मराठी: OBS translationNotes

Updated ? hours ago # views See on DCS Draft Material

01-01

उत्पत्ति

म्हणजे, देवाव्यतिरीक्त इतर सर्व गोष्टींची सुरुवात झाली किंवा अस्तित्वात आले.

निर्मिती

येथे या शब्दाचा अर्थ शून्यातून निर्माण करणे.

विश्व

या मध्ये देवाने पृथ्वीवर आणि स्वर्गात निर्माण केलेले सर्व, दृष्य व अदृष्य सुद्धा येते.

अंधार

पुर्णपणे अंधार होता. प्रकाश मुळीच नव्हता, देवाने अद्याप प्रकाश निर्माण केला नव्हता.

उजाड

रिकामी, देवाने अद्याप काहीही निर्माण केले नव्हते फक्त उजाड पृथ्वी होती व त्यावर पाणी होते.

काही स्थापना करण्यात आली नव्हती

एकापेक्षा दुसरे काही वेगळे असे दिसत नव्हते परंतू सर्व काही पाण्याने वेढलेले होते.

देवाचा आत्मा

देवाचा आत्मा काही ठीकाणी याला पवित्र आत्मा असे म्हटलेले आहे, तो सूरूवाती पासूनच हजर होता, त्याने योजलेल्या गोष्टी करण्यासाठी, मुक्तपणे हालचाल करीत होता.

01-02

देव बोलला

देव केवळ शब्द बोलला आणि प्रकाश झाला.

होवो

ही आज्ञा होती आणि त्याप्रमाणे झाले कारण देव बोलला. हे विधान खात्रीपूर्वक भाषांतरीत करता येते की हे निश्चित घडले. उदा., तुम्ही असे भाषांतर करू शकता देव म्हणाला प्रकाश होवो.

प्रकाश

देवाने हा एक विशेष प्रकारचा प्रकाश निर्माण केला होता, कारण तो पर्यंत सुऱ्याची निर्मिती झाली नव्हती.

चांगला होता

उत्पत्तीच्या गोष्टीमध्ये हे शब्द पुन्हा पुन्हा येतात आणि उत्पत्तीच्या प्रत्येक अवस्थेत यावर जोर देते की ते देवाला आवडणारे आहे आणि त्याची योजना व त्याचे बेत सिद्धिस नेत आहे.

उत्पत्ती

हा शब्द सहा दिवसाचा कालावधीसाठी वापरला आहे यामध्ये जे काही अस्तित्वात आले ते देवाने निर्माण केले.

01-03

दुसरा दिवस

देवाने उत्पत्तीचे कार्य सुव्यवस्थित, हेतूपूर्वक व क्रमवार होते. प्रत्येक दिवशी ज्या गोष्टी त्याने निर्माण केल्या त्या अगोदरच्या दिवशी केलेल्या गोष्टीच्या पुढच्या व त्यावर अवलंबलेल्या अशा होत्या.

देव बोलला

देव आज्ञा देवून बोलला व अंतराळ झाले.

निर्माण केले

देवाने शून्यातून अंतराळ निर्माण केले.

अंतराळ

हा शब्द पृथ्वीच्या वरचा सर्व भाग, अवकाश सूचीत करतो त्यामध्ये श्वास घेतो ती हवा आणि स्वर्गही येतो.

01-04

तिसरा दिवस

पूढे दिवसाच्या क्रमवारीतल्या मालिकेत देवाने जीवनासाठी पृथ्वीला तयार केले.

देव बोलला

देवाने आज्ञा केली आणि कोरडी भूमी निर्माण केली.

पृथ्वी

हा शब्द चिखल व माती या अर्थाने इथे वापरला आहे. ज्या मूळे कोरडी भूमी तयार झाली. 01-01  मधील “पृथ्वी” ह्या शब्दाचा अर्थ संपूर्ण जगात राहणारे लोक असा होतो.

निर्मिती

शून्यातून निर्माण करणे या अर्थाने हा शब्द येथे वापरला आहे.

01-05

देव बोलला

देवाने सर्व झाडेझूडपे वनस्पती शब्दाने आज्ञा देऊन निर्माण केली.

पृथ्वी उपजवो

ही आज्ञा आणि ताबडतोब त्या प्रमाणे झाले, कारण देव बोलला.

सर्व प्रकारची

निरनिरीळ्या जाती किंवा प्रकारची झाडे वनस्पती

निर्माण केल्या

इथे हा शब्द शुन्यातून निर्माण केले, निर्माण करण्यासाठी देवाला कसल्याही वस्तूची, पदार्थाची गरज नाही.

चांगले झाले

उत्पत्तीच्या गोष्टीमध्ये हे शब्द वारंवार येतात, उत्पत्तीचा प्रत्येक टप्पा देवाला आवडणारा व त्याची योजना, हेतू पुर्ण करणारा आहे, हे ठामपणे या शब्दातून सांगीतले आहे.

01-06

चौथा दिवस

दिवसाच्या क्रमवार मालिकेतील पुढचा दिवस ज्यात देवाने निर्मीतीचे कार्य केले.

देव बोलला

देवाने सुर्य,चंद्र, आणि तारे बोलून आज्ञा दिली व निर्माण केले.

प्रकाश

आकाशात प्रकाशणारी वस्तू जी आता पृथ्वीला प्रकाश देते.

दिवस आणि रात्र ऋतू आणि वर्षे

देवाने प्रत्येक छोट्या व मोठ्या कालावधीच्या खुणा दाखविण्याकरिता वेगळा प्रकाश निर्माण केला आणि त्याचे हे चक्र काळाच्या अंतापर्यंत चालेल असे केले.

निर्माण केले

इथे या शब्दाचा अर्थ शुन्यातून निर्माण केले असा आहे. देवाला निर्माण करण्यासाठी कसल्याही वस्तूची, पदार्थाची गरज नाही.

01-07

पाचवा दिवस

देवाचे चार दिवसापासून सुरू केलेले, उत्पत्तीचे कार्य क्रमवार प्रगतीने चालू आहे

देव बोलला

देवाने पक्षी व पाण्यातील जलचर हे नुसत्या शब्दाने आज्ञा देऊन निर्माण केले.

जे काही पाण्यात पोहते ते सर्व

देवाने फक्त मासे बनवले नाहीत पण पाण्यात राहणारा प्रत्येक जीव अस्तित्वात असणारी प्रत्येक गोष्ट देवाची इच्छा होती म्हणून निर्माण करण्यात आली.

सर्व पक्षी

देवाने फक्त एक प्रकारचा पक्षी निर्माण केला नाही परंतू अनेक आश्चर्यकारक प्रकारचे, आकाराचे, रंगाचे असे निर्माण केले.

ते चांगले होते

उत्पत्ती मध्ये हा शब्द पुन्हा पुन्हा येतो हे दाखविण्यासाठी की प्रत्येक गोष्ट अगदी देवाच्या सुज्ञ योजना व हेतू प्रमाणे झाली.

त्यांना आशिर्वाद दिला

देवाने त्यांच्याविषयी आपली इच्छा प्रदर्शित केली की त्यांची वृद्धी व्हावी व ज्या जगात त्यांना ठेवले आहे तेथे त्यांचे ठीक चालावे.

01-08

सहावा दिवस

निर्मिती काऱ्यातील क्रमवार पद्धतीने व प्रगतीने पुढे जाणाऱ्या दिवसातील ही पुढची घटना

देव बोलला

देवाने बोललेल्या शब्दामुळे गुरेढोरे यांची निर्मिती झाली.

सर्व प्रकारची

पुष्कळ निरनिराळ्या प्रकारची पण व्यवस्थित हे दर्शविते

पृथ्वीवरील जनावरे

जमिनीवर फिरतो तो प्रत्येक प्रकारचा पशू, पक्षी व समुद्रातील प्राणी या पेक्षा वेगळा असे हे प्राणी.

ग्रामपशू

निरनिराळ्या प्रकारचे ग्रामपशू जे सर्व सामान्यपणे मनुष्यांमध्ये शांतीने राहतात पाळीव किंवा माणसाळलेले प्राणी.

जमिनीवर सरपटणारे

या मध्ये बहुतकरून सरपटणारे प्राणी तसेच किडे, किटक येतात.

वन्य

हे अशा प्रकारचे प्राणी की जे मनुष्यामध्ये शांतीने राहत नाहीत, कारण त्यांना लोकांची भिती वाटते किंवा ते लोकांना धोकादायक असतात.

ते चांगले आहे

उत्पत्ती मध्ये हा शब्द पुन्हा पुन्हा येतो हे दाखविण्यासाठी की प्रत्येक गोष्ट अगदी देवाच्या सुज्ञ योजना व हेतू प्रमाणे झाले.

01-09

आपण

यातून देवाने हेतूपुर्वक स्वईच्छेने मनुष्याला विशेष रितीने विशेष हेतू साठी बनवले हे दिसते. तुम्ही याचे असे भाषांतर करू शकता, “आपण बनवू या”.

आपण, आमचे,

देव एकच आहे असे पवित्र शास्त्र शिकवते, परंतू जुन्या करारामध्ये देव स्वतःशी बोलताना अनेकवचन वापरतो.

काही लोक असे समजतात की ही देवाची विशेष पद्धत आहे. त्याद्वारे देवाची महानता स्पष्ट होते व काही लोक असे समजतात की देव

जो पिता, देव

आपल्या प्रतिरूपाचा

प्रतिरूप हे एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या गोष्टीचे शारीरिक प्रतिनिधीत्व करते. मनुष्ये अशी बनिवली गेली की त्यांनी देवाचे काही गुण स्वभाव प्रकट करावेत

आपल्या समान

मनुष्यामध्ये देवासारखा काही स्वभाव आहे पण त्याच्यासारखे सर्वच गुण नाहीत. हे शब्द असे भाषांतर केले जावे जेणेकरुन त्यात असे दर्शविले गेले पाहीजे की माणूस देवासारखा आहे. पण देवाच्या बरोबरीचा नाही. किंवा तंतोतंत त्याच्यासारखा नाही.

अधिकार

देवाने मानवाला अधिकार व सामर्थ्य दिले यासाठी त्याने पृथ्वी व त्यातील प्राणी यांचा कारभार कसा चालवावा याचे नियंत्रण व मार्गदर्शन करावे.

01-10

काही चिखल घेतला

देवाने जमिनीवरच्या मातीचा मनुष्य बनवला हा शब्द पृथ्वी या शब्दाला जो सर्वसामान्य शब्द वापरतो त्यापेक्षा वेगळा आहे.

घडवले

हा शब्द सुचवतो की देवाने व्यक्तीशः माणसाला बनवले. जसे एखादा मनुष्य आपल्या हातांनी काही तरी घडवतो, बनवतो. “निर्माण केले” या पेक्षा वेगळा शब्द वापरला आहे हे लक्षात घ्या. त्याने सर्व काही केवळ शब्द बोलून आज्ञा देवून झाले पण ह्याला वेगळ्या पद्धतीने घडवले हे लक्षात घ्या.

माणूस

त्या वेळी फक्त माणूसच घडवला, स्त्री नंतर घडवली व वेगळ्या पद्धतीने घडवली.

जीवनाचा श्वास फुकला

देवाने जेव्हा स्वतःतून जीवनाचा श्वास आदामाच्या शरिरात फुंकला तेव्हा ही कृती अगदी वैयक्तीक व जिव्हाळ्याने केलेली कृती होती असे शब्दातून दिसते. जसे की एखादा माणूस उच्छवासातून हवा बाहेर सोडतो.

जीवन

या घटनेत देवाने शाररिक व आत्मिक अशा दोन्ही जीवनाचा श्वास फुंकला.

आदाम

जुन्या करारात मनुष्यासाठी जो शब्द वापरला तोच शब्द आदामाच्या नावासाठी वापरला आहे. आणि त्याच शब्दासारखा शब्द चिखल या शब्दासाठी आहे.

बाग

जमिनीचा असा भाग ज्यात झाडे व वनस्पती लावले आहेत ज्याचा हेतू खाण्यास अन्न मिळवने व शोभा देणे हा हेतू होता.

निगा राखणे

बागेची काळजी घेणे, तण काढणे,पाणी देणे पेरणे, कापणे इ.

01-11

मध्यभागी

मध्यभागाची जागा दोन झाडाचे महत्व दाखवते

बाग

असा जमिनीचा भाग ज्यात झाडे व वनस्पतीची लागवड केली जाते, ज्यामुळे अन्न व शोभा निर्माण व्हावी हा हेतू असतो.

जीवनाचे झाड

जो ह्या झाडाचे फळ खाईल तो कधीच मरणार नाही.

बऱ्या वाईटाचे ज्ञान देणारे झाड

ह्या झाडाचे फळ एखाद्या माणसाला बरे आणि वाईट या दोन्ही गोष्टीचे ज्ञान देवू शकते.

ज्ञान

वैयक्तिक अनुभवावरून ओळखणे किंवा समजणे

बरे आणि वाईट

वाईट हे चांगल्याच्या विरूध्द असते. जसे “चांगले” म्हणजे देवाला आवडणारे, तसे “वाईट” म्हणजे देवाला आवडत नाही ते सर्व काही

मरणे

या प्रसंगात तो शाररिक व आत्मिक दोन्ही रितीने मरेल.

01-12

चांगले नाही

उत्पत्ती काऱ्यातली ही पहिलीच वेळ होती की जी चांगली नव्हती. याचा अर्थ “अद्याप चांगले नाही” कारण मनुष्याच्या निर्मितीचे कार्य अजून पुर्ण झाले नव्हते.

एकटा

आदाम हा एकटा माणूस होता, दुसऱ्यांशी नाते संबंध प्रस्थापित करण्यासाठी दुसरा माणूस नव्हता, आणि मुले बाळे उत्पन्न करु शकत नव्हता, आणि बहुगुणित होऊ शकत नव्हता.

आदामाची मदतगार

आदामासारखा दुसरा कोणी नव्हता जो त्याला दिलेल्या कामात त्याची मदत करेल. कोणताही प्राणी हे करू शकत नव्हता.

01-13

गाढ झोप

ही झोप सर्व साधरण झोपे पेक्षा गाढ होती.

आदामाची एक फासळी घेतली व बनविले

आदामातून एक फासळी घेवून त्याची स्त्री बनवली हे क्रियापद देवाची वैयक्तिक क्रिया दाखवते.

स्त्री

ती पहिली स्त्री मनुष्य जातीची नवी आवृत्ती होती, आतापर्यंत तशी अस्तित्वात नव्हती.

तिला त्याच्याकडे आणले

देवाने स्वतः त्यांची ओळख करून दिली. त्याने आदामाला स्त्रीची देणगी दिली, जणू काही विशेष देणगी.

01-14

शेवटी!

आदामाचा हा उद्गार दाखवतो की तो ह्या सारख्या गोष्टीची वाट बघत होता.

माझ्यासारखी

ही स्त्री अगदी आदामासारखी होती जरी त्यांच्यामध्ये काही महत्वाचे फरक होते.

स्त्री

पुरूष या शब्दाचे स्त्रीलिंगीरूप आहे.

मनुष्यापासून बनवलेली

स्त्री ही प्रत्यक्ष आदामाच्या शरिरातून बनवली होती.

पुरूष सोडतो

हे वर्तमान काळाचे रूप आहे, भविष्यकाळातही सर्वसामान्य स्थिती राहिल हे दर्शवते. आदामाला आई वडिल नव्हते पण इतर पुरूषांना असणार होते.

ते एक होतील

नवरा व बायको यांचे अत्यंत जवळीकतेचे संबंध व ते भागीदार असतिल व त्यांचे एकमेकांशी समर्पित असे नाते असेल ते इतर नात्यांपेक्षा अधिक घनिष्ठ असतील.

01-15

देवाने बनवले

देवाने पुरूष व स्त्री यांना स्वतःच्या हाताने बनवले.

स्वतःच्या प्रतिरुपात

प्रतिरूप हे कोणा व्यक्तीचे किंवा वस्तूचे भौतिक / शारीरिक प्रतिनिधीत्व करते. देवाने लोकांना यासाठी बनविले की त्यांनी त्याचे काही गुण, स्वभाव प्रकट करावे, पण त्यामुळे ते त्याच्या समान होत नाही.

फार चांगले

आधिच्या दिवसातील “चांगले आहे” त्यापेक्षा फार चांगले असे. “फार चांगले” हे सर्व उत्पत्ती विषयी आहे, फक्त स्त्री व पुरूषा विषयी नाही. सर्व गोष्टी देवाला हव्या होत्या तशाच झाल्या.

निर्मिती

सहा दिवसाच्या कालावधित जे काही अस्तित्वात होते ते देवाने बनवले.

01-16

सातवा दिवस

सहा दिवसानंतरच्या पुढच्या दिवशी उत्पत्तीचे कार्य पुर्ण झाले.

त्याचे कार्य संपले

विशेषतः त्याचे निर्मितीचे कार्य संपले. तो आताही इतर कामे करीत आहे.

देवाने विश्रांती घेतली

देवाने विश्रांती घेतली याचा अर्थ त्याने काम थांबवले कारण उत्पत्तीचे काम पूर्ण झाले होते. देव थकला नव्हता किंवा त्याला काम करता येत नव्हते असे नाही.

सातव्या दिवसाला आशिर्वादित केले

देवाची एक विशेष व निश्चित अशी योजना होती, आणि त्या नंतर येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी ती योजना होती.

पवित्र केला

म्हणजे असे की देवाने हा दिवस इतर दिवसापेक्षा “वेगळा” केला. व त्याला विशेष असे मानले. आठवड्याच्या सहा दिवसाप्रमाणे त्याचा उपयोग करावयाचा नव्हता.

विश्व

य़ात देवाने पृथ्वीवर आणि स्वर्गात जे काही दृश्य व अदृश्य निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टींचा समावेश होतो.

पवित्र शास्त्रातील गोष्ट

हे संदर्भ पवित्र शास्त्रातील इतर भाषांतरात थोडेसे वेगळे असण्याची शक्यता आहे.