मराठी: Open Bible Stories

Updated ? hours ago # views See on DCS

सृष्टी

OBS Image

अशा प्रकारे सर्व गोष्टींची सुरुवात झाली. देवाने सर्व जग व त्यातील सर्व वस्तु सहा दिवसामध्ये बनविल्या.पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर ती तशीच काळोखी व रिकामी होती, व तिच्यावर काहीच नव्हते. परंतु देवाचा आत्मा तेथे जलावर (पाण्यावर) होता.

OBS Image

मग देव बोलला, “प्रकाश होवो! आणि प्रकाश झाला. देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे आणि त्याने त्यास “दिवस म्हटले.” देवाने त्यास अंधारापासून वेगळे केले व अंधारास “रात्र” म्हटले. देवाने सृष्टीच्या पहिल्या दिवशी प्रकाश बनविला.

OBS Image

उत्पत्तीच्या दुसऱ्या दिवशी, देव बोलला आणि पृथ्वीच्या वरती आकाश बनविले. त्याने वरील व खालील जलाशयास वेगळे करत आकाश बनविले.

OBS Image

तिसऱ्या दिवशी, देव बोलला आणि पाण्यापासून कोरडी भूमि वेगळी केली. त्याने कोरडया भूमिस “पृथ्वी” व पाण्यास “समुद्र” म्हटले. देवाने पाहिले की त्याने जे कांही निर्माण केले ते चांगले आहे.

OBS Image

मग देव बोलला, “पृथ्वीवर वेगवेगळया प्रकारची झाडे तयार होवोत.” आणि तसेच झाले. देवाने पाहिले की त्याने जे कांही निर्माण केले ते सर्व चांगले आहे.

OBS Image

सृष्टीच्या चौथ्या दिवशी, देवाने आपल्या शब्दाद्वारे सूर्य, चंद्र व तारे बनविले. देवाने त्यांना पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी व दिवस रात्र, ॠतु व वर्षे दर्शविण्यासाठी बनविले. देवाने पाहिले की जे त्याने निर्माण केले ते सर्व चांगले आहे.

OBS Image

पाचव्या दिवशी, देवाने जलचर प्राणी व पक्षी बनविले. देवाने पाहिले की हे चांगले आहे आणि त्याने त्यांना आशीर्वाद दिला.

OBS Image

उत्पत्तीच्या सहाव्या दिवशी, देव बोलला,“पृथ्वीवर वस्ती करणारे प्राणी तयार होवोत!” आणि देवबाप बोलल्याप्रमाणेच सर्व काही झाले. अशा प्रकारे काही ग्रामपशु, जमीनीवर रांगणारे व कांही वन्यपशु निर्माण झाले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.

OBS Image

मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य आपण करू. त्यांना पृथ्वीवर व सर्व प्राण्यांवर सत्ता चालवता येईल.”

OBS Image

मग देवाने मातीपासून मनुष्य निर्माण केला व त्याच्या नाकपुड्यात जीवनी श्वास फुंकला. हया मनुष्याला आदाम हे नाव देण्यात आले. देवाने आदामाला राहण्यासाठी एक बाग निर्माण केली व त्याची काळजी घेण्यासाठी त्याला तेथे ठेवले.

OBS Image

बागेच्या मध्यभागी, देवाने दोन खास झाडे लावली-- जीवनाचे झाड व बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणारे झाड. देवाने आदामास सांगितले की त्याने बागेमधून कुठल्याही झाडाचे फळ खावे, फक्त बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नये. जर त्याने त्या झाडाचे फळ खाल्ले, तर तो निश्चित मरेल.

OBS Image

मग देव बोलला, “मनुष्य एकटा असणे हे बरे नाही. परंतु प्राण्यांमध्ये आदामासाठी योग्य जोडीदार मिळाला नाही.

OBS Image

मग देवाने आदामाला गाढ अशी निद्रा लागू दिली. मग देवाने आदामाच्या एका फासळीपासून एक स्त्री तयार करुन तिला आदामासमोर आणले.

OBS Image

आदामाने तिच्याकडे पाहून म्हटले, “शेवटी मिळाली! ही तर माइयासारखीच आहे! तिला ‘नारी’ म्हणावे कारण, ‘ ती नरापासून बनविली आहे.” आणि म्हणूनच पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या पत्नीशी जडून राहतो

OBS Image

देवाने आपल्या प्रतिरूपाचे स्त्री पुरुष बनवले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “तुम्हाला पुष्कळ मुलेमुली व नातवंडे होवोत व पृथ्वी भरून टाका !” देवाने पाहिले की सर्व काही चांगले आहे, व त्या सर्वाविषयी तो आनंदित झाला. हे सर्व उत्पत्तीच्या सहाव्या दिवशी, घडले

OBS Image

सातव्या दिवशी निर्मीतीचे काम पूर्ण झालेले होते. मग आपल्या कामापासून त्या दिवशी देवाने विश्रांती घेतली. देवाने सातव्या दिवसाला आशीर्वादित करुन पवित्र ठरविले कारण त्या दिवशी त्याने आपल्या कामापासून विश्रांती घेतली. अशा प्रकारे जग व त्यातील सर्व काही देवाने निर्माण केले.

बायबल कथाःउत्पत्ति 1 -2