मराठी (Marathi): translationWords

Updated ? hours ago # views See on DCS Draft Material

Key Terms

अंतिम दिवस, नंतरचे दिवस

व्याख्या:

"अंतिम दिवस" ​​किंवा "नंतरचे दिवस" ​​या शब्दाचा संदर्भ साधारणपणे चालू काळाच्या शेवटाशी असतो.

  • या कालावधीची मर्यादा माहित नसते.
  • देवापासून दूर गेलेल्यांसाठी "शेवटचे दिवस" ​हे ​न्याय करण्याचा समय आहे.

भाषांतर सूचना:

  • "शेवटचे दिवस" या शब्दाचे भाषांतर "अंतिम दिवस" किंवा "अंतिम समय" म्हणून देखील केले जाऊ शकते.
  • काही संदर्भांत, ह्याचे भाषांतर "जगाचा शेवट" किंवा "जेव्हा हे जग संपेल" असे म्हणून केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: परमेश्वराचा दिवस, न्याय, वळणे, जग)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0319, H3117, G20780, G22500

अधर्म

व्याख्या:

"अधर्म" हा शब्द "पाप" या शब्दाशी अगदी समान आहे, परंतु अधिक विशिष्टपणे चुकीच्या किंवा मोठ्या दुष्टपणाच्या जाणीवपूर्वक कृत्यांचा संदर्भ घेऊ शकतो.

  • “अधर्म” या शब्दाचा शाब्दिक अर्थ (कायद्याला) वळवणे किंवा विकृत करणे. हे मोठ्या अन्यायाला संदर्भित करते.
  • इतर लोकांविरुद्ध जाणूनबुजून, हानिकारक केलेली कृती म्हणून अधर्माचे वर्णन केले जाऊ शकते.
  • अधर्माच्या इतर व्याख्यांमध्ये "विपर्यास" आणि "दुराचार" यांचा समावेश होतो, जे दोन्ही शब्द भयंकर पापाच्या परिस्थितीचे वर्णन करणारे आहेत.

भाषांतर सूचना:

  • “अधर्म” या संज्ञेचे भाषांतर “दुष्टता” किंवा “विपरीत कृती” किंवा “हानीकारक कृत्ये” असे केले जाऊ शकते.
  • बर्‍याचदा, “पाप” आणि “अपराध” या शब्दाच्या समान मजकुरात “अधर्म” हा शब्द आढळतो म्हणून या संज्ञांचे भाषांतर करण्याचे वेगवेगळे मार्ग असणे महत्त्वाचे आहे.

(हे देखील पाहा: पाप, अपराध, उलंघन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0205, H1942, H5753, H5758, H5766, H5771, H5932, H5999, H7562, G00920, G00930, G04580, G38920, G41890

अधिकार

व्याख्या:

“प्राधिकरण” या शब्दाचा अर्थ सामान्यपणे प्रभाव, जबाबदारी किंवा दुसर्‍या व्यक्तीवर राज्य करणे या पदांवर असतो.

  • राजे आणि इतर राज्य करणारे सत्ताधारी लोकांवर सत्ता गाजवितात.
  • “अधिकारी” हा शब्द लोक, सरकार किंवा इतरांवर अधिकार असलेल्या संस्थांचा संदर्भ घेऊ शकतो.
  • “अधिकारी” हा शब्द अशा आत्मिक प्राण्यांनाही सूचित करू शकतो ज्यांनी स्वतःला देवाच्या अधिकाराच्या अधीन नसलेल्या लोकांवर अधिकार दिला आहे.
  • मालकाचा सेवक किंवा गुलामांवर अधिकार आहे. पालकांचा आपल्या मुलांवर अधिकार आहे.
  • सरकारांना त्यांच्या नागरिकांवर राज्य करणारे कायदे करण्याचा अधिकार किंवा अधिकार आहे.

भाषांतर सुचना:

  • "अधीकार" या शब्दाचे भाषांतर "नियंत्रण" किंवा "योग्य" किंवा "पात्रता" म्हणून देखील केले जाऊ शकते.
  • कधीकधी “अधिकार” याचा अर्थ “सामर्थ्य” असा होतो.
  • जेव्हा "अधिकारी" लोक किंवा राज्य करणारे लोक किंवा संस्थांचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जातात तेव्हा त्याचे भाषांतर "पुढारी" किंवा "राज्यकर्ते" म्हणून देखील केले जाऊ शकते
  • “त्याच्या स्वत: च्या अधिकाराने” या वाक्यांशाचे भाषांतरही “स्वत: च्या पुढाकाराच्या स्वत: च्या अधिकार” किंवा “त्याच्या स्वतःच्या पात्रतेनुसार” असे केले जाऊ शकते.
  • “अधिकाराच्या अधीन” या अभिव्यक्तीचे भाषांतर “आज्ञा पाळण्यास जबाबदार” किंवा “इतरांच्या आज्ञा पाळायला” म्हणून केले जाऊ शकते.

(हे देखील पहा: राज्य, राजे, शासक, शक्ती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 8633, जी 831, जी 1413, जी 1849, जी 1850, जी 2003, जी 2715, जी 5724

अधिराज्य

व्याख्या:

"अधिराज्य" ही संज्ञा शक्ती, नियंत्रण, किंवा लोकांवर, प्राण्यांवर, किंवा जमिन यावरील अधिकारास संदर्भित करते.

  • येशू ख्रिस्ताचे संदेष्टा, याजक आणि राजा म्हणून संपूर्ण पृथ्वीवर अधिराज्य आहे असे म्हटले जाते.
  • येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर मृत्यू झाल्यामुळे सैतानाच्या राज्याचा कायमचा पराभव झाला आहे.
  • उत्पत्तीच्या वेळी, देव म्हणाला की, मनुष्याला माश्यांवर, पक्षांवर, आणि पृथ्वीवरील सर्व प्राण्यांवर सत्ता आहे.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "अधिकार" किंवा "सत्ता" किंवा "नियंत्रण" यांचा समावेश होतो.
  • "च्या वर सत्ता गाजवा" या वाक्यांशाचे भाषांतर "राज्य करा" किंवा "व्यवस्थापन करा" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: अधिकार, सत्ता)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच1166, एच4474, एच4475, एच4896, एच4910, एच4915, एच7287, एच7300, एच7980, एच7985, जी026340, जी29040, जी29610, जी29630

अधोलोक, मृतलोक

व्याख्या:

"हेड्स" (ग्रीक मध्ये) आणि "शीओल" (इब्रीमध्ये) या संज्ञा "खालील जगासाठी" योग्य नावे आहेत, म्हणजे एक भूमिगत निवासस्थान जिथे प्राचीन संस्कृतीतील लोकांचा असा विश्वास होता की मृत व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर जाईल.

  • जुन्या करारात, इब्री संज्ञा "शीओल" एकतर विशेष नाव किंवा सामान्य नाम म्हणून वापरली जाऊ शकते ज्याचा अर्थ "भूमिगत" असा आहे.
  • नवीन करारामध्ये, ग्रीक संज्ञा "हेड्स" याचे वर्णन येशूला नाकारलेल्या मृत लोकांसाठी एक स्थान म्हणून केले आहे. नवीन कराराचे वर्णन लोक मृतलोकाकडे "खाली जाणे" असे म्हणून करतात.

भाषांतर सूचना:

  • जुन्या करारातील "अधोलोक" ही संज्ञा संदर्भानुसार विविध प्रकारे भाषांतरील केली जाऊ शकते. काही शक्यतांचा समावेश आहे: "मृतांची जागा;" "मृत आत्म्यांसाठी जागा;" "खड्डा;" किंवा "मृत्यू."
  • संदर्भानुसार नवीन कराराचा शब्द "हेड्स" याचे विविध प्रकारे भाषांतर केले जाऊ शकते. काही शक्यतांमध्ये समाविष्ट आहे: "अविश्वासू मृत आत्म्यांसाठी जागा;" "मृतांना त्रास देण्याचे ठिकाण;" किंवा "अविश्वासू मृत लोकांच्या आत्म्यांसाठी जागा."
  • काही भाषांतरे "अधोलोक" आणि "मृत्यूलोक" हे शब्द असेच ठेवून, भाषांतर करण्याच्या भाषेमध्ये ते व्यवस्थित बसतील ह्याप्रमाणे त्यांच्या शब्दाच्या वर्णामध्ये बदल करतात. (पाहाः अज्ञात कसे भाषांतरित करावे)
  • हे स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक शब्दाबरोबर एका वाक्यांशास जोडले जाऊ शकते, अे करण्याची उदाहरणे आहेत, "अधोलोक, मेलेल्या लोकांची जागा" आणि "मृत्यूलोक, मृतांची जागा."

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: मृत्यू, स्वर्ग, नरक, कबर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती

  • स्ट्रोंग: एच7585, जी00860

अनंतकाळ, सनातन, सार्वकालिक, सर्वदा

व्याख्या:

“सनातन” आणि “सार्वकालिक” या शब्दाचे अगदी सारखे अर्थ आहेत आणि ते कायम अस्तित्त्वात असलेल्या किंवा कायमचे टिकून राहणाऱ्या एखाद्या गोष्टीचा संदर्भ देते.

  • “अनंतकाळ” हा शब्द अस्तित्वाची स्थिती आहे ज्याचा प्रारंभ किंवा शेवट नाही याला संदर्भित करतो. हे कधीही न संपणाऱ्या जीवनाला देखिल संदर्भित करते
  • पृथ्वीवरील या सध्याच्या जीवनानंतर, मानव देवाबरोबर स्वर्गात किंवा देवाला सोडून नरकात अनंतकाळ घालवेल.
  • नवीन करारात “सार्वकालिक जीवन” आणि “अनंतकाळाचे जीवन” या शब्दाचा उपयोग स्वर्गात देवाबरोबर सदासर्वकाळ राहण्याच्या संदर्भात केला जातो.

“सर्वदा” हा शब्द कधीही न संपणाऱ्या काळाचा अर्थ आहे.

  • “सदैव आणि सदासर्वकाळ” या वाक्यात काळाची कल्पना येते जी कधीही संपत नाही आणि सार्वकालिक किंवा अनंतकाळचे जीवन कसे असते ते व्यक्त करते. हे यावर जोर देते की काहीतरी नेहमीच घडेल किंवा अस्तित्वात असेल. तो कधीही न संपणाऱ्या काळाचा संदर्भित करते.
  • देव म्हणाला की दाविदाचे सिंहासन “सदासर्वकाळ” राहील. हा दावीदाचा वंशज आहे या तथ्याला संदर्भित आहे

भाषांतरातील सूचना:

  • “सार्वकालीक” किंवा “अनंतकाळ” या शब्दांना अनुवादित करण्याच्या इतर मार्गांमध्ये “न संपणारे” किंवा “कधीही न थांबणारे” किंवा “नेहमीच चालू असणारे” या वाक्यांचा समावेश असू शकतो.
  • “सार्वकालिक जीवन” आणि “अनंकाळाचे जीवन” या वाक्यांशाचे भाषांतर “कधीही न संपणारे आयुष्य” किंवा “न थांबता चालणारे आयुष्य” किंवा “आपल्या शरीराला सर्वदा जणण्यासाठी उठवणे” असेही केले जाऊ शकते.
  • संदर्भानुसार, “अनंतकाळ” भाषांतरित करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांमध्ये “काळाच्या बाहेरचे अस्तित्व” किंवा “न संपणारे जीवन” किंवा “स्वर्गातील जीवन” या वाक्यांशाचा समावेश असू शकते.
  • या शब्दाचा स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत पवित्र शास्त्रातील भाषांतरात कसा अनुवाद केला जातो त्याचा विचार करा. (पाहा: [अज्ञात भाषांतर कसे करावे])
  • “सर्वदा” या शब्दाचे भाषांतर “नेहमी” किंवा “कधीही न संपणारे” याद्वारे देखील केले जाऊ शकते.
  • “सर्वदा टिकणारे” या वाक्यांशाचे भाषांतर “सदैव अस्तित्त्वात” किंवा “कधीच थांबणार नाही” किंवा “कायम राहील” असेही केले जाऊ शकत.
  • “सदैव आणि सदासर्वकाळ” या जोरदार वाक्यांशाचे भाषांतरही “नेहमीसाठी आणि नेहमी” किंवा “कधी न संपणारे” किंवा “कधीच संपत नाही” असेही केले जाऊ शकते.
  • दाविदाचे सिंहासन सर्वदा टिकून राहील याचे भाषांतर “दावीदाचा वंश सदासर्वकाळ राज्य करील” किंवा “दावीदाचा वंशज नेहमी राज्य करीत असेल.” असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: दावीद, राज्य, जीवन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्रांच्या कथांतील उदाहरणे:

  • 27:1 एके दिवशी यहुदी नियमशास्त्राचा एक तज्ज्ञ येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला, म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?””
  • 28:1 एके दिवशी, एक श्रीमंत तरुण राज्यकर्ता येशूकडे आला आणि त्याला विचारले, “उत्तम गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी मी काय करावे?” येशू त्याला म्हणाला, “तू मला चांगल्या गोष्टीविषयी का विचारतोस? फक्त एकच चांगला आहे आणि तो म्हणजे देव. परंतु तूला अनंतकाळचे जीवन पाहिजे असल्यास, देवाच्या नियमांचे पालन कर.”
  • 28:10 येशूने उत्तर दिले, “ज्याने ज्याने माझ्या नावासाठी घरे, भाऊ, बहीण, वडील, आई, मुले किंवा मालमत्ता सोडली असेल त्याला 100 पट जास्त मिळेल आणि त्याला“अनंतकाळचे जीवन ”देखील मिळेल.”

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच3117, एच4481, एच5331, एच5703, एच5705, एच5769, एच5865, एच5957, एच6924, जी126, जी165, जी166, जी1336

अभिषेक करणे, अभिषिक्त, अभिषेक

व्याख्या:

"अभिषेक" या संज्ञेचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर तेल ओतणे किंवा चोळणे असा होता. कधीकधी तेलाला एक गोड, सुगंधी, वास देण्यासाठी त्यास मसाल्यांच्या मिश्रणात मिसळले जायचे. बायबलसंबंधी काळात, एखाद्याला तेलाने अभिषेक करण्याची अनेक कारणे होती.

  • जुना करारामध्ये, याजक, राजे आणि संदेष्टे यांना देवाच्या खास सेवेसाठी वेगळे करण्याकरिता तेलाने अभिषेक करण्यात येई.
  • देवाच्या उपासनेसाठी व गौरवासाठी उपयोगात येणार आहे हे दर्शविण्यासाठी वेदी किंवा निवासमंडप यासारख्या वस्तूंना तेलाचा अभिषेक करण्यात येत असे.
  • नवीन करारात, आजारी लोकांना बरे करण्यासाठी तेलाचा अभिषेक केला गेला.
  • नवा करार दोन वेळा नोंदवितो की उपासना म्हणून येशूला एका स्त्रीने सुगंधी तेलाने अभिषेक केला होता. एकदा येशू म्हणाला की हे करत असताना ती त्याच्या भावी अंत्यविधीची तयारी करत होती.
  • येशूचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मित्रांनी त्याचे शरीर तेल आणि मसाल्यांच्या अभिषेकाद्वारे दफन करण्यासाठी तयार केले.
  • "मसिहा" (इब्री) आणि "ख्रिस्त" (ग्रीक) या शीर्षकाचा अर्थ "अभिषिक्त (एक)" असा होतो.
  • येशू हाच मसिहा आहे जो संदेष्टा, महायाजक, आणि राजा म्हणून निवडला आणि अभिषिक्त केला गेला.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "अभिषेक" या संज्ञेचे भाषांतर "तेल ओतणे" किंवा "तेल लावणे" किंवा "सुगंधी तेल ओतून समर्पित करणे" असे केले जाऊ शकते.
  • "अभिषिक्त" या संज्ञेचे भाषांतर "तेलाने अभिषेक करून समर्पित होणे" किंवा "नियुक्त होणे" किंवा "समर्पित होणे" असे केले जाऊ शकते.
  • काही संदर्भांमध्ये "अभिषेक" या संज्ञेचे "नियुक्ती" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते.
  • "अभिषिक्त याजक" या शब्दाचे भाषांतर "तेलाने समर्पित केलेला याजक" किंवा "तेल ओतून वेगळा केलेला याजक" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: ख्रिस्त, समर्पित, महायाजक, यहूद्यांचा राजा, याजक, संदेष्टा)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द समुह:

  • स्ट्रोंग: एच0047, एच0430, एच1101, एच1878, एच3323, एच4397, एच4398, एच4473, एच4886, एच4888, एच4899, एच5480, एच8136, जी00320, जी02180, जी07430, जी14720, जी20250, जी34620, जी55450, जी55480

अमंगळ, किळसवाणे

व्याख्या:

"किळस" या शब्दाचा वापर एखाद्याचा तिटकारा किंवा अत्यंत नापसंती दर्शवण्यासाठी केला जातो.

  • मिसरी लोकांना इब्री लोकांची किळस वाटत असे. याचा अर्थ असा मिसरी लोक इब्री लोकांस नापसंत करतात आणि त्यांच्याबरोबर सलग्न होत नाहीत किंवा त्यांच्या जवळ जात नाहीत.
  • पवित्र शास्त्रामध्ये म्हटले आहे की अशा काही गोष्टी आहेत "ज्याचा यहोवाला वीट येतो" यात खोटेपणा, गर्व, मानवांचा त्याग करणे, मूर्तींची उपासना करणे, हत्या करणे आणि व्यभिचार व समलैंगिकता यासारख्या लैंगिक पापांचा समावेश आहे.
  • शेवटल्या काळाविषयी आपल्या शिष्यांना शिकवताना, येशूने दानिएल संदेष्ट्याकडून झालेल्या भविष्यवाणीत "उजाडलेल्या गोष्टींची किळस" याविषयी सांगितले ज्यानी देवाच्या विरोधात बंड करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या उपासनेची जागा भ्रष्ट केली.

भाषांतर सूचना

  • "किळस" या शब्दाचे भाषांतर "देवाला आवडत नसलेले काहीतरी" किंवा "किळसवाणी वस्तू" किंवा "तिरस्करणीय वागणूक" किंवा "अत्यंत वाईट कृती" असेही होऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "किळस आहे" असे वाक्यांश अनुवादित करण्याच्या पद्धतींमध्ये "मोठ्या प्रमाणावर द्वेष केला जातो" किंवा "किळसवाणी आहे" किंवा "पूर्णपणे अस्वीकार्य आहे" किंवा "अत्यंत वीट आणणारी" असू शकते.
  • "उजाडलेल्या गोष्टींची किळस" या शब्दाचे भाषांतर "लोकांना मोठी दुखापत करणारी भ्रष्ट वस्तू" किंवा " मोठे दुःख देणारे अमंगळ कृत्य" म्हणून अनुवादित केले जाऊ शकते.

(हे देखील पाहाः व्यभिचार, भ्रष्ट, उजाड, खोट्या देवता, अर्पण)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H887, H6292, H8251, H8262, H8263, H8441, G946

अविश्वासू (अप्रामाणिक), अविश्वास

व्याख्या:

"अविश्वासू" या शब्दाचा अर्थ विश्वास नसणे किंवा विश्वास ठेवत नसणे असा होतो.

  • या शब्दाचा उपयोग, जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत त्या लोकांचे वर्णन करण्यासाठी केला जातो. त्यांच्या विश्वासाची कमतरता, ते करत असलेल्या अनैतिक कृत्यांवरून दिसून येते.
  • यिर्मया संदेष्ट्याने इस्राएली लोकांना देवाशी अविश्वासू असण्याबद्दल आणिआज्ञा मोडल्याबद्दल दोष लावला.
  • इस्राएली लोकांनी मुर्त्यांची उपासना केली आणि जे लोकसमूह देवाची उपासना करत अनीठ किंवा देवाची आज्ञा पाळत नाहीत, त्याचे इतर अपवित्र रीतीरिवाजांचे अनुसरण केले.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "अप्रामाणिक" या शब्दाचे भाषांतर "अविश्वासू" किंवा "विश्वास नसलेला" किंवा "देवाची आज्ञा मोडणारा" किंवा "विश्वास ठेवत नसलेला" असे केले जाऊ शकते.
  • "अविश्वास" या शब्दाचे भाषांतर "अश्रद्धा" किंवा "विश्वासघात" किंवा "देवाविरुद्ध बंडखोर" असेही केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहाः नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे सुद्धा पहा: विश्वास, विश्वासू, अवज्ञा करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


आज्ञा करणे, आज्ञा

व्याख्या:

“आज्ञा करणे” या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्याला काहीतरी करण्यास आदेश देणे. “आज्ञा” हा शब्द एखाद्या व्यक्तीला करण्यास आज्ञा केलेल्या गोष्टीला संदर्भित करते.

  • “आज्ञा” या शब्दाचा अर्थ कधीकधी काही ठराविक देवाच्या नियमांना संदर्भित करतो ज्या अधिक औपचारिक आणि कायम असतात, जसे की "दहा आज्ञा".
  • आदेश सकारात्मक असु शकतात जसे ("आपल्या आईवडिलांचा आदर कर") किंवा नकारात्मक असू शकतात ("चोरी करू नको").
  • “ताबा घेणे” म्हणजे “नियंत्रण घेणे” किंवा एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्याचा “पदभार” घेणे.

भाषांतरातील सुचना

  • या संज्ञेचे भाषांतर “कायदा” या शब्दापेक्षा वेगळे करणे चांगले. “फर्मान” आणि “कायदे” यांच्या परिभाषांशी देखील तुलना करा.
  • काही भाषांतरकार आपल्या भाषेत समान शब्दांने “आज्ञा देणे” आणि “आज्ञा” हे शब्द भाषांतरीत करणे पसंत करतात.
  • इतर भाषांतरकार आज्ञा या शब्दासाठी विशेष शब्द वापरण्यास प्राधान्य देतात जे देवानं दिलेल्या सनातन आणि औपचारिक आज्ञेला संदर्भित करते.

(पहा डिक्री, statute, law, दहा आज्ञा)

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच559, एच560, एच565, एच1296, एच1696, एच1697, एच1881, एच2706, एच2708, एच2710, एच2941, एच2942, एच2951, एच3027, एच3982, एच3983, एच4406, एच4662, एच4687, एच4929, एच4931, एच4941, एच5057, एच5713, एच5749, एच6213, एच6310, एच6346, एच6490, एच6673, एच6680, एच7101, एच7218, एच7227, एच7262, एच7761, एच7970, एच8269, जी1263, जी1291, जी1296, जी1297, जी1299, जी1690, जी1778, जी1781, जी1785, जी2003, जी2004, जी2008, जी2036, जी2753, जी3056, जी3726, जी3852, जी3853, जी4367, जी4483, जी4487, जी5506

आत्मा, वारा, श्वास

व्याख्या:

"आत्मा" ही संज्ञा एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक भागाला संदर्भित करते ज्याला आपण पाहू शकत नाही. बायबलसंबंधी काळात, व्यक्तीच्या आत्म्याची संकल्पना एखाद्या व्यक्तीच्या श्वासाच्या संकल्पनेशी जवळून संबंधित होती. हा शब्द वाऱ्यालाही संदर्भित करतो, म्हणजेच नैसर्गिक जगामध्ये हवेची होणारी हालचाल.

  • "आत्मा" या शब्दाचा संदर्भ एका अस्तित्वाशी आहे, ज्याला भौतिक शरीर नाही, विशेषकरून दुष्ट आत्मा.
  • सामान्यपणे, "आत्मिक" हा शब्द असे काही जे या भौतिक जगामध्ये नाही याचे वर्णन करतो.
  • “आत्मा” या शब्दाचा अर्थ “शहाणपणाचा आत्मा” किंवा “एलीयाच्या आत्म्यामध्ये” यांसारखी “वैशिष्ट्ये असणे” असा देखील होऊ शकतो. कधीकधी पवित्र शास्त्रात हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या मनोवृत्ती किंवा भावनिक स्थितीच्या संदर्भात लागू करते, जसे की “भीतीचा आत्मा” आणि “ईर्ष्याचा आत्मा”.
  • येशू म्हणाला की देव एक आत्मा आहे.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "आत्मा" या शब्दाला भाषांतरित करण्याच्या काही पद्धतींमध्ये "भौतिक शरीर नसलेले अस्तित्व" किंवा "आतील भाग" किंवा "अंतस्थ अस्तित्व" या शब्दांचा समावेश होतो.
  • काही संदर्भांमध्ये, "आत्मा" हा शब्द "दुष्ट आत्मा" किंवा "दुष्ट आत्म्याचे अस्तित्व" म्हणून भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • काहीवेळा, "आत्मा" हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरला जातो, जसे या वाक्यामध्ये "माझ्या अंतःकरणामध्ये माझा आत्मा खिन्न झाला होता." याचे भाषांतर "मला माझ्या आत्म्यामध्ये दुःख झाले" असे देखील केले जाऊ शकते.
  • "चा आत्मा" या वाक्यांशाचे भाषांतर " चे गुण असणे" किंवा "चा प्रभाव असणे" किंवा च्या वृत्तीचा" किंवा "विचारधारेमधून (म्हणजे) स्वभाव स्पष्ट करणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "आत्मिक" या शब्दाचे भाषांतर "शारीरिक नसलेला" किंवा "पवित्र आत्म्यापासून असलेला" किंवा "देवाचा" किंवा "भौतिक नसलेल्या जगाचा भाग" असे केले जाऊ शकते.
  • लाक्षणिक अभिव्यक्ती, "आत्मिक दुध" या शब्दाचे भाषांतर "देवाचे मुलभूत शिक्षण" किंवा "देवाचे शिक्षण जे आत्म्याचे पोषण करते (जसे दुध करते)" असे केले जाऊ शकते.
  • "आत्मिक परिपक़्वता" या वाक्यांशाचे भाषांतर "ईश्वरी स्वभाव जो पवित्र आत्म्याची आज्ञाधारकता दर्शवतो" असे केले जाऊ शकतो.
  • "आत्मिक वरदाने" या शब्दाचे भाषांतर "विशिष्ठ क्षमता जो पवित्र आत्मा देतो" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा हवेच्या साध्या हालचालीचा संदर्भित करत असताना काहीवेळा या शब्दाचे भाषांतर "वारा" किंवा जेव्हा सजीव प्राण्यांमुळे हवेमध्ये झालेल्या हालचालीस "श्वास" असे केले जाऊ शकते. (See also: जीव, पवित्र आत्मा, दुष्ट, श्वास)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 13:03 तिन दिवसानंतर, लोकांची आत्मिक तयारी झाल्यानंतर, देव सिनाय पर्वताच्या शिखरावर मेघगर्जना, विजेचा प्रखर प्रकाश, धूर, प्रचंड शिंगाचा नाद यासह उतरून आला.
  • 40:07 तेव्हा येशू मोठयाने म्हणाला, ‘‘पूर्ण झाले! हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो.’’ तेंव्हा त्याने आपले डोके लववून प्राण सोडिला.
  • 45:05 स्तेफन मरत असताना, तो मोठ्याने ओरडला, "येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर."
  • 48:07 जगातील सर्व कुळे त्याच्याद्वारे आशीर्वादीत झाली, कारण जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होते व तो अब्राहामाचा आत्मिक वंशज होतो.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0178, H1172, H5397, H7307, H7308, G41510, G41520, G41530, G53260, G54270

आत्मा, स्वत:, व्यक्ती

व्याख्या:

"आत्मा" हा शब्द एकतर सामान्यत: एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक-नसलेल्या भागाचा संदर्भ घेऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दलची जागरूकता इतरांपेक्षा वेगळी व्यक्ती म्हणून उल्लेख करू शकतो.

  • पवित्र शास्त्रात "जीव" आणि "आत्मा" हे शब्द दोन भिन्न संकल्पना असू शकतात किंवा त्या दोन संज्ञा समान संकल्पनेला संदर्भित असु शकतात.
  • जेव्हा एखादा व्यक्ती मरण पावतो तेव्हा त्याचा आत्मा आपले शरीर सोडतो.
  • शरीराच्या विरुध्द, "आत्मा” एखाद्या व्यक्तीचा भाग म्हणून बोलला जाऊ शकतो जो "देवाशी संबंधित आहे."
  • कधीकधी संपूर्ण व्यक्तीचा संदर्भ घेण्यासाठी "आत्मा" हा शब्द लाक्षणिकरित्या वापरला जातो. उदाहरणार्थ, "जो पाप करतो तो आत्मा” म्हणजे "ज्याने पाप केले तो व्यक्ती" आणि "माझा आत्मा थकलेला आहे" म्हणजे "मी थकलो आहे."

भाषांतरातील सूचना:

  • "आत्मा” या शब्दाचे भाषांतर "आतील स्व" किंवा” आतील व्यक्ती" असे देखील केले जाऊ शकते
  • काही संदर्भांमध्ये, "माझा आत्मा” या वाक्यांशाचे भाषांतर "मी" किंवा” मी" असे केले जाऊ शकते
  • सहसा संदर्भानुसार "आत्मा” या वाक्यांशाचे भाषांतर "व्यक्ती" किंवा "तो" किंवा” त्याला" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांमध्ये "जीव" आणि "आत्मा" या संकल्पनेसाठी फक्त एक शब्द असू शकतो
  • इब्री 4:12 मध्ये, "जीव आणि आत्मा छेदने" या अलंकारिक वाक्यांशाचा अर्थ "सखोल समजून घेणे किंवा आतील व्यक्तीला उघडकीस आणणे" असे असू शकतो

(हे देखील पाहा: आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H5082, H5315, H5397, G55900

आमेन, खरोखर

व्याख्या:

"आमेन" ही संज्ञा एखाद्या व्यक्तीने काय सांगितले आहे त्यावर विशेष जोर देण्यासाठी किंवा लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरला जाणारा एक शब्द आहे. हा सहसा प्रार्थनेच्या शेवटी वापरला जातो. काहीवेळा तो खरोखर असाही भाषांतरित केला जातो.

  • जेव्हा प्रार्थनेच्या शेवटी वापरला जातो, तेव्हा "आमेन'' प्रार्थना सह कराराचा संवाद दर्शवितो किंवा अशी इच्छा व्यक्त करातो की प्रार्थना पूर्ण व्हावी.
  • त्याच्या शिकवणुकीमध्ये, येशूने त्याच्या बोलण्यातील सत्यतेवर जोर देण्यासाठी "आमेन" या शब्दाचा वापर केला. पूर्वीच्या शिकवणीशी संबंधित असलेल्या दुसर्‍या शिकवणीचा परिचय करून देण्यासाठी तो अनेकदा “आणि मी तुम्हाला सांगतो” या शब्दाचे अनुसरण करत असे.
  • जेव्हा येशू या पध्दतीने "आमेन" या शब्दाचा वापर करतो, तेव्हा काही इंग्रजी आवृत्ती (आणि युएलटी) "खरे" किंवा "सत्य" म्हणून भाषांतरित करतात.
  • आणखी एक शब्द ज्याचा अर्थ "खरोखर" असा आहे तो "खात्रीने" किंवा "नक्कीच" म्हणून कधीकधी भाषांतरित केला जातो आणि वक्ता काय म्हणत आहे यावर जोर देण्यासाठी देखील वापरला जातो.

भाषांतर सूचना

  • लक्ष्‍य भाषेमध्‍ये विशेष शब्द किंवा वाक्प्रचार आहे की नाही याचा विचार करा जे बोलण्‍यात आलेल्‍या एखाद्या गोष्टीवर जोर देण्‍यासाठी वापरले जाते.
  • जेव्हा प्रार्थनेच्या शेवटी किंवा एखाद्या गोष्टीची पुष्टी करताना आमेन वापरतात, तेव्हा हा शब्द "असेच होवो" किंवा "असे होऊ शकते" किंवा "हे सत्य आहे" असेही भाषांतरित करतात.
  • जेव्हा येशू म्हणतो, "मी तुम्हाला खरे सांगतो," तर याचे भाषांतर "होय, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो" किंवा "ते खरे आहे आणि मी तुम्हालाही सांगतो" असे करता येऊ शकते.
  • "मी तुम्हाला खचित खचित सांगतो" या वाक्यांशाचे भाषांतर, "मी तुम्हाला हे अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो" किंवा "मी तुम्हाला अत्यंत कळकळीने सांगतो" किंवा "मी तुम्हाला काय सांगतो ते सत्य आहे" असे देखील केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: पूर्ण, खरे)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग:एच0543, जी02810

आशा, आशा केली

व्याख्या:

आशा ही काहीतरी घडावे यासाठीची उत्कंठ इच्छा आहे. आशा एकतर भविष्यातील घटनेसंबंधी निश्चितता किंवा अनिश्चितता दर्शविते.

पवित्र शास्त्रात “आशा” या शब्दाचा अर्थ “विश्वास” असा आहे, जसे “माझी आशा प्रभूमध्ये आहे.” हे देवाने आपल्या लोकांना जे काही वचन दिले आहे ते प्राप्त होण्याच्या निश्चित अपेक्षेला संदर्भित करते.

  • कधीकधी यूएलटी या संज्ञेला मूळ भाषेतील शब्द “आत्मविश्वास” असे भाषांतरीत करते. हे मुख्यतः: नवीन करारामध्ये अशा परिस्थितीत घडते जिथे येशूवर आपला तारणहार म्हणून विश्वास ठेवणार्‍या लोकांना देवाने वचन दिले आहे ते प्राप्त करण्याचे आश्वासन (किंवा आत्मविश्वास किंवा आशा) असते.
  • “आशा नसणे” म्हणजे काहीतरी चांगले घडण्याची अपेक्षा नसणे होय. याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्षात हे निश्चित आहे की ते होणार नाही.

भाषांतर सूचना:

  • काही संदर्भांमध्ये “आशा” या शब्दाचे भाषांतर “इच्छा” किंवा “अभिलाषा” किंवा “अपेक्षा” असेही केले जाऊ शकते.
  • “आशेसाठी काहीच नाही” या शब्दाचे भाषांतर “विश्वास ठेवण्यासारखे काहीही नाही” किंवा “चांगल्या कशाचीही अपेक्षा नसणे” असे केले जाऊ शकते.
  • “आशा नसणे” याचे भाषांतर “चांगल्या गोष्टीची अपेक्षा नसणे” किंवा “काहीच सुरक्षितता नसणे” किंवा “काही चांगले होणार नाही याची खात्री असणे” असे केले जाऊ शकते.
  • “तू आशा ठेवली आहे” या अभिव्यक्तीचे भाषांतर “आपली आशा ठेवली” किंवा “त्यामध्ये विश्वास ठेवला आहे” असेही केले जाऊ शकते.
  • “मला तुझ्या वचनाची आशा वाटते” या वाक्यांशाचे भाषांतर “मला खात्री आहे की तुझे वचन सत्य आहे” किंवा “तुझे वचन मला तुझ्यावर विश्वास ठेवण्यास मदत करतो” किंवा “जेव्हा मी तुझ्या वचनाचे पालन करतो तेव्हा मला आशीर्वाद मिळेल” असे देखील केले जाऊ शकते.
  • देवावर “आशा” यासारख्या वाक्यांशाचे भाषांतरही “, देवावर विश्वास ठेवा” किंवा “देव आपल्या वचनानुसार करील याची खात्री बाळगा” किंवा “देव विश्वासू आहे याविषयी निश्चित असा” असे केले जावू शकत.

(हे देखील पाहा: [आशीर्वाद], [आत्मविश्वास], [चांगले], [आज्ञा पाळणे], [विश्वास], [देवाचे वचन])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 इतिहास 29:14-15]
  • [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 02:19]
  • [प्रेषितांचे कृत्ये 24:14-16]
  • [प्रेषितांचे कृत्ये 26:06]
  • [प्रेषितांचे कृत्ये 27:20]
  • [कलस्सैकरांस पत्र 01:05]
  • [ईयोब 11:20]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच982, एच983, एच986, एच2620, एच2976, एच3175, एच3176, एच3689, एच4009, एच4268, एच4723, एच7663, एच7664, एच8431, एच8615, जी91, जी560, जी1679, जी1680, जी2070

आशीर्वाद देणे, आशीर्वादीत, आशीर्वाद

व्याख्या:

एखाद्याला किंवा कशालातरी “आशीर्वाद” देणे म्हणजे ज्या व्यक्तीला किंवा वस्तूला आशीर्वाद दिला जात आहे त्याच्यासाठी चांगल्या आणि लाभदायक गोष्टी घडवून आणणे.

  • एखाद्याला आशीर्वाद देणे म्हणजे त्या व्यक्तीसाठी सकारात्मक आणि लाभदायक गोष्टी घडवून याव्या अशी इच्छा व्यक्त करणे देखील आहे.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, एक पिता बहुतेकदा आपल्या मुलांवर औपचारिक आशीर्वाद बोलत असे.
  • जेव्हा लोक देवाला “धन्यवाद देतात” किंवा देव धन्यवादीत असो अशी इच्छा व्यक्त करतात तेव्हा याचा अर्थ ते त्याची स्तुती करतात.
  • "आशीर्वाद" हा शब्द काहीवेळा अन्न खाण्यापूर्वी पवित्र करण्यासाठी किंवा अन्नासाठी देवाचे आभार मानण्यासाठी आणि त्याची स्तुती करण्यासाठी वापरला जातो.

भाषांतर सूचना:

  • “आशीर्वाद” देणे या शब्दाचे भाषांतर “भरपूर प्रमाणात मिळणे” किंवा “दयाळू व अनुकूल असणे” असे देखील असू शकते.
  • “देवाने महान आशीर्वाद दिला आहे” या वाक्याचे भाषांतर “देवाने बऱ्याच चांगल्या गोष्टी दिल्या आहेत” किंवा “देवाने मुबलकपणे दिले” किंवा “देवाने बर्‍याच चांगल्या गोष्टी घडवून आणल्या” असे केले जाऊ शकते.
  • “तो धन्य आहे” या वाक्याचे भाषांतर “त्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल” किंवा “त्याला चांगल्या गोष्टींचा अनुभव येईल” किंवा “देव त्याची भरभराट करील”.
  • “धन्य ती व्यक्ती ज्याने” या वाक्याचे भाषांतर “किती चांगला तो व्यक्ती जो” असे केले जाऊ शकते.
  • “परमेश्वराला धन्यावाद असो ”यासारख्या अभिव्यक्तीचे भाषांतर “परमेश्वराची स्तुती होवो ”किंवा“ परमेश्वराचे स्तुती असो ”किंवा“ मी परमेश्वराची स्तुती करतो ”असे केले जाऊ शकते.
  • अन्नास आशीर्वाद देण्याच्या संदर्भात, "अन्नाबद्दल देवाचे आभार मानले" किंवा "त्यांना भोजन दिल्याबद्दल देवाची स्तुती केली" किंवा "त्याबद्दल देवाची स्तुती करुन अन्न पवित्र केले" असे भाषांतर केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: स्तुती करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 1:7 देवाने पाहिले की ते चांगले आहे आणि त्याने त्यांना आशीर्वाद दिला.
  • 1:15 देवाने आदाम आणि हव्वाला स्वतःच्या प्रतिमेत बनविले. त्याने त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना सांगितले, “तुमची मुले व मुलांची मुले होवो आणि पृथ्वी व्यापून टाका.”
  • 1:16 म्हणून देवाने जे केले त्यापासून देव विसावा घेतला. त्याने सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला व त्यास पवित्र केले, कारण या दिवशी त्याने आपल्या कामापासून विश्रांती घेतली.
  • 4:4 “मी तुझे नाव महान करीन. जे लोक तुला आशीर्वाद देतात त्यांना मी आशीर्वाद देईन आणि जे तुला शाप देतात त्यांना शाप देईल. पृथ्वीवरील सर्व कुळे तुझ्यामुळे आशीर्वादीत होतील.”
  • 4:7 मल्कीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद दिला व म्हणाला, “परात्पर देव जो स्वर्ग व पृथ्वीचा अधिपती आहे अब्रामास आशीर्वादीत करो.”
  • 7:3 इसहाकाला आपले आशीर्वाद एसावाला देण्याची इच्छा होती.
  • 8:5तुरुंगातदेखील योसेफ देवाशीी विश्वासू राहिला आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला.

शब्द संख्या:

  • स्ट्रोंग: एच0833, एच0835, एच1288, एच1289, एच1293, जी17570, जी21270, जी21280, जी21290, जी31060, जी31070, जी31080, जी60500

इब्री

तथ्य:

"इब्री" ही संज्ञा अब्राहामापासून इसहाक आणि याकोबाच्या वंशातून आलेल्या लोकांच्या गटाला सामान्य अर्थाने संदर्भित करते.

  • "इब्री" हा विशिष्ट शब्द एकतर लोक समूहातील एका व्यक्तीला किंवा त्या लोकांच्या समुहामध्ये बोल्ला जाणाऱ्या भाषेला संदर्भित करू शकते.
  • जुन्या कराराच बहुतांश भाग "इब्री" म्हटलेल्या भाषेत लिहिला गेला आहे. तथापि, नवीन करारातील बहुतेक प्रकरणांमध्ये, "इब्री" हे विशिष्ट संज्ञा इब्री भाषेऐवजी अरामी भाषेचा संदर्भित करते.
  • "इब्री" हा शब्द भाषेला सुद्धा संदर्भित करतो, जे इब्री लोक बोलत होते. जुना कराराची बहुसंख्य पुस्तके इब्री भाषेत लिहिण्यात आली.
  • बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, इब्रींना "इस्राएली" किंवा "यहूदी" असेही म्हटले गेले. भाषांतर करताना, या तिन्ही संज्ञा मजकुरामध्ये वेगळ्या ठेवणे उत्तम आहे, आतापर्यंत हे स्पष्ट आहे की या संज्ञा समान लोकसमुहाला संदर्भित करतात.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: इस्राएल, यहुदी, यहुदी पुढारी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

स्ट्रोंग: एच5680, जी1444, जी1445, जी1446, जी1447


इस्राएल, इस्राएली

तथ्य:

"इस्राएल" ही संज्ञा, देवाने याकोबाला दिलेले एक नाव आहे. बऱ्याचदा ते त्याच्यापासून आलेल्या राष्ट्राला सूचित करते.

  • इस्राएल नावाचा अर्थ कदाचित "तो देवाशी संघर्ष करतो" असा असावा.
  • याकोबाचे वंशज "इस्राएलचे पुत्र" किंवा "इस्रायलचे लोक" किंवा "इस्रायल राष्ट्र" किंवा "इस्राएली" म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • देवाने इस्राएल लोकांशी आपला करार केला. ते त्याचे निवडलेले लोक होते.
  • इस्रायल राष्ट्रात बारा कुळांचा समावेश होता.
  • राजा शलमोनाच्या मृत्यूनंतर, इस्राएलाचे दोन साम्राज्यांमध्ये विभाजन झाले: दक्षिणेकडील राज्य, ज्याला "यहूदा" असे म्हणतात आणि उत्तरेकडील राज्य, ज्यास "इस्त्राएल" असे म्हणतात.
  • बऱ्याचदा संदर्भानुसार, "इस्राएल" या संज्ञेचे भाषांतर "इस्त्राएलाचे लोक" किंवा "इस्राएल राष्ट्र" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: याकोब, इस्त्राएलाचे राज्य, यहुदा, राष्ट्र, इस्त्राएलांचे बारा वंश)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 8:15 या बारा पुत्रांची संतती ही इस्राएलाचे बारा वंश झाले.
  • 9:3 मिस-यांनी इस्राएलांस अनेक इमारतींचे बांधकाम करण्यास व मोठमोठ्या शहरांचे निर्माण करण्यास सक्ती केली.
  • 9:5 एका इस्राएली स्त्रीने एका मुलास जन्म दिला.
  • 10:1 ते म्हणाले, "इस्राएलाचा देव असे म्हणतो, 'माझ्या लोकांना जाऊ द्या!'"
  • 14:12 पण तरीही इस्राएल लोकांनी देवाविरूद्ध व मोशेविरूद्ध कुरकुर केली.
  • 15:09 त्या दिवशी इस्राएलाच्या बाजूने देव स्वतः लढला. त्याने अमोरी सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण केला व त्यांच्यावर मोठ्या गारा पाडल्या, ज्यामध्ये अनेक अमोरी मरण पावले.
  • 15:12 या लढाईनंतर देवाने इस्राएलाच्या प्रत्येक वंशास वचनदत्त देशाची वाटणी करुन दिली. त्यानंतर देवाने इस्राएलाच्या सर्व सीमेवर शांती प्रस्थापित केली.
  • 16:16 मग देवाने इस्त्राएलांस पुन्हा शासन केले, कारण त्यांनी मूर्तिपूजा केली होती.
  • 43:6 "अहो इस्राएल लोकांनो, येशूने देवाच्या शक्तिद्वारे अनेक चिन्हे व अद्भुत कार्ये केली, जी तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिली व तुम्हाला ती माहीत आहेत.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच3478, एच3479, एच3481, एच3482, जी935, जी2474, जी2475

ईर्ष्यावान, ईर्ष्या

व्याख्या:

"ईर्ष्यावान" आणि "ईर्ष्या" या शब्दांचा संदर्भ नातेसंबंधाची शुद्धता राखण्याची तीव्र इच्छा ह्याच्याशी आहे. ते एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्याचा ताबा ठेवण्याच्या तीव्र इच्छेचा देखील संदर्भ घेऊ शकतात.

  • या शब्दांचा उपयोग सहसा त्यांच्या विवाहातील अविश्वासू जोडीदाराच्या प्रती एखाद्या व्यक्तीच्या क्रोधीत भावनांचे वर्णन करण्याकरिता करतात.
  • जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये वापरले जातात, तेव्हा हा शब्द देवाची त्याच्या लोकांनी पापापासून शुद्ध आणि निष्कलंक राहण्याच्या तीव्र इच्छेला संदर्भित करतो.
  • देव त्याच्या नावाबद्दल देखील "ईर्ष्यावान" आहे, त्याची इच्छा आहे की त्याचे नाव सन्मानाने आणि आदराने घेतले पाहिजे.
  • ईर्ष्यावान होण्याचा आणखी एक अर्थ एखादा अतिशय यशस्वी किंवा प्रसिद्ध झाल्याबद्दल क्रोधीत होणे असा होतो. हे "मत्सर" या शब्दाच्या अर्थाच्या अगदी जवळ आहे.

भाषांतर सूचना:

  • "ईर्ष्यावान" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "मजबूत संरक्षणात्मक इच्छा" किंवा "स्वार्थी इच्छा" ह्यांचा समावेश होतो.
  • "ईर्ष्या" या शब्दाचे भाषांतर "मजबूत संरक्षणात्मक भावना" किंवा "स्वार्थी भावना" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा देवाबद्दल बोलले जाते, या शब्दांचे भाषांतर करताना त्याचा अर्थ एखाद्याबद्दल संतप्त झाल्याचा नकारात्मक अर्थ दिला जाणार नाही ह्याची खात्री करा.
  • इतर लोक जे अतिशय यशस्वी आहेत त्यांच्याप्रती लोकांच्या क्रोधाच्या चुकीच्या भावनेच्या संदर्भामध्ये, "मत्सरी" आणि "मत्सर" या शब्दांचा उपयोग केला जाऊ शकतो. पण या शब्दांचा उपयोग देवाबद्दल होता कामा नये.

(हे देखील पाहा: मत्सर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H7065, H7067, H7068, H7072, G22050, G38630

उंच करणे, महान, उदात्तीकरण

व्याख्या:

उंच करणे म्हणजे एखाद्याची अत्यंत स्तुती किंवा सन्मान करणे. ह्याचा अर्थ एखाद्याला उंच स्थानावर ठेवण्याशी देखील येतो.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "उंचवणे" या शब्दाचा सहसा उपयोग देवाला उंचवण्यासाठी केला गेला आहे.
  • जेंव्हा एखादी व्यक्ती स्वतःला उंचवतो, म्हणजे तो व्यक्ती स्वतःबद्दल गर्विष्ठ आणि अहंकारी पद्धतीने विचार करतो.

भाषांतर सूचना:

  • "उंचवणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "अत्यंत स्तुती करणे" किंवा "भरपूर सन्मान करणे" किंवा "प्रशंसा करणे" किंवा च्या बद्दल अत्यंत बोलणे" ह्यांचा समावेश होऊ शकतो.
  • काही संदर्भामध्ये ह्याचे भाषांतर, "उंच स्थानावर ठेवणे" किंवा "एखाद्याला अधिक सन्मान देणे" किंवा "च्या बद्दल गर्वाने बोलणे" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • "स्वतःला उंच करू नका" या शब्दाचे भाषांतर, "स्वतःबद्दल खूप मोठ्यापणाचे विचार करू नका" किंवा "स्वतःबद्दल बढाई मारू नका" असे केले जाऊ शकते.
  • "जे स्वतःला उंच करतात" ह्याचे भाषांतर, "जे स्वतःबद्दल अभिमानास्पद विचार करतात" किंवा "जे स्वतःबद्दल बढाई मारतात" असे देखील केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: स्तुती, उपासना, गौरव, बढाई मारणे, गर्व)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H1361, H4984, H5375, H5549, H5927, H7311, H7426, H7682, G18690, G52290, G52510, G53110, G53120

उजवा हात

व्याख्या:

"उजवा हात" हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या उजव्या बाजूस असलेल्या हाताला सूचित करतो.बायबलमध्ये, हा शब्द बहुतेक वेळा लाक्षणिक अर्थाने एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूस शरीराचे इतर अवयव, एखाद्या व्यक्तीची उजवी दिशा, दक्षिण दिशा, किंवा एखाद्या शासकाच्या किंवा इतर महत्वाच्या व्यक्तीच्या उजव्या बाजूचे सन्मान किंवा सामर्थ्याचे स्थान यांस संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

  • उजवा हात हा शक्ती, अधिकार, किंवा सामर्थ्याचे चिन्ह म्हणून देखील वापरला जातो.
  • पवित्र शास्त्र येशूचे वर्णन देव पित्याच्या "उजव्या हाताला" विश्वासणाऱ्यांच्या शरीराचा (मंडळी) मुख्य म्हणून आणि सर्व सृष्टीचा शासक म्हणून नियंत्रण करण्यासाठी बसला आहे, असे करते.
  • एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिल्या जातो तेव्हा विशेष सन्मान दर्शवण्यासाठी एका व्यक्तीच्या उजव्या हाताचा वापर केला जात असे (जसे कुलपिता याकोबाने योसेफाचा मुलगा एफ्राईम याला आशीर्वाद दिला).
  • एखाद्याच्या "उजव्या हातकडे सेवा" करणे म्हणजे ज्याची सेवा त्या व्यक्तीसाठी विशेषतः उपयुक्त आणि महत्वाची असते.

भाषांतर सूचना

  • काहीवेळा "उजवा हात" ही संज्ञा अक्षरशः त्या व्यक्तीच्या उजव्या हाताला सुचित करते, जसे की रोमी अधिकाऱ्याने येशुची थट्टा करण्याकरिता त्याच्या हातामध्ये वेत दिला. एखाद्या भाषेमध्ये हातासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा उपयोग करून त्याला भाषांतरित करावे.
  • लाक्षणिक उपयोगांबाबत, जर "उजवा हात" या संज्ञेचा समावेश असलेल्या अभिव्यक्तीचा प्रकल्पित भाषेत समान अर्थ नसेल, तर त्या भाषेमध्ये त्याच अर्थाची भिन्न अभिव्यक्ती आहे का याचा विचार करा.
  • "उजव्या हाताला" या अभिव्यक्तीचे भाषांतर "च्या उजव्या बाजूला" किंवा "सन्मानाच्या बाजूला" किंवा "सामर्थ्याच्या स्थितीत" किंवा "मदतीसाठी तयार" असे केले जाऊ शकते.
  • "त्याच्या उजव्या हाताने" याचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "अधिकाराने" किंवा "शक्तीचा वापर" किंवा "त्याच्या आश्चर्यकारक सामर्थ्याने" या अभिव्यक्तींचा समावेश असु शकतो.
  • “त्याचा उजवा हात आणि त्याची सामर्थी बाहू” ही लाक्षणिक अभिव्यक्ती देवाच्या सामर्थ्यावर आणि मोठ्या सामर्थ्यावर जोर देण्याचे दोन पध्दतीचा वापर करते. या अभिव्यक्तीचे भाषांतर करण्याचा एक मार्ग "त्याची आश्चर्यकारक बळ आणि पराक्रमी शक्ती" हा असू शकतो. (पाहा: समांतरवाद)
  • "त्यांचा उजवा हात खोटा आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्यांच्यातील सर्वात सन्माननीय गोष्ट देखील खोटेपणामुळे दूषित झाली आहे" किंवा "त्यांचे सन्मानाचे स्थान फसवणूकीमुळे दूषित झाले आहे" किंवा "ते स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी असत्याचा उपयोग करतात" असे केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: आरोप, वाईट, सन्मान, पराक्रमी, शिक्षा, बंडखोर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच3225, एच3231, एच3233, जी11880

उत्तेजन देणे, उत्तेजन

व्याख्या:

“उत्तेजन” या शब्दाचा अर्थ एखाद्याला योग्य ते करण्यास उद्युक्त करणे आणि आग्रह करणे होय. अशा प्रोत्साहनास “उत्तेजन” म्हणतात.

  • इतरांना पाप टाळण्यासाठी आणि देवाच्या इच्छेचे अनुसरण करण्यासाठी परावृत्त करणे हा उत्तेजनाचा उद्देश आहे.
  • नवीन करार ख्रिस्ती लोकांना कठोरपणे किंवा तुसडी वागणूकीने नव्हे तर एकमेकांना प्रेमाने बोध करण्यास शिकवतो.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, “उत्तेजन” याचे भाषांतर “अति आग्रह” किंवा “राजी करणे” किंवा “सल्ला देणे” असे देखील केले जाऊ शकते.
  • या शब्दाच्या भाषांतरात उत्तेजन देणारा रागात आहे असे सुचित करत नाही याची खात्री करा. या शब्दामध्ये सामर्थ्य आणि गंभीरता दर्शविली पाहिजे, परंतु संतापलेल्या भाषणाचा संदर्भ घेऊ नये.
  • बर्‍याच संदर्भांमध्ये, “उत्तेजन” या शब्दाचे भाषांतर “प्रोत्साहित” करण्यापेक्षा वेगळे केले पाहिजे, याचा अर्थ एखाद्याला प्रेरणा देणे, धीर देणे किंवा सांत्वन देणे होय.
  • सामान्यत: या शब्दाचे भाषांतर “बोध करणे” यापेक्षाही वेगळे केले जाईल. म्हणजे एखाद्याला त्याच्या चुकीच्या वागण्याबद्दल चेतावणी देणे किंवा सुधारणे होय.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: जी38670, जी38700, जी38740, जी43890

उत्साह, उत्साही

व्याख्या:

"उत्साह" आणि "उत्साही" हे शब्द व्यक्तीला किंवा कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी अति वाहवून घेणे याला संदर्भित करते.

  • उत्साहामध्ये तीव्र इच्छा आणि चांगले करण्याच्या क्रियांचा समावेश आहे. हे सहसा अशा व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते जे विश्वासूपणे देवाचे पालन करतात आणि इतरांना ते करण्यास शिकवतात.
  • उत्साही असणे म्हणजे काहीतरी करण्याचा तीव्र प्रयत्न करणे आणि त्या प्रयत्नात टिकून राहणे.
  • "परमेश्वराचा उत्साह" किंवा "याहवेचा उत्साह" म्हणजे आपल्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी किंवा न्याय मिळावा यासाठी देवाच्या दृढ, चिकाटीने केलेल्या कृतीला संदर्भित करते.

भाषांतरातील सूचना:

  • "उत्साही" या शब्दाचे भाषांतर "खुप चिकाटी असणे" किंवा "तीव्र प्रयत्न करणे" असे केले जाऊ शकते.
  • "उत्साह"या शब्दाचे भाषांतर "उन्माद भक्ती" किंवा "तीव्र दृढनिश्चय" किंवा "धार्मिक आवेश" असे देखील केले जाऊ शकते

"आपल्या घरासाठी उत्साह" या वाक्यांशाचे भाषांतर, "आपल्या मंदिराचा खुप सन्मान करणे" किंवा "आपल्या घराची काळजी घेण्याची तीव्र इच्छा"

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 7065, एच 7068, जी 2205, जी 2206, जी 2207, जी 6041

उरलेले

व्याख्या:

"उरलेले" या शब्दाचा शब्दशः अर्थ मोठ्या संख्येमधून किंवा समूहातील "राहिलेले" किंवा "शिल्लक राहिलेले" लोक किंवा गोष्टी असा होतो.

  • बऱ्याचदा "उरलेले" या शब्दाचा संदर्भ लोकांशी आहे,जर जीवघेण्या परिस्थितीतून जिवंत राहिले किंवा ज्यांचा छळ होत असतानासुद्धा ते देवाशी विश्वासू राहिले.
  • यशायाने यहुद्यांच्या समूहाला, जे बाहेरच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यातून वाचले आणि वचनदत्त भूमी कनानमध्ये राहायला परत आलेल्या लोकांना, उरेलेले असे संदर्भित केले,
  • पौल देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी निवडलेल्या लोकांच्याबद्दल बोलताना त्यांना "उरलेले" असे म्हणतो.
  • "उरलेले" या शब्दाचा अर्थ, असे अनेक लोक होते, जे विश्वासू राहिले नाहीत किंवा जे टिकून राहिले नाहीत, किंवा ज्यांना निवडले नव्हते असा होतो.

भाषांतर सूचना

  • "या लोकांच्यातील उरलेले" या वाक्यांशाचे भाषांतर, "या लोकांच्यातील शिल्लक राहिलेले" किंवा "लोक जे विश्वासू राहिले" किंवा "लोक जे शिल्लक राहिले" असे केले जाऊ शकते.
  • "संपूर्ण उरलेले लोक" ह्याचे भाषांतर "उरलेले सगळे लोक" किंवा "शिल्लक राहिलेले लोक" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H3498, H3499, H5629, H6413, H7604, H7605, H7611, H8281, H8300, G2640, G3005, G3062


उल्लंघण

व्याख्या:

"उल्लंघन करणे" याचा अर्थ रेषा ओलांडणे किंवा सीमेचे उल्लंघन करणे होय. नियम मोडणे किंवा इतर व्यक्तीच्या हक्काचे उल्लंघन करणे. एक "आज्ञाभंग" ही अपराध करण्याची क्रिया आहे. या संज्ञेचा अनेकदा लाक्षणिक अर्थाने वापर केला जातो, म्हणजे नियम मोडणे किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकारांचे उल्लंघन करणे.

  • ही संज्ञा "अपराध" या शब्दाच्या खुप समान आहे, परंतु सामान्यतः देवाच्या विरोधात इतर लोकांच्या उल्लंघनाचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते.
  • आज्ञाभंग नैतिक कायद्याचे किंवा नागरी कायद्याचे उल्लंघन असू शकते.
  • उल्लंघन इतर व्यक्ती विरुद्द केलेल पाप देखील असू शकते.
  • ही संज्ञा "पाप" आणि "अपराध" या संज्ञांशी संबंधित आहे, विशेषत: ती देवाची अवज्ञा करण्याशी संबंधित आहे. सर्व पाप देवाच्या विरुद्ध अपराध आहेत.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "विरुद्ध उल्लंघन करणे" याचे भाषांतर "विरुध्द पाप करणे" किंवा "नियम मोडणे" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांमध्ये "रेषा ओलांडणे" यासारखी अभिव्यक्ती असू शकते जी "उल्लंघण" याचे भाषांतर करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
  • हा शब्द आजुबाजूच्या बायबलमधील मजकुराच्या अर्थाशी कसा जुळतो याचा विचार करा आणि त्याची तुलना "उल्लंघण" आणि "पाप" सारख्याच अर्थ असलेल्या इतर संज्ञांशी करा.

(हे देखील पाहा: अवज्ञा, अपराध, पाप, उल्लंघन करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0816, एच0817, एच0819, एच2398, एच4603, एच4604, एच6586, एच6588, जी02640, जी39000

उल्लंघन करणे, अपराध

व्याख्या:

"उल्लंघन" या शब्दाचा अर्थ रेषा ओलांडणे किंवा सीमारेषाचे उल्लंघन करणे. हा शब्द सहसा लाक्षणिक अर्थाने वापरला जातो, म्हणजे आज्ञा, नियम किंवा नैतिक संहिता मोडणे.

  • ही संज्ञा "पाप" या शब्दासारखीच आहे, परंतु सामान्यतः इतर लोकांपेक्षा देवाविरूद्धच्या उल्लंघनांचे वर्णन करण्यासाठी अधिक वेळा वापरली जाते.
  • "उल्लंघण करणे" या संज्ञेचे वर्णन "रेषा ओलांडणे" असे देखील केले जाऊ शकते, म्हणजे, व्यक्ती आणि इतरांच्या भल्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादा किंवा सीमा ओलांडणे.

भाषांतर सूचना:

  • "उल्लंघन" या शब्दाचे भाषांतर "पाप" किंवा "अवज्ञा करणे" किंवा "बंड करणे" असेही केले जाऊ शकते.
  • जर, एखाद्या वचनात किंवा परिच्छेदात "पाप" किंवा "उल्लंघन" किंवा "अतिक्रमण" या अर्थाच्या दोन शब्दांचा उपयोग होत असेल तर, शक्य असल्यास, या शब्दांचे भाषांतर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा. जेव्हा पवित्र शास्त्रात दोन किंवा अधिक एकसारख्या अर्थाच्या शब्दांचा उपयोग एकाच संदर्भामध्ये केला जातो, तेव्हा सहसा त्याचा हेतू जे सांगितले जाते किंवा दाखवले जाते, त्यावर भर देण्याचा असतो.

(पाहा: समांतरता)

(हे देखील पाहा: अवज्ञा करणे, पाप, उल्लंघन, अपराध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H898, H4603, H4604, H6586, H6588, G458, G459, G3845, G3847, G3848, G3928

एफोद

व्याख्या:

एफोद हे वर बांधावयाच्या मलवस्त्रासारखा कपडा होता ज्याला इस्राएली याजक घालत असत. त्याला दोन भाग होते, पुढचा आणि मागचा, जे खांद्याजवळ एकत्रित होत होते, आणि कमरेभोवती कापडाच्या पट्ट्याने बांधायचे होते.

  • असा एक प्रकारचा एफोद त्याला सध्या तागाच्या कपड्यापासून बनवलेले होते, ज्याला सामान्य याजक घालत होते.
  • जे एफोद महायाजक घालत होते, त्याला सोने, निळे, जांभळे, आणि लाल धाग्यांनी सुंदर वेलबुट्टीदर बनवले जात होते.
  • महायाजकाच्या उरस्त्राणाला एफोदाचा पुढचा भाग जोडलेला होता. उरस्त्राणाच्या पाठीमागे उरीम आणि थुम्मीम ह्यांचे जतन केले होते, जे ठराविक समस्यांमध्ये देवाची इच्छा काय आहे, हे विचारण्यासाठीचे दगड होते.
  • गिदोन शास्त्याने मूर्खपणाने सोन्याचा एफोद बनवला आणि ते इस्राएली लोक उपासना करण्याची मूर्ती असे काहीतरी बनले.

(हे सुद्धा पहा: याजक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H641, H642, H646


कबूल करणे, कबूली

व्याख्या:

कबूल करणे ह्याचा अर्थ एखादी गोष्ट सत्य आहे हे मान्य करणे किंवा निश्चय करणे असा होतो. "कबूली" ही एखादी गोष्ट सत्य आहे ह्याचे एक विधान किंवा मान्यता आहे.

  • "कबूल करणे" ही संज्ञा देवाच्या सत्याबद्दल धाडसाने सांगण्याला संदर्भित करते. आपण पाप केले आहे हे मान्य करण्याला देखील संदर्भित करते.
  • पवित्र शास्त्र असे सांगते की, जर लोकांनी त्यांची पापे देवाजवळ कबूल केली तर, तो त्यांना क्षमा करेल.
  • प्रेषित याकोब, त्याच्या पत्रामध्ये असे लिहितो की, जेव्हा विश्वासणारे त्यांचे पाप एकमेकांजवळ कबूल करतात, तेव्हा त्यामुळे आत्म्यामध्ये आरोग्य येत.
  • प्रेषित पौल फिलीप्पैकरांस लिहितो की एके दिवशी प्रत्येकजण कबूल किंवा घोषित करेल की येशू प्रभु आहे.
  • पौलाने असे देखील म्हटले की जर लोक आपल्या मुखाने येशु प्रभू आहे असे कबूल करतील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास धरतील, तर त्यांना तारणप्राप्ती होईल.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, "कबूल करणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "मान्य करणे" किंवा "साक्ष देणे" किंवा "घोषणा करणे" किंवा "सत्य स्वीकारणे" किंवा "जाहीर करणे" या वाक्यांशांचा समावेश होतो.
  • "कबूली" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "घोषणा" किंवा "साक्ष" किंवा "आम्ही जो विश्वास धरतो ह्यावर विधान करणे" किंवा "पाप मान्य करणे" या वाक्यांशाचा समावेश होतो.

(हे देखील पाहा: विश्वास, साक्ष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग : एच3034, एच8426, जी1843, जी3670, जी3671

करार

व्याख्या:

बायबलमध्ये, "करार" या शब्दाचा अर्थ दोन पक्षांमधील एक औपचारिक, बंधनकारक प्रतिक्षा आहे जी एक किंवा दोन्ही पक्षांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • हा करार व्यक्तींमध्ये, लोकांच्या गटांमध्ये किंवा देव आणि लोकांमध्ये असू शकतो.
  • जेव्हा लोक एकमेकांशी करार करतात, तेव्हा ते वचन देतात की ते काहीतरी करतील आणि त्यांनी ते केलेच पाहिजे.
  • मानवी करारांच्या उदाहरणांमध्ये विवाह करार, व्यवसाय करार आणि देशांमधील करार यांचा समावेश आहे.
  • संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये, देवाने त्याच्या लोकांबरोबर अनेक वेगवेगळे करार केले.
  • काही करारांमध्ये, देवाने अटीशिवाय त्याचा भाग पूर्ण करण्याचे वचन दिले. उदाहरणार्थ, जेव्हा देवाने मानवजातीशी आपला करार, प्रलयाने पृथ्वीला पुन्हा कधीही नष्ट करणार नाही अशी प्रतिज्ञा करत प्रस्थापित केला, तेव्हा या वचनाला लोकांसाठी पूर्ण करण्याची कोणतीही अट नव्हती.
  • इतर करारांमध्ये, लोकांनी त्याचे आज्ञापालन केले आणि कराराची आपली बाजू पुर्ण केली तरच देव आपली बाजू पुर्ण करील असे त्याने वचन दिले.

"नवा करार" ही संज्ञा, देवाने आपला पुत्र येशू याच्या बलीदानाद्वारे लोकांशी केलेल्या वचनबद्धतेविषयी किंवा कराराविषयी आहे यास संदर्भित करते.

  • देवाचा "नवा करार" हा पवित्र शास्त्राच्या "नवीन करार" या भागात स्पष्ट केला आहे.
  • हा नवा करार देवाने जुन्या कराराच्या काळात इस्राएलांशी केलेल्या "जुन्या" किंवा "पूर्व" कराराच्या परस्परविरोधी आहे.
  • नवीन करार हा जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण हा येशूच्या बलिदानावर आधारित आहे, जो कायमस्वरूपी लोकांच्या पापाबद्दल पूर्णपणे प्रायश्चित्त करतो. जुन्या करारात केलेल्या बलिदानांनी असे केले नाही.
  • जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्या ह्रदयावर देव नवीन करार लिहितो. यामुळे त्यांना देवाची आज्ञा पाळण्याची आणि पवित्र जीवन जगण्यास सुरवात करण्याची इच्छा होईल.
  • जेव्हा देव पृथ्वीवर त्याचे राज्य स्थापित करील,नवीन करार शेवटच्या काळात पूर्णपणे पूर्ण होईल. सर्व काही पुन्हा एकदा खूप चांगले होईल, जसे देवाने प्रथम जग निर्माण केले होते तेव्हा होते तसे.

भाषांतर सूचना

  • संदर्भानुसार, या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "बंधनकारक करार" किंवा "औपचारिक बांधिलकी" किंवा "प्रतिज्ञा" किंवा "करारनामा" यांचा समावेश असू शकतो.
  • एका पक्षाने किंवा दोन्ही पक्षांनी केलेल्या प्रतिज्ञा त्यांनी पाळल्या पाहिजे यावर अवलंबून काही भाषांमध्ये करारासाठी वेगवेगळे शब्द असू शकतात. जर करार एकतर्फी असेल तर त्याचे भाषांतर "वचन" किंवा "प्रतिज्ञा" असे केले जाऊ शकते.
  • लोकांनी हा करार प्रस्तावित केला म्हणून या शब्दांचे भाषांतर होत नाही याची खात्री करा. देव आणि लोक यांच्यातील कराराच्या सर्व घटनांमध्ये, देवाने कराराचा आरंभ केला.
  • "नवीन करार" या शब्दाचे भाषांतर "नवीन औपचारिक करार" किंवा "नवीन बोली" किंवा "नवीन करारनामा" असे केले जाऊ शकते.
  • या अभिव्यक्तिमध्ये "नवीन" शब्दाचा अर्थ "ताजे" किंवा "नवीन प्रकारचा" किंवा "दुसरा" असा आहे.

(हे देखील पाहा: करार, वचन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 4:9 मग देवाने अब्रामाबरोबर करार केला. करार हा दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये केला जातो.
  • 5:4 मी इश्माएलचेही एक मोठे राष्ट्र करीन, पण माझा करार इसहाकाशी असेल.”
  • 6:4 ब-याच वर्षांनंतर, अब्राहाम मरण पावला व देवाने त्याला कराराच्या रुपाने दिलेली सर्व अभिवचने इसहाकाकडे आली.
  • 7:10 देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचे अभिवचन आता इसहाकाकडून याकोबाकडे गेले.
  • 13:2 देव मोशेला व इस्राएल लोकांस म्हणाला, "जर तुम्ही माझी आज्ञा व माझा करार पाळाल, तर तुम्ही माझे खास निवडलेले लोक, राजकीय याजकगण व पवित्र राष्ट्र असे व्हाल."
  • 13:4 मग देवाने त्यांना हे अभिवचन दिले व म्हणाला, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडवले. तुम्ही अन्य देवतांची उपासना करू नका."
  • 15:13 मग यहोशवाने लोकांना सिनाई येथे देवाने इस्रायली लोकांसोबत केलेल्या कराराचे पालन करण्याबद्दल त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली.
  • 21:5 यिर्मया संदेष्टयाच्या द्वारे, देवाने वचन दिले की तो एक नवा करार करणार आहे, परंतु तो सिनाय पर्वतावर इस्राएलांबरोबर केलेल्या करारासारखा नसेल. नव्या करारामध्ये देव आपल्या आज्ञा मनुष्यांच्या हृदयावर लिहिल, लोक देवाला वैयक्तीकरित्या ओळखतील,ते त्याचे लोक होतील आणि देव त्यांच्या अपराधांची क्षमा करील. मसिहा या नव्या कराराचा आरंभ करील.
  • 21:14 मसिहाच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे देव आपली योजना पूर्ण करील, पाप्यांचे तारण करुन एक नवा करार प्रस्थापित करील.
  • 38:5 मग येशूने एक प्याला घेऊन म्हटले, ‘‘ ह्यातुन प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे ते अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे. जेंव्हा तुम्ही हे पिता, तेंव्हा हे माझ्या आठवणीसाठी करा.’’
  • 48:11 पण त्याने आता सर्वांसाठी उपलब्ध असणारा एक नवा करार केला. या नव्या करारामुळे, कोणत्याही लोकसमुदायातील कोणीही येशूवरील विश्वासाद्वारे देवाच्या लोकांचा भाग होऊ शकतात.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच1285, एच2319, एच3772, जी802, जी1242, जी4934

कराराचा कोश, याहोवाचा (देवाचा) कोश

व्याख्या:

या शब्दांमध्ये एक विशेष लाकडी पेटीचा संदर्भ पहायला मिळतो, जी सोन्याने मढवलेली होती. यामध्ये दोन दगडी पाट्या होत्या ज्यावर दहा आज्ञा लिहिल्या होत्या. त्यात अहरोनाची काठी आणि मन्नाचे भांडे देखील होते.

  • "कोश" हा शब्द येथे "पेटी" किंवा "मोठी पेटी" किंवा "पात्र" म्हणून भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • या पेटीतील वस्तूंनी इस्राएलांना परमेश्वराने त्यांच्यासोबत केलेल्या कराराची आठवण करून दिली.
  • कराराचा कोश "अतिपवित्र स्थानात" मध्ये स्थित होता.
  • निवास मंडपाच्या अतिपवित्र स्थानी असलेल्या कराराच्या कोशावर परमेश्वराची उपस्थिती होती, तेथून परमेश्वर इस्राएली लोकांसाठी मोशे बरोबर बोलत होता.
  • त्या काळादरम्यान, कराराचा कोश मंदिराच्या अतिपवित्र स्थानी होता. दरवर्षी वर्षातून एकदा, प्रायश्चित्ताच्या दिवशी महायाजक कोशाजवळ जात होता.
  • बऱ्याच इंग्रजी आवृत्त्यांमध्ये "कराराची आज्ञा" याचा शब्दशः अर्थ "साक्ष" म्हणून भाषांतरित केला आहे. याचा अर्थ असा होतो की दहा आज्ञा आपल्या लोकांबरोबर देवाने दिलेल्या कराराची साक्षी होती किंवा साक्ष होती. हा "कराराचा कायदा" म्हणूनही भाषांतरित केला जातो.

(हेही पहा: कोश, करार, प्रायश्चित्त, पवित्र स्थान, साक्ष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H727, H1285, H3068


कराराचा विश्वासुपणा, कराराची एकनिष्ठता, कराराचे प्रेम

व्याख्या:

बायबलसंबंधी काळात, "कराराचा विश्वासूपणा" असे भाषांतरित केलेली संज्ञा विश्वासनियता, निष्ठा, दयाळूपणा आणि प्रेम या प्रकारांचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला होता जे एकतर लग्नाद्वारे किंवा रक्ताद्वारे एकमेकांशी जवळचे संबंध असलेल्या लोकांमध्ये अपेक्षित होते आणि प्रदर्शित केले गेले होते. देव आपल्या लोकांशी कसा संबंध ठेवतो, विशेषत: त्याने त्यांना दिलेले अभिवच पूर्ण करण्याची त्याची वचनबद्धता याचे वर्णन करण्यासाठी याच संज्ञेचा बायबलमध्ये बऱ्याचदा उपयोग केला जातो .

  • ज्या प्रकारे या संज्ञेचे भाषांतर केले जाते ते "करार" आणि "विश्वासूपणा" या प्रत्येक वैयक्तिक संज्ञांचे भाषांतर कसे केले जाते यावर अवलंबून असू शकते.
  • या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये याचा समावेश असू शकतो: "विश्वासू प्रेम;" "निष्ठावान, वचनबद्ध प्रेम;" किंवा "प्रेमळ अवलंबित्व."

(हे देखील पाहा: करार, विश्वसनीय, दया, इस्राएल, देवाचे लोक, वचन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच2617

करुणा, दयाळू

व्याख्या:

"करुणा" ही संज्ञा लोकांसाठी , विशेषत: ज्यांना त्रास होत आहे त्यांच्यासाठी असलेल्या काळजीच्या भावनेला संदर्भित करते. एक "दयाळू" व्यक्ती इतर लोकांची काळजी घेतो आणि त्यांना मदत करतो.

  • "करुणा" हा शब्द गरजवंत लोकांची काळजी घेणे, तसेच त्यांना मदत करण्यासाठी कार्य करणे यास सदर्भित करतो.
  • पवित्र शास्त्र सांगते की, देव दयाळू आहे, म्हणजेच, तो प्रेमाने आणि दयेने भरलेला आहे.

भाषांतर सूचना:

  • "करुणा" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "खोल काळजी घेणे" किंवा "दया" किंवा "मदतीची दया करणे" यांचा समावेश असु शकतो.
  • "दयाळू" या संज्ञेचे भाषांतर "काळजी घेणारा आणि मदत कराणारा" किंवा "अत्यंत प्रेमळ आणि कृपाळू" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच2550, एच7349, एच7355, एच7356, जी16530, जी33560, जी36270, जी46970, जी48340, जी48350

काम, कामे, कृत्ये

व्याख्या:

"कार्य" हा शब्द सामान्यत: एकतर काहीतरी साध्य करण्यासाठी खर्च करण्याच्या प्रयत्नास किंवा त्या क्रियेच्या परिणामास सूचित करतो.  "कामे" हा शब्द सामान्यत: संपूर्ण क्रियांना सूचित करतो (म्हणजेच ज्या गोष्टी केल्या आहेत किंवा केल्या पाहिजेत).

  • पवित्र शास्त्रात हे शब्द सामान्यत: देव आणि मानवाच्या संदर्भात वापरले जातात.
  • जेव्हा देवाच्या संदर्भात वापरली जाते, तेव्हा पवित्र शास्त्रीतील "कार्य" ही संज्ञा बहुतेक वेळा विश्व निर्माण करण्याच्या किंवा आपल्या लोकांना (एकतर शत्रूंकडून, पापापासून किंवा दोन्हीपासून) वाचविण्याच्या देवाच्या कृतीचा संदर्भ देते.
  • देवाची कामे तो करत असलेल्या किंवा केलेल्या सर्व गोष्टींचा संदर्भ घेतात, ज्यात जग निर्माण करणे, पाप्यांना वाचविणे, सर्व सृष्टीच्या गरजा भागविणे आणि संपूर्ण विश्व जागृत ठेवणे यांचा समावेश आहे.
  • एखादी व्यक्तीने केलेली कामे किंवा कृती एकतर चांगली किंवा वाईट असू शकते.

भाषांतरातील सूचना:

  • "कामे" या संज्ञेचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग "कृत्ये" किंवा "कृती" किंवा "पूर्ण केलेल्या गोष्टी"
  • देवाचे "कामे" किंवा "कृत्ये" किंवा "त्याच्या हातांचे कार्य" यांचे भाषांतर "चमत्कार" किंवा "अद्भुत कृत्ये" किंवा "देव करतो त्या गोष्टी" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • "देवाचे कार्य" या अभिव्यक्तीचे भाषांतर "देव करीत असलेल्या गोष्टी" किंवा "देव करीत असलेले चमत्कार" किंवा "देवाने जे केले आहे ते सर्व" असे म्हणून केले जाऊ शकते
  • "कार्य" हा शब्द “कार्ये” या शब्दाचे एकवचनी रुप असु शकते जसे "प्रत्येक चांगले कार्य" किंवा "प्रत्येक चांगली कृती".
  • जेव्हा देव किंवा इतरांसाठी काम केले जाते तेव्हा त्याचे भाषांतर "सेवा" किंवा "सेवाकार्य" असे म्हणून केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: फळ, पवित्र आत्मा, चमत्कार)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H4399, H4566, H4567, H4611, H4659, H5949, G20410

कृपा, अनुकूल, पक्षपात

व्याख्या:

"कृपा करणे" सामान्यत: म्हणजे प्राधान्य देणे. जो कोणी दुसऱ्या व्यक्तीची बाजू घेतो तेव्हा तो त्या व्यक्तीला सकारात्मक मानतो आणि त्याला मान्यता देतो.

  • येशू मनुष्याच्या आणि देवाच्या "कृपेत" वाढत गेला.याचा अर्थ असा की देव आणि इतर या दोघांनीही त्याच्या चारित्र्याला आणि वर्तनाला मान्यता दिली.
  • एखाद्या व्यक्तीवर "कृपा होणे" या अभिव्यक्तीचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीने मान्यता दिली आहे.
  • जेव्हा एखादा राजा एखाद्यावर कृपा दर्शवितो, तेव्हा अनेकदा याचा अर्थ असा होतो की तो त्या व्यक्तीची विनंती मान्य करतो आणि ती मंजूर करतो.
  • "कृपा" ही दुसऱ्या व्यक्तीच्या फायद्यासाठी केलेला एक हावभाव किंवा कृती देखील असु शकते.
  • "पक्षपात" या शब्दाचा अर्थ काही लोकांसाठी अनुकूल वागण्याची वृत्ती आहे परंतु इतरांसाठी नाही. याचा अर्थ एका व्यक्तीला दुसऱ्याऐवजी किंवा एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीऐवजी निवडण्याची प्रवृत्ती असा आहे कारण ती व्यक्ती किंवा वस्तू पसंत केली जाते. सामान्यतः पक्षपात हा अन्यायकारक मानला जातो.

भाषांतर सूचना

  • "कृपा" या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या इतर पध्दतीमध्ये "प्राधान्य" किंवा "आशीर्वाद" किंवा "लाभ" या संज्ञांचा समावेश असु शकतो.
  • "परमेश्वराच्या कृपेचे वर्ष" याचे "वर्ष (किंवा समय) जेव्हा परमेश्वर मोठा आशीर्वाद देईल." असे म्हणून भाषांतर केले जाऊ शकते.
  • "पक्षपात" हा शब्द "पक्षपातीपणा" किंवा "पूर्वग्रहदूषित" किंवा "अन्यायकारक वागणूक" असे म्हणून भाषांतरीत केला जाऊ शकतो. हा शब्द "आवडता" या शब्दाशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ इतर सर्वांपेक्षा प्राधान्य देणे आहे.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


कृपाळू, दयाळू

व्याख्या:

“कृपा” हा शब्द मदत किंवा आशीर्वाद याला संदर्भित करतो जे एखाद्याने मिळवले नाही त्याला दिले जाते. “दयाळू” ही संज्ञा जो एखाद्यावर कृपा करतो त्याचे वर्णन करते.

  • पापी मानवांबद्दल देवाची कृपा ही एक देणगी आहे जी मोफत दिली जाते.
  • कृपेची संकल्पना दयाळूपणे वागणे आणि एखाद्याने चुकीच्या किंवा हानीच्या गोष्टी केल्या आहेत त्याला क्षमा करणे याला संदर्भित करते.
  • “कृपा मिळवा” ही अभिव्यक्ती म्हणजे देवाकडून मदत व दया प्राप्त करण्याचा अविर्भाव आहे. बहुतेकदा याचा अर्थ असा होतो की देव एखाद्यावर प्रसन्न आहे आणि त्याला मदत करतो.

भाषांतरातील सुचना:

  • “कृपा” भाषांतरित करण्याच्या इतर मार्गांमध्ये “ईश्वरी दयाळूपणा” किंवा “देवाची कृपा” किंवा “देवाची दया आणि पाप्यांची क्षमा” किंवा “कृपाळू दया” यांचा समावेश आहे.
  • “दयाळू” या शब्दाचे भाषांतर “कृपेने पूर्ण” किंवा “कृपाळू” किंवा “कृपाळू” किंवा “कृपेने दयाशील” म्हणून केले जाऊ शकते.
  • “त्याच्यावर देवाची कृपादृष्टी झाली” या वाक्यांशाचे भाषांतर “देवाकडून त्याला कृपा प्राप्त झाली” किंवा “देवाने कृपेने त्याला मदत केली” किंवा “देवाने त्याच्यावर आपली कृपा प्रकट केली” किंवा“ देव त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याला मदत केली ”असे भाषांतर केले जाऊ शकते. ”

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच2580, एच2587, एच2589, एच2603, एच8467, जी21430, जी54850, जी55430

कोकरा, देवाचा कोकरा

व्याख्या:

"कोकरा" हा शब्द तरुण मेंढीसाठी वापरला जातो. मेंढी चार पायांचा प्राणी आहे ज्याला जाड लोकरीचे केस आहेत, त्याला देवाला बलिदान करण्यासाठी वापरतात. येशूला "देवाचा कोकरा" असे म्हंटले आहे, कारण लोकांच्या पापासाठी त्याचे बलिदान करण्यात आले.

  • हे प्राणी सहजरीत्या भलतीकडे नेले जाऊ शकतात आणि म्हणून त्यांना संरक्षणाची गरज आहे. देव मनुष्य प्राण्याची तुलना मेंढरांशी करतो.
  • देवाने लोकांना शारीरिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या मेंढरांचे आणि कोकरांचे बलिदान करण्याच्या सूचना दिल्या.

येशूला "देवाचा कोकरा" असे संबोधण्यात आले ज्याला लोकांच्या पापासाठी बलिदान करण्यात आले. तो एक परिपूर्ण, निष्कलंक बलिदान होता कारण तो पूर्णपणे पापाशिवाय होता.

भाषांतर सूचना

  • जर मेंढरांना भाषिक क्षेत्रात ओळखले जाते, तर त्या भाषेमध्ये लहान मेंढीला ज्या नावाने ओळखले जाते, त्या शब्दाचा उपयोग "कोकरा" आणि "देवाचा कोकरा" यांच्या भाषांतरासाठी करा.
  • "देवाचा कोकरा" ह्याचे भाषांतर "देवाचा (बालीदानासाठीचा) कोकरा" किंवा "देवाला बलिदान केलेला कोकरा" किंवा "देवाकडून (बालीदानासाठीचा) कोकरा" असे केले जाऊ शकते.
  • जर मेंढरे ओळखीची नसतील तर, ह्याचे भाषांतर "लहान मेंढरू" असे करून त्याच्याबरोबर मेंढरे कशी असतात याचे वर्णन करणारी एक तळटीप द्या. या टिपणमध्ये त्या भागातील मेंढरे आणि कोकरांसारख्या प्राण्याशी तुलना करा, जी कळपामध्ये राहतात, जी भित्रे आणि निराधार आहेत, आणि जी सहसा भरकटली जातात.
  • जवळच्या स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे हे देखील विचारात घ्या.

(पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे)

(हे सुद्धा पहा: मेंढी, मेंढपाळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 05:07 अब्राहाम व इसहाक होमार्पणाच्या ठिकाणी जात असतांना इसहाकाने विचारले “बाबा, होमापर्णासाठी लाकडे आहेत, पण कोकरु कोठे आहे?”
  • 11:02 जो कोणी देवावर विश्वास ठेवील त्याच्या घरातील प्रथम जन्मलेल्यास वाचविण्यासाठी देवाने मार्ग काढला. प्रत्येक कुटुंबाला एक निष्कलंक कोकरु निवडायचे होते आणि ते वधावयाचे होते.
  • 24:06 दूस-या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला. योहानाने त्यास पाहून म्हटले,‘‘पाहा! जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.’’
  • 45:08 तो वाचत होता, "त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणा-याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडीत नाही.
  • 48:08 जेव्हा देवाने अब्राहामास इसहाकाचे अर्पण करावयास सांगितले, तेंव्हा देवाने इसहाकाच्या ऐवजी, अर्पणासाठी कोकरा पुरविला होता. * आम्ही आमच्या पापांमुळे मरणदंडास पात्र आहोत! परंतु देवाने येशूला, देवाचा कोकरा, अर्पण म्हणून आमच्याजागी मरण्यास पाठविले.
  • 48:09 जेव्हा देवाने मिसर देशामध्ये शेवटची पीडा पाठविली, तेव्हा त्याने प्रत्येक इस्राएली कुटुंबास एक निर्दोष कोकऱ्याचा वध करून त्याचे रक्त त्यांच्या घरांच्या चौकटीस लावावयास सांगितले होते.
  • Strong's: H7716, G721, G2316

कोनशीला

व्याख्या:

""कोनशिला" ही संज्ञा एका मोठ्या दगडाला संदर्भित करतो ज्यास विशेषतः कापले जाते आणि इमारतीच्या पायाच्या कोपऱ्यात बसविला जातो.

  • इमारतीच्या इतर सर्व दगडांना मोजमाप करून कोनशिलेच्या संबंधात बसवण्यात येते.
  • हे संपूर्ण रचनेचा भक्कमपणा आणि स्थिरता ह्यासाठी खूप महत्वाचे आहे.
  • नवीन करारामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या मंडळीची रूपकदृष्ट्या एका इमारतीशी तुलना केली जाते ज्यामध्ये येशू ख्रिस्त तीचा "कोनशिला" आहे.
  • ज्याप्रकारे एखाद्या इमारतीची कोनशिला संपूर्ण इमारतीचे स्थानास आधार देते आणि त्यास निर्धारित करते, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त हा कोनशिला आहे ज्यावर विश्वासणाऱ्यांच्या मंडळीची स्थापना केली जाते आणि आधार दिला जातो.

भाषांतर सूचना:

  • "कोनशीला" या शब्दाचे भाषांतर "इमारतीचा मुख्य दगड" किंवा "पायाचा दगड" असे देखील केले जाऊ शकते.
  • प्रकल्पित भाषेत इमारतीच्या पायाचा भाग, जो मुख्य आधार आहे, त्यासाठी एखादा शब्द आहे काय, याचा विचार करा. तसे असल्यास, त्या शब्दाचा वापर केला जाऊ शकतो.
  • ह्याचे भाषांतर करण्याचा इतर मार्ग "इमारतीच्या कोपऱ्यासाठी वापरण्यात येणारा पायाचा दगड" असा असू शकतो.
  • तो एक मोठा दगड आहे, ज्याचा उपयोग इमारतीची भक्कम आणि सुरक्षितसामग्री म्हणून करतात, हे तथ्य तसेच ठेवणे हे महत्वाचे आहे. जर इमारतींच्या बांधकामामध्ये दगडाचा वापर करत नसतील, तर तिथे कदाचित दुसरा शब्द, ज्याचा अर्थ "मोठा दगड" (जसे की "धोंडा") ह्याचा उपयोग केला जाऊ शकतो, पण त्याच्यामध्ये तो व्यवस्थित रचलेला आणि घट्ट बसण्यासाठी बनविला याची कल्पना असावी.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0068, एच6438, एच7218, जी204, जी1137, जी2776, जी3037

कोश

व्याख्या:

"कोश" हा शब्द शब्दशः एक आयताकृती लाकडी पेटीशी संदर्भित आहे जो काही धारण करण्यासाठी किंवा संरक्षित केला जातो. एक तारू मोठे किंवा लहान असू शकते ते कशासाठी वापरले जात आहे त्यावर अवलंबून असते.

  • इंग्रजी भाषेच्या पवित्र शास्त्रामध्ये, "तारू" या शब्दाचा संदर्भ एक खूप मोठ्या, आयताकृती लाकडी जहाजासाठी येतो, जे नोहाने जगभरातील पुरामधून बाहेर पडण्यासाठी बांधले होते. तारू सपाट तळ, एक छत, आणि भिंती यांनी बनलेले होते.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याचे मार्ग "खूप मोठे जहाज" किंवा "नौका" किंवा "मालवाहू जहाज" किंवा "मोठे, पेटीच्या-आकाराचे जहाज."
  • ज्या हिब्रू शब्दाचा वापर हा मोठ्या जहाजासाठी केला जातो तोच शब्द टोपली किंवा पेटीसाठी वापरला जातो, ज्यात मोशेला त्याच्या आईने त्याला लपविण्यासाठी नाईल नदीत ठेवले होते. त्या प्रकरणात त्याला सहसा "टोपली" म्हणून भाषांतरित केले आहे.
  • "कराराचा कोश" या वाक्यांशात, "तारू" या शब्दाचा एक वेगळा हिब्रू शब्द वापरला आहे. याचे "पेटी" किंवा "मोठी पेटी" किंवा "पात्र" म्हणून भाषांतर केले जाऊ शकते.
  • "कोश" या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी संज्ञा निवडताना प्रत्येक संदर्भात काय महत्वाचे आहे आणि ते कशासाठी वापरले जात आहे यावर विचार करणे महत्वाचे आहे.

(हे देखील पहा: कराराचा कोश, पेटी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती

  • स्ट्रोंग: H727, H8392, G2787

क्रोध, संताप

व्याख्या:

क्रोध हा एक तीव्र राग आहे जो कधीकधी दीर्घकाळ राहतो. बायबलमध्ये लोक आणि देव या दोघांना तीव्र राग येत असल्याचे वर्णन केले आहे. देवाचा "क्रोध" याबद्दल बोलत असताना, हे सुनिश्चित करा की या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द किंवा वाक्यांश क्रोधाच्या पापी वृत्तीला सदर्भित करत नाही (जे एखाद्या मानवी व्यक्तीसाठी खरे असू शकते).

  • बायबलमध्ये, "क्रोध" हा शब्द सहसा देवाच्या पापाबद्दल योग्य न्यायास आणि त्याच्या विरोधात बंड करणाऱ्या लोकांच्या शिक्षेस संदर्भित करतो.
  • "देवाचा क्रोध" त्याच्या न्यायाच्या आणि पापाबद्दलच्या शिक्षेला देखील संदर्भित करु शकते.
  • जे लोक आपल्या पापाचा पश्चाताप करत नाहीत त्यांच्यासाठी देवाचा क्रोध हा योग्य दंड आहे.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "तीव्र राग" किंवा "नितीपुर्वक न्याय" किंवा "क्रोध" ह्यांचा समावेश होतो.
  • देवाचा क्रोध न्यायी आणि पवित्र आहे. देवाच्या क्रोधाबद्दल बोलताना, या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द किंवा वाक्यांश पापी मानवी संतापाचा संदर्भ देत नाही याची खात्री करा.

(हे देखील पाहा: न्यायाधीश, पाप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0639, एच2197, एच2528, एच2534, एच2740, एच3707, एच3708, एच5678, एच7107, एच7109, एच7110, एच7265, एच7267, जी23720, जी37090, जी39490, जी39500

क्षमा करणे, क्षमा पावलेला, क्षमाशीलता, माफ करणे, माफ केले

व्याख्या:

एखाद्याला क्षमा करणे म्हणजे, जरी त्या व्यक्तीने काही अपाय केला असेल तरी, त्या व्यक्तीबद्दल द्वेष न बाळगणे. "क्षमाशीलता" ही एखाद्याला क्षमा करण्याची क्रिया आहे.

  • एखाद्याला क्षमा करणे ह्याचा अर्थ सहसा ज्या व्यक्तीने काही चूक केली आहे त्या व्यक्तीला शिक्षा न करणे असा होतो.
  • "कर्ज माफ करा" या अभिव्यक्तीमध्ये या संज्ञाचा लाक्षणिकरित्या अर्थ "रद्द करणे" असा केला जाऊ शकतो.
  • जेंव्हा लोक त्यांचे पाप कबूल करतात, देव त्यांना वधस्तंभावरील येशूच्या बलिदानाच्या आधारावर क्षमा करतो.
  • येशूने त्याच्या शिष्यांना जसे त्यांने त्यांना क्षमा केली तशी दुसऱ्यांना क्षमा करण्यास शिकवले.

"माफ करणे" या शब्दाचा अर्थ एखाद्याला क्षमा करणे आणि त्याला त्याच्या पापाबद्दल शिक्षा न करणे असा होतो.

  • या शब्दाचा देखील "क्षमा करणे" असाच अर्थ होतो, पण त्याच्यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तीला शिक्षा न करण्याबद्दल औपचारिक निर्णयाचा समावेश असण्याची शक्यता आहे.
  • न्यायालयामध्ये, एक न्यायाधीश गुन्ह्यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तीला क्षमा करू शकतो.
  • जरी आपण पापामुळे दोषी असलो, तरी येशु ख्रिस्ताने वधस्तंभावरील आपल्या बलिदानाच्या मृत्युच्या आधारावर, त्याने आपल्याला नरकामध्ये मिळणाऱ्या शिक्षेपासून माफ केले.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, "क्षमा करणे" याचे भाषांतर "माफ करणे" किंवा "रद्द करणे" किंवा "सोडून देणे" किंवा (एखाद्याच्या) "विरोधात काहीही न धरणे" असे केले जाऊ शकते.
  • "क्षमाशीलता" या संज्ञेचे भाषांतर "न चिडण्याचा सराव करणे" किंवा "(एखादा) दोषी नसल्याची घोषणा करणे" किंवा "माफीचे कृत्य करणे" अशा अर्थाच्या शब्दानी किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते.
  • क्षमा करण्यासाठीच्या औपचारिक निर्णयासाठी भाषेत एखादा शब्द असेल, तर तो शब्द "माफ करणे" याच्या भाषांतरासाठी वापरला जाऊ शकतो.

(हे देखील पाहा: दोष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • ७:१० परंतु एसावाने अगोदरच याकोबास क्षमा केली होती, आणि त्यांना एकमेकांना भेटून आनंद झाला.
  • १३:१५ मोशे पुन्हा पर्वतावर चढला व त्याने देवाने लोकांना क्षमा करावी अशी प्रार्थना केली. देवाने मोशेचे ऐकले व त्यांना क्षमा केली.
  • १७:१३ दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चाताप केला आणि देवाने त्यास क्षमा केली.
  • २१:५ नव्या करारामध्ये, देव आपल्या आज्ञा मनुष्यांच्या हृदयावर लिहिल, लोक देवाला वैयक्तीकरित्या ओळखतील,ते त्याचे लोक होतील, आणि देव त्यांच्या पापांची क्षमा करील.
  • २९:१ एके दिवशी पेत्राने येशूला विचारले,‘‘प्रभुजी, जेंव्हा माझा भाऊ माझ्याविरुद्ध अपराध करील तेव्हा मी त्यास किती वेळा क्षमा करावी?’’
  • २९:८ तू मला गयावया केल्यामुळे मी तुझे कर्ज माफ केले.
  • ३८:५ मग येशूने एक प्याला घेऊन म्हटले, ‘‘ ह्यातुन प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. ते अनेकांच्या पापाच्या क्षमेसाठी ओतले जात आहे.

शब्द माहीती:

  • एच5546, एच5547, एच3722, एच5375, एच5545, एच5547, एच7521, जी859, जी863, जी5483

खंडणी, खंडणी भरून मुक्त झालेला

व्याख्या:

"खंडणी" हा शब्द बंदिवासात ठेवलेल्या व्यक्तीच्या सुटकेसाठी मागितलेली रक्कम किंवा इतर भरण्यात आलेला मोबदला यास संदर्भित करतो.

  • क्रियापद म्हणून, "खंडणी" ह्याचा अर्थ असा एखादा ज्याला पकडले, गुलाम केले, किंवा तुरुंगात टाकण्यात आले आहे अशा व्यक्तीला सोडवण्यासाठी मोबदला देणे किंवा आत्म-समर्पणाने काहीतरी करणे असा होतो. "परत विकत घेणे" या शब्दाचा हा अर्थ "सोडवणे" या शब्दाच्या अर्थासारख्याच आहे.
  • पापमय लोकांना त्यांच्या पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी येशूने स्वतःला मृत्यू देण्याची परवानगी दिली. पवित्र शास्त्रामध्ये, लोकांच्या पापांच्या शिक्षेची भरपाई करून त्याच्या लोकांना परत विकत घेण्याच्या देवाच्या कृत्याला "सुटका" असे म्हणतात.

भाषांतर सूचना

  • "खंडणी" या शब्दाचे भाषांतर "सोडण्यासाठी मोबदला देणे" किंवा "मुक्त करण्याची किंमत देणे" किंवा "परत विकत घेणे" असे केले जाऊ शकते.
  • "खंडणी भरणे" या वाक्यांशाचे भाषांतर "(स्वातंत्र्याची) किंमत भरणे" किंवा "(लोकांना मुक्त करण्यासाठी) दंड भरणे" किंवा "आवश्यक असलेली रक्कम देणे" असे केले जाऊ शकते.
  • "खंडणी" या नामाचे भाषांतर "परत विकत घेणे" किंवा "दंड भरलेले" किंवा "किंमत भरलेली" (लोक किंवा जमीन परत विकत घेण्यासाठी किंवा मुक्त करण्यासाठी) म्हणून केले जाऊ शकते.
  • "खंडणी" आणि "सुटका" या शब्दाचा इंग्रजीमध्ये समान अर्थ आहे परंतु काहीवेळा तो वेगळ्या पद्धतीने वापरला जातो. इतर भाषेमध्ये ह्यासाठी कदाचित फक्त एकच शब्द असू शकतो.
  • "प्रायश्चित्त" या शब्दापासून याचे भाषांतर वेगळे असेल याची खात्री करा.

(हे देखील पाहा: प्रायश्चित्त, सोडविणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग्स: एच1350, एच3724, एच6299, एच6306, जी487, जी3083

ख्रिस्त, मसीहा

तथ्य:

“मसीहा” आणि “ख्रिस्त” ही संज्ञा “अभिषिक्त” आणि देवाचा पुत्र येशू याला संदर्भित करते.

  • “मसीहा” आणि “ख्रिस्त” या दोन्ही संज्ञेचा उपयोग नव्या करारामध्ये देवाच्या पुत्राचा उल्लेख करण्यासाठी केला आहे, ज्याला देवपित्याने आपल्या लोकांवर राजा म्हणून राज्य करण्यासाठी व पाप व मृत्यू यापासून वाचविण्यासाठी नेमले आहे.
  • जुन्या करारात संदेष्ट्यांनी ख्रिस्त पृथ्वीवर येण्याच्या शेकडो वर्षांपूर्वी भविष्यवाण्या लिहून ठेवल्या.
  • जुन्या करारात बऱ्याचदा “अभिषिक्त (एक)” हा शब्द येणाऱ्या मसीहाचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो.
  • येशूने यातील अनेक भविष्यवाण्या पूर्ण केल्या आणि त्याने चमत्कारिक कामे केली ज्याद्वारे तो मसीहा असल्याचे सिद्ध केले; जेव्हा तो परत येईल तेव्हा या उरलेल्या भविष्यवाण्या पूर्ण होतील.
  • “ख्रिस्तामध्ये” आणि “ख्रिस्त येशू” या शब्दाप्रमाणेच “ख्रिस्त” हा शब्द शीर्षक म्हणून पुष्कळदा वापरला जातो.
  • जसे “येशू ख्रिस्त” या नावात त्याच्या नावाचा भाग म्हणून “ख्रिस्त” हा शब्द देखील वापरला गेला.

भाषांतरातील सुचना:

  • ही संज्ञा तीचा अर्थ वापरून भाषांतरीत केली जावू शकते “अभिषिक्त” किंवा “देवाचा अभिषिक्त तारणारा”.
  • बर्‍याच भाषा लिप्यंतरित शब्द वापरतात ज्या “ख्रिस्त” किंवा “मसीहा” यासारख्या दिसतात किंवा बोलल्या जातात. (पाहा: अज्ञात भाषांतर कसे करावे)
  • लिप्यंतरण शब्द, “ख्रिस्त, जो अभिषिक्त” या शब्दाची परिभाषा असु शकते.
  • हे संपूर्ण पवित्र शास्त्रात कसे भाषांतरित केले जाते त्यामध्ये सुसंगत राहा जेणेकरून हे स्पष्ट होईल की त्याच शब्दाचा उल्लेख केला जात आहे.
  • "मसीहा" आणि "ख्रिस्त" या शब्दाचे भाषांत संदर्भामध्ये जिथे दोन्ही शब्द एकाच वचनात आढळता तेथे चांगले कार्य करतात याची खात्री करा त (जसे योहान1:41).

(हे देखील पाहा: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: देवाचा पुत्र, दावीद, येशू, अभिषेक करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्रातीच्या कथांतील उदाहरणे:

  • 17:7 मसीहा हा देवान निवडलेला होतो जो जगातील लोकांना त्यांच्या पापापासून वाचवेल.
  • 17:8 हे जसे घडते, त्यासाठी इस्त्राएल लोकांना मसीहा येण्यापुर्वी, सुमारे 1,000 वर्ष प्रतिक्षा करावी लागली.
  • 21:1 सुरुवातीपासूनच, देवाने मसीहाला पाठवण्याची योजना केली.
  • 21:4 देवाने दावीदा राजाला अभिवचन दिले होते की मसीहा दावीदाच्या आपल्या वंशातील होईल.
  • 21:5 मसीहा नविन कराराचा आरंभ करील.
  • 21:6 देवाच्या संदेष्ट्याने असेही म्हटले होती की मसीहा संदेष्टा, याजक आणि राजा असेल.
  • 21:9 यशया संदेष्ट्याने अशी भविष्यवाणी केली की मसीहाचा जन्म कुमारीकेपासून होईल.
  • 43:7 “परंतू देवाने त्याला भविष्यवाणी पुर्ण करण्यासाठी पुन्हा जीवंत केले जी आहे, ‘तू आपल्या पवित्रजनास कबरेत कुजू देणार नाही.’”
  • 43:9"परंतु हे निश्चितपणे जाणून घ्या की देवाने येशूला प्रभु व मसीहा हे दोन्ही करून ठेविले आहे!"
  • 43:11पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही प्रत्येकाने पश्चात्ताप करावा व येशू ख्रिस्ताच्यानावात बाप्तिस्मा घ्यावा, जेणेकरून देव तुमच्या पापांची क्षमा करील.”
  • 46:6येशू हा मसीहा आहे हे सिद्ध करून शौलाने यहुद्यांशी वाद घातला.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच4899, जी33230, जी55470

ख्रिस्तविरोधी

व्याख्या:

"ख्रिस्तविरोधी" या संज्ञा एखाद्या व्यक्तीला किंवा शिकवणुकीला जी येशू ख्रिस्ताविरुद्ध आणि त्याच्या कार्याविरुद्ध आहे त्यास संदर्भित करते. जगामध्ये अनेक ख्रिस्त विरोधक आहेत.

  • प्रेषित योहान आपल्यास असे म्हणतो की जर एखादी व्यक्ती असे म्हणून लोकांना फसवत असेल की येशू हा मसिहा नव्हे किंवा येशू हा देव आणि मानव दोघेही नाही तर तो ख्रिस्तविरोधी आहे.
  • पवित्रशास्त्र असेही शिकवते की येशूच्या कार्याचा विरोध करणारा ख्रिस्तविरोधीचा सामान्य आत्मा या जगात कार्यरत आहे.
  • नवीन करारातील प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 13 अध्यात असे म्हटले आहे की "ख्रिस्तविरोधी" म्हटलेला एक मनुष्य आहे जो शेवटल्या काळात प्रकट होईल. हा मनुष्य देवाच्या लोकांचा नाश करण्याचा प्रयत्न करेल, पण येशू त्याचा पराभव करील.
  • प्रेषित पौल या व्यक्तीला “अधर्माचा माणूस” (2 थेस्सलनी 2:3) आणि जगातील ख्रिस्तविरोधीच्या सामान्य आत्म्याला “अधर्माची गुप्त शक्ती” म्हणून संबोधतो (2 थेस्सलनी 2:7).

भाषांतर सूचना:

  • या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "ख्रिस्त-विरोधक" किंवा "ख्रिस्ताचा शत्रू" किंवा "ख्रिस्ताच्या विरुद्ध असणारा व्यक्ती" अशा शब्दांचा किंवा वाक्याचा समावेश होतो.
  • "ख्रिस्तविरोधकाचा आत्मा" या वाक्यांशाचे भाषांतर "ख्रिस्ताच्या विरोधात असलेला आत्मा" किंवा "ख्रिस्ताच्या विरोधात असत्य पसरविण्याची प्रवृत्ती" किंवा "ख्रिस्ताबद्दल खोटी शिकवण देणारा आत्मा" असे केले जाऊ शकते.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या अनुवादामध्ये याचे भाषांतर कसे केले जाते याचा विचार करा. (पाहा: अज्ञाताचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: ख्रिस्त, यातना)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी05000

ख्रिस्तामध्ये, येशुमध्ये, प्रभूमध्ये, त्याच्याठायी

व्याख्या:

“ख्रिस्तामध्ये” हा वाक्प्रचार आणि संबंधित संज्ञा येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे त्याच्याशी नातेसंबंधात असण्याची स्थिती किंवा परीस्थिती दर्शवतात.

  • इतर संबंधित संज्ञांमध्ये "ख्रिस्त येशूमध्ये, येशू ख्रिस्तामध्ये, प्रभु येशूमध्ये, प्रभु येशू ख्रिस्तामध्ये" यांचा समावेश आहे.
  • "ख्रिस्तामध्ये" या संज्ञेच्या संभाव्य अर्थांमध्ये "तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून" किंवा "ख्रिस्ताशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधाद्वारे" किंवा "ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासावर आधारित" या वाक्यांचा समावेश असू शकतो.
  • या संबंधित सर्व शब्दांचा येशूवर विश्वास ठेवण्याच्या आणि त्याचे शिष्य असण्याच्या स्थितीचा समान अर्थ आहेत.
  • टीप: काहीवेळा "मध्ये" हा शब्द क्रियापदासह असतो. उदाहरणार्थ, "ख्रिस्तामध्ये सहभागी" म्हणजे ख्रिस्त जाणून घेतल्याचे फायदे "सामायिक करा." ख्रिस्तामध्ये "गौरव" म्हणजे येशू कोण आहे आणि त्याने जे केले आहे त्याबद्दल आनंदित होणे आणि देवाची स्तुती करणे होय. ख्रिस्तामध्ये "विश्वास" ठेवणे ह्याचा अर्थ तारणारा म्हणून त्याच्यावर भाव ठेवणे आणि त्याला ओळखणे असा होतो.

भाषांतर सूचना:

  • संदर्भानुसार, "ख्रिस्तामध्ये" आणि "प्रभूमध्ये" (आणि संबंधित वाक्ये) या वाक्याचे भाषांतर करण्याच्या विविध मार्गांमध्ये हे समाविष्ट असू शकते:
  • "जे ख्रिस्ताचे आहेत"
  • "कारण तुमचा ख्रिस्तावर विश्वास आहे"
  • “कारण ख्रिस्ताने आपले तारण केले आहे”
  • “प्रभूच्या सेवेत”
  • “परमेश्वरावर विसंबून राहणे”
  • “परमेश्वराने जे केले आहे त्यामुळे.”
  • जे लोक ख्रिस्तावर "विश्वास ठेवतात" किंवा ज्यांचा ख्रिस्तावर "विश्वास आहे" ते येशूने शिकवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि त्याच्या वधस्तंभावरील बलिदानामुळे त्यांचे तारण करण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवतात. संदर्भावर आधारित, "

(हे देखील पाहा: ख्रिस्त, प्रभु, येशू, विश्वास, विश्वास)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी15190, जी29620, जी55470

ख्रिस्ती

व्याख्या:

येशूचे स्वर्गारोहण झाल्या नंतर काही काळाने, लोकांनी "ख्रिस्ती" हे नाव ठेवले, ज्याचा अर्थ "येशूचा अनुयायी" असा होतो.

  • तो अंत्युखिया शहरात झाले, जेथे येशूच्या अनुयायांना प्रथम "ख्रिस्ती" असे म्हटले गेले.
  • एक ख्रिस्ती मनुष्य, जो येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास ठेवतो, आणि जो त्याला त्याच्या पापापासून वाचवण्यासाठी येशूवर विश्वास ठेवतो.
  • आपल्या आधुनिक काळामध्ये, "ख्रिस्ती" हा शब्द ख्रिश्चन धर्माची ओळख असलेल्या व्यक्तीसाठी वापरला जातो, परंतु तो खरोखर येशूचे अनुसरण करीत नाही. पवित्र शास्त्रामधील "ख्रिस्ती" चा अर्थ असा नाही.
  • कारण पवित्र शास्त्रामध्ये, "ख्रिस्ती" या संज्ञेचा संदर्भ, असा कोणीतरी जो खरोखर येशूवर विश्वास ठेवतो, एका ख्रिस्तीला "विश्वासी" म्हणून सुद्धा संबोधले जाते.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर "ख्रिस्ताचा-अनुयायी" किंवा "ख्रिस्ताचे अनुसरण करणारा" किंवा कदाचित "ख्रिस्ताचा-मनुष्य" अश्यासारखे काही, असे केले जाऊ शकते.
  • या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेले शब्द हे शिष्य किंवा प्रेषित यांच्यासाठी वापरलेल्या शब्दांपेक्षा वेगळे असतील ह्याची खात्री करा.
  • या शब्दाचे भाषांतर अशा शब्दाने करताना ज्याचा संदर्भ प्रत्येकजण जो येशूवर विश्वास ठेवतो, केवळ विशिष्ठ गट नव्हे, सावध राहा.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर केले गेले आहे हे देखील विचारात घ्या. (पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे)

(हे सुद्धा पाहा: अंत्युखिया, ख्रिस्त, मंडळी, शिष्य, विश्वास, येशू, देवाचा पुत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 46:9 अंत्युखिया येथील येशूवर विश्वास ठेवणा-यांना प्रथमच "ख्रिस्ती" म्हटले गेले.
  • 47:14 पौल व इतर ख्रिस्ती पुढारी येशूची सुवार्ता सांगत व शिक्षण देत अनेक शहरांमधून प्रवास करत गेले.
  • 49:15 जर आपण येशूवर विश्वास ठेवता व त्याने तुमच्यासाठी जे केले त्यावर विश्वास ठेवता तर आपण ख्रिस्ती आहात!
  • 49:16 जर आपण ख्रिस्ती आहात, तर येशूने केलेल्या कामामुळे देवाने आपणांस क्षमा केली आहे.
  • 49:17 जरी आपण ख्रिस्ती आहात, तरी आपल्याला पाप करण्याचा मोह होऊ शकतो.
  • 50:3 स्वर्गात जाण्यापुर्वी येशूने ख्रिस्ती लोकांना सांगितले की, ज्या लोकांनी कधीच सुवार्ता ऐकली नाही त्यांना जाऊन सांगा.
  • 50:11 जेव्हा येशू परत येईल, प्रत्येक ख्रिस्ती जो मेलेला आहे तो मरणातून उठेल व अंतराळामध्ये येशूला भेटेल.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी55460

गंधरस

व्याख्या:

गंधरस हे तेल किंवा मसाला आहे जो आफ्रिका आणि आशियामध्ये वाढणाऱ्या गंधरसाच्या झाडाच्या राळापासून बनवला जातो. तो लोबानशी संबंधित आहे.

  • गंधरस धूप, अत्तर आणि औषध बनवण्यासाठी आणि दफनासाठी मृतदेह तयार करण्यासाठी देखील वापरला जात असे.
  • जेंव्हा येशू जन्म झाला तेव्हा विद्वानांनी त्याला दिलेल्या भेटींपैकी एक गंधरस होता.
  • जेंव्हा येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते, तेंव्हा त्याच्या वेदना कमी करण्यासाठी त्याला द्राक्षरसामध्ये मिश्रलेला गंधरस देण्यात आला होता.

(हे सुद्धा पाहाः धूप, ज्ञानी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच3910, एच4753, जी34640, जी46660, जी46690

गुरुजी

व्याख्या:

“रब्बी” या शब्दाचा शाब्दिक अर्थ “माझा गुरु” किंवा “माझा शिक्षक” असा होतो.

  • हे आदराचे शीर्षक होते जे एका यहुदी धार्मिक गुरू, विशेषतः देवाच्या नियमांचे शिक्षक असलेल्या माणसाला संबोधित करण्यासाठी वापरले जात असे.
  • बाप्तिस्मा करणारा योहान आणि येशू या दोघांनाही काही वेळा त्यांच्या शिष्यांनी "गुरुजी" म्हणून संबोधित केले.

भाषांतर सूचना:

  • या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "माझे गुरु" किंवा "माझे शिक्षक" किंवा "आदरणीय शिक्षक" किंवा "धार्मिक शिक्षक" यांचा समावेश असू शकतो. काही भाषा अशाप्रकारे अभिवादन कॅपिटल करू शकतात, तर इतर कदाचित करू शकत नाहीत.
  • प्रकल्पित भाषेत, शिक्षकांना सामान्यपणे संबोधित करण्यासाठी, कदाचित विशिष्ठ मार्ग असू शकतो.
  • या संज्ञेचे भाषांतर येशू हा शाळेचा शिक्षक होता, असे सूचित करत नाही, ह्याची खात्री करा.
  • तसेच संबंधित भाषेत किंवा राष्ट्रीय भाषेतील बायबल भाषांतरात “गुरुजी” चे भाषांतर कसे केले जाते याचाही विचार करा.

(पाहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे)

(हे सुद्धा पाहा: शिक्षक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी44610

गौरव, तेजस्वी, गौरव करा

व्याख्या:

"गौरव" ही संज्ञा मूल्य, योग्यता, महत्त्व, सन्मान, वैभव किंवा भव्यता या संकल्पनांचा कुटुंबासाठी सामान्य शब्द आहे. “गौरव करणे” या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला गौरव देणे, किंवा एखादी गोष्ट किंवा एखादा व्यक्ती किती वैभवशाली आहे हे दर्शविणे किंवा सांगणे होय.

  • पवित्र शास्त्रात, “गौरव” हा शब्द खासकरून अशा देवाचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला आहे, जो विश्वातील कोणालाही किंवा कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मौल्यवान, अधिक योग्य, अधिक महत्वाचा, अधिक सन्माननीय, अधिक वैभवी आणि भव्य आहे. त्याच्या चारित्र्याबद्दलटची प्रत्येक गोष्ट त्याचा गौरव प्रकट करते.
  • त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीं सांगून लोक देवाचे गौरव करू शकतात. देवाच्या चरित्रानुसार जगण्याद्वारे देखिल ते देवाचे गौरव करू शकतात, कारण असे केल्याने त्याचे मूल्य, योग्यता, महत्त्व, मान, वैभव आणि भव्यता इतरांना दिसून येते.
  • “गौरव” या संज्ञेचा अविर्भाव म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी बढाई मारणे किंवा त्याचा गर्व करणे.

जुना करार

  • जुन्या करारातील "परमेश्वराचा गौरव" हे विशिष्ट वाक्यांश सामान्यत: एखाद्या विशिष्ट ठिकाणी परमेश्वराच्या उपस्थितीचे जाणण्यायोग्य प्रकटीकरण याला संदर्भित करते

नवा करार

  • येशू ख्रिस्त किती गौरवशाली आहे हे सर्व लोकांना सांगून देव पिता आपल्या पुत्राचे गौरव करील.
  • ज्या प्रत्येकाने ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे त्याचा गौरव त्याच्यामध्ये होईल. "गौरव" या शब्दाचा वापर अनन्य अर्थ दर्शवितो. याचा अर्थ असा होतो की जेव्हा ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक पुनरुत्थानाच्या वेळी उठतील तेव्हा येशूच्या पुनरुत्थानानंतर तो जसा प्रकट झाला तसे त्यांचे शारीरिक रुप बदलले जाईल.

भाषांतरातील सुचना:

  • संदर्भानुसार, “गौरव” अनुवादित करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांमध्ये “वैभव” किंवा “महिमा” किंवा “अप्रतिम महानता” किंवा “अत्यंत मूल्य” समाविष्ट असू शकते.
  • “तेजस्वी” या शब्दाचे भाषांतर “गौरवाने भरलेले” किंवा “अत्यंत मौल्यवान” किंवा “तेजस्वी चमकणारे” किंवा “अत्यंत भव्य” असे केले जाऊ शकते.
  • “देवाला गौरव द्या” या अविर्भावाचे भाषांतर “देवाच्या महानतेचा सन्मान” किंवा “त्याच्या वैभवामुळे देवाची स्तुती करणे” किंवा “देव किती महान आहे हे इतरांना सांगा.” असे भाषांतर केले जाऊ शकते.
  • “गौरव” या अभिव्यक्तीचे भाषांतर “स्तुती” किंवा “बढाई मारणे” किंवा “गर्व करणे” किंवा “आनंद घेणे” असेही केले जाऊ शकते.
  • “गौरव” हे “गौरव दिले” किंवा “गौरव आणणे” किंवा “महान दिसण्याचे कारण” असे भाषांतरही केले जाऊ शकते.
  • “देवाचे गौरव करणे” या शब्दाचे भाषांतर “देवाची स्तुती करणे” किंवा “देवाच्या महानतेबद्दल बोलणे” किंवा “देव किती महान आहे हे दाखवणे” किंवा “देवाचा आदर करणे” (त्याच्या आज्ञाचे पालन करून) असेही केले जाऊ शकते.
  • “गौरवी असो” या संज्ञेचे भाषांतर “खूप श्रेष्ठ असल्याचे दर्शविणे” किंवा “स्तुती होणे” किंवा “उंच केले जाणे” असे देखिल केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [सन्मान], [भव्यता], [उंचावणे], [आज्ञा पालन, [प्रशंसा]])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 23:7 अचानक, आकाश देवाची स्तुती करणाऱ्या देवदूतांनी भरले, ते असे म्हणत होते, स्वर्गात देवाचे“ गौरव असो आणि पृथ्वीवर ज्या लोकांवर त्याची कृपा आहे त्या सर्वांना शांती असो!”
  • 25:6 मग सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये आणि त्यांचे सर्व वैभव दाखविले आणि म्हणाला, “जर तू खाली वाकून मला नमन केले तर मी हे सर्व तुला देईन.”
  • 37:1 जेव्हा येशूने ही बातमी ऐकली, तेव्हा तो म्हणाला, “हा आजार मरणासाठी नाही, तर देवाच्या गौरवासाठी आहे.”
  • 37:8 येशूने उत्तर दिले, "मी तुला सांगितले नव्हते का की तू माझ्यावर विश्वास ठेवशील तर देवाची गौरव पाहशील?"

शब्द  माहीती:

  • स्ट्रोंग: एच117, एच142, एच155, एच215, एच1342, एच1921, एच1926, एच1935, एच1984, एच3367, एच3513, एच3519, एच3520, एच6286, एच6643, एच7623, एच8597, जी13910, जी13920, जी17400, जी17410, जी27404, जी48880

चमत्कार, आश्चर्य, चिन्ह

व्याख्या:

एक "चमत्कार" एक आश्चर्यकारक गोष्ट आहे जी देवाने घडवून आणल्याशिवाय शक्य नाही.

  • येशूने केलेल्या चमत्कारांच्या उदाहरणांमध्ये वादळ शांत करणे आणि एका आंधळ्याला बरे करणे समाविष्ट आहे.
  • चमत्कारांना कधीकधी “आश्चर्य” म्हटले जाते कारण ते लोक आश्चर्याने किंवा आश्चर्याने भरून जातात.
  • “आश्चर्य” हा शब्द अधिक सामान्यपणे देवाच्या शक्‍तीच्या अद्भुत प्रदर्शनांना देखील सूचित करू शकतो, जसे की त्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली तेव्हा.
  • चमत्कारांना "चिन्हे" असेही म्हटले जाऊ शकते कारण ते सूचक किंवा पुरावे म्हणून वापरले जातात की देव सर्वशक्तिमान आहे ज्याचा विश्वावर पूर्ण अधिकार आहे.
  • काही चमत्कार म्हणजे देवाच्या सुटकेची कृत्ये होती, जसे की इजिप्तमधील गुलाम होण्यापासून त्याने इस्राएली लोकांना सोडवले आणि डॅनियलला सिंहांनी इजा होण्यापासून वाचवले.
  • इतर चमत्कार म्हणजे देवाच्या न्यायदंडाची कृती, जसे की जेव्हा त्याने नोहाच्या काळात जगभर जलप्रलय पाठवला आणि मोशेच्या काळात त्याने इजिप्त देशावर भयानक पीडा आणल्या.
  • देवाचे अनेक चमत्कार आजारी लोकांना शारीरिक उपचार किंवा मृत लोकांना पुन्हा जिवंत करणे हे होते.
  • देवाचे सामर्थ्य येशूमध्ये दिसून आले जेव्हा त्याने लोकांना बरे केले, वादळ शांत केले, पाण्यावर चालले आणि लोकांना मेलेल्यांतून उठवले. हे सर्व चमत्कार होते.
  • देवाने संदेष्ट्यांना आणि प्रेषितांना बरे करण्याचे चमत्कार आणि इतर गोष्टी करण्यास सक्षम केले जे केवळ देवाच्या सामर्थ्याने शक्य होते.

भाषांतर सूचना

  • “चमत्कार” किंवा “चमत्कार” च्या संभाव्य भाषांतरांमध्ये “देव करतो त्या अशक्य गोष्टी” किंवा “देवाची शक्तिशाली कृत्ये” किंवा “देवाची अद्भुत कृत्ये” यांचा समावेश असू शकतो.
  • वारंवार होणाऱ्या “चिन्हे आणि चमत्कार” या शब्दाचे भाषांतर “पुरावे आणि चमत्कार” किंवा “देवाची शक्ती सिद्ध करणारी चमत्कारी कृत्ये” किंवा “देव किती महान आहे हे दाखवणारे आश्चर्यकारक चमत्कार” असे केले जाऊ शकते.
  • लक्षात घ्या की चमत्कारिक चिन्हाचा हा अर्थ एखाद्या गोष्टीसाठी पुरावा किंवा पुरावा देणाऱ्या चिन्हापेक्षा वेगळा आहे. दोघांचा संबंध असू शकतो.

(हे देखील पाहा: शक्ती, संदेष्टा, प्रेषित, चिन्ह)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 16:8 गिदोनाने देव आपणास इस्त्राएल लोकांची सुटका करण्यासाठी उपयोग करणार आहे याची खा़त्री पटावी म्हणून देवाकडे दोन चिन्हे मागितली.
  • 19:14 देवाने अलीशाद्वारे अनेक चमत्कार केले.
  • 37:10 हा चमत्कार पाहून अनेक यहूद्यांनी येशूवर विश्वास ठेविला.
  • 43:6 "अहो इस्राएल लोकांनो, येशूने देवाच्या शक्तिद्वारे अनेक चिन्हेअद्भुत कार्ये केली, जी तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिली व तुम्हाला माहीत आहेत.
  • 49:2 येशूने अनेक चमत्कार करून आपण देव असल्याचे प्रमाण पटवून दिले. * तो पाण्यावर चालला, वादळ शांत केले, अनेक आजा-यांना बरे केले, दुष्टात्म्यांना बाहेर काढले, मेलेल्यांना जिवंत केले व पाच भाकरी व दोन मासळ्यांद्वारे 5,000 पेक्षा अधिक लोकांना पोटभर जेवू घातले.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच226, एच852, एच2368, एच2858, एच4150, एच4159, एच4864, एच5251, एच5824, एच5953, एच6381, एच6382, एच6383, एच6395, एच6725, एच7560, एच7583, एच8047, एच8074, एच8539, एच8540,, जी880, जी1213, जा1229, जी1411, जी1569, जी1718, जी1770, जी1839, जी2285, जी2296, जी2297, जी3167, जी3902, जी4591, जी4592, जी50590

चांगले, बरोबर, आनंददायी, ठिक, सर्वोत्कृष्ट

व्याख्या:

"चांगले" हा शब्द सामान्यत: नैतिक किंवा भावनिक अर्थाने एखाद्या गोष्टीच्या किंवा एखाद्याच्या गुणवत्तेचे सकारात्मक मूल्यांकन दर्शवतो. तथापि, हा शब्द संदर्भानुसार संपूर्ण बायबलमध्ये विविध बारकावे व्यक्त करतो.

  • काहीतरी "चांगले" भावनिकदृष्ट्या आनंददायी, नैतिकदृष्ट्या बरोबर, उत्कृष्ट, उपयुक्त, योग्य किंवा फायदेशीर असू शकते.
  • बायबलमध्ये, “चांगले” या शब्दाचा सामान्य अर्थ बहुतेक वेळा “वाईट” या शब्दाच्या विरोधाभाशी असतो.

भाषांतरातील सुचना:

  • लक्ष्य भाषेतील "चांगले" या शब्दासाठी सामान्य शब्द जेथे हा सामान्य अर्थ अचूक आणि नैसर्गिक असेल तेथे वापरला जावा, विशेषत: ज्या संदर्भांमध्ये त्याचा वाईटाशी विरोधाभास असतो.
  • संदर्भानुसार, या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "दयाळू" किंवा "उत्कृष्ट" किंवा "देवाला आनंद देणारे" किंवा "नीतिमान" किंवा "नैतिकदृष्ट्या सरळ" किंवा "फायदेशीर" यांचा समावेश असू शकतो.
  • “चांगली जमीन” या वाक्याचे भाषांतर “सुपीक जमीन” किंवा “उत्पादक जमीन” असे केले जाऊ शकते; “चांगले पीक” याचे भाषांतर “विपुल पीक” किंवा “मोठ्या प्रमाणात पीक” असे केले जाऊ शकते.
  • "चांगले करा" या वाक्यांशाचा अर्थ असा आहे की इतरांना फायदा होईल असे काहीतरी करणे आणि "दयाळूपणे वागणे" किंवा "मदत करणे" किंवा एखाद्याला "लाभ करणे" किंवा "एखाद्याच्या उन्नतीसाठी कारणीभूत होणे" असे भाषांतर केले जाऊ शकते.
  • “शब्बाथ दिवशी चांगले करणे” म्हणजे “शब्बाथ दिवशी इतरांना मदत करणाऱ्या गोष्टी करणे.”
  • संदर्भानुसार, “चांगुलपणा” या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये “आशीर्वाद” किंवा “दयाळूपणा” किंवा “नैतिक परिपूर्णता” किंवा “नीतिमत्ता” किंवा “शुद्धता” यांचा समावेश असू शकतो.

(हे देखील पाहा: नीतिमान, समृध्द, दुष्ट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे

  • 1:4 देवाने पाहिले की त्याने जे निर्माण केले ते म्हणजे __चांगले__आहे.
  • 1:11 देवाने बरे आणि वाईटाचे ज्ञान देणारे झाड लावले!"
  • 1:12 मग देव म्हणाला, “मनुष्याने एकटे असावे हे चांगले नाही.”
  • 2:4 "देवाला हे माहिती आहे की तुम्ही हे खाल्ल्याबरोबरच तुम्ही देवासारखे व्हाल आणि त्याच्यासारखे बरे आणि वाईट समजू शकाल.
  • 8:12 “जेव्हा तुम्ही मला गुलाम म्हणून विकले तेव्हा तुम्ही वाईट गोष्टी करण्याचा प्रयत्न केला परंतु देवाने वाईटाचा उपयोग चांगल्यासाठी केला!”
  • 14:15यहोशवा एक चांगला पुढारी होता कारण तो स्थिर असे आणि देवाची आज्ञा पाळत असे.
  • 18:13 यातील काही राजे चांगली माणसे होती ज्यांनी न्यायाने राज्य केले आणि देवाची उपासना केली.
  • 28:1उत्तम गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी मी काय करावे? ” येशू त्याला म्हणाला, “तू मला‘ उत्तम ’असे का म्हणतोस? उत्तम फक्त एकच आहे, आणि तो देव आहे. ”

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच117, एच145, एच155, एच202, एच239, एच410, एच1580, एच1926, एच1935, एच2532, एच2617, एच2623, एच2869, एच2895, एच2896, एच2898, एच3190, एच3191, एच3276, एच3474, एच3788, एच3966, एच4261, एच4399, एच5232, एच5750, एच6287, एच6643, एच6743, एच7075, एच7368, एच7399, एच7443, एच7999, एच8231, एच8232, एच8233, एच8389, एच8458, जी14, जी15, जी18, जी19, जी515, जी744, जी865, जी979, जी1380, जी2095, जी2097, जी2106, जी2107, जी2108, जी2109, जी2114, जी2115, जी2133, जी2140, जी2162, जी2163, जी2174, जी2293, जी2565, जी2567, जी2570, जी2573, जी2887, जी2986, जी3140, जी3617, जी3776, जी4147, जी4632, जी4674, जी4851, जी5223, जी5224, जी5358, जी5542, जी5543, जी5544

चिन्ह, चिन्हे, साक्ष, स्मारक चिन्ह

व्याख्या:

चिन्ह म्हणजे एखादी वस्तू, घटना किंवा कृती आहे, जी विशेष अर्थाशी संवाद साधते.

  • "स्मारक चिन्हे" हे अशी चिन्हे आहेत, जी लोकांना काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी "आठवण" करून देण्यात मदत करतात, बऱ्याचदा असे काही ज्याचे वचन दिले गेले आहे:
  • आकाशात निर्माण होणारे मेघधनुष्य हे लोकांना आठवण करून देणारे एक चिन्ह आहे, ज्याचे त्याने आश्वासन दिले आहे की, तो पुन्हा जगभर पूर आणून पुराच्या पाण्याने सर्व जीवन नष्ट करणार नाही.
  • देवाने त्यांच्याशी केलेल्या कराराच्या चिन्हादाखल, देवाने इस्राएल लोकांना त्याच्या मुलांची सुंता करण्यास सांगितले.
  • चिन्हे काहीतरी प्रकट किंवा काश्याकडे तरी निर्देश करू शकतात:
  • देवदूताने मेंढपाळांना एक चिन्ह दिले, जेणेकरून त्यांना हे समजण्यास मदत होईल की बेथलहेममध्ये जन्मलेल्यांपैकी कोणता नवजात मसिहा आहे.
  • यहुदाने धार्मिक पुढाऱ्यांसाठी चिन्ह म्हणून येशूचे चुंबन घेतले, जेणेकरून त्यांना कळेल की येशू हाच आहे ज्याला त्यांना पकडायचे होते.
  • चिन्हे काहीतरी सत्य असल्याचे सिद्ध करू शकतात:
  • संदेष्टे आणि प्रेषितांनी जे चमत्कार केले, ते चिन्ह होते, ज्यांनी हे सिद्ध झाले की ते देवाचा संदेश सांगत होते.
  • येशूने केलेले चमत्कार हे चिन्ह होते,जे सिद्ध करत होते की, तो खरोखरच मसिहा आहे.

भाषांतर सूचना

  • त्याच्या संदर्भाच्या आधारावर, "चिन्ह" देखील "सांकेतिक खून" किंवा "प्रतिक" किंवा "खून" किंवा "पुरावा" किंवा "सबूत" किंवा "संकेत" म्हणून भाषांतरीत केले जाऊ शकते.
  • "हाताने चिन्हे करणे" ह्याचे भाषांतर "हाताने हालचाल करणे" किंवा "हाताने संकेत करणे" किंवा "खुनवणे" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषेमध्ये, "चिन्ह" जे काहीतरी सिद्ध करते ह्यासाठी एक शब्द असू शकतो, आणि "चिन्ह" जे चमत्कार आहे त्यासाठी दुसरा शब्द असू शकतो.

(हे देखील पहा: चमत्कार, प्रेषित, ख्रिस्त, करार, सुंता)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती

  • Strong's: H226, H852, H2368, H2858, H4150, H4159, H4864, H5251, H5824, H6161, H6725, H6734, H7560, G364, G880, G1213, G1229, G1718, G1730, G1732, G1770, G3902, G4102, G4591, G4592, G4953, G4973, G5280

जग, जगीक

व्याख्या:

"जग" हा शब्द सामान्यत: विश्वाच्या त्या भागाचा संदर्भ देतो जिथे लोक राहतात: पृथ्वी. "जगीक" या शब्दामध्ये या जगात राहणाऱ्या लोकांच्या वाईट मूल्ये आणि वर्तनांचे वर्णन केले आहे.

  • त्याच्या सर्वसाधारण अर्थाने, "जग" हा शब्द स्वर्ग आणि पृथ्वी आणि त्यातील प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देतो.
  • बऱ्याच संदर्भांमध्ये, "जग" म्हणजे "जगातील लोक."
  • कधीकधी असे सूचित केले जाते की याचा अर्थ पृथ्वीवरील वाईट लोक किंवा जे लोक देवाचे आज्ञा पालन करीत नाहीत त्यांना संदर्भित करते.
  • या जगात राहणाऱ्या लोकांची स्वार्थी वागणूक आणि भ्रष्ट मूल्यांचा संदर्भ घेण्यासाठी प्रेषितांनी "जग" हा शब्द देखील वापरला आहे. यात मानवी प्रयत्नांवर आधारित स्व-नीतिमान धार्मिक पद्धतींचा समावेश असू शकतो.
  • लोक आणि गोष्टींचे या मूल्याद्वारे व्यक्तिचित्रण केले जाते त्यांना "जगिक" असे म्हटले जाते.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, "जग" या शब्दाचे भाषांतर "विश्व" किंवा "या जगाचे लोक" किंवा "जगातील भ्रष्ट गोष्टी" किंवा "जगातील लोकांच्या वाईट वृत्ती" असे म्हणून केले जाऊ शकते
  • "सर्व जग" या वाक्यांशाचा अर्थ बऱ्याचदा "बरेच लोक" असा होतो आणि विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या लोकांना ते संदर्भित करते. उदाहरणार्थ, "सर्व जग मिसरास आले" असे भाषांतर "आजूबाजूच्या देशातील बरेच लोक मिसरास आले होते" किंवा "मिसरच्या आसपासच्या सर्व देशांतील लोक तिथे आले" असे केले जाऊ शकते.
  • "सर्व जग त्यांच्या गावी रोमी जनगणनेत नोंदणी करण्यासाठी आले" हे भाषांतर करण्याचा आणखी एक पध्दत "रोमी साम्राज्याच्या शासित प्रदेशात राहणारे बरेच लोक गेले" ही असेल.
  • संदर्भानुसार, "जगिक" या शब्दाचे भाषांतर "वाईट" किंवा "पापमय" किंवा "स्वार्थी" किंवा "अधार्मिक" किंवा "भ्रष्ट" किंवा "या जगातील लोकांच्या भ्रष्ट मूल्यांमुळे प्रभावित" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • "जगातील या गोष्टी सांगणे" या वाक्यांशाचे भाषांतर "जगातील लोकांना या गोष्टी सांगणे" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • इतर संदर्भांमध्ये, "जगिक" या शब्दाचे भाषांतर "जगातील लोकांमध्ये राहणे" किंवा "अधार्मिक लोकांमध्ये राहणे" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: भ्रष्ट, स्वर्ग, रोम, धार्मिक)

पवित्र शास्त्रतील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0776, H2309, H2465, H5769, H8398, G10930, G28860, G28890, G36250

जीवन, जीवन जगणे, जिवंत असलेले, जिवंत

व्याख्या:

"जीवन" हा शब्द शारीरिक मृत्यूच्याविरुध्द शारीरिकरित्या जिवंत असणे याला संदर्भित करतो.

1. शारीरिक जीवन

  • “जीवन” हा शब्द वैयक्तिक व्यक्तीला संदर्भित करते जसे “वाचलेले जीवन”.
  • कधीकधी “जीवन” हा शब्द जगण्याच्या अनुभवाला संदर्भित करते जसे “त्याचे जीवन आनंददायक होते.”
  • हे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा देखील उल्लेख करते, जसे “त्याच्या आयुष्याचा शेवट" या अविर्भावात आहे.
  • “जिवंत असलेले” ही संज्ञा शारीरिकदृष्ट्या जिवंत राहण्याला संदर्भित असू शकते, जसे “माझी आई अजूनही जिवंत आहे.” "ते शहरात राहत होते." असे कोठेतरी राहण्याला देखील संदर्भित असू शकते.
  • पवित्र शास्त्रात “जीवन” ही संकल्पना सहसा “मृत्यू” या संकल्पनेच्या भिन्न असते.

2. सार्वकालिक जीवन

  • जेव्हा एखादा व्यक्ती येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा त्याला अनंतकाळचे जीवन मिळते. देव त्या व्यक्तीमध्ये राहणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या व्यक्तीस परिवर्तित जीवन देतो.
  • सार्वकालिक जीवनाचा विरोधाभास म्हणजे सार्वकालिक मृत्यू होय, म्हणजेच देवापासून विभक्त होणे आणि अनंतकाळच्या शिक्षेचा अनुभव घेणे.

भाषांतर सूचना:

  • संदर्भानुसार, “जीवन” या संज्ञेचे भाषांतर “अस्तित्व” किंवा “व्यक्ती” किंवा “जीव” किंवा “अस्तित्वात असणे” किंवा “अनुभव” असे केले जाऊ शकते.
  • “जिवंत” या शब्दाचे भाषांतर “राहणे” किंवा “निवास करणे” किंवा “अस्तित्त्वात असणे” या शब्दांद्वारे केले जावू शकते.
  • “त्याच्या जिवनाचा शेवट” या अविर्भावाचे भाषांतर “जेव्हा त्याने जगण्याचे थांबविले” असे केले जाऊ शकते.
  • “त्यांचे आयुष्य वाचवले” या अभिव्यक्तीचे भाषांतर “त्यांना जगू दिले” किंवा “त्यांना मारले नाही” असे केले जाऊ शकते.
  • “त्यांनी स्वत: चा जीव धोक्यात घातला” या अभिव्यक्तीचे भाषांतर “त्यांनी स्वतःला धोक्यात घातले” किंवा “त्यांनी असे काहीतरी केले ज्यामुळे त्यांना ठार मारले” असे केले जावू शकते
  • जेव्हा पवित्र शास्त्रातील मजकूर सार्वकालिक जीवनाविषयी बोलते तेव्हा “जीवन” या शब्दाचे खालील प्रकारे भाषांतर केले जाऊ शकते: “सार्वकालीक जीवन” किंवा “देव आपल्या आत्म्यात आम्हाला जीवन देत आहे” किंवा “देवाच्या आत्म्याद्वारे नवीन जीवन” किंवा “आपल्या अंतःकरणात जिवंत केले जाणे”.
  • संदर्भानुसार, “जीवन देणे” या शब्दाचे भाषांतर “जगण्याचे कारण” किंवा “सार्वकालीक जीवन देणे” किंवा "सार्वकालिकतेने जण्याचे कारण" असेही केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: मृत्यू, सार्वकालिक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 1:10 म्हणून देवाने थोडी माती घेतली, तीचा मनुष्य निर्माण केला आणि त्याच्यात जिवनाचा श्वास फुंकला.
  • 3:1 काही काळानंतर, जगात बरेच लोक राहत होते
  • 8:13 जेव्हा योसेफाचे भाऊ घरी परत आले आणि त्यांनी आपले वडिल, याकोब, याला सांगितले , की योसेफ अजूनही जिवंत आहे, तेव्हा तो फार आनंदी झाला.
  • 17:9 तथापि, त्याच्या [दाविद] जीवनाच्या शेवटी त्याने देवापुढे भयानक पाप केले.
  • 27:1 एके दिवशी, यहूदी नियमशास्त्राचा एक तज्ञ येशूकडे त्याची परीक्षा घेण्यासाठी आला, आणि म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचेजीवन मिळविण्यासाठी मी काय करावे?”
  • 35:5येशूने उत्तर दिले, “पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे."
  • 44:5 “रोमी राज्यपालाला येशूला ठार मारण्याची आज्ञा देणारे तुम्हीच आहात. तुम्ही जीवन देणाऱ्याचा वध केला, परंतु देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले. ”

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच1934, एच2416, एच2417, एच2421, एच2425, एच5315, जी1980, जी2220, जी2270, जी8060, जी5900

जेष्ठत्व, (जेष्ठ्पणा)

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "जेष्ठत्व" या शब्दाचा संदर्भ सन्मान, कुटुंबाचे नाव, आणि भौतिक संपत्तीशी येतो, जे सामान्यपणे कुटुंबामध्ये प्रथम जन्मणाऱ्या मुलाला दिले जाते.

  • प्रथम जन्मलेल्या मुलाच्या जेष्ठत्वामध्ये पित्याच्या वारसाचा दुप्पट हिस्स्याचा समावेश होता.
  • राजाच्या प्रथम जन्मलेल्या मुलाला, सामान्यपणे राजा मेल्यानंतर तो जेष्ठ असल्यामुळे त्याला शासन करण्याचा अधिकार दिला जातो.
  • एसावाने त्याचा जेष्ठत्वाचा हक्क त्याचा छोटा भाऊ याकोब ह्याला विकला. या कारणामुळे, याकोबाला एसावाच्या जागी, प्रथम जन्मणाऱ्या मुलाचे वारसाहक्काचे आशीर्वाद मिळाले.
  • जेष्ठात्वामध्ये, कुटुंबाची वंशावली ही प्रथम जन्मलेल्या मुलाच्या रेशेद्वारे तपासली जाण्याचा सन्मानाचा समावेश होतो.

भाषांतर सूचना:

  • "जेष्ठत्व" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "प्रथम जन्मलेल्या मुलाची संपत्ती आणि अधिकार" किंवा "कुटुंबाचा सन्मान" किंवा "प्रथम जन्मलेल्या मुलाचा विशेषाधिकार आणि वारसा" ह्यांचा समावेश होऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: प्रथम जन्मलेले, वारस, वंशज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H1062, G4415


ढोंगी, ढोंगीपणा

व्याख्या:

"ढोंगी" हा शब्द अशा व्यक्तीला सूचित करतो जो नीतिमान दिसण्यासाठी गोष्टी करतो, परंतु गुप्तपणे वाईट मार्गाने वागत असतो. "ढोंगी" या शब्दाचा अर्थ अशा वर्तनाचा आहे जो एखादा व्यक्ती योग्य आहे अशा समजमध्ये लोकांना फसवतो.

  • ढोंगी लोकांना चांगले काम करताना दिसावे असे वाटते जेणेकरून ते चांगले लोक असे लोक समजतील.
  • बर्‍याचदा ढोंगी इतर लोकांवर तो स्वतः करत असलेल्या त्याच पापी गोष्टीविषयी टिका करतो.
  • येशूने परुश्यांना ढोंगी म्हटले कारण जरी ते विशिष्ट कपडे घालणे आणि विशिष्ट पदार्थ खाणे यासारखे धार्मिक वर्तन करत असले तरी ते लोकांशी दयाळू किंवा न्यायी नव्हते.
  • ढोंगी इतर लोकांमधील दोष दाखवितो, परंतु स्वतःचे दोष कबूल करत नाही.

भाषांतर सूचना:

  • काही भाषांमध्ये “दोतोंडी” यासारखी अभिव्यक्ती असते जी ढोंगी किंवा ढोंगी व्यक्तीच्या कृतींना सूचित करते.
  • "ढोंगी" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "फसवणूक" किंवा "दांभिक" किंवा "अभिमानी, कपटी व्यक्ती" यांचा समावेश असू शकतो.
  • "ढोंगीपणा" या शब्दाचे भाषांतर, "फसवणूक" किंवा "बनावट कृती" किंवा "ढोंग करणे" या शब्दांद्वारे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0120, एच2611, एच2612, जी05050, जी52720, जी52730

तारणारा, उध्दारकर्ता

तथ्ये:

"तारणारा" या शब्दाचा अर्थ असा आहे की जो इतरांना धोक्यातून तारतो किंवा बचाव करतो. हे अशा एखाद्यास संदर्भित करू शकते जो इतरांना सामर्थ्य देतो किंवा त्यांच्यासाठी तरतूद करतो.

  • जुन्या करारामध्ये, देव इस्राएलचा तारणहार म्हणून ओळखला जातो कारण त्याने त्यांना अनेकदा त्यांच्या शत्रूंपासून वाचवले, त्यांना सामर्थ्य दिले आणि त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी पुरविल्या.
  • जुन्या करारामध्ये, इस्राएल लोकांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या इतर लोकांच्या गटाविरुध्द लढाईत नेतृत्व करून न्यायाधीशांची नेमणूक केली. या न्यायाधीशांना कधीकधी "तारणारे" असे म्हटले जाते. जुने करारातील शास्तेचे पुस्तक इतिहासामधील या वेळेची नोंद करते जेव्हा हे न्यायाधीश इस्राएलावर शासन करीत होते.
  • नवीन करारामध्ये, "तारणारा" या संज्ञेला येशू ख्रिस्ताचे वर्णन किंवा शीर्षक म्हणून वापरला जाते कारण तो लोकांना त्यांच्या पापाबद्दल कायमची शिक्षा होण्यापासून वाचवितो. तो त्यांच्या पापांद्वारे त्याना नियंत्रित होण्यापासून देखील त्यांचे रक्षण करतो

भाषांतरातील सूचना:

  • शक्य असल्यास, "तारणारा" या संज्ञेचे भाषांतर "तारणे" आणि “तारण" या संज्ञेशी संबंधित असलेल्या शब्दाने केले पाहिजे.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या मार्गांमध्ये " वाचविणारा" किंवा "देव, जो तारतो" किंवा "जो धोक्यातून मुक्त करतो" किंवा “येशू, जो पापांपासून (लोक) वाचवितो"

(हे देखील पाहा: वितरण, येशू, सेव्ह, जमा)

पवित्र बायबल संदर्भ:

  • [1 तीमथ्याला पत्र 04:10]
  • [2 पेत्राचे पत्र 02:20]
  • [प्रेषितांचे कृत्ये 05: 29-32]
  • [यशया 60: 15-16]
  • [लुक 1:47]
  • [स्तोत्रसंहीता 106: 19-21]

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच3467, जी4990

दगडमार करणे, दगडमार करीत असता

व्याख्या:

एक दगड म्हणजे छोटा खडक होती. एखाद्याला "दगडमार" करणे, ह्याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीला दगड आणि मोठे खडक त्याला मरण्याच्या हेतूने फेकून मारणे, असा होतो. * "दगडमार करणे" ही एक घटना आहे , ज्य्मध्ये एखाद्याला दगड मारले जातात.

  • प्राचीन काळात, दगडमार ही लोकांना त्यांच्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून त्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची एक सामान्य पद्धत होती.
  • देवाने इस्राएली पुढाऱ्यांना, विशिष्ठ पाप, जसे की व्यभिचार, ह्यासाठी लोकांना दगडमार करण्याची आज्ञा दिली होती.
  • नवीन करारामध्ये, येशूने व्यभिचार करताना पकडलेल्या स्त्रीला माफ केले, आणि लोकांना तिला दगडमार करण्यापासून थांबवले.
  • स्तेफन, पवित्रशास्त्रामधील पहिला व्यक्ती, ज्याला लोकांनी येशुबद्दल साक्ष दिली म्हणून दगडमार करून मारले.
  • लुस्त्र या शहरात, प्रेषित पौलालासुद्धा दगडमार केला, पण तो त्या घावांमुळे मेला नाही.

(हे देखिल पहा: व्यभिचार, (पाप) करणे, अपराध, मृत्यू, लुस्त्र, साक्ष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहिती

  • Strong's: H68, H69, H810, H1382, H1496, H1530, H2106, H2672, H2687, H2789, H4676, H4678, H5553, H5601, H5619, H6344, H6443, H6697, H6864, H6872, H7275, H7671, H8068, G2642, G2991, G3034, G3035, G3036, G3037, G4074, G4348, G5586

दत्तकपण, दत्तक घेणे, दत्तक घेतले

व्याख्या:

"दत्तक घेणे" आणि "दत्तकपण" या संज्ञा कायद्याने एखाद्या व्यक्तीचे जे त्याचे जैविक पालक नाही मुल बनण्याच्या प्रक्रियेला संदर्भित करतात.

  • पवित्र शास्त्रामध्ये "दत्तकपण" आणि "दत्तक घेणे" या शब्दांचे देव कसे लोकांना आपल्या कुटुंबाचा भाग बनवून त्यांना आपले आध्यात्मिक मुले आणि मुली बनवितो याचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात आला आहे.
  • दत्तक मुलांप्रमाणे, देव विश्वासणाऱ्यांना पुत्र आणि कन्याचे सर्व विशेषाधिकार देऊन येशू ख्रिस्ताबरोबर सह-वारस बनवितो.

भाषांतर सूचना

  • पालक-बालकांच्या संबंधाच्या विशेष वर्णनाचे भाषांतर करण्यासाठी या शब्दाचा एक विशेष शब्द म्हणून भाषांतर केले जाऊ शकते. हे समजल्याची खात्री करा की यास एक लाक्षणिक किंवा आध्यात्मिक अर्थ आहे.
  • "मुल म्हणून दत्तकपणाचा अनुभव" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाने त्याची मुले म्हणून दत्तक घेणे" किंवा "देवाची (आध्यात्मिक) मुले होणे" असे केले जाऊ शकते.
  • "मुलांना दत्तक घेण्याची प्रतीक्षा करणे" याचे भाषांतर "परमेश्वराचे मुल बनण्याकडे पाहणे" किंवा "परमेश्वर मुल म्हणून आपला स्वीकार करील या अपेक्षेने वाट पाहणे" असे भाषांतर केले जाऊ शकते.
  • "त्यांना दत्तक घेणे" या वाक्यांशाचे भाषांतर "त्यांना स्वत: च्या मुलांसारखे स्वीकारणे" किंवा "त्यांना स्वतःची (आध्यात्मिक) मुले बनवणे" असे म्हणून केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: वारस, वारसा, आत्मा)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी 52060

दया, दयाळू

व्याख्या:

“दया” आणि “दयाळू” हे शब्द गरजू लोकांना मदत करणे, विशेषत: जेव्हा ते अत्यंत कठीन किंवा दीन परिस्थितीत असतात याला संदर्भित करते.

  • “दया” या शब्दामध्ये लोकांना चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल शिक्षा न देणे याचा देखिल समावेश असु शकतो.
  • राजासारख्या सामर्थ्यवान व्यक्तीचे वर्णन “दयाळू” असे केले जाते जेव्हा तो लोकांचे नुकसान करण्याऐवजी दयाळूपणे वागतो.
  • दयाळू असणे म्हणजे ज्याने आपल्याविरुद्ध काहीतरी चूक केली आहे त्याला क्षमा करणे.
  • जेव्हा आम्ही जास्त गरजू लोकांना मदत करतो तेव्हा आम्ही दया दाखवतो.
  • देव आपल्यावर दया करतो आणि आपण इतरांवर दया केली पाहिजे अशी त्याची इच्छा आहे.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार “दया” या शब्दाचे भाषांतर “दयाळूपणा” किंवा “करुणा” किंवा “कळवळा” असे केले जाऊ शकते.
  • “दयाळू” या शब्दाचे भाषांतर “कळवळा दाखवणे” किंवा “दयाळू असणे” किंवा “क्षमा करणे” असे केले जाऊ शकते.
  • “दया दाखवा” किंवा “दया करा” हे भाषांतर “दयाळूपणे वागणे” किंवा “करुणामय होणे.” असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: करुणा, क्षमा करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 19:16 त्या (संदेष्टे) सर्वांनी लोकांना सांगितले की मूर्तीची पूजा करणे थांबवा आणि इतरांचा न्याय करा आणि दया दाखवा.
  • 19:17 तो (यिर्मया) विहिरीच्या तळाशी असलेल्या चिखलात खाली बुडाला, परंतु नंतर राजाने त्याच्यावर दया केली आणि आपल्या सेवकांना यिर्मयाला मरण्यापूर्वी विहिरीतून बाहेर काढायला सांगितले.
  • 20:12 पर्शियाचे साम्राज्य बळकट होते परंतु जिंकलेल्या लोकांसाठी ते दयामय होते.
  • 27:11 नंतर येशूने नियमशास्त्राच्या अधिकाऱ्याला विचारले, “तुला काय वाटते? लूटमार करुन मारहाण झालेल्या व्यक्तीचा त्या तिघांपैकी कोण शेजारी होता? ” त्याने उत्तर दिले, "ज्याने त्याच्यावर दया दाखवली."
  • 32:11 परंतु येशू त्याला म्हणाला, “नाही, तू घरी जावे आणि आपल्या मित्रांना आणि आपल्या कुटुंबियांना देवाने तुझ्यासाठी जे काही केले आहे त्याविषयी आणि त्याने तुझ्यावर कशी दया केली आहे हे सांगावे अशी माझी इच्छा आहे.”
  • 34:9 ““परंतु कर वसूल करणारा धार्मिक अधिकार्‍यापासून खूप दूर उभा राहिला, त्याने स्वर्गाकडेही पाहिले नाही. त्याऐवजी, त्याने छाती बडवली आणि प्रार्थना केली, '' देवा, माझ्यावर दया कर कारण मी एक पापी आहे.''

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H2551, H2603, H2604, H2616, H2617, H2623, H3722, H3727, H4627, H4819, H5503, H5504, H5505, H5506, H6014, H7349, H7355, H7356, H7359, G16530, G16550, G16560, G24330, G24360, G36280, G36290, G37410, G46980

दयासन

व्याख्या:

"दयासन" हे सोन्याची शीला होती जे कराराच्या कोशाचे वरचे भाग आच्छादित करत असे बऱ्याच इंग्रजी भाषांतरामध्ये त्याला "प्रायश्चित्त आच्छादन" असे म्हटले आहे.

  • दयासन हे सुमारे 115 सेंटीमीटर लांब आणि रुंदी 70 सेंटीमीटर होते.
  • दयासनाच्या वरच्या बाजूला दोन करूब करून त्यांचे पंख एकमेकांना जोडलेले असावेत.

दयासनावरून आणि करुबांच्या दोन्ही पसरलेल्या पंखांच्या खालून मी इस्राएल लोकांना भेटत जाईन असे याहोवाने सांगितले होते. या मार्गाने याहोवाला भेटण्याची परवानगी फक्त महायाजकाला लोकांचा प्रतिनिधी म्हणून दिलेली होती.

  • कधीकधी या दयासानाला "दयाळूपणाचे आसन" असे म्हटले जाते कारण ते पापी मनुष्यांना मुक्त करण्यासाठी खाली उतरून आलेल्या परमेश्वराची कृपा कळवतो.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग म्हणजे "पवित्र कोशाचे आच्छादन जेथे परमेश्वराने सोडवण्याचे आश्वासन देतो" किंवा "जागा जिथे देवाला अर्पणे दिली जातात" किंवा "पवित्र कोशाचे झाकण जिथे देव क्षमा करतो आणि पुनर्रचना करतो."
  • याचा अर्थ "विनंतीचे स्थान" असाही होऊ शकतो.
  • या संज्ञेचा "प्रायश्चित्त", "विनंती," आणि "उद्धार" हे शब्द आपण कसे भाषांतरित करतो याच्याशी तुलना करा.

(हे सुद्धा पाहा: कराराचा कोश, प्रायश्चित्त, करुब, विनंती, सोडवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H3727, G2435


दुःख

व्याख्या:

"हाय" या शब्दाचा अर्थ मोठ्या संकटाची भावना आहे. हे एक चेतावणी देखील देते की, कोणीतरी गंभीर समस्या अनुभवेल.

  • "हाय तुम्हाला" ही अभिव्यक्ती लोकांसाठी, ते त्यांच्या पापांबद्दल शिक्षा म्हणून दुःख अनुभवतील, अशी एक चेतावणी म्हणून येते.
  • पवित्र शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी, विशेषतः भयानक न्याय करण्यावर जोर देण्यासाठी "हाय" हा शब्द परत परत वापरला जातो.
  • एक व्यक्ती जो असा म्हणतो "हाय मला" किंवा "माझ्यासाठी हाय" हे गंभीर छळाबद्दल दु:ख व्यक्त करण्याशी आहे.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "हाय" या शब्दाचे भाषांतर "महान दुःख" किंवा "खिन्नता" किंवा "अपत्ती" किंवा "अनर्थ" असे केले जाऊ शकते.
  • "हाय (शहराच्या नावाला)" या वाक्यांशाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "ह्याला कसे भयंकर होईल (शहराचे नाव)" किंवा "(त्या शहरातील) लोकांना कठोर शिक्षा होईल" किंवा "त्या लोकांना मोठ्या मानाने पीडा होईल" असे केले जाऊ शकते.
  • "हाय मला" किंवा "माझ्यासाठी हाय" या अभिव्याक्तींचे भाषांतर "मी किती दुःखी आहे!" किंवा "मी खूप दुःखी आहे" किंवा "हे माझ्यासाठी किती भयानक आहे!" असे केले जाऊ शकते,
  • "हाय तुम्हाला" या अभिव्यक्तीचे भाषातंर "तुम्ही अतिशय दुःख सहन कराल" किंवा "तुम्हाला भयंकर त्रास अनुभवायला लागेल" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहिती

  • Strong's: H188, H190, H337, H480, H1929, H1945, H1958, G3759

देव

व्याख्या:

पवित्र शास्त्रात, “देव” या संज्ञा सार्वकालिक अस्तित्वात असणाऱ्याला, ज्याने सर्व काही शुन्यातून निर्माण केले त्याला संदर्भित करते. देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या नात्याने अस्तित्वात आहे. देवाचे वैयक्तिक नाव “यहोवा” आहे.

  • देव कायम अस्तित्वात आहे; इतर काही अस्तित्त्वात येण्यापूर्वीच तो अस्तित्वात होता आणि तो कायमचा अस्तित्त्वात राहील.
  • तो एकमेव खरा देव आहे आणि विश्वाच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा अधिकार आहे.
  • देव उत्तम प्रकारे नीतिमान, असीम ज्ञानी, पवित्र, पापरहित, न्याय्य, दयाळू आणि प्रेमळ आहे.
  • तो एक करार पाळणारा देव आहे, जो नेहमी आपल्या अभिवचनांची पूर्तता करतो.
  • लोक देवाची उपासना करण्यासाठी निर्माण केले गेले आणि त्यांनी फक्त त्याचीच उपासना करावी
  • देवाने त्याचे नाव “यहोवा”, म्हणजे “तो आहे” किंवा “मी आहे” किंवा “जो कायम अस्तित्वात आहे” असे प्रकट केले आहे.
  • पवित्र शास्त्र खोटे “दैवत” यांच्याबद्दल देखील शिकवते, जे निर्जीव मूर्ती आहेत ज्यांची लोक चुकीने उपासना करतात.

भाषांतरातील सुचना:

  • “देव” या संज्ञचे भाषांतर करण्याच्या मार्गांमध्ये “देवता” किंवा “निर्माणकर्ता” किंवा “सर्वोच्च अस्तित्व” किंवा “सर्वोच्च निर्माता” किंवा “अनंत सार्वभौम प्रभु” किंवा “सनातन परात्पर” यांचा समावेश असू शकतो.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत देवाचा उल्लेख कसा होतो याचा विचार करा. भाषांतरित होणार्‍या भाषेत “देव” असा शब्द अगोदरच असू देखिल शकतो. तसे असल्यास, वर वर्णन केल्याप्रमाणे हा शब्द एका खऱ्या देवाच्या वैशिष्ट्यासाठी योग्य आहे का हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे.
  • खोट्या देवतांसाठी असलेल्या शब्दापासून वेगळे करण्यासाठी, बर्‍याच भाषा एकच खरा देव या शब्दाचे पहिले अक्षर मोठे लिहीतात. हा फरक करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे “देव” आणि “देवता” यासाठी भिन्न संज्ञा वापरणे होय. सुचना: बायबलसंबंधी मजकूरात, जेव्हा एखादी व्यक्ती परमेश्वराची उपासना करत नाही आणि जेव्हा तो परमेश्वराबद्दल बोलतो आणि “देव” असा शब्द वापरतो, तेव्हा परमेश्वराच्या संदर्भात मुख्य अक्षराशिवाय हा शब्द देणे स्वीकार्य आहे (पाहा योना 1: 6, 3: 9).
  • “मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील” या वाक्यांशाचे भाषांतर “मी, देव या लोकांवर राज्य करीन, आणि ते माझी उपासना करतील” असे देखील केले जाऊ शकते

(भाषांतर सुचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: निर्माण करणे, खोटा देव, देव जो पिता, पवित्र आत्मा, खोटा देव, देवाचा पुत्र, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 1:1 देवाने सहा दिवसांत विश्व आणि त्यातील सर्व काही निर्माण केले.
  • 1:15 देवाने पुरुष आणि स्त्रीला त्याच्या स्वतःच्या प्रतिरुपात निर्माण केले.
  • 5:3 “मी देव सर्वसमर्थ आहे. मी तुझ्याबरोबर एक करार करीन.”
  • 9:14 देव म्हणाला, “मी आहे तो मी आहे. त्यांना सांग, ‘मी आहे त्याने मला तुमच्याकडे पाठविले आहे.’ त्यांना हे देखिल सांग, ‘मी परमेश्वर, तुमचा पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव आहे. हे माझे नाव सर्वदाचे आहे.'
  • 10:2 या पीडांच्या माध्यमातून, देवाने फारोला फारो व मिसरच्या सर्व देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यवान असल्याचे दाखवले.
  • 16:1 इस्राएल लोक खऱ्या देवाची उपासना करण्याऐवजी कनानी देवतांची उपासना करु लागले.
  • 22:7 माझ्या मुला, तुला परात्पर देवाचा संदेष्टा म्हणतील. जो लोकांना मसीहाचा स्विकार करण्यास तयार करील.”
  • 24:9 फक्त एकच देव आहे. परंतु योहानाने देव पित्याचे बोलणे ऐकले, आणि जेव्हा त्याने येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा येशु जो पुत्र आणि पवित्र आत्मा यांना त्याने पाहीले.
  • 25:7 "फक्त आपल्या देव परमेश्वर याची उपासना कर आणि फक्त त्याचीच सेवा कर."
  • 28:1"फक्त एकच आहे जो चांगला आहे, आणि तो म्हणजे देव"
  • 49:9 परंतु देवाने जगातील प्रत्येकावर एवढे प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जेणेकरून ज्याने येशूवर विश्वास ठेवला आहे त्याला त्याच्या पापांची शिक्षा होणार नाही, परंतु तो देवाबरोबर सर्वकाळासाठी राहील.
  • 50:16 परंतु एका दिवशी देव एक नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी निर्माण करील जी परिपूर्ण असेल.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच136, एच305, एच410, एच426, एच430, एच433, एच2486, एच2623, एच3068, एच3069, एच3863, एच4136, एच6697, जी112, जी516, जी932, जी935, जी1096, जी1140, जी2098, जी2124, जी2128, जी2150, जी2152, जी2153, जी2299, जी2304, जी2305, जी2312, जी2313, जी2314, जी2315, जी2316, जी2317, जी2318, जी2319, जी2320, जी3361, जी3785, जी4151, जी5207, जी5377, जी5463, जी5537, जी5538

देव पिता, स्वर्गीय पिता, पिता

तथ्य

“देव पिता” आणि “स्वर्गीय पिता” या संज्ञा अर्थ एकच खरा देव, यहोवाला संदर्भित करतात. “पिता” असा समान अर्थ असलेला आणखी एक शब्द, येशू जेव्हा त्याचा उल्लेख करीत असे तेव्हा पुष्कळदा वापरला जात असे.

  • देव, देव पिता, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा या नात्याने अस्तित्वात आहे. प्रत्येकजण पूर्णपणे देव आहे आणि तरीही ते फक्त एकच देव आहेत. हे एक रहस्य आहे जे केवळ मानवांना पूर्णपणे समजू शकत नाही.
  • देव पित्याने देव पुत्राला (येशूला) जगात पाठवले आणि तो त्याच्या लोकांकडे पवित्र आत्मा पाठवितो.
  • जो कोणी देव पुत्रावर विश्वास ठेवतो तो देव पित्याचा पुत्र होतो, आणि देव जो पवित्र आत्मा त्या व्यक्तीमध्ये राहण्यासाठी येतो. हे आणखी एक रहस्य आहे जे मानवांना पूर्णपणे समजू शकत नाही.

भाषांतरातील सूचना:

  • “देव पिता” या संज्ञाचे भाषांतर करताना नैसर्गिकरित्या मानवी पित्यासाठी वापरल्या जाणार्‍या “पिता” या शब्दाने भाषांतर करणे उत्तम आहे.
  • “स्वर्गीय पिता” या संज्ञाचे भाषांतर “स्वर्गात राहणारा पिता” किंवा “स्वर्गात राहणारा आपला देव पिता” किंवा “स्वर्गातील आपला देव पिता.” असे केले जाऊ शकते.
  • सहसा जेव्हा देव असे म्हटले जाते तेव्हा “पिता” हे अक्षर मोठे लिहीले जाते.

(भाषांतर सुचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील: पुर्वज, देव, स्वर्ग, पवित्र आत्मा, येशू, देवाचा पुत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 24:9 फक्त एकच देव आहे. परंतु योहानाने देव पित्याचे बोलणे ऐकले, आणि जेव्हा त्याने येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा येशु जो पुत्र आणि पवित्र आत्मा यांना त्याने पाहीले.
  • 29:9 मग येशू म्हणाला, “जर तुम्ही आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही तर माझा स्वर्गीय पिता तुम्हा प्रत्येकासाठी तसेच करील.”
  • 37:9 मग येशूने स्वर्गाकडे पाहीले आणि म्हणाला, “पित्या, माझे ऐकल्याबद्दल धन्यवाद.”
  • 40:7 मग येशू मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे पूर्ण झाले आहे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती देतो. ”
  • 42:10 “म्हणून जा, सर्व लोकांना “ पिता, पुत्र ”आणि“ पवित्र आत्मा ”यांच्या नावाने बाप्तिस्मा देऊन शिष्य करा आणि मी तुला केलेल्या सर्व आज्ञा पाळायला शिकवा.”
  • 43:8 "येशू आता देव पिता याच्या उजवीकडे बसलेला आहे."
  • 50:10 "मग नीतिमान लोक देव जो त्यांचा पिता याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील."

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0001, एच0002, जी39620

देव, खोटे देव, देवी, प्रतिमा, मूर्तिपूजक, मूर्तीपूजा, मूर्तीपुजन

व्याख्या:

एक खऱ्या देवाला सोडून ज्याची लोक उपासना करतात त्यांना खोटे देव म्हटले जाते. "देवी" ही संज्ञा विशेषकरून खोट्या स्त्री देवासाठी वापरली जाते.

  • हे खोटे देव किंवा देवी अस्तित्वात नाहीत. यहोवा हाच एक परमेश्वर आहे.
  • काहीवेळा लोक उपासना करण्यासाठी, त्यांच्या खोट्या देवाचे प्रतिक म्हणून वस्तूंची मूर्ती बनवतात.
  • पवित्र शास्त्रामध्ये, देवाचे लोक वारंवार खोट्या देवांची उपासना करू नये या देवाच्या आज्ञेत राहण्यापासून मागे फिरले.
  • खोटे देव आणि मूर्ती ज्यांची लोक उपासना करतात, त्यांना सामर्थ्य आहे ह्यावर विश्वास ठेवायला लावून सैतान सहसा लोकांना फसवतो.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, अनेक खोट्या देवतांपैकी बआव, दागोन, आणि मोलख या तीन खोट्या देवांची उपासना लोकांनी केली.
  • अशेरा आणि अर्तमी (दीआना) या दोन देवींची पूर्वीच्या लोकांनी उपासना केली.

मूर्ती एक वस्तू आहे जी लोक बनवतात, म्हणजे ते त्याची उपासना करू शकतात. जर त्यात खऱ्या देवाशिवाय इतर गोष्टींना सन्मान देण्याचे समाविष्ट असेल, तर एखाद्या गोष्टीचे "मूर्तिपूजक" असे वर्णन केले जाते.

  • ज्या खोट्या देवाची लोक उपासना करतात, त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ते मूर्तींना बनवतात.
  • हे खोटे देव अस्तित्वात नाहीत; याहोवास सोडून दुसरा कोणी देव नाही.
  • काहीवेळा सैतान मूर्तींच्याद्वारे जरी त्याला सामर्थ्य नाही, तरी ते आहे, हे दाखवण्यासाठी कार्य करतो.
  • मुर्त्या या नेहमी मौल्यवान साहित्यांनी, जसे की, सोने, चांदी, कांस्य, किंवा मौल्यवान लाकूड यांनी बनविल्या जातात.
  • "मूर्तिपूजक साम्राज्य" म्हणजे "लोकांचे राज्य जे मूर्तींची उपासना करतात" किंवा "लोकांचे राज्य जे पृथ्वीवरील गोष्टींची उपासना करतात."
  • "मूर्तिपूजक प्रतिमा" ही संज्ञा "कोरीव मुर्ती" किंवा "मूर्ती" यासाठी दुसरा शब्द आहे.

भाषांतर सूचना

  • भाषेत किंवा जवळच्या भाषेत आधीच "देव" किंवा "खोटा देव" असा शब्द असू शकतो.
  • “मूर्ती” हा शब्द खोट्या देवांना सूचित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
  • *इंग्रजीमध्ये, खोट्या देवांचा संदर्भ देण्यासाठी लहान लिपी "g" वापरला जाता आणि मोठी लिपी "G" हा एका खऱ्या देवाचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो.
  • इतर पर्यायामध्ये, खोट्या देवतांचा संदर्भ देण्यासाठी पूर्णपणे भिन्न शब्द वापरण्यात येतील.
  • वर्णन केलेले खोटे देव पुरुष किंवा स्त्री आहेत हे स्पष्ट करण्यासाठी, काही भाषा एखादा शब्द अधिक जोडू शकतात.

(हे देखील पाहा: देव, आशेरा, बआल, मोलेख, सैतान, प्रतिमा, राज्य, उपासना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 10:2 या मरीद्वारे देवाने दाखवून दिले की तो फारो आणि मिसरातील देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे.
  • 13:4 मग देवाने त्यांच्याशी करार केला व म्हणाला, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडविले. तुम्ही अन्य देवतांची उपासना करू नका."
  • 14:2 ते (कनान लोक) खोट्या देवदवतांची उपासना करीत होते व पुष्कळ वाईट गोष्टी करत होते.
  • 16:1 इस्राएली लोक खरा देव, यहोवा ऐवजी कनानी देवतांची उपासना करू लागले.
  • 18:13 पण यहुदाचे बहुतेक राजे दुष्ट, भ्रष्ट होते आणि ते मूर्तींची पूजा करत असे. काही राजांनी तर खोट्या देवतांना आपल्या मुलांचा बळी दिला.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0205, H0367, H0410, H0426, H0430, H0457, H1322, H1544, H1892, H2553, H3649, H4656, H4906, H5236, H5566, H6089, H6090, H6091, H6456, H6459, H6673, H6736, H6754, H7723, H8163, H8251, H8267, H8441, H8655, G14930, G14940, G14950, G14960, G14970, G22990, G27120

देवदूत, आद्यदेवदूत

व्याख्या:

परमेश्वराने निर्माण केलेला देवदूत एक शक्तिशाली आत्मा आहे. देवदूतांना परमेश्वर जे काही करायला सांगेल, ते करून देवाची सेवा करण्यासाठी ते अस्तित्वात आहेत. "आद्यदेवदूत" ही संज्ञा इतर देवदूतांवर अधिकार असलेला किंवा इतर सर्व देवदूतांचे नेतृत्व करणाऱ्या देवदुताला संदर्भित करते.

  • "देवदूत" या शब्दाचा शब्दशः अर्थ "संदेशवाहक" असा होतो.
  • "आद्यदूत" या शब्दाचा शब्दशः अर्थ "मुख्य संदेशवाहक" असा होतो. पवित्र शास्त्रामध्ये "आद्यदेवदूत" म्हणून संदर्भित केलेला एकमेव देवदूत मिखाएल हा आहे.
  • पवित्र शास्त्रामध्ये, देवदूतांनी देवाकडील संदेश लोकांना दिला. या संदेशांमध्ये लोकांबद्दल देवाची काय इच्छा आहे, याविषयीच्या सूचनेचा समावेश होता.
  • देवदूतांनी भविष्यात होणाऱ्या घटनांविषयी किंवा आधीच घडलेल्या घटनांविषयी लोकांना सांगितले.
  • देवदूतांना परमेश्वराचे प्रतिनिधी म्हणून त्याचे अधिकार आहेत आणि काहीवेळा पवित्र शास्त्रामध्ये ते असे बोलत होते जसे की देव स्वत: बोलत होता.
  • देवदूत देवाची सेवा करतात याचे इतर मार्ग म्हणजे लोकांचे संरक्षण करणे आणि त्यांना बळकट करणे.
  • एक विशेष वाक्यांश, "यहोवाचा दूत" या वाक्याचा एकापेक्षा अधिक संभाव्य अर्थ आहे: 1) याचा अर्थ "देवदूत जो यहोवाचे प्रतिनिधित्व करतो" किंवा "दूत जो यहोवाची सेवा करतो" असा होऊ शकतो. 2) तो कदाचित स्वतःदेवाला संदर्भित करू शकते, जेव्हा तो एखाद्या व्यक्तीशी बोलला तेव्हा तो एका देवदूतासारखा दिसला. यापैकी एक अर्थ "मी" या शब्दाचा देवदूतांनी केलेला वापर स्पष्ट करतो, जसे की यहोवा स्वतः बोलत होता.

भाषांतर सूचना

  • "देवदूताचे" भाषांतर "परमेश्वराचा दूत" किंवा "देवाच्या आत्म्याने संदेशवाहन करणारा" किंवा "देवाचा स्वर्गीय सेवक" या मार्गाने देखील होऊ शकते.
  • "आद्यदेवदूत" या शब्दाचे भाषांतर "प्रमुख देवदूत" किंवा "मुख्याधिकारी देवदूत" किंवा "देवदूतांचा पुढारी" असे होऊ शकते.
  • या संज्ञा राष्ट्रीय भाषा किंवा अन्य स्थानिक भाषेत कशा प्रकारे भाषांतरित केल्या जातात ते देखील विचारात घ्या.
  • "यहोवाचा दूत" हा वाक्यांश "देवदूत" आणि "यहोवा" या शब्दांचा उपयोग करून भाषांतरित केला पाहिजे. हे त्या वाक्यांशाच्या विविध अर्थांसाठी अनुमती देईल. संभाव्य भाषांतरांमध्ये "यहोवाकडील देवदूत" किंवा "यहोवाने पाठवलेले देवदूत" किंवा "यहोवा, जो एका देवदूतासारखा दिसला" ह्याचा समावेश होऊ शकतो.

(हे देखील पाहाः अज्ञात कसे भाषांतरित करावे)

(हे देखील पाहा : प्रमुख, प्रधान, दूत, मिखाएल, शासक, सेवक)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 02:12 कोणीही जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ नये म्हणून देवाने बागेच्या प्रवेशद्वारावर मोठ्या शक्तीशाली देवदूतांचा ठेवले.
  • 22:03 देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुला ही सुवार्ता सांगण्यासाठी देवाने मला पाठविले आहे.
  • 23:06 अचानक, एक तेजस्वी देवदूत त्यांच्यासमोर प्रकट झाला ( मेंढपाळांना), आणि ते खूप घाबरले. देवदूत म्हणाला, ‘‘भिऊ नका, कारण मी तुम्हासाठी मोठ्या आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.
  • 23:07 अचानक, आकाश स्तुती करणाऱ्या देवदूतांनी भरले.’’
  • 25:08 मग देवदूतांनी येऊन येशूची सेवा केली.
  • 38:12 येशू खूप व्याकूळ झाला व त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा झाला. देवाने त्यास बळ देण्यासाठी एक देवदूत पाठविले.
  • 38:15 मी पित्यास माझ्या बचावासाठी देवदूतांचे सैन्य मागू शकतो.

शब्द माहिती:

स्ट्रोंग. एच0047, एच0430, एच4397, एच4398, एच8136, जी00320, जी07430, जी24650


देवपुत्र, देवाची मुले

व्याख्या:

"देवपुत्र" हा शब्द एक लाक्षणिक अभिव्यक्ती आहे, ज्याचे अनेक संभाव्य अर्थ आहेत.

  • नवीन करारामध्ये, "देवपुत्र" हा शब्द येशुमधील सर्व विश्वासणाऱ्यांना संबोधित करतो, आणि त्याचे सहसा भाषांतर "देवाची मुले" असे केले जाते, कारण त्यात पुरुष आणि स्त्रिया या दोघांचाही समावेश होतो.
  • या शब्दाचा उपयोग देवाशी असणाऱ्या नातेसंबंधाबद्दल सांगतो, जे मानवी पुत्र आणि त्याच्या पित्याच्या नातेसंबंधासारखे आहे, आणि ज्यात पुत्र असण्याचे सर्व विशेषाधिकार त्याच्याशी संलग्न आहेत.
  • काही लोक उत्पत्ति 6 मध्ये आलेल्या "देवपुत्र" या शब्दाचा उल्लेख करतात आणि त्याचा अर्थ खाली पाडलेले देवदूत—दुष्ट आत्मे किंवा दुरात्मे असा लावतात. इतर काहींना असे वाटते की ते शक्तिशाली राजकीय शासक किंवा शेथच्या वंशजांना सूचित करतो.
  • नवीन करारामध्ये, "देवपुत्र" हा शब्द येशुमधील सर्व विश्वासणाऱ्यांना संबोधित करतो, आणि त्याचे सहसा भाषांतर "देवाची मुले" असे केले जाते, कारण त्यात पुरुष आणि स्त्रिया या दोघांचाही समावेश होतो.
  • या शब्दाचा उपयोग देवाशी असणाऱ्या नातेसंबंधाबद्दल सांगतो, जे मानवी पुत्र आणि त्यांच्या पित्याच्या नातेसंबंधासारखे आहे, आणि ज्यात पुत्र असण्याचे सर्व विशेषाधिकार त्याच्याशी संलग्न आहेत.
  • "देवाचा पुत्र" हे शीर्षक एक वेगळी संज्ञा आहे: जी येशुला संबोधित करते, जो देवाचा एकुलता एक पुत्र आहे.

भाषांतर सूचना

  • जेव्हा "देवपुत्र" ह्याचा संदर्भ येशुमधील विश्वासणाऱ्यांशी येतो, तेव्हा त्याचे भाषांतर "देवाची मुले" असे केले जाऊ शकते.
  • उत्पत्तीच्या 6:2 व 4 मध्ये "देवाचे पुत्र" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "देवदूत", "आत्मिकजन," "अलौकिक जीव," किंवा "दुरात्मे" ह्यांचा समावेश होतो.
  • तसेच "पुत्र" या संज्ञेसाठी असलेला लिंक पाहा.

(हे देखील पाहा: देवदूत, दुष्टात्मा, पुत्र, देवाचा पुत्र, शासक, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच430, एच1121, जी2316, जी5043, जी5207

देवाचा पुत्र, पुत्र

तथ्य:

"देवाचा पुत्र" या शब्दाचा संदर्भ येशुशी आहे, देवाचा शब्द, जो मनुष्य बनून जगात आला. त्याला वारंवार "पुत्र" असेही संबोधले गेले.

  • देवाच्या पुत्राचा स्वभाव देवपित्यासारखाच आहे, आणि तो पूर्णपणे देव आहे.
  • देव पिता, देव पुत्र, आणि देव पवित्र आत्मा सर्व एक सार आहेत.
  • मानवी पुत्रांपेक्षा वेगळा, देवाचा पुत्र नेहमी अस्तित्वात आहे.
  • सुरुवातीला, देवाचा पुत्र पिता आणि पवित्र आत्मा यांच्यासह जगाची निर्मिती करण्यात सक्रिय होता.

कारण येशू देवाचा पुत्र आहे, म्हणून तो आपल्या पित्यावर प्रेम करतो आणि त्याच्या आज्ञांचे पालन करतो; आणि त्याचा पिता त्याच्यावर प्रेम कर

भाषांतर सूचना

  • "देवाचा पुत्र" या संज्ञेसाठी, "पुत्र" हा शब्द त्याच शब्दाने भाषांतर करणे सर्वोत्तम आहे जी भाषा नैसर्गिकरित्या मानवी पुत्राचा संदर्भ देण्यासाठी वापर करील.
  • "पुत्र" या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द "पिता" या शब्दाच्या भाषांतरास्ठी वापरलेल्या शब्दासह उचित बसत असल्याचे आणि हे शब्द सर्वात स्वाभाविक असून ते प्रकल्पित भाषेत एका खऱ्या पिता-पुत्राचा नातेसंबंध व्यक्त करतात हे सुनिश्चित करा.
  • "पुत्र" शब्द लिहिण्यास सुरू करण्याकरिता पहिले अक्षर मोठे वापरणे हे दर्शविते की तो देवाबद्दल बोलत आहे.
  • "पुत्र" हा वाक्यांश "देवाचा पुत्र" या वाक्यांशापासून हृस्वीत केला गेला आहे, विशेषत: जेव्हा तो "पिता" या शब्दाप्रमाणेच संदर्भित होतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: ख्रिस्त, पूर्वज, देव, देव पिता, पवित्र आत्मा, येशू, पुत्र, देवाचा पुत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 22:5 देवदूताने स्पष्ट केले,‘‘पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. यास्तव ते बाळ पवित्र, देवाचा पुत्र असेल.’’
  • 24:9 देवाने योहानास सांगितले होते, ‘‘तू बाप्तिस्मा दिलेल्या ज्या व्यक्तिवर पवित्र आत्मा उतरुन येईल. तीच व्यक्ति देवाचा पुत्र असेल’’
  • 31:8 हे पाहून शिष्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी येशूला नमन केले व म्हणाले, ‘‘तू खरोखर, देवाचा पूत्र आहेस.’’
  • 37:5 मार्थाने उत्तर दिले, ‘‘होय,प्रभुजी! आपण देवाचे पुत्र मसीहा आहात असा मी विश्वास धरते’’
  • 42:10 म्हणून जा, सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा.
  • 46:6 लगेच शौल दिमिष्कामध्ये असणाऱ्या यहूद्यांना प्रचार करू लागला व म्हणाला, "येशू हाच देवाचा पुत्र आहे."
  • 49:9 परंतु देवाने जगातील प्रत्येकावर एवढी प्रिती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी येशुवर विश्वास ठेवितो त्याला आपल्या पापांची शिक्षा होणार नाही, पण तो देवाबरोबर सदासर्वकाळ राहील.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच426, एच430, एच1121, एच1247, जी2316, जी5207

देवाची इच्छा

व्याख्या:

"देवाची इच्छा" याचा संदर्भ देवाची आकांक्षा आणि योजनेशी आहे.

  • देवाच्या इच्छेचा संबंध विशेषतः त्याचा लोकांशी परस्पर संवाद आणि लोकांनी त्याला कसा प्रतिसाद द्यावा ह्याच्याशी आहे.
  • हे त्याच्या उर्वरित निर्मितीसाठी त्याच्या योजना किंवा इच्छांना देखील संदर्भित करते.
  • "इच्छा" या शब्दाचा अर्थ "निश्चित करणे" किंवा "तीव्र इच्छा करणे" असा होतो.

भाषांतर सूचना:

  • "देवाची इच्छा" ह्याचे भाषांतर "देवाला काय हव आहे" किंवा "देवाने काय योजले आहे" किंवा "देवाचा उद्देश" किंवा "देवाला काय संतोषवते" असे देखील केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H6310, H6634, H7522, G1012, G1013, G2307, G2308, G2309, G2596

देवाचे घर, यहोवाचे घर

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "देवाचे घर" आणि यहोवाचे घर" या वाक्यांशाचा संदर्भ जिथे देवाची उपासना केली जाते, अशा ठिकाणाशी येतो.

  • या शब्दाचा उपयोग अधिक विशिष्ठ रूपाने निवासमंडप किंवा मंदिर ह्यांच्या संदर्भात केला जातो.
  • काहीवेळा "देवाचे घर" ह्याचा उपयोग देवाच्या लोकांना संदर्भित करण्यासाठी केला जातो.

भाषांतर सूचना'

  • जेंव्हा उपासनेच्या जागेच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो, तेंव्हा त्याचे भाषांतर, "देवाची उपासना करण्याचे घर" किंवा "देवाची उपासना करण्याची जागा" असे केले जाऊ शकते.
  • जर ह्याचा संदर्भ मंदिर किंवा निवासमंडपाशी येतो, तर या शब्दाचे भाषांतर, "मंदिर (किंवा निवासमंडप) जिथे देवाची उपासना केली जाते (किंवा "जिथे देवाची उपस्थिती आहे" किंवा "जिथे देव त्याच्या लोकांना भेटतो") असे केले जाऊ शकते.
  • तिथे देव "राहतो" हे दर्शविण्यासाठी, कदाचित "घर" या शब्दाचा उपयोग भाषांतरामध्ये करणे महत्वाचे आहे, म्हणजेच त्या जागेमध्ये त्याचा आत्मा त्याच्या लोकांना भेटतो आणि त्यांच्याद्वारे देवाची उपासना केली जाते.

(हे सुद्धा पहा: देवाचे लोक, निवासमंडप, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


देवाचे प्रतिरूप, प्रतिरूप

व्याख्या:

"प्रतिरूप" या शब्दाचा संदर्भ अशा गोष्टीशी आहे, जी दुसऱ्या गोष्टीसारखी दिसते किंवा जो चारित्र्याने किंवा सुगंधाने कोणाएका सारखा असतो. संदर्भाच्या आधारावर, "देवाचे प्रतिरूप" हा वाक्यांश वेगवेगळ्या मार्गांनी वापरला जातो.

  • सुरवातीच्या काळात, देवाने मनुष्य प्राण्याला "त्याच्या प्रतिरुपामध्ये" म्हणजेच "त्याच्या सारखे" बनवले. ह्याचा अर्थ लोकांच्याकडे काही विशिष्ठ वैशिष्ठ्ये आहेत, जी देवाच्या प्रतिरुपाला प्रतिबिंबित करतात, जसे की, भावनांना अनुभवण्याची क्षमता, तर्क करण्याची क्षमता आणि संवाद साधण्याची क्षमता, आणि एक आत्मा जो कायमचा आहे.
  • पवित्र शास्त्र असे शिकवते की, येशू, देवाचा पुत्र, हा "देवाचे प्रतिरूप आहे" म्हणजेच तो स्वतः देव आहे. मनुष्य प्राण्यांसारखी, येशूची निर्मिती केलेली नव्हती. सर्व अनंतकाळापासून देव जो पुत्र ह्याला सर्व ईश्वरीय वैशिष्ठ्ये आहेत, कारण त्याच्याकडे सारखीच मुलतत्वे आहेत जी देव जो बाप ह्याच्याकडे आहेत.

भाषांतर सूचना

  • जेंव्हा येशूला संदर्भित केले जाते, तेंव्हा "देवाचे प्रतिरूप" या शब्दाचे भाषांतर "देवाचे अचूक रूप" किंवा "देवासारखेच मुलतत्व" किंवा "देवासारखाच असणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा मनुष्य प्राण्याला संदर्भित केले जाते, तेंव्हा "देवाचे त्यांना त्याचे प्रतिरूप असे बनवले" ह्याचे भाषांतर "देवाने त्यांना त्यांच्यासारखे बनवले" किंवा "देवाने स्वतःसारख्या वैशिष्ट्यांसह त्यांना निर्माण केले" अशा अर्थाच्या वाक्यांशांनी केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: प्रतिरूप, देवाचा पुत्र, देवाचा पुत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H4541, H1544, H2553, H6456, H6459, H6754, H6816, H8403, G504, G179


देवाचे राज्य, स्वर्गाचे राज्य

व्याख्या:

"देवाचे राज्य" आणि "स्वर्गाचे राज्य" हे दोन्ही शब्द देवाचे शासन आणि अधिकार त्याच्या लोकांवर आणि संपूर्ण निर्मितीवर आहे हे संदर्भित करतात.

  • यहूद्यांनी नेहमीच "स्वर्ग" या शब्दाचा उपयोग देवाच्या संदर्भात त्याचे नाव थेट म्हणणे टाळण्यासाठी केला. (पाहा: उपमा)
  • मत्तयने लिहिलेल्या नवीन कराराच्या पुस्तकात, त्याने देवाच्या राज्याचा उल्लेख “स्वर्गाचे राज्य” असा केला आहे, कारण तो मुख्यतः यहुदी श्रोत्यांसाठी लिहीत होता.
  • देवाचे राज्य हा शब्द देव लोकांच्या आत्मिक तसेच शारीरिक जगावर शासन करीत आहे यास संदर्भित करतो.
  • जुन्या करारातील संदेष्ट्यांनी असे म्हटले आहे की देव एक मसिहा पाठवेल, जो नीतिमत्त्वाने शासन करेल. देवाचा पुत्र, येशू, हा मसिहा आहे जो देवाच्या राज्यावर सदासर्वकाळ राज्य करेल.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "देवाचे राज्य" हे "देवाचे शासन (राजा म्हणून)" किंवा "जेव्हा देव राजा म्हणून राज्य करेल" किंवा "प्रत्येक गोष्टीवर देवाचे शासन" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
  • "स्वर्गाचे राज्य" या शब्दाला " राज म्हणून देवाचे स्वर्गातून शासन" किंवा "स्वर्गातील देव राज्य करत आहे" किंवा "स्वर्गीय शासन" किंवा "प्रत्येक गोष्टीवर स्वर्ग राज्य करत आहे" असे भाषांतरित केले जाऊ शकते. जर हे सहज आणि स्पष्टपणे भाषांतर करणे शक्य नसल्यास, "देवाचे राज्य" हा वाक्यांश त्याऐवजी भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • काही भाषांतरकारांनी देवाला संदर्भित करण्यासाठी "स्वर्ग" हा शब्द मोठ्या अक्षरात लिहून दर्शविला आहे. इतर ठिकानी "स्वर्गाचे राज्य (म्हणजेच 'देवाचे राज्य')" यासारख्या मजकूरामध्ये एक टीप अंतर्भूत असू शकते.
  • मुद्रित पवित्र शास्त्राच्या पृष्ठाच्या खालच्या टोकावरील तळटीप "स्वर्ग" या शब्दप्रयोगाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते.

(हे देखील पाहा: देव, स्वर्ग, राजा, राज्य, यहूद्यांचा राजा, राज्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 24:02 त्याने ( योहान) त्यांस प्रचार केला, ‘‘पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे!’’
  • 28:06 मग येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात जाणे फार कठिण आहे! होय, श्रीमंताचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा ऊंटाला सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे.’’
  • 29:02 येशू म्हणाला,‘‘देवाचे राज्य एका राजासारखे आहे त्याला आपल्या चाकरांकडून हिशेब घ्यावा असे वाटले.
  • 34:01 येशूने देवाच्या राज्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. उदाहरणार्थ, तो म्हणाला, ‘‘देवाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे जे कोणीएकाने आपल्या शेतात पेरले.
  • 34:03 येशूने आणखी एक गोष्ट सांगितली, ‘‘देवाचे राज्य खमिरासारखे आहे जे एका स्त्रीने पिठामध्ये घातले व संपूर्ण पीठ फुगून गेले.’’
  • 34:04 ‘‘देवाचे राज्य शेतामध्ये कुणीतरी लपवून ठेवलेल्या गुप्त खजिन्यासारखे आहे. दुस-या मनुष्यास ते सापडले व त्याने ते पुन्हा पुरुन ठेवले.
  • 34:05 ‘‘देवाचे राज्य एका मौल्यवान मोत्यासारखे सुद्धा आहे.
  • 42:09 त्याने आपल्या शिष्यांना आपण जिवंत असल्याचे प्रमाण विविध प्रकारे दिले व त्यांना देवच्या राज्याविषयी शिकवण दिली.
  • 49:05 येशूने म्हटले की जगात जे सर्वकाही आहे त्यापेक्षा देवाचे राज्य हे अधिक मौल्यवान आहे.
  • 50:02 येशू या पृथ्वीवर असताना म्हणाला, "माझे शिष्य देवाच्या राज्याची सुवार्ता संपुर्ण जगामध्ये गाजवतील, तेव्हा शेवट होईल."

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: G9320, G23160, G37720

देवाचे लोक

व्याख्या:

बायबलमधील “देवाचे लोक” ही संकल्पना अशा लोकांना सूचित करते ज्यांच्याशी देवाने कराराचा संबंध प्रस्थापित केला आहे.

  • जुन्या करारात, “देवाचे लोक” हा वाक्यांश इस्राएल राष्ट्राला सूचित करतो. इस्राएल राष्ट्राला देवाने निवडले होते आणि त्याची सेवा आणि आज्ञा पाळण्यासाठी जगातील इतर राष्ट्रांपासून वेगळे केले होते.
  • नवीन करारामध्ये, "देवाचे लोक" हा वाक्यांश "चर्च" ला सूचित करतो, म्हणजे येशूवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण. यात ज्यू आणि परराष्ट्रीय दोघांचाही समावेश आहे. नवीन करारामध्ये, कधीकधी लोकांच्या या गटाला "देवाची मुले" किंवा "देवाची मुले" असे म्हटले जाते.
  • देव जेव्हा “माझे लोक” हा शब्दप्रयोग वापरतो तेव्हा तो अशा लोकांचा संदर्भ घेतो ज्यांचा त्याच्याशी करार आहे. देवाचे लोक त्याने निवडले आहेत आणि त्यांनी त्याला आवडेल अशा पद्धतीने जगावे अशी त्याची इच्छा आहे.

भाषांतर सूचना

  • "देवाचे लोक" या संज्ञेचे भाषांतर "देवाचे लोक" किंवा "जे लोक देवाची उपासना करतात" किंवा "जे लोक देवाची सेवा करतात" किंवा "जे लोक देवाचे आहेत" असे केले जाऊ शकतात.
  • देव जेव्हा “माझे लोक” म्हणतो तेव्हा भाषांतर करण्याचे इतर मार्ग त्यात “मी निवडलेले लोक” किंवा “जे लोक माझी उपासना करतात” किंवा “जे लोक माझे आहेत” यांचा समावेश असू शकतो.
  • त्याचप्रमाणे, "तुमचे लोक" चे भाषांतर "तुमचे लोक" किंवा "तुम्ही निवडलेले लोक तुमच्या मालकीचे" असे केले जाऊ शकते.
  • तसेच “त्याच्या लोकांचे” भाषांतर “त्याचे लोक” किंवा “देवाने स्वतःचे म्हणून निवडलेले लोक” असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: इस्राएल, लोकसमूह)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहाती:

  • स्ट्रोंग: एच430, एच5971, जी2316, जी29920

देवाचे वचन, याहवेचे वचन, परमेश्वराचे वचन, सत्याचे वचन, शास्त्रवचन

व्याख्या:

पवित्र शास्त्र "देवाचा शब्द" या शब्दाचा अर्थ देवाने लोकांशी केलेल्या कोणत्याही संवादाच संदर्भ आहे. यामध्ये बोललेल्या आणि लिखित संदेशांचा समावेश आहे. येशूला "देवाचा शब्द" असे देखील म्हणतात.

  • "शास्त्रवचने"या शब्दाचा अर्थ "लेखन" असा आहे. हे फक्त नवीन करारामध्ये वापरले जाते आणि जुन्या करारातील, इब्री शास्त्रांचा संदर्भ देते. हे लिखाण देवाचे संदेश होते जे त्याने लोकांना लिहायला सांगितले होते जेणेकरून भविष्यात बरेच वर्षे लोक ते वाचू शकतील
  • संबंधित शब्द "याहवेचे वचन" आणि "परमेश्वराचे वचन" बहुतेकदा देवाच्या एखाद्या विशिष्ट संदेशाला संदर्भित करतो जो पवित्र शास्त्रातील संदेष्ट्याला किंवा इतर व्यक्तीला देण्यात आला होता.
  • कधीकधी ही संज्ञा फक्त "शब्द" किंवा "माझा शब्द" किंवा "तुझा शब्द" (देवाच्या शब्दाबद्दल बोलताना) अशी येते.
  • नवीन करारामध्ये येशूला "शब्द" आणि "देवाचा शब्द" असे म्हटले आहे. हे शिर्षकांचा अर्थ असा आहे की येशू कोण आहे हे तो पूर्णपणे प्रकट करतो, कारण तो स्वत: देव आहे.

"सत्याचा शब्द" ही संज्ञा "देवाचा शब्द" या संज्ञेला संदर्भित करण्याचा आणखी एक मार्ग आहे जी त्याचा संदेश किंवा अध्यापन आहे. हे फक्त एका शब्दाचा संदर्भ देत नाही.

  • देवाच्या सत्याच्या शब्दात देव स्वत: बद्दल, त्याच्या निर्मितीबद्दल आणि येशूद्वारे त्याच्या तारणाची योजना, याबद्दल शिकवलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.
  • हा शब्द देवाने आपल्याला जे सांगितले ते सत्य, विश्वासू आणि वास्तविक आहे यावर जोर देते.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "याहवेचा संदेश" किंवा "देवाचा संदेश" किंवा "देवाकडून शिकवलेल्या गोष्टी” यांचा समावेश असू शकतो
  • काही भाषांमध्ये हा शब्द बहुवचन बनविणे आणि "देवाचे शब्द" किंवा "याहवेचे शब्द" असे म्हणणे अधिक नैसर्गिक असू शकते
  • "याहवेचे वचन आले" हा अविर्भाव अनेकदा देव आपल्या संदेष्ट्यांना किंवा आपल्या लोकांना सांगितलेल्या गोष्टीचा परिचय देण्यासाठी वापरला जातो. "याहवे हा संदेश बोलला" किंवा "याहवे ही वचने बोलला” असे त्याचे भाषांतर केले जाऊ शकते
  • "शास्त्रवचन" किंवा "शास्त्रवचने" या शब्दाचे भाषांतर "लिखाण" किंवा "देवाचे लेखी संदेश" असे केले जाऊ शकते. या शब्दाचे भाषांतर "शब्द" या शब्दाच्या अनुवादापेक्षा वेगळे केले पाहिजे.
  • जेव्हा "शब्द" एकटाच येतो आणि तो देवाच्या शब्दाचा संदर्भ घेतो तेव्हा त्याचे भाषांतर "संदेश" किंवा "देवाचे वचन" किंवा "शिकवणी" असे केले जाऊ शकते. वर सुचविलेल्या वैकल्पिक भाषांतरांचा देखील विचार करा.
  • जेव्हा पवित्र शास्त्र येशूला "शब्द" म्हणून संबोधते तेव्हा या शब्दाचे भाषांतर "संदेश" किंवा "सत्य" म्हणून केले जाऊ शकते
  • "सत्याचे वचन" या संज्ञचे भाषांतर "देवाचा खरा संदेश" किंवा "देवाचे वचन, जे खरे आहे" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • या शब्दाच्या भाषांतरात खरा अर्थ समाविष्ट करणे महत्वाचे आहे.

(हे देखील पाहा: संदेष्टा, सत्य, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 25:7 देवाच्या वचनात तो आपल्या लोकांना आज्ञा देतो, ‘केवळ आपला देव परमेश्वर याची उपासना करा आणि त्याचीच सेवा करा.’
  • 33:6 म्हणून येशूने स्पष्ट केले, "बी हे देवाचे वचन आहे.
  • 42:3 मग येशूने त्यांना देवाचे वचन मसीहाबद्दल काय सांगते ते समजावून सांगितले.
  • 42:7 येशू म्हणाला, "मी तुला सांगितले होते की माझ्याबद्दल देवाच्या वचनात जे लिहिले आहे ते सर्व गोष्टी पूर्ण झाले पाहिजे." मग त्याने त्यांची मने उघडली जेणेकरुन त्यांना देवाचे वचन समजावे.
  • 45:10 फिलिप्पाने देखील येशूची चांगली बातमी सांगण्यासाठी इतर शास्त्रवचनांचा उपयोग केला.
  • 48:12 परंतू येशू हा सर्वांचा महान संदेष्टा आहे. तो देवाचा शब्द आहे.
  • 49:18 देव तुम्हाला प्रार्थना करण्यास, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास, आणि इतर विश्वासणाऱ्या बरोबर त्याची उपासना करण्यास सांगतो आणि त्याने आपल्यासाठी काय केले ते इतरांना कळविण्यास सांगतो.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग:: H0561, H0565, H1697, H3068, G30560, G44870

देह

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये "देह" ही संज्ञा शब्दशः मनुष्याच्या किंवा प्राण्यांच्या भौतिक शरीरातील मऊ पेशींना संदर्भित करते.

  • पवित्र शास्त्रामध्ये देखील, "देह" हा शब्द सर्व मानव किंवा सर्व जिवंत प्राण्यांच्या संदर्भात वापरण्यात आला आहे.
  • नवीन करारामध्ये, "देह" हा शब्द मानवजातीच्या पापमय स्वभावाला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. ह्याचा उपयोग सहसा त्यांच्या आत्मिक स्वभावाच्या विरोधाभासात केला जातो.
  • "स्वतःचा देह आणि रक्त" या अभिव्यक्तीचा संदर्भ जैविकदृष्ट्या संबंधित असलेल्या मनुष्याशी आहे, जसे की, पालक, भावंडे, मूल, किंवा नातू.
  • "मांस आणि रक्त" ही अभिव्यक्ती त्या मनुष्याच्या पूर्वजांना किंवा वंशाजांना संदर्भित करते.
  • "एकदेह" ही अभिव्यक्ती वैवाहिक जीवनात स्त्री आणि पुरुषाच्या शारीरिक एकत्रीकरणाला संदर्भित करते.

भाषांतर सूचना:

  • प्राण्यांच्या शरीराच्या संदर्भात, "देह" ह्याचे भाषांतर "शरीर" किंवा "कातडी" किंवा "मांस" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा ह्याचा उपयोग सर्व जिवंत प्राण्यांना संदर्भित करण्यासाठी सामान्यपणे केला जातो, तेव्हा ह्याचे भाषांतर "जिवंत प्राणी" किंवा "जिवंत असणारी प्रत्येक गोष्ट" असे केले जाऊ शकते.
  • साधारणपणे सर्व लोकांचा संदर्भ देताना, या संज्ञेचे भाषांतार "लोक" किंवा "मनुष्य प्राणी" किंवा "जिवंत असणारा प्रत्येकजण" असे केले जाऊ शकते.
  • "मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचे भाषांतर "नातेवाईक" किंवा "कुटुंब" किंवा "नात्यातील लोक" किंवा "कुटुंब वंश" असे केले जाऊ शकते. तेथे असे संदर्भ असू शकतात ज्याचे भाषांतर "पूर्वज" किंवा "वंशज" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांमध्ये अशी अभिव्यक्ती असू शकते, ज्याचा "मांस आणि रक्त" ह्याच्या समान अर्थ असू शकतो.
  • "एकदेह होतील" या अभिव्यक्तीचे भाषांतर "लैंगिकरित्या एकत्र येणे" किंवा "एका शरीराप्रमाणे होणे" किंवा "शरीर आणि आत्म्यामध्ये एक व्यक्ती होणे" असे केले जाऊ शकते. या अभिव्यक्तीचे भाषांतर, प्रकल्पित भाषेमध्ये आणि संस्कृतीमध्ये ग्रहणीय आहे की नाही हे निश्चत करण्यासाठी तपासावे. (पाहा: शोभनभाषित). हे देखील समजले पाहिजे की हे लाक्षणिक आहे आणि ह्याचा अर्थ असा होतो की पुरुष आणि स्त्री जे "एकदेह होतात" ते प्रत्यक्षात एक मनुष्य होतात.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0829, एच1320, एच1321, एच2878, एच3894, एच4207, एच7607, एच7683, जी29070, जी45590, जी45600, जी45610

दैवी

व्याख्या:

"दैवी" हा शब्द देवाशी संबंधित असलेल्या कोणत्याही गोष्टीला सूचित करतो.

  • या शब्दाचा उपयोग करण्याच्या पद्धतींमध्ये, "दैवी अधिकार," "दैवी न्याय," "दैवी स्वभाव," "दैवी शक्ती" आणि "दैवी गौरव" यांचा समावेश होतो.
  • पवित्र शास्त्रातील एका परिच्छेदामध्ये, "दैवी" या शब्दाचा उपयोग खोट्या देवतांच्याबद्दल काहीतरी वर्णन करण्याकरिता केला आहे.

भाषांतर सूचना:

  • "दैवी" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "देवाचे" किंवा "देवापासून" किंवा "देवाच्या संबंधित" किंवा "देवाने दर्शिवलेले" या वाक्यांचा समावेश असू शकतो
  • उदाहरणार्थ, "दैवी अधिकार" ह्याचे भाषांतर "देवाचा अधिकार" किंवा "अधिकार जो देवापासून येतो' असे केले जाऊ शकते.
  • "दैवी तेज" या वाक्यांशाचे भाषांतर "देवाचे तेज" किंवा "तेज जे देवाकडे आहे" किंवा "तेज जे देवाकडून येते" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा खोट्या देवतांच्या संबंधात कश्याचातरी उल्लेख होतो, तेव्हा काही भाषांतरे कदाचित दुसऱ्या शब्दाचा उपयोग करण्यास प्राधान्य देऊ शकतात.

(हे देखील पाहा: अधिकार, खोटे देव, तेज, देव, न्यायाधीश, सत्ता)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: G23040, G29990

दोष लावणे, दोषी, दंडाज्ञा

व्याख्या:

"दोष लावणे" आणि "दंडाज्ञा" या शब्दाचा संदर्भ एखाद्या व्यक्तीने चुकीचे केल्याबद्दल त्याचा न्याय करण्याशी आहे.

  • बऱ्याचदा "दोष लावणे" या शब्दामध्ये, ज्या व्यक्तीने चूक केली आहे त्याला त्याबद्दल शिक्षा देण्याचा समावेश असतो.
  • काहीवेळा "दोष देणे" म्हणजे खोट्या रीतीने एखाद्याला दोष देणे किंवा एखाद्याचा निष्ठुरपणे न्याय करणे.
  • "दंडाज्ञा" या शब्दाचा संदर्भ एखाद्याला दोष लावण्याच्या किंवा दोष देण्याच्या कृत्याशी येतो.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर "निष्ठुरपणे न्याय करणे" किंवा "खोट्या रीतीने टीका करणे" असे केले जाऊ शकते.
  • "त्याला दोष लावला" या वाक्यांशाचे भाषांतर, "तो दोषी आहे असा त्याचा न्याय करणे" किंवा "त्याला त्याच्या पापाबद्दल शिक्षा झाली पाहिजे असे सांगणे" असे केले जाऊ शकते.
  • "दंडाज्ञा" या शब्दाचे भाषांतर, "निष्ठुर न्याय" किंवा "दोषी असल्याचे घोषित करणे" किंवा "दोषाची शिक्षा देणे" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: न्यायाधीश, शिक्षा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H6064, H7034, H7561, H8199, G176, G843, G2607, G2613, G2631, G2632, G2633, G2917, G2919, G2920, G5272, G6048

दोष, दोषी

व्याख्या:

"दोष" या शब्दाचा संदर्भ पाप केलेले असण्याचे किंवा गुन्हा केलेल्याच्या तथ्याशी आहे.

  • "दोषी असणे" म्हणजे नैतिकदृष्ट्या काहीतरी चुकीचे केलेले असणे, म्हणजेच, देवाच्या आज्ञेचे पालन केलेले नसणे.
  • "दोषी" च्या विरुद्धार्थी शब्द "निरपराध" हा आहे.

भाषांतर सूचना

  • काही भाषा "दोष" या शब्दाचे भाषांतर कदाचित "पापाचे वजन" किंवा "पापांची मोजणी" असे करतात.
  • "दोषी असणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "चुकीचे असणे" किंवा "नैतिकदृष्ट्या काहीतरी चुकीचे केलेले असणे" किंवा "पाप केलेले असणे" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: निरपराध, अन्याय, शिक्षा, पाप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 39:02 त्यांनी येशूविरुद्ध अनेक खोटे साक्षीदार आणले होते. तथापि, त्यांच्या जबानीमध्ये मेळ नव्हता म्हणुन यहूदी पुढा-यांना येशूचा गुन्हा सिद्ध करता आला नाही.
  • 39:11 येशूबरोबर बोलल्यानंतर पिलात बाहेर असलेल्या जमावास म्हणाला, ‘‘मला या मनुष्यामध्ये काहीच दोष आढळत नाही.’’ परन्तु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठयाने ओरडले, ‘‘त्याला वधस्तंभावर खिळून टाका!’’ यावर पिलात उत्तरला, ‘‘तो निर्दोष आहे!’’ पण ते आणखी मोठयाने ओरडू लागले. तेंव्हा पिलात तिस-यांदा म्हणाला, ‘‘तो निरपराध आहे.’’
  • 40:04 येशूला दोन लुटारुंच्या मधोमध वधस्तंभावर खिळण्यात आले. त्यापैकी एकाने येशूची थट्टा केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तू देवाला भित नाही काय? आपण दोषी आहोत, पण हा मनुष्य निर्दोष आहे.’’
  • 49:10 तुमच्या पापांमुळे तुम्ही दोषी आहात व मरणदंडास पात्र आहात.

Strong's: H816, H817, H818, H5352, H5355, G338, G1777, G3784, G5267


धार्मिक, धार्मिकता, अधार्मिक, देवहीन, अधार्मिकता, देवहीनता

व्याख्या:

"धार्मिक" ही संज्ञा एखाद्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते जो अशा प्रकारे कार्य करतो की ज्याने देवाचा सन्मान व्हावा आणि देव कसा आहे हे दाखवावे. “धार्मिकता” ही त्याची इच्छा पूर्ण करून देवाचे गौरव करण्याच्या चरित्राचे वैशिष्ट्य आहे.

  • ज्याची ईश्वरी चरित्र आहे तो पवित्र आत्म्याचे फळ जसे की प्रेम, आनंद, शांती, धीर, दयाळूपणा आणि आत्मसंयम दर्शवेल.
  • धार्मिकतेची गुणवत्ता दर्शवते की एखाद्या व्यक्तीजवळ पवित्र आत्मा आहे आणि तो त्याच्या आज्ञाचे पालन करीत आहे.

“अधार्मिक” आणि “देवहीन” या संज्ञा अश्या लोकांचे वर्णन करतात जे देवाविरुद्ध बंड करतात. देवाचा विचार न करता वाईट मार्गाने जगण्याला “अधार्मिकता” किंवा “देवहीनपणा” असे म्हणतात.

  • या शब्दांचे अर्थ खूप समान आहेत. तथापि, “देवहीन” आणि “देवहीनता” अशा आणखी एका अत्यंत अवस्थेचे वर्णन करू शकतात ज्यात लोक किंवा राष्ट्र देवाला किंवा त्यांच्यावर राज्य करण्याच्या त्याच्या अधिकाराला देखील ओळखत नाहीत.

जे त्याचा आणि त्याच्या मार्गाचा नकार करतात अशा लोकांवर देव न्याय आणि संताप व्यक्त करतो.

भाषांतरातील सुचना:

  • “धार्मिक” या वाक्यांशाचे भाषांतर “धर्मी लोक” किंवा “देवाचे आज्ञापालन करणारे लोक” असे केले जाऊ शकते. (पाहा: [नाममात्र विशेषण])
  • “धार्मिक” हे विशेषण “देवाचे आज्ञाधारक” किंवा “नीतिमान” किंवा “देवाला संतुष्ट” असे भाषांतरित केले जाऊ शकते.
  • “धार्मीकतेने” या वाक्यांशाचे भाषांतर “देवाची आज्ञा पाळणाऱ्या मार्गाने” किंवा “देवाला संतुष्ट करणाऱ्या कृतींनी व शब्दांनी” असे केले जाऊ शकते.
  • “धार्मिकता” भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये “देवाला संतुष्ट करण्याच्या मार्गाने वागणे” किंवा “देवाची आज्ञा पाळणे” किंवा “नीतिने जीवन जगणे” यांचा समावेश असू शकतो.
  • संदर्भानुसार, “अधार्मिक” या शब्दाचे भाषांतर “देवाला नापसंत” किंवा “अनैतिक” किंवा “देवाची आज्ञा मोडणारा” असे केले जाऊ शकते.
  • “देवहीन” आणि “देवहीनता” या संज्ञांचा शब्दश: अर्थ असा आहे की लोक “देवाशिवाय” आहेत किंवा “देवाचा विचार करीत नाहीत” किंवा “देवाला ओळखत नाहीत अशा मार्गाने वागतात.”
  • “अधार्मिकता” किंवा “देवहीनता” या संज्ञांचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग म्हणजे “दुष्टपणा” किंवा “वाईट” किंवा “देवाविरुद्ध बंड” असे असू शकतात.

(हे देखिल पाहा [वाईट], [सन्मान], [आज्ञा पाळणे], [धार्मिक], [नीतिमान])

Bible References:

  • [ईयोब 27:10]
  • [नीतिसुत्रे 11:09]
  • [प्रेषितांचे कृत्ये 03:12]
  • [1 तिमथ्याला पत्र 01:9-11]
  • [1 तिमथ्याला पत्र 04:07]
  • [2 तिमथ्याला पत्र 03:12]
  • [इब्री लोकांस पत्र 12:14-17]
  • [इब्री लोकांस पत्र 11:7]
  • [1 पेत्राचे पत्र 04:18]
  • [यहुदाचे पत्र 01:16]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच430, एच1100, एच2623, एच5760, एच7563, जी516, जी763, जी764, जी765, जी2124, जी2150, जी2152, जी2153, जी2316, जी2317

नमस्कार, नमन,उपासना आराधना

व्याख्या:

"उपासना" करणे म्हणजे एखाद्याला, विशेषकरून देवाला सन्मान, स्तुती देणे आणि त्याची आज्ञा पाळणे.

  • या शब्दाचा सहसा अर्थ, एखाद्याला नम्रपणे सन्मान देण्यासाठी, अक्षरशः "खाली वाकणे" किंवा "साष्टांग नमस्कार घालणे" असा होतो.
  • जेव्हा आपण त्याची सेवा आणि त्याचा सन्मान करतो, तेव्हा त्याची स्तुती आणि त्याची आज्ञा मानून, आम्ही देवाची उपासना करतो.
  • जेंव्हा इस्राएली लोकांनी देवाची उपासना केली, तेंव्हा सहसा त्यात वेदीवर प्राण्यांचे बलिदान देण्याचा समावेश होता.
  • काही लोकांनी खोट्या देवांची उपासना केली.

भाषांतर सूचना

  • "उपासना" या शब्दाचे भाषांतर "च्या पर्यंत खाली वाकणे" किंवा "सन्मान आणि सेवा करणे" किंवा "सन्मान करणे आणि आज्ञा पाळणे" असे केले जाऊ शकते.
  • काही संदर्भामध्ये, ह्याचे भाषांतर "नम्रपणे स्तुती करणे" किंवा "स्तुती आणि सन्मान देणे" असे देखील केले जाऊ शकते.

(हे देखिल पहा: बलिदान, स्तुती, सन्मान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 13:04 मग देवाने त्यांना ही वचने सांगितली, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडवले. तुम्ही अन्य देवतांची पूजा करू नका."
  • 14:02 कनानी लोक देवाची आराधना करीत नव्हते व त्याची आज्ञा मानत नव्हते. ते खोट्या देवदवतांची पुजा करीत होते व पुष्कळ वाईट गोष्टी करीत होते.
  • 17:06 दाविदाला एक मंदिर बांधावयाचे होतो ज्यामध्ये सर्व इस्राएल लोक देवाची उपासना व अर्पणे करु शकतील.
  • 18:12 सर्व राजे व इस्त्रायलाच्या राज्यातील बहुसंख्य प्रजा मूर्तीची पूजा करु लागले.
  • 25:07 येशूने म्हटले,‘‘अरे सैताना, चालता हो! देव आपल्या वचनामध्ये लोकांस आज्ञा करितो, परमेश्वर तुझा देव हयाला नमन कर व केवळ त्याचीच उपसना कर!’’
  • 26:02 शब्बाथ दिवशी, तो उपासना करीत त्या ठिकाणी गेला.
  • 47:01 तेथे त्यांना लुदिया नावाची एक व्यापारी स्त्री भेटली. तिचे देवावर प्रेम होते व ती देवाची भक्ती करणारी होती.
  • 49:18 देव आम्हास प्रार्थना करण्यास, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास, इतर ख्रिस्ती लोकांसोबत त्याची आराधना करण्यास व त्याने तुम्हासाठी काय केले आहे इतरांना सांगण्यास सांगतो.

शब्द महिती:

  • Strong's: H5457, H5647, H6087, H7812, G1391, G1479, G2151, G2318, G2323, G2356, G3000, G3511, G4352, G4353, G4573, G4574, G4576

नम्र, लीन, नम्रता

व्याख्या:

“नम्र” ही संज्ञा अशा व्यक्तीचे वर्णन करते जी स्वत: ला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानत नाही. तो गर्विष्ठ किंवा घमंडी नाही. नम्रता ही नम्र असण्याचा गुण आहे.

  • देवासमोर नम्र असणे म्हणजे त्याची महानता, शहाणपण आणि परिपूर्णतेच्या तुलनेत एखाद्याची दुर्बलता आणि अपूर्णता समजून घेणे.
  • जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला नम्र करते तेव्हा स्वत: ला कमी महत्त्वतेच्या स्थितीत ठेवते.
  • नम्रता म्हणजे स्वतःच्या गरजेपेक्षा इतरांच्या गरजा पूर्ण करणे.
  • नम्रता म्हणजे एखाद्याच्या भेटवस्तू आणि क्षमता वापरताना विनम्र वृत्तीने सेवा करणे होय.
  • “नम्र व्हा” या वाक्यांशाचे भाषांतर “गर्व करू नका” असे केले जाऊ शकते.
  • “देवासमोर स्वत: ला नम्र करा” याचे भाषांतर “आपली इच्छा देवाला समर्पित करा, असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: गर्विष्ठ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 17:2 दावीद देवावर भरवसा ठेवणारा आणि आज्ञा पाळणारा एक नम्र व नीतिमान मनुष्य होता.
  • 34:10 " प्रत्येक गर्विष्ठाला देव नम्र करील, आणि जो कोणी स्वत: ला नम्र करतो तो त्याला उंच करील."

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H1792, H3665, H6031, H6035, H6038, H6041, H6800, H6819, H7511, H7807, H7812, H8213, H8214, H8215, H8217, H8467, G08580, G42360, G42390, G42400, G50110, G50120, G50130, G53910

नर्क, अग्नीचे सरोवर

व्याख्या:

नर्क ही शाश्वत वेदनांचे आणि छळाचे शेवटचे ठिकाण आहे, जिथे देव त्याच्याविरुद्ध बंड करणाऱ्या आणि येशूच्या बलिदानाद्वारे त्यांना वाचवण्याच्या योजनेला नाकारणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा करील. याला "अग्नीचे सरोवर" असेही संदर्भित केले आहे.

  • नर्काचे अग्नी व गंभीर पीडेचे ठिकाण म्हणून वर्णन केले आहे.
  • सैतान आणि त्याला अनुसरण करणारे दुष्ट आत्मे ह्यांना अनंतकाळाच्या शिक्षेसाठी नरकात फेकले जाईल.
  • जे लोक त्यांच्या पापासाठी येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवत नाहीत आणि आपला बचाव करण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना नरकात कायमची शिक्षा होईल.

भाषांतर सूचना:

  • या संज्ञा वेगवेगळ्या प्रकारे भाषांतरित केल्या पाहिजेत, कारण त्या वेगवेगळ्या संदर्भामध्ये आढळतात.
  • काही भाषा "अग्नीचे सरोवर" या वाक्यांशामध्ये "नदी" या शब्दाचा उपयोग करत नाहीत, कारण ते पाण्याला संदर्भित करते.
  • "नरक" या शब्दाचे भाषांतर "दुःखाचे ठिकाण" किंवा "अंधकार आणि वेदनांचे शेवटचे ठिकाण" असे केले जाऊ शकते.
  • "अग्नीचे सरोवर" या शब्दाचे भाषांतर "अग्नीचा समुद्र" किंवा "(दुःखाचा) मोठा अग्नी" किंवा "अग्नीचे क्षेत्र" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: स्वर्ग, मृत्यू, अधोलोक, अथांग डोह)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 50:14 तो त्यांना नरकात टाकील, ज्या ठिकाणी सर्वकाळ रडणे व दुःखाने दात खाणे सर्वकाळ चालेल. त्यांना न विझणाऱ्या अग्निमध्ये जाळून टाकण्यात येईल व किडे त्यांना सर्वकाळ खात राहतील.
  • 50:15 तो सैतानाला नरकात टाकील, ज्या ठिकाणी तो सर्वकाळ जळत राहील, त्याच्याबरोबर ज्यांनी त्याच्या मागे जाण्याचे निवडले व देवाची आज्ञा मानली नाही तेही असतील.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H7585, G00860, G04390, G04400, G10670, G30410, G44420, G44430, G44470, G44480, G50200, G53940, G54570

नवस

व्याख्या:

एक "नवस" एक गंभीर वचन किंवा शपथ आहे जी एखादी व्यक्ती देवाला देते.

  • जर प्राचीन इस्राएलमधील एखाद्या व्यक्तीने देवाला नवस केला तर त्या व्यक्तीला नवस पूर्ण करणे बंधनकारक होते. प्राचीन इस्राएली लोकांचा असा विश्वास होता की एखाद्या व्यक्तीने केलेला नवस पुर्ण केला नाही तर देव त्याला शिक्षा करतो.
  • प्राचीन इस्राएलमध्ये, कधीकधी एखादी व्यक्ती देवाला त्याच्या संरक्षणासाठी किंवा नवस करण्याच्या बदल्यात त्याची तरतूद करण्याची विनंती करत असे. तथापि, प्राचीन इस्राएली लोकांचा विश्वास नव्हता की या विनंत्या पूर्ण करण्यासाठी देव बांधील आहे
  • संदर्भानुसार, "नवस" या संज्ञेचे भाषांतर "गंभीर वचन" किंवा "गंभीर शपथ" किंवा "देवाला दिलेले वचन" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: वचन, शपथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच5087, एच5088, जी171

नाजीर, नाजीराचा नवस

तथ्य:

"नाजीर" या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी आहे ज्याने "नाजीराचा नवस" केला आहे. बऱ्याचदा हा नवस पुरुषांनी केला, पण स्त्रिया सुद्धा हा नवस करू शकतात.

  • ज्या व्यक्तीने नाजीराचा नवस केला होता, तो व्यक्ती नवस केलेल्या कालावधीपर्यंत तो नवस पूर्ण करण्यासाठी, द्राक्ष्यापासून बनवलेले अन्न किंवा पेय न खाण्याबद्दल मान्य करतो. या काळात, त्या व्यक्तीने त्याचे केस कापायचे नसते, आणि कोणत्याही मृत शरीराच्या जवळ जायचे नसते.
  • जेंव्हा ठरलेली वेळ संपते, आणि नवस पूर्ण होतो, तेंव्हा नाजीराने याजकाकडे जाऊन अर्पण प्रदान करायचे असते. ह्याच्यामध्ये त्याचे कापणे आणि ते जाळण्याचाही समावेश होतो. अन्य सर्व निर्बंधसुद्धा काढून टाकले जातात.
  • शिमसोन हा जुन्या करारातील प्रसिद्ध मनुष्य आहे, जो नजीराच्या नवसामध्ये होता.
  • बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माबद्दल घोषणा करणाऱ्या देवदुताने जखऱ्याला सांगितले की, त्याच्या पुत्राने कोणतेही मादक पेय पिऊ नये, ज्याने हे सूचित होते की, योहान हा नाजीराच्या नवसामध्ये होता.
  • प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील परिच्छेदाप्रमाणे, प्रेषित पौलाने देखील एकेकाळी हा नवस बोलला होता, हे प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील एका परिच्छेदाप्रमाणे आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा)

(हे सुद्धा पहा: (बाप्तिस्मा करणारा) योहान, बलिदान, शिमसोन, नवस, जखऱ्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H5139


नाव

व्याख्या:

“नाव” या शब्दाचा अर्थ असा आहे ज्याद्वारे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा वस्तूस संबोधले जाते. पवित्र शास्त्रात, "नाव" हा शब्द वेगवेगळ्या संकल्पनांचा संदर्भ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो.

  • काही संदर्भांमध्ये, “नाव” एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा संदर्भ घेऊ शकतो, जसे की “चला आपण स्वत: साठी आपले नाव करु.”
  • “नाव” हा शब्द एखाद्या गोष्टीच्या आठवणीला संदर्भित असू शकते. उदाहरणार्थ, “मूर्तींची नाव काढून टाका” म्हणजे त्या मूर्ती नष्ट करणे म्हणजे यापुढे त्यांची आठवण होणार नाही किंवा त्यांची पूजा केली जाणार नाही.
  • “देवाच्या नावाने” बोलणे म्हणजे त्याच्या सामर्थ्याने व अधिकाराने बोलणे किंवा त्याचा प्रतिनिधी म्हणून बोलणे.
  • एखाद्याचे “नाव” संपूर्ण व्यक्तीला संदर्भित करु शकते, जसे “पृथ्वीवर दुसरे कोणतेही नाव नाही ज्याद्वारे आपले तारण होईल.”

(पाहा: रुपक)

भाषांतरातील सुचना:

  • “त्याचे चांगले नाव” यासारख्या अभिव्यक्तीचे भाषांतर “त्याची चांगली प्रतिष्ठा” असे केले जाऊ शकते.
  • “नावाने” काहीतरी करणे याचे भाषांतर “च्या अधिकाराने” किंवा “परवानगीने” किंवा “त्या व्यक्तीचा प्रतिनिधी” असे केले जाऊ शकते.
  • “स्वतःचे नाव बनवा” या शब्दाचे भाषांतर “अनेक लोकांना आपल्याबद्दल माहीत करणे” किंवा “लोकांनी विचार करावा आम्ही खूप महत्वाचे असे करणे.”
  • “त्याचे नाव सांगा” या शब्दाचे "त्याला नाव द्या" किंवा "त्याला नाव देणे" असे भाषांतर केले जाऊ शकते.
  • “ज्यांना तुझे नाव आवडते” या वाक्यांशाचे भाषांतर “जे तुझ्यावर प्रेम करतात” असे केले जाऊ शकते.
  • “मूर्तींची नाव पुसून टाका” या शब्दाचा अनुवाद “मूर्तिपुजक प्रतिमा काढून टाका जेणेकरून त्यांची आठवणही राहणार नाही” किंवा “लोकांनी खोट्या देवतांची उपासना करणे थांबवावे” किंवा “सर्व मूर्ती नष्ट करा म्हणजे यापुढे लोक त्यांच्याबद्दल विचार करणार नाही.”

( हे देखील पाहा: बोलविणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच5344, एच7121, एच7761, एच8034, एच8036, जी25640, जी36860, जी36870, जी51220

नाश होणे

व्याख्या:

सहसा हिंसा किंवा आपत्तीचा परिणाम म्हणून, "नाश" या शब्दाचा अर्थ मरणे किंवा नष्ट होणे असा आहे. नवीन करारामध्ये, त्याचा हरवणे किंवा देवाच्या लोकांपासून विभक्त होणे असा आध्यात्मिक अर्थ आहे.

"नाश होणे" या वाक्याशाचा आध्यात्मिक अर्थ:

  • जे लोक "नष्ट होत आहेत" ते असे लोक आहेत ज्यांनी आपल्या तारणासाठी येशूवर विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे.
  • जे "नाश पावतात" ते स्वर्गात देवाबरोबर अनंतकाळ राहणार नाहीत. त्याऐवजी, ते देवाच्या शिक्षेखाली नरकामध्ये अनंतकाळ राहतील.
  • प्रत्येकजण शारीरिकरित्या मरण पावेल, परंतु जे लोक आपल्या तारणासाठी येशूवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना कायमची शिक्षा होईल.
  • जेव्हा "नाश" हा शब्द आध्यात्मिक अर्थाने वापरला जातो, तेव्हा खात्री करा की तुमचे भाषांतर हे शारीरिकरित्या मरण्यापेक्षा वेगळ्या प्रकारे व्यक्त करते.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "देवाच्या लोकांपासून ताटातूट होणे," किंवा "अनंतकाळासाठी मरणे" किंवा 'नरकात नाश होणे" किंवा "नष्ट होणे" यांचा समावेश असू शकतो.
  • एखादा शब्द किंवा अभिव्यक्ती वापरण्याचा प्रयत्न करा ज्याचा अर्थ केवळ "शारीरिकरित्या मरणे" किंवा "अस्तित्व थांबणे" असा होत नाही.

(हे देखील पाहा: मृत्यू, अनंतकाळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0006, एच0007, एच0008, एच1478, एच1820, एच1826, एच5486, एच5595, एच6544, एच8045, जी05990, जी06220, जी06840, जी08530, जी13110, जी27040, जी48810, जी53560

निंदा, निंदा करणे, निंदनीय

व्याख्या:

पवित्रशास्त्रात, "निंदा" या शब्दाचा अर्थ देव किंवा लोकांबद्दल खोल अनादर दर्शविणाऱ्या रीतीने बोलणे होय.. "एखाद्या व्यक्तीची "निंदा" करणे, म्हणजे त्या व्यक्तीच्या विरुद्ध बोलणे, जेणेकरून इतर लोक त्याच्याबद्दल चुकीचा किंवा वाईट विचार करतील.

  • बहुतेकदा, देवाची निंदा करणे म्हणजे त्याच्याबद्दल सत्य नसलेल्या गोष्टी बोलून किंवा त्याचा अपमान करणाऱ्‍या अनैतिक रीतीने वागून त्याची निंदा करणे किंवा त्याचा अपमान करणे होय.
  • एका खर्‍या देवाशिवाय दुसरा देव आहे असा दावा करणे किंवा देव असल्याचा दावा करणे ही मानवाने केलेली निंदा आहे.
  • काही इंग्रजी आवृत्त्या, ह्याचे भाषांतर "खोटा आरोप करणे" असे करतात, जेव्हा त्याचा संदर्भ लोकांची निंदा करणे याच्याशी येतो.

भाषांतर सूचना:

  • "निंदा" या शब्दाचे भाषांतर "च्या विरुद्ध वाईट गोष्टी बोलणे" किंवा "देवाचा अनादर करणे" किंवा "खोटा आरोप करणे" असे केले जाऊ शकते.
  • "निंदा" या शब्दाचा भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "इतरांबद्दल चुकीचे बोलणे" किंवा "खोटा आरोप ठेवणे" किंवा "खोट्या अफवा पसरवणे" ह्यांचा समावेश होतो.

(हे देखील पाहा: अनादर, खोटा आरोप करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

माहिती समूह:

  • स्ट्रोंग : H1288, H1442, H2778, H5006, H5007, H5344, G09870, G09880, G09890

नियम, मोशेचे नियमशास्त्र, परमेश्वराचे नियम, देवाचे नियम

व्याख्या:

सर्वात सोप्या शब्दात, "नियम" हा शब्द एखादा कायदा किंवा सूचनांना संदर्भित करतो ज्याचे अनुसरण केले पाहिजे. पवित्रशास्त्रामध्ये, “नियम” हा शब्द सहसा कोणत्याही आणि प्रत्येक गोष्टी ज्या आपल्या लोकांनी पाळल्या पाहिजेत आणि तसे केले पाहीजे अशी देवाची इच्छा आहे अशा सर्व गोष्टींसाठी वापरला जातो. "मोशेचे नियमशास्त्र" हा विशिष्ट शब्द इस्राएली लोकांना आज्ञा पाळण्यासाठी देवाने मोशेला दिलेल्या आज्ञा व निर्देशांना संदर्भित करतो.

  • संदर्भानुसार, “नियम” हा शब्द संदर्भत करु शकतो:
  • देवाने इस्राएल लोकांसाठी दगडांच्या पाट्यांवर लिहिलेल्या दहा आज्ञा
  • मोशेला दिलेले सर्व नियम
  • जुन्या कराराची पहिली पाच पुस्तके
  • संपूर्ण जुना करार (नवीन करारात "शास्त्रवचने" असे देखील संबोधले आहे).
  • देवाच्या सर्व सूचना आणि इच्छा
  • "नियमशास्त्र आणि संदेष्टे" हा वाक्यांश नवीन करारामध्ये इब्री शास्त्रवचनांना (किंवा “जुना करार)” संदर्भित करण्यासाठी वापरला जातो

भाषांतरातील सुचना:

  • या शब्दांचे अनेकवचनी “कायदे” असे वापरून भाषांतर केले जाऊ शकते कारण ते बर्‍याच सूचनांना संदर्भित करते.
  • “मोशेचे नियमशास्त्र” या शब्दाचे भाषांतर “नियमशास्त्र जे देवाने मोशेला इस्राएल लोकांना देण्यास सांगितले” असे केले जाऊ शकते.
  • संदर्भानुसार, “मोशेचे नियमशास्त्र” या वाक्यांशाचे भाषांतर “देवाने मोशेला सांगितलेले नियम” किंवा “मोशेने लिहिलेले देवाचे नियम” किंवा “नियम जे देवाने मोशेला इस्राएल लोकांस देण्यास सांगितले.” असे केले जाऊ शकते.
  • "कायदा" किंवा "देवाचा कायदा" किंवा "देवाचे नियम" या वाक्याचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "देवाकडून आलेले नियम" किंवा "देवाच्या आज्ञा" किंवा "देवाने दिलेले नियम" किंवा "देवाने आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी" किंवा "देवाच्या सर्व सूचनां" या वाक्यांचा समावेश असू शकतो.
  • "यहोवाचे नियम" या वाक्यांशाचे भाषांतर "यहोवाचे कायदे" किंवा "परमेश्वराने पाळण्यास सांगितलेले नियम" किंवा "यहोवाकडील नियम" किंवा "यहोवाने आज्ञा दिलेल्या गोष्टी" असे देखील केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: सुचना देणे, मोशे, दहा आज्ञा, कायदेशीर, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 13:7 देवाने पालन करण्यासाठी इतर बरीच नियम आणि कायदे देखिल दिले आहेत. देवाने असे अभिवचन दिले आहे की जर लोकांनी या नियमांचे पालन केले तर तो त्यांना आशीर्वाद देईल आणि त्यांचे रक्षण करील. जर त्यांनी त्यांचे उल्लंघन केले तर देव त्यांना शिक्षा करील.
  • 13:9 जो कोणी देवाचा नियम मोडत असे त्याला दर्शन मंडपासमोर असलेल्या वेदीवर परमेश्वरासाठी यज्ञ म्हणून एखादे प्राणी आणावे लागत असे.
  • 15:13 मग यहोशवाने लोकांना सीनाय येथे इस्राएल लोकांशी देवाने केलेल्या कराराचे पालन करण्याबद्दल आपल्या कर्तव्याची आठवण करून दिली. लोकांनी देवाशी एकनिष्ठ राहण्याचे व या नियमांचे पालन करण्याचे वचन दिले.
  • 16:1 यहोशवा मरण पावल्यानंतर, इस्राएल लोकांनी देवाची आज्ञा मोडली आणि उर्वरित कनानी लोकांना बाहेर घालवून दिले नाही किंवा देवाचे नियम पाळले नाहीत.
  • 21:5 नवीन करारात, देव लोकांच्या हृदयावर त्याचा नियमिशास्त्र लिहिल, लोक देवाला वैयक्तिकरीत्या ओळखतील, ते त्याचे लोक होतील आणि देव त्यांच्या पापांची क्षमा करील.
  • 27:1 येशूने उत्तर दिले, “देवाच्या नियमशास्त्रात काय लिहिले आहे?”
  • 28:1 येशू त्याला म्हणाला, “तू मला 'उत्तम' का म्हणतोस? फक्त एकच उत्तम आहे आणि तो देव आहे. परंतु तुला सार्वकालिक जीवन मिळवायचे असेल तर देवाच्या आज्ञा पाळ.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच430, एच1881, एच1882, एच2706, एच2710, एच3068, एच4687, एच4872, एच4941, एच84510, जी23160, जी35510, जी35650

नियमशास्त्राचे शिक्षक

व्याख्या:

शास्त्री हे अधिकृत अधिकारी होते, जे महत्वाचे शासकीय किंवा धार्मिक कागदपत्रे हाताने लिहिण्यास किंवा नक्कल करण्यास जबाबदार होते. यहुदी शास्त्री ह्यांच्यासाठीचे दुसरे नाव "यहुदी नियमशास्त्रातील तज्ञ" हे होते.

  • जुन्या कराराच्या पुस्तकांची कॉपी आणि जतन करण्यासाठी लेखक जबाबदार होते.
  • त्यांनी धार्मिक मते आणि देवाच्या नियमावर भाष्य देखील कॉपी केले, जतन केले आणि त्याचा अर्थ लावला.
  • काही वेळा, शास्त्री हे महत्त्वाचे सरकारी अधिकारी होते.
  • महत्त्वाच्या बायबलसंबंधी शास्त्रींमध्ये बारूख आणि एज्रा यांचा समावेश होतो.
  • नवीन करारात, “शास्त्री” या शब्दाचे भाषांतर “नियमशास्त्राचे शिक्षक” असे देखील केले गेले.
  • नवीन करारात, शास्त्री हे सहसा “परुशी” नावाच्या धार्मिक गटाचा भाग होते आणि दोन्ही गटांचा वारंवार उल्लेख केला जात असे.

(हे देखील पाहा: कायदा, परुशी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच5608, एच5613, एच7083, जी11220

निर्दोष

व्याख्या:

“निर्दोष” या शब्दाचा शाब्दिक अर्थ “दोषविरहित” आहे. याचा अर्थ अशा व्यक्तीचा संदर्भ घेण्यासाठी केला जातो जो मनापासून देवाची आज्ञा पाळतो, परंतु याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती निर्दोष आहे.

  • अब्राहाम आणि नोहाला देवासमोर दोषरहित मानले जाई.
  • “निर्दोष” म्हणून प्रतिष्ठित असलेली व्यक्ती देवाचा सन्मान करण्याच्या पद्धतीने वागते.
  • एका वचनानूसार, निर्दोष व्यक्ती म्हणजे “जो देवाचा आदर करतो आणि वाईटापासून दूर वळतो.”

भाषांतरातील सूचना:

  • त्याचे भाषांतर “त्याच्या चरित्रात कोणतेही दोष नसलेले” किंवा “देवाला पूर्णपणे आज्ञाधारक” किंवा “पाप टाळणे” किंवा “वाईटापासून दूर ठेवणे” असेही केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती :

  • स्ट्रोंग: एच5352, एच5355, एच8535, जी273, जी274, जी298, जी299, जी338, जी410, जी423

निर्दोष

व्याख्या:

"निर्दोष" या संज्ञेचा अर्थ एखाद्या अपराधामध्ये किंवा इतर चुकीच्या गोष्टीमध्ये दोषी नसणे असा होतो. हे सर्वसामान्यपणे वाईट गोष्टींमध्ये सहभागी नसलेल्या लोकांसाठी देखील संदर्भित केले जाऊ शकते.

  • काहीतरी चुकीचे केले असा दोष एखाद्यावर लावला असेल, आणि जर त्या व्यक्तीने काहीच चुकीचे केले नसेल तर त्याला निर्दोष असे म्हणतात.
  • काहीवेळा "निर्दोष" ही संज्ञा अशा लोकांना संदर्भित करते, ज्या लोकांना वाईट वागणूक मिळावी असे त्यांनी काहीच केलेले नसते, तरीही ती त्यांना मिळत असते, जसे की, शत्रू सैन्याच्या हल्ल्यामधील "निर्दोष लोक."
  • बायबलमध्ये, "रक्त" "हत्या" यास दर्शवू शकते, म्हणून "निष्पाप रक्त" म्हणजे "अशा लोकांना ठार मारणे जे मरण्यास पात्र नव्हते."

भाषांतर सूचना:

  • बऱ्याच संदर्भामध्ये, "निर्दोष" या शब्दाचे भाषांतर "दोषी नसलेला" किंवा "जबाबदार नसलेला" किंवा कशासाठीही "दोष न लागलेला" असे केले जाऊ शकते.
  • साधारणपणे निर्दोष लोकांचा संदर्भ देताना, या संज्ञेचे भाषांतर "ज्याने काहीच चुकी केली नाही" किंवा "जो वाईटामध्ये सामील नव्हता" असे केले जाऊ शकते.
  • "निर्दोष रक्त पाडणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "अशा लोकांना मरणे, ज्यांनी त्या मरणाच्या योग्य काहीच चुकीचे केले नाही" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: दोष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • ८:६ दोन वर्षांनंतर, निष्पाप असूनही योसेफ तुरुंगातच होता.
  • ४०:४ त्यापैकी एकाने येशूची थट्टा केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तुला देवाची भित नाही काय? आपण दोषी आहोत, पण हा मनुष्य निर्दोष आहे.’’
  • ४०:८__जेव्हा येशूवर पहारा करत असलेल्या सैनिकाने हे सर्व पाहीले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘खरोखर, हा मनुष्य __निष्पाप होता. ‌‌‌तो देवाचा पुत्र होता.’’

शब्द माहिती

  • स्ट्रोंग: एच2136, एच2600, एच2643, एच5352, एच5355, एच5356, जी121

निवडलेले, निवडणे, निवडलेले लोक, निवडलेला, पसंत करणे

व्याख्या:

“पसंत केलेला” या संज्ञेचा शाब्दिक अर्थ “निवडलेले” किंवा “निवडलेले लोक” असा आहे आणि ज्यांना देवाने आपले लोक म्हणून नियुक्त केले आहे किंवा निवडलेले आहे त्यांना सूचित करतो. “निवडलेला” किंवा “देवाचा निवडलेला जन” हे शीर्षक येशूला सूचित करते, जो निवडलेला मसीहा आहे.

  • “निवडणे” या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्य गोष्टीला किंवा एखाद्याला निवडणे किंवा काहीतरी निश्चित करणे. बहुतेकदा असे म्हटले जाते की देव त्याच्या मालकीचे होण्याकरता आणि त्याची सेवा करण्यासाठी लोकांना नियुक्त करतो.
  • “निवडलेले” असणे म्हणजे “उचललेले” किंवा “नियुक्त केलेले” किंवा काहीतरी करणे.
  • चांगले आध्यात्मिक फळ देण्याच्या उद्देशाने देवाने आपल्या माणसांना पवित्र बनविले. म्हणूनच त्यांना “निवडलेले” किंवा “पसंत केलेले” म्हणतात.
  • “निवडलेला” हा शब्द कधीकधी पवित्र शास्त्रात मोशे आणि राजा दावीद यांसारख्या विशिष्ट लोकांना सूचित करण्यासाठी वापरला जातो ज्यांना देवाने आपल्या लोकांवर पुढारी म्हणून नेमले होते. देवाचे निवडलेले लोक म्हणून इस्राएल राष्ट्राचा उल्लेख करण्यासाठीही याचा उपयोग केला जातो.
  • “पसंत केलेला” हा वाक्यांश जुना शब्द आहे ज्याचा अर्थ शब्दशः “निवडलेला” किंवा “निवडलेले लोक” असा आहे. ख्रिस्तावरील विश्वास असलेल्यांचा संदर्भ घेताना मूळ भाषेतील हा शब्द बहुवचन आहे.
  • जुन्या इंग्रजी बायबल आवृत्तीमध्ये, “पसंत केलेला” हा शब्द “निवडलेल्या (नां)” या शब्दाचा अनुवाद करण्यासाठी जुन्या आणि नवीन करारात वापरला जातो. अधिक आधुनिक आवृत्त्या केवळ येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाने तारलेल्या लोकांचा संदर्भ घेण्यासाठी केवळ नवीन करारामध्ये “पसंत केलेले” हा शब्द वापरतात. पवित्र शास्त्रातील इतर मजकुरामध्ये ते या शब्दाचे अधिक शब्दशः “निवडलेला” म्हणून भाषांतर करतात.

भाषांतरातील सुचना:

  • “पसंत केलेला” याचे असे शब्द किंवा वाक्यांश यामध्ये अनुवादित करणे चांगले आहे ज्याचा अर्थ “निवडलेला” किंवा “निवडलेले लोक” असा आहे.
  • “जे निवडलेले” या शब्दाचे भाषांतर “नेमलेले” किंवा “निवडलेले ”किंवा“ ज्यांना देवाने निवडले ”असेही होऊ शकते.
  • “मी तुला निवडले आहे” याचे भाषांतर “मी तुला नेमले” किंवा “मी तुला निवडले” असे केले जाऊ शकते
  • येशूच्या संदर्भात, “निवडलेला” हे भाषांतर “देवाचा निवडलेला एक” किंवा “देवाचा खास नियुक्त केलेला मसीहा” किंवा “देवाने (लोकांना वाचवण्यासाठी) नियुक्त केलेला” असेही होऊ शकते.

(हे देखील पाहा: नियुक्त करणे, ख्रिस्त)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच970, एच972, एच977, एच1262, एच1305, एच4005, एच6901, जी138, जी140, जी1586, जी1588, जी1589, जी1951, जी3724, जी4400, जी4401, जी4758, जी4899, जी5500

निवासमंडप

व्याख्या:

निवासमंडप ही एक खास तंबुसारखी बनलेली रचना होती, जिथे 40 वर्षे वाळवंटात प्रवास करताना इस्राएल लोकांनी देवाची उपासना केली.

  • देवाने इस्राएलांना या मोठ्या तंबूच्या उभारणीसाठी सविस्तर सूचना दिल्या होत्या, ज्यांमध्ये दोन खोल्या होत्या आणि ते बंद अंगणाने वेढलेले होते.
  • प्रत्येक वेळी जेंव्हा इस्राएल लोक वाळवंटात राहण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचे, तेंव्हा याजक लोक तो तंबू काढून घेऊन छावणीच्या परिसरात वाहत घेऊन जायचे. मग ते पुन्हा आपल्या नवीन छावणीच्या मध्यभागी त्याची स्थापना करत.
  • निवासमंडप लाकडाच्या रचनांनी बांधण्यात आला होता, त्यावर कापडांपासून, शेळीच्या केसापासून आणि प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले पडदे टांगण्यात आले होते. सभोवतालचे आंगण हे आणखी पडद्यांनी बंदिस्त केलेले होते.
  • निवासमंडपाचे दोन भाग होते, पवित्रस्थान (जिथे धूप जाळण्याची वेदी ठेवलेली होती) आणि अति पावित्रस्थान (जिथे कराराचा कोश ठेवण्यात आला होता).
  • निवासमंडपाच्या अंगणात बलिदान केलेल्या प्राण्यांना जाळण्यासाठी एक वेदी होती, आणि विधीपूर्वक धुण्यासाठी एक विशिष्ठ धुण्याचे कुंड होते.
  • जेंव्हा शलमोनाने यरुशलेम येथे मंदिर बांधले, तेंव्हा इस्राएल लोकांनी निवासमंडपाचा उपयोग करण्याचे बंद केले.

भाषांतर सूचना

  • "निवासमंडप" या शब्दाचा अर्थ "निवासस्थान" असा होतो. ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "पवित्र तंबू" किंवा "तंबू जिथे देव होता" किंवा "देवाचा तंबू" ह्यांचा समावेश होतो.
  • या शब्दाचे भाषांतर "मंदिर" या शब्दाच्या भाषांतरापेक्षा वेगळे असायला हवे ह्याची खात्री करा.

(हे सुद्धा पहा: वेदी, धूपवेदी, कराराचा कोश, मंदिर, मिलापाचा तंबू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H168, H4908, H5520, H5521, H5522, H7900, G4633, G4634, G4636, G4638


नीतिमान, नीतिमत्ता, अनितिमान, अनीतीमत्वता, सरळ, सरळता

व्याख्या:

"नीतिमत्ता" हा शब्द देवाच्या परिपूर्ण चांगुलपणा, न्याय, विश्वास आणि प्रेमाला सूचित करतो. हे गुण देवाला "नीतिमान" बनवितात. कारण देव नीतिमान आहे, त्याने पापाचा निषेध केला पाहिजे

  • या संज्ञा बऱ्याचदा अशा व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी देखील वापरल्या जातात जे देवाचे ऐकतात आणि नैतिकदृष्ट्या चांगले असतात. तथापि, सर्व लोकांनी पाप केले आहे म्हणून देवाशिवाय कोणीही पूर्णपणे नीतिमान नाही.
  • पवित्र शास्त्रात ज्यांना "नीतिमान" म्हटले गेले त्यांच्या उदाहरणांमध्ये नोहा, ईयोब, अब्राहाम, जखऱ्या आणि अलिशाबेथ यांचा समावेश आहे.
  • जेव्हा लोक त्यांचा उध्दार करण्यासाठी येशूवर विश्वास ठेवतात, तेव्हा देव त्यांना त्यांच्या पापांपासून मुक्त करतो आणि येशूच्या नीतिमत्तेमुळे त्यांना नीतिमान असल्याचे घोषित करतो.

"अनीतिमान" या शब्दाचा अर्थ पापी आणि नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असणे आहे. "अनीतीमत्वता" म्हणजे पाप किंवा पापी असण्याची स्थिती.

  • या संज्ञा विशेषत: अशा प्रकारे जगण्याला संदर्भित करतात ज्यामध्ये देवाच्या शिकवणीचे आणि आज्ञेचे केले उल्लंघन जाते.
  • अनीतिमान लोक त्यांच्या विचारांमध्ये आणि कृतीत अनैतिक असतात.
  • कधीकधी "अनीतिमान" ही संज्ञा विशेषत: अशा लोकांना संदर्भित करते ज्यांचा येशूवर विश्वास नाही.

"सरळ" आणि "सरळता" या शब्दाचा अर्थ देवाच्या नियमांचे पालन करण्याच्या मार्गाने कार्य करणे होय.

  • या शब्दांच्या अर्थात सरळ उभे राहून थेट पुढे पाहण्याची कल्पना समाविष्ट आहे.
  • जो व्यक्ती "सरळ" आहे तो देवाच्या नियमांचे पालन करणारा आणि त्याच्या इच्छेविरूद्ध असलेल्या गोष्टी न करणारा व्यक्ती आहे.
  • "सात्विकता” आणि "नीतिमान" या संज्ञेंचे समान अर्थ आहेत आणि कधीकधी “सात्विकता आणि सरळता" सारख्या समांतर रचनेमध्ये वापरले जातात. (पाहा: [समांतरता])

भाषांतरातील सूचना:

  • जेव्हा ते देवाचे वर्णन करते तेव्हा "नीतिमान" या शब्दाचे भाषांतर "पूर्णपणे चांगले आणि न्याय्य" किंवा “नेहमीच योग्य वागणे" असे केले जाऊ शकते
  • देवाची "नीतिमत्ता" या संज्ञचे भाषांतर “परिपूर्ण विश्वासुपणा आणि चांगुलपणा" असे देखील केले जाऊ शकते
  • जेव्हा ते देवाचे आज्ञाधारक लोकांचे वर्णन करतात तेव्हा "नीतिमान” या शब्दाचे भाषांतर "नैतिकदृष्ट्या चांगले" किंवा "फक्त" किंवा “देवाला संतोष देणारे जीवन जगणे" असे केले जाऊ शकते
  • "नीतिमान “या वाक्यांशाचे भाषांतर "नीतिमान लोक" किंवा "देवभीरु लोक" असे देखील केले जाऊ शकते
  • संदर्भानुसार, "नीतिमत्वता” ही संज्ञा शब्द किंवा वाक्यांशासह देखील भाषांतरीत केली जाऊ शकते ज्याचा अर्थ "चांगुलपणा" किंवा "देवापुढे परिपूर्ण असणे" किंवा "देवाचे आज्ञापालन करुन योग्य मार्गाने वागणे" किंवा “पूर्णपणे चांगले करणे" असा होतो
  • "अनीतिमान"या शब्दाचे भाषांतर केवळ “नीतिमान नाही" असे केले जाऊ शकते
  • संदर्भानुसार, हे भाषांतरित करण्याच्या इतर मार्गांमध्ये "वाईट “किंवा "अनैतिक" किंवा "देवाविरुध्द बंड करणारे लोक" किंवा "पापीष्ट" यांचा समावेश असू शकतो
  • "अनीतिमान"या वाक्यांशाचे भाषांतर “अनीतिमान लोक" असे केले जाऊ शकते
  • "अनीतिमत्वता" या शब्दाचे भाषांतर "पाप" किंवा "वाईट विचार आणि कृती" किंवा “दुष्टपणा" असे केले जाऊ शकते
  • शक्य असल्यास, त्याचे संबंध "नीतिमान, नीतिमत्वता" यांच्याशी दर्शविणाऱ्या मार्गाने भाषांतरित करणे चांगले ठरेल,
  • "सरळ” या संज्ञेला भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये "योग्य वागणे" किंवा "योग्य रीतीने वागणारा व्यक्ती" किंवा "देवाच्या नियमाचे पालन करणे" किंवा "देवाचा आज्ञाधारक" किंवा” योग्य मार्गाने वागणे" या वाक्यांशाचा समावेश असू शकतो
  • "सरळपणा" या शब्दाचे भाषांतर "नैतिक शुद्धता" किंवा "चांगले नैतिक आचरण" किंवा” योग्यता" असे केले जाऊ शकते
  • "सरळ” या वाक्यांशाचे भाषांतर "सरळ असणारे लोक" किंवा” सरळ लोक" असे केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: दुष्ट, विश्वासू, चांगला, पवित्र, सात्विकता, न्याय्य, नियम, कायदा, आज्ञा पाळणे, शुध्द, नीतिमान, पाप, बेकायदेशीर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 3:2 पण नोहावर देवाची कृपा झाली. दुष्ट लोकांमध्ये राहणारा तो एक नीतिमान मनुष्य होता.
  • 4:8 देवाने घोषित केले की अब्राहाम नीतिमान आहे कारण त्याने देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला आहे.
  • 17:2 दाविद एक नम्र आणि नीतिमान माणूस होता ज्याने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचे आज्ञापालन केले.
  • 23:1 योसेफ, मरीयाचा ज्या माणसाशी वाग्दान झाले होते, तो नीतिमान माणूस होता.
  • 50:10 मग नीतिमान लोक त्यांच्या देव पिता याच्या राज्यात सूर्यासारखे चमकतील. "

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0205, H1368, H2555, H3072, H3474, H3476, H3477, H3483, H4334, H4339, H4749, H5228, H5229, H5324, H5765, H5766, H5767, H5977, H6662, H6663, H6664, H6665, H6666, H6968, H8535, H8537, H8549, H8552, G00930, G00940, G04580, G13410, G13420, G13430, G13440, G13450, G13460, G21180, G37160, G37170

नेमणे, नेमलेला

व्याख्या:

"नेमणे" आणि "नेमलेला" या संज्ञा एखादे विशिष्ट कार्य किंवा भूमिकेची पूर्तता करण्यासाठी एखाद्याला निवडणे यास संदर्भित करतात.

  • "नेमलेला असणे" हे वाक्य काहीतरी स्वीकारण्यासाठी "निवडलेला" यास संदर्भित करते, जसे की "सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी नेमलेला". त्या लोकांना "सार्वकालिक जीवनासाठी नेमले" म्हणजे ते सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी निवडण्यात आले.
  • "नेमलेली वेळ" या वाक्यांशाचा संदर्भ काहीतरी घडण्यासाठी परमेश्वराची "निवडलेली वेळ" किंवा "नियोजित वेळ" होय.
  • "नेमणे" या शब्दाचा अर्थ "आदेश देणे" किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी करण्यासाठी "नियुक्त करणे" असाही होऊ शकतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "नेमणे" या शब्दाच्या भाषांतरामध्ये "निवडणे" किंवा "नियुक्त करणे" किंवा "औपचारिकरित्या निवडणे" किंवा "विशिष्ठ कामासाठी योजने" यांचा समावेश असू शकतो.
  • "नेमलेला" या शब्दाचे भाषांतर "नियुक्त केलेला" किंवा "नियोजित" किंवा "विशेषतः निवडलेला" असे केले जाऊ शकते.
  • "नेमलेला असणे" या वाक्यांशाचे भाषांतर "निवडलेला असणे" असा देखील होऊ शकते.

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द माहीती :

  • स्ट्रोंग्स एच 0561, एच 0977, एच 2163, एच 2296, एच 2706, एच 2708, एच 2710, एच 3198, एच 3245, एच 3259, एच 3677, एच 3983, एच 4150, एच 4151, एच 4152, एच 4483, एच 4487, एच 4662, एच 5324, एच 5344, एच 5414, एच5567, एच 5975, एच6310, एच 6485, एच 6565, एच 6635, एच6680, एच 6923, एच 6942, एच 6966, एच 7760, एच 7896, जी 03220, जी 06060, जी 12990, जी 13030, जी 19350, जी 25250, जी 27490, जी 42870, जी 42960, जी 43840, जी 49290, जी 50210, जी 50870

न्यायाचा दिवस

व्याख्या:

"न्यायाचा दीवस" या शब्दाचा संदर्भ भविष्यातील वेळेशी आहे, जेंव्हा देव प्रत्येक मनुष्याचा न्याय करील.

  • देवाने त्याच्या पुत्राला, येशू ख्रिस्ताला, सर्व लोकांवर न्यायाधीश बनवले आहे.
  • न्यायाच्या दिवशी, येशू लोकांचा त्यांच्या नीतिमान चारीत्र्यानुसार न्याय करील.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर, "न्यायाचा काळ" असेही केले जाऊ शकते, कारण ह्याचा संदर्भ एकापेक्षा अधिक दिवसाशी येतो.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "शेवटची वेळ जेंव्हा देव सर्व लोकांचा न्याय करेल" यांचा समावेश होतो.
  • काही भाषांतरे या शब्दाला मोठ्या अक्षरात लिहून तो एक विशेष दिवस किंवा काळ आहे असे दाखवतात: "न्यायाचा दिवस" किंवा "न्यायाचा काळ."

(हे सुद्धा पहा: न्यायाधीश,येशू, स्वर्ग, नरक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


न्यायाधीश, न्याय

व्याख्या:

"न्यायाधीश" आणि "न्याय" या शब्दांचा संदर्भ, काहीतरी नैतिकदृष्ट्या बरोबर की चूक आहे ह्याचा निर्णय करण्याकरिता येतो. तथापि, या संज्ञा सहसा काहीतरी वाईट, चुकीचे किंवा दुष्ट आहे हे ठरवण्याच्या संदर्भामध्ये, एखाद्या निर्णयाचा परिणाम म्हणून एखाद्या व्यक्तीने केलेल्या कृतीला संदर्भित करू शकतात.

  • "न्यायाधीश" आणि "न्याय" या शब्दांचा अर्थ "अपाय करणे" असा देखील असू शकतो (सामान्यतः देवाने एखाद्या व्यक्तीची किंवा राष्ट्राची कृतीस दुष्ट असल्याचे ठरवले आहे).
  • "देवाचा न्याय" हे सहसा एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्याला पापी म्हणून दोषी ठरवण्याच्या त्याच्या निर्णयाला सूचित करते.
  • देवाच्या न्यायनिवाड्यात सामान्यतः लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देणे याचा समावेश असतो.
  • "न्याय" या शब्दाचा अर्थ "दोष लावणे" असाही होतो. या पद्धतीने कोणावरही दोष लावू नका असे देवाने लोकांना सूचित केले.
  • "दोघांमध्ये मध्यस्थी करणे" किंवा "दोघांमध्ये निवाडा करणे" या वाक्यांशाचा दुसरा अर्थ, दोघांमधील वादामध्ये कोण बरोबर आहे ह्याचा निर्णय देणे, असा होतो.
  • काही संदर्भात, देवाचे “न्याय” हे त्याने जे ठरविले आहे ते योग्य आणि न्याय्य आहे असे आहेत. ते त्याच्या आज्ञा, कायदे किंवा नियम यासारखे आहेत.
  • "न्याय" हा शब्द, सुज्ञपणे निर्णय घेण्याच्या क्षमतेला संदर्भित करतो. ज्या व्यक्तीच्या "निवाड्यामध्ये" कमतरता आहे, त्याच्याकडे सुज्ञपणे निर्णय घेण्यासाठी ज्ञान नाही.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर "न्याय" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "निर्णय घेणे" किंवा "दोषी ठरवणे" किंवा "शिक्षा देणे" किंवा "हुकुम देणे" यांचा समावेश होतो.
  • "न्याय" या शब्दाचे भाषांतर "शिक्षा देणे" किंवा "निर्णय देणे" किंवा "अधिकृत निर्णय" किंवा "हुकुम देणे" किंवा "दोषी ठरवणे" असे केले जाते.
  • काही संदर्भामध्ये, "न्यायामद्ये" या वाक्यांशाचे भाषांतर "न्यायाच्या दिवशी" किंवा "जेंव्हा देव लोकांचा न्याय करेल त्या वेळी" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: हुकुम देणे, न्यायाधीश, न्यायाचा दिवस, न्याय्य, कायदा, नियम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 19:16 संदेष्टयांनी लोकांना इशारा दिला की जर त्यांनी आपला वाईट मार्ग सोडून देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर देव त्यांना दोषी ठरविल आणि त्यांना शिक्षा करील.
  • 21:08 राजा म्हणजे जो लोकांवर राज्य करतो व त्यांचा न्याय करतो. आपला पूर्वज दाविद याच्या सिंहासनावर बसणारा मसिहा हा एक परिपूर्ण राजा असेल. तो संपूर्ण जगावर सर्वकाळ राज्य करील, आणि प्रामाणिकपणे न्याय करील व योग्य निर्णय घेईल.
  • 39:04 तेंव्हा महायाजकाने रागाने आपली वस्त्रे फाडिली व अन्य धार्मीक पुढा-यांसमोर मोठयाने म्हणाला, ‘‘आता आम्हास आणखी पुराव्याची गरज नाही! तो देवाचा पुत्र आहे असे त्याने म्हटले हे तुम्ही स्वत: ऐकले आहे. तुमचा निवाडा काय आहे?’’
  • 50:14 परंतु येशूवर विश्वास न ठेवणाऱ्या प्रत्येकाचा देव न्याय करील. तो त्यांना नरकात टाकील, ज्या ठिकाणी ते सर्वकाळ रडतील व दुःखाने दात खातील.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0148, एच0430, एच1777, एच1778, एच1779, एच1780, एच1781, एच1782, एच2940, एच4055, एच4941, एच6414, एच6415, एच6416, एच6417, एच6419, एच6485, एच8196, एच8199, एच8201, जी01440, जी03500, जी09680, जी11060, जी12520, जी13410, जी13450, जी13480, जी13490, जी29170, जी29190, जी29200, जी29220, जी29230, जी42320

न्याय्य, न्याय, अन्यायी, अन्याय, न्यायी ठरवणे, न्याय्यपणा

व्याख्या:

“न्याय्य” आणि “न्याय” म्हणजे देवाच्या नियमांनुसार लोकांना योग्य वागणूक देणे. मानवाचे नियम जे इतरांबद्दल देवाचे योग्य वर्तन प्रतिबिंबित करतात ते देखील न्याय्य आहेत.

  • “न्यायी” असणे म्हणजे दुसर्‍यांशी चांगल्या आणि योग्य मार्गाने वागणे. देवाच्या नजरेत नैतिकदृष्ट्या योग्य ते करण्यास प्रामाणिकपणा आणि सात्विकता याला देखील सूचित करते.
  • “न्यायीपणाने” वागणे म्हणजे लोकांना देवाच्या नियमांनुसार जे बरोबर, चांगले, आणि योग्य आहे त्यानुसार वागणे.
  • “न्याय” मिळविणे म्हणजे कायद्यांतर्गत योग्य वागणूक मिळणे, एकतर कायद्याद्वारे संरक्षित होणे किंवा कायदा मोडल्याबद्दल शिक्षा भोगणे.
  • कधीकधी “न्याय्य” या शब्दाचा अर्थ “नीतिमान” किंवा “देवाचे नियम पाळणे” असा होतो.

“अन्यायकारक” आणि “अन्यायकारकपणे” या संज्ञा लोकांना अयोग्य आणि बर्‍याचदा हानिकारक वागणूक देणे याला संदर्भित करते.

  • “अन्याय” म्हणजे एखादा व्यक्ती पात्र नसताही त्याच्याशी काहीतरी वाईट करणे हे लोकांशी केलेली अन्यायकारक वागणूक दर्शविते.
  • अन्याय म्हणजे काही लोकांना वाईट तर काही जनांना चांगली वागणूक देणे.
  • जो अन्यायकारक रीतीने वागत आहे तो “पक्षपाती” किंवा “पूर्वग्रहद” आहे कारण तो लोकांना समान वागणूक देत नाही.

“न्याय्य” आणि “न्याय्यपणा” या संज्ञा एखाद्या दोषी व्यक्तीला नीतिमान ठरविण्याला संदर्भित करतात. फक्त देवच लोकांना खऱ्यारीतीने नीतिमान ठरवू शकतो.

  • जेव्हा देव लोकांना नीतिमान ठरवितो तेव्हा देव त्यांच्या पापांची क्षमा करतो आणि असे करतो की त्यांच्यात कोणतेही पाप नाही. आपल्या पापांपासून आपल्या वाचवण्यासाठी पश्चात्ताप करणाऱ्या आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्या पापींना तो नीतिमान ठरवितो.
  • “न्याय्य” म्हणजे एखाद्याच्या पापांची क्षमा करतो आणि त्या व्यक्तीला त्याच्या दृष्टीने नीतिमान ठरवितो तेव्हा देव काय करतो हे सूचित करते.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, “न्याय्य” अनुवादित करण्याच्या इतर पध्दतीमध्ये “नैतिकदृष्ट्या बरोबर” किंवा “योग्य” याचा समावेश होऊ शकते.
  • “न्याय” या शब्दाचे भाषांतर “योग्य वागणूक” किंवा “पात्र परिणाम” असे केले जाऊ शकते.
  • “न्यायीपणाने वागणे” हे “योग्यतेने वागवणे” किंवा “न्यायाने वागणे” असे भाषांतर केले जाऊ शकते.
  • काही संदर्भांमध्ये, “न्याय्य” या शब्दाचे भाषांतर “नीतिमान” किंवा “सरळ” असे केले जाऊ शकते.
  • संदर्भानुसार, “अन्यायकारक” या शब्दाचे भाषांतर “अयोग्य” किंवा “पक्षपाती” किंवा “अनीतीमान” असेही केले जाऊ शकते.
  • “अन्यायी” या शब्दाचे भाषांतर “अन्याय करणारा” किंवा “अन्याय करणारे लोक” किंवा “इतरांशी अयोग्यरीतीने वागणारे लोक” किंवा “अनीतीमान लोक” किंवा “देवाची आज्ञा मोडणारे लोक” असे केले जाऊ शकते.
  • “अन्यायकारक” या शब्दाचे भाषांतर “अयोग्यरीतीने” किंवा “चुकीने” किंवा “अयोग्यतेने” असे केले जाऊ शकते.
  • “अन्याय” अनुवादित करण्याच्या मार्गांमध्ये “चुकीची वागणूक” किंवा “अयोग्य वागणूक” किंवा “अयोग्यतेने वागणे” यांचा समावेश असू शकतो. (पाहा: भाववाचक नाम)
  • “न्यायी ठरविणे” भाषांतरित करण्याच्या इतर पध्दतीमध्ये “(एखाद्याला) नीतिमान घोषित करणे” किंवा “(एखाद्याला) नीतिमान ठरविणे” याचा समावेश असू शकतो.
  • “न्याय्यपणा” या शब्दाचे भाषांतर “नीतिमान ठरविणे” किंवा “नीतिमान होणे” किंवा “लोकांना धार्मिक बनविणे” असे केले जाऊ शकते.
  • “नीतिमान ठरणे” या शब्दाचे भाषांतर “देवाने पुष्कळ लोकांना नीतिमान ठरविले” किंवा “ज्यामुळे देवाने लोकांना नीतिमान ठरविले.” असे भाषांतर केले जाऊ शकते.
  • “आपल्या नीतिमत्तेसाठी” या वाक्यांशाचे भाषांतर “जेणेकरून आम्हाला देवान नीतिमान ठरवावे” असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: क्षमा करणे, दोष, न्यायाधीश, नीतिमान, धार्मिक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 17:9 दावीदाने बरेच वर्ष न्यायाने आणि विश्वासूपणाने राज्य केले आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला.
  • 18:13 यातील काही राजे (यहुदामधील) चांगले लोक होते ज्यांनी न्यायाने शासन केले आणि देवाची उपासना केली.
  • 19:16 त्या (संदेष्टे) सर्वांनी लोकांना सांगितले की त्यांनी मूर्तींची पूजा करणे थांबवावे आणि इतरांना न्याय आणि दया दाखवावी.
  • 50:17 येशू शांतीने आणि न्यायाने आपल्या राज्यात शासन करील आणि तो आपल्या लोकांबरोबर सर्वदा राहील.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0205, H2555, H3477, H4941, H5765, H5766, H5767, H6662, H6663, H6664, H6666, H8003, H8264, H8636, G00910, G00930, G00940, G13420, G13440, G13450, G13460, G13470, G17380

परम उच्च

तथ्य:

"परम उच्च" हा शब्द देवासाठी एक शीर्षक आहे. ह्याचा संदर्भ त्याच्या महत्तेशी किंवा अधिकाराशी येतो.

  • या शब्दाचा अर्थ "सार्वभौम" किंवा "सर्वोच्च" च्या अर्थासारखा आहे.
  • या शीर्षकातील "उच्च" हा शब्द भौतिक उंची किंवा अंतराचा संदर्भ देत नाही. हे महानतेचा संदर्भ देते.

भाषांतर सूचना:

  • या संज्ञेचे भाषांतर “सर्वात उच्च देव” किंवा “सर्वात सर्वोच्च प्राणी” किंवा “परमेश्वर” किंवा “सर्वात श्रेष्ठ” किंवा “सर्वोच्च एक” किंवा “देव, जो सर्वांपेक्षा महान आहे” असे देखील केले जाऊ शकते.
  • जर “उंच” सारखा शब्द वापरला असेल, तर तो शारीरिकदृष्ट्या उंच किंवा उंच असण्याचा संदर्भ देत नाही याची खात्री करा.

(हे देखील पाहा: देव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • Strong's: एच5945, जी53100

परराष्ट्रीय

तथ्य

“परराष्ट्रीय” ही संज्ञा यहुदी नसलेल्या प्रत्येकाला संदर्भित करते. परदेशी लोक ते लोक आहेत जे याकोबाचे वंशज नाहीत.

पवित्र शास्त्रात, “सुंता न झालेला” हा शब्द यहूदीतरांना संदर्भित करण्यासाठी लाक्षणिकरित्या देखील वापरला गेला आहे, कारण बहुतेक जणांनी इस्राएली लोक करतात तशी आपल्या मुलांची सुंता केली नाही .

  • कारण देवाने यहूदी लोकांना आपले खास लोक म्हणून निवडले, म्हणून त्यांनी परराष्ट्रीयांचा बाहेरील म्हणून विचार केला जे देवाचे लोक कधीच असू शकत नाही.
  • यहुद्यांना इतिहासाच्या वेगवेगळ्या वेळी “इस्त्रायली” किंवा “इब्री” देखील म्हटले जायचे. ते इतर कोणासही “विदेशी” म्हणून संबोधत.
  • परराष्ट्रीयांना “यहुदी नाही” किंवा “यहुदी नसलेले” किंवा “एकही इस्राएली नसलेले” (जुना करार) किंवा “गैर-यहुदी” असे देखिल भाषांतरीत केले जावू शकते.
  • पारंपारिकपणे, यहुदी लोक परदेशी लोकांबरोबर जेवत नसे किंवा त्यांच्याबरोबर सहभागी होत नसे, ज्यामुळे पहिल्यांदा चर्चच्या सुरुवातीच्या काळात समस्या निर्माण झाल्या.

(हे देखील पाहा: [इस्त्राएल], [याकोब], [यहुदी])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच1471, जी14820, जी14840, जी16720

परीक्षा घेणे, मोह

व्याख्या:

एखाद्याला परीक्षेत पाडणे म्हणजे त्या व्यक्तीला काहीतरी चुकीचे करण्यास प्रवृत्त करणे होय.

  • एक मोह म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी चुकीचे करण्याची इच्छा असणे.
  • लोक त्यांच्या स्वत:च्या पापमय स्वभावामुळे आणि इतर लोकांच्याद्वारे मोहात पडले जातात.
  • सैतान लोकांना देवाची आज्ञा मोडण्यास आणि चुकीच्या गोष्टी करून देवाविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त करतो.
  • सैतानाने येशूला मोहात पाडण्याचा आणि त्याला काहीतरी चुकीचे करण्याचा प्रयत्न केला, परंतु येशूने सैतानाच्या सर्व मोहाचा प्रतिकार केला आणि कधीही पाप केले नाही.
  • जो कोणी “देवाला मोहात पाडत आहे” तो त्याने काहीतरी चुकीचे करावे असा प्रयत्न करीत नाही, उलट, त्याच्या हट्टी अवज्ञेच या पातळीवर जातो की देवाने त्याला शिक्षा करून प्रतिसाद दिला पाहिजे. याला “देवाची परीक्षा” असेही म्हणतात.

भाषांतर सूचना:

  • "भुरळ पाडणे" या शब्दाचे भाषांतर "पाप करण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडणे" किंवा "मोहात पाडणे" किंवा "पाप करण्याची इच्छा निर्माण करण्यास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
  • "मोह" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "मोहक गोष्टी" किंवा "एखाद्याला पाप करण्यासाठी मोहात पडणाऱ्या गोष्टी" किंवा "अशा गोष्टी ज्यामुळे काहीतरी चुकीचे करण्याची इच्छा निर्माण होते" असे केले जाऊ शकते.
  • "देवाची परीक्षा घेणे" ह्याचे भाषांतर "देवाची परीक्षा बघणे" किंवा "देवाला पारखणे" किंवा "देवाची सहनशीलता बघणे" किंवा "देवाने शिक्षा द्यावी म्हणून कारणीभूत होणे" किंवा "हट्टीपणाने देवाची आज्ञा मोडत राहणे" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: अवज्ञा, सैतान, पाप, परीक्षा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 25:01 तेव्हा सैतान येशूकडे आला आणि पाप करावे म्हणून त्याची परीक्षा पाहिली.
  • 25:08 अशा प्रकारे येशू सैतानाच्या मोहाला बळी पडला नाही, म्हणून सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला.
  • 38:11 शिष्यांनी परिक्षेत पडू नये म्हणून येशूने त्यांना प्रार्थना करावयास सांगितले.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H974, H4531, H5254, G551, G1598, G3985, G3986, G3987

परीक्षा, पारख, परीक्षा घेणे, अग्नित परिक्षा घेणे

व्याख्या:

"परीक्षा" या शब्दाचा संदर्भ कठीण किंवा दुःखदायक अनुभवाशी आहे, जो एखाद्या व्यक्तीची ताकद किंवा दुर्बलता प्रकट करतो.

  • देव लोकांची परीक्षा घेतो, पण तो त्यांना पाप करण्यासाठी भुरळ पाडत नाही. सैतान, तथापि, पाप करण्यासाठी लोकांना भुरळ पाडतो.
  • देव लोकांचे पाप उघड करण्यासाठी काहीवेळा परीक्षेचा उपयोग करतो. एक परीक्षा एखाद्या व्यक्तीला पापापासून वळण्यासाठी आणि देवाच्या जवळ जाण्यासाठी मदत करते.
  • सोने आणि इतर धातूंची, ते किती शुद्ध आणि मजबूत आहेत हे शोधण्यासाठी आग्निमध्ये परीक्षा घेतली जाते. कसा देव त्याच्या लोकांना पारखण्यासाठी दुःखदायक परिस्थितींचा उपयोग करतो, ह्याचे हे चित्र आहे.
  • "परीक्षा ठेवणे" ह्याचा अर्थ "काहीतरी किंवा कोणालातरी त्याची किंमत सिद्ध करण्यासाठी आव्हान करणे" असा होतो.
  • देवाची परीक्षा घेणे ह्याच्या संदर्भात, ह्याचा अर्थ त्याच्या दयेचा फायदा घेऊन, आपल्यासाठी त्याला एक चमत्कार घडवून आणण्याचा प्रयत्न करणे असा होतो.
  • येशूने सैतानाला सांगितले की देवाची परीक्षा घेणे चुकीचे आहे. तो सर्वसमर्थ, पवित्र देव आहे, जो सर्वांच्या वर आहे.

भाषांतर सूचना:

  • "परीक्षा घेणे" या शब्दाचे भाषांतर "आव्हान देणे" किंवा "अडचणींचा अनुभव करावयास लावणे" किंवा "सिद्ध करणे" असे देखील केले जाऊ शकते.
  • "परीक्षा" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "आव्हान" किंवा "अडचणींचा अनुभव" ह्यांचा समावेश होतो.
  • "परीक्षे होणे" ह्याचे भाषांतर "चाचणी" किंवा "आव्हान तयार करणे" किंवा "स्वतःला सिद्ध करण्याची सक्ती करणे" असे केले जाऊ शकते.
  • देवाची परीक्षा घेण्याच्या संदर्भात, ह्याचे भाषांतर "देवाला त्याचे प्रेम सिद्ध करण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न करणे" असे केले जाऊ शकते.
  • काही संदर्भामध्ये, जेव्हा देवा विषय नसतो, तेव्हा "परीक्षा" ह्याचा अर्थ "भुरळ पाडणे" असा होतो.

(हे देखील पाहा: भुरळ पाडणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H5254, H5713, H5715, H5749, H6030, H8584, G12420, G12630, G13030, G13820, G19570, G31400, G31410, G31420, G31430, G39840, G43030, G44510, G48280, G60200

परुशी

तथ्य:

परुशी हे येशूच्या काळातील यहुदी धार्मिक नेत्यांचा एक महत्त्वाचा, शक्तिशाली गट होता.

  • त्यांच्यापैकी बरेच मध्यमवर्गीय व्यापारी होते तर काही पुजारीही होते.
  • सर्व ज्यू नेत्यांपैकी परुशी हे मोशेचे नियम आणि इतर यहुदी कायदे आणि परंपरांचे पालन करण्यात सर्वात कठोर होते.
  • ते यहुदी लोकांना त्यांच्या सभोवतालच्या विदेशी लोकांच्या प्रभावापासून अलिप्त ठेवण्याबद्दल खूप चिंतित होते. "पराशी" हे नाव "वेगळे" या शब्दावरून आले आहे.
  • परुशांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास होता; त्यांचा देवदूत आणि इतर आध्यात्मिक प्राण्यांच्या अस्तित्वावरही विश्वास होता.
  • परुशी आणि सदूकी यांनी येशू आणि सुरुवातीच्या ख्रिश्चनांचा सक्रियपणे विरोध केला.

(हे देखील पाहा: परिषद(मंडळी), यहुदी पुढारी, नियमशास्त्र, सदुकी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी53300

पवित्र

व्याख्या:

"पवित्र" हा शब्द पवित्र शास्त्रामधील एक शीर्षक आहे, आणि तो नेहमी देवला सूचित करतो.

  • जुन्या करारामध्ये, हे शीर्षक "इस्राएलाचा पवित्र प्रभु" या वाक्यांशामध्ये बऱ्याचदा आढळते.
  • नवीन करारामध्ये, येशूला सुद्धा "जो पवित्र आहे" असे संदर्भित केले आहे.
  • "पवित्र" हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये काहीवेळा देवदुतांच्या संदर्भात वापरला आहे.

भाषांतर सूचना:

  • शब्दशः शब्द "पवित्र" असा आहे, ("एक" हा शब्द निगडीत आहे). अनेक भाषा (इंग्रजीसारख्या) ह्याचे भाषांतर निगडीत नामाने (जसे की, "एक" किंवा "देव") असे करतात.
  • या शब्दाचे भाषांतर, "देव, जो पवित्र आहे" किंवा "एक ज्याला वेगळे केले आहे" असे केले जाऊ शकते.
  • "इस्राएलाचा पवित्र प्रभु" या वाक्यांशाचे भाषांतर, "पवित्र प्रभु, ज्याची इस्राएल उपासना करतो" किंवा "पवित्र परभू जो इस्राएलावर राज्य करतो" असे केले जाऊ शकते.
  • "पवित्र" या शब्दाचे भाषांतर ज्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाते, त्याच समान शब्दाने या शब्दाचे भाषांतर करणे सर्वोत्तम राहील.

(हे देखील पाहा: पवित्र, देव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H2623, H376, H6918, G40, G3741

पवित्र आत्मा, देवाचा आत्मा, परमेश्वराचा आत्मा, आत्मा

तथ्य

या संज्ञा सर्व पवित्र आत्म्याला संदर्भित आहेत, जो देव आहे. एकच खरा देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा म्हणून सार्वकालीकतेने अस्तित्वात आहे.

  • पवित्र आत्म्याला “आत्मा” आणि “परमेश्वराचा आत्मा” आणि “सत्याचा आत्मा” असेही म्हटले जाते.
  • कारण पवित्र आत्मा देव आहे, तो पूर्णपणे पवित्र आहे, अपरिमितपणे शुद्ध आहे, आणि त्याच्या सर्व स्वभावात आणि तो जे काही करतो त्यामध्ये नैतिकदृष्ट्या परिपूर्ण आहे.
  • पिता आणि पुत्रासमवेत, पवित्र आत्मा जगाच्या निर्मितीमध्ये सक्रिय होता.
  • जेव्हा देवाचा पुत्र येशू स्वर्गात परत गेला तेव्हा देवाने आपल्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना शिकविण्यास, दिलासा देण्यास आणि देवाच्या इच्छेनुसार करण्यास सक्षम होण्यासाठी पवित्र आत्मा पाठविला.
  • पवित्र आत्म्याने येशूला मार्गदर्शन केले आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना तो मार्गदर्शन करतो.

भाषांतरातील सूचना:

  • ही संज्ञा “पवित्र” आणि “आत्मा” असे भाषांतर करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या शब्दासह भाषांतरीत करता येईल.
  • हा शब्द भाषांतरित करण्याच्या पध्दतीमध्ये “शुद्ध आत्मा” किंवा “आत्मा जो पवित्र आहे” किंवा “देव जो आत्मा” यांचा समावेश असू शकतो.

(हे देखील पाहा: पवित्र, आत्मा, देव, परमेश्वर, देव जो पिता, देवाचा पुत्र, भेट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 1:1 पण देवाचा आत्मा पाण्यावर होता.
  • 24:8 बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यातून बाहेर आला तेव्हा, __देवाचा आत्मा__कबुतराच्या रुपात प्रकट झाला आणि खाली आला व त्याच्यावर स्थिर झाला.
  • 26:1 सैतानाच्या मोहांवर विजय मिळवल्यानंतर, येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो राहत असलेल्या गालील प्रदेशात परतला.
  • 26:3 येशू वाचतो, “देवाने मला त्याचा आत्मा दिला आहे” जेणेकरून मी गोरगरीबांना सुवार्ता घोषित करावी, बंदिवानांना मुक्त करावे, आंधळ्यांना दृष्टी द्यावी आणि दडपलेल्यांना सोडवावे.”
  • 42:10 "म्हणून जा, सर्व लोकांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देऊन शिष्य करा आणि मी तुला जे आज्ञापिले आहे ते सर्व पाळायला शिकवा."
  • 43:3 ते सर्व पवित्र आत्म्याने भरले आणि ते अन्य भाषांमध्ये बोलू लागले.
  • 43:8 “आणि येशूने वचन दिल्याप्रमाणे त्याने पवित्र आत्मा”पाठविला आहे. आपण आता ज्या गोष्टी पाहात आणि ऐकत आहात त्या सर्वांनाच “पवित्र आत्मा” कारणीभूत आहे. ”
  • 43:11 पेत्राने उत्तर दिले, “तुमच्यातील प्रत्येकाने पश्चात्ताप केला पाहिजे व येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतला पाहीजे, यासाठी की देव तुमच्या पापांची क्षमा करील. मग तो तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान देईल.”
  • 45:1 त्याची (स्तेफन) चांगली प्रतिष्ठा होती आणि तो पवित्र आत्मा आणि शहाणपणाने परिपूर्ण होता.

शब्द संख्या:

  • स्ट्रोंग: H3068, H6944, H7307, G00400, G41510

पवित्र आत्म्याने पूर्ण होणे

व्याख्या:

जेव्हा एखाद्या मनुष्याचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते तेव्हा "पवित्र आत्म्याने पूर्ण होणे" ही संज्ञा एक लाक्षणिक अभिव्यक्ती असते, ह्याचा अर्थ पवित्र आत्मा त्या मनुष्याला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे सशक्तीकरण करतो.

  • "पूर्ण होणे" ही एक अभिव्यक्ती आहे जिचा सहसा अर्थ "च्या द्वारे नियंत्रित" असा होतो.
  • जेंव्हा लोक पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शखाली चालतात आणि आपल्यासाठी देवाला पाहिजे ते करण्यास त्याच्यावर विसंबून राहतात, तेंव्हा ते "पवित्र आत्म्याने भरले जातात."

भाषांतर सूचना

  • या संज्ञेचे भाषांतर "पवित्र आत्म्याद्वारा सशक्तीकरण" किंवा "पवित्र आत्म्याद्वारा नियंत्रित होणे" असे केले जाऊ शकते. पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीला काहीतरी करण्यास भाग पाडत आहे, ह्याचा असा भास होता कामा नये.
  • "तो पवित्र आत्म्याने भरला" या वाक्याचे भाषांतर "तो पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगत होता" किंवा "त्याला पूर्णपणे पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळत होते" किंवा "पवित्र आत्मा पूर्णपणे त्याचे मार्गदर्शन करत होता" असे केले जाऊ शकते.
  • ही संज्ञेचा अर्थ "पवित्र अत्म्याद्वारे जगणे" या अभिव्यक्तीच्या अर्थासमान आहे, पण "पवित्र आत्म्याने भरलेला" हा पुर्णत्वावर भर देतो, जिथे एखादा व्यक्ती पवित्र आत्म्याला त्याच्यावर नियंत्रण करण्याची किंवा त्याच्या जीवनावर प्रभाव टाकण्याची परवानगी देतो. शक्य असल्यास, या दोन अभिव्यक्तींचे वेगळे भाषांतर करणे आवश्यक आहे.

(हे देखील पाहाः पवित्र आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी00400, जी41300, जी41370, जी41510

पवित्र करणे, पवित्रीकरण

व्याख्या:

पवित्र करणे म्हणजे बाजूला करणे किंवा पवित्र बनविणे. पवित्रीकरण ही पवित्र बनण्याची प्रक्रिया आहे.

  • जुन्या करारात, काही लोक आणि गोष्टी देवाच्या सेवेसाठी पवित्र केल्या गेल्या किंवा वेगळ्या केल्या गेल्या.
  • नवीन करार शिकवतो की देव येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना पवित्र करतो. म्हणजेच, तो त्यांना पवित्र करतो आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना वेगळे करतो.
  • येशूवर विश्वास ठेवणार्‍यांना देखील स्वतःला देवासाठी पवित्र करण्याची, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत पवित्र राहण्याची आज्ञा देण्यात आली आहे.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "पवित्र करणे" या शब्दाचे भाषांतर "बाजूला करणे" किंवा "पवित्र बनवणे" किंवा "शुद्ध करणे" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा लोक स्वतःला पवित्र करतात, तेंव्हा ते स्वतःला शुद्ध करतात, आणि देवाच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतात. बऱ्याचदा "समर्पित करणे" या शब्दाचा उपयोग या अर्थासाठी पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.
  • जेव्हा ह्याचा अर्थ "समर्पित करणे" असा होतो, तेव्हा या शब्दाचे भाषांतर, "देवाच्या सेवेसाठी एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला समर्पित करणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "तुमचे पवित्रीकरण" ह्याचे भाषांतर "तुम्हाला पवित्र बनविणे" किंवा "(देवासाठी) बाजूला करणे" किंवा "जे तुम्हाला पवित्र बनवणे" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: समर्पित करणे, पवित्र, बाजूला करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच6942, जी00370, जी00380

पवित्र, पवित्रता, अपवित्र, वेगळे केलेले

व्याख्या:

“पवित्र” आणि “पवित्रता” हे शब्द देवाच्या स्वभावाला संदर्भित करतात जो पाप आणि अपरिपूर्ण असलेल्या सर्व गोष्टीपासून पूर्णपणे वेगळा आहे.

  • फक्त देवच पूर्णपणे पवित्र आहे. तो लोक आणि वस्तू यांना पवित्र करतो.
  • जो व्यक्ती पवित्र आहे तो देवाचा आहे आणि त्याची सेवा करण्यासाठी आणि त्याचे गौरव व्हावे या उद्देशाने तो वेगळा झाला आहे.
  • देवाने पवित्र घोषित केलेली वस्तु अशी आहे जी त्याने त्याचे गौरव व उपयोग यासाठी वेगळी केली आहे, जसे की वेदी त्याला अर्पण करण्याच्या उद्देशाने आहे.
  • त्याने परवानगी दिल्याशिवाय लोक त्याच्याकडे येऊ शकत नाही, कारण तो पवित्र आहे आणि ते केवळ मानव, पापी आणि अपूर्ण आहेत. जुन्या करारात, देव त्याच्या खास सेवेसाठी याजकांना वेगळे करतो. देवाकडे जाण्यासाठी त्यांना पापापासून विधीवत शुद्ध करावे लागले.
  • देव निश्चित ठिकाणे पवित्र म्हणून वेगळी करतो

शब्दशः, "अपवित्र" या शब्दाचा अर्थ "पवित्र नाही" असा आहे. हे एखाद्याचे किंवा एखाद्या गोष्टीचे वर्णन करते जे देवाचा आदर करीत नाही.

  • हा शब्द एखाद्याच्या विरोधात बंडखोरी करुन देवाचा अनादर करणाऱ्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
  • ज्या गोष्टीला “अपवित्र” म्हटले जाते त्याचे वर्णन सामान्यत: भ्रष्ट किंवा अशुद्ध असे केले जाऊ शकते. हे देवाचे नाही.

“वेगळे केलेले” या शब्दामध्ये अश्या काही गोष्टींचे वर्णन केले आहे जे देवाची उपासना करण्याशी किंवा खोट्या देवतांच्या मूर्तिपूजक उपासनेशी संबंधित आहे.

  • जुन्या करारामध्ये खोट्या देवतांच्या पूजेसाठी वापरल्या जाणार्‍या दगडी खांब आणि इतर वस्तूंचे वर्णन करण्यासाठी “वेगळे केलेले” हा शब्द बहुधा वापरला जात असे. याचे भाषांतर “धार्मिक” असे देखील केले जाऊ शकते.
  • “पवित्र गाणे” आणि “पवित्र संगीत” हे संगीताला संदर्भित करते जे देवाच्या गौरवासाठी गायले गेले किंवा वाजवले गेले. हे "परमेश्वराची उपासना करणारे संगीत" किंवा "देवाची स्तुती करणारी गाणी" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
  • “वेगळे केलेले कर्तव्ये” या शब्दाचा अर्थ “धार्मिक कर्तव्ये” किंवा “धार्मिक विधी” असा होतो जे याजकांनी लोकांना देवाच्या उपासनेत नेण्यासाठी केले. यात मूर्तिपूजकाच्या खोट्या देवतांची उपासना करण्यासाठी केल्या जाणार्‍या विधींचा देखील संदर्भ असू शकतो

भाषांतर सूचना:

  • “पवित्र” भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये “देवासाठी वेगळे केलेले” किंवा “देवाचे” किंवा “पूर्णपणे शुद्ध” किंवा “पूर्णपणे निर्दोष” किंवा “पापापासून विभक्त” याचा समावेश असू शकतो.
  • “पवित्र बनविणे” हे बर्‍याचदा इंग्रजीमध्ये “पवित्र करणे” म्हणून भाषांतरित केले जाते. त्याचे भाषांतर “देवाच्या गौरवासाठी (एखाद्याला) वेगळे करणे” असे देखील केले जाऊ शकते.
  • “अपवित्र” भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये “पवित्र नाही” किंवा “देवाचे नाही” किंवा “देवाचा मान राखत नाही” किंवा “धार्मिक नाही” याचा समावेश असु शकतो.
  • काही संदर्भांमध्ये, “अपवित्र” या शब्दाचे भाषांतर “अशुद्ध” असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [पवित्आत्मा], [पवित्र], [पवित्र केलेले], [वेगळे करणे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 1:16 त्याने (देवाने) सातव्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि ते पवित्र केले, कारण या दिवशी त्याने आपल्या कामापासून विश्रांती घेतली.
  • 9:12तू पवित्र जागेवर उभा आहेस."
  • 13:1 "जर तुम्ही माझे ऐकले आणि माझा करार पाळला तर तुम्ही माझी विकत घेतलेली संपत्ती व्हाल, याजकांचे राज्य आणि एक पवित्र राष्ट्र.'
  • 13:5 “शब्बाथ दिवस नेहमीच पवित्रपाळण्याची खात्री करा.”
  • 22:5तर बाळ पवित्र, देवाचा पुत्र असेल.”
  • 50:2 आपण अशा मार्गाने जगावे जो__ पवित्र__ आहे आणि त्याचा सन्मान करणारा आहे. जशी आम्ही येशू परत येण्याची वाट पाहत आहोत, देवाची इच्छा आहे की

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच430, एच2455, एच2623, एच4676, एच4720, एच6918, एच6922, एच6942, एच6944, एच6948, जी37, जी38, जी39, जी40, जी41, जी42, जी462, जी1859, जी2150, जी2412, जी2413, जी2839, जी3741, जी3742

पवित्रजण

व्याख्या:

“संत" या शब्दाचा शाब्दिक अर्थ “पवित्रजन” असा होतो आणि तो येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना सूचित करतो.

  • नंतर मंडळीच्या इतिहासात, त्याच्या चांगल्या कामांसाठी ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीला “संत” ही पदवी देण्यात आली, परंतु नवीन कराराच्या काळात ही संज्ञा वापरली जात नव्हती.
  • येशूवर विश्वास ठेवणारे हे संत किंवा पवित्र आहेत, त्यांनी जे काही केले आहे त्यामुळे नाही, तर येशू ख्रिस्त तारणारा आहे म्हणुन त्यांच्या विश्वासाणे, तोच त्यांना पवित्र करतो.

भाषांतर सूचना:

  • “संत” या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये “पवित्र जन” किंवा “पवित्र लोक” किंवा “येशूवर विश्वासणारे” किंवा “वेगळे केलेले” यांचा समावेश असू शकतो.
  • फक्त एका ख्रिस्ती गटाच्या लोकांना संदर्भ देणारा शब्द वापरणार नाही याची काळजी घ्या.

(हे देखील पाहाः पवित्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच2623, एच6918, एच6922, जी00400

पवित्रस्थान

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "पवित्रस्थान" आणि "अति पवित्रस्थान" या शब्दांचा संदर्भ निवासमंडपाच्या किंवा मंदिराच्या इमारतींच्या दोन भागांशी आहे.

  • "पावित्रस्थान" ही पहिली खोली होती, ज्यात धूप जाळण्याची वेदी आणि एक मेज होते ज्यावर विशेष "उपस्थितीची भाकर" होती.
  • "अति पावित्रस्थान" ही दुसरी सर्वात आतील खोली होती, आणि त्यात कराराचा कोश होता.
  • एक जाड आणि जड पडदा बाहेरच्या खोलीला आतील खोलीपासून वेगळे करत होता.
  • महायाजक हा असा एकच व्यक्ती होता, ज्याला अतिपवित्र स्थानात जाण्याची परवानगी होती.
  • कधीकधी "पवित्र स्थान" हे मंदिर किंवा निवासमंडप ह्यांच्या, दोन्ही इमारती आणि अंगण क्षेत्रास सूचित करते. सर्वसाधारणपणे, ते देवासाठी वेगळ्या केलेल्या कोणत्याही जागेला संदर्भित करते.

भाषांतर सूचना

  • "पावित्रस्थान" या शब्दाचे भाषांतर "देवासाठी वेगळी केलेली खोली" किंवा "देवाला भेटण्याची विशेष खोली" किंवा "देवासाठी राखून ठेवलेली जागा" असे केले जाऊ शकते.
  • "अति पावित्रस्थान" या शब्दाचे भाषांतर "देवासाठी सर्वात वेगळी केलेली खोली" किंवा "देवाला भेटण्याची सर्वात विशिष्ठ खोली" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "एक पवित्रस्थान" या सामान्य अभिव्यक्तीचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "एक पवित्रस्थान" किंवा "देवाने वेगळी केलेली जागा" किंवा "मंदिराच्या परिसरातील जागा, जी पवित्र आहे" किंवा "देवाच्या पवित्र मंदिराचे आंगण" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: धूपवेदी, कराराचा कोश, भाकर, पवित्र करणे, आंगण, पडदा, पवित्र, वेगळे केलेला, निवासमंडप, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H1964, H4720, H4725, H5116, H6918, H6944, G39, G40, G3485, G5117


पवित्रस्थान

व्याख्या:

"पवित्रस्थान" या शब्दाचा शब्दशः अर्थ "पवित्र ठिकाण" असा होतो आणि त्याचा संदर्भ अशा ठिकाणाशी आहे, ज्याला देवाने पवित्र आणि निर्मळ केले आहे. हे अशा ठिकाणाला संदर्भित करते, जे संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करते.

  • जुन्या करारामध्ये, "पवित्रस्थान" या शब्दाचा वारंवार उपयोग निवासमंडपाच्या किंवा मंदिराच्या इमारतीच्या जिथे "पवित्र स्थान" आणि "अति पवित्र स्थान" स्थित आहेत ह्यांच्या संदर्भात केला गेला आहे.
  • देवाने पवित्रस्थानाचा संदर्भ अशा जागेला दिला आहे, जिथे तो त्याच्या लोकांच्यामध्ये, इस्राएलामध्ये राहतो.
  • तो स्वतःला देखील त्याच्या लोकांच्यासाठी "पवित्र स्थान" किंवा सुरक्षित जागा असे संबोधतो, जिथे त्यांना सुरक्षा प्राप्त होते.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचा मूळ अर्थ "पवित्र स्थान" किंवा "अशी जागा जी वेगळी केलेली आहे" असा होतो.
  • संदर्भावर आधारित, "पवित्रस्थान" या शब्दाचे भाषांतर "पवित्र जागा" किंवा "पवित्र इमारत" किंवा "देवाचे राहण्याचे पवित्र स्थान" किंवा "संरक्षणाचे पवित्र स्थान" किंवा "सुरक्षेचे पवित्र स्थान" असे केले जाऊ शकते.
  • "पवित्र स्थानातील शेकेलाचे चलन" या वाक्यांशाचे भाषांतर "निवासमंडपासाठी काही प्रकारचे शेकेल देण्यात आले" किंवा "मंदिराची काळजी घेण्याकरिता भरावयाच्या करामध्ये शेकेलाचा वापर केला जात होता" असे केले जाऊ शकते.
  • टीप: * या संज्ञेच्या भाषांतराचा संदर्भ आधुनिक युगातील मंडळींच्या उपासनेच्या खोलीशी येणार नाही ह्याची काळजी घ्या.

(हे सुद्धा पाहा: पवित्र, पवित्र आत्मा, पवित्र करणे, वेगळा करणे, निवासमंडप, कर, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H4720, H6944, G39


पश्चात्ताप करणे, पश्चात्ताप केला

व्याख्या:

"पश्चात्ताप" आणि "पश्चात्ताप" या शब्दांचा अर्थ पापापासून दूर जाणे आणि देवाकडे परत जाणे होय.

  • “पश्चात्ताप” करण्याचा शब्दशः अर्थ “मन बदलणे” असा होतो.
  • बायबलमध्ये, "पश्चात्ताप" चा अर्थ सामान्यतः पापी, मानवी विचार व कृतीपासून दूर जाणे आणि देवाच्या विचार व कृतीकडे वळणे असा होतो.
  • जेव्हा लोक त्यांच्या पापांबद्दल खरोखर पश्चात्ताप करतात, तेव्हा देव त्यांना क्षमा करतो आणि त्यांची आज्ञा पाळण्यास त्यांना मदत करतो.

भाषांतर सूचना

  • “पश्चात्ताप” या शब्दाचे भाषांतर एखाद्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते ज्याचा अर्थ “परत (देवाकडे) वळा” किंवा “पापापासून व देवाकडे वळा” किंवा “पापापासून दूर देवाकडे वळा.”
  • अनेकदा “पश्चात्ताप” या शब्दाचे भाषांतर “पश्चात्ताप” या क्रियापदाचा वापर करून केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, “देवाने इस्रायलला पश्चात्ताप केला आहे” याचे भाषांतर “देवाने इस्राएलला पश्चात्ताप करण्यास सक्षम केले आहे” असे केले जाऊ शकते.
  • “पश्चात्ताप” चे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये “पापापासून दूर जाणे” किंवा “देवाकडे वळणे आणि पापापासून दूर जाणे” यांचा समावेश असू शकतो.

(हे देखील पाहा: क्षमा करणे, पाप, वळणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 16:2 अनेक वर्षानंतर देवाचा आज्ञाभंग व शत्रूद्वारे जुलूम सोसून झाल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला व त्यांनी सुटकेसाठी देवाकडे धाव घेतली.
  • 17:13 दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चाताप केला आणि देवाने त्यास क्षमा केली.
  • 19:18 त्यांनी लोकांस सावधानतेचा इशारा दिला की जर त्यांनी पश्चाताप केला नाही तर देव त्यांचा नाश करील.
  • 24:2 योहानाचे भाषण ऐकण्यासाठी अनेक लोक जंगलामध्ये जाऊ लागले. * त्याने त्यांस प्रचार केला,‘पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे!’’
  • 42:8 "धर्मशास्त्रामध्ये हेही लिहिले होते की माझे शिष्य पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाची घोषणा करतील.
  • 44:5 यास्तव, आता पश्चाताप करा व देवाकडे वळा म्हणजे तुमची पापे धुतली जातील."

शब्द माहीती:

  • स्ट्रोगं: एच5150, एच5162, एच5164, जी278, जी3338, जी3340, जी33410

पाप, पापमय, पापी, पाप करणे

व्याख्या:

"पाप" या शब्दाचा अर्थ कृती, विचार आणि शब्द जे देवाच्या इच्छेविरूद्ध आणि नियमाच्या विरोधात आहेत. आपण जे करावे अशी देवाची इच्छा असून ते न करणे पाप यास देखील संदर्भित करते.

  • आपण देवाचे आज्ञा पालन करत नाही किंवा त्याला प्रसन्न करत नाही अश्या गोष्टींचा पापामध्ये समावेश आहे, अश्या गोष्टी ज्या इतर लोकांना माहितही नसतात.
  • देवाच्या इच्छेचे उल्लंघन करणारे विचार आणि कृती यांना "पापमय" असे म्हणतात
  • आदामाने पाप केल्यामुळे सर्व मानवांचा जन्म "पापमय स्वभावात" झाला, असा स्वभाव जो त्यांना नियंत्रण ठेवतो आणि त्यांना पाप करण्यास प्रवृत्त करतो
  • एक "पापी" असा व्यक्ती आहे जो पाप करतो, म्हणून प्रत्येक माणूस पापी आहे.
  • कधीकधी परुशीसारख्या धार्मिक लोकांनी "पापी" हा ज्या लोकांनी नियम पाळला नाही अशा लोकांचा संदर्भ घेण्यासाठी तसेच परुशांना वाटले त्यांनी पाळायला पाहिजे.
  • "पापी" हा शब्द इतर लोकांपेक्षा अत्यंत वाईट पापी मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी देखील वापरला गेला. उदाहरणार्थ, ही खुण कर वसूल करणारे आणि वेश्या यांना देण्यात आली होती.

भाषांतरातील सूचना:

  • "पाप" या शब्दाचे भाषांतर एखाद्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते ज्याचा अर्थ "देवाची आज्ञाभंग" किंवा "देवाच्या इच्छेविरूद्ध जाणे" किंवा "दुष्ट वर्तन आणि विचार" किंवा” चुकीचे कार्य" असा आहे
  • "पाप" या शब्दाचे भाषांतर "देवाची अवज्ञा करणे" किंवा “चुकीचे करणे" असे देखील केले जाऊ शकते
  • संदर्भानुसार "पापमय" या संज्ञेचे भाषांतर "चुकीच्या कार्याने भरलेले" किंवा "दुष्ट" किंवा "अनैतिक" किंवा "देवाविरुध्द बंडखोरी" असे केले जाऊ शकते
  • संदर्भानुसार "पापी" ही संज्ञा एखाद्या शब्द किंवा वाक्यांशाद्वारे भाषांतरीत केली जाऊ शकते ज्याचा अर्थ असा आहे, "जो व्यक्ती पाप करतो" किंवा "चुकीच्या गोष्टी करणारा व्यक्ती" किंवा "देवाची अवज्ञा करणारा व्यक्ती" किंवा "नियमाचे उल्लंघन करणारी व्यक्ती."
  • "पापी" या शब्दाचे भाषांतर शब्द किंवा वाक्यांशाद्वारे केले जाऊ शकते ज्याचा अर्थ आहे "खूप पापी लोक" किंवा "खूप पापी समजले जाणारे लोक" किंवा "अनैतिक लोक".
  • "कर गोळा करणारे आणि पापी" या वाक्यांशाला भाषांतरित करण्याच्या पध्दतीमध्ये "सरकारासाठी पैसे गोळा करणारे लोक आणि इतर अत्यंत पापी लोक" किंवा “ अत्यंत पापी लोक (अगदी) कर वसूल करणाऱ्या लोकांसह” या वाक्यांचा समावेश असू शकतो.
  • या संज्ञेच्या भाषांतरामध्ये पापी वर्तन आणि विचारांचा समावेश असू शकतो याची खात्री करा, जे इतर लोकांना दिसत नाहीत किंवा माहित नाहीत.
  • "पाप" हा शब्द सामान्य असावा, आणि "दुष्टपणा" आणि "वाईट" या संज्ञेपेक्षा भिन्न असावा.

(हे देखील पाहा: [अवज्ञा करणे], [वाईट], [शरीर], [कर वसूल करणारे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 3:15 देव म्हणाला, "मी वचन देतो की लोक वाईट गोष्टी केल्यामुळे मी पुन्हा कधीही पृथ्वीला शाप देणार नाही, किंवा प्रलयाने जगाचा नाश करणार नाही, तरी लोक लहान असल्यापासून पापमय_ आहेत "
  • 13:12 त्यांच्या पापामुळे_ देव त्यांच्यावर खूप रागावला होता आणि त्याने त्यांचा नाश करण्याचा विचार केला.
  • 20:1 इस्राएल आणि यहूदा या दोन्ही राज्यांनी देवाविरूद्ध __पाप ___केले. सीनाय पर्वतावर देवाने त्यांच्याबरोबर केलेला करार त्यांनी मोडला.
  • 21:13 संदेष्ट्यांनी असेही म्हटले आहे की मसीहा परिपूर्ण असेल, ज्यामध्ये पाप नाही. तो इतर लोकांच्या पापाची शिक्षा घेण्यासाठी त्याला मारण्यात येईल.
  • 35:1 एक दिवस येशू अनेक कर वसूल करणारे आणि इतर पापीलोक यांना शिकवत होता, जे त्याचे ऐकण्यासाठी जमले होते.
  • 38:5 मग येशू प्याला घेऊन म्हणाला, "हे प्या. हे माझे नवीन कराराचे रक्त आहे जे पापाच्या क्षमेसाठी सांडण्यात आले.
  • 43:11 पेत्राने त्यांना उत्तर दिले, "तुमच्या प्रत्येकाने पश्चात्ताप करावा आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा जेणेकरून देव तुमच्यापापांची क्षमा करील."
  • 48:8 आम्ही सर्व आपल्या पापामुळे मरण्यासाठी पात्र आहोत!
  • 49:17 तुम्ही ख्रिस्ती असूनही, पाप करावे म्हणून तुमची परीक्षा होईल. परंतु देव विश्वासू आहे आणि म्हणतो की जर तुम्ही आपले __पाप ___ कबुल कराल तर तो तुम्हाला क्षमा करेल. तो तुम्हालापापाविरुध्द लढाण्यास सामर्थ्य देईल.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0817, H0819, H2398, H2399, H2400, H2401, H2402, H2403, H2408, H2409, H5771, H6588, H7683, H7686, G02640, G02650, G02660, G02680, G03610, G37810, G39000, G42580

पाळक

व्याख्या:

"पाळक" ही संज्ञा शब्दशः "मेंढपाळ" या शब्दासारखीच आहे. ह्याचा उपयोग शीर्षक म्हणून केला जातो, जो विश्वासनाऱ्यांच्या समूहाचा आध्यात्मिक पुढारी असतो.

  • पवित्र शास्त्राच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये, "पाळक" हा शब्द इफिसकरांस पत्र या पुस्तकात फक्त एकदाच आढळतो. हा तोच शब्द आहे जो इतर ठिकाणी "मेंढपाळ" म्हणून भाषांतरित केलेला आहे.
  • काही भाषांमध्ये, "पाळक" हा शब्द "मेंढपाळ" या शब्दासाठी असलेल्या समान शब्दासारखाच आहे.
  • हा एक समान शब्द आहे जो येशूला "चांगला मेंढपाळ" म्हणून संबोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाप्रमाणे आहे.

भाषांतर सूचना:

  • प्रकल्प भाषेत "मेंढपाळ" या शब्दाद्वारे या शब्दाचे भाषांतर करणे सर्वोत्तम आहे.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतीमध्ये, "आत्मिक मेंढपाळ" किंवा "मेंढरांचे पालन करणारा ख्रिस्ती पुढारी" ह्यांचा समावेश होतो.

(हे देखील पाहा: मेंढपाळ, मेंढरू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच7462, जी4166

पुत्र

व्याख्या:

पुरुष आणि स्त्रीच्या पुरुष संततीला संपूर्ण आयुष्यासाठी त्यांचा "पुत्र" असे म्हणतात. त्याला देखिल त्या माणसाचा पुत्र आणि त्या बाईचा पुत्र असे म्हणतात. "दत्तक मुलगा" हा एक पुरुष आहे जो कायदेशीररित्या मुलगा होण्याच्या स्थितीत ठेवला गेला आहे

  • पवित्र शास्त्रात एखाद्या व्यक्तीचे वडील, आई किंवा मागील पिढीतील पूर्वज ओळखण्यासाठी "चा मुलगा" हा वाक्यांश वापरला जाऊ शकतो. हा वाक्यांश वंशावली आणि इतर बऱ्याच ठिकाणी वापरला जातो.
  • "इस्राएलाचे पुत्र" हे सहसा इस्राएली राष्ट्र (उत्पत्तीनंतर) आहे.
  • वडिलांचे नाव देण्यासाठी "चा मुलगा" वापरणे वारंवार समान नाव असलेल्या लोकांना ओळखण्यास मदत करते. उदाहरणार्थ, 1 राजे 4 मध्ये “सादोकाचा पुत्र अजऱ्या” आणि “नाथानाचा पुत्र अजऱ्या” आणि 2 राजे 15 मध्ये "अमस्याचा पुत्र अजऱ्या” हे तीन भिन्न पुरुष आहेत.
  • “पुत्र” हा शब्दप्रयोग त्या व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीशी किंवा संकल्पनेशी जोडण्यासाठी वापरला जाऊ शकतो. अर्थ नंतर मोठ्या प्रमाणात संदर्भाद्वारे निर्धारित केला जातो. हे सकारात्मक असू शकते (उदा. 2 राजे 2:16: "क्षमतेचे पुत्र"), नकारात्मक (उदा. 2 शमु 7:10: "दुष्टतेचे पुत्र"), समूहातील सदस्यत्व दर्शवितात, व्यक्तीचे नाव न घेता तिरस्कार व्यक्त करतात. (उदा. "तुम्ही सरुयाचे पुत्र"), इ.

भाषांतरातील सूचना:

  • या शब्दाच्या बहुतेक घटनांमध्ये, मुलाचा संदर्भ घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेत शाब्दिक संज्ञेद्वारे "पुत्र" या संज्ञेचे भाषांतर करणे उत्तम आहे.
  • "देवाचा पुत्र" या संज्ञेचे भाषांतर करताना, "पुत्र" या संज्ञेसाठी प्रकल्प भाषेचा सामान्य शब्द वापरला जावा.
  • कधीकधी "पुत्र"या संज्ञेचे भाषांतर "लेकरं" म्हणून केले जाऊ शकते, जेव्हा पुरुष आणि स्त्री या दोघांचा उल्लेख केला जातो. उदाहरणार्थ, "देवाचे पुत्र" या संज्ञेचे भाषांतर “देवाचे लेकरं” असे केले जाऊ शकते कारण या अभिव्यक्तीमध्ये मुली आणि स्त्रिया देखील समाविष्ट आहेत.

(हे देखील पाहा: वंश, पुर्वज, देवाचा पुत्र, देवाचे पुत्र)

बायबल संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 4:8 देव अब्रामाशी बोलला आणि पुन्हा अभिवचन दिले की त्याला पुत्र होईल आणि आकाशातील ताऱ्या इतकी त्याची संतती होईल.
  • 4:9 देव म्हणाला, "मी तुला तुझ्या स्वतःच्या शरीरातून एक पुत्र देईन."
  • 5:5 सुमारे एक वर्षानंतर, जेव्हा अब्राहम 100 वर्षांचा होता आणि सारा 90 वर्षांची होती तेव्हा साराने अब्राहामाच्या पुत्राला जन्म दिला.
  • 5:8 जेव्हा ते बलिदानाच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा अब्राहामाने त्याचा पुत्र इसहाक याला बांधले आणि त्याला वेदीवर ठेवले. तो आपल्या पुत्राचा वध करणारच होता, तेव्हा देव म्हणाला, “थांब.” मुलाला काही हानी करु नको! आता मला कळाले आहे की तू माझे भय धरतोस कारण तू आपला एकुलता एका पुत्राला माझ्यापासून राखून ठेवले नाही."
  • 9:7 जेव्हा तिने बाळाला पाहिले तेव्हा तिने तिला स्वतःचे पुत्र म्हणून त्याला घेतले.
  • 11:6 देवाने मिसराच्या प्रत्येकाच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राला मारले.
  • 18:1 बऱ्याच वर्षांनंतर, दाविद मरण पावला आणि त्याचा पुत्र शलमोन राज्य करू लागला.
  • 26:4 ते म्हणाले, "हा योसेफाचा पुत्र आहे काय?

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: 1060, H1121, H1123, H1248, H3173, H3206, H3211, H4497, H5209, H5220, G38160, G50430, G52070

पुनःस्थापन करणे,  पुनःस्थापना

व्याख्या:

"पुनर्स्थापना करणे" आणि "पुनर्स्थापना" या संज्ञा अर्थ एखाद्या गोष्टीला त्याच्या मूळ स्थानावर किंवा स्थितीकडे परत आणणे आहे.

  • जेंव्हा रोगग्रस्त झालेल्या एखाद्या अवयवाला पुनर्संचयित केला जातो, तेंव्हा त्याचा अर्थ तो भाग "बरा झाला" असा होतो.
  • एक तुटलेले नातेसंबंध, ज्याची पुनःस्थापना केली जाते, म्हणजे त्यांच्यात "समेट घडवून आणला जातो." देव पापमय लोकांची पुनःस्थापना करतो आणि त्यांना त्याच्याकडे परत आणतो.
  • जर लोकांना त्यांच्या मूळ देशात पुनर्स्थापित केले असेल तर, त्यांना त्या देशात "परत आणले" गेले किंवा "परत आले" आहे.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, "पुनःस्थापना करणे" या वाक्यांशाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "नवीकरण करणे" किंवा "परतफेड करणे" किंवा "परत करणे" किंवा "बरे करणे" किंवा "परत आणणे" ह्यांचा समावेश असू शकतो.
  • या संज्ञांसाठी इतर अभिव्यक्ती, "नवीन बनवणे" किंवा "नवीन असल्यासारखे पुन्हा बनवणे" या असू शकतात.
  • जेंव्हा मालमत्तेची "पुनःस्थापना केली" जाते, तेंव्हा तिला "दुरुस्त केले जाते" किंवा "बदलले जाते" किंवा "तीच्या मालकाला "परत दिले" जाते.
  • संदर्भाच्या आधारावर, "पुनःस्थापना करणे" याचे भाषांतर "नुतनीकरण" किंवा "आरोग्य" किंवा "समेट" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समुह:

  • स्ट्रोंग: एच7725, एच7999, एच8421, जी06000, जी26750

पुनरुत्थान

व्याख्या:

"पुनरुत्थान" या शब्दाचा संदर्भ, मेल्यानंतर पुन्हा जिवंत उठण्याच्या कार्याशी आहे.

  • एखाद्याला पुनरुत्थित करणे म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करणे. फक्त देवालाच ह्याचे सामर्थ्य आहे.
  • "पुनरुत्थान" हा शब्द सहसा येशूचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पुन्हा जिवंत उठण्याचा उल्लेख करतो.
  • जेंव्हा येशू म्हणतो "पुनरुत्थान व जीवन मीच आहे" ह्याचा अर्थ तोच पुनरुत्थानाचा स्त्रोत आहे, आणि आणि एक जो लोकांना पुन्हा जिवंत होण्यास कारणीभूत होतो.

भाषांतर सूचना

  • एखाद्या व्यक्तीचे "पुनरुत्थान" ह्याचे भाषांतर "पुन्हा जिवंत होणे" किंवा त्याने "मेल्यानंतर पुन्हा जिवंत होणे" असे केले जाऊ शकते.
  • या शब्दाचा शब्दशः अर्थ "पुन्हा उठणे" किंवा "पुन्हा उठण्याचे कार्य (मेल्यानंतर)" असे केले जाऊ शकते. हे त्या शब्दाचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग असू शकतात.

(हे देखील पाहा: जीवन, मृत्यू, उठणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 21:14 मशीहाचा मृत्यू आणि पुनरुत्थान द्वारे, देव पाप्यांना वाचवण्याची आणि नवीन करार सुरू करण्याची त्याची योजना पूर्ण करेल.
  • 37:5 येशूने उत्तर दिले, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल.”

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी386, जी1454, जी18150

पुन्हा जन्मलेला, देवापासून जन्मलेला, नवीन जन्म

व्याख्या:

“पुन्हा जन्म” या शब्दाचा उपयोग येशूने प्रथम एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिकरीत्या मृत असण्यापासून आध्यात्मिकरीत्या जिवंत असणे याचा देवासाठी अर्थ काय होतो याचे वर्णन करण्यासाठी केला. “देवापासून जन्मलेला” आणि “आत्म्यापासून जन्मलेला” ह्या संज्ञा देखिल एखाद्या व्यक्तीला नवीन आध्यात्मिक जीवन देण्यात आले आहे याला संदर्भित करतात.

  • सर्व मानव आध्यात्मिकरित्या मृत जन्माला येतात आणि जेव्हा ते येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतात तेव्हा त्यांना “नवीन जन्म” दिला जातो.
  • अध्यात्मिक नवीन जन्माच्या क्षणी, देवाचा पवित्र आत्मा नवीन विश्वासणाऱ्यात राहू लागतो आणि त्याला आपल्या जीवनात चांगले आध्यात्मिक फळ देण्यास सामर्थ्य देतो.
  • एखाद्या व्यक्तीचा पुन्हा जन्म होणे आणि आपले मूल होणे हे देवाचे कार्य आहे.

भाषांतर सूचना:

  • “पुन्हा जन्मलेला” असे भाषांतरित करण्याच्या इतर मार्गांमध्ये “नवीन जन्मलेले” किंवा “आध्यात्मिकरित्या जन्मलेला” यांचा समावेश असू शकतो.”
  • या संज्ञाचा शब्दशः अनुवाद करणे आणि जन्मलेला यासाठी वापरल्या जाणार्‍या भाषेत सामान्य शब्द वापरणे उत्तम आहे.
  • "नवीन जन्म" या संज्ञेचे भाषांतर "आध्यात्मिक जन्म" म्हणून केले जावू शकते.
  • “देवापासून जन्मलेला” या वाक्यांशाचे भाषांतर “देवापासून नवजात बाळासारखे नवीन जीवन प्राप्त झालेले” किंवा “देवाने नवीन जीवन दिले.” असे केले जाऊ शकते.
  • त्याच प्रकारे, “आत्म्याने जन्मलेला” हे भाषांतर “पवित्र आत्म्याद्वारे नवीन जीवन प्राप्त झालेला” किंवा “पवित्र आत्म्याद्वारे देवाचे मुल होण्यासाठी सामर्थ्यवान” किंवा “आत्म्याद्वारे नवजात बाळासारखे नवीन जीवन मिळालेला” असे भाषांतर केले जाऊ शकते. ”

(हे देखील पाहा: पवित्र आत्मा, वाचविणे)

पविशास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी03130, जी05090, जी10800, जी38240

पूर्ण होणे, पूर्ण झाले, शेवटास नेणे

व्याख्या:

"पूर्ण होणे" या शब्दाचा अर्थ, अपेक्षित असलेल्या गोष्टी शेवटास नेणे किंवा साध्य करणे असा होतो.

  • जेंव्हा एखादी भविष्यवाणी पूर्ण होते, ह्याचा अर्थ त्या भविष्यवाणीमध्ये जे भाकीत केले होते, तसे घडण्यास देव कारणीभूत झाला असा होतो.
  • जेंव्हा एखादा मनुष्य त्याचे वचन किंवा शपथ पूर्ण करतो, त्याचा अर्थ जे करण्याचे वचन त्याने दिले होते, ते त्याने केले, असा होतो.
  • एखादी जबाबदारी पूर्ण करणे म्हणजे जे कार्य नेमून दिले आहे किंवा गरजेचे आहे ते करणे.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "पूर्ण करणे" ह्याचे भाषांतर "साध्य करणे" किंवा "शेवटास नेणे" किंवा "घडण्यास कारणीभूत होणे" किंवा "आज्ञा पाळणे" किंवा "पुरे करणे" असे केले जाऊ शकते.
  • "पूर्ण झाले आहे" ह्याचे भाषांतर "खरे झाले आहे" किंवा "तसे घडले आहे" किंवा "घडले आहे" असे केले जाऊ शकते.
  • "तुमचे सेवाकार्य पूर्ण करा" या वाक्यांशामधील "पूर्ण करा" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "शेवटास न्या" किंवा "पुरे करा" किंवा "सराव करा" किंवा "इतर लोकांची सेवा करा कारण ह्यासाठी देवाने आपल्याला बोलावले आहे" ह्यांचा समावेश होतो.

(हे देखील पाहा: संदेष्टा, ख्रिस्त, सेवक, बोलवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 24:04 योहानाने संदेष्टयांच्या या वचनाची पूर्तता केली, ‘‘पाहा, मी आपला दूत तुझ्या पुढे पाठवित आहे, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’’
  • 40:03 येशूचे वस्त्र वाटून घेण्यासाठी सैनिकांनी चिठ्ठया टाकल्या. जेंव्हा त्यांनी हे केले, त्यावेळी ही भविष्यवाणी पूर्ण झाली, ’’ त्यांनी माझे वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी चिठ्ठया टाकल्या.’’
  • 42:07 येशू म्हणाला, "मी तुम्हास सांगितले होते की माझ्याविषयी देवाच्या वचनामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणे अगत्याचे आहे."
  • 43:05 ह्याद्वारे योएल भविष्यवक्त्याने केलेली भविष्यवाणी पूर्ण होत आहे, देवाने म्हटले आहे "शेवटच्या काळामध्ये मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करील.'"
  • 43:07 या घटनेद्वारे ही भविष्यवाणी पूर्ण होते, ‘तू आपल्या पवित्रास कबरेमध्ये कुजू देणार नाहीस.’
  • 44:05 जरी तुम्ही काय करत होता ते तुम्हास कळले नाही, तरी देवाने तुमच्या करवी मसिहा दुःख सोशिल व मरेल ही भविष्यवाणी पूर्ण करून घेतली आहे.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H1214, H5487, G1096, G4138

पूर्वनियोजित, पूर्वी नेमलेले

व्याख्या:

"पूर्वनियोजित" आणि "पूर्वी नेमलेले" या संज्ञा एखादी गोष्ट घडण्याच्या आधी निर्णय घेणे किंवा नियोजन करणे यास संदर्भित करतात.

  • ही संज्ञा विशेषकरून लोकांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून देव पूर्वनियोजन करतो, यास संदर्भित करते.
  • काहीवेळा "अगोदर नेमलेला" या शब्दाचा उपयोग केला जातो, ज्याचा अर्थ आधी निर्णय घेण्याशी येतो.

भाषांतर सूचना:

  • "पूर्वनियोजित" या संज्ञेचे भाषांतर, "आधी ठरविणे" किंवा "वेळेच्या आधीच निर्णय घेणे" असे केले जाऊ शकते.
  • "पूर्वी नेमलेले" या संज्ञेचे भाषांतर, "खूप आधीच ठरविलेले" किंवा "वेळेच्या आधीच योजिलेले" किंवा " वेळेच्या आधीच निर्णय घेतलेले" असे केले जाऊ शकते.
  • या संज्ञेचे भाषांतर, "पूर्वज्ञान" या शब्दाच्या भाषांतरापेक्षा वेगळे असावे, ह्याची नोंद घ्या.

(हे देखील पाहा: पूर्वज्ञान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: G43090

पेन्टेकॉस्ट,सप्ताहांचा सण

तथ्य:

"सप्ताहांचा सण" हा एक यहुदी सण होता, जो वल्हांडणाच्या नंतर पन्नास दिवस साजरा करत असे.

  • प्रत्येक सप्ताहांला सात दिवसांचा हा सण म्हणजे पहिल्या हंगामाच्या सात दिवस होता. नवीन कराराच्या काळात, या सणाला "पेन्टेकॉस्ट" असे म्हणतात ज्याचा अर्थ "पन्नास" असा आहे.
  • सप्ताहांचा सण धान्यांच्या कापणीच्या सुरवातीला साजरा केला जात होता. तसेच, देवाने मोशेला दिलेल्या दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांना नियमशास्त्र दिले तेव्हा हा एक आठवण्याचा काळ होता.
  • नवीन करारामध्ये, पेन्टेकॉस्टचा दिवस खासकरून महत्त्वाचा आहे कारण कारण जेव्हा येशूच्या विश्वासणाऱ्यांना नवीन मार्गाने पवित्र आत्मा प्राप्त झाला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे सुद्धा पाहा: उत्सव, प्रथमफळ, कापणी, पवित्र आत्मा, वाढवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच2282, एच7620, जी40050

प्रकट, प्रकट झाले, प्रकटीकरण

व्याख्या:

"प्रकट होणे" या शब्दाचा अर्थ असा आहे की काहीतरी ज्ञात होणे. "प्रकटीकरण" म्हणजे काहीतरी ज्ञात केले गेले आहे.

  • त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीद्वारे आणि लोकांशी बोलण्या आणि लिखित संदेशाने आपल्या संवादाद्वारे देव स्वत: ला प्रकट करतो.
  • देव स्वप्नांद्वारे किंवा दृष्टांताद्वारे स्वत: ला प्रकट करतो.
  • जेव्हा पौलाने "येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाद्वारे" सुवार्ता प्राप्त केली तेव्हा त्याचा अर्थ असा की येशूने स्वत: त्याला सुवार्ता सांगितली
  • नवीन कराराच्या पुस्तकात "प्रकटीकरण" देवाने प्रकट केलेल्या घटनांविषयी आहे ज्या शेवटच्या काळात घडतील. त्याने त्या गोष्टी दृष्टांताद्वारे प्रेषित योहानाला प्रकट केल्या.

भाषांतरातील सूचना:

  • "प्रकट करणे" या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "ज्ञात होणे" किंवा "उघड करणे" किंवा "स्पष्टपणे दर्शविणे" याचा समावेश असू शकतो
  • संदर्भानुसार, "प्रकटीकरण" या संज्ञेचे भाषांतर करण्याचे संभाव्य मार्ग "देवाकडील संवाद" किंवा "देवाने प्रकट केलेल्या गोष्टी" किंवा "देवाबद्दलचे शिक्षण" हे असु शकतात. भाषांतरामध्ये "प्रकट करणे" या संज्ञेचा अर्थ ठेवणे चांगले.
  • "जिथे कोणतेही प्रकटीकरण नाही” या वाक्यांशाचे भाषांतर "जेव्हा देव स्वतःला लोकांसमोर प्रकट करत नाही" किंवा "जेव्हा देव लोकांशी बोलत नाही" किंवा “ज्या लोकांमध्ये देव संवाद करीत नाही" असे केले जावू शकते.

(हे देखील पाहा: चांगली बातमी, चांगली बातमी, dream, दृष्टी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच 241, एच 1540, एच 1541, जी 601, जी 602, जी 5537

प्रभु यहोवा, यहोवा देव

तथ्य:

जुन्या करारामध्ये, "प्रभु यहोवा" ह्याचा उपयोग एक खरा देव ह्याला संदर्भित करण्यासाठी वारंवार करण्यात आला आहे.

  • "प्रभु" हे पद एक दैवी शीर्षक आहे, आणि "यहोवा" हे देवाचे वैयक्तिक नाव आहे.
  • "यहोवा" हा शब्द"यहोवा देव" हा शब्द बनवण्यासाठी "देव" या शब्दाशी नेहमी जोडला जातो.

भाषांतर सूचना

  • जर "यहोवा" या शब्दाचा उपयोग देवाच्या वैयक्तिक नावाच्या भाषांतरासाठी केला जाऊ शकतो, तर "प्रभू यहोवा" आणि "यहोवा देव" ह्याचे भाषांतर शब्दशः केले जाऊ जाऊ शकते. * इतर संदर्भामध्ये जेंव्हा देवाला संदर्भित केले जाते, तेंव्हा "प्रभु" या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे, हे देखील विचारात घ्या.
  • काही भाषा नावाच्या आधी शीर्षक लावतात, आणि त्याचे भाषांतर "प्रभु यहोवा" असे केले जाऊ शकते. प्रकल्पित भाषेमध्ये स्वाभाविक काय आहे ते विचारात घ्या: "प्रभु" हे शीर्षक "यहोवा" च्या आधी किंवा नंतर असायला हवे?
  • "यहोवा देव" ह्याला "देव, ज्याला यहोवा म्हणून संबोधतात" किंवा "देव, जो एकमेव जिवंत देव आहे" किंवा "मी आहे, जो देव आहे" म्हणून देखील संदर्भित केले जाऊ शकते.
  • जर "यहोवा" ह्याचे भाषांतर "प्रभु" किंवा "परमेश्वर" म्हणून भाषांतर करण्याची परंपरा पाळत असेल तर, "प्रभू यहोवा" ह्याचे भाषांतर "प्रभु देव" किंवा "देव, जो प्रभु आहे" असे केले जाऊ शकते. इतर संभाव्य भाषांतरे "स्वामी परमेश्वर" किंवा "देव जो परमेश्वर" अशी असू शकतात.
  • "प्रभु यहोवा" हा शब्द "प्रभु परमेश्वर" म्हणून प्रस्तुत केला जाऊ नये, कारण वाचक कदाचित या अक्षरांमधील आकाराच्या फरकाकडे लक्ष देणार नाहीत, जे पारंपारिकपणे या दोन शब्दांचा फरक दर्शविण्यासाठी वापरले गेले आहेत, आणि ते अतिशय विचित्र दिसेल.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे सुद्धा पहा: देव, प्रभु, परमेश्वर, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H136, H430, H3068, G2316, G2962


प्रभुभोजन

व्याख्या:

"प्रभूभोजन" हा शब्द प्रेषित पौलाने वल्हांडणाच्या जेवणाच्या संदर्भात वापरला, जे येशूने, ज्या रात्री तो यहुदी पुढाऱ्यांच्या द्वारे पकडला गेला त्या रात्री, शिष्यांच्यासोबत खाल्ले.

  • या जेवणा दरम्यान, येशूने वल्हांडणाच्या भाकरीचे तुकडे केले आणि त्याला त्याचे शरीर म्हटले, ज्याला लवकरच फटके मारण्यात आणि ठार मारण्यात येणार होते.
  • त्याने द्राक्षारसाचा प्याला आपल्या रक्ताताला, तो “पापाचे अर्पण ” म्हणून मरण पावला तेव्हा लवकरच तो बाहेर येईल.
  • येशूने आज्ञा दिली की त्याच्या अनुयायांनी हे भोजन एकत्र करावे, येशूने जितक्यांदा तुम्ही हे प्रभूभोजन एकत्रित येऊन कराल, तितक्यांदा तुम्ही त्याच्या मरणाचे आणि पुनरुत्थानाचे स्मरण करावे.
  • करिंथकरांना लिहिलेल्या आपल्या पत्रात, प्रेषित पौलाने पुढे असेही म्हटले की, प्रभूच्या भोजनाची व्यवस्था “ येशूवर विश्‍वास ठेवणारे ” म्हणून केली होती.
  • आज चर्चेत बहुतेक वेळा “सहभागिता” या शब्दाचा वापर प्रभूच्या भोजनाच्या संदर्भात करतात. “शेवटचे जेवण” हा शब्द कधीकधी वापरला जातो.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर, "प्रभूचे भोजन" किंवा "आपल्या प्रभु येशूचे जेवण" किंवा "प्रभू येशूच्या स्मरणार्थ जेवण" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: वल्हांडण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहिती:

  • स्ट्रोंग: जी11730, जी29600

प्रभूचा दिवस, यहोवाचा दिवस

व्याख्या:

"यहोवाचा दिवस" या जुन्या करारातील संज्ञेचा उपयोग, जेंव्हा देव लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा करील, त्या विशिष्ट समयाला संदर्भित करण्यासाठी केला जातो.

  • नवीन कराराचा शब्द "प्रभूचा दिवस" ​​सामान्यतः त्या दिवसाचा किंवा वेळेला सूचित करतो जेव्हा प्रभु येशू शेवटच्या काळी लोकांचा न्याय करण्यासाठी परत येईल.
  • या अंतिम, भविष्यातील न्याय आणि पुनरुत्थानाच्या वेळेला कधीकधी "शेवटचा दिवस" ​​असेही संबोधले जाते. जेव्हा प्रभु येशू पाप्यांचा न्याय करण्यासाठी आणि त्याची सत्ता कायमची स्थापन करण्यासाठी येईल तेंव्हा या काळाची सुरुवात होईल.
  • या वाक्यांशांमधील "दिवस" ​​हा शब्द काहीवेळा शाब्दिक दिवसाचा संदर्भ घेऊ शकतो किंवा तो एक दिवसापेक्षा जास्त काळ असलेल्या "वेळ" किंवा "प्रसंग" या शब्दांना संदर्भित करू शकतो.
  • काहीवेळा शिक्षेला विश्वास न ठेवणाऱ्यांवर "देवाचा क्रोध ओतणे" म्हणून संबोधले जाते.

भाषांतर सूचना:

  • संदर्भावर आधारित, "यहोवाचा दिवस" या वाक्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "यहोवाचा समय" किंवा "अशी वेळ, जेंव्हा यहोवा त्याच्या शत्रूंना शिक्षा करील" किंवा "यहोवाच्या क्रोधाचा समय" या वाक्यांचा समावेश होतो.
  • "प्रभूचा दिवस" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "प्रभूच्या न्यायाचा समय" किंवा "जेव्हा प्रभु येशू लोकांचा न्याय करण्यासाठी परत येईल तो समय" या वाक्यांचा समावेश होतो.

(हे देखील पाहा: दिवस, न्यायाचा दिवस, प्रभू, पुनरुत्थान, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H3068, H3117, G22500, G29620

प्रायश्चित्त

व्याख्या:

"प्रायश्चित्त" हा शब्द देवाच्या न्यायाला संतुष्ट करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी आणि त्याचा क्रोध शांत करण्यासाठी केलेल्या त्यागाचा संदर्भ देतो.

  • येशू ख्रिस्ताचे बलिदान म्हणून अर्पण केलेले रक्त, हे मानवजातीच्या पापांसाठी देवाला प्रायश्चित्त असे आहे.
  • येशूच्या वधस्तंभावरील मरण्याने, देवाचा पापाविरुद्धचा क्रोध शांत झाला. ह्याने देवाला, लोकांकडे दयेने बघण्यासाठी आणि त्यांना सार्वकालिक जीवन देऊ करण्यासाठी एक मार्ग प्रदान केला.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर, "समाधान" किंवा "देवाने लोकांच्या पापाची क्षमा करून त्यांच्यावर मेहेरनजर करण्यासाठी कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
  • "भरपाई" या शब्दाचा अर्थ "प्रायश्चित्त" या शब्दाच्या अर्थाशी अगदी समान आहे. या दोन साज्ञांचा उपयोग कसा केला जाऊ शकतो ह्याची तुलना करणे महत्वाचे आहे.

(हे देखील पाहा: प्रायश्चित्त, सार्वकालिक, क्षमा करणे, बलिदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


प्रायश्चित्त, अर्पण

व्याख्या:

"प्रायश्चित" आणि "अर्पण" या शब्दांचा संदर्भ, परमेश्वराने कसे लोकांच्या पापांची किंमत मोजण्यासाठी आणि पापाबद्दलचा त्याचा राग शांत करण्यासाठी बलिदान कसे पुरवले याच्याशी आहे.

  • जुन्या कराराच्या काळात, देवाने इस्राएल राष्ट्राच्या पापांसाठी, एखाद्या प्राण्याचा बळी देऊन त्याच्या रक्ताचे अर्पण करण्याद्वारे, तात्पुरती प्रायश्चित्त करण्याची परवानगी दिली.
  • नवीन करारात नमूद केल्याप्रमाणे, वधस्तंभावरील ख्रिस्ताचा मृत्यू हा पापांसाठी एकमात्र खरे आणि कायमचे प्रायश्चित आहे.
  • जेव्हा येशू मरण पावला, तेव्हा त्याने शिक्षा आपणावर घेतली ज्या शिक्षेस पाप केल्यामुळे लोक पात्र होते. स्वतःच्या मृत्युच्या यज्ञासंबंधाने, त्याने प्रायश्चित्ताची किंमत भरली.

भाषांतर सूचना

  • "प्रायश्चित्त" या शब्दाचा अर्थ "किंमत भरणे" किंवा "किंमत भरण्यासाठी भरपाई देणे" किंवा "एखाद्याच्या पापांची क्षमा होण्यासाठी निमित्त बनणे" किंवा "अपराधाची भरपाई करणे" या शब्द किंवा वाक्यांशाद्वारे भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • "प्रायश्चित्त" भाषांतरीत करण्याच्या पद्धतींमध्ये "भरपाई" किंवा "पापाच्या भरपाईसाठी बलिदान" किंवा "क्षमा करण्याचे साधन प्रदान करणे" समाविष्ट असू शकते.
  • या संज्ञेच्या भाषांतराचा पैसे भरपाईशी काहीही संबंध नाही हे सुनिश्चित करा.

(हे सुद्धा पहा: दयासन, क्षमा करणे, विनंती, समेट करणे, सोडवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H3722, H3725, G2643


प्रार्थना करणे, प्रार्थना

व्याख्या:

“प्रार्थना करणे” आणि “प्रार्थना” या शब्दाचा अर्थ देवासोबत बोलणे होय. या शब्दाचा उपयोग खोट्या देवाशी बोलण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांना संदर्भित करण्यासाठी केला जातो.

  • लोक शांतपणे प्रार्थना करून, त्यांच्या विचारांसह देवाशी बोलू शकतात किंवा त्यांच्या आवाजाने देवाशी मोठ्याने बोलू शकतात. कधीकधी प्रार्थना लिहून ठेवल्या जातात, जसे की दाविदाने स्तोत्रांच्या पुस्तकात त्याच्या प्रार्थना लिहिल्या.
  • प्रार्थनेत देवाकडे दया मागणे, एखाद्या समस्येबद्दल मदत मागणे आणि निर्णय घेण्यास शहाणपणा मागणे यांचा समावेश असू शकतो.
  • बर्‍याचदा लोक आजारी असलेल्यांना किंवा इतर गोष्टीसांठी त्याच्या मदतीची गरज असलेल्या लोकांना बरे करण्याची प्रार्थना करतात.
  • जेव्हा लोक देवाला प्रार्थना करतात तेव्हा त्याचे आभार आणि स्तुतीसुद्धा करतात.
  • प्रार्थनेमध्ये देवाकडे आपल्या पापांची कबुली करणे आणि त्यानी आम्हास क्षमा करावे यासाठी मागण्याचे समविष्ट असते.
  • जेव्हा आपला आत्मा त्याच्या आत्म्याद्वारे त्याच्याशी संवाद साधत असतो, आपल्या भावना विभागतो आणि त्याच्या उपस्थितीचा आनंद घेतो तेव्हा देवाशी बोलण्याला कधीकधी त्याच्याशी “संवाद साधणे” म्हटले जाते.
  • या शब्दाचे भाषांतर “देवाशी बोलणे” किंवा “देवाशी संवाद साधणे” असे केले जाऊ शकते. या शब्दाचे भाषांतर मुक प्रार्थनेचा देखिल समावेश करण्यास सक्षम असावे.

(हे देखील पाहा: खोटे देव, क्षमा करणे, स्तुती करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 6:5 इसहाकाने रिबकेसाठी प्रार्थना केली आणि देवाने तिला जुळ्या बाळांची गर्भधारणा करण्यास परवानगी दिली.
  • 13:12 परंतु मोशेने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्यांचा नाश केला नाही.
  • 19:8 त्यानंतर बालाच्या संदेष्ट्यांनी बालाला प्रार्थना केली, "हे बाल, आमचे ऐक! "
  • 21:7 याजकांनी देखील लोकांसाठी देवाला प्रार्थना केली.
  • 38:11 येशूने आपल्या शिष्यांना त्यांनी मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करण्यास सांगितले.
  • 43:13 शिष्यांनी प्रेषितांची शिकवण सतत ऐकली, एकत्र वेळ घालवला, एकत्र भोजन केले, आणि एकमेकांबरोबर प्रार्थना केल्या.
  • 49:18 देव तुम्हाला त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी, इतर विश्वासणाऱ्याबरोबर त्याची उपासना करण्यासाठी आणि त्याने आपल्यासाठी काय केले हे इतरांना सांगण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगतो.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0559, H0577, H1156, H2470, H3863, H3908, H4994, H6279, H6293, H6419, H6739, H7592, H7878, H7879, H7881, H8034, H8605, G01540, G11620, G11890, G17830, G20650, G21710, G21720, G38700, G43350, G43360

प्रिय

व्याख्या:

"प्रिय" हा शब्द आपुलकीची अभिव्यक्ती आहे जो एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणारा आणि प्रिय असलेल्या व्यक्तीचे वर्णन करतो.

  • “प्रिय” या संज्ञेचा शाब्दिक अर्थ “प्रिय (जन)” किंवा “(ज्यावर) प्रिती केली जाते.”
  • देव येशूला त्याचा “प्रिय पुत्र” असे म्हणतो.
  • ख्रिस्ती मंडळीना लिहिलेल्या पत्रांत प्रेषित वारंवार आपल्या सहविश्वासू बांधवांना “प्रिय” म्हणून संबोधीत असे.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर “प्रिय” किंवा “प्रिय व्यक्ती” किंवा “प्रियजन” किंवा “खूप प्रिय” म्हणून देखील केले जाऊ शकते.
  • एखाद्या जवळच्या मित्राबद्दल बोलण्याच्या संदर्भात त्याचे “माझे प्रिय मित्र” किंवा “माझा जवळचा मित्र” असे भाषांतरित केले जाऊ शकते. इंग्रजीमध्ये “माझा प्रिय मित्र, पौल” किंवा “ पौल, जो माझा प्रिय मित्र आहे” असे म्हणणे स्वाभाविक आहे. इतर भाषांना हे वेगळ्या प्रकारे प्रदान करणे अधिक नैसर्गिक वाटू शकते.
  • लक्षात घ्या की “प्रिय” हा शब्द देवाच्या प्रेमाच्या शब्दापासून आला आहे, जो बिनशर्त, निःस्वार्थ आणि त्याग आहे.

(हे देखील पाहा: प्रेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

स्ट्रोंग:एच157, एच1730, एच2532, एच3033, एच3039, एच4261, जी25, जी27, जी5207


प्रेम, प्रिय

व्याख्या:

दुसर्‍या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे त्या व्यक्तीची काळजी घेणे आणि अशा गोष्टी करणे ज्यामुळे त्याला त्याचा फायदा होईल. "प्रेम" या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहे काही भाषा भिन्न शब्द वापरून याला व्यक्त करू शकतात:

  1. देवापासून येणारे प्रेम आपल्या स्वतःच्या लाभासाठी नसतानाही ते इतरांच्या चांगले करण्याकडे लक्ष केंद्रित करते. या प्रकारचे प्रेम इतरांची काळजी घेते, मग ते काहीही करोत. देव स्वत: प्रेम आहे आणि खर्‍या प्रेमाचे स्त्रोत आहे.

  2. येशूने आपल्याला पाप आणि मृत्यूपासून वाचवण्यासाठी आपल्या जीवनाचे बलिदान देऊन या प्रकारचे प्रेम दर्शविले. त्याने आपल्या अनुयायांनाही इतरांवर बलिदानाने प्रेम करण्यास शिकवले.

  3. जेव्हा लोक इतरांवर या प्रकारच्या प्रेमाने प्रेम करतात तेव्हा ते अशा मार्गाने कार्य करतात की ते इतरांची भरभराट कश्याने होईल याचा विचार करतात हे दर्शविते. अशा प्रकारच्या प्रेमात इतरांना क्षमा करणे देखील समाविष्ट आहे.
  4. यूएलटीमध्ये, "प्रेम" ही संज्ञा अशा प्रकारच्या त्यागाच्या प्रेमाला संदर्भित करते, नाहीतर भाषांतराच्या टीपेमध्ये भिन्न अर्थ दर्शविला जातो नाही.

  5. नवीन करारातील आणखी एक शब्द बंधुप्रेम किंवा मित्र किंवा कुटुंबातील सदस्यावरील प्रीतीला संदर्भित करतो.

  6. हा शब्द मित्र किंवा नातेवाईकांमधील नैसर्गिक मानवी प्रेमाचा संदर्भ देतो.

  7. हा शब्द अश्या संदर्भात देखील वापरला जाऊ शकतो जसा, “त्यांना मेजवानीत सर्वात महत्वाच्या जागांवर बसणे आवडते.” याचा अर्थ असा की त्यांना ते “खूप आवडते” किंवा तसे करण्याची “मोठ्या प्रमाणात इच्छा आहे”.

  8. “प्रेम” या शब्द पुरुष आणि स्त्री यांच्यातील प्रणयरम्य प्रेमाला देखील संदर्भित असू शकते.

भाषांतरातील सूचना:

  • अन्यथा भाषांतर टिपमध्ये सूचित केले आहे, यूएलटी मधील “प्रेम” या शब्द देवापासून येणाऱ्या त्यागाच्या प्रेमाला संदर्भित करते.
  • काही भाषांमध्ये देवाकडे असलेल्या निस्वार्थी आणि निस्वार्थ प्रेमासाठी खास शब्द असू शकतात. याचा अनुवाद करण्याच्या मार्गांमध्ये, “एकनिष्ठ, विश्वासू काळजी” किंवा “निःस्वार्थ काळजी” किंवा “देवाचे प्रेम” यांचा समावेश असू शकतो. हा शब्द अनुवाद करण्यासाठी वापरला असल्याचे सुनिश्चित करा
  • कधीकधी “लव” हा इंग्रजी शब्द लोक मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी असलेल्या काळजीला संदर्भित करतो. काही भाषा हे शब्द किंवा वाक्यांशासह भाषांतरित करतात ज्याचा अर्थ असा होतो, “खूप आवडणे” किंवा “काळजी घेणे” किंवा “तीव्र प्रेम असणे.”
  • ज्या संदर्भात “प्रेम” हा शब्द एखाद्या गोष्टीसाठी भक्कम प्राधान्य देण्यासाठी वापरला जातो, त्यास "भक्कम प्राधान्य" किंवा "खूप आवड असणे" किंवा "मोठ्या इच्छेचे" असे भाषांतरित केले जाऊ शकते
  • काही भाषांमध्ये एक वेगळा शब्द देखील असू शकतो जो पती-पत्नीमधील प्रणयरम्य किंवा लैंगिक प्रेमाचा संदर्भ देतो.
  • बर्‍याच भाषांमध्ये कृती म्हणून "प्रेम" या शब्दाला व्यक्त करणे आवश्यक आहे. म्हणून उदाहरणार्थ, ते भाषांतर करू शकतात “प्रेम सहनशील आहे, प्रेम दयाळू आहे” आहे, जसे की “जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्यावर प्रेम करते तेव्हा तो त्याच्याशी सहनशील असतो आणि दयाळू असतो.”

(हे देखील पाहा: करार, मृत्यू, बलिदान, वाचविणे, पाप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 27:2 नियमाच्या तज्ञाने उत्तर दिले की, देवाचा नियमशास्त्र ,सांगते, “ आपला देव परमेश्वर, त्याजवर संपूर्ण अंत: करणाने, आत्म्याने, सामर्थ्याने आणि बुध्दीन प्रीति कर. आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रिती कर.”
  • 33:8 “काटेरी जमीन असा व्यक्ती आहे जो देवाचे वचन ऐकतो, परंतु, काळानुसार आयुष्यातील काळजी, संपत्ती आणि आनंद देवाप्रती असलेल्या त्याच्या प्रितीला खुंटवून टाकते."
  • 36:5 पेत्र बोलत असता त्यांच्यावर एक चमकदार ढग खाली आला आणि त्या ढगातून एक वाणी ऐकू आली ती अशी ; “हा माझा पुत्र आहे ज्याच्यावर माझे प्रेम आहे;
  • 39:10 "ज्याला सत्य प्रिय आहे तो प्रत्येकजण माझे ऐकतो."
  • 47:1 तिने (लुदीया) देवावर प्रेम केले आणि त्याची उपासना केली.
  • 48:1 जेव्हा देवाने जगाची निर्मिती केली तेव्हा सर्वकाही परिपूर्ण होते. पाप नव्हते. आदाम आणि हव्वेने एकमेकांवर प्रेम केले आणि त्यांनी देवावर प्रेम केले.
  • 49:3 त्याने (येशू) शिकवले की आपण जसे स्वतःवर प्रेम करतो त्याच प्रमाणे आपण इतर लोकांवरप्रेम करणे आवश्यक आहे.
  • 49:4 त्याने (येशू) हे देखील शिकवले की तुम्ही आपल्या संपत्तीसह, इतर कोणत्याही गोष्टीवर प्रीती करता त्यापेक्षा तुम्ही देवावरप्रिती करणे आवश्यक आहे.
  • 49:7 येशूने शिकवले की देव पापी लोकांवर खूप प्रेम करतो.
  • 49:9परंतु देवाने जगातील प्रत्येकावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जेणेकरून ज्याने येशूवर विश्वास ठेवला आहे त्याला त्याच्या पापांची शिक्षा होणार नाही तर तो देवाबरोबर सर्वकाळ जगेल.
  • 49:13 देव तुम्हावर प्रेम करतो आणि आपण येशूवर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे जेणेकरून तो तुमच्याशी जवळचा नातेसंबंध असावा.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच157, एच158, एच159, एच160, एच2245, एच2617, एच2836, एच3039, एच4261, एच5689, एच5690, एच5691, एच7355, एच7356, एच7453, एच7474, जी00250, जी00260, जी53600, जी53610, जी53620, जी53630, जी5365, जी53670, जी53680, जी53690, जी53770, जी53810, जी53820, जी53830, जी53880

प्रेषित, प्रेषितपद

व्याख्या:

येशू आणि प्रेषितांना देव व त्याच्या राज्याविषयी प्रचार करण्यासाठी माणसे पाठवली गेली. प्रेषित म्हणून वापरल्या गेलेल्या शब्दाचा अर्थ प्रेषित म्हणून निवडल्या गेलेल्यांच्या स्थान व अधिकाराविषयी आहे.

  • प्रेषित या शब्दाचा अर्थ असा आहे की “एखाद्याला विशिष्ट हेतूसाठी पाठवले गेले आहे.” ज्याने प्रेषितला पाठविले त्याच प्रेषितचादेखील अधिकार आहे.
  • येशूचे जवळचे बारा शिष्य पहिले प्रेषित झाले. पौल व योहानासारखे इतर पुरुषसुद्धा प्रेषित झाले.
  • देवाच्या सामर्थ्याने प्रेषितांना धैर्याने सुवार्तेचा प्रचार करण्यास आणि लोकांना बरे करण्यास सक्षम केले आणि भुतांना लोकांतून बाहेर येण्यास भाग पाडण्यास सक्षम केले.

भाषांतर सूचना:

  • “प्रेषित” या शब्दाचे भाषांतर एखाद्या शब्दाने किंवा वाक्यांशाने देखील केले जाऊ शकते ज्याचा अर्थ “बाहेर पाठवलेले” किंवा “पाठवलेले” किंवा “ज्याला बाहेर जाऊन लोकांना देवाचा संदेश सांगण्यासाठी बोलावले आहे.”
  • “प्रेषित” आणि “शिष्य” या शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे भाषांतर करणे महत्त्वाचे आहे.
  • या संज्ञेचे स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील बायबल भाषांतरात कसे भाषांतर केले गेले याचाही विचार करा. (पहा अज्ञातांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: अधिकृत, शिष्य, याकोब (जब्दीचा मुलगा) , पौल, बारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 26:10 मग येशूने बारा पुरुष निवडले ज्यांना त्याचे प्रेषित म्हटले गेले. प्रेषितांनी येशूबरोबर प्रवास केला आणि त्याच्याकडून शिकले.
  • 30:1 येशूने आपल्या प्रेषितांना निरनिराळ्या गावांमध्ये लोकांना प्रचार करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी पाठवले.
  • 38:2 यहूदा हा येशूच्या प्रेषितांपैकी एक होता. तो प्रेषितांच्या पैशाच्या पिशवीचा प्रभारी होता, परंतु त्याला पैशाची आवड होती आणि तो अनेकदा पिशवीतून चोरी करत असे.
  • 43:13 शिष्यांनी स्वतःला प्रेषितांची शिकवण, सहवास, एकत्र भोजन आणि प्रार्थनेत वाहून घेतले.
  • 46:8 नंतर बर्नबा नावाच्या एका आस्तिकाने शौलाला प्रेषितांकडे नेले आणि शौलाने दिमिष्कामध्ये धैर्याने प्रचार कसा केला ते त्यांना सांगितले.

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: जी651, जी652, जी2491, जी5376, जी5570

बंधू

व्याख्या:

“बंधू” या शब्दाचा अर्थ असा एक पुरुष भावंड जे कमीतकमी एका जैविक पालकाला सामायिक करतो.

  • जुन्या करारामध्ये, "बंधू" हा शब्द नातेवाईक किंवा सहयोगी, जसे की समान जमाती, कुळ, व्यवसाय किंवा लोकांच्या गटातील सदस्यांसाठी सामान्य संदर्भ म्हणून वापरला जातो. अशा प्रकारे वापरल्यास, हा शब्द स्त्री आणि पुरुष दोघांनाही संदर्भित करू शकतो.
  • नवीन करारामध्ये प्रेषित सहसा ख्रिस्ती पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही संदर्भित करण्यासाठी “बंधू” असा शब्द वापरतात.
  • नवीन करारात काही वेळा प्रेषितांनी विशेषत: स्त्री असलेल्या ख्रिस्ती सहकाऱ्याचा संदर्भत देत असताना, किंवा पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही यात समाविष्ट केले जात आहे यावर जोर देत असताना “बहीण” असा शब्द वापरला होता. उदाहरणार्थ, याकोब यावर भर देतो की तो सर्व विश्वासणाऱ्यांबद्दल बोलत आहे, जेव्हा तो “सर्व बंधू किंवा बहीण ज्यांना अन्नाची किंवा वस्त्रांची गरज आहे” असे संबोधतो.

भाषांतरातील सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर नैसर्गिक किंवा जैविक भावाला संदर्भित करण्यासाठी लक्ष्य भाषेमध्ये वापरल्या जाणार्‍या शब्दशः शब्दाने करणे चांगले आहे, नाहीतर याचा अर्थ चुकीचा अर्थ होईल.
  • जुन्या करारात, विशेषत: जेव्हा “बंधू” हा शब्द सामान्यपणे एकाच कुटुंबातील, कुळातील किंवा लोकसमूहाचे सदस्यं असल्याचा संदर्भ देण्यासाठी वापरले जाते, तेव्हा संभाव्य भाषांतरामध्ये “नातेवाईक” किंवा “कुळातील सदस्य” किंवा “सहकारी इस्राएल” याचा देखील समावेश असू शकतो.
  • ख्रिस्तामध्ये असलेल्या सहविश्वासणाऱ्याच्या संदर्भात, या संज्ञेचे भाषांतर “ख्रिस्तामधील बंधू” किंवा “आध्यात्मिक बंधू” असे केले जाऊ शकते.
  • जर पुरुष आणि स्त्रिया या दोघांचा उल्लेख केला जात असेल आणि “बंधू” चुकीचा अर्थ देत असेल तर आणखी एक सामान्य नातेसंबंधाच्या संज्ञेचा वापर केला जाऊ शकतो ज्यामध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांचा समावेश असेल.
  • या संज्ञेचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग जेणेकरून पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही संदर्भित करतात “सहविश्वासू” किंवा “ख्रिस्ती बंधू व भगिनी” हे असू शकेल.
  • केवळ पुरुषांचा उल्लेख केला जात आहे किंवा पुरुष आणि स्त्रिया दोघांचा समावेश आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी संदर्भ तपासण्याचे सुनिश्चित करा.

(हे देखील पाहा: प्रेषित, देव जो पिता, बहीण, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच251, एच252, एच264, एच1730, एच2992, एच2993, एच2994, एच7453, जी80, जी81, जी2385, जी2455, जी2500, जी4613, जी5360, जी5569

बढाई मारणे, बढाईखोर

व्याख्या:

"बढाई" या शब्दाचा अर्थ कश्याबद्दल किंवा कोणाबद्दल तरी गर्वाने बोलणे असा होतो. बऱ्याचदा ह्याचा अर्थ स्वतःबद्दल बढाई मारणे असा होतो.

  • जो "बढाईखोर" आहे, तो गर्वाने स्वतःबद्दल बोलतो.
  • देवाने इस्राएली लोकांना त्यांच्या मूर्तींविषयी "अभिमान" बाळगण्याबद्दल दोष लावला. त्यांनी खऱ्या देवाची आराधना करण्याऐवजी, उद्धटपणे खोट्या देवांची उपासना केली.
  • पवित्रशास्त्र लोक त्यांची संपत्ती, त्यांची शक्ती, त्यांची फलदायी शेते आणि त्यांचे नियम यांसारख्या गोष्टींमध्ये बढाई मारतात याबद्दल देखील सांगते. ह्याचा अर्थ त्यांना या गोष्टींबद्दल गर्व होता आणि देवच एक आहे, जो या सर्व गोष्टी पुरविणारा आहे, हे त्यांनी मान्य केले नाही.
  • त्याऐवजी देवाने इस्राएल लोकांना आवाहन केले की, ते देवाला ओळखतात या गोष्टीचा त्यांनी "अभिमान" किंवा गर्व बाळगावा.
  • प्रेषित पौलाने देखील प्रभुमध्ये अभिमान बाळगण्याचा उल्लेख केला आहे, ह्याचा अर्थ त्याने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आनंदित होऊन त्याचे आभार मानणे असा होतो.

भाषांतर सूचना:

  • "बढाई" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "फुशारकी मारणे' किंवा "गर्वाने बोलणे" किंवा "गर्व असणे" ह्यांचा समावेश होतो.
  • "बढाईखोर" या शब्दाचे भाषांतर "गर्विष्ठ भाषणाने भरलेला" किंवा "गर्विष्ठ" किंवा "स्वतःबद्दल गर्वाने बोलणारा" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • देवाला जाणून घेणे किंवा त्याच्याविषयी अभिमान बाळगण्याच्या संदर्भात ह्याचे भाषांतर "चा अभिमान असणे" किंवा "उंच" किंवा "च्या बद्दल खूप आनंदित असणे" किंवा "च्या बद्दल देवाचे आभार मानने" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषेमध्ये "गर्व" या शब्दासाठी दोन शब्द असतात: एक म्हणजे नकारात्मक, गर्विष्ठ असण्याच्या अर्थाने आणि दुसरा सकारात्मक हा आहे, एखाद्याच्या कामाचा, कुटुंबाचा किंवा देशाचा अभिमान व्यक्त करण्याच्या अर्थाने.

भाषांतर सूचना:

(हे देखील पाहा: गर्व)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H1984, H3235, H6286, G212, G213, G2620, G2744, G2745, G2746, G3166

बांधणे, बंधन, बांधलेले

व्याख्या:

"बांधणे" या शब्दाचा अर्थ काही बांधणे किंवा ती सुरक्षितपणे जोडणे असा होतो. काहीतरी जे बांधलेले आहे किंवा एकत्रित जोडलेले आहे त्याला "बांधणे" असे म्हणतात. "बांधलेले" ही संज्ञा त्याचे भूतकाळी रूप आहे.

  • "बांधलेले" ह्याचा अर्थ काहीतरी बांधलेले किंवा कश्यानेतरी गुंडाळलेले असणे.
  • लाक्षणिक अर्थाने, एक व्यक्ती शपथेमध्ये "बांधलेला" आहे, त्याचा अर्थ त्याने जी काही शपथ वाहिली आहे "ती त्याला पूर्ण" करावी लागेल.
  • "बंधन" ह्याचा संबंध जे काही बांधलेले आहे, मर्यादेमध्ये आहे, किंवा एखाद्याला कैदेत ठेवणे याच्याशी आहे. हे सहसा शारीरिक बंधन, बेड्या किंवा रस्सीला संदर्भित करते जे एखाद्या व्यक्तीला मुक्तपणे हालचाल करण्यापासून अडवतात.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, बंधन जसे की, दोऱ्या किंवा साखळ्या कैद्यांना भिंतीशी किंवा दगडाच्या कारागृहाच्या जमिनीशी जोडण्यासाठी वापरल्या जात असे.
  • "बांधणे" या शब्दाचा उपयोग एखादी जखम बरी होण्यासाठी, त्या जखमे भोवती कपडा गुंडाळण्याच्या सांगण्याबद्दल सुद्धा केला जातो.
  • एक मृत व्यक्तीला दफन करण्यासाठी तयार करताना, त्याला कापडाने "बांधण्यात" येत असे.
  • "बंधन" या शब्दाचा लाक्षणिक उपयोग, काश्याच्यातरी संदर्भात, जसे की पाप, जे नियंत्रित करते किंवा गुलाम बनवते केला जातो.
  • एक बंधन म्हणजे दोन लोकांच्यामधील जवळचा संबंध, ज्यामध्ये ते एकमेकांना भावनिकदृष्ट्या, आत्मिकदृष्ट्या, आणि शारीरिकदृष्ट्या मदत करतात. हे विवाहाच्या बंधनात लागू होते.
  • उदाहरणार्थ, पती आणि पत्नी हे एकमेकांच्या "बंधनात" किंवा बांधलेले असतात. हे एक असे बंधन आहे, जे तुटू नये अशी देवाची इच्छा आहे.

भाषांतर सूचना

  • "बांधणे" या शब्दाचे भाषांतर "बांधणे" किंवा "जोडणे" किंवा "(सभोवती) गुंडाळणे" असे केले जाऊ शकते.
  • लाक्षणिक अर्थाने, ह्याचे भाषांतर "निर्बंधात ठेवणे" किंवा "आडवणे" किंवा "(काहीतरी) बाजूला ठेवणे" असे केले जाऊ शकते.
  • मत्तय 16 आणि 18 मध्ये "बांधणे" ह्याचा विशेष उपयोग केला आहे त्याचा अर्थ "मनाई करणे" किंवा "परवानगी नाकारणे."
  • "बंधन" या शब्दाचे भाषांतर "साखळ्या" किंवा "दोऱ्या" किंवा "बेड्या" असे केले जाऊ शकते.
  • "बंधन" या शब्दाचे लाक्षणिक अर्थाचे भाषांतर "गाठ" किंवा "संबंध" किंवा "जवळचे संबंध" असे केले जाऊ शकते.
  • "शांततेचे बंधन" या वाक्यांशाचा अर्थ "ऐक्यामध्ये असणे, जे लोकांना एकमेकांच्या जवळच्या संबंधात घेऊन येते" किंवा "एकत्रित बांधणे ज्यामुळे शांतता येते" असे केले जाऊ शकते.
  • "बांधून घेणे" ह्याचे भाषांतर "सभोवताली गुंडाळणे" किंवा "च्या वर पट्टी बांधणे" असे केले जाऊ शकते.
  • स्वतःला शपथेचे "बंधन" घालणे ह्याचे भाषांतर "शपथ पूर्ण करण्याचे वचन देणे" किंवा "शपथ पूर्ण करण्याचा शब्द देणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "बंधन" या शब्दाचे भाषांतर "बांधलेला" किंवा "बद्ध" किंवा "बांधले गेले" किंवा "(पूर्ण करणे) अत्यंत आवश्यक" किंवा "करणे गरजेचे असणे" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: पूर्ण, शांती, तुरुंगसेवक, शपथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ

शब्द माहीती

स्ट्रांग्स: H247, H481, H519, H615, H631, H632, H640, H1366, H1367, H1379, H2280, H2706, H3256, H3533, H3729, H4147, H4148, H4205, H4562, H5650, H5656, H5659, H6029, H6123, H6616, H6696, H6872, H6887, H7194, H7405, H7573, H7576, H8198, H8244, H8379, G254, G331, G332, G1195, G1196, G1198, G1199, G1210, G1397, G1398, G1401, G1402, G2611, G2615, G3734, G3784, G3814, G4019, G4029, G4385, G4886, G4887, G5265


बाप्तिस्मा देणे, बाप्तिस्मा घेतला, बाप्तिस्मा

व्याख्या:

नवीन करारामध्ये, "बाप्तिस्मा देणे" आणि "बाप्तिस्मा" या संज्ञा सामान्यत: एखादा ख्रिस्ती व्यक्ती पापापासून शुद्ध झाला आहे आणि ख्रिस्ताशी एकरूप झाला आहे हे दर्शविण्यासाठी त्यास पाण्याने पारंपारिकरित्या स्नान घालणे यास संदर्भित करतात.

भाषांतर सूचना:

  • एखाद्या व्यक्तीने पाण्याने बाप्तिस्मा कसा घ्यावा याबद्दल ख्रिस्ती लोकांची भिन्न मते आहेत. सामान्यतः या संज्ञेचे भाषांतर करणे सर्वोत्तम आहे जे पाण्याचा उपयोग विविध मार्गाने करण्यास अनुमती देते.
  • संदर्भाच्या आधारावर, "बाप्तिस्मा देणे" या शब्दाचे भाषांतर "शुद्ध होणे," "बाहेर टाकणे," "आत डुबकी मारणे (किंवा बुडविणे) " किंवा "धुणे" असे केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, " तुला पाण्याने बाप्तिस्मा देतो" याचे भाषांतर "तुला पाण्यात बुडवितो" असाही होऊ शकतो.
  • "बाप्तिस्मा" या शब्दाचे भाषांतर "शुध्दीकरण," "च्या वर ओतणे," "बुडविणे", "स्वच्छ करणे" असे केले जाऊ शकते.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्र शास्त्राच्या भाषांतरांत या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे याचा देखील विचार करा.

(हे देखील पाहाः अज्ञात कसे भाषांतरित करावे)

(हे देखील पहा: (बाप्तीस्मा करणारा) योहान, पश्चाताप करणे, पवित्र आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 24:3__जेव्हा लोकांनी योहानाचा संदेश ऐकला, अनेक लोकांनी आपल्या पापांचा पश्चाताप केला, आणि योहानाने त्यांना __बाप्तिस्मा दिला. अनेक धार्मिक पुढारी देखील योहानाकडू बाप्तिस्मा घेण्यासाठी आले, परंन्तु त्यांनी आपल्या पापांविषयी पश्चात्ताप केला नव्हता व आपले पाप कबूल केले नव्हते.
  • 24:6 दूस-या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला.
  • 24:07 योहान येशूला म्हणाला, ‘‘मी तुला बाप्तिस्मा देण्यास पात्र नाही. त्याऐवजी तू मला बाप्तिस्मा द्यावा.
  • 42:10 म्हणून, तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा.
  • 43:11 पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील.
  • 43:12 तेव्हा सुमारे 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेविला व ते येशूचे शिष्य झाले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला व यरूशलेमेच्या मंडळीमध्ये सामिल झाले.
  • 45:11 फिलिप्प आणि कूशी अधिकारी पुढे प्रवास करत असताना, ते एका तळ्याजवळ आले. कूशी अधिकारी म्हणाला, "पाहा! येथे काही पाणी आहे! मी बाप्तिस्मा घेऊ शकतो का?"
  • 46:05 लगेच शौलाला पुन्हा दिसू लागले, आणि हनन्याने त्यास बाप्तिस्मा दिला.
  • 49:14 येशू आपणांस आमंत्रण देत आहे यासाठी की तुम्ही विश्वास धरावा व बाप्तिस्मा घ्यावा.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी907

बारा, अकरा

व्याख्या:

"बारा" या शब्दाचा संदर्भ बारा मनुष्यांशी आहे, ज्यांना येशूने त्याचे जवळचे शिष्य किंवा प्रेषित होण्यासाठी निवडले. यहुदाने आत्महत्या केल्यावर, त्यांना "अकरा" असे संबोधण्यात आले.

  • येशूचे इतर अनेक शिष्य होते, पण "बारा" हे शीर्षक, जे येशूच्या अगदी जवळ होते असा भेद दाखवते.
  • या बारा शिष्यांच्या नावाची यादी मत्तय 10, मार्क 3 आणि लुक 6 मध्ये नोंद केलेली आहे.
  • येशू स्वर्गामध्ये परत गेल्यानंतर, "अकरा" जणांनी मत्थिया नावाच्या शिष्याला यहुदाच्या जागी प्रेषित होण्यासाठी निवडले. त्यानंतर त्यांना परत "बारा" असे संबोधण्यात आले.

भाषांतर सूचना:

  • अनेक भाषेमध्ये एखादे नाम जोडून असे म्हणणे, "बारा प्रेषित" किंवा "येशूचे बारा जवळचे शिष्य" हे कदाचित स्पष्ट आहे किंवा अधिक स्वाभाविक आहे.
  • "अकरा" ह्याचे भाषांतर "येशूचे राहिलेले अकरा शिष्य" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांतरे, कदाचित ह्याचा एक शीर्षक म्हणून उपयोग केला आहे असे दाखवतील, जसे की, "बारा" आणि "अकरा" आणि ह्याला मोठ्या अक्षरात लिहिण्यास प्राधान्य देतील.

(हे सुद्धा पहा: प्रेषित, शिष्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • Strong's: G1427, G1733

बेखमीर भाकर

व्याख्या:

"बेखमीर भाकर" या शब्दाचा संदर्भ अशा भाकरीशी आहे, जी किण्व किंवा इतर खमीर न वापरता बनवलेली असते. अशा प्रकारची भाकर फुगत नाही कारण त्याला फुगवण्यासाठी त्याच्यामध्ये खमीर घातलेले नसते.

  • जेंव्हा देवाने इस्राएली लोकांना मिसरच्या गुलामगिरीतून मुक्त केले, तेव्हा त्याने त्यांना भाकर फुगण्याची वाट न पाहता लगेच मिसर मधून पळून जाण्यास सांगितले. म्हणून त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये बेखमीर भाकर खाल्ली. तेव्हापासून बेखमीर भाकरीचा उपयोग त्यांचा वार्षिक वल्हांडण सण साजरा करताना केला जातो, जो त्यांना त्या वेळेची आठवण करून देतो.
  • कधीकधी खमीर पापाचे चित्र म्हणून वापरले जाते, "बेखमीर भाकर" म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनातून पाप काढून टाकणे, ज्यामुळे देवाला सन्मान मिळावा अशा पद्धतीने जीवन जगता येते.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "किण्व नसलेली भाकर" किंवा "सपाट भाकर जी फुगत नाही" असे केले जाऊ शकते.
  • आपण "किण्व, खमीर" या शब्दाचे भाषांतर ज्या पद्धतीने करतो, त्या बरोबर या मुद्याचे भाषांतर सुसंगत असल्याचे सुनिश्चित करा.
  • काही संदर्भांमध्ये, "बेखमीर भाकर" या शब्दाचा अर्थ "बेखमीर भाकरीचा सन" असा आहे आणि त्याला त्या मार्गाने भाषांतरित केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: भाकर, मिसर, सन, वल्हांडण, सेवक, पाप, किण्व)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहिती

  • Strong's: H4682, G106

बोधकथा,

व्याख्या:

"दाखला" या शब्दाचा सहसा संदर्भ छोट्या गोष्टीशी किंवा वास्तुपाठाशी येतो, ज्याचा उपयोग नैतिक सत्य स्पष्ट करण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी केला जातो.

  • येशूने दाखल्यांचा उपयोग त्याच्या शिष्यांना शिकवण्यासाठी केला. जरी त्याने लोकांच्या गर्दीला देखील दाखले सांगितले तरी, त्याने नेहमी दाखल्याला स्पष्ट करून सांगितले नाही.
  • येशुमध्ये विश्वास नसलेल्या परुश्याप्रमाणेच लोकापासून सत्य लपवून त्याच्या शिष्यांना सत्य सांगण्यासाठी एका दाखल्याचा उपयोग केला जाऊ शकतो.
  • नाथान संदेष्ट्याने दाविदाला त्याचे भयंकर पाप दाखवण्यासाठी एक दाखला सांगितला.
  • चागल्या शोमरोन्याची गोष्ट हे एक दाखल्याचे उदाहरण आहे, म्हणजेच गोष्ट आहे. जुन्या आणि नव्या द्राक्षबुधल्यांची येशुची तुलना करणे, हे एक दाखल्याचे उदाहरण आहे, जो शिष्यांना येशूचे शिक्षण समजण्याचा एक वस्तूपाठ आहे.

(हे देखील पाहा: शोमरोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच1819, एच4912, जी3850, जी39420

बोलविणे , आरोळी मारणे

व्याख्या:

"बोलविणे" आणि "आरोळी मारणे" या शब्दांचा अर्थ सहसा मोठ्याने बोलणे असा होतो, परंतु "बोलविणे" या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीला नाव देणे किंवा बोलावणे असा देखील असू शकतो. त्याचे इतर काही अर्थ देखील आहेत.

  • एखाद्याला “पुकारणे” म्हणजे ओरडणे, घोषणा करणे किंवा जाहीर करणे. ह्याचा अर्थ एखाद्याला मदत करण्यासाठी विचारणे असा देखील होतो, विशेषतः देवाला.
  • पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचदा, "बोलविणे" ह्याचा अर्थ "फर्मावने" किंवा "येण्याची आज्ञा देणे" किंवा "येण्याची विनंती करणे" असा होतो.
  • देव लोकांना त्याच्याकडे येण्यास आणि त्याचे लोक बनण्यास बोलवितो. हे त्यांचे "पाचारण" आहे.
  • जेव्हा देव लोकांना "बोलवितो," ह्याचा अर्थ देवाने लोकांना त्याची मुले होण्याकरिता, त्याचे सेवक होण्याकरिता आणि येशूद्वारे तारणाच्या संदेशाची घोषणा करण्याकरिता नियुक्त केले किंवा निवडले आहे.
  • या शब्दाचा उपयोग एखाद्याचे नाव संदर्भित करण्यासाठी देखील केला जातो. उदाहरणार्थ, "त्याचे नाव योहान असे आहे," म्हणडे "त्याचे नाव योहान असे ठेवण्यात आले" किंवा "त्याचे नाव योहान आहे."
  • "या नावाने बोलवले जाणे" ह्याचा अर्थ एखाद्याने कोणा एकाला नाव दिले आहे. देव म्हणतो की त्याने त्याच्या नावाने लोकांना बोलविले आहे.
  • एक वेगळी अभिव्यक्ती, मी तुला तुझ्या नावाने बोलावले आहे" ह्याचा अर्थ देवाने त्या व्यक्तीला विशिष्ठ पद्धतीने निवडले आहे.

भाषांतर सूचना

  • "बोलविणे" या शब्दाचे भाषांतर, "फर्मावने" या अर्थाच्या शब्दाद्वारे केले जाऊ शकते, ज्यामध्ये हेतुपुरस्सर असल्याची कल्पना किंवा हेतुपूर्ण बोलविणे याचा समावेश आहे.
  • "तुला आरोळी मारली आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "तुला मदतीसाठी विचारले आहे" किंवा "तुला त्वरित प्रार्थना करतो" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते की, देवाने तुला त्याचा सेवक होण्यासाठी "बोलविले" आहे, ह्याचे भाषांतर "आपल्याला विशेषरित्या निवडले आहे" किंवा " त्याचे सेवक होण्यासाठी आपल्याला "नियुक्त केले" आहे असे केले जाऊ शकते.
  • "आपण त्याच्या नावाने बोलविणे आवश्यक आहे" ह्याचे भाषांतर "आपण त्याचे नाव घेणे आवश्यक आहे" असेही केले जाऊ शकते.
  • "त्याला नावाने बोलविण्यात येते" ह्याचे भाषांतर "त्याचे नाव आहे" किंवा "त्याचे नाव घेतले आहे" असेही केले जाऊ शकते.
  • “परमेश्वराच्या नावाने हाक मारणे” या वाक्याचे भाषांतर “परमेश्वराला शोध घ्या आणि त्याच्यावर अवलंबून राहा” किंवा “प्रभूवर विश्वास ठेवा आणि त्याचे पालन करा” असे केले जाऊ शकते.
  • कश्यासाठी तरी “बोलविणे” किंवा “मागणी करणे” किंवा “साठी विचारणे” किंवा "आज्ञा करणे" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
  • "तुम्हाला माझ्या नावाने बोलविले आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "तुम्ही माझे आहात हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला माझे नाव दिले आहे" असे केले जाऊ शकते.
  • जेव्हा देव म्हणतो "मी तुला तुझ्या नावाने बोलविले आहे" ह्याचे भाषांतर "मी तुला ओळखतो आणि मी तुला निवडले आहे" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा : प्रार्थना, ओरडणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समूह

  • स्ट्रोंग : H0559, H2199, H4744, H6817, H7121, H7123, H7769, H7773, G01540, G03630, G14580, G15280, G19410, G19510, G20280, G20460, G25640, G28210, G28220, G28400, G29190, G30040, G31060, G33330, G33430, G36030, G36860, G36870, G43160, G43410, G43770, G47790, G48670, G54550, G55370, G55810

भय, घाबरणे, भयभीत

व्याख्या:

"भय" या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी किंवा आरोग्यासाठी संभाव्य धोका अनुभवताना जाणवणाऱ्या अप्रिय भावनांना सूचित करते. तथापि, बायबलमध्ये, “भय” या शब्दाचा अर्थ देव किंवा राजा यांसारख्या सामर्थ्यशाली व्यक्तीबद्दल, उपासनेचा, आदर, विस्मय किंवा इतर व्यक्तीबद्दल आज्ञाधारकता याची वृत्ती असा देखील होतो.

भाषांतर सूचना :

  • संदर्भावर आधारित, "भय" या शब्दाचे भाषांतर "घाबरणे" किंवा "प्रचंड आदर" किंवा "आदर" किंवा "सन्मान" बहुधा "विस्मित होणे" असे केले जाऊ शकते.
  • “भिऊ नका” या वाक्यांशाचे भाषांतर “घाबरू नको” किंवा “घाबरणे थांबवा” असे देखील केले जाऊ शकते.
  • “देवाचे भय त्या सर्वांवर पडले” या वाक्याचे विविध प्रकारे भाषांतर केले जाऊ शकते. काही शक्यतांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो: “अचानक त्या सर्वांना देवाबद्दल खूप भय आणि आदर वाटला;” किंवा “लगेच, त्या सर्वांना खूप आश्‍चर्य वाटले आणि देवाचा मनापासून आदर वाटला;” किंवा “तेव्हा, त्या सर्वांना देवाची खुप भीती वाटली (त्याच्या महान सामर्थ्यामुळे).”

(हे देखील पाहा: दरारा, यहोवा, परमेश्वर, आश्चर्य, शक्ती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समूह

  • स्ट्रोंग : H0367, H0926, H1204, H1481, H1672, H1674, H1763, H2119, H2296, H2727, H2729, H2730, H2731, H2844, H2849, H2865, H3016, H3025, H3068, H3372, H3373, H3374, H4032, H4034, H4035, H4116, H4172, H6206, H6342, H6343, H6345, H6427, H7264, H7267, H7297, H7374, H7461, H7493, H8175, G08700, G11670, G11680, G11690, G16300, G17190, G21240, G21250, G29620, G53980, G53990, G54000, G54010

भूतग्रस्त

व्याख्या:

एक व्यक्ती जो भूतग्रस्त आहे, त्याच्यात भुते किंवा दुष्ट आत्मा असतात ते त्याच्या कृतींना आणि विचारांना नियंत्रित करतात.

  • सहसा भूतग्रस्त व्यक्ती स्वतःला किंवा इतरांना दुखापत करेल, कारण भुत त्याला तसे करण्यास कारणीभूत होते.
  • येशूने भूतग्रस्त लोकांच्यातून भूतांना निघण्याची आज्ञा देऊन त्यांना बरे केले. ह्याला सहसा भुते "बाहेर काढणे" असे म्हणतात.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "भूतांच्या नियंत्रणाखाली" किंवा "दुष्ट आत्म्यानी नियंत्रित केलेले" किंवा "दुष्ट आत्मा आत मध्ये असणे" यांचा समावेश आहे.

(हे देखिल पहा: भुत)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 26:9 ज्यांच्यामध्ये __ भुते होती__ अशा अनेक लोकांना येशूकडे आणण्यात आले.
  • 32:2 जेव्हा ते सरोवराच्या पलीकडे पोहोचले तेव्हा एक भूतबाधा मनुष्य येशूकडे धावत आला.
  • 32:6 तो __ भूत असलेला__ मोठ्या आवाजात ओरडला, “येशू, देवाच्या पुत्रा, तुला माझ्याकडून काय हवे आहे? परात्पर देव? कृपया माझा छळ करू नका!”
  • 32:9 गावातील लोक आले आणि त्यांनी त्या माणसाला पाहिले ज्याला भुते होते.
  • 47:3 दररोज ते (पॉल आणि सिलास) तिथून चालत असतांना, एक दासी __ जिला भूतबाधा झाली होती__ त्यांच्यामागे येत होती.

शब्द माहीती

  • Strong’s: G11390

भेट

व्याख्या:

"भेट" हा शब्द काहीही जे एखाद्याला दिले किंवा देऊ केले जाते यास संदर्भित करतो. भेट ही परत काहीतरी मिळेल ही अपेक्षा न ठेवता दिली जाते.

  • गरीबांना देण्यात येणारे पैसे, अन्न, कपडे किंवा इतर वस्तू ह्यांना "दाने" असे म्हटले जाते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, देवाला देण्यात येणारे अर्पण किंवा बलिदान यास देखील भेट असे म्हटले जाते.
  • तारणाचे दान हे असे काहीतरी आहे जे, येशुवरील विश्वासाच्याद्वारे देव आपल्याला देतो.
  • नवीन करारामध्ये, "दाने" हा शब्द इतर लोकांच्या सेवेसाठी देवाने सर्व ख्रिस्ती लोकांना दिलेल्या विशेष आध्यात्मिक क्षमतांचा संदर्भ देण्यासाठी देखील वापरला आहे.

भाषांतर सूचना:

  • "दान" या शब्दासाठी असलेला सामान्य शब्द ह्याचे भाषांतर "काहीतरी जे दिले जाते" अशा अर्थाच्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाते.
  • एखाद्याकडे एखादे दान असणे किंवा देवाकडून येणारी विशेष क्षमता ह्याच्या संदर्भात, "आत्म्याचे दान" या शब्दाचे भाषांतर "आत्मिक क्षमता" किंवा "पवित्र आत्म्याकडून मिळालेली विशेष क्षमता" किंवा "देवाने दिलेली विशेष आत्मिक क्षमता" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा : आत्मा, पवित्र आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समूह:

  • स्ट्रोंग : H0814, H4503, H4864, H4976, H4978, H4979, H4991, H5078, H5083, H5379, H7810, H8641, G03340, G13900, G13940, G14310, G14340, G14350, G33110, G54860

मंडळी, चर्च

व्याख्या:

नवीन करारामध्ये, “मंडळी” हा शब्द येशूमधील विश्वासणाऱ्यांच्या स्थानिक गटाला सूचित करतो जो नियमितपणे एकत्र प्रार्थना करुन देवाचा संदेश ऐकत होता. “मंडळी” हा शब्द अनेकदा सर्व ख्रिस्ती लोकांना सूचित करतो.

  • ही संज्ञा शब्दशः “बोलवलेली” सभा किंवा एखाद्या विशिष्ट हेतूसाठी एकत्र जमलेल्या लोकांच्या मंडळीला संदर्भित करते.
  • जेव्हा ही संज्ञा ख्रिस्ताच्या संपूर्ण शरीरामध्ये सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा काही पवित्र शास्त्रातील भाषांतरे स्थानिक चर्चपेक्षा वेगळे दाखवण्यासाठी (“चर्च”) या शब्दाचे पहीले अक्षर मोठे लिहीतात.
  • एखाद्या विशिष्ट शहरातील विश्वासणारे बऱ्याचदा एखाद्याच्या घरी एकत्र जमत असत. या स्थानिक मंडळींना शहराचे नाव देण्यात आले जसे “इफिस येथील मंडळी”.
  • पवित्र शास्त्रात “चर्च” इमारतीला संदर्भित करत नाही.

भाषांतरातील सुचना:

  • “मंडळी” या शब्दाचे भाषांतर “एकत्र जमणे” किंवा “मंडळी” किंवा “लोक” किंवा “एकत्रित येणारे” असे केले जाऊ शकते.
  • या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरलेली संज्ञा किंवा वाक्यांश केवळ एका लहान गटाचा नाही तर सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करण्यास सक्षम असावी.
  • “चर्च” या संज्ञेचे भाषांतर फक्त इमारतीला संदर्भित करत नाही हे सुनिश्चित करा.
  • जुन्या करारात “मंडळी” हा शब्द भाषांतर करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा या शब्दाचा अनुवाद करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय पवित्र शास्त्रातील भाषांतरामध्ये त्याचे कसे भाषांतर केले जाते याचा विचार करा. (पाहा: [अज्ञात भाषांतर कसे करावे].)

(हे देखील पाहा: मंडळी, विश्वास ठेवणे, ख्रिस्ती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 43:12 सुमारे 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ते येशूचे शिष्य झाले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि ते यरुशलेमच्या मंडळीचा भाग बनले.
  • 46:9 अंत्युखियामधील बहुतेक लोक यहूदी नव्हते, परंतु पहिल्यांदाच, बरेच लोक विश्वासणारे झाले. बर्णबा आणि शौल तेथे या नवीन विश्वासणाऱ्यांना येशूविषयी अधिक शिकवण्यासाठी आणि मंडळीला बळकट करण्यासाठी गेले.
  • 46:10 म्हणून अंत्युखियामधील मंडळीने बर्णबा व शौलसाठी प्रार्थना केली आणि त्यांच्यावर आपले हात ठेवले. मग त्यांनी त्यांना इतर ठिकाणी येशुविषयची सुवार्ता सांगण्यासाठी पाठविले.
  • 47:13 येशूविषयची चांगली बातमी सतत पसरत राहिली, आणि मंडळी वाढत राहिली.
  • 50:1 जवळजवळ 2,000 वर्षांपासून, जगातील अधिकाधिक लोक येशू ख्रिस्ताविषयी चांगली बातमी ऐकत आहेत. मंडळी वाढत आहे.

शब्द संख्या:

  • स्ट्रोंग: जी15770

मंदिर, घर, देवाचे घर

तथ्य:

मंदिर एक भिंत असलेल्या अंगणांनी वेढलेली इमारत होती जिथे इस्राएल लोक प्रार्थना करण्यासाठी आणि देवाला यज्ञ अर्पण करण्यासाठी येत असे. ते यरुशलेम शहरातील मोरया पर्वतावर होते.

  • बऱ्याचदा "मंदिर" ही संज्ञा संपूर्ण मंदिराच्या परिसराला संदर्भित करते, ज्यात मुख्य इमारतीभोवती असलेल्या अंगणांचा समावेश असतो. कधीकधी ते फक्त इमारतीला संदर्भित करते.
  • मंदिराच्या इमारतीला दोन खोल्या होत्या, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान.
  • देवाने मंदिराचा उल्लेख त्याचे राहण्याचे स्थान म्हणून केला.
  • शलमोन राजाने त्याच्या कारकिर्दीत मंदिर बांधले. ते यरुशलेममधील उपासनेचे कायमस्वरूपी स्थान होते.
  • नवीन करारामध्ये, "पवित्र आत्म्याचे मंदिर" या संज्ञेचा उपयोग येशुवरील विश्वासणाऱ्यांच्या समूहाच्या संदर्भात केला गेला, कारण पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये राहतो.

भाषांतर सूचना:

  • सामान्यतः जेव्हा मजकूर म्हणतो की लोक "मंदिरात" होते, तेव्हा ते इमारतीच्या बाहेरील अंगणाला संदर्भित होते. ह्याचे भाषांतर "मंदिराच्या अंगणात" किंवा "मंदिराच्या परिसरामध्ये" असे केले जाऊ शकते.
  • जिथे ते विशेषतः इमारतीस संदर्भित करते, काही भाषांतरे "मंदिर" या शब्दाचे भाषांतर तो संदर्भ अधिक स्पष्ट करण्यासाठी "मंदिराची इमारत" असे करतात.
  • "मंदिर" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "देवाचे पवित्र घर" किंवा "उपासनेचे पवित्र स्थान" या शब्दांचा समावेश होतो.
  • पवित्र शास्त्रामध्ये अनेकदा, मंदिर या शब्दास "याहोवाचे निवासस्थान" किंवा "देवाचे निवासस्थान" म्हणून संदर्भित केले जाते.

(हे देखील पाहा: बलिदान, शलमोन, बाबेल, पवित्र आत्मा, निवासमंडप, अंगण, सियोन, घर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:6 दाविदाला एक मंदिर बांधायचे होते ज्यामध्ये सर्व इस्राएल लोक देवाची उपासना करू शकतील व यज्ञ करु शकतील.
  • 18:2 आपला बाप दाविद याच्या योजनेप्रमाणे व त्याने जमविलेल्या साधन सामग्रीने शलमोनाने यरुशलेममध्ये एक मंदिर बांधले. लोक दर्शनमंडपासमोर उपासना न करता, आता मंदिरामध्ये देवाची उपासना करू लागले व यज्ञ करु लागले. देव आला व त्याची उपस्थिती त्या मंदिरामध्ये होती, आणि तो तेथे आपल्या लोकांबरोबर वस्ती करु लागला.
  • 20:7 त्यांनी (बाबेलच्या लोकांनी) यरुशलेम शहर ताब्यात घेतले,__मंदिराचा__नाश केला, व सर्व संपती घेऊन गेले.
  • 20:13 जेव्हा लोक यरुशलेमेस आले, त्यांनी मंदिर आणि शहराभोवती व मंदिराभोवती असलेल्या भिंती पुन्हा बांधल्या.
  • 25:04 मग सैतानाने येशूला घेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले,‘‘ जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहीले आहे की, ‘तुझा पाय धोंडयावर आपटू नये म्हणून तुला हातावर झेलून धरण्याची देव आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील.’’
  • 40:07 जेव्हा तो मरण पावला तेंव्हा मोठा भूकंप झाला आणि लोकांना देवाच्या उपस्थितीपासून वेगळे करणारा मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच1004, एच1964, एच1965, जी1493, जी2411, जी3485

मत्री , मत्रालय

व्याख्या:

बायबलमध्ये, “मत्रालय” या शब्दाचा अर्थ इतरांना देवाबद्दल शिकवून त्यांची सेवा करणे आणि त्यांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेणे असा होतो.

  • जुन्या करारात, याजक मंदिरात देवाला अर्पण करून त्याची “सेवा” करायचे.
  • त्यांच्या “सेवाकार्यात” मंदिराची काळजी घेणे आणि लोकांच्या वतीने देवाला प्रार्थना करणे देखील समाविष्ट होते.
  • लोकांची “सेवा” करण्याच्या कामात त्यांना देवाबद्दल शिकवून त्यांची आध्यात्मिकरित्या सेवा करणे समाविष्ट असू शकते.
  • याचा अर्थ शारीरिक मार्गांनी लोकांची सेवा करणे, जसे की आजारी लोकांची काळजी घेणे आणि गरिबांना अन्न पुरवणे असा देखील होऊ शकतो.

भाषांतर सूचना

  • लोकांची सेवा करण्याच्या संदर्भात, “सेवक” या शब्दाचे भाषांतर “सेवा” किंवा “काळजी” किंवा “गरजा पूर्ण करणे” असे देखील केले जाऊ शकते.
  • मंदिरात सेवेचा उल्लेख करताना, “सेवक” या शब्दाचे भाषांतर “मंदिरात देवाची सेवा करा” किंवा “लोकांसाठी देवाला अर्पण अर्पण करा” असे केले जाऊ शकते.
  • देवाची सेवा करण्याच्या संदर्भात, याचे भाषांतर “सेवा” किंवा “देवासाठी कार्य” असे केले जाऊ शकते.
  • "मंत्रिपद दिले" या वाक्यांशाचे भाषांतर "काळजी घेतली" किंवा "पुरवलेली" "मदत"असे देखील केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: सेवा करणे, बलिदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच6399, एच8120,एच8334, एच8335, जी12470, जी12480, जी12490, जी20230, जी20380, जी24180, जी30080, जी30090, जी30100, जी30110, जी39300, जी52560, जी52570, जी55240

मध्यस्थी, रदबदली करणे (मध्यस्थी करणे)

व्याख्या:

"मध्यस्थी" आणि "रदबदली करणे" या शब्दांचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या वतीने दुसऱ्या व्यक्तीकडे विनंती करणे असा होतो. पवित्र शास्त्रात, ह्याचा संदर्भ बऱ्याचदा, इतर लोकांच्याबद्दल प्रार्थना करण्याशी येतो.

  • "च्या बद्दल मध्यस्थी करा" आणि "मध्यस्थी करा" या अभिव्यक्तींचा अर्थ इतर लोकांच्या फायद्यासाठी देवाकडे विनंती करणे असा होतो.
  • पवित्रशास्त्र असे शिकवते की, पवित्र आत्मा आपणासाठी मध्यस्थी करतो, म्हणजेच, तो आपल्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.
  • एखादा व्यक्ती, इतर लोकांच्यासाठी एखादा व्यक्ती जो अधिकारी आहे, त्याच्याकडे विनंती करण्याद्वारे मध्यस्थी करतो.

भाषांतर सूचना:

  • "मध्यस्थी" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "च्या साठी विनंती करणे" किंवा "(एखाद्याला) एखादी गोष्ट (दुसऱ्यासाठी) करण्यासाठी आवाहन करणे" असे केले जाऊ शकते.
  • "मध्यस्थी करणे" या नामाचे भाषांतर, "कळकळीची विनंती करणे" किंवा "विनंती करणे" किंवा "तातडीची प्रार्थना" असे केले जाऊ शकते.
  • "च्या साठी मध्यस्थी करा" या वाक्यांशाचे भाषांतर, "च्या फायद्यासाठी विनंती करा" किंवा "च्या वतीने कळकळीची विनंती करा" किंवा "देवाला मदतीसाठी विचारणे" किंवा "(एखाद्याला) आशीर्वादित करण्यासाठी देवाला कळकळीची विनंती करणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: प्रार्थना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H6293, G1783, G1793, G5241


मनुष्याचा पुत्र, मानवपुत्र

व्याख्या:

"मनुष्याचा पुत्र" हे शीर्षक येशूने स्वतःला संदर्भित करण्यासाठी वापरले होते. "मी" किंवा "मला" असे म्हणण्याच्या ऐवजी त्याने सहसा या शब्दाचा उपयोग केला.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "मनुष्याचा पुत्र" हा एखाद्या मनुष्याचा संदर्भ देण्याचा किंवा त्याला उद्देशण्याचा एक मार्ग असू शकतो. ह्याचा अर्र्थ "मनुष्य" असा देखील होतो.
  • यहेज्केलच्या जुन्या करारातील पुस्तकामध्ये, देवाने वारंवार यहेज्केलला "मनुष्याचा पुत्र" असे संबोधले आहे. उदाहरणार्थ तो म्हणाला, "तू, मानवपुत्रा, भविष्यवाणी कर"
  • दानीएल संदेष्ट्याने "मनुष्याच्या पुत्राला" मेघांसाहित येतानाचा दृष्टांत पहिला, ज्याचा संदर्भ येणाऱ्या मासिहाशी होता.
  • येशू सुद्धा बोलला की, एके दिवशी मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन परत येईल.
  • मनुष्याच्या पुत्राचे ढगांवर येण्याचे संदर्भ हे प्रकट करतात की, येशू, मसिहा हाच देव आहे.

भाषांतर सूचना

  • जेंव्हा येशूने "मनुष्याचा पुत्र" या शब्दाचा उपयोग केला, तेंव्हा ह्याचे भाषांतर "असा एक जो मनुष्य झाला" किंवा "स्वर्गातून येणारा मनुष्य" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांतरकार कधीकधी "मी" किंवा "मला" या शीर्षकांचा समावेश करतात (जसे की, "मी, मनुष्यच पुत्र" यामध्ये), हे स्पष्ट करण्यासाठी की, येशू स्वतःबद्दल बोलत आहे.
  • या शब्दाचे भाषांतर चुकीचा अर्थ देत नाही हे खात्री करण्यासाठी तपासून पहा (जसे की एक युक्तिवादाला सोडून असलेला मुलगा, किंवा येशू केवळ मनुष्य होता असा चुकीचा चाप देणारा शब्द).
  • "मानवपुत्र" हा शब्द जेंव्हा एखाद्या मनुष्याला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, तेंव्हा त्याचे भाषांतर "तू, मानव" किंवा "तू, मनुष्य" किंवा "मानवी" किंवा "मनुष्य" असे केले जाते.

(हे देखील पहा: स्वर्ग, पुत्र, देवाचा पुत्र, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती

  • Strong's: H120, H606, H1121, H1247, G444, G5207

मन्ना

व्याख्या:

मन्ना हे पांढरे, धन्यासारखे अन्न होते, जे देवाने इस्राएल लोकांना त्यांनी मिसर सोडल्यानंतर, वाळवंटामध्ये राहत असताना 40 वर्षा पर्यंत खाण्यासाठी पुरविले.

  • मन्ना रोज सकाळी दवाखाली जमिनीवर दिसणार्‍या पांढऱ्या फ्लेक्ससारखा दिसत होता. त्याची चव मधासारखी गोड होती.
  • इस्राएली लोक शब्बाथ वगळता दररोज मान्ना गोळा करायचे.
  • शब्बाथाच्या आदल्या दिवशी, देवाने इस्राएली लोकांना दररोज लागतो त्यापेक्षा दुप्पट मन्ना गोळा करण्याची आज्ञा दिली होती, जेणे करून त्यांना विश्रामाच्या दिवशी मन्ना गोळा करावा लागणार नाही.
  • "मन्ना" या शब्दाचा अर्थ "हे काय" असा होतो.
  • पवित्र शास्त्रामध्ये, मन्ना या शब्दाला "स्वर्गातील भाकर" आणि "स्वर्गातील धान्य" असे संदर्भित केले आहे.

भाषांतर सूचना

  • या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये "अन्नाचे पातळ पांढरे फ्लेक्स" किंवा "स्वर्गातील अन्न" यांचा समावेश असू शकतो.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेतील पवित्रशास्त्र भाषांतरात या संज्ञेचे भाषांतर कसे केले जाते ते देखील विचारात घ्या. (पाहा: अज्ञातांचे भाषांतर कसे करावे)

(हे सुद्धा पाहा: भाकर, वाळवंट, धान्य, स्वर्ग, शब्बाथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच4478, जी31310

महायाजक

व्याख्या:

"महायाजक" या शब्दाचा संदर्भ एक विशेष याजाकाशी आहे, ज्याला एक वर्षाच्या काळासाठी इतर इस्राएली याजाकांवर नेता म्हणून सेवा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते.

  • महायाजकाला विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. वर्षातून एकदा विशेष बलिदान अर्पण करण्यासाठी फक्त त्यालाच मंदिरातील अतिपवित्र स्थानात जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
  • इस्राएल लोकांना अनेक याजक असायचे, पण एका वेळी एकच महायाजक असायचा.
  • जेंव्हा येशूला अटक केली तेंव्हा कयफा हा अधिकृत महायाजक होता. * कायफाचा सासरा हन्ना ह्याचा देखील काहीवेळा उल्लेख करण्यात आला आहे, कारण तो पूर्वीच्या काळातील महायाजक होता, ज्याला अजूनही लोकांवर ताकद आणि अधिकार होता.

भाषांतर सूचना

  • "महायाजक" याचे भाषांतर "सर्वोच्च याजक" किंवा "महान श्रेणीतील याजक" असे केले जाऊ शकते.
  • "मुख्ययाजक" या शब्दापासून याचे भाषांतर वेगळे असेल याची खात्री करा.

(हे सुद्धा पहा: हन्ना, कयफा, मुख्ययाजक, याजक, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 13:08 पडद्याच्या पाठीमागे असणा-या खोलीमध्ये केवळ महायाजकासच जाण्याची परवानगी होती कारण तेथे देवाचा निवास होता.
  • 21:07 मसिहा हा एक परिपूर्ण महायाजक असणार होता जो देवाला स्वत:चे परिपूर्ण बलिदान करणार होता.
  • 38:03 तेंव्हा महायाजक व यहूदी पुढा-यांनी मिळून, येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीची तीस नाणी दिले.
  • 39:01 सैनिकांनी येशूची चौकशी करण्यासाठी त्याला महायाजकाच्या घरी घेऊन गेले.
  • 39:03 शेवटी, महायाजकाने येशूकडे पाहून विचारले, ‘‘आम्हास सांग, की तू मसिहा, जिवंत देवाचा पुत्र आहेस?’’
  • 44:07 दुस-या दिवशी, यहूदी पुढा-यांनी पेत्र व योहान यांना महायाजकासमोर व इतर धर्मपुढा-यांसमोर उभे केले.
  • 45:02 तेव्हा धार्मिक पुढा-यांनी स्तेफनास अटक केले व त्यास महायाजक व इतर पुढा-यांसमोर आणले, तेथे त्याच्याविरुदध आणखी खोटे साक्षीदार उभे केले व त्यांनी स्तेफनावर खोटे आरोप लाविले.
  • 46:01 महायाजकाने शौलास दिमिष्क शहरातील ख्रिस्ती लोकांस पकडून यरूशलेमेस आणण्यासाठी परवाना दिला होता.
  • 48:06 येशू हा एक थोर महायाजक आहे. इतर याजकांनी केले नाही असे येशूने केले, संपूर्ण जगातील लोकांसाठी स्वतःचेच अर्पण केले, अशासाठी की जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना पापांची क्षमा व्हावी. येशू हा एक परिपूर्ण महायाजक होता, कारण त्याने, प्रत्येकाने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा स्वत:वर घेतली.
  • Strong's: H7218, H1419, H3548, G748, G749

महिमा

व्याख्या:

"महान" किंवा "महान" हा शब्द महानता आणि वैभवाचा संदर्भ देतो, बहुतेकदा राजाच्या गुणांच्या संबंधात.

  • बायबलमध्ये, “महिमा” हा वारंवार देवाच्या महानतेला सूचित करतो, जो विश्वाचा सर्वोच्च राजा आहे.
  • “महाराज” हा राजाला संबोधित करण्याचा एक मार्ग आहे.

भाषांतर सूचना

  • या संज्ञेचे भाषांतर "राजकीय महानता" किंवा "शाही वैभव" असे केले जाऊ शकते.
  • “महाराज” चे भाषांतर “आपले महाराणी” किंवा “आपले महामहिम” किंवा लक्ष्य भाषेत शासकाला संबोधित करण्याचा नैसर्गिक मार्ग वापरून केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: राजा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच1347, एच1348, एच1420, एच1923, एच1926, जी1935, जी7238, जी3168, जी3172

मांडलिक

व्याख्या:

"मांडलिक" या शब्दाचा संदर्भ शासकीय अधिकाऱ्याशी आहे, जो रोमी साम्राज्याच्या भागांवर शासन करीत होता. प्रत्येक मांडलिक हा रोमी सम्राटाच्या अधिकाराखाली होता.

  • मांडलिक या शीर्षकाचा अर्थ "चार संयुक्त शासकांपैकी एक" असा होतो.
  • सम्राट डाईक्लेटीयनच्या साम्राज्यात, रोमन साम्राज्याच्या चार प्रमुख विभागाची सुरवात झाली आणि प्रत्येक मंडलीकाने एका भागावर राज्य केले.
  • "महान" हेरोदाचे राज्य, जो येशूच्या जन्माच्या वेळी राजा होता, त्या राज्याचे त्याच्या मृत्युनंतर चार भाग झाले, आणि त्यावर त्याच्या मुलांनी "मांडलिक" किंवा "चौथ्याचे शासक" म्हणून शासन केले.
  • प्रत्येक भागामध्ये एक किंवा अधिक छोटे भाग होते, त्याला "प्रांत" असे म्हणत, जसे की गालील किंवा शोमरोन.
  • "मांडलिक हेरोद" ह्याचा उल्लेख नवीन करारामध्ये बऱ्याचदा आलेला आहे. तो "हेरोद अंतिपा" या नावाने सुद्धा ओळखला जातो.
  • "मांडलिक" या शब्दाचे भाषांतर "प्रादेशिक अधिकारी" किंवा "प्रांताचा शासक" किंवा "शासक" किंवा "अधिकारी" असेही केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: अधिकारी, हेरोद अंतिपा, प्रांत, रोम, शासक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग:जी50750, जी50760

मुले, मूल, संतती

व्याख्या:

“मूल” (बहुवचन "मुले") हा शब्द पुरुष आणि स्त्रीच्या संततीस सूचित करतो. हा शब्द बहुतेक वेळा सामान्यत: वयाने तरुण आणि प्रौढ नसलेल्या अशा कोणासाठीही संदर्भ म्हणून वापरला जातो. "संतती" हा शब्द लोक किंवा प्राण्यांच्या जैविक वंशजांचा सामान्य संदर्भ आहे.

पवित्र शास्त्रात शिष्यांना किंवा अनुयायांना कधीकधी “मुले” म्हटलेले आहे.

  • बहुतेकदा "मुले" हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या संततीसाठी वापरला जातो.
  • पवित्रशास्त्रात बर्‍याचदा “संतती” या शब्दाचा अर्थ “मुले” किंवा “वंशज” यासारखा आहे.
  • “बीज” हा शब्द कधीकधी संततीला संदर्भित करण्यासाठी लाक्षणिक पद्धतीने वापरला जातो.
  • "चे मुले" हा वाक्प्रचार एखाद्या चरित्राद्वारे दर्शविला जाऊ शकतो. याची काही उदाहरणे अशी आहेत:
  • प्रकाशाची मुले
  • आज्ञाधारक मुले
  • सैतानाची मुले
  • ही संज्ञा मंडळीला देखिल संदर्भित करु शकते. उदाहरणार्थ, कधीकधी नवीन कराराचा असा अर्थ होतो की जे येशूवर “देवाची मुले” म्हणून विश्वास ठेवतात.

भाषांतरातील सुचना:

  • जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नातवंड किंवा त्यांचे नातवंड इत्यादींचा संदर्भ असतो तेव्हा "मुले" हा शब्द "वंशज" म्हणून अनुवादित केला जाऊ शकतो.
  • संदर्भानुसार, "चे मुले" याचे, "ज्या लोकांमध्ये वैशिष्ट्ये आहेत" किंवा "असे वर्तन करणारे लोक" असे भाषांतरीत केले जाऊ शकत।
  • शक्य असल्यास, “देवाची मुले” या वाक्यांशाचे भाषांतर शब्दश: केले पाहिजे कारण पवित्र शास्त्रामधील महत्त्वाचा विषय म्हणजे देव आपला स्वर्गीय पिता आहे. पर्यायी भाषांतर म्हणजे “देवाचे लोक” किंवा “देवाचे आध्यात्मिक मुले” हे असेल.
  • जेव्हा येशू आपल्या शिष्यांना “मुले” म्हणतो तेव्हा त्याचे “प्रिय मित्र” किंवा “माझे प्रिय शिष्य” असेही भाषांतर केले जाऊ शकते.
  • जेव्हा पौल व योहान येशूमधील विश्वासणाऱ्यांना “मुले” असे संबोधतात तेव्हा त्याचे “प्रिय सहविश्वासणारे” म्हणून देखील भाषांतर केले जाऊ शकते.
  • "अभिवचनाची मुले" या वाक्यांशाचे असे भाषांतर केले जाऊ शकते, "असे लोक ज्यांना देवाने जे वचन दिले आहे ते प्राप्त झाले."

(हे देखील पहा: वंशज, बीज, वचन, मुलगा, आत्मा, विश्वास, प्रिय)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच1069, एच 1121, एच 1123, एच 1129, एच 1323, एच1397, एच1580, एच2029, एच2030, एच2056, एच2138, एच2145, एच2233, एच2945, एच3173, एच3205, एच3206, एच3208, एच3211, एच3243, एच3490, एच4392, एच5209, एच5271, एच5288, एच5290, एच5759, एच5764, एच5768, एच5953, एच6185, एच6363, एच6529, एच6631, एच7908, एच7909, एच7921, जी730, जी815, जी1025, जी1064, जी1081, जी1085, जी1471, जी3439, जी3515, जी3516, जी3808, जी3812, जी3813, जी3816, जी5040, जी5041, जी5042, जी5043, जी5044, जी5206, जी5207, जी5388

मूर्ख, मूर्खता, मूर्खपणा

व्याख्या:

“मूर्ख” हा शब्द अश्या व्यक्तीला संदर्भित करतो जो नेहमी चुकीची निवड करतो, विशेषत: जेव्हा तो आज्ञा न पाळण्याची निवड करतो. “मूर्खता” ही संज्ञा शहाणा नसणाऱ्या व्यक्तीचे किंवा वर्तवणूचे वर्णन करते.

  • पवित्र शास्त्रामध्ये “मूर्ख” हा शब्द सहसा अशा व्यक्तीला सूचित करतो जो देवावर विश्वास ठेवत नाही किंवा त्याच्या आज्ञा पाळत नाही. हे बर्‍याचदा शहाण्या माणसापेक्षा भिन्न आहे, जो देवावर विश्वास ठेवतो आणि देवाची आज्ञा पाळतो.
  • स्तोत्रात, दाविदाने एका मूर्खाचे वर्णन असे केले आहे जो देवावर विश्वास ठेवत नाही, जो देवाच्या सृष्टीतील सर्व पुराव्याकडे दुर्लक्ष करतो.
  • जुन्या करारातील नीतिसूत्रेच्या पुस्तकात देखील एक मूर्ख किंवा वेडगळा माणूस कसा असतो याबद्दल बरेच वर्णन केलेले आहे.
  • “मूर्खपणा” ही संज्ञा शहाणपणाची नसणाऱ्या कृतीला संदर्भित करते कारण ती देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. बर्‍याचदा “मूर्खपणा” या संज्ञेमध्ये वेडगळ किंवा धोकादायक अशा गोष्टीचा अर्थ देखील असतो.

भाषांतरातील सुचना:

  • “मूर्ख” या संज्ञेचे भाषांतर “मूर्ख मनुष्य” किंवा “वेडगळा मनुष्य” किंवा “बेसावध मनुष्य” किंवा “अधार्मिक मनुष्य” असे केले जाऊ शकते.
  • “मूर्ख” भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये “समजदारपणाचा अभाव” किंवा “वेडगळा” किंवा “बेसावध” याचा समावेश असू शकतो.

(हे देखील पाहा: शहाणा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0191, H0196, H0200, H1198, H1984, H2973, H3684, H3687, H3688, H3689, H3690, H5014, H5034, H5036, H5039, H5528, H5529, H5530, H5531, H6612, H8417, H8602, H8604, G04530, G04540, G07810, G08010, G08770, G08780, G27570, G31500, G31540, G34710, G34720, G34730, G34740, G39120

यहुदी, यहुदी लोकांचे

तथ्य:

यहूदी लोक हे अब्राहामाचा नातू याकोब याचे वंशज आहेत. “यहुदी” हा शब्द “यहुदा” या शब्दावरून आला आहे.

  • बाबेलच्या बंदिवासातून यहुदात परत आल्यावर लोकांनी इस्राएली लोकांना “यहुदी” म्हणण्यास सुरुवात केली.
  • येशू मसीहा यहुदी होता. तथापि, यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी येशूला नाकारले आणि त्याला ठार मारण्याची मागणी केली.

(हे देखील पाहा: [अब्राहाम], [याकोब], [इस्त्राएल], [बाबेल], [यहुदी पुढारी])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 20:11 इस्राएली लोकांना आता __ यहुदी__ म्हटले गेले आणि बर्‍याच जणांनी आपले संपूर्ण जीवन बाबेलमध्येच घालवले होते.
  • 20:12__म्हणून, सत्तर वर्षांच्या बंदिवासानंतर, __यहुदी लोकांचा छोटा गट यरूशलेम शहरातील यहुदामध्ये परत आले.
  • 37:10 या चमत्कारामुळे बर्‍याच __यहुदी __ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.
  • 37:11 परंतु यहूदी लोकांचे धर्मगुरू जळू लागले, म्हणून ते येशू व लाजराला कसे मारावे याविषयी योजना करण्यासाठी एकत्र जमले.
  • 40:2 पिलाताने चिन्हावर “ यहूदी लोकांचा राजा” असे लिहून येशूच्या डोक्यावर वधस्तंभावर लावा असा आदेश दिला.
  • 46:6 लगेच, शौलाने दिमीष्कातील यहूदी लोकांना प्रचार करण्यास सुरवात केली, की “येशू हा देवाचा पुत्र आहे!”

Word Data:

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच3054, एच 3061, एच 3062, एच 3064, एच 3066, जी2450, जी 2451, जी 2452, जी 2453, जी 2454

यहुद्यांचा राजा

व्याख्या:

"यहुद्यांचा राजा" हा शब्द, एक शिर्षक आहे ते, येशू, मासिहाला संदर्भित करण्यासाठी वापरले जाते.

  • जेंव्हा ज्ञानी लोक बेथेलेहेमास बाळाला भेटण्यासाठी, जो "यहुद्यांचा राजा" होता, गेले तेंव्हा, हे शीर्षक पहिल्यांदा पवित्र शास्त्रात त्यांच्याकडून वापरले गेले.
  • देवदुताने मरीयेला प्रकट केले की. तिचा मुलगा, दावीद राजाचा वंशज, एक राजा असेल आणि त्याचे राज्य सर्वकाळ टिकेल.
  • येशूला वधस्तंभावर खिळवण्यापुर्वी, रोमी सैन्यांनी थट्टेने येशूला "यहुद्यांचा राजा" असे संबोधले. हे शीर्षक एका लाकडाच्या तुकड्यावर लिहिले आणि येशूच्या वधस्तंभाच्या टोकाला खिळले.
  • येशू खरोखर यहुद्यांचा राजा आणि सर्व सृष्टीवर राजा आहे,

भाषांतर सूचना

  • "यहुद्यांचा राजा" या शब्दाचे भाषांतर "यहुद्यांवरील राजा" किंवा "यहुदावर राज्य करणारा राजा" किंवा "यहुद्यांचा सर्वोच्च शाषक" असे केले जाऊ शकते.
  • "चा राजा" हा वाक्यांश भाषांतराच्या इतर ठिकाणी कसा भाषांतरित केला आहे, हे तपासून पहा.

(हे सुद्धा पहा: वंशज, यहुदी, येशू, राजा, राज्य, देवाचे राज्य, ज्ञानी लोक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 23:9 थोडया दिवसांनंतर, पूर्व दिशेला एक विशेष तारा ज्ञानी लोकांनी पाहिला. त्यांना समजले की, हा यहूद्यांचा एक नवा राजा जन्मास आला आहे.
  • 39:9 पिलाताने येशूला विचारले, ‘‘तू यहू़द्यांचा राजा आहेस काय?’’
  • 39:12 रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!’’
  • 40:2 _ पिलाताने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी ‘‘यहूद्यांचा राजा’’ अशी लिहिलेली पाटी वधस्तंभाच्या वर येशूच्या डोक्यावर लावावी.
  • Strong's: G935, G2453

यहोवा

तथ्य:

"यहोवा" ही संज्ञा जुन्या करारातील देवाचे वैयक्तिक नाव आहे. या नावाचे विशिष्ट मूळ अज्ञात आहे, परंतु हे बहुधा "असणे" असा अर्थ असलेल्या इब्री क्रियापासून आले आहे.

  • परंपरेला अनुसरून, अनेक बायबल आवृत्त्या "यहोवास" दर्शविण्यासाठी "परमेश्वर" किंवा "प्रभू" या संज्ञेचा वापर करतात.
  • "यहोवा" च्या संभाव्य अर्थामध्ये, "तो आहे" किंवा "मी आहे" किंवा "एक जो हे सर्व होण्यामागे कारणीभूत आहे" या साज्ञांचा समावेश होतो. या परंपरेचा परिणाम असा झाला की ऐतिहासिकदृष्ट्या, यहुदी लोक यहोवाच्या नावाचा चुकीचा उच्चार करण्याबद्दल भीती बाळगू लागले आणि प्रत्येक वेळी “यहोवा” ही संज्ञा मजकुरामध्ये आली की "परमेश्वर" असे म्हणू लागले. आधुनिक बायबल देवाच्या वैयक्तिक नावाबद्दल आदर दर्शविण्यासाठी आणि "प्रभु" या भिन्न इब्री शब्दापासून वेगळे करण्यासाठी मोठ्या अक्षरांमध्ये "परमेश्वर" असे लिहिते.
  • यूएलटी आणि यूएसटी मजकुर जुन्या करारातील इब्री मजकुराशी असलेल्या सहमतीत या संज्ञेचे भाषांतर, " यहोवा" असे म्हणून नेहमी करतात.
  • "यहोवा" ही संज्ञा नवीन कराराच्या मूळ मजकुरामध्ये कधीच आढळत नाही; जुन्या कराराचा उल्लेख होत असला तरीही, "प्रभू" यासाठी असलेल्या केवळ ग्रीक संज्ञेचा वापर केला जातो.
  • जुन्या करारात, जेव्हा देव स्वतःबद्दल बोलत असे, तेव्हा तो सर्वनामाऐवजी त्याचे नाव वापरत असे.

भाषांतर सूचना

  • "यहोवा" याचे भाषांतर शब्द किंवा वाक्यांश ज्याचा अर्थ "मी आहे" किंवा "जिवंत" किंवा "जो आहे" किंवा "जो जिवंत आहे" याद्वारे केला जाऊ शकतो.
  • हा शब्द जसे "यहोवा" या नावाचे शब्दलेखण आहे, त्या प्रमाणेच लिहिले जाऊ शकतात.
  • काही चर्च संप्रदाय "यहोवा" हा शब्द न वापरणे पसंत करतात आणि त्याऐवजी पारंपारिक प्रस्तुतीकरण "परमेश्वर" या शब्दाचा वापर करतात. एक महत्त्वाचा विचार म्हणजे मोठ्याने वाचताना हे गोंधळात टाकणारे असू शकते कारण ते "प्रभु" या शीर्षकासारखेच वाटेल. काही भाषांमध्ये एक प्रत्यय किंवा इतर व्याकरण चिन्हक असू शकतात जे नाव म्हणून "परमेश्वर" या शब्दाचे (यहोवा) शीर्षक म्हणून "प्रभू" या शब्दापासून वेगळे करण्यासाठी जोडले जाऊ शकते.
  • जर शक्य असेल तर यहोवा हे नाव मजकूरात शब्दश: येते तिथे ठेवणे उत्तम आहे, परंतु काही भाषांतरे मजकूर अधिक नैसर्गिक आणि स्पष्ट करण्यासाठी काही ठिकाणी फक्त सर्वनाम वापरण्याचे ठरवू शकतात.
  • "परमेश्वर असे म्हणतो" असे काहीतरी परिचयासाठी उद्धृत करा.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: देव, परमेश्वर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • ९:१४ देव म्हणाला, "मी आहे तो आहे. त्यांना सांग, ‘मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे.’ त्यांना हेही सांग की, मी यहोवा त्यांच्या पूर्वजांचा अब्राहाम, इसहाक व याकोबा यांचा देव आहे. हेच माझे सनातन नाव आहे.' "
  • १३:४ मग देवाने त्यांना ही वचने दिली व म्हणाला, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडविले. अन्य देवतांची उपासना करू नका."
  • १३:५ "आपल्यासाठी कोरीव मुर्ती करू नका व तिच्या पाया पडू नका, कारण मी, यहोवा, तुझा देव ईर्षावान देव आहे.
  • १६:१ इस्राएली लोक खरा देव, यहोवा याच्याऐवजी कनानी देवतांची उपासना करू लागले.
  • १९:१० मग एलीयाने प्रार्थना केली,‘‘हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या देवा, इस्त्राएलामध्ये तूच देव आहेस व मी तुझा सेवक आहे हे आज आम्हास दाखव."

शब्द समुह:

  • स्ट्रोंग: एच3050, एच3068, एच3069

याजक, पुरोहित

व्याख्या:

बायबलमध्ये, एक याजक अशी व्यक्ती होती जी देवाच्या लोकांच्या वतीने देवाला अर्पण करण्यासाठी निवडली गेली होती. "पुरोहितपद" हे पुजारी असण्याच्या पदाचे किंवा स्थितीचे नाव होते.

  • जुन्या करारात, देवाने अहरोन आणि त्याच्या वंशजांना इस्राएल लोकांसाठी त्याचे याजक म्हणून निवडले.
  • “याजकत्व” हा अधिकार आणि जबाबदारी होती जी लेवी कुळातील पित्याकडून पुत्राकडे दिली गेली.
  • मंदिरातील इतर कर्तव्यांसह देवाला लोकांचे बलिदान अर्पण करण्याची जबाबदारी इस्राएली याजकांकडे होती.
  • याजकांनी देखील आपल्या लोकांच्या वतीने देवाला नियमित प्रार्थना केली आणि इतर धार्मिक विधी केले.
  • याजकांनी लोकांवर औपचारिक आशीर्वाद दिला आणि त्यांना देवाचे नियम शिकवले.
  • येशूच्या काळात, मुख्य याजक आणि महायाजकांसह विविध स्तरावरील याजक होते.
  • येशू हा आपला “महान महायाजक” आहे जो देवाच्या उपस्थितीत आपल्यासाठी मध्यस्थी करतो. त्याने स्वतःला पापासाठी अंतिम यज्ञ म्हणून अर्पण केले. याचा अर्थ असा की मानवी पुरोहितांनी केलेल्या त्यागांची आता गरज नाही.
  • नवीन करारामध्ये, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला "याजक" म्हटले आहे जो स्वतःसाठी आणि इतर लोकांसाठी मध्यस्थी करण्यासाठी थेट देवाकडे प्रार्थना करू शकतो.
  • प्राचीन काळी, मूर्तिपूजक पुजारी देखील होते जे बाल सारख्या खोट्या दैवतांना अर्पण करायचे.

भाषांतर सूचना

  • संदर्भानुसार, "याजक" या शब्दाचे भाषांतर "बलिदान देणारी व्यक्ती" किंवा "देवाचा मध्यस्थ" किंवा "बलिदान देणारा मध्यस्थ" किंवा "देव त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती" असे केले जाऊ शकते.
  • “पुजारी” चे भाषांतर “मध्यस्थ” च्या भाषांतरापेक्षा वेगळे असावे.
  • काही भाषांतरे नेहमी "इस्राएली पुजारी" किंवा "ज्यू पुजारी" किंवा "यहोवाचा पुजारी" किंवा "बालचा पुजारी" असे काहीतरी म्हणणे पसंत करतात हे स्पष्ट करण्यासाठी की हे आधुनिक काळातील पुजारी यांच्याशी संबंधित नाही.
  • "याजक" चे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द "मुख्य याजक" आणि "महायाजक" आणि "लेवी" आणि "संदेष्टा" या शब्दांपेक्षा वेगळा असावा.

(हे देखील पाहा: अहरोन, मुख्य याजक, महायाजक, मध्यस्थ, बलिदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 4:7 "मलकीसदेकास परात्पर देवाचा याजक"
  • 13:9 देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारा प्रत्येक जण निवासमंडपा समोर असणा-या वेदीवर देवाला होमार्पण करण्यासाठी पशू आणू शकत असे. याजक त्या पशूस मारून त्याचे वेदीवर होमार्पण करत असे. त्या पशूच्या रक्ताद्वारे त्या व्यक्तीचे पाप झाकले जाऊन ती व्यक्ति देवाच्या दृष्टीने शुद्ध ठरत असे. मोशेचा भाऊ अहरोन व अहरोनाचे संतान यांना देवाने आपले याजक म्हणून निवडले.
  • 19:7 अशा प्रकारे बालदेवतेच्या याजकांनी होमार्पण तयार केले पण त्यास आग लावली नाही.
  • 21:7 इस्राएली याजक लोकांनी केलेल्या पापाच्या शिक्षेचे प्रायश्चित म्हणून देवाला होमार्पणे करत असत. याजक लोकांसाठी देवाला प्रार्थनाही करत असत.

शब्द माहीती:

  • स्ट्रोगं: एच3547, एच3548, एच3549, एच3550, जी748, जी749, जी2405, जी2406, जा2407, जी2409, जी24200

येशू, येशू ख्रिस्त, ख्रिस्त येशू

तथ्य

येशू देवाचा पुत्र आहे. “येशू” नावाचा अर्थ “परमेश्वर वाचवितो” असा आहे “ख्रिस्त” हा शब्द एक शीर्षक आहे ज्याचा अर्थ “अभिषिक्त” असा आहे आणि मसीहासाठी तो आणखी शब्द आहे.

  • दोन नावे सहसा एकत्रित केली जातात जसे “येशू ख्रिस्त” किंवा “ख्रिस्त येशू”. ही नावे स्पष्टपणे सांगतात की देवाचा पुत्र मसीहा आहे, जो लोकांच्या पापांच्या शिक्षेपासून त्यांना वाचविण्यासाठी आला.
  • चमत्कारिक मार्गाने, पवित्र आत्म्यामुळे देवाचा सनातन पुत्र मनुष्य म्हणून जन्माला आला. त्याच्या आईला एका देवदूताने त्याला “येशू” हे नाव देण्यास सांगितले कारण तो लोकांना त्यांच्या पापांपासून वाचविणार होता.
  • येशूने अनेक चमत्कार केले ज्यावरून तो देव आहे आणि तो ख्रिस्त किंवा मसीहा आहे हे उघड झाले.

भाषांतरातील सूचना:

  • बर्‍याच भाषांमध्ये "येशू" आणि "ख्रिस्त" या नावाचे लिखाण अशा प्रकारे केले जाते जे ध्वनी किंवा शब्दलेखन शक्य तितक्या मूळच्या जवळ ठेवतात. उदाहरणार्थ, “जेशूक्रिस्तो,” “जेझस क्रिस्टस,” “येसूस क्रिस्टुस” आणि “हेसुक्रिस्टो” ही नावे वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित केले जाते त्याचे काही प्रकार आहेत.
  • “ख्रिस्त” या शब्दासाठी काही अनुवादक संपूर्ण काळात “मसीहा” या शब्दाचे काही रूप वापरणे पसंत करतात.
  • ही नावे जवळच्या स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत कशी लिहिली जातात याचा विचार देखील करा.

(भाषांतरातील सूचना: [नावे भाषांतरित कसे करावे])

(See also: ख्रिस्त, देव, देव जो पिता, महायाजक, देवाचे राज्य, मरीया, तारणारा, देवाचा पुत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 22:4 देवदूत म्हणाला, “तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल; तू त्याचे नाव येशू ठेव आणि तो मसीहा होईल. ”
  • 23:2“त्याचे नाव येशू ठेव (याचा अर्थ असा की, 'परमेश्वर वाचवितो'), कारण तो लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवेल.”
  • 24:7 जरी येशूने कधीच पाप केले नव्हते, तरी योहानाने त्याला (येशू) बाप्तिस्मा दिला, .
  • 24:9 एकच देव आहे. परंतु योहान देव पित्याचे बोलणे ऐकले आणि जेव्हा त्याने येशूला बाप्तीस्मा दिला तेव्हा त्याने येशू जो पुत्र व पवित्र आत्मा यांना पाहिले.
  • 25:8 येशू सैतानाच्या मोहात पडला नाही, म्हणून सैतानाने त्याला सोडून गेला.
  • 26:8 नंतर येशू गालील प्रांतात फिरला व मोठा लोकसमुदाय त्याच्याकडे आला. त्यांनी आजारी किंवा पंगू , अश्या बऱ्याच लोकांना आणले, त्यामध्ये जे पाहू, चालू , ऐकू किंवा बोलू शकत नव्हते अशा लोकांचा समावेश होता आणि येशूने त्यांना बरे केले.
  • 31:3 मग येशू प्रार्थना संपवून शिष्यांकडे गेला. पाण्यावर चालून तलावा पलीकडे त्यांच्या नावेकडे गेला.
  • 38:2 त्याला (यहुदाला) ठाऊक होते की यहुदी पुढाऱ्यांनी हे नाकारले की येशू हा मसीहा आहे आणि ते त्याला ठार मारण्याचा कट रचत आहेत.
  • 40:8 त्याच्या मृत्यूद्वारे, येशूने लोकांसाठी देवाकडे जाण्याचा मार्ग खुला केला.
  • 42:11 मग येशूला स्वर्गात वर घेण्यात आले आणि ढगांनी त्याला त्यांच्या नजरे आड केले. येशू सर्व गोष्टींवर राज्य करण्यासाठी देवाच्या उजवीकडे बसला आहे.
  • 50:17 येशू व त्याचे लोक नवीन पृथ्वीवर राहतील आणि अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींवर तो कायमचा राज्य करील. तो प्रत्येक अश्रू पुसून टाकील आणि यापुढे दु: ख, निराशा, रडणे, वाईट, वेदना किंवा मृत्यू  राहणार नाही. येशू शांतता व न्यायाने त्याच्या राज्यावर शासन करील, आणि तो आपल्या लोकांबरोबर सर्वदा राहील.

शब्द संख्या:

  • स्ट्रोंग: जी24240, जी55470

योग्य, योग्यता, अयोग्य, निरर्थक

व्याख्या:

"योग्य" या शब्दामध्ये एखाद्याचे किंवा अशा गोष्टीचे वर्णन केले आहे जे आदर किंवा सन्मानास पात्र आहे. "योग्यतेचा" असणे म्हणजे मौल्यवान किंवा महत्वाचे असणे. "अयोग्य" या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याचे काही मूल्य नाही.

  • पात्र असणे हे मौल्यवान किंवा महत्वाचे असण्याशी संबंधित आहे
  • "अयोग्य" असणे म्हणजे कोणत्याही विशेष सूचनेस पात्र नसणे होय.
  • योग्य न वाटणे म्हणजे दुसऱ्यापेक्षा कमी महत्वाचे वाटणे किंवा सन्मानाने किंवा दयाळूपणे वागण्याच्या पात्र नाही असे वाटणे.
  • "अयोग्य" आणि "निरर्थक" हे शब्द संबंधित आहेत, परंतु यांचा भिन्न अर्थ आहे. "अयोग्य" असणे म्हणजे कोणत्याही सन्मान किंवा मान्यतेस पात्र नसणे होय. "निरर्थक" असणे म्हणजे कोणतेही हेतू किंवा मूल्य नसणे.

भाषांतरातील सूचना:

  • "योग्य" या शब्दाचे भाषांतर "पात्र" किंवा "महत्वाचे" किंवा "मौल्यवान" असे म्हणून केले जाऊ शकते
  • “योग्यता” या शब्दाचे भाषांतर "मूल्य" किंवा "महत्त्व" असे केले जाऊ शकते.
  • "योग्यता असणे"या वाक्यांशाचे भाषांतर "मौल्यवान असणे" किंवा "महत्त्वपूर्ण असणे" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.

"पेक्षा अधिक योग्य आहे "या वाक्यांशाचे भाषांतर" पेक्षा अधिक मौल्यवान आहे" असे केले जावू शकते.

  • संदर्भानुसार, "अयोग्य" या शब्दाचे भाषांतर "महत्त्वहीन" किंवा "लाजिरवाणा" किंवा "अपात्र" असे म्हणून देखील केले जाऊ शकते
  • "निरर्थक" या शब्दाचे भाषांतर "मूल्याविना" किंवा "कोणत्याही हेतूशिवाय" किंवा "काहीही योग्य नसलेले" असे म्हणून केले जाऊ शकते

(हे देखील पहा: सन्मान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 117, एच 639, एच 1929, एच 3644, एच 4242, एच 4373, एच 4392, एच 4941, एच 6994, एच 7939, जी 96, जी 515, जी 516, जी 2425

रक्त

व्याख्या:

"रक्त" ही संज्ञा लाल द्रव्यास जे एखाद्या व्यक्तीच्या त्वचेतून दुखापत किंवा जखम झाल्यावर बाहेर येते त्यास संदर्भित करते. रक्त एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीरात जीवनदायी पोषक आणते. बायबलमध्ये, "रक्त" हा शब्द सहसा लाक्षणिक अर्थाने "जीवन" आणि/किंवा इतर अनेक संकल्पनांसाठी वापरला जातो.

  • जेंव्हा लोक देवाला बलिदान अर्पण करतात, ते प्राण्याला मारतात आणि त्याचे रक्त वेदीवर ओततात. हे लोकांच्या पापाची किंमत म्हणून प्राण्यांच्या जीवनाच्या बलिदानास चिन्हांकित करते.
  • "मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचा संदर्भ मनुष्याशी आहे.
  • "स्वतःचे मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचा संदर्भ जैविकदृष्ट्या संबंधित असलेल्या मनुष्याशी आहे.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर लक्षित भाषेमध्ये करताना रक्तासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा उपयोग करून केले जाऊ शकते.
  • "मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचे भाषांतर "लोक" किंवा "मनुष्य" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "माझे स्वतःचे मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचे भाषांतर "माझे स्वतःचे कुटुंब" किंवा "माझे स्वतःचे नातेवाईक" किंवा "माझे स्वतःचे लोक" असे केले जाऊ शकते.
  • लक्षित भाषेत जर या अर्थाने वापरलेली अभिव्यक्ती असेल तर ती अभिव्यक्ती "मांस आणि रक्त" या अभिव्यक्तीचे भाषांतर करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

(हे देखील पाहा: हत्या; मांस; जिवन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • ८:३ योसेफाचे भाऊ घरी परतण्यापूर्वी, त्यांनी योसेफाचा झगा फाडला व बकऱ्याच्या रक्तात बुडविला.
  • १०:३ देवाने निल नदीला रक्तात रूपांतरीत केले, पण तरीही फारोने इस्राएलास जाऊ दिले नाही.
  • ११:५ इस्राएलाच्या सर्व घरांच्या चौकटीवर कोक-याचे रक्त लावले होते, जेणेकरून देव त्या घरांना ओलांडून गेला तरी त्या घरातील सर्वजण सुरक्षित होते. कोक-याच्या रक्तामुळे त्यांचा बचाव झाला.
  • १३:९ अर्पिलेल्या पशूच्या रक्ताद्वारे व्यक्तीचे पाप झाकले गेले आणि ती व्यक्ति देवाच्या दृष्टीने शुद्ध केली गेली.
  • ३८:५ मग येशूने एक प्याला घेऊन म्हटले, ‘‘ ह्यातुन प्या. हा माझे नव्या कराराचे रक्त आहे जे अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे.
  • ४८:१० जेव्हा कोणी येशूवर विश्वास ठेवितो, तेव्हा येशूचे रक्त त्या व्यक्तीचे पापा काढून टाकते,आणि देवाची शिक्षा त्याच्यावरून ओलांडून जाते.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच1818, एच5332, जी01290, जी01300, जी01310

वचन, वचन दिले

व्याख्या:

जेव्हा क्रियापद म्हणून वापरला जातो तेव्हा, “अभिवचन” हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या कृतीचा संदर्भ देतो की तो असे काही करेल की त्याने जे सांगितले ते पूर्ण करण्यास तो स्वतःला बांधील आहे. एक संज्ञा म्हणून वापरल्यास, "अभिवचन" हा शब्द एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करण्यासाठी स्वत: ला बंधनकारक करतो

  • पवित्र शास्त्रात देवाने आपल्या लोकांना दिलेल्या अनेक अभिवचनांची नोंद आहे.
  • अभिवचने कराराप्रमाणे औपचारिक वचनांचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

भाषांतरातील सूचना:

  • "वचन" या शब्दाचे भाषांतर "वचनबद्धता" किंवा "आश्वासन" किंवा "हमी" असे केले जाऊ शकते
  • "काहीतरी करण्याचे वचन देणे” असे भाषांतर केले जाऊ शकते "एखाद्याला आश्वासन द्या की आपण काहीतरी कराल" किंवा “काहीतरी करण्यास वचनबद्ध व्हा."

(हे देखील पाहा: करार, शपथ, नवस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 3:15 देव म्हणाला, "मी अभिवचन देतो की लोकांनी वाईट गोष्टी केल्यामुळे मी पुन्हा कधीही पृथ्वीला शाप देणार नाही, किंवा प्रलयाने जगाचा नाश करणार नाही, जरी लोक बालक असल्यापासून पापी असले तरीही. "
  • 3:16 त्यानंतर देवाने त्याच्या अभिवचनाचे प्रथम चिन्ह म्हणून इंद्रधनुष्य बनविला. प्रत्येक वेळी इंद्रधनुष्य आकाशात दिसू लागल्यावर देवाला त्याने केलेल्या अभिवचनाची आठवण होत असेल आणि त्याच्या लोकांनाही ते आठवत असेल.
  • 4:8 देव अब्रामाशी बोलला आणि पुन्हा अभिवचन दिले की त्याला मुलगा होईल आणि आकाशातील तारे इतके त्याचे संतती होईल. अब्रामाचा विश्वास देवाच्या अभिवचनावर होता.
  • 5:4 "तुझी पत्नी सारा हिला पुत्र होईल – तो अभिवचनाचा पुत्र होईल."
  • 8:15 देवाने अब्राहामाला दिलेले कराराचे अभिवचने इसहाक, त्यानंतर याकोब आणि त्यानंतर याकोबाचे बारा मुलगे व त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले.
  • 17:14 दाविद देवाशी अविश्वासु ठरला असला तरी देव अजूनही त्याला दिलेल्या अभिवचनाबद्दल विश्वासू होता.
  • 50:1 येशूने अभिवचन दिले की तो जगाच्या शेवटी परत येईल. तो अद्याप परत आला नसला तरी, तो आपले अभिवचन पाळेल.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0559, H0562, H1696, H8569, G18430, G18600, G18610, G18620, G36700, G42790

वचनदत्त भूमी

तथ्य:

"वचनदत्त भूमी" हा शब्द फक्त पवित्र शास्त्राच्या कथामध्येच आढळतो, पवित्र शास्त्राच्या माजकुरांमध्ये येत नाही. हा कनानच्या भूमीला संदर्भित करण्याचा एक पर्यायी मार्ग आहे, ज्याला देवाने अब्राहमला आणि त्याच्या वंशजांना देण्याचे वचन दिले होते.

  • जेंव्हा अब्राहम ऊर शहरात राहत होता, तेंव्हा देवाने त्याला कनानमध्ये जाऊन राहण्याची आज्ञा दिली. तो आणि त्याचे वंशज, इस्राएली लोक, तेथे बऱ्याच वर्षापर्यंत राहिले.
  • जेंव्हा कडाक्याच्या दुष्काळामुळे कनानमध्ये काहीच अन्न शिल्लक राहिले नाही, तेंव्हा इस्राएली लोक मिसरला गेले.
  • चारशे वर्षानंतर, देवाने इस्राएल लोकांना मिसरच्या गुलामगिरीतून मुक्त केले, आणि त्यांना परत कनानला घेऊन आला, जी भूमी देवाने त्यांना देण्याचे वचन दिले होते.

भाषांतर सूचना

  • "वचनदत्त भूमी" या शब्दाचे भाषांतर "अशी भूमी जीला देवाने अब्राहामास देतो असे सांगितले होते" किंवा "अशी भूमी जीला देण्याचे वचन देवाने अब्राहमला दिले होते" किंवा "अशी भूमी जिचे वचन देवाने त्याच्या लोकांना दिले होते" किंवा "कनानची भूमी" असे केले जाऊ शकते.
  • पवित्र शास्त्रातील मजकुरात, हा शब्द "देवाने वचन दिलेली भूमी" या प्रकारच्या स्वरुपात देखील आढळतो.

(हे सुद्धा पहा: कनान, वचन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 12:01 आता ते गुलाम नव्हते, ते आता वचनदत्त भूमीकडे वाटचाल करत होते!
  • 14:01 देवाने इस्राएल लोकांशी केलेल्या कराराचा भाग म्हणून जे नियम त्यांना पाळण्यासाठी दिले होते ते सांगून झाल्यानंतर त्यांनी सीनाय पर्वत सोडला. देव त्यांना वचनदत्त देशाकडे, ज्याला कनान देश सुदधा म्हटले जायचे त्याकडे त्यांना घेऊन जात होता.
  • 14:02 देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते की त्यांच्या वंशजांना तो वचनदत्त देश देईल, पण आता त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक राहत होते.
  • 14:14 मग देवाने लोकांस पुन्हा त्या वचनदत्त देशाकडे येण्यास त्यांचे मार्गदर्शन केले.
  • 15:02 इस्राएलांना वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्यासाठी यार्देन नदी पार करणे अगत्याचे होते.
  • 15:12 या लढाईनंतर देवाने इस्राएलाच्या प्रत्येक वंशास वचनदत्त देशाची वाटणी करुन दिली.
  • 20:09 हयाच कालावधित जेंव्हा देवाच्या लोकांस वचनदत्त देश सोडून जाण्यास सक्ति करण्यात आली, त्यास पाडाव- हद्दपारी असे म्हणतात.

Strong's: H776, H3068, H3423, H5159, H5414, H7650


वतन, वारसा, वारस

व्याख्या:

"वतन" ही संज्ञा आईवडिलांच्या मृत्यूनंतर पालकांकडून मौल्यवान काहीतरी प्राप्त होण्याला संदर्भित करते. ही संंज्ञा त्या व्यक्तीशी असलेल्या विशेष नात्यामुळे एखाद्या अन्य व्यक्तीकडून मौल्यवान काहीतरी प्राप्त करण्यास देखील संदर्भित असू शकते. "वारसा" म्हणजे प्राप्त झालेल्या गोष्टी आणि "वारस" ही अशी व्यक्ती आहे जी वारसा घेते.

  • मिळणारा भौतिक वारसा पैसा, जमीन किंवा इतर प्रकारची मालमत्ता असू शकते.
  • देवाने अब्राहम आणि त्याच्या वंशजांना अभिवचन दिले की ते कनान देशाचे वारस होतील, ते कायमचे त्यांच्या मालकीचे असेल.

भाषांतर सुचना:

  • नेहमीप्रमाणे, आधी वारस किंवा वारसा या संकल्पनेसाठी लक्ष्य भाषेत संज्ञा आहेत की नाही याचा प्रथम विचार करा आणि त्या संज्ञा वापरा.
  • संदर्भावर अवलंबून, "वतन" या शब्दाचे भाषांतर केले जाणाऱ्या इतर पध्दतीमध्ये "प्राप्त करणे" किंवा "ताब्यात घेणे" किंवा "ताब्यात येणे" यांचा समावेश असू शकतो.
  • "वारसा" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "वचनदत्त भेट" किंवा "सुरक्षित ताबा" यांचा समावेश असू शकतो.
  • "वारस" या शब्दाचे भाषांतर एका शब्दासह किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते ज्याचा अर्थ "वडिलांची मालमत्ता प्राप्त करणारा विशेषाधिकार प्राप्त मुलगा."
  • "वारसा" या शब्दाचे भाषांतर "वारशाने मिळालेले आशीर्वाद" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: वारस, कनान, वचनदत्त देश, ताब्यात घेणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

4:6 अब्राम कनानमध्ये आला तेव्हा देव म्हणाला, “आपल्या आजूबाजूला पाहा. मी तुला आणि तुझ्या वंशजांना सर्व जमीन देईन जी तुम्हाला ___वारसा__ म्हणून दिसेल.

  • 27:1 एके दिवशी, यहूदी धर्मशास्त्रात पारंगत असलेला एक व्यक्ती येशूची परिक्षा पाहण्यासाठी येऊन म्हणाला,‘‘गुरुजी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय करावे?’’
  • 35:3 ‘‘एका मनुष्यास दोन पुत्र होते. धाकटया पुत्राने त्याकडे जाऊन म्हटले, ‘‘बापा, माझे वतन मला आत्ता द्या’’ यास्तव पित्याने आपल्या संपत्तीला दोन मुलांमध्ये विभागले.

Word Data:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच2490, एच2506, एच3423, एच3425, एच4181, एच5157, एच5159, जी28160, जी28170, जी28190, जी28200

वधस्तंभ

व्याख्या:

पवित्रशास्त्राच्या काळात, वधस्तंभ जमिनीमध्ये अडकवलेला एक सरळ लाकडी खांब होता, ज्याच्या वरच्या बाजूला एक आडवी लाकडी तुळई जोडलेली होता.

  • रोमी साम्राज्याच्या काळात, रोमी सरकार गुन्हेगारांना वधस्तंभावर बांधून किंवा खिळून शिक्षा देत असे व त्यांना तिथे मरण्यासाठी सोडून देत असे.
  • येशूवर त्याने न केलेल्या गुन्ह्यांचा खोटा आरोप झाला आणि रोमी लोकांनी त्याला वधस्तंभावर खिळून मारले.
  • लक्षात घ्या की हा "ओलांडणे" या क्रियापदापासून पूर्णपणे वेगळा शब्द आहे ज्याचा अर्थ नदी किंवा तलावासारख्या एखाद्या गोष्टीच्या दुसऱ्या बाजूला जाणे असा होतो.

भाषांतर सूचना

  • क्रुसाच्या आकारास संदर्भित लक्ष्यित भाषेतील संज्ञा वापरून या संज्ञेचे भाषांतर केले जाऊ शकते.
  • "शिक्षेचा खांब" किंवा "मृत्यूचे झाड" यासारख्या वाक्यांशांचा वापर करून ज्यावर लोक मारले गेले त्या वधस्तंभाचे वर्णन करण्याचा विचार करा.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत पवित्रशास्त्राच्या भाषांतरात हा शब्द कसा भाषांतरीत केला जातो याचा विचार करा. (पाहा: अज्ञातांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: खिळणे, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 40:01 सैनिकांनी येशूची थट्टा उडविल्यानंतर, ते त्यास वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यासाठी घेऊन गेले. ज्या वधस्तंभावर त्यास मारावयाचे होते तो वधस्तंभ त्यांनी त्याच्या खांद्यावर दिला.
  • 40:02 तेंव्हा ‘‘कवटी’’ नाव असलेल्या ठिकाणी ते त्याला घेऊन आले आणि त्यांनी येशूच्या हाता व पाया क्रुसावर खिळले.
  • 40:05 यहूदी पुढारी व जमावातील इतर लोकांनीही येशूची थट्टा केली. ते त्यास म्हणाले, ‘‘जर तू देवाचा पुत्र आहेस तर वधस्तंभावरुन खाली उतरुन ये व स्वत:चा बचाव कर! म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू.’’
  • 49:10 जेंव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला, तेंव्हा त्याने तुमची शिक्षा स्वतःवर घेतली.
  • 49:12 तुम्ही असा विश्वास धरिला पाहिजे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, व देवाने त्यास पुन्हा जिवंत केले आहे.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी4716

वधस्तंभावर खिळणे, वधस्तंभावर खिळलेला

व्याख्या:

"वधस्तंभावर खिळणे" म्हणजे एखाद्याला वधस्तंभाला जोडून ठेवणे आणि तेथे त्याला दुःख सोसण्यासाठी आणि मोठ्या वेदनेत मरण्यासाठी सोडून देण्याची अंमलबजावणी करणे.

  • पीडितांना एक तर वधस्तंभाशी बांधले जायचे किंवा खिळले जायचे. वधस्तंभावरील लोक रक्त जाऊन किंवा गुदमरून मरायचे.
  • जे भयंकर गुन्हेगार होते, किंवा ज्यांनी सरकारच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बंड केले होते, अशा लोकांच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यांना मारण्यासाठी, प्राचीन रोमी सम्राट वारंवार या पद्धतीचा अवलंब करत होते.
  • यहुदी धर्मपुढाऱ्यांनी रोमी अधिकाऱ्यांना त्यांच्या सैनिकांना येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा करण्यास सांगितले. सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिळले. त्याने तेथे सहा तास त्रास सहन केला आणि नंतर तो मेला.

भाषांतर सूचना

  • "वधस्तंभावर खिळणे" या शब्दाचे भाषांतर "वधस्तंभावर मारणे" किंवा "वधस्तंभावर खिळून मरणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: वधस्तंभ, रोमी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 39:11 परन्तु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठयाने ओरडले, ‘‘त्याला वधस्तंभावर खिळून टाका!’’
  • 39:12 जमाव आपल्या विरुध्द बंड पुकारील अशी पिलातास भिती वाटली व त्याने आपल्या सैनिकांस येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा दिली.
  • 40:01 सैनिकांनी येशूची थट्टा उडविल्यानंतर, ते त्यास वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यासाठी घेऊन गेले. ज्या वधस्तंभावर त्यास मारावयाचे होते तो वधस्तंभ त्यांनी त्याच्या खांद्यावर दिला.
  • 40:04 येशूला दोन लुटारुंच्या मधोमध वधस्तंभावर खिळण्यात आले.
  • 43:06 "अहो इस्राएल लोकांनो, येशूने देवाच्या शक्तिद्वारे अनेक चिन्हे व अद्भुत कार्ये केली, जी तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिली व तुम्हाला माहीत आहेत. पण तुम्ही त्यास वधस्तंभावर खिळले!"
  • 43:09 "तुम्ही येशू या मनुष्यास, वधस्तंभावर खिळले.
  • 44:08 पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरा होऊन तुम्हापुढे उभा आहे. * तुम्ही येशूला खिळले, परंतु देवाने त्यास पुन्हा जिवंत केले!

शब्द माहीती

  • Strong's: G388, G4362, G4717, G4957

वल्हांडण

तथ्य:

देवाने त्यांच्या पूर्वजांना, इस्त्रायलींना इजिप्तमधील गुलामगिरीतून कसे सोडवले हे लक्षात ठेवण्यासाठी, ज्यू दरवर्षी साजरे करणार्‍या धार्मिक सणाचे नाव“वल्हांडण”.

  • या सणाचे नाव या वस्तुस्थितीवरून आले आहे की देवाने इस्राएल लोकांची घरे “ओलांडली” आणि इजिप्तशयन लोकांच्या प्रथम जन्मलेल्या मुलांना मारले तेव्हा त्याने त्यांच्या मुलांना मारले नाही.
  • वल्हांडणाच्या उत्सवात त्यांनी मारलेल्या आणि भाजलेल्या परिपूर्ण कोकर्याचे खास जेवण तसेच यीस्टशिवाय बनवलेली भाकर यांचा समावेश होतो. हे खाद्यपदार्थ त्यांना इजिप्तमधून पळून जाण्याच्या आदल्या रात्री इस्राएल लोकांनी खाल्लेल्या जेवणाची आठवण करून देतात.
  • देवाने इस्राएली लोकांना हे जेवण दर वर्षी खाण्यास सांगितले जेणेकरून देवाने त्यांची घरे कशी “ओलांडली” आणि त्यांनी त्यांना इजिप्तमधील गुलामगिरीतून कसे मुक्त केले हे लक्षात ठेवण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी.

भाषांतर सूचना

  • "वल्हांडण सण"या शब्दाचे भाषांतर "पास" आणि "संपले" या शब्दांच्या संयोगाने किंवा हा अर्थ असलेल्या शब्दांच्या दुसर्‍या संयोजनाने केले जाऊ शकते.
  • इस्राएल लोकांच्या घराजवळून जाताना आणि त्यांच्या मुलांना वाचवताना परमेश्वराच्या देवदूताने काय केले हे स्पष्ट करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या शब्दांशी या सणाच्या नावाचा स्पष्ट संबंध असल्यास ते उपयुक्त आहे.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 12:14 देवाने इस्राएलाला मिसरी लोकांवर कसा विजय दिला व त्यांची गुलामगिरीपासून कशी सुटका केली याचे स्मरण त्यांना राहावे म्हणून देवाने इस्राएलास दरवर्षी वल्हांडण सण साजरा करण्याची आज्ञा दिली.
  • 38:1 दरवर्षी, यहूदी वल्हांडण सण साजरा करत असत. देवाने मिसर देशातील गुलामगिरीतून शेकडोवर्षापुर्वी त्यांच्या पुर्वजांची कशी सुटका केली, याचा आनंद साजरा करण्यासाठी यहूदी लोक हा सण पाळत.
  • 38:4 यरुशलेमध्ये, येशूने आपल्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा केला.
  • 48:9 जेव्हा देवाने ते रक्त पाहिले, तेव्हा त्यांचे घर ओलांडून तो गेला व प्रथम जन्मलेल्या पुत्रांस त्याने मारले नाही. या घटनेस वल्हांडण म्हणतात.
  • 48:10 येशू ख्रिस्त हाच आमच्या वल्हांडणाचा कोकरा आहे. तो परिपुर्ण व निर्दोष होता आणि वल्हांडणाच्या सणाच्या समयी वधला गेला होता.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच6453, जी39570

वाईट, दुष्ट, अप्रिय

व्याख्या:

बायबलमध्ये, “वाईट” हा शब्द एकतर नैतिक दुष्टपणा किंवा भावनिक अप्रियता याच्या संकल्पनेला सूचित करतो. संदर्भ सामान्यत: संदर्भ सहसा स्पष्ट करेल की शब्दाच्या विशिष्ट उदाहरणामध्ये कोणता अर्थ अभिप्रेत आहे.

  • “वाईट” ही संज्ञा एखाद्या व्यक्तीच्या स्वरूपाचे वर्णन करू शकत असली तरी, “दुष्ट” ही संज्ञा एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीचा अधिक उल्लेख करते. तथापि, दोन्ही संज्ञा अर्थाने सारख्याच आहेत. “दुष्टपणा” हा शब्द लोक जेव्हा वाईट गोष्टी करतात तेव्हा त्यांच्या अस्तित्वाच्या स्थितीला संदर्भित करते.
  • "दुष्टता" हा शब्द लोक दुष्ट गोष्टी करतात तेव्हा अस्तित्वात असलेल्या स्थितीला सूचित करतो
  • लोकांना ठार मारणे, चोरी करणे, निंदा करणे आणि क्रूर व निर्दयीपणा याद्वारे लोक इतरांशी कसा अत्याचार करतात यामध्ये वाईट गोष्टींचे परिणाम स्पष्टपणे दर्शविलेले आहेत.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, “वाईट” आणि “दुष्ट” या शब्दांचे भाषांतर “वाईट” किंवा “पापी” किंवा “अनैतिक” म्हणून केले जाऊ शकते.
  • याचा अनुवाद करण्याच्या इतर मार्गांमध्ये “चांगले नसणे” किंवा “नीतिमान नसणे” किंवा “नैतिक नसणे” यांचा समावेश असू शकतो.
  • या शब्दांचे भाषांतर करण्यासाठी वापरले जाणारे शब्द किंवा वाक्ये लक्ष्य भाषेतील नैसर्गिक संदर्भात योग्य आहेत याची खात्री करा.

(हे देखील पाहा: अवज्ञा करणे, पाप, बरे, नीतिमान, दुष्ट)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 2:4 "देवाला माहीत आहे की तुम्ही ते खाल्ल्याबरोबर, तुम्ही देवासारखे व्हाल आणि त्याच्यासारखे तुम्हाला बरे आणि वाईट समजेल."
  • 3:1 बर्‍याच काळानंतर, बरेच लोक जगात राहत होते. ते खूपच दुष्ट आणि हिंसक बनले होते.
  • 3:2 पण नोहावर देवाची कृपा झाली. तो दुष्ट लोकांमध्ये राहणारा एक नीतिमान मनुष्य होता.
  • 4:2 देवाने पाहिले की जर ते सर्व वाईट करण्यासाठी एकत्र काम करत राहिले तर ते आणखी अनेक पापी गोष्टी करू शकतात.
  • 8:12 "जेव्हा तुम्ही मला गुलाम म्हणून विकले तेव्हा तुम्ही वाईट करण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाने वाईटाचा उपयोग चांगले करण्यासाठी केला!"
  • 14:2 त्यांनी (कनानी लोक) खोट्या देवतांची उपासना केली आणि बर्‍याच वाईट गोष्टी केल्या.
  • 17:1 पण नंतर तो (शौल) देवाची आज्ञा न मानणारा वाईट मनुष्य झाला, म्हणून देवाने एक वेगळा माणूस निवडला जो एक दिवस त्याच्या जागी राजा होईल.
  • 18:11 इस्राएलाच्या नवीन राज्यात सर्व राजे वाईट होते.
  • 29:8 राजा इतका संतापला की त्याने दुष्ट सेवकाला त्याचे सर्व कर्ज फेडेपर्यंत तुरूंगात टाकले.
  • 45:2 ते म्हणाले, “आम्ही त्याला (स्तेफन) मोशे व देवाविषयी वाईट  बोलताना ऐकले!”
  • 50:17 तो (येशू) प्रत्येक अश्रू पुसून टाकील आणि यापुढे दु: ख, निराशा, रडणे, वाईट, वेदना किंवा मृत्यू राहणार नाही.

शब्द संख्या:

  • स्ट्रोंग: एच205, एच605, एच1100, एच1681, एच1942, एच2154, एच2162, एच2254, एच2617, एच3399, एच3415, एच4209, एच4849, एच5753, एच5766, एच5767, एच5999, एच6001, एच6090, एच7451, एच7455, एच7489, एच7561, एच7562, एच7563, एच7564, जी92, जी113, जी459, जी932, जी987, जी988, जी1426, जी2549, जी2551, जी2554, जी2555, जी2556, जी2557, जी2559, जी2560, जी2635, जी2636, जी4151, जी4189, जी4190, जी4191, जी5337

वाचविणे, वाचविले, सुरक्षित, तारण

व्याख्या:

"वाचविणे" या शब्दाचा अर्थ एखाद्याला काहीतरी वाईट किंवा हानी होण्यापासून रोखणे. "सुरक्षित" असणे म्हणजे हानी किंवा धोक्यापासुन संरक्षित होणे.

  • शरीरिक दृष्टीने, लोक नुकसान, धोका किंवा मृत्यूपासून वाचले किंवा सुटले जावू शकतात.
  • अध्यात्मिक दृष्टीने, जर एखाद्या व्यक्तीला "तारले" गेले आहे, तर देवाने, वधस्तंभावरील येशूच्या मृत्यूद्वारे, त्याला क्षमा केली आणि त्याच्या पापाबद्दल त्याला नरकात शिक्षा होण्यापासून वाचवले.
  • लोक धोक्यातून वाचवू किंवा सुटू शकतात, परंतु केवळ देवच लोकांना त्यांच्या पापांबद्दल कायमची शिक्षा होण्यापासून वाचवू शकतो.

"तारण" या शब्दाचा अर्थ असा आहे की वाईट आणि धोका यापासून वाचणे किंवा सुटणे.

  • पवित्र शास्त्रात, "तारण" सामान्यत: जे लोक त्यांच्या पापांबद्दल पश्चात्ताप करतात आणि येशूवर विश्वास ठेवतात त्यांना देवाने दिलेली आध्यात्मिक आणि सार्वकालीक सुटका होय.
  • पवित्रशास्त्र देवाचे आपल्या लोकांना त्यांच्या शारीरिक शत्रूंपासून वाचविणे किंवा मुक्त करणे याविषय देखिल सांगते.

भाषांतरातील सूचना:

  • "तारणे" या संज्ञेचे भाषांतर करण्याच्या मार्गांमध्ये "मुक्त करणे" किंवा "हानीपासून दूर ठेवणे" किंवा "हानीचे मार्ग काढून टाकणे" किंवा” मृत्यूपासून दूर ठेवणे" या वाक्यांशाचा समावेश असू शकतो
  • "जो कोणी आपला जीव वाचवू शकेल" या अभिव्यक्तींमध्ये "तारणे" या शब्दाचे भाषांतर "जपणे" किंवा “रक्षण करणे" असे देखील केले जाऊ शकते
  • "संरक्षित" या शब्दाचे भाषांतर "धोक्यापासून रक्षित" किंवा “ज्या ठिकाणी काहीही नुकसान होऊ शकत नाही अशा ठिकाणी" असे केले जाऊ शकते
  • "तारण" या शब्दाचा अनुवाद "तारणे" किंवा "बचाव करणे" या शब्दाद्वारे केला जाऊ शकतो, जसे "देवाचे तारलेले लोक (त्यांच्या पापांबद्दल शिक्षा होण्यापासून)" किंवा” देवाचा आपल्या लोकांचा बचाव (त्यांच्या शत्रूंपासून)
  • "देव माझे तारण आहे” या वाक्यांशाचा अनुवाद” देवच मला वाचवतो" असा केला जावू शकतो
  • "तू तारणाच्या विहिरीतून पाणी काढशील" या वाक्यांशाचे भाषांतर "देव तुझा बचाव करत असल्यामुळे तू पाण्याने ताजेतवाना होशील."

(हे देखील पाहा: वधस्तंभ, सुटका करणे, शिक्षा करणे, पाप, तारणारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 9:8 मोशेने आपला सह इस्राएली मनुष्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.
  • 11:2 देव त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या पहिल्या मुलाला वाचवण्याचा एक मार्ग प्रदान करतो
  • 12:5 मोशेने इस्राएल लोकांना सांगितले, "घाबरू नका! देव आज तुमच्यासाठी लढा देईल आणि तुमचा बचाव करील. "
  • 12:13 इस्त्राएल लोकांनी त्यांचे नवीन स्वातंत्र्य साजरे करण्यासाठी आणि देवाची स्तुती करण्यासाठी बरीच गाणी गायली कारण देवाने त्यांना मिसराच्या सैन्यापासून वाचविले.
  • 16:17 या पद्धतीची बऱ्याच वेळा पुनरावृत्ती झाली: इस्राएल लोक पाप करतील, देव त्यांना शिक्षा देईल, ते पश्चात्ताप करतील आणि देव त्यांना वाचविण्यास एक मुक्तीदाता पाठविल.
  • 44:8 "तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळीले, परंतु देवाने त्याला पुन्हा जिवंत केले! तुम्ही त्याला नाकारले, परंतु येशूच्या सामर्थ्याशिवाय तारण पावण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही! "
  • 47:11 पौल व सिलास यांच्या जवळ जाताच तुरुंगाचा अधिकारी थरथर कापू लागला आणि म्हणाला, "तारण होण्यासाठी मी काय करावे?"? "पौलाने उत्तर दिले,"प्रभु, येशूवर विश्वास ठेव आणि तू आणि तुझ्या कुटुंबाचे तारण होईल."
  • 49:12 चांगली कामे तुझे तारण करू शकत नाहीत
  • 49:13 देव येशूवर विश्वास ठेवणाऱ्या आणि त्याला आपला प्रभु म्हणून स्वीकारणाऱ्या प्रत्येकजणाचे तारण करील. परंतु जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तो त्यांचे तारण करणार नाही

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0983, H2421, H2502, H3444, H3467, H3468, H4190, H4422, H4931, H5338, H6308, H6403, H7682, H7951, H7965, H8104, H8199, H8668, G08030, G08040, G08060, G12950, G15080, G49820, G49910, G49920, G51980

विवेक

व्याख्या:

विवेक हा एखाद्याच्या विचारसरणीचा एक भाग आहे ज्याद्वारे देव त्याला जागरूक करतो की आपण काहीतरी पाप करीत आहे.

  • देवाने लोकांना काय बरोबर व काय चूक यामधील फरक कळण्यास मदत व्हावी म्हणून एक विवेकबुद्धी दिली.
  • जो देवाची आज्ञा पाळतो त्याच्याजवळ “शुद्ध” किंवा “स्पष्ट” किंवा “स्वच्छ” विवेक आहे असे म्हटले जाते.
  • जर एखाद्याकडे "स्पष्ट विवेक" असेल तर याचा अर्थ असा की तो कोणतेही पाप लपवत नाही.
  • जर एखाद्याने त्यांच्या विवेकाकडे दुर्लक्ष केले आणि त्याने पाप केल्यामुळे यापुढे दोषी वाटत नसेल तर याचा अर्थ असा आहे की त्याचा विवेक यापुढे चुकल्याबद्दल संवेदनशील राहणार नाही. पवित्र शास्त्र यास “आंधळा” विवेक असे म्हणते, ज्यांना गरम लोखंडाने “डाग” दिला आहे. अशा विवेकाला “असंवेदनशील” आणि “प्रदूषित” असेही म्हणतात.
  • हा शब्द भाषांतरित करण्याच्या संभाव्य मार्गांमध्ये “अंतर्गत नैतिक मार्गदर्शक” किंवा “नैतिक विचारसरणी” हे समाविष्ट असू शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 तिमथ्यी 01:19]
  • [1 तिमथ्यी 03:09]
  • [2 करिंथकरांस पत्र 05:11]
  • [2 तिमथ्यी 01:03]
  • [रोमकरांस पत्र 09:01]
  • [तीताला पत्र 01:15-16]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: जी4893

विश्वास

व्याख्या:

सर्वसाधारणपणे, “विश्वास” हा शब्द एखाद्याचा विश्वास, भाव किंवा एखाद्यावर किंवा एखाद्या गोष्टींवर असणारा आत्मविश्वास आहे.

  • एखाद्यावर “विश्वास ठेवणे” म्हणजे तो जे बोलतो आणि करतो ते सत्य आणि विश्वासार्ह आहे यावर विश्वास ठेवणे.
  • “येशूवर विश्वास ठेवणे” म्हणजे येशूविषयीच्या देवाच्या सर्व शिकवणीवर विश्वास ठेवणे. याचा खास अर्थ असा आहे की लोक आपल्या पापांपासून शुद्ध होण्यासाठी आणि त्यांच्या पापामुळे ते पात्र असलेल्या शिक्षेपासून वाचण्यासाठी येशू आणि त्याच्या बलिदानावर ठेवतात.
  • येशूवर खरा विश्वास किंवा भाव ठेवल्यामुळे एखाद्या व्यक्तीला चांगले आध्यात्मिक फळ किंवा वागणूक मिळू शकते कारण पवित्र आत्मा त्याच्यात राहतो.
  • कधीकधी “विश्वास” म्हणजे येशूविषयीच्या सर्व शिकवणुकीचा संदर्भ असतो, जसे की “विश्वासाची सत्यता” याच्या अभिव्यक्तिमध्ये आहे.
  • “विश्वास ठेवणे” किंवा “विश्वास त्यागणे” यासारख्या संदर्भात “विश्वास” हा शब्द येशूविषयीच्या सर्व शिकवणींवर विश्वास ठेवण्याची स्थिती किंवा अट दर्शवितो.

पवित्र शास्त्रातील सुचना:

  • काही संदर्भांमध्ये “विश्वास” याचे भाषांतर “श्रध्दा” किंवा “खात्री” किंवा “आत्मविश्वास” किंवा “भाव” असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांसाठी या संज्ञांचे भाषांतर “विश्वास ठेवणे” या क्रियापदाचे स्वरूप वापरून केले जाईल. (पाहा: [अमुर्त नाम])

a

  • “विश्वास ठेवा” या शब्दाचे भाषांतर “येशूवर विश्वास ठेवत राहा” किंवा “येशूवर सतत विश्वास ठेवणे” याद्वारे केले जाऊ शकते.
  • “त्यांनी विश्‍वासातील खोल सत्ये धरून ठेवली पाहिजेत” या वाक्याचे भाषांतर “त्यांनी येशूबद्दलच्या सर्व सत्य गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे” असे केले जाऊ शकते.
  • “विश्वासातील माझे खरे लेकरु” या अविर्भावाचे भाषांतर “तो माझ्यासाठी मुलाप्रमाणे आहे कारण मी त्याला येशूवर विश्वास ठेवण्यास शिकवले आहे” किंवा “माझा खरा अध्यात्मिक मुलगा, जो येशूवर विश्वास ठेवतो.” काही अश्याप्रकारे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: विश्वास करणे, विश्वासू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 5:6 जेव्हा इसहाक तरुण होता, तेव्हा देवाने अब्राहामाच्या विश्वासाची परीक्षा घेतली, असे म्हणाला, “तू आपला एकुलता एक पुत्र इसहाक याला घे, आणि माझ्यासाठी यज्ञ म्हणून त्याचा वध कर.”
  • 31:7 मग तो (येशू) पेत्राला म्हणाला, “तू, अल्प विश्वासू मनुष्या, तू संशय का धरलास?”
  • 32:16 येशू तिला म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे." शांतीने जा.”
  • 38:9 ”मग येशू पेत्राला म्हणाला,“ सैतान तुम्हा सर्वांना चाळावयावस पाहतो , परंतु पेत्र, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे की, तुझा विश्वास ढळणार नाही.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच529, एच 530, जी16800, जी36400, जी41020, जी60660

विश्वास करणे, विश्वासणारा, विश्वास, अविश्वासणारा, अविश्वास

व्याख्या:

“विश्वास करणे” आणि “विश्वास ठेवा” या शब्दाचे जवळचे संबंध आहेत, परंतु त्यांचे वेगळे अर्थ आहेत:

1. विश्वास करणे

  • एखाद्या गोष्टीवर विश्वास करणे म्हणजे ते सत्य आहे यावर विश्वास ठेवणे किंवा त्यावर भरवसा ठेवणे होय.
  • एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे म्हणजे त्या व्यक्तीने जे म्हटले आहे ते सत्य आहे हे मान्य करणे.

2. विश्वास ठेवणे

  • याचा अर्थ ती व्यक्ती आहे जी तो म्हणतो तो आहे, तो नेहमी सत्य बोलतो आणि त्याने जे वचन दिले आहे ते तो करेल यावर भाव ठेवणे असा होतो.
  • जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर खरोखर विश्वास ठेवते, तेव्हा तो अशा प्रकारे वागतो ज्यामुळे तो विश्वास दिसून येतो.
  • "विश्वास ठेवा" या वाक्यांशाचा सामान्यतः "विश्वास ठेवणे" असाच अर्थ होतो.
  • “येशूवर विश्वास ठेवणे” अर्थ असा आहे की तो देवाचा पुत्र आहे, तो स्वतः देव आहे जो मानव झाला आणि आपल्या पापांची भरपाई करण्यासाठी बलिदान म्हणून मरण पावला. त्याचा अर्थ तारणहार म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याचा सन्मान होईल अशा प्रकारे जगणे होय.

3. विश्वासणारा

बायबलमध्ये "विश्वासणारा” हा शब्द असा आहे की ज्याने येशू ख्रिस्तावर तारणहार म्हणून विश्वास ठेवला आहे व त्याच्यावर भरवसा ठेवला आहे.

  • “विश्वासणारा” या संज्ञेचा शब्दश: अर्थ “विश्वास ठेवणारी व्यक्ती” असा आहे.
  • अखेरीस “ख्रिस्ती”हा शब्द विश्वासणाऱ्यांसाठी मुख्य शिर्षक ठरला कारण यावरून असे सूचित होते की ते ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आणि त्याच्या शिकवणुकींचे पालन करतात.

4. अविश्वास

“अविश्वास” हा शब्द म्हणजे एखाद्या गोष्टीवर किंवा कोणावर विश्वास न ठेवणे होय.

  • बायबलमध्ये “अविश्वास” हा शब्द एखाद्याचा तारणारा म्हणून येशूवर विश्वास न ठेवणे किंवा त्यावर विश्वास नसणे.
  • ज्याचा येशूवर विश्वास नाही त्याला “अविश्वासू” असे म्हणतात.”

भाषांतर सूचना:

  • “विश्वास ठेवा” असे भाषांतर “सत्य असण्याचे माहित” किंवा “बरोबर असणे माहित आहे.” असे केले जाऊ शकते.”
  • “विश्वास ठेवा” असे भाषांतर “पूर्ण विश्वास” किंवा “विश्वास व आज्ञा” किंवा “पूर्णपणे विसंबून राहून त्याचे अनुसरण” असे केले जाऊ शकते.”
  • काही भाषांतरे “येशूवर विश्वास ठेवणारा” किंवा “ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे” म्हणणे पसंत करतात.
  • या शब्दाचे भाषांतर एखाद्या शब्दाद्वारे किंवा वाक्यांश देखील केले जाऊ शकते ज्याचा अर्थ असा आहे की “येशूवर विश्वास ठेवणारी व्यक्ती” किंवा “येशूला ओळखणारा आणि त्याच्यासाठी जगणारा एखादा माणूस.”
  • “विश्वासणारा” भाषांतरित करण्याचे इतर मार्ग “येशूचा अनुयायी” किंवा “येशूला ओळखणारा व त्याच्या आज्ञा पाळणारी व्यक्ती” असू शकतात.
  • ख्रिस्तातील कोणत्याही आस्तित्वासाठी “विश्वासू” हा शब्द एक सामान्य शब्द आहे, तर “शिष्य” आणि “प्रेषित” हे येशूला ओळखणार्‍या लोकांसाठी अधिक वापरले जात होते. तो जिवंत असताना या अटी वेगळ्या ठेवण्यासाठी भिन्न प्रकारे अनुवाद करणे चांगले.
  • “अविश्वास” अनुवादित करण्याच्या इतर मार्गांमध्ये “विश्वास नसणे” किंवा “विश्वास न ठेवणे” समाविष्ट असू शकते.”
  • “अविश्वासू” या शब्दाचे भाषांतर “येशूवर विश्वास नसणारी व्यक्ती” किंवा “येशूवर तारणारा म्हणून विश्वास न ठेवणारी व्यक्ती” असे केले जाऊ शकते.”

(हे देखील पाहा: विश्वास करणे, प्रेषित, ख्रिस्ती, शिष्य, विश्वास, भाव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 3:4 नोहाने लोकांना येणाऱ्या प्रलयाविषयी सावध केले आणि त्यांना देवाकडे वळण्यास सांगितले परंतु त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
  • 4:8 अब्रामाने देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला. देवाने जाहीर केले की अब्राम नीतिमान आहे कारण त्याने देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला.
  • 11:2 ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्या पहिल्या मुलाचा बचाव करण्यासाठी देवाने एक मार्ग प्रदान केला.
  • 11:6 परंतू मिसरी लोकांनी देवावर विश्वास ठेवला नाही किंवा त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
  • __37:5__येशूने उत्तर दिले, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो कोणी माझ्यावर

विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण कधीही मरणार नाही. तुम्ही यावर विश्वास ठेवता का? "

  • 43:1 येशू स्वर्गात परत गेल्यावर, शिष्यांनी यरूशलेममध्ये जे करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी तेथेच मुक्काम केला. तेथील विश्वासणारे सतत प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमले.
  • 43:3 __विश्वासणारे__सर्वजण एकत्र जमले असताना, अचानक ते ज्या घरात होते ते घर सुसाट वाऱ्यासारखा आवाजाने भरून गेले. मग अग्नीच्या ज्वालांसारक्या दिसत असलेल्या ज्वाला __विश्वासणाऱ्यांच्या__डोक्यावर दिसल्या.
  • 43:13 दररोज,अनेक लोक विश्वासणारे बनले.
  • 46:6 त्या दिवशी यरुशलेमेतील बरेच लोक येशूच्या अनुयायांचा छळ करु लागले, म्हणून विश्वासणाऱ्यांनी इतर ठिकाणी पलायन केले. परंतु असे असूनही, जेथे जेथे ते गेले तेथे त्यांनी येशूविषयी उपदेश केला.
  • 46:1 शौल हा तरूण होता ज्याने स्तेफनाला ठार मारणाऱ्या माणसांच्या कपड्यांचे रक्षण केले. तो येशूवर विश्वास ठेवत नव्हता म्हणून त्याने विश्वासणाऱ्यांचा छळ केला.
  • 46:9 यरुशलेमेतील छळापासून पळून गेलेले काही विश्वासणारे अंत्युखिया शहरात बरेच दूर गेले आणि येशूविषयी उपदेश केला.
  • 46:9 अंत्युखिया येथेच येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना प्रथम “ख्रिस्ती” म्हटले गेले.
  • 47:14 त्यांनी मंडळीमधील विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी अनेक पत्रेही लिहिली.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0539, H0540, G05430, G05440, G05690, G05700, G05710, G39820, G41000, G41020, G41030, G41350

विश्वास, विश्वास केला, विश्वासार्ह, विश्वासार्हता

व्याख्या:

एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर विश्वास ठेवणे म्हणजे ती गोष्ट किंवा व्यक्ती सत्य आहे किंवा विसंबून राहण्या योग्य आहे. त्या विश्वासाला "निष्ठा" देखील म्हणतात. एक "विश्वासार्ह" व्यक्ती अशी आहे ज्यावर आपण विश्वास ठेवू शकतो आणि योग्य आणि सत्य काय आहे ते सांगू शकता आणि म्हणूनच "विश्वासर्हता" याची गुण असलेली एक व्यक्ती आहे

  • निष्ठेचा विश्वासाशी जवळचा संबंध आहे. जर आपण एखाद्यावर विश्वास ठेवत असाल तर त्या व्यक्तीने जे वचन दिले त्याप्रमाणे तो करील यावर आमचा विश्वास आहे.
  • एखाद्यावर विश्वास ठेवणे म्हणजे त्या व्यक्तीवर अवलंबून राहणे.
  • येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे तो देव आहे यावर विश्वास ठेवणे, आपल्या पापांची किंमत मोजण्यासाठी तो वधस्तंभावर मरण पावला असा विश्वास ठेवणे आणि आपल्याला वाचवण्यासाठी त्याच्यावर विसंबून राहणे होय.
  • एक "विश्वासार्ह म्हण" जे बोलले ते खरे आहे याला संदर्भित करते.

भाषांतरातील सूचना:

  • "विश्वास" अनुवादित करण्याच्या मार्गांमध्ये "विश्वास करणे" किंवा "विश्वास असणे" किंवा "अत्मविश्वास असणे" किंवा “अवलंबुण राहणे” याचा समावेश असू शकतो.

"आपला विश्वास ठेवा "हा वाक्यांश "विश्वास करणे" या अर्थाने अगदी समान आहे

  • "विश्वासार्ह" या शब्दाचे भाषांतर "अवलंबित्व" किंवा "खात्रीपुर्वक" किंवा "नेहमी विश्वास ठेवला जाऊ शकतो."

(हे देखील पहा: विश्वास, विश्वास, विश्वास, विश्वासू, खरे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 12:12 जेव्हा इजिप्शियन लोक मेले असल्याचे इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि मोशे हा देवाचा संदेष्टा होता यावर विश्वास ठेवला.
  • 14:15 जोशुआ एक चांगला नेता होता कारण त्याने विश्वास आणि देवाची आज्ञा पाळली.
  • 17:2 डेव्हिड एक नम्र आणि नीतिमान मनुष्य होता ज्याने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचे पालन केले.
  • 34:6 नंतर येशूने अशा लोकांबद्दल एक कथा सांगितली ज्यांनी स्वतःच्या चांगल्या कृतींवर विश्वास ठेवला आणि इतर लोकांचा तिरस्कार केला.

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 539, एच 982, एच 1556, एच 2620, एच 3176, एच 4009, एच 4268, एच 7365, जी 1679, जी 3982, जी 4006, जी 4100, जी 4276

विश्वासू, विश्वासूपणा, विश्वासघातकी, विश्वासघातकीपणा

व्याख्या:

देवाशी “विश्वासू” राहण्याचा अर्थ सतत देवाच्या शिकवणुकीनुसार जगणे. म्हणजे त्याचे ऐकून त्याच्याशी एकनिष्ठ राहणे. विश्वासू राहण्याची अवस्था किंवा स्थिती म्हणजे “विश्वासुपणा”.

  • विश्वासू व्यक्तीवर त्याने आपली अभिवचने नेहमी पाळतो आणि इतर लोकांवर त्याची नेहमी जबाबदारी पार पाडतो याद्वारे नेहमी विश्वास ठेवला जाऊ शकतो.
  • एक विश्वासू माणूस एखादी गोष्ट लांब आणि कठीण असली तरीही एखादे कार्य करण्यास धडपडत असतो.
  • देवाप्रती विश्वासू राहणे म्हणजे जे आपण करावे अशी देवाची इच्छा आहे ते सतत करत राहणे.

“अविश्वासू” या शब्दामध्ये अशा लोकांचे वर्णन केले आहे जे देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे करत नाहीत. विश्वासघातकी होण्याची स्थिती किंवा सराव म्हणजे “विश्वासघात”.

  • जेव्हा इस्राएल लोकांनी मूर्तिपूजा करण्यास सुरवात केली आणि इतर मार्गांनी देवाची आज्ञा मोडली तेव्हा त्यांना “अविश्वासु” म्हटले गेले.
  • विवाहात जो कोणी व्यभिचार करतो तो आपल्या जोडीदाराशी “अविश्वासु” असतो.
  • देवाने इस्राएलच्या आज्ञा न मानणाऱ्या वर्तनाचे वर्णन करण्यासाठी “विश्वासघात” हा शब्द वापरला. ते देवाची आज्ञा पाळत नव्हते किंवा त्याचा आदर करीत नव्हते.

भाषांतरातील सूचना:

  • बर्‍याच संदर्भांमध्ये, “विश्वासू” या संज्ञेचे भाषांतर “निष्ठावंत” किंवा “समर्पित” किंवा “विश्वासार्ह” म्हणून केले जाऊ शकते.
  • अन्य संदर्भांमध्ये, “विश्वासू” या संज्ञेचे भाषांतर एखाद्या शब्दाद्वारे किंवा वाक्यांशातून करता येते ज्याचा अर्थ “विश्वास ठेवणे” किंवा “चिकाटीने देवावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे” असे केले जावू शकते
  • “विश्वासूपणा” भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये “चिकाटीने विश्वास ठेवणे” किंवा “निष्ठा” किंवा “विश्वासार्हता” किंवा “देवावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे” याचा समावेश असू शकतो.
  • संदर्भानुसार, “विश्वासघातकी” असे भाषांतर “अविश्वासु” किंवा “विश्वासू नाही” किंवा “आज्ञाधारक नाही” किंवा “निष्ठावंत नाही” असे केले जाऊ शकते.
  • “अविश्वासू” या वाक्यांशाचे भाषांतर “लोक विश्वासू (देवाशी) नाही” किंवा “अविश्वासु लोक” किंवा “देवाची आज्ञा मोडणारे लोक” किंवा “देवाविरुद्ध बंड करणारे लोक” असे केले जाऊ शकते.
  • “विश्वासघात” या शब्दाचे भाषांतर “आज्ञा मोडणे” किंवा “बेईमानी” किंवा “विश्वास न ठेवणे किंवा आज्ञांचे पालन न करणे” असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांमध्ये “अविश्वासू” हा शब्द “अविश्वास” या शब्दाशी संबंधित आहे.

(हे देखील पाहा: [व्यभिचार], [विश्वास ठेवणे], [आज्ञा न पाळणे], [विश्वास], [विश्वास ठेवा])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • __8:5__तुरुंगातदेखील योसेफ देवाप्रती __विश्वासू __ राहिला आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला.
  • 14:12 तरीही, देव अब्राहाम, इसहाक आणि याकोबाला दिलेल्या अभिवचनांशी विश्वासू होता.
  • 15:13 लोकांनी देवाशी __ विश्वासू__ राहण्याचे आणि त्याच्या नियमांचे पालन करण्याचे वचन दिले.
  • __17:9__दावीदाने बरेच वर्ष न्यायाने आणि विश्वासुपणाने राज्य केले,आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला. परंतु, आपल्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरूद्ध भयंकर पाप केले.
  • 35:12"मोठा मुलगा वडिलांना म्हणाला, 'मी इतकी वर्षे तुमच्यासाठी विश्वासुपणाने काम केले आहे.
  • __49:17__v
  • 50:4 जर तू शेवटपर्यंत माझ्याशी __ विश्वासू__ राहिल्यास, तर देव तुला वाचवेल. "

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच529, एच530, एच539, एच540, एच571, एच898, एच2181, एच4603, एच4604, एच4820, जी569, जी571, जी4103

वेगळे करणे

व्याख्या:

"वेगळे करणे" ह्याचा अर्थ विशिष्ठ हेतू पूर्ण करण्याकरिता एखाद्या गोष्टीपासून बाजूला केलेला असा होतो.. त्याचबरोबर, "काही व्यक्तींना किंवा गोष्टींना "वेगळे करणे" म्हणजे त्यांना "बाजूला करणे" होय.

  • इस्राएली लोकांना देवाच्या सेवेसाठी वेगळे केलेले आहे.
  • पवित्र आत्म्याने अंत्युखीयाच्या ख्रिस्ती लोकांना आज्ञा केली की, पौल आणि बर्णबा ह्यांना देवाला त्यांच्याकडून जे कार्य करून घ्यायचे आहे त्यासाठी वेगळे करा.
  • एक विश्वासू ज्याला देवाच्या सेवेसाठी "वेगळे केलेले" आहे, त्याला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी "समर्पित केलेले" आहे.
  • "पवित्र" या शब्दाचा एक अर्थ हा देवाच्या मालकीचा म्हणून वेगळा केलेला आणि जगाच्या पापमय मार्गापासून बाजूला केलेला असा होतो.
  • एखाद्याला "पवित्र करणे" ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला देवाच्या देवाच्या सेवेसाठी वेगळे करणे असा होतो.

भाषांतर सूचना

  • "वेगळे करणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "विशेषरित्या निवडणे" किंवा "सर्वांमधून वेगळा करणे" किंवा "विशेष कार्य करण्यासाठी बाजूला काढणे" असे केले जाऊ शकते.
  • "वेगळे केलेला असणे" ह्याचे भाषांतर "(च्यापासून) वेगळे केलेले असणे" किंवा "(च्या साठी) विशेषरित्या नियुक्त केलेले असणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: पवित्र, पवित्र करणे, नियुक्त)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H2764, H4390, H5674, H6918, H6942, H6944, G37, G38, G40, G873


वेदी

व्याख्या:

वेदी एक उभारलेली रचना होती ज्याच्या वर इस्राएल लोक देवाला प्राणी आणि धान्ये अर्पण करत.

  • बायबलच्या काळात, साध्या वेद्या पुष्कळदा मातीचा ढिगारा तयार करून किंवा स्थिर रास तयार करण्यासाठी मोठमोठे दगड ठेवून बनविल्या जात असे.
  • सोने, पितळ किंवा कांस्य धातूने आच्छादलेल्या काही विशिष्ट पेटीच्या आकाराच्या वेद्या लाकडाने बनविल्या जात असे.
  • इस्राएल लोकांच्या जवळ राहणाऱ्या इतर लोकांच्या गटांनीही आपल्या दैवतांना बलिदान अर्पण करण्यासाठी वेद्या बांधल्या.

(हे देखील पाहा: धूप जाळण्याची वेदी, खोट्या देवता, अन्नार्पण, बलिदान)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • 3:14 नोहा तारवाबाहेर आल्यानंतर, त्याने वेदी बांधली व यज्ञासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांपैकी प्रत्येक प्रकारातून काही प्राण्यांचे देवाला होमार्पण केले.
  • 5:8 जेंव्हा ते होमार्पणाच्या ठिकाणी जेंव्हा पोहोचले तेंव्हा अब्राहामाने आपला पुत्र इसहाक यास बांधले व वेदीवर ठेविले.
  • 13:9 याजक पशूनस मारून वेदीवर त्याचे होमार्पण करत असे.
  • 16:6 त्याने (गिदोन) मुर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळ‌त्याने जीवंत देवासाठी एक नवीन वेदी बांधली व त्यावर देवाला यज्ञ अर्पण केला.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0741, H2025, H4056, H4196, G10410, G23790

व्यभिचार, व्यभिचारी, जारकर्मी, व्याभिचारिणी

व्याख्या:

"व्यभिचार" या शब्दाचा संदर्भ अशा पापाचा आहे जो विवाहित व्यक्तीने त्या व्यक्तीचा जोडीदार नसलेल्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवल्यास होतो. ते दोघेही व्यभिचाराचे दोषी आहेत. “व्यभिचार” हा शब्द या प्रकारच्या वर्तनाचे किंवा हे पाप करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे वर्णन करतो.

  • "व्यभिचारी" ही संज्ञा व्यभिचार करणा-या कोणत्याही व्यक्तीला संदर्भित करतो.
  • कधीकधी "व्यभिचारिणी" हा शब्द व्यभिचार करणारी एक स्त्री होती हे दर्शविण्यासाठी वापरला जातो.
  • पती-पत्नीने लग्नाच्या करारामध्ये एकमेकांबद्दल केलेल्या आश्वासनांना व्याभिचार तोडून टाकतो.
  • तुम्ही व्यभिचार करू नये अशी इस्राएलांना परमेश्वराने आज्ञा दिली आहे.

भाषांतर सूचना:

  • लक्ष्यित भाषेमध्ये "व्यभिचार" असा अर्थ असलेला एकही शब्द नसल्यास या संज्ञेचा "दुसऱ्या कोणाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे" किंवा "दुसऱ्या व्यक्तीच्या जोडीदाराशी निकटचा संबंध असणे" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
  • काही भाषेत व्यभिचाराबद्दल बोलण्याचा एक अप्रत्यक्ष मार्ग असू शकतो, जसे की "कोणाच्यातरी पतीबरोबर निजणे" किंवा "आपल्या बायकोशी विश्वासघात करणे". (पाहा: शिष्टोक्ती)

(हे देखील पाहा: करणे, करार, लैंगिक अनैतिकता, दुसऱ्याबरोबर झोपणे, विश्वासू)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्रामधील कथेतील उदाहरणे:

  • 13:06 व्यभिचार करू नकोस.
  • 28:02 व्यभिचार करु नकोस.
  • 34:07 धार्मिक पुढा-याने अशी प्रार्थना केली, ‘‘हे देवा, मी तुला धन्यवाद देतो की मी अन्य मनुष्यांसारखा पापी नाही, जसे दरोडेखोर, अन्यायी पुरुष, जारकर्मी त्यांच्याप्रमाणे मी नाही, व हया जकातदारासारखाही नाही.”

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H5003, H5004, G34280, G34290, G34300, G34310, G34320

शक्ती, सामर्थ्यवान, सामर्थ्याने

व्याख्या:

"सामर्थ्य" या शब्दाचा अर्थ असा की बर्‍याचदा मोठ्या ताकदीने गोष्टी करण्याच्या किंवा गोष्टी घडवून आणण्याची क्षमता. “शक्ती” ही संज्ञा लोक किंवा विचारांना संदर्भित करते ज्यामध्ये गोष्टी घडवून आणण्याची मोठी क्षमता असते.

  • “देवाचे सामर्थ्य” म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्याची देवाच्या क्षमता, विशेषत: अशा गोष्टी ज्या लोकांना करणे शक्य नाही.
  • देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा पूर्ण अधिकार आहे.
  • देव आपल्या लोकांना त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्याची शक्ती देतो, जेणेकरून जेव्हा ते लोकांना बरे करतात किंवा इतर चमत्कार करतात तेव्हा ते देवाच्या सामर्थ्याने हे करतात.
  • कारण येशू आणि पवित्र आत्मा देखील देव आहेत, त्यांच्यातही हे समान सामर्थ्य आहे.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, "शक्ती" या शब्दाचे भाषांतर "क्षमता" किंवा "सामर्थ्य" किंवा "ऊर्जा" किंवा "चमत्कार करण्याची क्षमता" किंवा "नियंत्रण" असे देखील केले जाऊ शकते.
  • “शक्ती” या शब्दाचा अनुवाद करण्याच्या संभाव्य मार्गांमध्ये “शक्तिशाली” किंवा “नियंत्रित करणारा आत्मा” किंवा “इतरांवर नियंत्रण ठेवणारे” यांचा समावेश असू शकतो.

(हे देखील पाहा: ताकद, पवित्र आत्मा, येशू, [चमत्कार] (../kt/miracle.md))

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • [22:5] देवदूताने स्पष्ट केले की, “पवित्र आत्मा तुझ्याकडे येईल, आणि देवाची __शक्ती _ तुझ्यावर सावली करील. मग देवाचा पुत्र, बाळ पवित्र असेल. ”
  • [26:1] सैतानाच्या मोहांवर विजय मिळविल्यानंतर, येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो राहत असलेल्या गालील प्रदेशात परतला.
  • [32:15] येशूला लगेच कळाले की त्याच्यातून शक्ती निघाली आहे.
  • [42:11] येशू मेलेल्यांतून उठल्याच्या चाळीस दिवसांनंतर, त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “जेव्हा पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, माझ्या पिता तुम्हाला सामर्थ्य देईपर्यंत यरुशलेममध्ये राहा.”
  • [43:6] इस्राएल लोकांनो, येशू हा एक मनुष्य होता ज्याने देवाच्या __सामर्थ्याने__ अद्भुत चिन्ह आणि चमत्कार केले, जसे की तुम्ही पाहिले आणि अगोदरच तुम्हाला ते माहीत आहे.”
  • [44:8] पेत्राने उत्तर दिले, “ हा मनुष्य जो तुमच्या समोर उभा आहे तो येशु मसीहाच्या शक्तीने बरा झाला आहे.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच410, एच1369, एच1370, एच2220, एच2393, एच2428, एच2429, एच2632, एच3027, एच3028, एच3581, एच4475, एच4910, एच5794, एच5797, एच5808, एच6184, एच7786, एच7980, एच7981, एच7983, एच7989, एच8280, एच8592, एच8633, जी1411, जी1415, जी1754, जी1756, जी1849, जी1850, जी2159, जी2478, जी2479, जी2904, जी3168

शताधिपती

व्याख्या:

एक शताधिपती हा एक रोमी अधिकारी आहे, ज्याच्या हाताखाली 100 लोकांचा एक गट असतो.

  • ह्याचे भाषांतर "शंभर मनुष्यांचा नेता" किंवा "सैन्याचा नेता" किंवा "शंभर लोकांचा अधिकारी" अशा अर्थाच्या शब्दांनी केले जाऊ शकते.
  • एक रोमी शताधिपती येशूकडे आला आणि त्याने त्याला त्याच्या चाकराला बरे करण्याची विनंती केली.
  • येशूच्या वधस्तंभाजवळचा शताधिपती, येशूचा मृत्यू कसा झाला याचा साक्षीदार झाला तेव्हा आश्चर्यचकित झाला.
  • देवाने शताधिपतीला पेत्राकडे पाठवले, जेणेकरून पेत्र त्याला येशूबद्दलची सुवार्ता समजावून सांगू शकेल.

(हे सुद्धा पहा: रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहिती

  • Strong's: G1543, G2760

शब्बाथ

व्याख्या:

"शब्बाथ" या शब्दाचा संदर्भ आठवड्याच्या शेवटच्या दिवसाशी आहे, ज्याला देवाने इस्राएली लोकांना विश्रांतीचा दिवस म्हणून वेगळे करण्यासाठी आणि कोणतेही कार्य न करण्यास सांगितले.

  • सहा दिवसात देवाने सृष्टीची रचना केल्यानंतर, त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. त्याच पद्धतीने, देवाने इस्राएली लोकांना सातवा दिवस विश्रांतीसाठी आणि त्याची उपासना करण्यासाठी वेगळा करण्यास सांगितले.
  • मोशेच्या हातामध्ये इस्राएल लोकांसाठी दिलेल्या दगडी पाट्यांवर, देवाने लिहिलेल्या दहा अज्ञापैकी एक आज्ञा "शब्बाथ पवित्रपणे पाळ" ही आहे.
  • दिवस मोजण्याच्या यहुदी पद्धतीनुसार, शब्बाथाची सुरवात शुक्रवारी सूर्यास्ताने होत होती आणि त्याचा शेवट शनिवारी सूर्यास्ताने होत होता.
  • काहीवेळा पवित्र शास्त्रामध्ये शब्बाथाला फक्त शब्बाथ म्हणण्यापेक्षा "शब्बाथ दीवस" असे म्हंटले गेले.

भाषांतर सूचना

  • ह्याचे भाषांतर "विश्रामाचा दीवस" किंवा "आराम करण्याचा दीवस" किंवा "काम न करण्याचा दीवस" किंवा "देवाचा विश्रांतीचा दीवस" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषांतरे या शब्दाला मोठ्या अक्षरात लिहून तो एक विशेष दिवस आहे जसे की, "शब्बाथ दीवस" किंवा "विश्रामाचा दीवस" असे दाखवतात.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे, हे देखील विचारात घ्या.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे देखील पाहा: विश्राम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 13:5 शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. अर्थात सहा दिवस तू आपले सर्व काम कर व सातवा दिवस हा तुझा विश्रांतीचा दिवस व माझी आठवण करण्याचा दिवस म्हणून पाळ."
  • 26:2 येशू त्याच्या बालपणी राहात असलेल्या नासरेथ या ठिकाणी गेला. शब्बाथ दिवशी, तो उपासना करीत त्या ठिकाणी गेला.
  • 41:3 येशूला कबरेत ठेवल्यानंतरचा दुसरा दिवस हा शब्बाथ दिवस होता, त्या दिवशी यहूद्यांना कबरेकडे जाण्याची मनाई होती.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग : एच4868, एच7676, एच7677, जी4315, जी45210

शरीर

व्याख्या:

"शरीर" या संज्ञा शब्दशः एखाद्या मनुष्याच्या किंवा प्राण्याच्या भौतिक शरीराला संदर्भित करते. ही संज्ञा लाक्षणिक अर्थाने एखाद्या वस्तूला किंवा संपूर्ण गट ज्याचे वैयक्तिक सदस्य आहेत यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

  • बऱ्याचदा "शरीर" हा शब्द मेलेल्या मनुष्याला किंवा प्राण्याला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो. काहीवेळा ह्याला "मृत शरीर" किंवा "प्रेत" म्हणून संदर्भित केले जाते.
  • जेव्हा येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या शेवटच्या वल्हांडण सणाच्या जेवनावेळी बोलला की, ही (भाकर) माझे शरीर आहे," तेव्हा तो त्याच्या भौतिक शरीराला संदर्भित करत होता जे त्यांच्या पापासाठी "मोडले" (मारले) जाणार होते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, ख्रिस्ती लोकांच्या समूहाला "ख्रिस्ताचे शरीर" म्हणून संदर्भित केले आहे.
  • जसे भौतिक शरीरामध्ये अनेक भाग असतात, तसेच "ख्रिस्ताच्या शरीर" यामध्ये अनेक सदस्य आहेत.
  • प्रत्येक विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताच्या शरीरात एक विशेष कार्य आहे, जेणेकरून संपूर्ण गटाने एकत्र येऊन देवाची सेवा करण्यास आणि त्याला गौरव प्राप्त होण्यास मदत होईल.
  • येशूला त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या “शरीराचे” “मस्तक” (पुढारी) असेही संबोधले जाते. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे मस्तक त्याच्या शरीराला काय करावे हे सांगते, त्याचप्रमाणे येशू हा ख्रिस्ती लोकांना त्याच्या “शरीराचे” अवयव म्हणून मार्गदर्शन व निर्देशन करतो.

भाषांतर सूचना:

  • या संज्ञेचे भाषांतर करण्यासाठी लक्षित भाषेतील भौतिक शरीरासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा सामान्यपणे उपयोग करणे हे सर्वोत्तम राहील. वापरलेला शब्द आक्षेपार्ह शब्द नाही याची खात्री करा.
  • विश्वासनाऱ्यांसाठी सामुहिकपणे संदर्भ देताना, काही भाषांसाठी "ख्रिस्ताचे आत्मिक शरीर" असे बोलणे अधिक नैसर्गिक आणि अचूक असू शकते.
  • जेव्हा येशू म्हणाला, "हे माझे शरीर आहे," हे जसेच्या तसे गरज पडल्यास एखाद्या टिपणाच्या स्पष्टीकरणासाहित भाषांतरित करणे सर्वोत्तम राहील.
  • काही भाषांमध्ये मृत शरीराला संदर्भित करण्यासाठी वेगळा शब्द असू शकतो, जसे की मनुष्यासाठी "प्रेत" किंवा प्राण्यांसाठी "शव." हे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द संदर्भामध्ये अर्थपूर्ण आहे आणि स्वीकार्य आहे याची खात्री करा.

(हे देखील पाहा: प्रमुख, हात; मुख; कंबर; उजवा हात; जीभ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समूह:

  • स्ट्रोंग : H0990, H1320, H1460, H1465, H1472, H1480, H1655, H3409, H4191, H5038, H5085, H5315, H6106, H6297, H7607, G44300, G49540, G49830, G55590

शाप, शापित, शाप देणे

व्याख्या:

"शाप" या शब्दाचा अर्थ, ज्या व्यक्तीला किंवा वस्तूला शाप दिला आहे, त्या बरोबर नकारात्मक गोष्टी घडण्यास कारणीभूत होये असा होतो.

  • एक शाप हे एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला हानी होईल असे एक वाक्य असू शकते.
  • एखाद्याला शाप देणे हे त्यांच्याबरोबर वाईट गोष्टी घडण्याच्या इच्छेची अभिव्यक्ती असू शकते.
  • हे शिक्षा किंवा इतर नकारात्मक गोष्टी ज्या एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो ह्यास संदर्भित करते.

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर "वाईट गोष्टी घडण्यास भाग पडणे" किंवा "च्या बरोबर काहीतरी वाईट घडेल ह्याची घोषणा करणे" किंवा "च्या बरोबर वाईट गोष्टी घडवून आणण्याची शपथ घेणे" असे केले जाऊ शकते.
  • देव त्याची अवज्ञा करणाऱ्या लोकांवर शाप पाठवितो या वाक्याच्या संदर्भात, ह्याचे भाषांतर "वाईट गोष्टी घडू देऊन शिक्षा करणे" असे केले जाऊ शकते.
  • "शापित" हा शब्द, जेव्हा लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा त्याचे भाषांतर "(हा व्यक्ती) खूप मोठय संकटांचा अनुभव करेल" असे केले जाऊ शकते.
  • "शापित असो" या वाक्यांशाचे भाषांतर "(या व्यक्तीने) मोठ्या समस्यांचा अनुभव करावा अशी इच्छा करणे" असे केले जाऊ शकते.
  • "जमीन शापित आहे" या वाक्यांशाचे भाषांतर "जमीन खूप सुपीक नसणार" असे केले जाऊ शकते.
  • तथापि, जर प्रकल्पित भाषेत "शापित असो" हा वाक्यांश असेल आणि त्याचा देखील तोच अर्थ असेल, तर त्याच वाक्यांशाचा वापर करणे चांगले राहील.

(हे देखील पाहा: आशीर्वाद)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 02:09 देव सर्पास बोलला, “तू शापीत झाला आहेस !
  • 02:11 म्हणून जमिन शापित झाली आहे, आता तूला अन्न मिळविण्यासाठी कष्ट करावे लागेल.
  • 04:04 तुला जे आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन व तुला जे शाप देतील त्यांना मी शाप देईन.
  • 39:07 तेव्हा पेत्राने शपथ घेऊन म्हटले, ‘जर मी या मनुष्यास ओळखत असेल तर देव मला शापित करो!’’
  • 50:16 आदाम आणि हव्वेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप या जगात आले व देवाने त्यास शाप दिला व त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H422, H423, H779, H1288, H2763, H2764, H3994, H5344, H6895, H7043, H7045, H7621, H8381, G331, G332, G685, G1944, G2551, G2652, G2653, G2671, G2672, G6035

शिष्य,

व्याख्या:

"शिष्य" या शब्दाचा अर्थ अशा व्यक्तीला सूचित करतो, जो शिक्षकांबरोबर बराच वेळ घालवतो, त्या शिक्षकांच्या चारित्र्य आणि शिकवानिमधून शिकतो.

  • जे लोक येशूचे अनुसरण करीत असत, त्याचे शिक्षण ऐकत आणि त्यांच्या आज्ञा पाळत असत त्यांना "शिष्य" म्हटले गेले.
  • बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे सुद्धा शिष्य होते.
  • येशूच्या सेवेच्या दरम्यान, तेथे त्याचे अनुसरण करणारे आणि त्याचे शिक्षण ऐकत असलेले अनेक शिष्य होते.
  • येशूने त्यातील बारा शिष्यांना त्याचे जवळचे अनुयायी होण्यासाठी निवडले, हे लोक पुढे जाऊन त्याचे "प्रेषित" म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • येशूच्या बारा प्रेषितांना पुढे सुद्धा त्याचे "शिष्य" किंवा "बारा" म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • येशूचे स्वर्गारोहण होण्याच्या आधी, त्याने त्यच्या शिष्यांना आज्ञा दिली की, इतर लोकांनासुद्धा येशूचे शिष्य कसे बनता येईल ह्याबद्दल शिकवा.
  • जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याने शिकवलेल्या आज्ञा पाळतो, त्याला त्याचा शिष्य असे म्हंटले जाते.

भाषांतर सूचना:

  • "शिष्य" या शब्दाचे भाषांतर "अनुयायी" किंवा "विद्यार्थी" किंवा "छात्र" किंवा "शिकाऊ" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • या संज्ञेच्या भाषांतराचा संदर्भ फक्त वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याशीची येणार नाही सुनिश्चित करा.
  • या शब्दाचे भाषांतर "प्रेषित" या शब्दाच्या भाषांतरापेक्षा वेगळे असायला हवे.

(हे सुद्धा पहा: प्रेषित, विश्वास, येशू, योहान (बाप्तिस्मा करणारा), बारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 30:08 मग त्याने शिष्यांस लोकांना वाढण्यासाठी दिले. शिष्य लोकांना वाढतच राहीले तरी ते अन्न संपले नाही.
  • 38:01 येशूच्या प्रचारकार्यास उघडपणे आरंभ झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी येशूने आपल्या शिष्यांस सांगितले की यरुशलेममध्ये त्यांजबरोबर वल्हांडण साजरा करावा अशी त्याची इच्छा आहे, आणि त्यानंतर तो तेथे मारला जाणार आहे असेही त्याने सांगितले.
  • 38:11 मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन गेथशेमाने म्हटलेल्या ठिकाणी गेला. शिष्यांनी परिक्षेत पडू नये म्हणून येशूने त्यांना प्रार्थना करावयास सांगितले.
  • 42:10 येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आले आहे. * म्हणून, तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा.

शब्द माहि़ती

  • Strong's: H3928, G3100, G3101, G3102

शिस्त, स्वत: ची शिस्त

व्याख्या:

“शिस्त” हा शब्द नैतिक वर्तनासाठी मार्गदर्शक सूचनांच्या संचाचे पालन करण्यासाठी लोकांना प्रशिक्षण देणे होय.

  • पालक आपल्या मुलांना नैतिक मार्गदर्शन आणि त्यांचे मार्गदर्शन देऊन शिस्त लावतात आणि त्यांचे पालन करण्यास शिकवतात.
  • त्याचप्रमाणे, देव आपल्या मुलांना त्यांच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि धीर याचे आध्यात्मिक फळ उत्पन्न करण्यास मदत करण्यासाठी शिस्त लावतो.
  • शिस्तीत देवाला संतुष्ट करण्यासाठी कसे जगायचे यासंबंधी सूचना आहे, तसेच देवाच्या इच्छेविरूद्ध वागण्याच्या शिक्षेचा समावेश आहे.
  • स्वत: ची शिस्त ही स्वतःच्या जीवनात नैतिक आणि आध्यात्मिक तत्त्वे लागू करण्याची प्रक्रिया आहे.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, “शिस्त” या शब्दाचे भाषांतर “प्रशिक्षण आणि निर्देश” किंवा “नैतिक मार्गदर्शक” किंवा “चुकीच्या कृत्याबद्दल शिक्षा” असे केले जाऊ शकते.
  • “शिस्त” या संज्ञेचे भाषांतर "नैतिक प्रशिक्षण" किंवा "शिक्षा" किंवा "नैतिक सुधार" किंवा "नैतिक मार्गदर्शन आणि सूचना" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [इफिसकरांस पत्र06:4]
  • [इब्री लोकांस पत्र12:05]
  • [नीतिसूत्रे 19:18]
  • [नीतिसूत्रे 23:13-14]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच4148, जी1468

शुद्ध, शुध्द करणे, शुध्दीकरण

व्याख्या:

"शुद्ध" असणे म्हणजे दोष नसणे किंवा त्यात काहीही न मिसळणे. काहीतरी शुद्ध करणे म्हणजे ते स्वच्छ करणे आणि त्यास दूषित किंवा प्रदूषित करणारे काढून टाकणे

  • जुन्या कराराच्या नियमासंदर्भात, "शुद्ध करणे" आणि "शुद्धीकरण" मुख्यत: एखाद्या वस्तुला किंवा व्यक्तीला विधीद्वारे अशुद्ध ठरविलेल्या त्या गोष्टींना स्वच्छ करणे याला संदर्भित करते जसे रोग, शरीरातील द्रव किंवा बाळंतपण.
  • जुन्या करारामध्ये लोकांना पापांपासून शुद्ध कसे व्हावे हे सांगण्याचे नियम देखील होते, सहसा एखाद्या प्राण्याच्या बलिदानाने. हे फक्त तात्पुरते होते आणि यज्ञ पुन्हा पुन्हा करावे लागत असे.
  • नवीन करारामध्ये, शुद्ध होणे म्हणजे बऱ्याचदा पापांपासून शुद्ध होते
  • पापापासून पूर्णपणे आणि कायमचे शुद्ध होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे येशू आणि त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवून पश्चात्ताप करणे आणि देवाची क्षमा प्राप्त करणे होय.

भाषांतर सूचना:

  • "शुद्ध करणे" या शब्दाचे भाषांतर "शुद्ध बनवणे" किंवा "स्वच्छ करणे" किंवा "सर्व दूषितपणापासून साफ करणे" किंवा “सर्व पापांपासून मुक्त होणे" म्हणून केले जाऊ शकते
  • “त्यांच्या शुद्धीकरणाची वेळ संपली तेव्हा” यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर “जेव्हा त्यांनी आवश्यक दिवसाची वाट पाहून स्वतःला शुद्ध केले” असे केले जाऊ शकते.
  • “पापांसाठी शुद्धीकरण प्रदान केले” या वाक्यांशाचे भाषांतर “लोकांना त्यांच्या पापापासून पूर्णपणे शुद्ध होण्याचा मार्ग प्रदान केला” असे केले जाऊ शकते.
  • "शुद्धिकरण" या संज्ञचे भाषांतर करण्याच्या इतर पध्दतीमध्ये "शुध्दीकरण" किंवा "अध्यात्मिक धुणे" किंवा "विधीवत स्वच्छ होणे" या वाक्यांशाचा समावेश असू शकतो

(हे देखील पाहा: प्रायश्चित्त, शुध्द, आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H1249, H1252, H1253, H1305, H1865, H2134, H2135, H2141, H2212, H2398, H2403, H2561, H2889, H2890, H2891, H2892, H2893, H3795, H3800, H4795, H5343, H5462, H6337, H6884, H6942, H8562, G00480, G00490, G00530, G00540, G15060, G25110, G25120, G25130, G25140

शुभवार्ता, सुवार्ता

व्याख्या:

"सुवार्ता" या शब्दाचा शब्दशः अर्थ "शुभवार्ता" असा होतो आणि संदेश किंवा घोषणेला संदर्भित करते जे लोकांना काहीतरी सांगते ज्यामुळे त्यांना फायदा होतो आणि त्यांना आनंद होतो.

  • बायबलमध्ये, हा शब्द सहसा वधस्तंभावरील येशूच्या बलिदानाद्वारे लोकांसाठी असलेलेल्या देवाच्या तारणाच्या संदेशास सूचित करतो.
  • बऱ्याच इंग्रजी पवित्र शास्त्रांमध्ये, "शुभवार्ता" या शब्दाचे भाषांतर सहसा "सुवार्ता" असे केले आहे आणि ते वाक्यांशामध्ये वापरले गेले आहे जसे की, "येशू ख्रिस्ताची सुवार्ता," "देवाची सुवार्ता" आणि "राज्याची सुवार्ता."

भाषांतर सूचना:

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "शुभ संदेश" किंवा "चांगली घोषणा" किंवा "देवाचा तारणाचा संदेश" किंवा "येशुबद्दलच्या चांगल्या गोष्टी ज्या देव आपल्याला शिकवतो" यांचा समावेश होतो.
  • संदर्भाच्या आधारावर, "ची शुभवार्ता" या वाक्यांशाचे भाषांतर करण्याच्या पध्दतीमध्ये "च्या बद्दलची शुभवार्ता" किंवा "च्या बदद्दल शुभ वार्ता/संदेश" किंवा "च्यापासून चांगला संदेश" किंवा "देव सांगत असलेल्या चांगल्या गोष्टी" किंंवा "देव लोकांना कश्याप्रकारे वाचवितो तो जे सांगतो" या वाक्यांचा समावेश होतो.

(हे देखील पाहा: राज्य, बलिदान, तारण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 23:6 देवदूत म्हणाला, ‘‘भिऊ नका, कारण मी तुम्हासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज बेथलेहेम नगरामध्ये तुमच्यासाठी मसिहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!’’
  • 26:3 येशूने वाचले,‘‘परमेश्वराने त्याचा आत्मा मला दिला आहे, ते अशासाठी की गरीबांस सुवार्ता सांगावी, धरुन नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टिचा लाभ व्हावा व ठेचले जात आहेत त्यास सोडवुन पाठवावे. हे परमेश्वराच्या कृपेचे वर्ष आहे.”
  • 45:10 फिलिप्पाने अन्य शास्त्रपाठातूनही संदर्भ घेऊन त्यास येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
  • 46:10 आणि मग त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी येशूची सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना पाठविले.
  • 47:1 एके दिवशी, पौल आणि त्याचा मित्र सीला हे फिलिप्पै नगरामध्ये येशूविषयची चांगली वार्ता सांगण्यासाठी गेले.
  • 47:13 येशूविषयीची सुवार्ता पसरत गेली, व मंडळीची वाढ होत गेली.
  • 50:01 सुमारे 2000 वर्षांपासून सर्व जगात अधिक आणि अधिक लोक येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी ऐकत आहेत.
  • 50:2 येशू या पृथ्वीवर असताना म्हणाला, "माझे शिष्य देवाच्या राज्याची सुवार्ता संपुर्ण जगामध्ये गाजवतील, आणि तेव्हा शेवट होईल."
  • 50:3 स्वर्गात जाण्यापुर्वी येशूने ख्रिस्ती लोकांना सांगितले की, ज्या लोकांनी कधीच सुवार्ता ऐकली नाही त्यांना जाऊन सांगा.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी20970, जी20980, जी42830

शोक, विलाप

व्याख्या:

"शोक" आणि "विलापगीत" ह्याचा संदर्भ शोक, दुःख, किंवा तीव्र दुःखाच्या अभिव्यक्तीशी आहे.

  • काही वेळा पापा बद्दल तीव्र पश्चात्ताप किंवा आपत्ती अनुभवलेल्या लोकांसाठी करुणा यांचा समावेश होतो.
  • विलापगीत करणे, रडणे किंवा शोक यांचा समावेश असू शकतो.

भाषांतर सूचना

  • "“शोक” या संज्ञेचे भाषांतर “खूप शोक” किंवा “दुःखाने विलाप करणे” किंवा “दु:खी होणे” असे केले जाऊ शकते.
  • “विलापगीत” (किंवा “शोक”) चे भाषांतर “मोठ्याने आक्रोश आणि रडणे” किंवा “खोल दु:ख” किंवा “दुःखदायक रडणे” किंवा “शोकमय कण्हणे” असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच0056, एच0421, एच0578, एच0592, एच1058, एच4553, एच5091, एच5092, एच5594, एच6088, एच6969, एच7015, एच8567, जी23540, जी23550, जी28700, जी28750

षंढ, खोजी

व्याख्या:

सहसा "षंढ" या शब्दाचा संदर्भ अशा मनुष्याशी आहे, ज्याला नपुंसक बनवले आहे (किंवा ज्याचे वृषण काढलेले आहे). हा शब्द नंतर एक समान्य संज्ञा बनली, जिचा संदर्भ एक शासकीय अधिकाऱ्याशी येतो, जरी त्याच्यामध्ये काही व्यंग नसले तरी.

  • येशूने म्हंटले की, कदाचित खराब झालेल्या संभोग करण्याच्या अवयावांमुळे, किंवा लैंगिकदृष्ट्या कार्य करण्यास सक्षम नसल्यामुळे, काही लोक अशा पद्धतीने षंढ बनतात. इतर लोक ब्रम्हचारी जीवनशैली जगण्यासाठी षंढाप्रमाणे राहतात.
  • प्राचीनकाळी, खोजी हे सहसा राजाचे सेवक असत, ज्यांना स्त्रियांच्या निवासस्थानावरील रक्षक म्हणून नेमण्यात आले होते.
  • काही खोजी हे महत्वाचे शासकीय अधिकार होते, जसे की, इथिओपियाचा षंढ जो प्रेषित फिलीप्पाला वाळवंटात भेटला.

(हे सुद्धा पाहा: फिलिप्प)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's: H5631, G2134, G2135


संदेष्टा, भविष्यवाणी, द्रष्ट्या, संदेष्टी

व्याख्या:

"संदेष्टा" हा एक माणूस आहे जो लोकांना देवाचे संदेश सांगतो. असे करणाऱ्या महिलेला "संदेष्टी" असे म्हणतात

  • पुष्कळदा संदेष्ट्यांनी लोकांना त्यांच्या पापांपासून दूर जाऊन देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचा इशारा दिला
  • "भविष्यवाणी" हा संदेष्टाने बोलणारा संदेश आहे. "भविष्यवाणी" करणे म्हणजे देवाचे संदेश बोलणे.
  • बऱ्याचदा भविष्यवाणीचा संदेश भविष्यात जे घडणार त्याबद्दल होता.
  • जुन्या करारामधील अनेक भविष्यवाण्या यापूर्वीच पूर्ण झाल्या आहेत.
  • बायबलमध्ये संदेष्ट्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या संग्रहाला कधीकधी "संदेष्टे" असे संबोधले जाते
  • उदाहरणार्थ, "नियम आणि संदेष्टे “हा वाक्यांश म्हणजे सर्व इब्री शास्त्रलेखांना संदर्भित करण्याचा एक मार्ग आहे, ज्याला “जुना करार" म्हणून देखील ओळखले जाते
  • संदेष्ट्यासाठी एक जुनी संज्ञा "द्रष्ट्या" किंवा" जो पाहतो तो" अशी होती
  • कधीकधी "द्रष्ट्या" हा शब्द खोट्या संदेष्ट्याला किंवा एखाद्याला जो शकून पाहतो त्याला सूचित करतो.

भाषांतरातील सूचना:

  • "प्रेषित" या शब्दाचे भाषांतर "देवाचा प्रवक्ता" किंवा "देवासाठी बोलणारा मानुस" किंवा "देवाचे संदेश सांगणारा माणूस" असे केले जाऊ शकते
  • "द्रष्ट्या" या संज्ञेचे भाषांतर "दृष्टांत पाहणारा व्यक्ती" किंवा “देवाकडून भविष्य पाहणारा मनुष्य" असे केले जाऊ शकते
  • "संदेष्टी" या शब्दाचे भाषांतर "देवाची प्रवक्ता" किंवा "देवासाठी बोलणारी स्त्री" किंवा “देवाचे संदेश सांगणारी स्त्री" असे केले जाऊ शकते "भविष्यवाणी" या संज्ञेचे भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये "देवाकडून संदेश" किंवा “संदेष्ट्याचा संदेश" याचा समावेश असू शकतो
  • "भविष्यवाणी" या संज्ञेचे भाषांतर "देवाचे वचन बोला" किंवा “देवाचा संदेश सांगा" असे केले जाऊ शकते
  • "नियम आणि संदेष्टे" या अलंकारिक अभिव्यक्तीचे भाषांतर "नियमाची आणि संदेष्ट्यांची पुस्तके" किंवा “देव आणि त्याच्या लोकांबद्दल लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी, देवाचे नियम आणि त्याच्या संदेष्ट्यांनी केलेले उपदेश" असे केले जावू शकते (पाहा: [शब्दालंकार])
  • खोट्या देवाचा संदेष्टा (किंवा द्रष्टा) याचा संदर्भ घेताना, त्यास "खोटा संदेष्टा (द्रष्टा)" किंवा "खोट्या दैवताचा संदेष्टा (द्रष्टा)" किंवा "बालाचा संदेष्टा" असे भाषांतर करणे आवश्यक असू शकते. उदाहरणार्थ.

(हे देखील पाहा: बाल, भविष्य सांगणे, खोटे देव, खोटे संदेष्टे, पुर्ण करणे, नियम, दृष्टांत)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 12:12 जेव्हा मिसरी लोक मरण पावले आहेत हे जेव्हा इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि असा विश्वास ठेवला की मोशे हा देवाचा संदेष्टा आहे.
  • 17:13 दाविदाने जे केले त्याबद्दल देव खूप रागावला होता, म्हणून त्याने दाविदाला त्याचे पाप किती वाईट आहे हे सांगण्यासाठी नाथान संदेष्ट्याला पाठविले.
  • 19:1 इस्राएल लोकांच्या संपूर्ण इतिहासात देवाने त्यांच्याकडे संदेष्टे पाठविले. संदेष्ट्यांनीदेवाकडून संदेश ऐकले आणि नंतर लोकांना देवाचे संदेश सांगितले.
  • 19:6 बालाच्या 450 संदेष्ट्यांसह संपूर्ण इस्राएल राज्यातील सर्व लोक कर्मेल पर्वतावर आले.
  • 19:17 बऱ्याचदा, लोकांनी देवाचे ऐकले केले नाही. त्यांनी बऱ्याच वेळा संदेष्ट्यांशी गैरवर्तन केले आणि कधीकधी त्यांना ठार मारले.
  • 21:9 यशया संदेष्ट्याने भविष्यवाणी केली की मसीहाचा जन्म कुमारीपासून होईल.
  • 43:5 "योएल संदेष्ट्याद्वारे केलेली ही भविष्यवाणी पूर्ण होते ज्यामध्ये देव म्हणाला,"शेवटच्या दिवसांत मी माझा आत्म्याचा वर्षाव करीन."
  • 43:7 "ही भविष्यवाणी पूर्ण होते की, तू आपल्या पवित्रजनाला थडग्यात कुजू देणार नाही."
  • 48:12 मोशे हा एक महान संदेष्टा होता ज्याने देवाचा वचनाची घोषना केली. पण येशू सर्वांत महान संदेष्टा आहे. तो देवाचा शब्द आहे.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H2372, H2374, H4853, H5012, H5013, H5016, H5017, H5029, H5030, H5031, H5197, G24950, G43940, G43950, G43960, G43970, G43980, G55780

संस्कार करणे, संस्कार केला, संस्काराचा (समर्पनासाठी)

व्याख्या:

संस्कार करणे ह्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला देवाच्या सेवेसाठी समर्पित करणे असा होतो. ज्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा संसाक्र केला जातो, तिला पवित्र समजले जाते, आणि देवासाठी वेगळे केले जाते.

  • या शब्दाचा अर्थ, "शुद्ध करणे" किंवा "पवित्र करणे" या शब्दांसारखाच होतो, पण, त्यामध्ये एखाद्याला देवाच्या सेवेसाठी औपचारिकरित्या बाजूला काढणे या अर्थाचा समावेश होतो.
  • ज्या गोष्टींचा देवासाठी संस्कार केला जातो, त्यामध्ये बलिदान करावयाचा प्राणी, होमार्पनाची वेदी आणि निवासमंडप ह्यांचा समावेश होतो.
  • ज्या लोकांचा देवासाठी संस्कार केला जातो, त्यामध्ये, याजक, इस्राएली लोक, मोठे पुरुष बालक ह्यांचा समावेश होतो.
  • काहीवेळा "संस्कार करणे" या शब्दाचा अर्थ "शुध्द करणे" या शब्दाच्या अर्थाशी समान असतो, विशेषकरून जेंव्हा त्याचा संबंध लोकांना किंवा वस्तूंना देवाच्या सेवेसाठी तयार करण्याशी येतो, जेणेकरून ते लोक शुद्ध होऊन देवासाठी स्वीकृत होतील.

भाषांतर सूचना:

  • "संस्कार करणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "देवाच्या सेवेसाठी वेगळा केलेला" किंवा "देवाच्या सेवेसाठी शुद्ध केलेला" असे केले जाऊ शकते.
  • "पवित्र" आणि "शुद्ध करणे" या शब्दाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते हे देखील समजून घ्या.

(हे सुद्धा पहाः पवित्र, शुद्ध, शुद्ध करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H2763, H3027, H4390, H4394, H5144, H5145, H6942, H6944, G1457, G5048


सत्य असणे, सत्य

व्याख्या:

"सत्य" हा शब्द तथ्ये, घटना आणि वास्तविकतेशी संबंधित विधानां यास संदर्भित करतो. वास्तविक तथ्ये विश्वाचे अस्तित्त्वात असल्याचे वर्णन करतात. वास्तविक घटना म्हणजे प्रत्यक्षात घडलेल्या घटना. खरी विधाने ही अशी विधाने आहेत जी वास्तविक जगानुसार चुकीची नाहीत.

  • "खऱ्या" गोष्टी वास्तविक, अस्सल, सत्य, योग्य, कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ आहेत.
  • "सत्य" म्हणजे समज, विश्वास, तथ्य किंवा सत्य असलेली विधाने.
  • असे म्हणायचे की एखादी भविष्यवाणी "खरी झाली "किंवा" खरी होईल" याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्षात अंदाजानुसार घडले आहे किंवा तसे होईल.
  • पवित्र शास्त्र "सत्य" या संकल्पनेत विश्वासार्ह आणि विश्वासू अशा पद्धतीने वागण्याची संकल्पना समाविष्ट आहे.
  • येशू जे बोलला त्यावरून देवाचे सत्य प्रकट झाले.
  • पवित्र शास्त्र सत्य आहे. हे देवाबद्दल आणि त्याने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल काय सत्य आहे ते शिकवते.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भ आणि वर्णन केले जात असलेल्या गोष्टींवर अवलंबून, "खरे" या शब्दाचे भाषांतर "वास्तविक" किंवा "वावस्तुनिष्ठ" किंवा "बरोबर" किंवा "योग्य" किंवा “निश्चित” किंवा" अस्सल" याद्वारे केले जाऊ शकते
  • "सत्य" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या मार्गांमध्ये "जे खरे आहे" किंवा "तथ्य" किंवा "निश्चितता" किंवा “तत्त्व" हे समाविष्ट असू शकते
  • "खरे होणे” या अभिव्यक्तीचे भाषांतर "प्रत्यक्षात घडणे" किंवा "पूर्ण होणे" किंवा" अंदाजानुसार होणे" असे देखील केले जाऊ शकते
  • "सत्य सांगणे" किंवा "सत्य बोलणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "जे खरे आहे ते सांगा" किंवा "खरोखर काय घडले ते सांगा" किंवा" विश्वासू असलेल्या गोष्टी सांगा" असे देखील केले जाऊ शकते
  • "सत्य स्वीकारणे" भाषांतर "देवाबद्दल जे खरे आहे यावर विश्वास ठेवा" असे केले जाऊ शकते
  • विश्वासाने आणि सत्याने देवाचे उपासना करणे" यासारख्या अभिव्यक्तीमध्ये "सत्याने" या अभिव्यक्तीचे भाषांतर "देवाने आपल्याला जे शिकवले त्यावर विश्वास ठेवून आज्ञा पालन करणे" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: विश्वास ठेवणे, विश्वासू, पुर्ण होणे, आज्ञा पाळणे, संदेष्टा, समजणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • 2:4 सर्पाने त्या स्त्रीला उत्तर दिले, "ते सत्य नाही! तू मरणार नाहीस. "
  • 14:6 इतर दोन हेर कालेब आणि यहोशवा ताबडतोब म्हणाले, "कनानचे लोक धिप्पाड आणि बलवान आहेत हे सत्य आहे, परंतु आम्ही त्यांना नक्कीच पराभूत करू शकतो! "
  • 16:1 इस्राएल लोकांनी यहोवा खऱ्या देवाऐवजी कनानी देवतांची उपासना करण्यास सुरवात केली
  • 31:8 त्यांनी येशूची उपासना केली, आणि त्याला म्हणाले, "खरचं, आपण देवाचे पुत्र आहात."
  • 39:10 "मी देवाचे सत्य सांगण्यासाठी पृथ्वीवर आलो आहे. ज्याला सत्य आवडते तो प्रत्येकजण माझे ऐकतो. "पिलात म्हणाला,"सत्य काय आहे? "

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0199, H0389, H0403, H0529, H0530, H0543, H0544, H0551, H0571, H0935, H3321, H3330, H6237, H6656, H6965, H7187, H7189, G02250, G02260, G02270, G02280, G02300, G11030, G33030, G34830, G36890, G41030, G41370

सदुकी

व्याख्या:

येशू ख्रिस्ताच्या काळात, सदुकी हा एक यहुदी याजकांचा राजकारणी गट होता. त्यांनी रोमी साम्राज्याला पाठिंबा दिला आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवला नाही.

  • बरेच सदूकी श्रीमंत, उच्च दर्जाचे यहुदी होते, जे मुख्य याजक आणि महायाजक यासारख्या शक्तिशाली नेतृत्वाच्या पदावर होते.
  • सदूकींच्या कर्तव्यामध्ये मंदिराच्या परिसराची काळजी घेणे आणि याजकाची कार्ये, जसे की बलिदान अर्पण करणे समाविष्ट होते.
  • सदूकी आणि परूश्यांनी जोरदारपणे रोमी अधिकाऱ्यांना येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी प्रभावित केले.
  • येशू या दोन गटांच्या स्वार्थीपणामुळे आणि ढोंगीपणामुळे त्यांच्या विरुद्धात बोलला.

(हे देखील पाहा: मुख्य याजक, परिषद, महायाजक, ढोंगी, यहुदी पुढारी, परुशी, याजक)

पवित्र बायबलमधील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: जी4523

सन्मान

व्याख्या:

"आदर" आणि "सन्मान करणे" या शब्दांचा संदर्भ एखाद्याला आदर, प्रशंसा किंवा परम आदर देण्याशी आहे.

  • सन्मान सामान्यतः उच्च दर्जा आणि महत्त्व असलेल्या व्यक्तीला दिला जातो, जसे की राजा किंवा देव.
  • देवाने ख्रिस्ती लोकांनी एकमेकांचा आदर करावा अशी सूचना दिली.
  • मुलांनी त्यांच्या आई आणी वडिलांचा मान राखावा त्या मार्गामध्ये त्यांचा आदर करणे आणि त्यांच्या आज्ञा पाळणे ह्यांचा समावेश होतो.
  • "सन्मान" आणि "गौरव" हे शब्द सहसा एकत्र वापरले जातात, विशेषत: येशूचा संदर्भ देताना. हे एकाच गोष्टीला संदर्भित करण्याचे दोन वेगवेगळे मार्ग असू शकतात.
  • देवाचा सन्मान करण्याच्या पद्धतींमध्ये, त्याला धन्यवाद देणे आणि त्याची स्तुती करणे, आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे आणि तो किती महान आहे हे दर्शवेल अशा पद्धतीने जीवन जगुन त्याला आदर देण्याचा समावेश होतो.

भाषांतर सूचना:

  • “सन्मान” या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर मार्गांमध्ये “आदर” किंवा “सन्मान” किंवा “उच्च आदर” यांचा समावेश असू शकतो.
  • “सन्मान करणे” या संज्ञेचे भाषांतर “विशेष आदर दाखवणे” किंवा “स्तुती करण्यास कारण” किंवा “उच्च आदर दाखवणे” किंवा “अत्यंत मूल्य” असे केले जाऊ शकतो

(हे देखील पाहा: अनादर, वैभव, गौरव, स्तुती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच1420, एच1921, एच1922, एच1923, एच1926, एच1927, एच1935, एच2082, एच2142, एच3366, एच3367, एच3368, एच3372, एच3373, एच3374, एच3444, एच3513, एच3519, एच3655, एच3678, एच5081, एच5375, एच5457, एच6213, एच6286, एच6437, एच6942, एच6944, एच6965, एच7236, एच7613, एच7812, एच8597, एच8416, एच08200, जी13910, जी13920, जी17840, जी21510, जी25700, जी31700, जी44110, जी45860, जी50910 जी50920, जी50930, जी53990

सभास्थान

व्याख्या:

सभास्थान ही एक इमारत होती, जिथे यहुदी लोक देवाची उपासना करण्यासाठी एकत्र जमत होते.

  • प्राचीन काळापासून, एखाद्या सभास्थानांच्या सेवेमध्ये प्रार्थनेची वेळ, शास्त्रवचनांचे वाचन आणि शास्त्रवचनांविषयी शिकवण समाविष्ट आहे.
  • यहूद्यांनी मुळात प्रथम सभास्थाने बांधण्याचे काम आपल्या स्वतःच्या गावात देवाला प्रार्थना आणि उपासना करण्याकरिता केले, कारण त्यांच्यापैकी बरेच जण यरुशलेममधील मंदिरापासून लांब दूर राहत होते.
  • येशूने बऱ्याचदा सभास्थानात शिक्षण दिले आणि तेथे लोकांना आरोग्य दिले.
  • काहीवेळा "सभास्थान" हा शब्द लाक्षणिक अर्थाने तेथे जमणाऱ्या लोकांच्या गटाला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो.

(हे सुद्धा पहा: आरोग्य, यरुशलेम, यहुदी, प्रार्थना, मंदिर, देवाचे वचन, उपासना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहिती

  • Strong's: H4150, G656, G752, G4864

समेट करणे, समेट केला, समेट

व्याख्या:

"समेट करणे" आणि "समेट" हे शब्द दोन व्यक्तींच्यामध्ये "शांती प्रस्थापित" करण्याशी येतो, जे पूर्वी एकमेकांचे शत्रू होते यास संदर्भित करतात. "समेट" ही शांती प्रस्थापित करण्याची क्रिया आहे.

  • पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दाचा सहसा संदर्भ देवाने त्याच्या पुत्र, येशू ख्रिस्ताच्या, बलीदानाद्वारे, लोकांचा त्याच्याशी समेट घडवून आणण्याशी येतो.
  • पाप केल्यामुळे, सर्व मनुष्यप्राणी हे देवाचे शत्रू बनले होते. पण त्याच्या करुणामय प्रेमामुळे, देवाने लोकांना त्याच्याशी येशूच्या द्वारे समेटाचा मार्ग प्रदान केला.
  • पापाची भरपाई म्हणून येशूच्या बलीदानावर विश्वास ठेवून, लोकांच्या पापांची क्षमा होते, आणि ते देवाबरोबर शांतीने राहू शकतात.

भाषांतर सूचना:

  • "समेट करणे" या शब्दाचे भाषांतर "शांती प्रस्थापित करणे" किंवा "चांगले संबंध पुनःस्थापित करणे" किंवा "मित्र बनण्यास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
  • "समेट" या संज्ञेचे भाषांतर "चांगले संबंध पुनःस्थापित करणे" किंवा "शांती स्थापणे" किंवा "शांतीमय संबंधास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: शांती, बलिदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच2398, एच3722, जी604, जी1259, जी2433, जी2643, जी2644

सर्वसमर्थ

तथ्य:

"सर्वसमर्थ" या संज्ञेचा शब्दशः अर्थ "सर्व-शक्तिशाली" असा होतो. पवित्र शास्त्रामध्ये, ही संज्ञा नेहमी देवला सूचित करते.

  • "सर्वसमर्थ" किंवा "सर्वशक्तिमान" हे शीर्षक देवाला सूचित करतात आणि त्याला प्रत्येक गोष्टींवर संपुर्ण सत्ता व अधिकार आहे यास प्रकट करतात
  • या शब्दाचा उपयोग "सर्वसमर्थ देव" आणि "सर्वशक्तिमान देव" आणि "सर्वशक्तिमान परमेश्वर" आणि "सर्वशक्तिमान प्रभु परमेश्वर" या शीर्षकांमध्ये देवाचे वर्णन करण्यासाठी केला जातो.

भाषांतर सूचना

  • या संज्ञेचे भाषांतर "सर्व-शक्तीमान" किंवा "संपुर्ण शक्तिशाली" किंवा "संपुर्ण शक्तिशाली असलेला देव" असे केले जाऊ शकते.
  • “सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वर” या वाक्यांशाचे भाषांतर करण्याच्या पध्दतींमध्ये “देव, शक्तिशाली शासक” किंवा “शक्तिशाली सार्वभौम देव” किंवा “प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व असलेला शक्तिशाली देव” या वाक्यांशाचा समावेश असू शकतो.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे देखील पाहा: देव, परमेश्वर, शक्ती)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

शब्द समुह:

  • स्ट्रोगं: एच7706, एच3841

सहभागीता

व्याख्या:

सामान्यपणे, "सह्भागीता" या शब्दाचा संदर्भ लोकांच्या समूहातील सदस्यांमधील मैत्रीपूर्ण संवादाशी आहे, जे समान रुची आणि अनुभव सामायिक करतात.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "सह्भागीता" या शब्दाचा संदर्भ ख्रिस्तामधील विश्वासनाऱ्यांच्या एकतेशी आहे.
  • ख्रिस्ती सह्भागीता हा विश्वासणाऱ्यांचे ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याबरोबर असलेल्या संबंधाद्वारे एकमेकांशी असलेला सामायिक नातेसंबंध आहे.
  • सुरुवातीचे ख्रिस्ती लोक त्यांची सह्भागीता देवाच्या वचनांना ऐकण्याद्वारे आणि एकत्रित प्रार्थना करण्याद्वारे, त्यांच्या मालकीच्या वस्तू सामायिक करण्याद्वारे आणि एकत्रित जेवण करण्याद्वारे व्यक्त करतात.
  • ख्रिस्ती लोक सुद्धा येशूवरील विश्वासाच्याद्वारे आणि त्याच्या वधस्तंभावरील याज्ञासंबंधीच्या मरणाद्वारे, ज्याने देव आणि लोक ह्यांच्या मधील अडसर दूर केला, देवाबरोबर सह्भागीता करू शकतात.

भाषांतर सूचना:

  • "सहभगीता" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "एकत्रित सामायिक करणे" किंवा "नातेसंबंध" किंवा "सख्य" किंवा "ख्रिस्ती समुदाय" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H2266, H8667, G2842, G2844, G3352, G4790

साक्ष, साक्ष देणे, साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी, पुरावा

व्याख्या:

जेव्हा एखादा व्यक्ती "साक्ष" देतो तेव्हा तो विधान सत्य आहे असा दावा करून आपल्याला माहीत असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल विधान करतो. "साक्ष देणे" म्हणजे "साक्ष" देणे

  • बऱ्याचदा एखादा व्यक्ती थेट अनुभवलेल्या एखाद्या गोष्टीची "साक्ष" देतो.
  • "चुकीची साक्ष" देणारा साक्षीदार जे घडले त्याबद्दल सत्य सांगत नाही.
  • कधीकधी "साक्ष" हा शब्द संदेष्ट्याने सांगितलेल्या भविष्यवाणीचा संदर्भ देतो.
  • नवीन करारामध्ये, येशूच्या जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानाच्या घटनांबद्दल येशूचे अनुयायी कसे साक्ष देतात या संदर्भात हा शब्द वापरला जात असे.

"साक्षीदार" या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने वैयक्तिकरित्या घडलेल्या एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला असेल. सामान्यत: साक्षीदार देखील अशी व्यक्ती असते जी त्यांना जे माहित असते ते सत्य आहे याची साक्ष देते. "प्रत्यक्षदर्शी" या शब्दावर जोर देण्यात आला आहे की तो व्यक्ती प्रत्यक्षात तेथे होता आणि काय घडले ते त्याने पाहिले.

  • काहीतरी "साक्षीदार" होणे म्हणजे ते घडताना पाहणे.
  • एका चाचणीत, साक्षीदार "साक्ष देतात"किंवा "साक्षी होणे," याचा अर्थ "साक्ष देणे" यासारखाच आहे
  • साक्षीदारांकडून त्यांनी जे पाहिले किंवा ऐकले त्याबद्दल सत्य सांगण्याची अपेक्षा असते.
  • जे घडले त्याबद्दल सत्य सांगत नाही अशा साक्षीदाराला "खोटे साक्षीदार"म्हणतात. त्याला "खोटी साक्ष देण्यास" किंवा "खोटे साक्षीदार होण्यास" सांगितले जाते
  • "मधील साक्षीदार व्हा" या अभिव्यक्तीचा अर्थ असा आहे की काहीतरी किंवा कोणीतरी करार केल्याचा पुरावा असेल. साक्षीदार प्रत्येक व्यक्तीने जे करण्याचे वचन दिले आहे ते करतो याची खात्री करुन घेईल.

भाषांतर सूचना:

  • "साक्ष देणे"किंवा "साक्ष द्या" या शब्दाचे भाषांतर "तथ्य सांगा" किंवा "जे पाहिले किंवा ऐकले ते सांगा" किंवा "वैयक्तिक अनुभवावरून सांगा" किंवा "पुरावा द्या" किंवा"काय झाले ते सांगा" असे देखील केले जाऊ शकते.
  • "साक्ष" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पध्तीमध्ये "जे घडले त्याचा अहवाल" किंवा "खरा आहे त्याचे विधान" किंवा "पुरावा" किंवा "जे सांगितले गेले आहे" किंवा"प्रसार" समाविष्ट असू शकते
  • "त्यांची साक्ष म्हणून" या वाक्यांशाचे भाषांतर "जे खरे आहे ते त्यांना दर्शविण्यासाठी" किंवा"जे खरे आहे ते त्यांना सिद्ध करण्यासाठी" केले जाऊ शकते.
  • "त्यांच्याविरूद्ध साक्ष म्हणून"या वाक्यांशाचे भाषांतर "जे त्यांना त्यांचे पाप दर्शवेल" किंवा "त्यांचा ढोंगीपणा उघडकीस आणेल" किंवा"जे ते चुकीचे असल्याचे सिद्ध करेल" केले जाऊ शकते.
  • "चुकीची साक्ष द्या" या वाक्याचे भाषांतर "चुकीच्या गोष्टी सांगा" किंवा "ज्या गोष्टी सत्य नाहीत अशा गोष्टीचे विधान करा" असे केले जाऊ शकते.
  • "साक्षीदार"किंवा "प्रत्यक्षदर्शी" या शब्दाचा अर्थ "ज्याने ते पाहिले आहे" किंवा "ज्याने ते पाहिले आहे" किंवा"ज्यांनी पाहिले आणि ऐकले (त्या गोष्टी)" अशा शब्द किंवा वाक्यांशासह अनुवादित केले जाऊ शकतात
  • “साक्षीदार” असे काहीतरी या वाक्याचे भाषांतर “हमी” किंवा “आमच्या वचनाचे चिन्ह” किंवा “हे खरे असल्याची साक्ष देणारे काहीतरी” असे केले जाऊ शकते.
  • "तुम्ही माझे साक्षीदार व्हाल"या वाक्यांशाचे भाषांतर "तुम्ही माझ्याबद्दल इतर लोकांना सांगाल" किंवा "तुम्ही लोकांना मी शिकविलेले सत्य शिकवाल" किंवा"तुम्ही मला काय केले ते तुम्ही लोकांना सांगाल आणि मला शिकवताना ऐकले."
  • "साक्षीदार" या शब्दाचे भाषांतर "जे पाहिले होते ते सांगा" किंवा "काय झाले ते सांगा" किंवा"जे घडले ते सांगा" म्हणून अनुवादित केले जाऊ शकते
  • कशाचा तरी "साक्षी" याचे भाषांतर "काहीतरी पाहा" किंवा"काहीतरी घडण्याचा अनुभव" म्हणून अनुवादित केले जाऊ शकते

(हे देखील पाहा: कराराचा कोश, दोष, न्याय करणे, संदेष्टा, साक्ष, सत्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

बायबलमधील कथांमधील उदाहरणे:

  • 39:2 घराच्या आत यहुदी नेत्यांनी येशूला चाचणी केली. त्यांनी बरेच खोटे साक्षीदार आणले ज्यांनी त्याच्याबद्दल खोटे बोलले
  • 39:4 मुख्य याजकांनी रागाने आपले कपडे फाडले आणि ओरडले, "आम्हाला यापुढे साक्षीदारांची गरज नाही. आपण त्याला देवाचा पुत्र असल्याचे ऐकले आहे. तुमचा निर्णय काय आहे? "
  • 42:8 हे माझे शिपाई घोषित करतील की त्यांच्या पापांबद्दल क्षमा मिळावी म्हणून प्रत्येकाने पश्चात्ताप करावा.". ते यरुशलेमापासून हे करतील आणि नंतर सर्वत्र सर्व लोकांच्या गटात जातील. आपण या गोष्टींचे साक्षीदार आहात. "
  • 43:7 "आपण येशूला पुन्हा जिवंत केले या कारणास्तव आम्ही साक्षीदार आहोत."

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H5707, H5713, H5715, H5749, H6030, H8584, G02670, G12630, G19570, G26490, G31400, G31410, G31420, G31430, G31440, G43030, G48280, G49010, G55750, G55760, G55770, G60200

सियोन, सियोन पर्वत

व्याख्या:

मूळतः "सियोन" किंवा "सियोन पर्वत" या शब्दांचा संदर्भ गढ किंवा किल्ला ह्याच्याशी येतो, ज्याला दावीद राजाने यबुसी लोकांच्याकडून जिकून घेतले होते. हे दोन्ही शब्द यरुशलेमला संदर्भित करण्याचे इतर मार्ग आहेत.

  • यरुशलेम हे शहर सिनाय पर्वत आणि मोरिया पर्वत या दोन टेकड्यांवर वसलेले होते. नंतर "सियोन" आणि "सियोन पर्वत" या दोन्ही पर्वतांना आणि यरुशलेम शहराला संदर्भित करण्यासाठीच्या सामान्य संज्ञा बनल्या. काहीवेळा त्यांना यरुशलेममध्ये स्थित असलेल्या मंदिराला संदर्भित करण्यासाठी सुद्धा वापरले गेले. (पहा: रूपक)
  • दावीदाने सियोन किंवा यरुशलेम हिचे नाव "दाविद्पूर" असे ठेवले. हे दाविदाच्या मूळ गावा पासून वेगळे होते, बेथलेहेम, या शहराला सुद्धा दाविदाचे नगर असे म्हंटले जाते.
  • "सियोन" या शब्दाचा उपयोग दुसऱ्या लाक्षणिक अर्थाने इस्राएल किंवा देवाचे आत्मिक राज्य किंवा नवीन स्वर्गीय यरुशलेम, जीला देव निर्माण करील ह्यांना संदर्भित करण्यासाठी सुद्धा केला जातो.

(हे सुद्धा पाहा: अब्राहाम, दावीद, यरुशलेम, बेथलेहेम, यबुसी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच6726

सियोनच्या कन्या

व्याख्या:

"सियोनाच्या कन्या" हा इस्राएलाच्या लोकांना संदर्भित करण्याचा लाक्षणिक मार्ग आहे. ह्याचा उपयोग सहसा भविष्यवाणींमध्ये होतो.

  • जुन्या करारात, "सियोन" हे येरुशलेम शहराचे दुसरे नाव म्हणून वापरले जाते.
  • "सियोन" आणि "येरुशलेम" हे दोन्ही इस्रायलचा संदर्भ देण्यासाठी देखील वापरले जातात.
  • "मुलगी" हा शब्द प्रेमळपणा किंवा ममता ह्यांचा शब्द आहे. हे देवाचे त्याच्या लोकांच्याप्रती असलेली सहनशीलता आणि काळजीचे हे रूपक आहे.

भाषांतर सूचना

  • ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "सियोनेपासूनची माझी मुलगी इस्राएल" किंवा "सियोनेचे लोक, जे मला माझ्या मुली सारखे आहेत" किंवा "सियोन, माझे इस्राएलचे प्रिय लोक" असे केले जाऊ शकते.
  • "सियोन" हा शब्द, या अभिव्यक्तीमध्ये तसेच ठेवणे हे सर्वोत्तम आहे, कारण ह्याचा उपयोग पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच वेळा करण्यात आला आहे. या शब्दाचा लाक्षणिक अर्थ आणि भविष्यवाणीतील उपयोगासाठी भाषांतरामध्ये एका टीप्पणाचा समावेश केला जाऊ शकतो.
  • जो पर्यंत हे अचूकरीत्या समजले जाते, तोपर्यंत या अभिव्यक्तीच्या भाषांतरामध्ये "मुलगी" या शब्दाला ठेवणे हे उत्तम राहील.

(हे सुद्धा पाहा: यरुशलेम, संदेष्टा, सियोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहिती:

  • स्ट्रोंग: एच1323, एच6726

सुंता करणे, सुंता केलेले, सुंता, सुंता न झालेला, बेसुनत,

व्याख्या:

“सुंता” या शब्दाचा अर्थ पुरुष किंवा पुरुष मुलाची कातडी कापणे होय. यासंदर्भात सुंता करण्याचे कार्यक्रम केला जाऊ शकतो.

  • देवाने अब्राहामास त्यांच्याबरोबर केलेल्या कराराची साक्ष म्हणून आपल्या कुटुंबातील प्रत्येक पुरुषांची आणि सेवकांची सुंता करुन घेण्याची आज्ञा दिली.
  • देवाने अब्राहामाच्या वंशजांना त्यांच्या घरात जन्मलेल्या प्रत्येक मुलांचे असे करण्याचे चालू ठेवण्याची आज्ञा दिली.
  • “अंतःकरणाची सुंता” हे वाक्यांश लाक्षणिक अर्थाने एखाद्या व्यक्तीपासून पाप कापून टाकणे किंवा काढून टाकणे याला संदर्भित करते.
  • आध्यात्मिक अर्थाने, “सुंता झालेले” ज्यांना देवाने येशुच्या रक्ताद्वारे पापापासून शुध्द केले आणि जे त्याचे लोक आहेत अश्या लोकांना संदर्भित करते
  • “सुंता न झालेली” हा शब्द म्हणजे ज्यांची शारीरिक सुंता झाली नाही त्यांना सूचित करते. हे आध्यात्मिकदृष्ट्या सुंता न झालेल्या व देवासोबत संबंध नसलेल्यांनाही लाक्षणिक अर्थाने सूचित करते.

“सुंता न झालेले” आणि “बेसुनत” या शब्दाचा अर्थ एखाद्या पुरुषाबद्दल आहे ज्याची शारीरिक सुंता झाली नाही. या संज्ञा देखील लाक्षणिक पद्धतीने वापरल्या जातात.

  • मिसर हे एक असे राष्ट्र होते तेथे देखिल सुंता करण्याची गरज होती. तर, “सुंता न झालेल्या” लोकांद्वारे मिसराला पराभूत करण्याविषयी जेव्हा देव बोलतो तेव्हा तो अशा लोकांबद्दल बोलत आहे ज्यांची सुंता न झाल्याबद्दल मिसरी लोकांनी तुच्छ लेखिले.
  • पवित्र शास्त्र अशा लोकांचा उल्लेख करते ज्यांचे “सुंता न झालेले हृदय” किंवा “अंत: करणाची सुंता न झालेले” आहेत. हे असे लोक म्हणण्याचा हा अलंकारिक मार्ग आहे
  • जर सुंता यासाठी एखादा शब्द भाषेत वापरला किंवा ओळखला गेला तर “बेसुनत” हे “सुंता झालेली नाही” असे भाषांतरीत केले जाऊ शकते.
  • “बेसुनत” ही अभिव्यक्ती भाषांतर संदर्भानुसार “सुंता न झालेले लोक” किंवा “देवाचे नाही असे लोक” असे केले जाऊ शकते, संदर्भावर अवलंबून आहे
  • या शब्दाच्या अलंकारिक अर्थ अनुवाद करण्याच्या इतर मार्गांमध्ये “देवाचे लोक नाहीत” किंवा “जे देवाचे नाहीत असे बंडखोर” किंवा “देवाचे लोक आहेत हे चिन्ह नसणारे लोक” समावेश असू शकतो.
  • जर सुंता यासाठी एखादा शब्द भाषेत वापरला किंवा ओळखला गेला तर “बेसुनत” हे “सुंता झालेली नाही” असे भाषांतरीत केले जाऊ शकते.

भाषांतरातील सुचना:

  • जर लक्ष्य भाषेची संस्कृती पुरुषांची सुंता करते, तर याचा संदर्भ घेण्यासाठी वापरलेला शब्द या संज्ञेसाठी वापरला जावा.
  • हा शब्द भाषांतरित करण्याचे इतर मार्ग म्हणजे, “सर्वत्र कापणे” किंवा “वर्तुळात कापून टाकणे” किंवा “पुढचा भाग कापून टाकणे.”
  • ज्या संस्कृतीत सुंता होत नाही अशा संस्कृतींमध्ये तळटीप किंवा शब्दकोशात त्याचे स्पष्टीकरण असणे आवश्यक असू शकते.
  • याची खात्री करा की याचा अनुवाद करण्यासाठी वापरलेली संज्ञा महिलांना संदर्भित करत नाही. पुरुषाचा समावेश असलेल्या शब्दाने किंवा वाक्यांशासह भाषांतरित करणे आवश्यक असू शकते

(हे देखील पहा: अज्ञातांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पहा: अब्राहम, करार)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहणे:

  • 5:3 "तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रत्येक पुरुषाची सुंता करणे आवश्यक आहे."
  • 5:5 त्या दिवशी अब्राहामाने आपल्या घरातील सर्व पुरुषांची सुंता केली.

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच4135, एच4139, एच5243, एच6188, एच6189, एच6190, जी203, जी564, जी1986, जी4059, जी4061

सुज्ञ, ज्ञान

व्याख्या:

"सुज्ञ" हा शब्द एखाद्या व्यक्तीला ज्यास करण्यासाठी योग्य आणि नैतिक गोष्टी कोणत्या आहे हे समजते आणि नंतर तसे करतो यास संदर्भित करतो. "ज्ञान" हे एक खरे आणि नैतिकदृष्ट्या योग्य असलेल्या गोष्टींची समज आणि सराव आहे.

  • सुज्ञ असण्यामध्ये चांगले निर्णय घेण्याची क्षमता समाविष्ट आहे, विशेषत: देवाला जे आवडते ते करण्याचे निवडणे..
  • देवाचे ऐकून आणि नम्रपणे त्याची इच्छा पूर्ण करण्याद्वारे लोक सुज्ञ होतात.
  • एक सुज्ञ व्यक्ती आपल्या जीवनात पवित्र आत्म्याची फळे दर्शवतो, जसे की आनंद, दया, प्रेम आणि सहनशीलता.

भाषांतर सूचना:

  • संदर्भाच्या आधारावर, "सुज्ञ" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "देवाला आज्ञाधारक" किंवा "शहाणा आणि आज्ञाधारक" किंवा "देवभिरू" ह्यांचा समावेश होतो.
  • "ज्ञान" या शब्दाचे भाषांतर "सुज्ञ जीवन" किंवा "शहाणपणाचे आणि आज्ञाधारक जीवन" किंवा "सुयोग्य निर्णय" या अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • धार्मिक किंवा आज्ञाधारक अशा इतर महत्त्वाच्या शब्दांपासून वेगळे असलेल्या पध्दतीने "सुज्ञ" आणि "ज्ञान" या शब्दांचे भाषांतर करणे चांगले आहे.

(हे देखील पाहा: आज्ञाधारक, फळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 2:5 तिला शहाणे देखील व्हायचे होते, म्हणुन तिने कांही फळे घेतली व खाल्ली.
  • 18:1 जेव्हा शलमोनाने बुद्धि मागितली तेंव्हा देव त्याच्यावर प्रसन्न झाला व त्याने त्याला जगातील सर्वांत ज्ञानी मनुष्य बनविले. शलमोन अनेक गोष्टी शिकला व तो एक सुज्ञ न्यायाधीश झाला.
  • 23:9 थोडया दिवसांनंतर, पूर्व दिशेला एक विशेष तारा ज्ञानी लोकांनी पाहिला.
  • 45:1 तो एक प्रतिष्ठित पुरूष होता, तो ज्ञानी व पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा होता.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H998, H1350, H2445, H2449, H2450, H2451, H2452, H2454, H2942, H3820, H3823, H6195, H6493, H6912, H7535, H7919, H7922, H8454, G4678, G4679, G4680, G4920, G5428, G5429, G5430

सुटका करणे, सुटका करणारा, पूर्तता

व्याख्या:

"पुर्तता" या शब्दाचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती जी पूर्वीच्या मालकीची किंवा बंदिवान केलेली आहे ती परत विकत घेणे. "रिडीमर" म्हणजे एखादी व्यक्ती किंवा कोणाची तरी पूर्तता करणारा.

  • देवाने इस्राएल लोकांना लोकांची किंवा वस्तूंची सुटका कशी करायची याचे नियम दिले. उदाहरणार्थ, कोणीतरी गुलामगिरीत असलेल्या व्यक्तीला किंमत देऊन सोडवू शकतो जेणेकरून गुलाम मुक्त होऊ शकेल. “खंडणी” हा शब्द देखील या प्रथेला सूचित करतो.
  • जर एखाद्याची जमीन विकली गेली असेल, तर त्या व्यक्तीचा नातेवाईक ती जमीन “पुन्हा” घेऊ शकतो किंवा “परत विकत” घेऊ शकतो जेणेकरून ती कुटुंबात टिकेल.
  • या पद्धती दाखवतात की देव पापाच्या गुलामगिरीत असलेल्या लोकांना कसे सोडवतो. जेव्हा तो वधस्तंभावर मरण पावला, तेव्हा येशूने लोकांच्या पापांची पूर्ण किंमत दिली आणि तारणासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची सुटका केली. ज्या लोकांना देवाने सोडवले आहे त्यांना पाप आणि त्याच्या शिक्षेपासून मुक्त केले जाते.

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, “रिडीम” या संज्ञेचे भाषांतर “बाय बॅक” किंवा “मोफत (एखाद्याला) किंवा “खंडणी” असे देखील केले जाऊ शकते.
  • "विमोचन" या शब्दाचे भाषांतर "खंडणी" किंवा "स्वातंत्र्य पेमेंट" किंवा "परत खरेदी करणे" असे केले जाऊ शकते.
  • “खंडणी” आणि “रिडीम” या शब्दांचा मुळात एकच अर्थ आहे, त्यामुळे काही भाषांमध्ये या दोन्ही शब्दांचे भाषांतर करण्यासाठी एकच संज्ञा असू शकते. तथापि, “खंडणी” या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्याची “पूर्तता” करण्यासाठी आवश्यक पेमेंट असा देखील होऊ शकतो. "रिडीम" हा शब्द कधीही वास्तविक देयकाचा संदर्भ देत नाही.

(हे देखील पाहा: मुक्त, खंडणी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच 1350, एच 1353, एच 6299, एच 6302, एच 6304, एच 6306, एच 6561, एच 7069, जी 59, जी 629, जी 1805, जी 3085

सुवार्तिक

व्याख्या:

"सुवार्तिक" हा असा व्यक्ती आहे, जो इतर लोकांना येशू ख्रिताबद्दलची शुभ वार्ता सांगतो.

  • "सुवर्तिक" या शब्दाचा शब्दशः अर्थ, असा कोणीतरी जो शुभ वर्तमानाचा संदेश देतो.
  • येशूने त्याच्या प्रेषितांना, कसे आपण येशू ख्रिस्तावर आणि पापासाठी त्याने केलेल्या बलीदानाद्वारे, देवाच्या राज्याचे सहभागी होऊ शकतो, ह्याची शुभ वार्ता पसरवण्यासाठी बाहेर पाठीवले.
  • सर्व ख्रिस्ती लोकांना ही शुभ वार्ता पसरवण्याची विनंती आहे.
  • काही ख्रिस्ती लोकांना शुभवर्तमान परिणामकारक सांगण्याचे विशिष्ठ वरदान दिलेले असते. या लोकांना सुवार्तेचे वरदान आहे असे म्हंटले जाते, आणि त्यांना "सुवार्तिक"असे म्हंटले जाते.

भाषांतर सूचना:

  • "सुवार्तिक" या शब्दाचे भाषांतर, "असा कोणी जो शुभ वार्तेचा संदेश देतो" किंवा "शुभवर्तमानाचा शिक्षक" किंवा "असा व्यक्ती जो (येशूची) शुभ वार्ता घोषित करतो" किंवा "शुभवर्तमानाची घोषणा करणारा" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहाः शुभ वार्ता, आत्मा, वरदान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:


सेनाधीश यहोवा, सेनाधीश देव, स्वर्गातील यजमान, स्वर्गाचा अधिकारी, सैन्यांचा देव

व्याख्या:

"सेनाधीश यहोवा" आणि "सेनाधीश देव" हे शब्द शीर्षक आहेत, जे देवाची आज्ञा पाळणाऱ्या हजारो देवदुतांवर त्याचा अधिकार व्यक्त करतात.

  • "सेना" आणि "सैन्य" हे शब्द कशाच्यातरी मोठ्या संख्येला संदर्भित करतात, जसे की लोकांचे सैन्य किंवा ताऱ्यांची प्रचंड संख्या. हे सर्व आत्मिक अस्तित्वांना देखील संदर्भित करू शकतात, ज्यामध्ये दुष्ट आत्म्यांचा समावेश होतो. मजकूर स्पष्ट करतो की, हे कशाला संदर्भित करते.
  • "आकाशातील नक्षत्रे" यासारखे वाक्यांश सर्व तारे, ग्रह, आणि आकाशातील इतर शरीरे ह्यांना संदर्भित करतात.
  • नवीन करारामध्ये, सैन्यांचा देव" या वाक्यांशाचा अर्थ "सेनाधीश यहोवा" ह्याच्या अर्थासारखाच आहे, परंतु त्याला त्याच मार्गाने भाषांतरीत केले जाऊ शकत नाही, कारण इब्री शब्द "यहोवा" ह्याचा उपयोग नवीन करारामध्ये केलेला नाही.

भाषांतर सूचना

  • "सेनाधीश याहोवा" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "यहोवा, जो सर्व देवदुतांवर सत्ता गाजवतो" किंवा "यहोवा, देवदूतांच्या सैन्याचा शासक" किंवा "यहोवा, सर्व निर्मितीचा अधिकारी" ह्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
  • "सेनाधीश देव" किंवा "सैन्यांचा प्रभु" या शब्दांमधील "चे सैन्य" या वाक्यांशाचे भाषांतर वर केलेल्या "सेनाधीश यहोवा" या वाक्यांशाप्रमाणेच केले जाऊ शकते.
  • काही मंडळ्या "यहोवा" या शब्दाचा शब्दशः स्वीकार करीत नाहीत, त्याऐवजी, त्या अनेक पवित्र शास्त्राच्या आवृत्यांचे अनुसरण करीत, मोठ्या अक्षरात लिहिलेला "प्रभु (LORD)" या शब्दाचा उपयोग करण्यास प्राधान्य देतात. त्या मंडळींसाठी, "सैन्यांचा देव" या शब्दाच्या भाषांतराचा उपयोग जुन्या करारातील "सेनाधीश यहोवा" ह्याच्या जागी करता येईल.

(हे देखील पाहा: देवदूत, अधिकार, देव, प्रभु, परमेश्वर, [परमेश्वर यहोवा] (../kt/lordyahweh.md), यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H0430, H3068, H6635, G29620, G45190

सेवक

व्याख्या:

सेवक हा असा व्यक्ती आहे, जो स्थानिक मंडळीमध्ये सेवा करतो, त्याच्या सहकारी विश्वासणाऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजा, जसे की अन्न किंवा पैसा ह्यासाठी मदत करतो.

  • "सेवक" हा शब्द थेट ग्रीक भाषेतून घेतला आहे, त्याचा अर्थ "सेवक" किंवा "सेवा करणारा" असा होतो.
  • सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांच्या काळापासून, सेवक असणे ही मंडळीच्या शरीरामधील सु-परिभाषित भूमिका आणि सेवा आहे.
  • उदाहरणार्थ, नवीन करारामध्ये, सेवक या गोष्टीची खात्री करत की, विश्वासणाऱ्यांनी जे काही पैसे किंवा अन्न दिले आहे, ते त्या मंडळींच्या विधावांमध्ये समान वाटले गेले आहेत.
  • "सेवक" या शब्दाचे भाषांतर, "मंडळीचा सेवा करणारा" किंवा "मंडळीचा कामगार" किंवा "मंडळीचा सेवक" किंवा इतर काही वाक्यांशांनी जे असे दाखवतील की, एखाद्या व्यक्तीला एखादे ठराविक काम करण्यासाठी जे स्थानिक ख्रिस्ती समुदायाच्या फायद्याचे आहे त्यासाठी औपचारिकरित्या नियुक्त केलेले आहे.

(हे देखील पाहा : सेवा करणारा, सेवक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द समूह

  • स्ट्रोंग : जी 12490

सैतान, दुष्ट आत्मा, अशुद्ध आत्मा

व्याख्या:

या सर्व संज्ञा सैतानाला संदर्भित करतात, ते असे आत्मे आहेत जे देवाच्या इच्छेला विरोध करतात.

  • देवाने देवदूतांची निर्मिती त्याची सेवा करण्यासाठी केली. जेव्हा सैतानाने देवाविरुद्ध बंड केले, काही देवदूतांनी देखील बंड केले आणि ते स्वर्गाच्या बाहेर फेकले गेले. असे मानले जाते की, सैतान आणि दुष्ट आत्मे हे तेच "पडलेले देवदूत" आहेत.
  • काहीवेळा या सैतानांना "अशुद्ध आत्मे" देखील म्हणतात. "अशुद्ध" या शब्दाचा अर्थ "घाणेरडा" किंवा "दुष्ट" किंवा "अपवित्र" असा होतो.
  • भूते सैतानाची सेवा करतात म्हणून ते वाईट गोष्टी करतात. काहीवेळा ते लोकांमध्ये राहतात आणि त्यांना नियंत्रित करतात.
  • सैतान हा मनुष्यापेक्षा ताकदवान आहे पण देवाइतका ताकदवान नाही,

भाषांतर सूचना:

  • "सैतान" या शब्दाचे भाषांतर "दुष्ट आत्मा" असेही केले जाऊ शकते.
  • "अशुद्ध आत्मा" ह्याचे भाषांतर "घाणेरडा आत्मा" किंवा "भ्रष्ट आत्मा" किंवा "दुष्ट आत्मा" असे देखील केले जाऊ शकते.
  • या शब्दाचे भाषांतर करण्याकरिता वापरण्यात येणारा शब्द किंवा वाक्यांश हा सैतान या शब्दाला संदर्भित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दापेक्षा वेगळा आहे ह्याची खात्री करा.
  • स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत "सैतान" या शब्दाचे भाषांतर कसे केले गेले आहे हे देखील विचारात घ्या. (पाहाः अज्ञात कसे भाषांतरित करावे)

(हे देखील पाहा : भुत लागलेले, सैतान, खोटे देव, खोटे देव, देवदुत, दुष्ट, शुध्द)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 26:09 भुते लागलेले असे अनेक लोक येशूकडे आणिले गेले. जेव्हा येशूने त्यांना आज्ञा केली, ती भूते त्या मनुष्यांतून बाहेर निघाली व पुष्कळदा ओरडून म्हणत ‘‘तू देवाचा पुत्र आहेस!’’
  • 32:08 तेव्हा दुष्टात्मे त्या माणसामधून निघून डुकरामध्ये घुसले.
  • 47:05 शेवटी एके दिवशी ती दासी मुलगी ओरडू लागली, पौलाने तिच्याकडे वळून तिच्यामध्ये असणाऱ्या दूष्टआत्म्याला म्हटले, "येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा." आणि तत्काळ तो दूष्टआत्मा तिला सोडून निघून गेला.
  • 49:02 तो(येशू) पाण्यावर चालला, वादळांना शांत केले, अनेक आजा-यांना बरे केले, दुष्टात्म्यांना बाहेर काढले, मेलेल्यांना जिवंत केले, व पाच भाकरी व दोन मासळ्यांद्वारे 5,000 पेक्षा अधिक लोकांना पोटभर जेवू घातले.

शब्द समूह

  • स्ट्रोंग : H2932, H7307, H7451, H7700, G01690, G11390, G11400, G11410, G11420, G41900, G41510, G41520, G41890

सैतान, भूत, दुष्ट

तथ्य:

जरी सैतान हा देवाने बनवलेला आत्मा आहे, तरी त्याने देवाविरुद्ध बंड केले आणि तो देवाचा शत्रू झाला. भूताला "सैतान" किंवा "दुष्ट" असेही संबोधले जाते.

  • देव आणि जे काही देवाने निर्माण केले आहे, त्याचा सैतान तिरस्कार करतो कारण त्याला देवाची जागा घ्यायची आहे आणि देव म्हणून स्वतःची उपासना करवून घ्यायची आहे.
  • सैतान लोकांना देवाविरुद्ध बंड करण्यासाठी मोहात पडतो.
  • देवाने त्याच्या पुत्राला, येशू, यास लोकांना सैतानाच्या तावडीतून सोडवण्यासाठी पाठविले.
  • सैतान या नावाचा अर्थ "विरोधक" किंवा "शत्रू."
  • "दुष्ट" या शब्दाचा अर्थ "दोष लावणारा असा आहे"

भाषांतर सूचना:

  • "दुष्ट" या शब्दाचे भाषांतर "दोष लावणारा" किंवा "एक दुष्ट" किंवा "दुष्ट आत्म्यांचा राजा" किंवा "दुष्टात्म्यांचा मुख्य" असे देखील केले जाऊ शकते.
  • "सैतान" ह्याचे भाषांतर "विरोधक" किंवा "प्रतिस्पर्धी" किंवा दुसरे एखादे नाव ज्याद्वारे असे दर्शविले जाते की तो दुष्ट आहे, असे केले जाऊ शकते.
  • या शब्दाचे भाषांतर "पिसाच्य" आणि "दुष्ट आत्मे" यापासून वेगळे असावे.
  • या संज्ञा राष्ट्रीय भाषा किंवा अन्य स्थानिक भाषेत कशा प्रकारे भाषांतरित केल्या जातात ते देखील विचारात घ्या.

(पाहाः अज्ञात कसे भाषांतरित करावे)

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करावे)

(हे देखील पाहा: पिसाच्च, दुष्ट, देवाचे राज्य, मोह)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 21:01 ज्या सापाने हव्वेस फसविले तो सैतान होता. अभिवचनाचा अर्थ असा होता की मसिहा सैतानास पुर्णपणे पराजित करील.
  • 25:06 मग सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये व वैभव दाखविले व म्हणाला,‘‘जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन.’’
  • 25:08 अशा प्रकारे येशू सैतानाच्या मोहाला बळी पडला नाही, म्हणून सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला.
  • 33:06 म्हणून येशूने स्पष्ट केले, ‘‘बी हे देवाचे वचन आहे. वाटेवरची जमीन म्हणजे असा व्यक्ती की जो देवाचे वचन ऐकतो पण समजून घेत नाही आणि सैतान येऊन ते मनातून काढून टाकतो.’’
  • 38:07 यहूदाने भाकर घेतल्याबरोबर, सैतानाने त्याच्यामध्ये प्रवेश केला.
  • 48:04 देवाने अभिवचन दिले की हव्वेचा एक वंशज सैतानाचे डोके फोडिल व सैतान त्याची टाच फोडिल. अर्थात सैतान मसिहास जीवे मारील, परंतु देव त्यास पुन्हा जिवंत करील आणि मग मसिहा सैतानाच्या सत्तेचा संपूर्ण नायनाट करील.
  • 49:15 देवाने आपणांस सैतानाच्या अंधःकारमय राज्यातून काढून आपल्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आणिले आहे.
  • 50:09 "निदण म्हणजे सैतानाचे लोक. ज्या शत्रूने निदण पेरले, तो शत्रू म्हणजे सैतान.
  • 50:10 "जेव्हा जगाचा शेवट होईल, तेव्हा देवदूत सैतानाच्या सर्व लोकांस एकत्र करून न विझणाऱ्या अग्निमध्ये टाकून देईल, तेथे रडणे व दात खाणे चालेल.
  • 50:15 जेव्हा येशू परत येईल, तो सैतान व त्याच्या राज्याचा नाश करील. तो सैतानाला नरकात टाकील, ज्या ठिकाणी तो सर्वकाळ जळत राहील, त्याच्याबरोबर ज्यांनी त्याच्या मागे जाण्याचे निवडले व देवाची आज्ञा मानली नाही तेही असतील.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: H7700, H7854, H8163, G1139, G1140, G1141, G1142, G1228, G4190, G4566, G4567

सोडणे, सोडला, त्याग केला, त्यागले

व्याख्या:

"सोडणे" या शब्दाचा अर्थ एखाद्याचा त्याग करणे किंवा काहीतरी सोडून देणे असा होतो. असा कोणीतरी ज्याचा "त्याग केला" आहे, दुसऱ्या एखाद्याने त्याला सोडलेले आहे किंवा त्याचा त्याग केला आहे.

  • जेंव्हा लोक देवाला "सोडतात" तेंव्हा ते त्याची आज्ञा न पाळता त्याच्याशी अविश्वासू असतात.
  • जेंव्हा देव लोकांना "सोडतो," तेंव्हा तो त्यांची मदत करण्याची थांबवतो आणि त्यांना त्याच्याकडे परत वळवून आणण्यासाठी त्यांना त्रासाचा अनुभव करण्यास परवानगी देतो.
  • या शब्दाचा अर्थ वस्तूंना सोडणे असा देखील होतो, जसे की, देवाच्या शिक्षणाचा त्याग करणे किंवा त्याचे अनुसरण न करणे.
  • "त्याग केलेला" हा शब्द भूतकाळी रूप म्हणून वापरले जाऊ शकते, जसे की, "त्याने तुझा त्याग केला" किंवा अशा एखाद्याला संदर्भित करणे ज्याचा "त्याग केला आहे."

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "त्याग करणे" किंवा "दुर्लक्ष करणे" किंवा "सोडून देणे" किंवा "च्या पासून दूर जाणे" किंवा "मागे सोडणे" ह्यांचा संदर्भाच्या आधारावर समावेश होतो.
  • देवाच्या नियमांना "सोडणे" ह्याचे भाषांतर "देवाच्या नियमांची अवज्ञा करणे" असे केले जाऊ शकते. ह्याचे भाषांतर त्याच्या शिकवणींचा किंवा त्याच्या नियमांचा "त्याग करणे" किंवा "सोडून देणे" किंवा "आज्ञा पालन करण्याचे थांबवणे" असे देखील केले जाऊ शकते.
  • "त्याग केलेला असणे" या वाक्यांशाचे भाषांतर "त्यागलेला असणे" किंवा "सोडून दिलेले असणे" असे देखील होऊ शकते.
  • मजकूर एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला सोडून देण्याचे वर्णन करतो, या संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा उपयोग करणे अधिक स्पष्ट करेल.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's: H488, H2308, H5203, H5428, H5800, H5805, H7503, G646, G657, G863, G1459, G2641,


स्तोत्र

व्याख्या:

"स्तोत्र" ही संज्ञा पवित्र गाण्याला संदर्भित करते, हे सहसा गाता यावे म्हणून कवितेच्या रुपात लिहिले जाते.

  • जुन्या करारातील स्तोत्रसंहिता या पुस्तकात या गाण्यांचा संग्रह केला आहे जे दावीद राजाने आणि इतर इस्राएली लोकांमधील जसे की, मोशे, शलमोन, आणि आसाफ यांनी लिहिली आहेत.
  • इस्राएल राष्ट्राद्वारे त्यांच्या देवाची उपासना करण्यासाठी स्तोत्रांचा उपयोग केला जात होता.
  • स्तोत्रांचा उपयोग आनंद, विश्वास आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी, तसेच वेदना आणि दुःख व्यक्त करण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • नवीन करारात, ख्रिस्ती लोकांना देवाची उपासना करण्याच्या पद्धतीमध्ये स्तोत्रे गाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

(हे देखील पाहा: दावीद, विश्वास, आनंद, मोशे, पवित्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच2158, एच2167, एच4210, जी5567, जी5568

स्वच्छ करणे, धुणे

व्याख्या:

"स्वच्छ" हा शब्द सामान्यतः एखाद्या व्यक्तीकडून/काहीतरी वरून घाण किंवा डाग काढून टाकणे किंवा प्रथम स्थानावर कोणतीही घाण किंवा डाग नसणे असा होतो. "धुणे" हा शब्द विशेषत: एखाद्यातून/कशातून घाण किंवा डाग काढून टाकण्याच्या क्रियेला सूचित करतो.

  • “स्वच्छ करणे” म्हणजे काहीतरी “स्वच्छ” करण्याची प्रक्रिया. याचे "धुणे" किंवा "शुद्ध करणे" असे देखील भाषांतरित केले जाऊ शकते.
  • जुन्या करारामध्ये, त्याने कोणते प्राणी विधीनुसार “शुद्ध” केले आहेत व कोणते प्राणी “अशुध्द” केले आहेत हे देवान इस्राएल लोकांना सांगितले. केवळ शुद्ध प्राण्यांना खाण्यासाठी किंवा यज्ञासाठी वापरण्याची परवानगी होती. या संदर्भात, “स्वच्छ” या शब्दाचा अर्थ असा आहे की यज्ञ म्हणून वापरण्यासाठी परमेश्वराला तो प्राणी मान्य होता.
  • ज्या व्यक्तीस त्वचेचे काही विशिष्ट आजार होते जोपर्यंत त्याच्या त्वचेचा संसर्ग होणार नाही एवढा बरा होत नाही तोपर्यत तो व्यक्ती अशुध्द असे. त्या व्यक्तीला पुन्हा “स्वच्छ” घोषित करावे म्हणून त्वचा स्वच्छ करण्याच्या सूचनांचे पालन केले पाहिजे.
  • कधीकधी नैतिक शुद्धतेला संदर्भत करण्यासाठी लाक्षणिक अर्थाने “शुद्ध” हा शब्द वापरला जातो, ज्याचा अर्थ पापांपासून "शुध्द" होणे असा आहे .

पवित्रशास्त्रात, “अशुद्ध” या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने त्या गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी केला आहे ज्याला देवाने आपल्या लोकांना स्पर्श करणे, खाणे किंवा बलिदान देणे योग्य नाही.

  • कोणते प्राणी “शुद्ध” आहेत व कोणते “अशुद्ध” आहेत याविषयी देवाने इस्राएल लोकांना सूचना दिल्या. अशुद्ध प्राणी खाण्यासाठी किंवा यज्ञासाठी वापरण्याची परवानगी नव्हती.
  • ज्या लोकांना विशिष्ट त्वचेचा आजार होता ते जोपर्यंत बरे होत नाही त्यांना “अशुद्ध” असे म्हणत असे.
  • जर इस्राएली लोकांनी एखाद्या “अशुद्ध” वस्तूला स्पर्श केला तर ते स्वतःला ठराविक काळासाठी अशुद्ध समजत असे.
  • अशुद्ध गोष्टींना स्पर्श न करणे किंवा न खाणे याविषयी देवाच्या आज्ञांचे पालन केल्याने इस्राएली लोक देवाच्या सेवेसाठी वेगळे केले गेले.
  • ही शारीरिक आणि धार्मिक अशुध्दता नैतिक अशुद्धतेचे देखील प्रतिक होती.
  • दुसर्‍या लाक्षणिक अर्थाने, “अशुद्ध आत्मा” म्हणजे दुष्ट आत्मा होय.

भाषांतरातील सुचना:

  • या शब्दाचे भाषांतर “स्वच्छ” किंवा “शुद्ध” या सामान्य शब्दासह केले जाऊ शकते (गलिच्छ नसण्याच्या अर्थाने).
  • याचा अनुवाद करण्याच्या इतर मार्गांमध्ये “धार्मिकतापुर्ण शुद्ध” किंवा “देवाला मान्य” याचा समावेश असू शकतो.
  • “शुद्ध” या शब्दाचे भाषांतर “धुणे” किंवा “शुद्ध करणे” असे केले जाऊ शकते.
  • “स्वच्छ” आणि “स्वच्छ करणे” या शब्दांसाठी वापरण्यात आलेले शब्द लाक्षणिक अर्थाने समजले जाऊ शकतात हे सुनिश्चित करा.
  • “अशुद्ध” या शब्दाचे भाषांतर “शुद्ध नसणे” किंवा “देवाच्या दृष्टीने अयोग्य” किंवा “शारीरिकरित्या अशुद्ध” किंवा “अपवित्र” असेही केले जाऊ शकते.
  • भूताला अशुद्ध आत्मा म्हणून संदर्भित करताना “अशुद्ध” हा शब्द “दुष्ट” किंवा “अपवित्र” असे भषांतरीत केले जाऊ शकते.
  • या संज्ञेच्या भाषांतराने आध्यात्मिक अशुद्धपणास अनुमती दिली पाहिजे. ज्याला देवाने स्पर्श, खाणे किंवा यज्ञ करण्यास अयोग्य म्हणून घोषित केले त्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करण्यास ते सक्षम असले पाहिजे.

(हे देखील पाहा: अशुध्द होणे, दुष्ट, पवित्र, यज्ञ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द संख्या:

  • स्ट्रोंग: एच1249, एच1252, एच1305, एच2134, एच2135, एच2141, एच2398, एच2548, एच2834, एच2889, एच2890, एच2891, एच2893, एच2930, एच2931, एच2932, एच3001, एच3722, एच5079, एच5352, एच5355, एच5356, एच6172, एच6565, एच6663, एच6945, एच7137, एच8552, एच8562, जी167, जी169, जी2511, जी2512, जी2513, जी2839, जी2840, जी3394, जी3689

स्वर्ग, आकाश, उर्ध्वलोक, स्वर्गीय

व्याख्या:

"स्वर्ग" या संज्ञेचे भाषांतर करण्यासाठी वापरलेला शब्द, सहसा देव जिथे राहतो त्या ठिकाणाचा संदर्भ देतो. संदर्भाच्या आधारावर, त्याच शब्दाचा अर्थ "आकाश" म्हणून देखील होतो.

  • "स्वर्ग" या शब्दाचा संदर्भ, आपण पृथ्वीच्या वर जे काही पाहतो त्याच्याशी आहे, ज्यामध्ये सूर्य, चंद्र, आणि ताऱ्यांचा समावेश आहे. ह्यामध्ये स्वर्गीय नक्षत्रांचा देखील समावेश आहे, जसे की, दूरगामी ग्रह, जे आपण थेट पृथ्वीवरून पाहू शकत नाही.
  • "आकाश" हा शब्द, पृथ्वीच्यावर एक निळा विस्तार आहे, ज्यामध्ये ढग आणि आपण श्वास घेतो ती हवा आहे, यास संदर्भित करतो. सहसा सूर्य आणि चंद्र यांस "वर आकाशात" असे म्हटले जाते.
  • पवित्र शास्त्रातील काही संदर्भामध्ये, "स्वर्ग" हा शब्द एकतर आकाश नाहीतर एक ठिकाण जिथे देव राहतो यासाठी संदर्भित केला जातो.

भाषांतर सूचना

  • मत्तयाच्या पुस्तकात "स्वर्गाचे राज्य" यासाठी, "स्वर्ग" हा शब्द तसाच ठेवणे सर्वोत्तम असेल, कारण हे मत्तयाच्या पुस्तकाचे वैशिष्ठ्य आहे.
  • "आकाशावर" किंवा "स्वर्गीय नक्षत्रे" या शब्दांचे भाषांतर "सूर्य, चंद्र, आणि तारे" किंवा "विश्वातील सर्व तारे" असे केले जाऊ शकते.
  • "आकाशाचे तारे" या वाक्यांशाचे भाषांतर "आकाशातील तारे" किंवा "आकाशगंगेतील तारे" किंवा "विश्वातील तारे" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहाः देवाचे राज्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 04:02 त्यांनी स्वर्गापर्यंत पोहोचेल असा एक उंच बुरुज देखील बांधण्यास सुरुवात केली.
  • 14:11 त्याने त्यांना स्वर्गातील भाकर ज्याला त्यांनी "मान्ना" म्हटले ती खावयास दिली.
  • 23:07 अचानक, आकाशामध्ये देवदूत देवाची स्तूती करत म्हणाले,‘‘वर उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांवर त्याची कृपा झाली आहे त्यांस शांती!’’
  • 29:09 तेव्हा येशू म्हणाला, ‘‘जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.’’
  • 37:09 तेव्हा येशूने वर स्वर्गाकडे पाहून म्हटले, ‘‘बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो.
  • 42:11 मग येशू आकाशात गेला व मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. सर्व गोष्टींवर अधिकार चालवण्यासाठी येशू देवाच्या उजवीकडे बसलेला आहे.

शब्द माहीती: ​

  • स्ट्रोंग: H1534, H6160, H6183, H7834, H8064, H8065, G932, G2032, G3321, G3770, G3771, G377

स्वामी, परमेश्वर, प्रभु, सर

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये “स्वामी” हा शब्द सामान्यत: एखाद्याला सूचित करतो ज्याची मालकी किंवा इतर लोकांवर अधिकार आहे. पवित्र शास्त्रामध्ये, हा शब्द देवाला समाविष्ट करून, अनेक प्रकारच्या लोकांना उद्देशून वापरला आहे.

  • येशूला संबोधित करताना किंवा गुलामांची मालकी असलेल्या एखाद्याचा उल्लेख करताना कधीकधी “प्रभु” हा शब्द अनुवादित केला जातो.
  • काही इंग्रजी आवृत्त्या या संज्ञेला “सर” म्हणून भाषांतरित करतात ज्यात कोणीतरी सभ्यपणे एखाद्याला उच्च पदावर संबोधित करीत आहे.

जेव्हा “परमेश्वर” या शब्दाला मोठ्या अक्षरात लिहिले जाते तेव्हा ती एक पदवी असते जी देवाला सूचित करते. (तथापि, लक्षात घ्या, की जेव्हा हे एखाद्याला संबोधित करण्याच्या रूपात वापरले जाते किंवा वाक्याच्या सुरूवातीस येते तेव्हा त्याला मोठ्या अक्षरात लिहिले जावू शकते आणि "गुरुजी" किंवा "प्रभु" असा त्याचा अर्थ असू शकतो.)

  • जुन्या करारामध्ये हा शब्द "सर्वशक्तिमान परमेश्वर देव " किंवा "यहोवा परमेश्वर" किंवा "यहोवा आमचा परमेश्वर" अशा अभिव्यक्तींमध्ये देखील वापरला जातो.
  • नवीन करारात, प्रेषितांनी हा शब्द “प्रभु येशू” आणि “प्रभु येशू ख्रिस्त” या अविर्भावात वापरले आहे, जे सांगते की येशु हा देव आहे
  • नवीन करारात “परमेश्वर” हा शब्द एकटाच देवासाठी थेट संदर्भ म्हणून वापरला जातो, खासकरुन जुन्या कराराच्या उल्लेखामध्ये. उदाहरणार्थ, जुन्या करारातील मजकुरामध्ये “परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित आहे” आणि नवीन कराराच्या मजकुरामध्ये “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादीत आहे “असे लिहीले आहे.
  • यूएलटी आणि यूएसटी मध्ये, “परमेश्वर” ही पदवी केवळ "प्रभु" असा अर्थ असलेल्या वास्तविक इब्री आणि ग्रीक शब्दांचे भाषांतर करण्यासाठी वापरली जाते. हे देवाच्या नावाचे भाषांतर म्हणून कधीच वापरले जात नाही (यहोवा), जसे की बर्‍याच अनुवादांत केले आहे.
  • काही भाषा “परमेश्वर” या संज्ञेला “प्रभु” किंवा “शासक” किंवा काही अन्य संज्ञेद्वारे भाषांतर करतात जी मालकी किंवा सर्वोच्च नियम संप्रेषित करते.
  • योग्य संदर्भात, बर्‍याच भाषांतरे या शब्दाच्या पहिल्या अक्षराला मोठे करतात जेणेकरुन वाचकांना हे स्पष्ट होईल की हे देवाला संदर्भित करणारे शीर्षक आहे. जुन्या करारातील उल्लेख असलेल्या नवीन कराराच्या ठिकाणी, “परमेश्वर देव” असा शब्द वापरला जाऊ शकतो, हे स्पष्ट करण्यासाठी की हा परमेश्वराचा देवाचा संदर्भ आहे.

भाषांतरातील सूचना:

  • जेव्हा तो शब्द गुलामांची मालकी असलेल्या व्यक्तीस संदर्भित करतो तेव्हा या शब्दाला “प्रभु” या शब्दाबरोबरीच्या शब्दाने भाषांतरित केले जाऊ शकते. हे सेवकाद्वारे ज्याच्यासाठी त्याने काम केले आहे त्या व्यक्तीला संबोधित करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.
  • जेव्हा येशूचा संदर्भ असतो, जेव्हा संदर्भ दर्शवितो की वक्ता त्याला धार्मिक शिक्षक म्हणून पाहत असेल तर त्याचे भाषांतर “प्रभु” या सारख्या एका धार्मिक शिक्षकाच्या आदरणीय उल्लेखाने केले जाऊ शकते.
  • जर येशूला संबोधित करणारी व्यक्ती त्याला ओळखत नसेल तर, “स्वामी” हे भाषांतर “गुरुजी” यासारख्या आदराच्या स्वरुपात केले जाऊ शकते. हे भाषांतर इतर संदर्भांमध्ये देखील वापरले जाईल ज्यात एखाद्या पुरुषाला सभ्य उल्लेखाने बोलविले जाते.
  • देव पिता किंवा येशूला संदर्भित करताना या शब्दाला इंग्रजीमध्ये “परमेश्वर” (मोठी लिपि) असे लिहिलेली, पदवी मानली जाते.

(हे देखील पाहा: देल, येशू, शासक, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • 25:5 पण येशूने शास्त्रवचनांचा हवाला देऊन सैतानाला उत्तर दिले. तो म्हणाला, “देवाच्या वचनात असे लिहीले आहे, तो आपल्या लोकांना आज्ञा देतो की,“ आपला देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नका.”
  • 25:7 येशू म्हणाला, “सैताना, माझ्यापासून दूर जा. देवाच्या वचनात तो आपल्या लोकांना आज्ञा देतो, ‘फक्त तुमचा देव परमेश्वर_ याचीच उपासना करा आणि त्याचीच सेवा करा.”
  • 26:3 हे परमेश्वराच्या कृपेचे वर्ष आहे.
  • 27:2 नियमाच्या तज्ञाने उत्तर दिले की, देवाचा नियम म्हणतो, “आपल्या अंतकरणाने, आत्म्याने, सामर्थ्याने आणि बुध्दीने आपला देव परमेश्वर यावर प्रेम करा.
  • 31:5 मग पेत्र येशूला म्हणाला, “प्रभुजी, जर तू असशील तर मला पाण्यावर तुझ्याकडे येण्यास सांग.”
  • 43:9 “परंतु हे निश्चितपणे जाणून घ्या की देवाने येशूला“ प्रभू आणि मसीहा ”करून ठेवले आहे!”
  • 47:3 या भुताद्वारे तिने लोकांच्या भविष्याचा अंदाज लावला, तिने तिच्या प्रभुंसाठी एक ज्योतिषी म्हणून खूप पैसे कमविले.
  • 47:11 पौलाने उत्तर दिले, " प्रभू येशूवर विश्वास ठेवा, म्हणजे तू व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.”

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच113, एच136, एच1167, एच1376, एच4756, एच7980, एच8323, जी2030, जी6340, जी9620, जी12030, जी29620

ह्रदय

व्याख्या:

"हृदय" ही संज्ञा शरीराच्या अंतर्गत अवयवास सूचित करते जो मनुष्य आणि प्राणी यांच्या संपूर्ण शरीरात रक्त पंप करतो. तथापि, पवित्र शास्त्रामध्ये "ह्रदय" या संज्ञेचा उपयोग लाक्षणिक अर्थाने एखाद्या व्यक्तीचे विचार, भावना, आणि इच्छा किंवा इच्छाशक्ती यांना संदर्भित करण्यासाठी केला जातो.

  • “कठोर ह्रदय” असणे ही एक सामान्य अभिव्यक्ती आहे ज्याचा अर्थ एक व्यक्ती हटवादीपणाने देवाची आज्ञा पाळण्यास नकार देतो.
  • “माझ्या पूर्ण अंतःकरणाने” किंवा “माझ्या पूर्ण मनाने” या अभिव्यक्तींचा अर्थ पूर्ण प्रामाणिकपणाने, वचनबद्धतेने किंवा इच्छेने काहीतरी करणे, काहीही मागे न ठेवता करणे होय.
  • "मनावर घ्या" या अभिव्यक्तीचा अर्थ एखाद्या गोष्टीला गांभीर्याने हाताळणे आणि ते एखाद्याच्या जीवनात लागू करणे होय.
  • "भग्नहृदयी" हा शब्द एखादा व्यक्ती खूप दुःखी असल्याचे वर्णन करतो. त्या व्यक्तीला भावनिकरीत्या खोलवर दुखापत झाली आहे.

भाषांतर सूचना

  • काही भाषा या कल्पनांचा संदर्भ देण्यासाठी "पोट" किंवा "यकृत" यासारखे भिन्न शरीरांच्या भागाचा वापर करतात.
  • इतर भाषा या संकल्पनांपैकी काही व्यक्त करण्यासाठी एक शब्द वापरू शकतात आणि अन्य व्यक्त करण्यासाठी दुसरा शब्द वापरू शकतात.
  • जर "हृदय" किंवा शरीराच्या इतर भागांचा हा अर्थ नसता, तर काही भाषेत हे शब्दशः व्यक्त करण्यासाठी "विचार" किंवा "भावना" किंवा "इच्छा" या शब्दांसह करणे आवश्यक आहे.
  • संदर्भावर आधारित, "माझ्या अंतःकरणापासून" किंवा "माझ्या संपूर्ण अंतःकरणाने" ह्याचे भाषांतर "माझ्या संपूर्ण शक्तीने" किंवा "संपूर्ण समर्पणाने" किंवा "पूर्णपणे" किंवा "संपूर्ण वचनबद्धतेने" असे केले जाऊ शकते.
  • "अंतःकरणात घेणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "गंभीरपणे हाताळणे" किंवा "त्याबद्दल काळजीपुर्वक विचार करणे" असे केले जाऊ शकते.
  • "कठीण अंतःकरणाचे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "हटवादीपणाने बंडखोर" किंवा "आज्ञापालन करण्यास नकार देणे" किंवा "सतत देवाची अवज्ञा करणे" असे केले जाऊ शकते.
  • "भग्नहृदयी" या वाक्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "खूप दुःखी" किंवा "भावनिक रित्या खोलवर दुखावलेले" असे केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: कठीण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच1079, एच2436, एच2504, एच2910, एच3519, एच3629, एच3820, एच3821, एच3823, एच3824, एच3825, एच3826, एच4578, एच5315, एच5640, एच7130, एच7307, एच7356, एच7907, जी06740, जी12820, जी12710, जी21330, जी25880, जी25890, जी46410, जी46980, जी55900