स्तोत्रसंहिता
The Book of
लेखक
स्तोत्र व गीतांच्या कवितांचा संग्रह हा जुन्या करारातील पुस्तकांपैकी एक आहे, ज्याला स्वतःला एक समग्र लेखन म्हणून संबोधले जाते ज्यात एकापेक्षा जास्त लेखक असतात, हे बहुविध लेखकांद्वारे लिहिलेले आहे; दाविदाने 73 स्तोत्रसंहिता लिहिल्या, आसाफने 12, कोरहाचे मुलगे यांनी 9, शलमोनाने 3 लिहिल्या, एथान आणि मोशेने प्रत्येकी एक लिहिली (स्तोत्र. 90), आणि 51 स्तोत्रसंहिता अज्ञात आहे. शलमोन आणि मोशेचा अपवाद वगळता, हे सर्व अतिरिक्त लेखक हे याजक व लेवी होते जे दाविदाच्या कारकिर्दीत अरण्यात आराधनेकरिता संगीत सादर करण्यासाठी जबाबदार होते.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 1440-430
वैयक्तिक स्तोत्रे मोशेच्या काळातील दावीदाचा काळ, आसाफ आणि शलमोन यांच्याद्वारे इतिहासात लिहून ठेवण्यात आली होती, बाबेलच्या बंदिवासानंतर बहुतेक लोक राहत असलेल्या इझ्रातेच्या काळात, याचा अर्थ पुस्तक लिहिणे एक हजार वर्षे चालले.
प्राप्तकर्ता
इस्त्राएलाचे राष्ट्र, देवाने त्यांच्यासाठी काय केले होते आणि इतिहासात विश्वास ठेवणाऱ्यांची आठवण करून दिली आहे
हेतू
स्तोत्रे देव आणि त्याची निर्मिती, युद्ध, आराधना, शहाणपण, पाप व दुष्टता, न्याय, निःपक्षपातीपणा आणि मसीहाच्या येण्यासंबंधीच्या विषयांशी संबंधित आहेत. त्याच्या अनेक पृष्ठांदरम्यान, स्तोत्रांनी आपल्या वाचकांना परमेश्वर कोण आहे आणि त्याने काय केले आहे त्याबद्दल प्रशंसा करण्यास प्रोत्साहन दिले. स्तोत्र आपल्या परमेश्वराची महानता ठळकपणे नमूद करते, संकटाच्या वेळी आमच्याशी त्याची निष्ठा दाखविल्याबद्दल आणि आपल्याला त्याच्या वचनातील पूर्ण केंद्रीयत्वाची आठवण करून देतात.
विषय
स्तुती
रूपरेषा 1. मसीहाचे स्तोत्र (1-41) 2. इच्छेचे स्तोत्र (42-72) 3. इस्त्राएलचे स्तोत्र (73-89) 4. देवाच्या नियमाचे स्तोत्र (90-106) 5. स्तुतीचे स्तोत्र (107-150)Chapter 1
नीतिमान व अनीतिमान
प्रेषि. 4:23-31
1 आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही,
किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही,
आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.
2 परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो,
आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो.
3 तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या,
आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या,
ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत,
अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल.
4 परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.
5 म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत.
6 कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो.
परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.
Chapter 2
परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य
1 राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत,
आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत?
2 पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत,
आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात.
3 चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या.
आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ.
4 परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल,
प्रभू त्यांचा उपहास करेल.
5 तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल,
आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करील.
6 मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर [1] ,
माझ्या राजास अभिषेक केला आहे.
7 मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन,
तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस.”
या दिवशी मी तुझा पिता झालो आहे.
8 मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल.
9 लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील,
कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील.
10 म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा;
पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा.
11 भय धरून परमेश्वराची स्तुती करा
आणि थरथर कापून हर्ष करा.
12 आणि तो तुमच्यावर रागावू नये,
ह्यासाठी देवाच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही.
कारण देवाचा क्रोध त्वरीत पेटेल.
जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत.
Chapter 3
प्राप्तःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला.
1 परमेश्वरा, माझे शत्रु पुष्कळ आहेत!
पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.
2 “परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,”
असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला [1]
3 परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस,
तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.
4 मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन,
आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला
5 मी अंग टाकून झोपी गेलो;
मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.
6 जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत,
त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.
7 हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार!
कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस,
तू दुष्टांचे दात पाडले आहेत.
8 तारण [2] परमेश्वरापासूनच आहे,
तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.
Chapter 4
सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना
प्रमुख वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तोत्र.1 मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा.
संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले,
माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.
2 अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार?
किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला
3 परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे.
मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल.
4 भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका!
तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा.
5 न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा
आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा.
6 बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल?
परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.”
7 त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षारसाची समृध्दी असते,
तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे.
8 मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो,
कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.
Chapter 5
संरक्षणासाठी प्रार्थना
मुख्य वाजंत्र्यासाठी; वाजंत्र्याच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, माझे बोलणे ऐक.
माझे कण्हणे विचारात घे.
2 माझ्या देवा! माझ्या राजा! माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करीत आहे.
3 परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील,
सकाळी मी माझी विनंती [1] तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन.
4 खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला संमती देत नाही.
दुर्जन लोकांचे तू स्वागत करीत नाहीस.
5 गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो.
6 खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस;
परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो.
7 पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन,
मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन.
8 हे प्रभू, माझ्या शत्रुंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव,
तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर.
9 कारण त्यांच्या मुखात काही सत्य नाही,
त्यांचे अंतर्याम दुष्टपणच आहे.
त्यांचा गळा उघडे थडगे आहे,
ते आपल्या जीभेने आर्जव करतात.
10 देवा, त्यांना अपराधी घोषीत कर,
त्यांच्याच योजना त्यांना पडण्यास कारणीभूत ठरो.
तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल घालवून दे.
कारण त्यांनी तुझ्याविरूद्ध बंड केले आहे.
11 परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करोत.
ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस.
ज्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्यामध्ये आनंद करोत.
12 कारण तुच धार्मिकाला आशीर्वाद देतोस, हे परमेश्वरा, तू तुझ्या कृपेच्या ढालीने यांना वाढवतोस.
Chapter 6
अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना
मुख्य वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस,
किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.
2 हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे.
हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
3 माझा जीव फार घाबरला आहे.
परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?
4 हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव!
तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.
5 कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही.
मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार?
6 मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे.
रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो.
मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.
7 शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत.
माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.
8 अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा.
कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
9 परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे;
त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
10 माझे सर्व शत्रु लाजवले जातील आणि फार घाबरतील.
ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.
Chapter 7
आपल्याला न्याय मिळावा म्हणून प्रार्थना
कूश बन्यामिन याच्या बोलण्यावरुन परमेश्वरास गाईलेले दाविदाचे शिग्गायोन.1 हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो!
माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव.
2 नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील.
वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील.
3 परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात,
माझ्या हाती काही अन्याय नाही.
4 माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही.
किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही.
5 जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो.
तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो.
6 हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा,
माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने.
7 राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो,
आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे.
8 परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो,
परमेश्वरा, मला समर्थन दे, आणि माझ्या न्यायीपणाप्रमाणे आणि माझ्या स्वतःच्या सात्त्विकतेप्रमाणे माझा न्याय कर.
9 दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर.
कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे.
10 जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे.
11 देव न्यायी न्यायाधीश आहे,
असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो.
12 जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार
आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार.
13 त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत.
तो आपले अग्नीबान तयार करतो.
14 त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत.
जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात.
15 त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला,
आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला.
16 त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील,
आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल.
17 मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन,
मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
Chapter 8
देवाचा गौरव आणि मानवाची थोरवी
मुख्य गायकासाठी; गित्तीथ सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.
2 तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून,
बाळांच्या आणि तांन्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.
3 तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या
आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो.
4 तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी?
किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?
5 तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा [1] थोडेसेच कमी केले आहेस.
आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे.
6 तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस.
तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस.
7 सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.
8 आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे
जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.
9 हे परमेश्वरा, आमच्या देवा,
सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे!
Chapter 9
देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती
प्रमुख गायकासाठी; मूथ लब्बेन रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.1 मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन;
मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
2 तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन,
हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
3 माझे शत्रू माघारी फिरतात,
तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.
4 कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे.
तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे.
5 आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस;
तू दुष्टाचा नाश केला आहेस.
तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे.
6 जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले,
तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे.
त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.
7 परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे;
त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे.
8 तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार,
राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.
9 परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे,
संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
10 जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
11 सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
12 कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे.
तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही.
13 परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा.
14 म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन;
सियोन कन्येच्या दाराजवळ
मी तुझ्या तारणात हर्ष करीन.
15 राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत;
त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे.
16 परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
17 दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल,
जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल.
18 कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही.
किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही.
19 हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो;
राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे.
20 परमेश्वरा त्यांना भयभीत कर;
राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. सेला.
Chapter 10
दुष्टाचे पतन व्हावे म्हणून प्रार्थना
1 हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस?
संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस?
2 कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो,
परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो.
3 कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो;
दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो.
4 दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही.
कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही.
5 त्याचे मार्ग उन्नतीचे असतात,
परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत,
तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो.
6 तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही;
संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही.
7 त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत.
त्यांची जीभ जखमी व नाश करते.
8 तो गावाजवळ टपून बसतो,
गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो;
त्याचे डोळे लाचारावर टपून असतात.
9 जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो.
तो दीनाला धरायला टपून बसतो.
तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो.
10 त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात.
ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात.
11 तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे,
त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही.
12 हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव.
गरीबांना विसरु नकोस.
13 दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो?
14 तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो,
लाचार तुला आपणास सोपवून देतो,
तू अनाथांचा वाचवणारा आहे.
15 दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक,
त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही.
16 परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे,
राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत.
17 हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे;
तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे.
18 पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे,
म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.
Chapter 11
सरळतेने चालणाऱ्याचा आधार
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.1 परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो;
पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा,
असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता?
2 कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून,
दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात.
3 कारण जर पायेच नष्ट केले,
तर न्यायी काय करणार?
4 परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे;
त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात.
5 परमेश्वर नितीमानाची पारख करतो.
परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो.
6 तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील,
दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल.
7 कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे.
सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.
Chapter 12
दुष्टाविरुद्ध साहाय्याची याचना
मुख्य गायकासाठी; शमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे.
विश्वासू गायब झाला आहे.
2 प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो,
प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.
3 परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.
4 हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ,
जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?”
5 परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो;
ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.”
6 परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत,
पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.
7 हे परमेश्वरा, तुच त्यांना [1] सांभाळशील,
या पिढीपासून तू त्यांना [2] सर्वकाळ राखशील.
8 मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.
Chapter 13
संकटकाळी साहाय्यासाठी प्रार्थना
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस?
किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?
2 पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता,
किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू?
किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे.
मला मृत्युनिद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर.
4 मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको.
म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील.
5 परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे.
माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.
6 मी परमेश्वरासाठी गाईन,
कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे.
Chapter 14
मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई
स्तोत्र. 53:1-6
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.1 मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.”
ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत.
चांगले करणारा कोणीच नाही.
2 परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की,
कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय?
3 प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत.
सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही.
4 जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय?
ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात;
ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?
5 परंतु ते भीतीने थरथर कापतील,
कारण देव न्यायींच्या सभेत आहे.
6 तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे.
7 अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल!
जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल,
तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.
Chapter 15
देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी
दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
2 जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.
3 जो आपल्या जीभेने चुगली करत नाही,
किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही,
किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही.
4 अधमाचा तिरस्कार करतो,
परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो,
जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही,
5 जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही,
जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही.
तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.
Chapter 16
उत्तम वारसा
दाविदाचे मिक्ताम (सुवर्णगीत)1 हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझ्यात आश्रय घेतला आहे.
2 मी परमेश्वरास म्हणालो, “हे परमेश्वरा, तू माझा प्रभू आहेस, माझ्यामध्ये असलेला चांगुलपणा तुझ्याशिवाय काहीच नाही.”
3 पृथ्वीवर जे पवित्र (संत) आहेत, ते थोर जन आहेत. त्यांच्यामध्ये माझा सर्व आनंद आहे.
4 जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु:खे वाढवली जातील.
त्यांच्या देवाला मी रक्ताची पेयार्पणे ओतणार नाही.
किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही.
5 परमेश्वरा, तू माझा निवडलेला भाग आणि माझा प्याला आहे. माझा वाटा तुच धरून ठेवतोस.
6 माझ्या करिता सिमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत. खचित माझे वतन सुंदर आहे.
7 मी परमेश्वराची स्तुती करतो, ज्याने मला मार्गदर्शन केले आहे, रात्रीच्या वेळी माझे मन मला शिकविते.
8 मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.
9 त्यामुळे माझे हृदय आनंदी आहे; माझे मन त्यास उंच करते. खचित माझा देह सुद्धा सुरक्षित राहतो.
10 कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस.
11 तू मला जीवनाचा मार्ग शिकवला, तुझ्या उपस्थितित विपुल हर्ष आहे, तुझ्या उजव्या हातात सुख सर्वकाळ आहेत.
Chapter 17
जुलूम करणाऱ्यांपासून संरक्षणासाठी प्रार्थना
दाविदाची प्रार्थना.1 हे परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे!
माझ्या निष्कपट ओठातून जी प्रार्थना निघते तिच्याकडे कान दे.
2 तुझ्या उपस्थितित माझा न्याय कर; जे खरे ते तुझे डोळे पाहोत.
3 तू माझे हृदय पारखले आहे, रात्री तू झडती घेतली आहेस,
तू मला गाळून पाहिले आहे, तरी तुला काही सापडत नाही, माझे तोंड पाप करणार नाही असा निश्चय मी केला आहे.
4 मानवजातीच्या कृत्यांसंबंधित, तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला अनिष्ट करणाऱ्यांपासून राखले आहे.
5 माझ्या पावलांनी तुझे मार्ग घट्ट धरले आहेत, माझे पाय घसरले नाहीत.
6 देवा, मी तुला हाक मारतो, कारण तू उत्तर देतोस, तुझे कान माझ्याकडे फिरव आणि माझे बोलने ऐक.
7 जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव.
8 तुझ्या डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण कर; मला तुझ्या पंखाच्या सावलीखाली लपव.
9 वाईट लोक जे माझ्यावर हल्ला करतात, माझे शत्रू ज्यांनी मला घेरले आहे, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
10 त्यांना कोणाची दया येत नाही, त्यांचे मुख गर्वाने बोलते.
11 त्यांनी माझ्या पावलांना घेरले आहे, मला भुमीवर पाडावयास ते आपली दृष्टी लावत आहेत.
12 एखाद्याचा बळी घेण्यास उत्सुक असणाऱ्या सिंहासारखे ते आहेत, जसा तरुण सिंह जो लपून बसला आहे.
13 परमेश्वरा, ऊठ! त्यांच्यावर हल्ला कर! त्यांच्या तोंडावर त्यांना पाड! तुझ्या तलवारीने तू माझा जीव दुष्टापासून वाचव.
14 परमेश्वरा, ज्यांचे वैभव या जीवनातच आहे, आणि ज्यांचे पोट तू आपल्या धनाने भरतोस, अशा मनुष्यांपासून तू आपल्या हाताने मला वाचव.
ते आपल्या संततीने तृप्त आहेत, आणि ते आपले उरलेले द्रव्य आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवतात.
15 मी न्यायीपणात तुझे मुख पाहीन, जेव्हा मी जागा होईन, तेव्हा तुझ्या दर्शनाने मी समाधानी होईन.
Chapter 18
दाविदाचे गाइलेले मुक्तिगीत
2शमु. 22:1-51
मुख्य गायकासाठी, परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र. परमेश्वराने त्यास त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडवले, त्या दिवशी तो या गीताची वचने परमेश्वरापाशी बोलला, आणि तो म्हणाला.1 “हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.”
2 परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो माला सुरक्षा देतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो.
तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे.
3 जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वरास मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईन.
4 मृत्यूच्या दोऱ्यांनी मला घेरीले, आणि नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले आहे.
5 अधोलोकांच्या [1] बंधनांनी मला घेरीले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले.
6 मी संकटात असता, मी परमेश्वरास हाक मारली; मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली. त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली.
7 तेव्हा पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. डोंगरांचे पाये थरथर कापले आणि हादरले,
कारण देव क्रोधित झाला होता.
8 त्याच्या नाकातून धूर वर चढला, आणि त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाला निघाल्या, ज्याने कोळसे पेटले गेले.
9 त्याने आकाश उघडले आणि तो खाली आला, आणि निबिड अंधार त्याच्या पाया खाली होता.
10 तो करुबावर स्वार झाला आणि वाऱ्याच्या पंखांनी वर उडत गेला.
11 पावसाचे मोठे काळोख असे मेघ त्याने त्याच्याभोवती तंबू असे केले,
12 त्याच्या समोरील तेजामुळे, गारा आणि जळते कोळसे बाहेर पडले.
13 परमेश्वराने आकाशात गडगडाट केला! परात्पराने आवाज उंच केला, गारा आणि विजा बाहेर पडल्या.
14 परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण उडाली, पुष्कळ विजांनी त्यांना छेदून टाकले.
15 तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या सोसाट्याने
हे परमेश्वरा, जगाचे पाये उघडे पडले.
16 तो उंचावरून खाली आला आणि त्याने मला पकडले! त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले.
17 माझ्या शक्तीशाली शत्रूंपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले. कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते.
18 माझ्या दु:खाच्या दिवशी ते माझ्याविरूद्ध आले; परंतु परमेश्वर मला उचलून धरणारा होता.
19 त्याने मला विस्तृत खुल्या जागेमध्ये मोकळे केले! त्याने मला तारले कारण तो माझ्यामुळे संतुष्ट होता.
20 माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने मला पुरस्कृत केले आहे, त्याने मला पुनसंचयित केले कारण माझे हात निर्मळ होते.
21 कारण मी परमेश्वराच्या मार्गात राहिलो आणि दुष्टाईने देवापासून दूर फिरलो नाही.
22 कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत.
23 मी त्याच्यासमोर निर्दोष असा होतो, आणि मी स्वत:ला पापापासून दूर राखले.
24 माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने पुनसंचयित केले. कारण त्याच्या डोळ्यासमोर माझे हात निर्मळ होते.
25 जो विश्वासयोग्य आहे, त्याच्याशी तू विश्वास दाखवतोस,
निर्दोष मनुष्याशी तू सात्विकतेने वागतोस.
26 जे शुद्ध असतात त्यांच्याशी तू शुद्ध असतोस, परंतु जे कुटील त्यांच्याशी तू कुटीलतेने वागतोस.
27 कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस.
28 कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करितो.
29 कारण तुझ्या मदतीने मी फौजेविरूद्ध जाऊ शकतो, माझ्या देवाच्या योगे मी तटावरुन उडी मारून [2] जाऊ शकतो.
30 देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे.
जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे.
31 कारण परमेश्वराखेरीज कोण देव आहे? आमच्या देवाशिवाय कोण खडक आहे?
32 तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो माझे मार्ग सुरक्षित ठेवतो.
33 तो माझे पाय हरिणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगरावर ठेवतो!
34 तो माझ्या हाताला युद्ध करावयाला आणि माझे भुज पितळी धनुष्य वाकवायला शिकवतो.
35 तू मला तुझ्या तारणाची ढाल दिली आहेस, तुझा उजवा हात मला आधार देतो आणि तुझ्या अनुग्रहाने मला थोर केले आहे.
36 तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत.
37 मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही.
38 मी माझ्या शत्रूंना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील.
39 कारण युद्धाकरिता तू सामर्थ्याने माझी कंबर बांधली आहे, जे माझ्याविरूद्ध उठले होते त्यांना तू खाली पाडले आहे.
40 तू मला माझ्या शत्रूंनाही त्यांची पाठ फिरवायला लावली आहे, ज्यांनी माझा द्वेष केला, त्यांचा मी नाश केला.
41 ते मदतीसाठी ओरडले, पण कोणीही त्यांना वाचवले नाही, त्यांनी परमेश्वरास आरोळी केली, पण त्याने उत्तर दिले नाही.
42 मी माझ्या शत्रूंचे वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले.
43 मी त्यांना असे मारले की धुळीसारखा त्यांचा भुगा केला, तू मला राष्ट्रांवर मस्तक असे केले आहे. जे लोक मला माहित नाहीत ते माझी सेवा करतील.
44 ते लोक माझ्याविषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील, ते परदेशी माझ्यापुढे शरण येतील.
45 ते परदेशी त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.
46 परमेश्वर जिवंत आहे, माझा खडक धन्यवादित असो. माझ्या तारणाचा देव उंचावला जावो.
47 हाच तो देव आहे जो माझ्यासाठी सूड घेतो, तो त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली देतो.
48 मी माझ्या शत्रूंपासून मुक्त झालो आहे, खचित, जे माझ्याविरूद्ध उठले आहेत, त्यांच्यावर तू मला उंच केले आहे. तू मला क्रूर मनुष्यांपासून वाचवले.
49 यास्तव परमेश्वरा, राष्ट्रांमध्ये मी तुला धन्यवाद देईन, मी तुझ्या नावाची स्तुती गाईन.
50 देव आपल्या राजाला मोठा विजय देतो, आणि तो आपल्या अभिषिक्तावर, दाविदावर व त्याच्या संतानावर सदासर्वकाळ कृपा करतो.
Chapter 19
देवाची कृत्ये आणि त्याचे नियम
मुख्य गायकासाठी. दाविदाचे स्तोत्र.1 आकाश देवाचा गौरव जाहीर करते,
आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते.
2 दिवस दिवसाशी बोलतो,
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
3 संभाषण नाही, बोललेले शब्दही नाही,
त्यांचा आवाजही ऐकू येत नाही.
4 तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात.
आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते.
त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे.
5 सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो.
आणि सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो.
6 सूर्य एक क्षितीजापासून उदय होतो,
आणि दुसऱ्या क्षितिजापर्यंत आकाशात पार जातो.
त्याच्या उष्णतेपासून कोणाचीही सुटका होत नाही.
7 परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे.
परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे.
8 परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात.
परमेश्वराच्या कराराचे नियम शुद्ध आहेत, ते डोळे प्रकाशवनारे आहेत.
9 परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे,
परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत.
10 ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत.
ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत.
11 होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावनी मिळते.
ते पाळण्याने उत्तम प्रतिफळ मिळते.
12 आपल्या स्वत:च्या चुका कोण ओळखू शकतो? माझ्या गुप्त दोषांची मला क्षमा कर.
13 तुझ्या सेवकाला जाणूनबुजून केलेल्या पापापासून राख;
ती माझ्यावर राज्य न गाजवोत.
तेव्हा मी परिपूर्ण होईल,
आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहीन.
14 माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस.
Chapter 20
विजयासाठी प्रार्थना
मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र.1 परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो,
याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो.
3 तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो,
आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.
4 तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो,
आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.
5 तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू.
आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू.
परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो.
6 परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे.
त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने,
तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल.
7 काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर,
परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू.
8 ते खाली आणले गेले आणि पडले,
परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू!
9 हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो.
Chapter 21
शत्रूच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती
मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यात राजा हर्ष करतो!
तू दिलेल्या तारणात तो किती मोठ्या मानाने आनंद करतो!
2 त्याच्या हृदयाची इच्छा तू पूर्ण केली आहेस.
आणि त्याच्या ओठांची विनंती तू अमान्य केली नाही.
3 कारण तो तुजकडे मोठे आशीर्वाद आणतो.
तू त्याच्या डोक्यावर शुद्ध सोन्याचा मुकुट चढवतो.
4 त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू त्यास न संपणारे आयुष्य दिलेस.
5 तुझ्या विजयामुळे त्याचे गौरव थोर आहे.
तू त्यास ऐश्वर्य व वैभव बहाल केलेस.
6 कारण तू त्यास सर्वकाळचा आशीर्वाद दिला आहे;
तू तुझ्या समक्षतेत त्यास हर्षाने आनंदित करतोस.
7 कारण राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे,
परात्पराच्या प्रेमदयेने तो कधीही ढळणार नाही.
8 तुझा हात तुझ्या सर्व शत्रूला पकडणार.
तुझा उजवा हात जे तुझा हेवा करतात त्यांना पकडेल.
9 तुझ्या क्रोधसमयी तू त्यांना जळत्या भट्टीत जाळून टाकशील.
परमेश्वर त्याच्या क्रोधसमयी त्यांचा नाश करणार,
आणि त्याचा अग्नी त्यांना खाऊन टाकणार.
10 तू त्यांच्या संतानांचा या पृथ्वीवरुन नाश करशील.
11 कारण, त्या लोकांनी तुझ्याविरूद्ध वाईट योजीले,
त्यांनी अशी योजना आखली जी त्यांच्याने यशस्वी झाली नाही.
12 कारण तू त्यांना त्यांची पाठ दाखवावयास लावशील.
तू आपले धनुष्य त्यांच्यावर चालवण्यास सज्ज करशील.
13 परमेश्वरा तू आपल्या नावाने उंचावला जावो,
आम्ही गाऊ व तुझ्या सामर्थ्याची स्तुती करू.
Chapter 22
दुःखाची आरोळी आणि स्तुतिगीत
प्रमुख गायकासाठी अय्येलेथ हाश्शहर (म्हणजे पहाटेची हरिणी) या रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.1 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस?
2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस,
आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही.
3 तरी तू पवित्र आहेस,
जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस.
4 आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा,
त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.
5 देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले,
त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही.
6 परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही,
जो मनुष्यांनी निंदीलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे.
7 सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात;
ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात.
8 ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो,
तर परमेश्वर त्यास सोडवो.
त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.”
9 परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस,
मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले.
10 मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो.
माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस.
11 माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे.
आणि मला मदत करायला कोणीही नाही.
12 खुप बैलांनी मला वेढले आहे,
बाशानाच्या बळकट बैलांनी मला वेढले आहे.
13 जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो,
तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरूद्ध उघडले आहे.
14 मी पाण्यासारखा ओतला जात आहे,
आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत.
माझे हृदय मेणासारखे झाले आहे.
जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे.
15 फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे.
माझी जीभ टाळूला चिकटली आहे.
तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे.
16 “कुत्री” मला वेढून आहेत,
मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे.
त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे.
17 मी माझी सर्व हाडे मोजू शकतो.
ते माझ्याकडे टक लावून बघतात.
18 त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत,
आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्या टाकतात.
19 परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर.
20 परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव,
माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव.
21 सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर.
जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.
22 परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन.
सभेत मी तुझे गुणगान गाईन.
23 जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा!
याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या!
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
24 कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही.
आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही.
जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले.
25 परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन.
तुझे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन.
26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील.
जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील.
तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो.
27 सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील.
सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील.
28 कारण राज्य परमेश्वरचे आहे,
तो जगावर अधिकार करणारा आहे.
29 पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील.
जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत,
ते त्यास नमन करतील.
30 येणारी पिढी त्याची सेवा करणार.
ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील.
31 ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे.
Chapter 23
परमेश्वर माझा मेंढपाळ
दाविदाचे स्तोत्र.1 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे [1] , मला कशाचीही उणीव भासणार नाही.
2 तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो माझा जीव ताजा-तवाना करतो,
तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.
4 मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी,
मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही,
कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
5 तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस,
तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे.
माझा प्याला भरुन वाहत आहे.
6 खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील,
आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.
Chapter 24
गौरवाचा राजा
दाविदाचे स्तोत्र.1 भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे.
जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.
2 कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला,
आणि जलांवर त्याने ती स्थापली.
3 परमेश्वराच्या [1] डोंगरावर कोण चढेल?
परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू [2] शकतो?
4 ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे,
ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही,
आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.
5 तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल,
आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल.
6 हिच पिढी त्यास शोधणारी आहे,
जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते.
7 अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा.
पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा,
म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
8 गौरवशाली राजा कोण आहे?
तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे.
9 वेशींनो, तुमची मस्तके उंच करा.
सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा,
म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
10 तो गौरवशाली राजा कोण आहे?
सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे,
तोच तो गौरवशाली राजा आहे.
Chapter 25
मार्गदर्शन, क्षमा आणि संरक्षण ह्यांसाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
2 माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे.
मला निराश होऊ देऊ नको,
माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत.
3 तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही.
परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.
4 हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव,
मला तुझे मार्ग शिकव.
5 तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव.
कारण तू माझा तारणारा देव आहेस
मी रोज तुझी वाट पाहतो.
6 हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर.
7 हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको.
तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.
8 परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे.
यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो.
9 तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो.
आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.
10 जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत.
11 परमेश्वरा, तुझ्या नामास्तव,
माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खुप आहेत.
12 परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे?
प्रभू त्यास सुचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे.
13 त्याचे जीवन चांगुलपणात जाईल,
आणि त्याची संतान भूमीचे वतन पावतील.
14 परमेश्वराचे सत्य त्याचे अनुकरण करणाऱ्यांबरोबर असते.
आणि तो त्याचे करार कळवतो.
15 मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो.
कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो.
16 परमेश्वरा माझ्याकडे फिर आणि माझ्यावर दया कर.
कारण मी एकटा आणि पीडलेला आहे.
17 माझ्या हृदयाचा त्रास वाढला आहे,
संकटातून मला तू काढ.
18 परमेश्वरा, माझे दु:ख आणि कष्ट बघ,
माझ्या सर्व पापांची क्षमा कर.
19 माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत.
ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात.
20 देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव.
माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस.
21 तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत.
कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.
22 देवा, इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या सर्व त्रासांपासून सोडव.
Chapter 26
सात्त्विकतेचा दावा
दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे.
मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे.
2 हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर.
माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा.
3 कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे,
आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे.
4 कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही,
किंवा मी अप्रामाणिक लोकांत मिसळलो नाही.
5 मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो.
आणि मी दुष्टांसोबत राहत नाही.
6 मी आपले हात निर्दोषतेने धुईन,
आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन.
7 अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी
आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी.
8 परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि
तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते.
9 पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस.
10 त्यांच्या हातात कट आहे,
आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे.
11 पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन,
माझ्यावर दया कर आणि मला तार.
12 माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे,
सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन.
Chapter 27
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे
दाविदाचे स्तोत्र.1 परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे.
मी कोणाचे भय बाळगू?
परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे,
मी कोणाची भीती बाळगू?
2 जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले,
तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले.
3 जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला,
माझे हृदय भयभीत होणार नाही.
जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले,
तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन.
4 मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन,
परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात
ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन,
परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन.
5 कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे;
तो मला त्याच्या तंबूत लपवेल,
तो मला खडकावर उंच करील.
6 तेव्हा माझ्या सभोवती असणाऱ्या शत्रू समोर माझे मस्तक उंचावले जाईल,
आणि त्याच्या मंडपात मी सदैव आनंदाचा यज्ञ अर्पण करणार,
मी गाईन, होय! परमेश्वरास मी स्तुति गाईन.
7 परमेश्वरा, मी तुला आरोळी करेन तेव्हा माझा आवाज ऐक!
माझ्यावर दया कर आणि मला उत्तर दे.
8 माझे हृदय तुझ्या विषयी म्हणाले,
त्याचे मुख शोध, हे परमेश्वरा, मी तुझे मुख शोधीन.
9 तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस;
तुझ्या सेवकाला रागात फटकारू नकोस!
तू माझा सहाय्यकर्ता होत आला आहेस;
माझ्या तारण करणाऱ्या देवा, मला सोडू किंवा त्यागू नकोस.
10 जरी माझ्या आईवडीलांनी मला सोडून दिले तरी,
परमेश्वर मला उचलून घेईल.
11 परमेश्वरा, तू मला तुझे मार्ग शिकव.
माझ्या वैऱ्यामुळे,
मला सपाट मार्गावर चालव.
12 माझा जीव शत्रूस देऊ नको,
कारण खोटे साक्षी माझ्याविरूद्ध उठले आहेत,
आणि ते हिंसक श्वास टाकतात.
13 जीवंताच्या भुमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता,
तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती.
14 परमेश्वराची वाट पाहा;
मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो.
परमेश्वराची वाट पाहा.
Chapter 28
साहाय्याची याचना व ते मिळाल्याबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, माझ्या खडका, मी तुलाच आरोळी करतो. मला दुर्लक्षीत करू नको.
जर तू मला उत्तर दिले नाहीस तर जे थडग्यात जातात त्यांसारखा मी होईन.
2 जेव्हा मी तुला मदतीसाठी हाक मारतो,
जेव्हा मी आपले हात तुझ्या पवित्र ठिकाणाकडे उंचावतो, तेव्हा माझी विनवणी ऐक.
3 जे अन्याय करतात त्या दुष्टांबरोबर मला फरफटू नकोस.
जे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत शांतीने बोलतात, परंतु त्यांच्या हृदयात मात्र वाईट असते.
4 त्यांच्या कृतीप्रमाणे आणि त्यांच्या दुष्टकृत्यांच्या प्रमाणे त्यांची परत फेड कर.
5 कारण त्यांना परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या हातची कृत्ये समजत नाहीत.
तो त्यांना मोडेल आणि पुन्हा बांधणार नाही.
6 परमेश्वराची स्तुती असो,
कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला.
7 परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे.
माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे.
यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते.
आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन.
8 परमेश्वर त्याच्या लोकांसाठी बल असा आहे,
आणि तो त्याच्या अभिषिक्ताला तारणाचा आश्रय आहे.
9 तुझ्या लोकांस वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे.
त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाळ वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.
Chapter 29
तुफानात परमेश्वराची वाणी
दाविदाचे स्तोत्र.1 स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव
आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.
2 परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या;
पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
3 परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला,
गौरवशाली देव गर्जत आहे,
परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे.
4 परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे,
परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.
5 परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते,
परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6 तो लबानोनला वासराप्रमाणे आणि
सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो.
7 परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करते.
8 परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते
कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.
9 परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते
आणि अरण्य पर्णहीन करतो.
पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात
10 महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे,
आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांस सामर्थ्य देतो,
परमेश्वर त्याच्या मनुष्यांना शांतीने आशीर्वादित करील.
Chapter 30
मृत्यूपासून झालेल्या बचावाबद्दल उपकारस्तुती
स्तोत्र; मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या वेळचे गाणे. दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.
2 हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
3 हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे.
4 जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
5 कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे.
रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
6 मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही.
7 होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो.
8 परमेश्वरा, मी तुझ्याकडे आरोळी केली आणि माझ्या प्रभू कडून अनुग्रह मागितला.
9 मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ?
माती तुझी स्तुती करणार काय? ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय?
10 हे परमेश्वरा, ऐक आणि माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला मदत करणारा हो.
11 तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत.
12 म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन.
Chapter 31
श्रद्धेसंबंधी साक्ष
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे,
कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस.
तुझ्या न्यायात मला वाचव.
2 माझे ऐक, त्वरीत मला वाचव,
माझ्या आश्रयाचा खडक हो.
माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो.
3 कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस,
तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव.
4 त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ.
कारण तू माझा आश्रय आहे.
5 मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो,
हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे.
6 जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो.
परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
7 तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन,
कारण तू माझे दु:ख पाहिले आहेस.
8 तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस.
तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे.
9 परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु:खात आहे.
माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे.
10 कारण माझे आयुष्य दु:खात
आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत.
माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत,
आणि माझी हाडे झिजली आहेत.
11 माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात
माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे,
आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे.
12 मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही.
मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे.
13 कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे,
प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे,
ते माझ्याविरुध्द कट करत आहेत.
14 परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो.
15 माझे वेळ तुझ्या हातात आहे.
मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव.
16 तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे.
तुझ्या प्रेमदयेत मला तार.
17 परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो,
दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो.
18 खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत,
जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात.
19 जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे,
जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस.
20 त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील.
हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील.
21 परमेश्वर धन्यवादित असो!
कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे.
22 मी घाईत म्हणालो,
मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे,
तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली,
जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली.
23 अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा.
कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो.
परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो.
24 जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता,
बलवान व धैर्यवान व्हा.
Chapter 32
क्षमेची थोरवी
दाविदाचे स्तोत्र; मासकील (शिक्षण)1 ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत
ते आशीर्वादित आहेस.
2 परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.
3 मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या,
ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.
4 कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.
5 तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले,
आणि मी माझा अपराध लपवला नाही,
मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन,
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
6 याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
7 तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील,
विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला)
8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन.
तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.
9 म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही.
त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.”
10 वाईट लोकांस खूप दु:ख भोगावे लागेल,
परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.
11 अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा.
अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.
Chapter 33
उत्पन्नकर्त्याची व संरक्षकाची महती
1 न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा,
न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
2 वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या;
दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.
3 त्याच्यासाठी नवे गीत गा;
मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा.
4 कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे,
आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.
5 देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे,
परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे.
6 परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली
आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.
7 तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो,
तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो.
8 सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो,
जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.
9 कारण तो बोलला आणि ते झाले,
त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.
10 राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो,
तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो.
11 परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात,
त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.
12 परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे.
ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत.
13 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो,
तो सर्व लोकांस पाहातो.
14 तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून
पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.
15 ज्याने सर्वांची हृदये घडवली तो
त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.
16 पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही.
वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.
17 घोडा विजयासाठी व्यर्थ आहे.
त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.
18 पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे.
जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,
19 त्यांना मरणापासून,
आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.
20 आम्ही परमेश्वराची वाट पाहू,
तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे.
21 त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते,
कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो.
22 परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे
त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे.
Chapter 34
पीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखापुढे आपली चर्या बदलल्यावर त्यास त्याने हाकलून लावले, आणि तो तेथून निघून गेला तेव्हाचे त्याचे गीत.1 मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन.
माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
2 मी परमेश्वराची स्तुती करणार,
विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.
3 तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या.
आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.
4 मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले.
आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.
5 जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील,
आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत.
6 या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले
आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले.
7 परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो.
आणि त्यास वाचवतो.
8 परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
9 जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा.
त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही.
10 तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात,
परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही.
11 मुलांनो माझे ऐका
आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन.
12 सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?
13 तर वाईट बोलण्यापासून आवर,
आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
14 वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर.
शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
15 परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे,
त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.
16 परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे.
तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो.
17 नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो,
आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.
18 जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे.
आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.
19 नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत,
परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.
20 परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल.
त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही.
21 परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील,
जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल.
22 परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल.
त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही.
Chapter 35
शत्रूंच्या हातून सुटण्यासाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र.1 हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर.
जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ.
2 तुझी मोठी आणि छोटी ढाल घे,
उठून मला मदत कर.
3 जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर.
माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे.
4 जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत.
जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत.
5 ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत
आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो.
6 त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे.
परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो.
7 विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे.
विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे.
8 त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो,
त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे.
त्यांच्याच नाशात ते पडोत.
9 परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन,
आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन.
10 माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे?
जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस.
आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो.
11 अनितीमान साक्षी उठल्या आहेत;
ते माझ्यावर खोटा आरोप लावतात.
12 माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात.
मी दु:खी आहे.
13 परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले,
मी त्यांच्या करता उपवास केला,
मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही.
14 मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे.
मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे.
15 परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला.
मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले.
16 आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली.
त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले.
17 परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस?
माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव.
18 मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन.
लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन.
19 माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको.
20 कारण ते शांतीने बोलत नाही,
परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात.
21 ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात,
ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे.
22 हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको.
देवा, माझ्यापासून दूर राहू नको.
23 हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ.
24 परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर,
तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ.
25 “आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ.
“आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.
26 जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो.
जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो.
27 जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत.
जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत.
28 तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन,
आणि तुझी स्तुती दिवसभर करीन.
Chapter 36
देवाचे अढळ प्रेम
प्रमुख गायकासाठी; परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र.1 दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की,
त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही.
2 त्याचे अपराध उघडकीस येणार नाही आणि त्याचा द्वेष केला जाणार नाही,
अशा भ्रमात तो राहत असतो.
3 त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात.
तो शहाणा होण्यास किंवा सत्कृत्ये करण्यास इच्छीत नाही.
4 तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो.
तो वाईट मार्गाच्या योजना करतो,
तो वाईटाचा धिक्कार करत नाही.
5 हे परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे;
तुझी एकनिष्ठता आभाळापर्यंत पोहचली आहे.
6 परमेश्वरा तुझे न्यायीपण उंच पर्वतासारखे आहे.
तुझा न्याय खोल समुद्रासारखा आहे.
परमेश्वरा तू मनुष्यास आणि प्राण्यांस दोघांस राखतो.
7 देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे.
मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते.
8 ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील.
तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील.
9 कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.
तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू.
10 राजे तुला ओळखतात त्यांच्याकरिता तू आपली प्रेमदया विस्तीर्ण कर,
तुझी सुरक्षीतता सरळांसोबत असू दे.
11 गर्विष्ठांचे पाय माझ्याजवळ येऊ देऊ नकोस.
दुष्टाचा हात मला घालवून न देवो.
12 तेथे दुष्ट पडले आहेत,
ते पाडले गेले आहेत आणि ते कधीही उभे राहू शकणार नाहीत.
Chapter 37
दुष्ट व देवभक्त ह्यांचे भवितव्य
दाविदाचे स्तोत्र.1 दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस,
जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.
2 कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील;
व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.
3 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर;
देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
4 परमेश्वरामध्ये आनंद कर,
आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
5 तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे,
त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
6 तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे
आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
7 परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा.
जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो,
तर काळजी करू नको.
8 रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस.
त्याने फक्त त्रास होतो.
9 कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील,
परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
10 थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील;
तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
11 परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील,
आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
12 दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो,
आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
13 प्रभू त्यास हसत आहे,
कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
14 जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत,
त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.
15 परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
16 अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा,
नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
17 कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील
परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.
18 परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो,
आणि त्यांचे वतन सदैव राहील.
19 वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत.
जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
20 परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील,
परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील;
ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.
21 दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही.
परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो.
22 जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील;
आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.
23 मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात,
असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात.
24 जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही.
कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.
25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे;
तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
26 सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो,
त्याची संतती आशीर्वादित असते.
27 वाईटापासून फिर आणि चांगले ते कर.
तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील.
28 कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे
आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही.
ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत.
परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील.
29 नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील
आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.
30 नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते,
आणि न्याय वाढवते.
31 त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते,
त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.
32 परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो,
आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.
33 परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही.
किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही.
34 परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ.
आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल.
जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.
35 मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला.
जो आपले मूळ जमिनीत पसरवतो.
36 परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता.
मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही.
37 प्रमाणिक मानसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव.
कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते.
38 पापी तर पूर्णपणे नाश पावतील,
परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल.
39 नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते,
संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन.
40 परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील,
तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो,
कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे.
Chapter 38
पश्चातापी अंतःकरणाची प्रार्थना
आठवण देण्यासाठी, दाविदाचे स्तोत्र.1 परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस,
आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस.
2 कारण तुझे बाण मला छेदतात,
आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे.
3 माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे.
आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.
4 कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे.
ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे.
5 माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे,
माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
6 मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते;
दिवसभर मी शोक करतो.
7 कारण लज्जेने मला गाठले आहे,
आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
8 मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे.
आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.
9 हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस,
आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही.
10 माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे
आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे.
11 माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात,
माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात.
12 जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात.
जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक
आणि कपटाचे शब्द बोलतात.
13 मी तर बहिर्यासारखा होऊन ऐकत नाही;
मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.
14 ऐकू न येणाऱ्या मानसासारखा मी आहे,
ज्याच्याकडे काही उत्तर नाही.
15 परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन.
प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.
16 कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील.
जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील.
17 कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे,
आणि मी सतत यातनेत आहे.
18 मी माझा अपराध कबूल करतो;
मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.
19 परंतु माझे शत्रू असंख्य आहेत;
जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत.
20 माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात.
जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात.
21 हे परमेश्वरा, मला सोडू नकोस;
माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.
22 हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या,
माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.
Chapter 39
आयुष्याची क्षणभंगुरता
मुख्य गायकासाठी; यदूथूनासाठी, दाविदाचे स्तोत्र.1 मी ठरवले “मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन,
म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही.”
2 मी स्तब्ध राहिलो, चांगले बोलण्यापासूनही मी आपले शब्द आवरले.
आणि माझ्या वेदना आणखी वाईट तऱ्हेने वाढल्या.
3 माझे हृदय तापले,
जेव्हा मी या गोष्टींविषयी विचार करत होतो, तेव्हा ते अग्नीप्रमाणे पेटले.
तेव्हा शेवटी मी बोललो.
4 हे परमेश्वरा, माझ्या जीवनाचा अंत केव्हा आहे,
आणि माझ्या आयुष्याचे दिवस किती आहेत हे मला कळू दे,
मी किती क्षणभंगुर आहे ते मला दाखव.
माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
5 पाहा, तू माझे दिवस हाताच्या रुंदी इतके केले आहेत.
आणि माझा जीवनकाल तुझ्यासमोर काहीच नाही.
खचित मनुष्य केवळ एक श्वासच आहे.
6 खचित प्रत्येक मनुष्य हा सावलीसारखा चालतो,
खचित प्रत्येकजण संपत्ती साठवण्यासाठी घाई करतो,
पण त्यांना हे कळत नाही कोणास ते प्राप्त होणार.
7 हे प्रभू, आता मी कशाची वाट पाहू?
तूच माझी एक आशा आहेस!
8 माझ्या अपराधांवर मला विजय दे,
मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.
9 मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही.
कारण हे तुच केले आहेस.
10 मला जखमा करणे थांबव,
तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे.
11 जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस.
कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो.
खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)
12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक,
माझ्याकडे कान लाव.
माझे रडणे ऐक,
कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे.
13 तुझे माझ्यावरील टक लावून बघने फिरव,
म्हणजे मी मरणाच्या आधी पुन्हा हर्षीत होईल.
Chapter 40
सुटकेबद्दल उरकारस्तुती
स्तोत्र. 70:1-5
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.1 मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली,
त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला.
2 त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले,
आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली.
3 आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले,
पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील.
आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.
4 जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो,
आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.
5 परमेश्वरा, माझ्या देवा, तू केलेली आश्चर्याची कृत्ये पुष्कळ आहेत.
आणि आमच्यासाठी तुझे विचार मोजले जाणार नाहीत इतके आहेत.
जर मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर,
ते मोजण्यापलीकडचे आहेत.
6 यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही.
परंतु तू माझे कान उघडले आहेत.
होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस.
7 म्हणून मी म्हणालो बघ, मी आलो आहे.
माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले आहे.
8 माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे.
9 मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले.
परमेश्वरा, तुला माहित आहे.
10 तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही.
तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले.
तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही.
11 यास्तव हे परमेश्वरा, तू तुझी दयाळूपणाची कृत्ये माझ्यापासून आवरून धरू नको.
तुझी प्रेमदया आणि तुझी सत्यता मला नेहमीच राखो.
12 कारण असंख्य वाईटाने मला वेढले आहे.
मी वर पाहण्यास सक्षम नाही, कारण माझ्या अपराधांनी मला गाठले आहे.
माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा ते जास्त आहेत.
म्हणून माझे हृदय खचले आहे.
13 परमेश्वरा, मला वाचवायला हर्षित हो.
परमेश्वरा, मला मदत करण्यास त्वरा कर.
14 जे माझ्या जीवाचा नाश करण्यास माझ्या पाठीस लागले आहेत,
ते लज्जित केले जावोत आणि गोंधळून जावोत.
15 हा! हा! हा! असे जे मला म्हणतात, ते आपल्या लज्जेमुळे चकित होवोत.
16 परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष व आनंद करोत.
ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व
परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत.
17 मी गरीब आणि दीन आहे,
तरी प्रभू माझा विचार करतो.
तू माझे साहाय्य आणि मला वाचवणारा आहेस.
माझ्या देवा, उशीर करू नकोस.
Chapter 41
रोगनिवारणार्थ प्रार्थना
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.1 जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे.
त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल.
2 परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जीवंत ठेवेल.
आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल.
परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही.
3 तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल.
तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील.
4 मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर.
माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.”
5 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात,
“तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?”
6 माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात.
त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते.
जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात.
7 माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात,
ते माझ्याविरूध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
8 ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो.
म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.”
9 माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला.
पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.
10 परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर.
म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेन.
11 माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही,
यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस.
12 मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस,
आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस.
13 परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची
अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो,
आमेन, आमेन.
Chapter 42
देवप्राप्तीचा ध्यास
मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मासकील. (शिक्षण)1 जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते,
तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो.
2 माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन?
3 जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?”
तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.
4 हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर,
कसा मी त्या गर्दीला नेतृत्व करत देवाच्या घरात घेऊन जात असे,
हे आठवून माझा जीव माझ्याठायी ओतला जात आहे.
5 हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस?
माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस?
देवाची आशा धर, कारण त्याच्या उपस्थितीने होणाऱ्या तारणामुळे
मी त्याची अजून स्तुती करीन.
6 माझ्या देवा, माझ्याठायी माझा जीव निराश झाला आहे,
म्हणून यार्देनच्या प्रदेशापासून,
हर्मोनच्या डोंगराच्या तीन शिखरावरून आणि मिसहारच्या टेकडीवरून मी तुझे स्मरण करतो.
7 तुझ्या धबधब्याच्या अवाजाने ओघ ओघाला हाक मारतो.
तुझ्या सर्व लहरी आणि मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या आहेत.
8 तरी परमेश्वर त्याची प्रेमदया दिवसा अज्ञापील,
आणि रात्री त्याचे गीत, म्हणजे माझ्या जीवाच्या देवाला केलेली प्रार्थना माझ्यासोबत असेल.
9 मी देवाला म्हणेल, माझ्या खडका, तू का मला सोडले आहे?
शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करू?
10 “तुझा देव कुठे आहे?” असे बोलून
माझे शत्रू तलवारीने माझ्या हाडात भोसकल्याप्रमाणे पूर्ण दिवस मला दोष देत राहतात.
11 हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस?
माझ्यामध्ये तू तळमळत आहेस?
देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि
माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन.
Chapter 43
बचाव आणि मुक्तीसाठी प्रार्थना
1 हे देवा, तू माझा न्याय कर, आणि भक्तिहीन राष्ट्राविरूद्ध तू माझी बाजू मांड,
2 कारण तू माझ्या सामर्थ्याचा देव आहेस;
तू मला का दूर केले आहे?
शत्रूंच्या जुलूमाने मी का शोक करत फिरू?
3 तू आपला प्रकाश आणि सत्य पाठवून दे, ते मला चालवोत.
तुझ्या पवित्र डोंगराकडे आणि मंडपाकडे ते मला मार्गदर्शन करोत.
4 तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ,
देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल,
आणि हे देवा, माझ्या देवा, वीणा वाजवून मी तुझी स्तुती करीन.
5 हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस?
आतल्या आत तू का तळमळत आहेस?
देवाची आशा धर, कारण जो माझी मदत आणि माझा देव
त्याची मी आणखी स्तुती करेन.
Chapter 44
पूर्वीच्या सुटका आणि हल्लीच्या अडचणी
मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मसकील (शिक्षण)1 हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे,
की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस.
2 तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस,
परंतु आपल्या लोकांस स्थापिले,
तू लोकांस पीडले
परंतु आपल्या लोकांस तू वाढवले.
3 कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही.
आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही.
परंतू तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले,
कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास.
4 देवा, तू माझा राजा आहेस,
याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे.
5 तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू.
जे आमच्याविरूद्ध उठतात, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूंना तुडवून टाकू.
6 कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही.
किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल.
7 परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस.
आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस.
8 देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे,
आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला)
9 परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे,
आणि आमची अप्रतिष्ठा होऊ दिली आहे.
आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस.
10 तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले,
आणि आमचा द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात.
11 तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे,
आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस.
12 तू तुझ्या लोकांस कवडीमोलाने विकलेस,
आणि असे करून तू आपली संपत्ती देखील वाढवली नाही.
13 तू शेजाऱ्यांमध्ये आम्हांस निंदा आणि
आमच्या सभोवती असणाऱ्यांमध्ये आम्हांस हसण्याजोगे आणि थट्टा असे केले आहे.
14 राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे,
लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात.
15 सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते.
आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला झाकले आहे.
16 कारण माझ्या निंदकाच्या आणि अपमानाच्या शब्दाने,
शत्रू आणि सुड घेणाऱ्यांमुळे माझे मुख लज्जेने झाकले आहे.
17 हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही,
किंवा करारांत खोटे वागलो नाही.
18 आमचे हृदय मागे फिरले नाही,
आमची पावले तुझ्यापासून दूर गेली नाहीस.
19 तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस,
आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस.
20 जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल
किंवा आमचे हात अनोळखी देवाकडे पसरवले असतील,
21 तर देव हे शोधून काढणार नाही काय?
कारण तो हृदयातील गुप्त गोष्टी जाणतो.
22 खरोखर, आम्ही दिवसभर तुझ्यासाठी मारले जात आहोत.
मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
23 प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस?
ऊठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस.
24 तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस?
आणि आमचे दु:ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस?
25 कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे,
आणि आमचे पोट भूमीला चिकटले आहे.
26 आमच्या साहाय्याला ऊठ!
आणि तुझ्या प्रेमदयेस्तव आम्हास वाचव.
Chapter 45
राजाच्या लग्नासंबंधी गीत
मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे शोशन्नीम (म्हणजे भूकमले) या नावाच्या रागावर बसवलेले मस्कील (शिक्षण) प्रीतीचे स्तोत्र.1 माझे हृदय चांगल्या विचारांनी भरून वाहते,
राजासाठी बनवलेली काव्ये मी मोठ्याने वाचेन,
लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जीभेतून शब्द येतात.
2 तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस.
तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे,
यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे.
3 हे बलवाना, तू आपली तलवार मांडीला बांध,
आपले वैभव आणि आपला प्रताप धारण कर.
4 तू आपल्या सत्याने, नम्रतेने, न्यायीपणामध्ये विजयाने स्वारी कर,
तुझा उजवा हात तुला भयानक गोष्टी शिकवेल.
5 तुझे बाण तीक्ष्ण आहेत.
लोक तुझ्या पायाखाली पडतील.
तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात आहेत.
6 देवा तुझे सिंहासन सर्वकाळासाठी आहे.
तुझा न्यायाचा राजदंड हा तुझ्या राज्याचा राजदंड आहे.
7 तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्टाईचा हेवा केला.
यास्तव देवाने, तुझ्या देवाने, हर्षाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा अधीक अभिषेक केल आहे.
8 तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो.
हस्तिदंताच्या महालातून तंतुवाद्यांनी तुला आनंदीत केले आहे.
9 राजांच्या मुली तुझ्या सन्मान्य स्रीयांच्यामध्ये आहेत.
राणी ओफिराच्या सोन्याने शृंगारलेली तुझ्या उजव्या बाजूस उभी आहे.
10 मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव.
तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.
11 अशाने राजा तुझ्या सौंदर्याची आवड धरणार,
तो तुझा स्वामी आहे, तू त्याचा आदर कर.
12 सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील.
श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
13 राजकन्या राजमहालात तेजस्वी आहे,
तिचे वस्र सोन्याच्या कारागिरीचे आहेत.
14 तिला कशिदाकाम केलेल्या वस्त्रांमध्ये राजाकडे नेले जाईल.
तिच्या मागे चालणाऱ्या तिच्या सोबतिणी कुमारी तुझ्याजवळ आणल्या जातील.
15 ते आनंदात व हर्षात नेल्या जातील.
ते राजाच्या महालात प्रवेश करतील.
16 तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले राज्य करतील.
ज्यांना तू सर्व पृथ्वीत अधिपती करशील.
17 तुझे नाव सर्व पिढ्या आठवतील असे मी करीन.
म्हणून लोक सदासर्वकाळ तुझी स्तुती करतील.
Chapter 46
देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य
मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे आलामोथ सुरावर बसवलेले गाणे.1 देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे,
जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.
2 म्हणून जरी पृथ्वी बदलली,
जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.
3 जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या,
आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही.
4 तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या
पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात.
5 देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही;
देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील.
6 राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील;
तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.
7 सेनाधीश परमेश्वर [1] आमच्याबरोबर आहे.
याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे.
8 या, परमेश्वराची कृत्ये पाहा,
त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे.
9 तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो;
तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो;
तो रथ जाळून टाकतो.
10 शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे;
राष्ट्रात मी उंचावला जाईन;
मी पृथ्वीवर उंचावला जाईन.
11 सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे;
याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.
Chapter 47
देव अखिल पृथ्वीचा राजा
कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीते1 अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा.
विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा.
2 कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे;
तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
3 तो लोकांस आमच्या ताब्यात देतो,
आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
4 त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे,
ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
5 जयघोष होत असता देव वर गेला,
परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
6 देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा;
आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
7 कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे;
त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
8 देव राष्ट्रांवर राज्य करतो;
देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
9 अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत;
कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत.
तो अत्यंत उंच आहे.
Chapter 48
सीयोनेचे सौंदर्य व वैभव
कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीत.1 आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर,
परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.
2 सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे,
त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते.
3 देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे.
4 कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत,
ते एकत्र येऊन चढाई करून आले.
5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले.
ते निराश झाले आणि पळत सुटले.
6 भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला.
प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या.
7 पूर्वेकडच्या वाऱ्याने
तू तार्शीशाची जहाजे मोडलीस.
8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात,
आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले.
देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो.
10 देवा, जसे तुझे नाव आहे,
तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे.
11 तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो,
यहूदाची कन्या हर्ष करोत.
12 सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा.
13 उंच भिंती बघा, सियोनेच्या राजवाड्याचे वर्णन करा.
नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14 कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे.
तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.
Chapter 49
संपत्तीवर भरवसा ठेवण्याचा वेडेपणा
मुख्य गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तोत्र.1 सर्व लोकांनो, हे ऐका.
जगाचे सर्व रहिवासी, तुम्ही हे ऐका.
2 गरीब आणि श्रीमंत दोघेही,
उच्च आणि नीच.
3 माझे मुख ज्ञान बोलेल,
आणि माझ्या हृदयातील विचार समंजसपणाचे असणार.
4 मी दृष्टांताकडे आपले कान लावीन,
मी आपली गोष्ट वीणे सोबत सुरु करणार.
5 संकटाच्या दिवसात, जेव्हा अन्याय माझ्या पायाला वेढा घालतो, तेव्हा मी कशाला घाबरू?
6 जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात,
आणि आपल्या धनाच्या विपुलतेविषयी बढाई मारतात,
7 त्यातील कोणीही आपल्या भावाला खंडून घेण्यास समर्थ नाही,
किंवा त्याच्यासाठी देवाकडे खंडणी देववत नाही.
8 कारण त्यांच्या जीवाची खंडणी महाग आहे,
आणि तिची भरपाई करणे कधीच शक्य नाही.
9 यासाठी की त्यांना सर्वकाळ जगावे,
म्हणजे त्यांचे शरीर कुजणार नाही.
10 कारण सर्वजण बघतात की बुद्धीमान मरतो, मूर्ख आणि मतिमंद नष्ट होतो.
आणि आपली संपत्ती इतरांसाठी सोडून जातात.
11 त्यांच्या मनातील विचार हे असतात की,
त्यांचे कुटूंब सर्वकाळ राहणार,
आणि ज्या ठिकाणी ते राहतात ते पिढ्यानपिढ्या राहणार,
ते आपल्या भूमीस आपले नाव देतात.
12 परंतु संपत्ती असणारा मनुष्य सर्वकाळ राहत नाही,
तो पशूसारखाच नाश होणारा आहे.
13 हा त्यांचा मार्ग मुर्खपण आहे,
तरी त्यांच्या मागे येणारे त्याचे असे म्हणजे मंजूर करतो.
14 ते कळपाप्रमाणे नेमलेले आहेत, जे मृतलोकांत जातात.
मरण त्यांचा मेंढपाळ आहे.
सरळ त्यांच्यावर धनीपण करतील असे सामर्थ्य त्यांना असेल.
15 परंतु देव मृतलोकांच्या सामर्थ्यापासून माझा जीव खंडून घेणार.
तो मला जवळ करणार.
16 जेव्हा कोणी श्रीमंत होतो आणि त्याच्या घराचे सामर्थ्य वाढते,
तर तू भयभीत होऊ नको.
17 कारण तो मरेल तेव्हा काहीच सोबत घेऊन जाणार नाही.
त्याचे सामर्थ्य त्याच्या मागे खाली उतरणार नाही.
18 जरी तो आपल्या जीवनात आपल्या जीवाला आशीर्वाद देत असेल,
आणि तू आपल्यासाठी जगला असता मनुष्यांनी तुझी स्तुती केली.
19 तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीकडे जाणार,
ते कधीच प्रकाश पाहणार नाहीत.
20 ज्याकडे संपत्ती आहे, परंतु त्यास काही समजत नाही,
तर तो नाश होणाऱ्या पशूसारखा आहे.
Chapter 50
देव न्यायाधीश आहे
आसाफाचे स्तोत्र.1 थोर परमेश्वर देव, बोलला आहे.
आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.
2 सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून
देव प्रकाशला आहे.
3 आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही,
त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे,
आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
4 त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली,
म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.
5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा.
ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.”
6 आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते.
कारण देव स्वतः न्यायधीश आहे.
7 हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन,
मी देव आहे, तुमचा देव आहे.
8 मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही.
तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत,
9 मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही.
किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.
10 कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे,
हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
11 उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे
आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.
12 मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही,
कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.
13 मी बैलाचे मांस खाणार का?
मी बकऱ्यांचे रक्त पिणार का?
14 देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर,
आणि परत्पराकडे आपले नवस फेड.
15 तू संकटात असता मला हाक मार,
आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.
16 देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे?
आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?
17 कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस,
आणि माझी वचने झुगारून देतोस?
18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता.
तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.
19 तू वाईटाला आपले मुख देतोस,
आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.
20 तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता.
तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.
21 तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो.
मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले,
परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.
22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात.
मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.
23 जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो,
आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो,
त्यास मी देवाचे तारण दाखवेन.
Chapter 51
शुद्धतेसाठी प्रार्थना
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र; जेव्हा तो बथशेबापाशी गेल्यानंतर नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आला तेव्हाचे.1 हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर,
तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक.
2 देवा माझे अपराध धुऊन टाक,
आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.
3 कारण माझे अपराध मला माहित आहेत.
आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत.
4 तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे,
आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.
जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो.
तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.
5 पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे,
आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
6 पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो,
तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर,
मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
8 आनंद व हर्ष मला ऐकू दे,
म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस,
माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
10 देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर.
आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
11 तुझ्या उपस्थितितून मला दूर लोटू नकोस,
आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे,
आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.
13 तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन
आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.
14 हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर,
आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन.
15 प्रभू, माझे ओठ उघड,
आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल.
16 कारण यज्ञाची आवड तुला नाही,
नाहीतर मी ते दिले असते,
होमार्पणाने तुला संतोष होत नाही.
17 देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय,
तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
18 हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर.
आणि यरुशलेमेच्या भींती पुन्हा बांध.
19 तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील.
तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील.
Chapter 52
ज्ञानशून्य दुष्ट
दाविदाचे स्तोत्र1 हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस?
देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते.
2 अरे कपटाने कार्य करणाऱ्या,
तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी नाशाची योजना करते.
3 तुला चांगल्यापेक्षा वाईटाची,
आणि प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा असत्याची अधिक आवड आहे.
4 तू कपटी जीभे,
तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात.
5 त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील;
तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल
आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील.
6 नितीमानसुद्धा ते पाहतील आणि घाबरतील;
ते त्याच्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील,
7 पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही,
पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला,
आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले.
8 पण मी तर देवाच्या घरात हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे;
माझा देवाच्या कराराच्या विश्वासनियतेवर सदासर्वकाळ आणि कायम भरवसा आहे.
9 कारण ज्या गोष्टी तू केल्या आहेत, त्यासाठी मी तुझ्या
विश्वासणाऱ्यांच्या समक्षेत सर्वकाळ तुझे उपकार मानीन.
आणि तुझ्या नावात आशा ठेवली आहे कारण ते चांगले आहे.
Chapter 53
मानवाची दुष्टाई आणि मूर्खपणा
स्तोत्र. 14:1-7
दाविदाचे स्तोत्र1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो, तेथे देव नाही.
ते भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी तिरस्करणीय अन्यायाचे कृत्य केले आहे;
त्यातल्या कोणीही चांगले कृत्य केले नाही.
2 देव स्वर्गातून मानवजातीच्या मुलांकडे पाहतो की,
जर तेथे कोणी समजदार आहे,
आणि जो देवाचा शोध घेतो.
3 त्यातील प्रत्येकजण माघारी गेला आहे;
सर्व भ्रष्ट झाले आहेत;
त्यातल्या एकानेही चांगले कृत्य केले नाही, एकानेही नाही.
4 ज्यांनी अन्याय केला,
त्यांना काहीही माहित नव्हते काय?
ज्यांनी माझ्या लोकांस भाकरीप्रमाणे खाल्ले,
पण ते देवाला हाक मारत नाही.
5 तेथे भिण्याचे काही कारण नव्हते, तरी ते मोठ्या भयात होते;
कारण तुझ्याविरूद्ध तळ देणाऱ्यांची देवाने हाडे विखुरली आहेत;
असे लोक लज्जित झाले आहेत कारण देवाने त्यांना नाकारले आहे.
6 अहो, सियोनातून इस्राएलाचे तारण येवो!
जेव्हा देव आपल्या लोकांस बंदिवासातून परत आणील,
तेव्हा याकोब आनंद करेल आणि इस्राएल हर्षित होईल!
Chapter 54
शत्रूंपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव,
आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.
2 हे देवा, माझी प्रार्थना ऐक;
माझ्या शब्दाकडे कान दे.
3 कारण माझ्याविरूद्ध परके [1] उठले आहेत,
आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत;
त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.
4 पाहा, देव माझा मदतनीस आहे;
प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
5 तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील;
तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.
6 मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीन;
हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
7 कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे;
माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.
Chapter 55
विश्वासघातक्यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना
मुख्य गायकासाठी; तंतूवाद्दावरचे दाविदाचे स्तोत्र.1 हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव,
आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस.
2 देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे
माझ्या संकटात मला विसावा नाही.
3 माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे,
दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे,
कारण ते माझ्यावर संकट आणतात,
आणि द्वेषात माझा पाठलाग करतात.
4 माझे हृदय फार दुखणाईत आहे,
आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे.
5 भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत,
आणि भयाने मला ग्रासले आहे.
6 मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते.
मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो.
7 मी खूप दूर भटकत गेलो असतो.
मी रानात राहिलो असतो.
8 वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो.
9 प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर.
कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत.
10 दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात;
अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत.
11 दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे,
जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही.
12 कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर
तर मला कळून आले असते,
किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता,
तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते.
13 परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस,
माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त.
14 एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती.
आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो.
15 मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो.
जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत.
कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे.
16 मी तर देवाला हाक मारीन,
आणि परमेश्वर मला तारील.
17 मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन.
आणि तो माझी वाणी ऐकेल.
18 माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे.
कारण माझ्याविरूद्ध लढणारे पुष्कळ होते.
19 देव, जो पुरातन काळापासून आहे,
तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला)
ते मनुष्ये बदलत नाहीत;
ती देवाला भीत नाहीत.
20 माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे.
त्याने आपला करार मोडला आहे.
21 त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे,
परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे.
त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत,
तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे.
22 तू आपला भार परमेश्वरावर टाक,
म्हणजे तो तुला आधार देईल.
तो नितीमानाला कधी पडू देणार नाही.
23 परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील;
घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत,
परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन.
Chapter 56
श्रद्धायुक्त प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो;
दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो.
2 माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात;
कारण उद्धटपणे माझ्याविरूद्ध लढणारे अनेक आहेत.
3 मी जेव्हा घाबरतो,
तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.
4 मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन,
मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करील?
5 दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात;
त्यांचे सर्व विचार माझ्याविरूद्ध माझ्या वाईटासाठी असतात.
6 ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात,
जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात.
7 त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको.
हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण.
8 तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत
आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत;
तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?
9 मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील;
हे मला माहित आहे, देव माझ्या बाजूचा आहे.
10 मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
मी परमेश्वराच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
11 मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?
12 हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे;
मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन.
13 कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे;
तू माझे पाय पडण्यापासून राखले,
यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात
देवापुढे चालावे.
Chapter 57
छळणाऱ्यांच्या हातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
स्तोत्र. 108:1-5
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर,
कारण माझा जीव ही संकटे टळून जाईपर्यंत
तुझ्यात आश्रय घेतो.
2 मी परात्पर देवाकडे, जो देव माझ्यासाठी सर्वकाही करतो
त्याचा मी धावा करीन.
3 तो स्वर्गातून मला मदत पाठवतो आणि मला वाचवतो,
जेव्हा मनुष्य मला गिळून टाकण्याची इच्छा करतो तेव्हा तो त्यास धमकावतो;
देव त्याच्या कराराची विश्वसनियता आणि त्याचा विश्वासूपणा मला दाखवतो.
4 माझा जीव सिंहाच्यामध्ये पडला आहे;
ज्यांचे दात भाले आणि बाण आहेत,
आणि ज्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे
अशा लोकांमध्ये मला जबरदस्तीने रहावे लागत आहे.
5 हे देवा, तू आकाशापेक्षाही उंच हो;
तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर होवो.
6 त्यांनी माझ्या पावलांसाठी सापळा तयार केला आहे;
माझा जीव वाकून गेला आहे;
त्यांनी माझ्यासमोर खाच खणली आहे,
परंतु ते स्वतःच त्यामध्ये पडले आहेत.
7 हे देवा, माझे हृदय स्थिर आहे, माझे हृदय स्थिर आहे;
मी गाईन, होय, मी स्तुती गाईन.
8 हे माझ्या गौरवी जीवा, जागा हो;
हे सतारी आणि वीणे, जागे व्हा;
मी पहाटेला जागे करीन.
9 हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन;
मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन.
10 कारण तुझ्या कराराची विश्वसनियता आकाशापर्यंत महान आहे
आणि तुझा विश्वासूपणा ढगापर्यंत पोहचतो.
11 हे देवा, तू आकाशाच्या वर उंचविला जावो;
तुझा महिमा सर्व पृथ्वीवर उंच होवो.
Chapter 58
दुष्टाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का?
अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का?
2 नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता;
तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.
3 दुष्ट उदरापासूनच दुरावतात;
ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
4 त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे,
जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत;
5 गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी
त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.
6 हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड;
हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक;
7 जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत;
जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत.
8 गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते,
जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.
9 तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच,
ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील.
10 नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल;
तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल.
11 म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे;
खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”
Chapter 59
शत्रूंच्या हातातून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, मला माझ्या शत्रूंपासून सोडीव;
जे माझ्याविरूद्ध उठतात त्यांच्यापासून मला दूर उंचावर ठेव.
2 दुष्कर्म करणाऱ्यांपासून मला सुरक्षित ठेव,
आणि रक्तपाती मनुष्यापासून मला वाचव.
3 कारण, पाहा, ते माझ्या जीवासाठी दबा धरून बसले आहेत.
हे परमेश्वरा, माझा अपराध किंवा पातक नसता,
सामर्थी लोक माझ्याविरूद्ध एकत्र गोळा झाले आहेत.
4 जरी मी निर्दोष असलो तरी ते माझ्याकडे धावण्याची तयारी करत आहेत;
मला मदत करावी म्हणून जागा हो व पाहा.
5 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, इस्राएलाच्या देवा,
ऊठ आणि सर्व राष्ट्रांना शिक्षा कर;
कोणत्याही दुष्ट पापी मनुष्यास दया दाखवू नकोस.
6 संध्याकाळी ते परत येतात, कुत्र्यांसारखे गुरगुरतात
आणि नगराभोवती फिरतात.
7 पाहा, ते आपल्या मुखावाटे ढेकर देतात;
त्यांच्या तोंडचे शब्द तलवार आहेत.
कारण ते म्हणतात, आमचे कोण ऐकतो?
8 परंतु हे परमेश्वरा, तू त्यांना हसशील;
तू सर्व राष्ट्रांना उपहासात धरशील.
9 हे माझ्या सामर्थ्या, मी तुझ्याकडे लक्ष देईन;
कारण देवच माझा उंच बुरूज आहे.
10 माझा देव मला त्याच्या कराराच्या विश्वासनियतेने भेटेल;
माझ्या शत्रूवर माझी इच्छा पूर्ण झालेली देव मला पाहू देईल.
11 त्यांना जिवे मारू नको नाहीतर माझे लोक विसरून जातील;
हे प्रभू तू आमची ढाल आहेस, आपल्या बलाने त्यांची दाणादाण कर, त्यांस खाली पाड.
12 कारण त्यांच्या तोंडचे पाप आणि त्यांच्या ओठांचे शब्द,
आणि त्यांनी अभिव्यक्त केलेले शाप
आणि खोटेपणा यामुळे ते आपल्या अंहकारात पकडले जातात.
13 क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे व्हावेत असे त्यांना नष्ट कर.
देव याकोबात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत
राज्य करतो हे त्यांना माहित होवो.
14 संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरतात.
आणि रात्री नगराभोवती फिरतात.
15 ते अन्नासाठी वर आणि खाली भटकतात,
आणि जर त्यांची तृप्ति झाली नाही तर रात्रभर वाट पाहतात.
16 परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन; कारण तू माझा उंच बुरूज आहे
आणि माझ्या संकटाच्या समयी आश्रयस्थान आहेस.
17 हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तवने गाईन;
कारण देव माझा उंच बुरूज आहे,
माझा देव ज्यावर मी विश्वास ठेऊ शकतो.
Chapter 60
शत्रूला विरोध करण्यासाठी साहाय्याची याचना
स्तोत्र. 108:6-13
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस; तू आम्हास फाडून खाली टाकले आहे; आमच्यावर रागावला आहेस;
तू आम्हांस पुन्हा पूर्वस्थितीवर आण.
2 तू भूमी कंपित केली आहेस; तू ती फाडून वेगळी केली; तिचे खिंडार बरे कर,
कारण ती हादरत आहे.
3 तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत;
तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षारस पाजला आहे.
4 तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे,
यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा.
5 ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी,
म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे.
6 देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन;
मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
7 गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे;
एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे;
यहूदा माझा राजदंड आहे.
8 मवाब माझे धुण्याचे पात्र आहे;
अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन;
मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
9 मला बळकट नगरात कोण नेईल?
मला अदोमात कोण नेईल?
10 हे देवा, तू आम्हास नाकारले नाही?
परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
11 तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर,
कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
12 आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ;
तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.
Chapter 61
देवाच्या संरक्षणावर भरवसा
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, माझी आरोळी ऐक;
माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
2 जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन;
माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने.
3 कारण तू माझ्यासाठी आश्रय,
माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस.
4 मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन;
मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन.
5 कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस;
जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे.
6 तू राजाचे आयुष्य वाढव;
त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत.
7 मी देवासमोर सर्वकाळ राहो;
तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील.
8 मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन,
म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.
Chapter 62
आपली भिस्त केवळ देवावर
दाविदाचे स्तोत्र1 माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे;
त्याच्यापासून माझे तारण येते.
2 तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे;
तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही.
3 झुकलेल्या भिंतीसारख्या, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या,
एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण
किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल?
4 त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात;
त्यांना लबाड बोलण्यास आवडते;
ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात, पण त्यांच्या अंतःकरणातून शाप देतात.
5 हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर;
कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
6 तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे;
तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.
7 माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे;
माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.
8 अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा;
त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा;
देव आमच्यासाठी आश्रय आहे.
9 खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत, आणि उच्च माणसे लबाड आहेत;
वजन केले असता हलके भरतील; त्यांना मापले असता ते केवळ मिथ्या आहेत.
10 दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका;
आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका;
11 देव एकदा बोलला आहे,
मी दोनदा ऐकले आहे,
सामर्थ्य देवाचे आहे.
12 हे प्रभू, तुझ्या ठायी प्रेमदया आहे.
कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस.
Chapter 63
देव तान्हेल्या जिवांचे समाधान करतो
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन;
शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जिव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे;
माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे.
2 म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी
मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे.
3 कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे;
माझे ओठ तुझी स्तुती करतील.
4 म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन;
मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन.
5 माझा जिव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल;
माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील.
6 मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो
आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो.
7 कारण तू माझे सहाय्य आहे,
आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे.
8 माझा जिव तुला चिकटून राहतो;
तुझा उजवा हात मला आधार देतो.
9 पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात
ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील.
10 त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल;
त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील.
11 परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल;
जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल,
पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल.
Chapter 64
गुप्त शत्रूंपासून बचाव व्हावा म्हणून प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे;
माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव.
2 वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून,
अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव,
3 त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे.
त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे.
4 याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात;
अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत;
5 ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात;
ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील?
6 ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात,
आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे.
मनुष्याचे अंतःकरण आणि अंतरीक विचार खोल आहेत.
7 परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील;
अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील.
8 त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील;
जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील.
9 सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील.
ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील.
10 परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील;
सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील.
Chapter 65
निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो;
तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल.
2 जो तू प्रार्थना ऐकतोस,
त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते.
3 दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे.
आमचे अपराध तर तूच क्षमा करशील.
4 ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे,
याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे.
तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या
उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ.
5 हे आमच्या तारणाऱ्या देवा,
जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा
आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस,
तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस.
6 कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून,
पर्वत दृढ केले आहेत.
7 तू गर्जणाऱ्या समुद्राला,
त्यांच्या लाटांच्या गर्जनेला
आणि लोकांचा गलबला शांत करतो.
8 जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात;
तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस.
9 तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस;
तू तिला फारच समृद्ध करतोस;
देवाची नदी जलपूर्ण आहे;
तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस.
10 तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस;
तू तिचे उंचवटे सपाट करतोस;
तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस.
तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस
11 तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस;
तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो.
12 रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात
आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत.
13 कुरणांनी कळप पांघरले आहेत;
दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत.
ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत.
Chapter 66
देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती
1 अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा;
2 त्याच्या नावाचा महिमा गा;
त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.
3 देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत,
तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.
4 सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील;
आणि तुझी स्तोत्रे गातील;
ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.
5 अहो या, आणि देवाची कार्ये पहा;
तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो.
6 त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली;
ते नदीतून पायांनी चालत गेले;
तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला.
7 तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो;
तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो;
बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.
8 अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या,
आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा.
9 तो आमचा जीव राखून ठेवतो,
आणि तो आमचे पाय सरकू देत नाही.
10 कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे;
रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे.
11 तू आम्हास जाळ्यात आणले;
तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले.
12 तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले.
आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो,
परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले.
13 मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन;
मी तुला केलेले नवस फेडीन.
14 संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले
आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल,
15 मी तुला मेंढ्याच्या धूपासहित
पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीन;
बोकड आणि गोऱ्हे अर्पीन.
16 जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका,
आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो.
17 मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला,
आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.
18 जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते,
तर प्रभूने माझे ऐकले नसते.
19 पण देवाने खचित ऐकले आहे;
त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे.
20 देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही,
किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.
Chapter 67
देवाचे उपकारस्मरण करण्याचा राष्ट्रांना आदेश
1 देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा.
आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
2 याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत,
तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
3 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत;
सर्व लोक तुझी स्तुती करोत.
4 राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत,
कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील
आणि राष्ट्रावर राज्य करशील.
5 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत;
सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6 भूमीने आपला हंगाम दिला आहे
आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.
7 देव आम्हास आशीर्वाद देवो आणि
पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.
Chapter 68
सीयोनेचा व पवित्रस्थानाचा परमेश्वर
दाविदाचे स्तोत्र1 देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत;
जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्यापुढून पळून जावोत.
2 जसा धूर पांगला जातो, तसे त्यांना दूर पांगून टाक;
जसे मेण अग्नीपुढे वितळते, तसे दुर्जन देवापुढे नष्ट होवोत.
3 परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत;
ते हर्षोत आणि आनंदी होवोत.
4 देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा;
ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून [1] चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा;
त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.
5 तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार [2]
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.
6 देव एकाकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो;
तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो;
पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात.
7 हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे गेला,
जेव्हा तू रानातून चालत गेलास,
8 तेव्हा भूमी कापली;
देवाच्या उपस्थितित आकाशातून पाऊसही पडला,
देवाच्या उपस्थितित, इस्राएलाच्या देवाच्या उपस्थित सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.
9 हे देवा, तू विपुल पाऊस पाठवलास;
जेव्हा तुझे वतन शिणलेले होते तेव्हा तू ते बळकट केलेस.
10 तुझे लोक त्यामध्ये राहिले;
हे देवा, तू आपल्या चांगुलपणातून गरीबांना दिले.
11 परमेश्वराने आज्ञा दिली,
आणि ज्यांनी त्यांना घोषणा केली ते मोठे सैन्य होते.
12 सैन्यांचे राजे पळून जातात, ते पळून जातात,
आणि घरी राहणारी स्री लूट वाटून घेते.
13 जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता,
तेव्हा ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मढवलेले आहेत,
अशा कबुतरासारखे तुम्ही आहात.
14 तेथे सर्वसमर्थाने राजांना विखरले आहे,
तेव्हा सल्मोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले.
15 हे महान पर्वता, बाशानाच्या पर्वता,
उंच बाशान पर्वत शिखरांचा पर्वत आहे.
16 देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे,
त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस?
खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील.
17 देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत.
जसा सीनाय पर्वतावर पवित्रस्थान, तसा प्रभू त्यांच्यामध्ये आहे.
18 तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे;
मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले
त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत,
यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे.
19 प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो,
देव आमचे तारण आहे.
20 आमचा देव आम्हास तारणारा देव आहे;
मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे.
21 पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल,
जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल.
22 परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन,
समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन.
23 यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा,
आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा.
24 हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत,
पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत.
25 गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत,
आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत.
26 मंडळीत देवाचा धन्यवाद करा;
जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
27 तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ,
यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय
जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.
28 तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे;
हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव.
29 यरुशलेमातील मंदिराकरता,
राजे तुला भेटी आणतील.
30 लव्हाळ्यात राहणारे वनपशु,
बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे ह्यांना धमकाव.
जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव;
जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक.
31 मिसरमधून सरदार येतील;
कूश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील.
32 अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा,
परमेश्वराची स्तुतिगीते गा.
33 जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकांशावर आरूढ होतो;
पाहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो.
34 देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा;
इस्राएलावर त्याचे वैभव
आणि आकाशात त्याचे बल आहे.
35 हे देवा, तू आपल्या पवित्रस्थानात भयप्रद आहे;
इस्राएलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो.
देव धन्यवादित असो.
Chapter 69
संकटसमयी केलेली आरोळी
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, मला तार;
कारण पाणी माझ्या गळ्याशी [1] येऊन पोहचले आहे.
2 मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही;
मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे.
3 माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे;
माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत.
4 विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत;
जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत;
जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले.
5 हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो,
आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत.
6 हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये.
हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.
7 कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे;
लाजेने माझे तोंड झाकले आहे.
8 मी आपल्या बंधूला परका झालो आहे,
आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे.
9 कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे,
आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत.
10 जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली [2] ,
तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती.
11 जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले,
तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो.
12 जे नगराच्या वेशीत बसतात;
ते माझी निंदा करतात; मी मद्यप्यांचा गीत झालो.
13 पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो;
हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.
14 मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस;
माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ.
15 पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस,
खोल डोह मला न गिळो.
खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो.
16 हे परमेश्वरा, मला उत्तर दे,
कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे.
17 आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस,
कारण मी क्लेशात आहे; मला त्वरीत उत्तर दे.
18 माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे;
माझ्या शत्रूंमुळे खंडणी भरून मला सोडव.
19 तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे;
माझे विरोधक माझ्यापुढे आहेत;
20 निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे;
माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता;
मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही.
21 त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले;
मला तहान लागली असता आंब दिली
22 त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत;
जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो.
23 त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये;
आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर.
24 तू त्यांच्यावर आपला संताप ओत,
आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो.
25 त्यांची ठिकाणे ओसाड पडो;
त्यांच्या तंबूत कोणीही न राहो.
26 कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात;
तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात.
27 ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव;
तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको.
28 जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत,
आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत.
29 पण मी गरीब आणि दु:खी आहे;
हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो.
30 मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन,
आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन.
31 ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या,
किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल.
32 लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले;
जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जीवंत होवो.
33 कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो
आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही.
34 आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे
प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा.
35 कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील;
लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल.
36 त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील;
आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील.
Chapter 70
मुक्ततेसाठी प्रार्थना
स्तोत्र. 40:13-17
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, मला सोडव.
हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर.
2 जे माझा जीव घेऊ पाहतात,
त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक;
माझ्या यातनेत आनंद मानणारे
माघारी फिरोत आणि अपमानित होवोत;
3 जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात,
ते आपल्या लाजेने मागे फिरोत.
4 जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत;
ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत.
5 पण मी गरीब आणि गरजवंत आहे;
हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये;
तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस.
हे परमेश्वरा, उशीर करू नकोस.
Chapter 71
वृद्धाची प्रार्थना
1 हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे;
मला कधीही लज्जित होऊ देऊ नको.
2 मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव;
तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर.
3 मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो;
तू मला तारावयास आज्ञा दिली आहे,
कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस.
4 हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव,
अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव.
5 कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस.
मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे.
6 गर्भापासून तूच माझा आधार आहेस;
माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले;
माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल.
7 पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे;
तू माझा बळकट आश्रय आहे.
8 माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने
आणि सन्मानाने भरलेले असो.
9 माझ्या वृद्धापकाळात मला दूर फेकून देऊ नको;
जेव्हा माझी शक्ती कमी होईल तेव्हा मला सोडू नकोस.
10 कारण माझे शत्रू माझ्याविरूद्ध बोलत आहेत;
जे माझ्या जिवावर पाळत ठेवून आहेत ते एकत्रित येऊन कट करत आहेत.
11 ते म्हणाले देवाने त्यास सोडले आहे;
त्याचा पाठलाग करा आणि त्यास घ्या, कारण त्यास सोडवणारा कोणीही नाही.
12 हे देवा, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस;
माझ्या देवा, माझ्या मदतीला त्वरा कर!
13 जे माझ्या जिवाचे विरोधी आहेत त्यांना लज्जित आणि नष्ट कर,
जे माझे अनिष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धिक्काराने आणि मानहानीने झाकून टाक.
14 पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन,
आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन.
15 माझे मुख तुझ्या न्यायीपणाचे
आणि तारणाविषयी सांगत राहील,
जरी मला ते समजले नाही.
16 प्रभू परमेश्वराच्या सामर्थ्यी कृत्याबरोबर मी त्यांच्याकडे जाईन;
मी तुझ्या, केवळ तुझ्याच, नितिमत्वाचा उल्लेख करीन.
17 हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस;
आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे.
18 खरोखर, जेव्हा आता मी म्हातारा आणि केस पिकलेला झालो आहे,
तेव्हा पुढल्या पिढीला तुझे सामर्थ्य, येणाऱ्या प्रत्येकाला तुझा पराक्रम मी सांगेपर्यंत,
हे देवा, मला सोडू नको.
19 हे देवा, तुझे नितिमत्व खूप उंच आहे;
हे देवा, ज्या तू महान गोष्टी केल्या आहेस, त्या तुझ्यासारखा कोण आहे?
20 ज्या तू मला अनेक भयंकर संकटे दाखवली,
तो तू मला पुन्हा जिवंत करशील;
आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील.
21 तू माझा सन्मान वाढव;
आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर.
22 मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन,
हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन;
हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू,
मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन.
23 मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने
आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील.
24 माझी जीभदेखील दिवसभर तुझ्या नितिमत्वाविषयी बोलेल;
कारण ज्यांनी मला इजा करण्याचा प्रयत्न केला ते लज्जित झाले आहेत, आणि गोंधळून गेले आहेत.
Chapter 72
नीतिमान राजाची कारकीर्द
1 हे देवा, तू राजाला आपले न्यायाचे निर्णय,
राजाच्या मुलाला आपले न्यायीपण दे.
2 तुझ्या लोकांचा नितिने न्याय करो,
आणि तुझ्या गरीब लोकांचा न्यायनिवाडा न्यायाने करो.
3 पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील;
टेकड्या न्यायीपणा उत्पन्न करतील.
4 तो लोकांतील गरीबांचा न्याय करील;
गरजवंताच्या मुलांना तारील,
आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील.
5 जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे,
तोपर्यंत सर्व पिढ्यानपिढ्या ते तुझा आदर करतील.
6 जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो,
तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल.
7 त्याच्या दिवसात नितिमानाची भरभराट होवो,
आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती होईल.
8 समुद्रापासून समुद्रापर्यंत
आणि त्या नदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो.
9 अरण्यात राहणारे [1] त्याच्यासमोर नमन करोत;
त्याचे शत्रू धूळ चाटोत.
10 तार्शीश आणि बेटांचे राजे खंडणी देवोत;
शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणोत.
11 खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत;
सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत;
12 कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला,
आणि गरीबाला दुसरा कोणी मदतनीस नाही त्यास मदत केली आहे.
13 तो गरीब आणि गरजवंतांवर दया करील,
आणि गरजवंताचा जीव तो तारील.
14 तो त्यांचा जुलूम आणि हिंसाचारापासून त्यांचा जीव खंडून घेईल,
आणि त्यांचे रक्त त्याच्या दृष्टीने मौलवान आहे.
15 राजा जगेल, त्यास शबाचे सोने दिले जावो.
लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करो;
देव त्यास दिवसभर आशीर्वाद देवो.
16 तेथे पृथ्वीत पर्वत कळसावर विपुल धान्य येवो;
तिचे पीक लबानोन झाडासारखे वाऱ्याच्या झुळकेने डुलोत
आणि नगरातले लोक पृथ्वीच्या गवतासारखी भरभराटीस येवो.
17 राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो;
सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो;
त्याच्यात लोक आशीर्वादित होतील;
सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील.
18 परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो,
तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो.
19 त्याचे गौरवशाली नाव सर्वकाळ धन्यवादित असो
आणि सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जावो. आमेन आणि आमेन.
20 इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.
Chapter 73
शत्रूचा शेवट
आसाफाचे स्तोत्र1 खात्रीने देव इस्राएलास चांगला आहे,
जे अंतःकरणाने शुद्ध आहेत.
2 पण माझ्यासाठी जसे माझे पाय बहुतेक निसटणार होते;
माझे पाय बहुतेक माझ्या खालून निसटणार होते.
3 कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला
तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला.
4 कारण त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना वेदना होत नाही,
पण ते बलवान आणि चांगले पुष्ट असतात.
5 दुसऱ्या मनुष्याच्या भारापासून मुक्त असतात;
ते दुसऱ्या मनुष्यासारखे जुलूमात नसतात.
6 अभिमानाने ते त्यांच्या गळ्याभोवती असलेल्या हाराप्रमाणे आपल्याला सुशोभित करतात;
झग्यासारखा ते हिंसाचाराचे वस्र घालतात.
7 अंधत्वातून असे पाप बाहेर येते;
वाईट विचार त्यांच्या अंतःकरणातून निघतात.
8 ते माझी चेष्टा करून वाईट गोष्टी बोलतात;
ते गर्वाने हिंसाचाराची धमकी देतात.
9 ते आकाशाविरूद्ध बोलतात,
आणि त्यांची जीभ पृथ्वीतून भटकते.
10 म्हणून देवाचे लोक त्यांच्याकडे वळतात
आणि त्यांच्या वचनातले पाणी भरपूर पितात.
11 ते म्हणतात, “देवाला हे कसे माहित होणार?
काय चालले आहे ते देवाला कसे कळते?”
12 पाहा हे लक्षात घ्या, हे लोक दुष्ट आहेत;
ते नेहमी चिंतामुक्त असून धनवान झाले आहेत.
13 खचित मी आपले हृदय जपले,
आणि आपले हात निरागसतेत धुतले हे व्यर्थ आहे.
14 कारण दिवसभर मी पीडला जातो
आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते.
15 जर मी म्हणालो असतो की, मी या गोष्टी बोलेन,
तर मी या पिढीच्या तुझ्या मुलांचा विश्वासघात केला असता.
16 तरी या गोष्टी मी समजण्याचा प्रयत्न केला,
पण त्या माझ्यासाठी खूप कठीण होत्या.
17 मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो,
आणि नंतर त्यांच्या भवितव्याचा शेवट मला समजून आला.
18 खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो;
त्यांना तू खाली नाशात पाडतोस.
19 कसे अचानक ते उध्वस्त झाले.
आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले.
20 जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते;
तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील.
21 कारण माझे हृदय दुःखीत झाले होते,
आणि मी खोलवर घायाळ झालो.
22 मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती;
मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो.
23 तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे;
तू माझा उजवा हात धरला आहे.
24 तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील
आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील.
25 स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे?
पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही?
26 माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत,
पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य [1] आहे.
27 जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल;
जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील.
28 पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे.
मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे.
मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन.
Chapter 74
देवाच्या प्रजेच्या शत्रूंविषयी गाऱ्हाणे
आसाफाचे स्तोत्र1 हे देवा, तू आम्हास सर्वकाळ का सोडून दिले आहेस?
आपल्या कुरणातील कळपांवर तुझा कोपाग्नि का भडकत आहे?
2 तू प्राचीनकाळी जी मंडळी विकत घेतली,
जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडविले तिचे,
व ज्या सीयोन पर्वतावर तू वस्ती केली त्याची आठवण कर.
3 पूर्णपणे विध्वंस झालेल्याकडे या,
शत्रूने सर्व पवित्रस्थानाचे कसे नुकसान केले आहे ते पहा.
4 तुझ्या सभास्थानात तुझे शत्रू गर्जना करीत आहेत;
त्यांनी युद्धाची झेंडे उभारले आहेत.
5 जसे दाट झाडीवर कुऱ्हाडीने छिन्नविछीन्न करणाऱ्या
मनुष्याप्रमाणे ते त्यांना दिसले.
6 त्यांनी कुऱ्हाडीने आणि हातोडीने
सर्व कोरीव काम तोडून आणि फोडून टाकले.
7 त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला आग लावली;
जेथे तू राहतो त्याचे पावित्र्य भ्रष्ट केले, धुळीस मिळविले.
8 ते आपल्या अंतःकरणात म्हणाले, आपण ह्यांचा नायनाट करून टाकू.
त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत.
9 आम्हास देवाकडून कोणतेही चिन्ह मिळाले नाही, कोणी संदेष्टा उरला नाही;
असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.
10 हे देवा, शत्रू किती वेळ माझा अपमान करील?
शत्रू तुझ्या नावाची निंदा सर्वकाळ करणार काय?
11 तू आपला हात, आपला उजवा हात का मागे आवरून धरतोस?
तू आपला उजवा हात आपल्या अंगरख्यातून काढ आणि त्यांना नष्ट कर?
12 तरी देव, प्राचीन काळापासून माझा राजा आहे,
पृथ्वीवर तारणारा तो आहे.
13 तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागला;
तू समुद्रातील प्रचंड प्राण्यांची मस्तके पाण्यात फोडली.
14 तू लिव्याथानाचे [1] मस्तक ठेचले;
रानात राहणाऱ्यास तो खाऊ घातला.
15 तू झरे आणि प्रवाह फोडून उघडले;
तू वाहणाऱ्या नद्या कोरड्या केल्या.
16 दिवस तुझा आहे आणि रात्रही तुझीच आहे;
तू सूर्य आणि चंद्र त्यांच्या जागी ठेवले.
17 तू पृथ्वीच्या सर्व सीमा ठरविल्या आहेत;
तू उन्हाळा आणि हिवाळा केलास.
18 हे परमेश्वरा, वैऱ्याने तुझ्याकडे अपमान भिरकावला आहे;
आणि मूर्ख लोकांनी तुझ्या नावाची निंदा केली आहे त्याची आठवण कर
19 तू आपल्या कबुतराचा जीव वन्यपशूच्या स्वाधीन करू नकोस.
आपल्या दडपशाहीचे जिवन सर्वकाळ विसरू नकोस.
20 तू आपल्या कराराची आठवण कर,
कारण पृथ्वीवरील काळोखी प्रदेश पूर्ण हिंसाचाराची ठिकाणे आहेत.
21 दडपलेल्यास लज्जित होऊन मागे फिरू देऊ नको;
गरीब आणि दडपलेले तुझ्या नावाची स्तुती करोत.
22 हे देवा, ऊठ, आपल्या सन्मानाचे समर्थन स्वतःच कर;
मूर्ख दिवसभर तुझा अपमान करत आहे याची आठवण कर.
23 तुझ्या शत्रूंचा आवाज विसरू नको,
किंवा तुझा विरोध करणाऱ्यांचा गोंगाट एकसारखा वर चढत आहे.
Chapter 75
देव दुष्टाला खाली पाडतो व नीतिमानाला वर आणतो
आसाफाचे स्तोत्र1 हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो;
आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो;
लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात.
2 नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन.
3 जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत,
मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन.
4 मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका,
आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका.
5 विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका;
आपले डोके उंच करून बोलू नका.
6 विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून
किंवा रानातूनही येत नाही.
7 पण देव न्यायाधीश आहे;
तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो.
8 कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे,
त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो.
खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील.
9 पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन;
मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन.
10 तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे [1] तोडून टाकीन,
पण नितीमानाची शिंगे [2] उंच करीन.
Chapter 76
विजयी व न्यायी देव
मुख्य संगीतकारा साठी, तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र गीत.1 यहूदात देव कळाला आहे,
इस्राएलामध्ये त्याचे नाव थोर आहे.
2 शालेममध्ये [1] त्याचा मंडप आहे,
आणि सियोनेत त्याची गुहा आहे.
3 तेथे त्याने धनुष्य बाण, ढाली, तलवारी
आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत.
4 तू जेथे शत्रूंना ठार केलेस,
त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रकट करतोस.
5 जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत,
ते झोपी गेले आहेत,
सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत.
6 हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरोळीने,
रथ आणि घोडे दोन्हीपण झोपी गेलेत आहेत.
7 तू, होय तुच, ज्याचे भय धरावे असा आहेस.
असा कोण आहे कि तू रागावतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील?
8 तुझा न्याय आकाशातून आला,
आणि पृथ्वी भयभित व नि:शब्द झाली.
9 देवा, तू, पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारायला,
न्याय अमलांत आणण्यास उठला आहे.
10 खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल.
तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.
11 परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा,
ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या सभोवती आहात, त्यास भेटी आणा.
12 तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो.
पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे.
Chapter 77
देवाच्या महत्कृत्यांच्या स्मरणाने समाधान
आसाफाचे स्तोत्र1 मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन;
मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल.
2 माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले.
मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही.
माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.
3 मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो;
मी त्याबद्दल चिंतन करतो तसा मी क्षीण होतो.
4 तू माझे डोळे उघडे ठेवतोस;
मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही.
5 मी पूर्वीचे दिवस व पुरातन काळची वर्षे
याबद्दल मी विचार करतो.
6 रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते.
मी काळजीपूर्वक विचार करतो
आणि काय घडले हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
7 प्रभू सर्वकाळ आमचा नकार करील काय?
तो मला पुन्हा कधीच प्रसन्नता दाखवणार नाही का?
8 त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का?
त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या अयशस्वी होतील का?
9 देव दया करण्याचे विसरला का?
त्याच्या रागाने त्याचा कळवळा बंद केला आहे का?
10 मी म्हणालो, हे माझे दुःख आहे,
आमच्या प्रती परात्पराचा उजवा हात बदलला आहे
11 पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन;
मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन.
12 मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन,
आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.
13 हे देवा, तुझे मार्ग पवित्र [1] आहेत,
आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.
14 अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस.
तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे.
15 याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना,
आपल्या लोकांस आपल्या सामर्थ्याने विजय दिला आहेस.
16 हे देवा, जलाने तुला पाहिले,
जलांनी तुला पाहिले आणि ते घाबरले,
खोल जले कंपित झाली.
17 मेघांनी पाणी खाली ओतले;
आभाळ गडगडाटले;
तुझे बाणही चमकू लागले.
18 तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली;
विजांनी जग प्रकाशमय केले;
पृथ्वी कंपित झाली आणि थरथरली.
19 समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या,
पण तुझ्या पावलाचे ठसे कोठेही दिसले नाहीत.
20 मोशे आणि अहरोन याच्या हाताने
तू आपल्या लोकांस कळपाप्रमाणे नेलेस.
Chapter 78
एकनिष्ठपणे न वागणाऱ्यावरही देवाची कृपा
आसाफाचे स्तोत्र1 अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका,
माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या.
2 मी शहाणपणाचे गीत गाईन;
मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन.
3 ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या,
त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या.
4 त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही.
त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये,
त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
5 कारण त्याने याकोबात निर्बंध स्थापले
आणि इस्राएलासाठी नियमशास्त्र नेमले.
त्याने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या की,
त्यांनी त्या आपल्या मुलांना शिकवाव्या.
6 त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या,
त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या.
7 मग ते आपली आशा देवावर ठेवतील
आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत
परंतु त्याच्या आज्ञा पाळतील.
8 तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे
हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये,
त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही,
आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता.
9 एफ्राइमाचे वंशज धनुष्यासह सशस्र होती,
परंतु त्यांनी युद्धाच्यादिवशी पाठ फिरवली.
10 त्यांनी देवाबरोबर करार पाळला नाही,
आणि त्यांनी त्याचे नियमशास्त्र पाळण्याचे नाकारले.
11 ते त्याची कृत्ये
व त्याने दाखवलेली विस्मयकारक गोष्टी ते विसरले.
12 मिसर देशातल्या सोअन प्रांतात
त्यांच्या वडिलांच्या दृष्टीसमोर त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या.
13 त्याने समुद्र दुभागला आणि त्यांना पलिकडे नेले,
त्याने पाणी भिंतीसारखे उभे केले.
14 तो त्यांना दिवसा मेघ
व रात्रभर अग्नीच्या प्रकाशात मार्ग दाखवित घेऊन जात असे.
15 त्याने रानात खडक फोडला,
आणि समुद्राची खोली पुरे भरण्यापर्यंत त्यांना विपुल पाणी दिले.
16 त्याने खडकातून पाण्याचे प्रवाह
आणि नदीसारखे पाणी बाहेर वाहविले.
17 तरी ते त्याच्याविरुध्द पाप करितच राहिले.
रानात परात्पराविरूद्ध बंड केले.
18 नंतर त्यांनी आपली भूक तृप्त करण्यासाठी,
अन्न मागून आपल्या मनात देवाला आव्हान दिले.
19 ते देवाविरूद्ध बोलले,
ते म्हणाले, ‘देव खरोखर आम्हास रानात भोजन देऊ शकेल का?’
20 पहा, त्याने खडकावर प्रहार केला तेव्हा पाणी उसळून बाहेर पडले,
आणि पाण्याचे प्रवाह भरून वाहू लागले.
पण भाकरही देऊ शकेल काय?
तो आपल्या लोकांसाठी मांसाचा पुरवठा करील काय?
21 जेव्हा परमेश्वराने हे ऐकले, तेव्हा तो रागावला;
म्हणून याकोबावर त्याचा अग्नि भडकला,
आणि त्याच्या रागाने इस्राएलवर हल्ला केला,
22 कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही,
आणि त्याच्या तारणावर भरवसा ठेवला नाही.
23 तरी त्याने वर आभाळाला आज्ञा दिली,
आणि आभाळाचे दरवाजे उघडले.
24 खाण्यासाठी त्याने त्यांच्यावर मान्नाचा वर्षाव केला,
आणि त्यांना आकाशातून धान्य दिले.
25 देवदूतांची भाकर लोकांनी खाल्ली.
त्याने त्यांना भरपूर अन्न पाठवून दिले.
26 त्याने आकाशात पूर्वेचा वारा वाहविला,
आणि त्याच्या सामर्थ्याने त्याने दक्षिणेच्या वाऱ्याला मार्ग दाखवला.
27 त्याने त्यांच्यावर धुळीप्रमाणे मांसाचा
आणि समुद्रातील वाळूप्रमाणे असंख्य पक्षांचा वर्षाव केला.
28 ते त्यांच्या छावणीच्यामध्ये पडले,
त्यांच्या तंबूच्या सर्व सभोवती पडले.
29 मग त्यांनी ते खाल्ले आणि तृप्त झाले. त्यांच्या हावेप्रमाणे त्याने त्यांना दिले.
30 पण अजून त्यांची तृप्ती झाली नव्हती;
त्यांचे अन्न त्यांच्या तोडांतच होते.
31 त्याच क्षणाला, देवाच्या कोपाने त्याच्यावर हल्ला केला,
आणि त्यांच्यातील बलवानास मारून टाकले.
त्याने इस्राएलाच्या तरुणास हाणून पाडले.
32 इतके झाले तरी ते पाप करितच राहीले,
आणि त्यांनी त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांवर विश्वास ठेवला नाही.
33 म्हणून देवाने त्यांचे दिवस थोडके केले;
त्यांचे आयुष्य भयानक भयात संपवले.
34 जेव्हा कधी देवाने त्यांना पीडिले, तेव्हा त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली.
उत्सुकतेने ते त्याच्याकडे वळले.
35 देव आमचा खडक आहे,
आणि परात्पर देव आमचा सोडवणारा याची आठवण त्यांना झाली.
36 पण त्यांनी आपल्या मुखाने त्याची खोटी स्तुती केली
आणि आपल्या जीभेने त्याच्याजवळ लबाडी केली.
37 कारण त्यांचे मन त्यांच्याठायी स्थिर नव्हते,
आणि ते त्याच्या कराराशी एकनिष्ठ नव्हते.
38 परंतु तो दयाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि त्याने त्यांचा नाश केला नाही.
होय, तो अनेक वेळा आपला राग आवरून धरतो,
आणि आपला सर्व राग भडकू देत नाही.
39 ती केवळ देह आहेत,
वारा वाहून निघून जातो आणि तो परत येत नाही याची त्याने आठवण केली.
40 त्यांनी किती वेळा रानात त्याच्याविरुध्द बंडखोरी केली,
आणि पडिक प्रदेशात त्यांनी त्यास दु:खी केले.
41 पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले,
आणि इस्राएलाच्या पवित्र प्रभूला खूप दु:खविले.
42 त्यांनी त्याच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही,
त्याने त्यांना शत्रूपासून कसे सोडवले होते.
43 मिसरात जेव्हा त्याने आपली घाबरून सोडणारी चिन्हे
आणि सोअनाच्या प्रांतात आपले चमत्कारही दाखविले ते विसरले.
44 त्याने मिसऱ्यांच्या नद्यांचे रक्तात रुपांतर केले.
म्हणून त्याच्या प्रवाहातील पाणी त्यांच्याने पिववेना.
45 त्याने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले त्यांनी त्यांना खाऊन टाकले,
आणि बेडकांनी त्यांचा देश आच्छादला.
46 त्याने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली
आणि त्यांच्या श्रमाचे फळ टोळाला दिले.
47 त्याने गारांनी त्यांच्या द्राक्षवेलींचा
आणि त्यांच्या उंबराच्या झाडांचा नाश बर्फाने केला.
48 त्याने त्यांची गुरेढोरे गारांच्या
व त्यांचे कळप विजांच्या हवाली केली.
49 त्यांने आपल्या भयंकर रागाने त्यांच्याविरुद्ध तडाखे दिले.
त्याने अरिष्ट आणणाऱ्या प्रतिनीधीप्रमाणे आपला क्रोध, प्रकोप आणि संकट पाठवले.
50 त्याने आपल्या रागासाठी मार्ग सपाट केला;
त्याने त्यांना मरणापासून वाचविले नाही
पण त्याने त्यांना मरीच्या हवाली केले.
51 त्याने मिसरमध्ये प्रथम जन्मलेले सर्व,
हामाच्या तंबूतील [1] त्यांच्या शक्तीचे प्रथम जन्मलेले मारून टाकले.
52 त्याने आपल्या लोकांस मेंढरांसारखे बाहेर नेले
आणि त्याने त्याच्या कळपाप्रमाणे रानातून नेले.
53 त्याने त्यांना सुखरुप आणि न भीता मार्गदर्शन केले,
पण समुद्राने त्यांच्या शत्रूंना बुडवून टाकले.
54 आणि त्याने त्यास आपल्या पवित्र देशात,
हा जो पर्वत आपल्या उजव्या हाताने मिळवला त्याकडे आणले.
55 त्याने त्यांच्यापुढून राष्ट्रांना हाकलून लावली,
आणि त्यांना त्यांची वतने सूत्राने मापून नेमून दिली; आणि त्यांच्या तंबूत इस्राएलाचे वंश वसविले.
56 तरी त्यांनी परात्पर देवाला आव्हान दिले आणि त्याच्याविरुध्द बंडखोरी केली,
आणि त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
57 ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्ये केली;
फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते.
58 कारण त्यांनी आपल्या उंच जागा बांधल्या आणि देवाला क्रोधित केले
आणि आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्यास आवेशाने कोपविले.
59 जेव्हा देवाने हे ऐकले, तो रागावला,
आणि त्याने इस्राएलाला पूर्णपणे झिडकारले.
60 त्याने शिलोतले [2] पवित्रस्थान सोडून दिले,
ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता.
61 त्याने आपल्या सामर्थ्याचा कोश बंदिवासात जाण्याची परवानगी दिली,
आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले.
62 त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले,
आणि आपल्या वतनावर तो रागावला.
63 अग्नीने त्यांच्या तरुण मनुष्यास खाऊन टाकले,
आणि त्यांच्या तरुण स्रीयांना लग्नगीते लाभली नाहीत.
64 त्यांचे याजक तलवारीने पडले,
आणि त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.
65 मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला,
द्राक्षारसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला.
66 त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले;
त्याने त्यांची कायमची नामुष्की केली.
67 त्याने योसेफाचा तंबू नाकारला,
आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही.
68 त्याने यहूदाच्या वंशाला निवडले,
आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.
69 उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या
पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.
70 त्याने आपला सेवक दावीदाला निवडले,
आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.
71 आपले लोक याकोब व आपले वतन इस्राएल यांचे पालन
करण्यास त्याने त्यास दुभत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले.
72 दावीदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले,
आणि आपल्या हातच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला.
Chapter 79
येरुशलेमेच्या नाशामुळे विलाप
आसाफाचे स्तोत्र1 हे देवा, परकी राष्ट्रे तुझ्या वतनात शिरली आहेत;
त्यांनी तुझे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे;
त्यांनी यरुशलेमेचे ढिगारे केले आहेत.
2 त्यांनी तुझ्या सेवकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना,
व पृथ्वीवरील पशूंना तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मांस खाण्यासाठी दिले आहे.
3 त्यांनी यरुशलेमेभोवती पाण्यासारखे रक्ताचे पाट वाहविले आहेत;
आणि त्यांना पुरण्यास कोणी राहिले नव्हते.
4 आम्ही आमच्या शेजाऱ्यांस निंदास्पद,
आमच्या भोवतालच्या लोकांस थट्टा आणि उपहास असे झालो आहोत.
5 हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? सर्वकाळपर्यंत तू रागावलेला राहशील का?
तुझी ईर्षा अग्नीसारखी कोठपर्यंत जळत राहील?
6 जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, जी राज्ये तुझ्या नावाने धावा करीत नाहीत,
त्यांच्यावर तू आपला क्रोध ओत.
7 कारण त्यांनी याकोबाला खाऊन टाकले आहे,
आणि त्यांनी त्याच्या खेड्यांचा नाश केला आहे.
8 आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस.
तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो,
कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे.
9 हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर;
आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर.
10 ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे?
तुझ्या सेवकांचे जे रक्त पाडले गेले,
त्याबद्दलचा सूड उगविण्यात आला आहे हे आमच्या देखत राष्ट्रांमध्ये कळावे.
11 कैद्यांचे कण्हणे तुझ्या कानी येऊ दे;
ज्या मुलांना मारण्यासाठी नेमले आहे त्यांना आपल्या महान सामर्थ्याने जिवंत ठेव.
12 हे प्रभू, आमच्या शेजारी राष्ट्रांनी ज्या अपमानाने तुला अपमानीत केले
त्यांच्या पदरी तो उलट सात पटीने घाल.
13 मग आम्ही तुझे लोक आणि तुझ्या कळपातील मेंढरे ते
आम्ही सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ.
आम्ही सर्व पिढ्यानपिढ्या तुझी स्तुती वर्णीत जाऊ.
Chapter 80
इस्त्राएल लोकांस परत आणण्यासाठी काकळूता
आसाफाचे स्तोत्र1 हे इस्राएलाच्या मेंढपाळा,
जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवितोस तो तू लक्ष दे.
जो तू करूबांच्यावर बसतोस, आम्हावर प्रकाश पाड.
2 एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर तू आपल्या सामर्थ्याने खळबळ उडव;
ये व आम्हास वाचव.
3 हे देवा, तू आमचा पुन्हा स्वीकार कर;
आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्ही वाचू.
4 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा,
तुझे लोक प्रार्थना करीत असता तू किती वेळ कोपलेला राहशील?
5 तू त्यांना अश्रूंची भाकर खावयास दिली आहे.
आणि मोठ्या प्रमाणात आसवे पिण्यास दिली आहेत.
6 तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त करतोस,
आणि आमचे शत्रू आपसात आम्हास हसतात.
7 हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव.
8 मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला;
राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला.
9 तू त्याकरता जागा तयार केली;
त्याने मूळ धरले आणि देश भरून टाकला.
10 त्याच्या सावलीने पर्वत,
त्याच्या फांद्यांनी देवाचे उच्च गंधसरू आच्छादून टाकले.
11 त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत
आणि आपले कोंब फरात नदीपर्यंत पाठविले.
12 तू त्यांची कुंपणे कां मोडली?
त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात.
13 रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात.
आणि रानटी पशू त्यास खाऊन टाकतात.
14 हे सेनाधीश देवा, तू मागे फिर;
स्वर्गातून खाली बघ आणि लक्ष पुरव आणि या द्राक्षवेलीची काळजी घे.
15 हे मूळ तू आपल्या उजव्या हाताने लाविले आहे,
जो कोंब तू आपणासाठी सबळ केला आहे त्याचे रक्षण कर.
16 ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे;
तुझ्या मुखाच्या धमकीने तुझे शत्रू नष्ट होतात.
17 तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर,
तू आपल्यासाठी बलवान केलेल्या मानवपुत्रावर तुझा हात राहो;
18 मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही;
तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
19 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हास परत आण.
आमच्यावर आपला मुखप्रकाश पाड आणि आमचा बचाव होईल.
Chapter 81
देवाचा चांगुलपणा व इस्त्राएलाचा बंडखोरपणा
आसाफाचे स्तोत्र1 देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा;
याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा.
2 गाणे गा आणि डफ वाजवा,
मंजुळ वीणा व सतार वाजवा.
3 नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस,
आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
4 कारण हा इस्राएलासाठी नियम आहे.
हा याकोबाच्या देवाने दिलेला विधी आहे.
5 जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला,
तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला.
तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली.
6 मी त्याच्या खांद्यावरचे ओझे काढून टाकले आहे;
टोपली धरण्यापासून त्याचे हात मोकळे केले आहेत.
7 तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली;
मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले;
मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.
8 अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हास सूचना देतो,
हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल.
9 तुझ्यामध्ये परके देव नसावेत;
तू कोणत्याही परक्या देवाची उपासना करू नकोस.
10 मीच तुझा देव परमेश्वर आहे,
मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले.
तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन.
11 परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही;
इस्राएलाने माझी आज्ञा पाळली नाही.
12 म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले,
अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे.
13 अहा, जर माझे लोक माझे ऐकतील;
अहा, जर माझे लोक माझ्या मार्गाने चालतील तर बरे होईल!
14 मग मी त्यांच्या शत्रूंचा त्वरेने पराभव करीन
आणि अत्याचार करणाऱ्याविरूद्ध आपला हात फिरवीन.
15 परमेश्वराचा द्वेष करणारे भितीने त्याच्यापुढे दबून जातील.
ते सर्वकाळ अपमानीत राहतील.
16 मी इस्राएलास उत्तम गहू खाण्यास देईन;
मी तुला खडकातल्या मधाने तृप्त करीन.
Chapter 82
विपरीत न्यायाला दूषण देणे
आसाफाचे स्तोत्र1 देव दैवी मंडळीत उभा आहे,
तो देवांच्यामध्ये [1] न्याय देतो.
2 कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल?
आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?
3 गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे;
त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.
4 त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
5 “ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत;
ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात;
पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”
6 मी म्हणालो, “तुम्ही देव आहात,
आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”
7 तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल,
आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.
8 हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर,
कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.
Chapter 83
इस्त्राएलाच्या शत्रूंच्या नाशासाठी प्रार्थना
आसाफाचे स्तोत्र1 हे देवा, गप्प राहू नकोस.
हे देवा, आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि स्वस्थ राहू नकोस.
2 पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत,
आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे.
3 ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात.
आणि ते एकत्र मिळून तुझ्या आश्रितांविरूद्ध योजना करतात.
4 ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू.
यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणित राहणार नाही.
5 त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे,
ते तुझ्याविरूद्ध करार करतात.
6 ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,
7 गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.
8 अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे;
ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत.
9 तू जसे मिद्यानाला,
सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर.
10 ते एन-दोर येथे नष्ट झाले,
आणि ते भूमीला खत झाले.
11 तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर,
जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.
12 ते म्हणाले, देवाची निवासस्थाने
आपण आपल्या ताब्यात घेऊ.
13 हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे,
वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.
14 अग्नी जसा वनाला जाळतो,
व ज्वाला जशी डोंगराला पेटवते.
15 तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर,
आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.
16 हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर
यासाठी की, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा.
17 ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत;
ते लज्जित होऊन नष्ट होवोत.
18 नंतर तू, मात्र तूच परमेश्वर,
या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल.
Chapter 84
देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ
कोरहाच्या मुलांची स्तोत्रे1 हे सेनाधीश परमेश्वरा,
तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे.
2 माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे;
माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारित आहे.
3 हे सेनाधीश परमेश्वरा,
माझ्या राजा, माझ्या देवा,
तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर
आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे.
4 जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत;
ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील.
5 ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे,
ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे.
6 शोकाच्या खोऱ्यातून जाताना, त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात.
आगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो.
7 ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात;
त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते.
8 हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक;
याकोबाच्या देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक.
9 हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर,
तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव.
10 तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे;
दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे.
11 कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे;
परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो;
जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.
12 हे सेनाधीश परमेश्वरा,
जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.
Chapter 85
देवाने इस्त्राएलावर दया करावी म्हणून प्रार्थना
कोरहाच्या मुलांची स्तोत्रे1 हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस;
तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
2 तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस.
तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.
3 तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे;
आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस.
4 हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण,
आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.
5 सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का?
पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?
6 तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा,
म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?
7 हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे;
तू कबूल केलेले तारण आम्हास दे.
8 परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन.
कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल,
तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.
9 खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे;
यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
10 दया व सत्य एकत्र मिळाली आहेत;
निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
11 पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे,
आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे.
12 जे उत्तम ते परमेश्वर देईल,
आणि आमची भूमी आपले पिक देईल.
13 त्याच्यासमोर नितीमत्व चालेल,
आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.
Chapter 86
देवाने सर्वदा दया करावी म्हणून प्रार्थना
दाविदाची प्रार्थना1 हे परमेश्वरा, माझे ऐक, आणि मला उत्तर दे,
कारण मी दीन आणि दरिद्री आहे.
2 माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे;
हे माझ्या देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सेवकाचे रक्षण कर.
3 हे प्रभू, माझ्यावर दया कर,
कारण मी दिवसभर तुला हाक मारतो.
4 हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर,
कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो.
5 हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस,
आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस.
6 हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे;
माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे.
7 हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन,
कारण तू मला उत्तर देशील.
8 हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही.
तुझ्या कृत्यासारखी कोणीतीही कृत्ये नाहीत.
9 हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील.
ते तुझ्या नावाला आदर देतील.
10 कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस;
तूच फक्त देव आहेस.
11 हे परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव, मग मी तुझ्या सत्यात चालेन.
तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.
12 हे प्रभू, माझ्या देवा, मी अगदी आपल्या मनापासून तुझी स्तुती करीन;
मी सर्वकाळ तुझ्या नावाचे गौरव करीन.
13 कारण माझ्यावर तुझी महान दया आहे;
तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस.
14 हे देवा, उद्धट लोक माझ्याविरूद्ध उठले आहेत.
हिंसाचारी लोकांची टोळी माझा जीव घेण्यास पाहत आहे.
त्यांना तुझ्यासाठी काही आदर नाही.
15 तरी हे प्रभू, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस.
मंदक्रोध, आणि दया व सत्य यामध्ये विपुल आहेस.
16 तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर;
तू आपल्या दासास आपले सामर्थ्य दे;
आपल्या दासीच्या मुलाचे तारण कर.
17 हे परमेश्वरा, तुझ्या अनुग्रहाचे चिन्ह दाखव.
कारण तू माझे साहाय्य व सांत्वन केले आहे.
मग माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पाहावे, आणि लज्जित व्हावे,
Chapter 87
सीयोनेत राहण्याचा मान
1 परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.
2 याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास
सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.
3 हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
4 राहाब [1] आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन.
पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच.
5 सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता;
आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
6 लोकांची नोंदणी करताना,
ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.
7 गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की,
माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”
Chapter 88
मृत्यूपासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना
कोरहाच्या मुलांची स्तोत्रे1 हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा,
मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.
2 माझी प्रार्थना ऐक;
माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
3 कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे,
आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे.
4 खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत;
मी असहाय्य मनुष्यासारखा आहे.
5 मला मृतामध्ये सोडून दिले आहे;
अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो,
ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस,
ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे.
6 तू मला त्या खड्यांतल्या खालच्या भागात,
काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस.
7 तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे,
आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत.
8 तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात.
त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे;
मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही.
9 कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत;
हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे.
मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे.
10 तू मृतांसाठी चमत्कार करशील काय?
जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय?
11 तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा
मृतांच्या जागी घोषणा होईल का?
12 तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात
किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय?
13 परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो;
सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.
14 हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास?
तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस?
15 मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे;
मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही.
16 तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे,
आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे.
17 त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे;
त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.
18 तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस.
माझा परिचयाचा केवळ काळोख आहे.
Chapter 89
देवाचा दाविदाशी करार
एथानाचे स्तोत्र1 मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन.
मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन.
2 कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल;
तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस.
3 मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे,
मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे.
4 मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन,
आणि तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन.
5 हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील,
तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्रजनांच्या मंडळीत होईल.
6 कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे?
देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे?
7 पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे;
आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भितीदायक आहे.
8 हे सेनाधीश देवा, परमेश्वरा,
हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे?
तुझी सत्यता तुझ्याभोवती आहे?
9 समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस;
जेव्हा त्याच्या लाटा उसळतात, तेव्हा तू त्यांना शांत करतोस.
10 तू राहाबाला [1] ठेचून त्याचा चुराडा केलास.
तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस.
11 आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे.
तू जग आणि त्यातले सर्वकाही निर्माण केलेस.
12 उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या.
ताबोर [2] आणि हर्मोन [3] तुझ्या नावाचा जयजयकार करतात.
13 तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे
व तुझा उजवा हात उंचावला आहे.
14 निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत.
कराराचा विश्वास आणि सत्य तुझ्यासमोर आहेत.
15 जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत.
हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
16 ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात,
आणि तुझ्या न्यायीपणाने ते तुला उंचावतात.
17 त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस,
आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत.
18 कारण आमची ढाल परमेश्वराची आहे;
इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.
19 पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास;
तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे;
लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.
20 मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे;
मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.
21 माझा हात त्यास आधार देईल;
माझा बाहू त्यास बलवान करील.
22 कोणी शत्रू त्यास फसवणार नाही.
दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत.
23 मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन;
जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन.
24 माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील;
माझ्या नावाने ते विजयी होतील.
25 मी त्याचा हात समुद्रावर
आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
26 तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता,
माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.
27 आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन,
पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.
28 मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील,
आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.
29 त्याचे वंश सर्वकाळ राहील,
आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.
30 जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले
आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.
31 जर त्यांनी माझे नियम मोडले
आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
32 मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने,
आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.
33 परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही;
मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.
34 मी माझा करार मोडणार नाही,
किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.
35 एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे,
आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.
36 त्याची संतती सर्वकाळ राहील,
आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.
37 ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल.
आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.
38 पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास,
तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.
39 तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास.
तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.
40 तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास.
तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
41 सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात.
तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे.
42 तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे.
तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस.
43 तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे.
आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस.
44 तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला;
तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस.
45 तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत.
तू त्यास लज्जेने झाकले आहेस.
46 हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय?
तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल?
47 माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर,
तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय?
48 कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही
किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील?
49 हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली,
ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत?
50 हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे;
आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण.
51 हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात;
ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात.
52 परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो.
आमेन आणि आमेन.
Chapter 90
देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता
मोशेचे स्तोत्र1 हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या [1]
आमचे निवासस्थान आहेस.
2 पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी
किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच,
अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
3 तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस,
आणि तू म्हणतोस, ‘अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.’
4 कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने,
कालच्या गेलेल्या दिवसासारखी,
रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
5 पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत,
सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.
6 सकाळी ते उगवते आणि वाढते;
संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.
7 खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो,
आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.
8 तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत.
आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे.
9 तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते;
आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात.
10 आमचे आयुष्य [2] सत्तर वर्षे आहे;
किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे;
पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे.
होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.
11 तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे;
तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?
12 म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे
मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
13 हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील?
तुझ्या सेवकावर दया कर.
14 तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर
म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.
15 जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने
आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर.
16 तुझी कृती तुझ्या सेवकांना,
तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे.
17 प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो.
आमच्या हातच्या कामाला उन्नती दे;
खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.
Chapter 91
सर्वसामर्थ्याच्या पंखांखाली आश्रय
1 जो परात्पराच्या आश्रयात राहतो,
तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
2 मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे,
माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.”
3 कारण तो तुला पारध्याच्या पाशातून
आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.
4 तो तुला आपल्या पंखानी झाकील,
आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल.
त्याचे सत्य ढाल व कवच आहे.
5 रात्रीच्या दहशतीचे भय,
किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला,
6 किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला
किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस.
7 तुझ्या एका बाजूला हजार पडले,
आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले,
पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही.
8 तू मात्र निरीक्षण करशील,
आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील.
9 कारण परमेश्वर माझा आश्रय आहे
असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस.
10 तुमच्यावर वाईट मात करणार नाही.
तुमच्या घराजवळ कोणतीही पिडा येणार नाही.
11 कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची,
तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
12 ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील
अशासाठी की, तू घसरून दगडावर पडू नये.
13 तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील;
तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील.
14 तो माझ्याशी निष्ठावान आहे, म्हणून मी त्यास सोडवीन;
मी त्यास सुरक्षित ठेवीन कारण तो माझ्याशी प्रामाणिक आहे.
15 जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन;
संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन;
मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन.
16 मी त्यास दीर्घायुष्य देईन,
आणि त्यास माझे तारण दाखवीन.
Chapter 92
देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती
शब्बाथ दिवसाचे स्तोत्र1 परमेश्वराची उपकारस्तुती करणे
आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे.
2 सकाळी तुझे वात्सल्य,
आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे.
3 दहा तारांचे वाद्य, वीणेवर
आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे.
4 कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे.
तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन.
5 हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत,
तुझे विचार फार गहन आहेत.
6 पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत,
किंवा मूर्खाला ती समजत नाहीत,
7 दुष्ट गवताप्रमाणे उगवले,
आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले;
तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे.
8 परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील.
9 हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा;
सर्व वाईट करणारे विखरले आहेत.
10 पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस;
मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.
11 माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे;
जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.
12 नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल,
तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.
13 जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत;
ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील.
14 वृद्धपणातही ते फळ देत राहतील;
ते टवटवीत आणि हिरवे राहतील.
15 हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे;
तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.
Chapter 93
परमेश्वराचे माहत्म्य
1 परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे;
परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे.
जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
2 तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे;
तू सर्वकाळापासून आहेस.
3 हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे;
आपला आवाज उंचावला आहे,
महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात.
4 बहुत जलांच्या, महासागराच्या प्रचंड
लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला
परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.
5 तुझे नियम अतिसत्य आहेत;
हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता
सदासर्वकाळ शोभते.
Chapter 94
दुर्जनाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना
1 हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे,
तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज [1] प्रगट कर.
2 पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ,
गर्विष्ठांना त्यांचे उचित प्रतिफल दे.
3 हे परमेश्वरा, दुष्ट किती काळ,
दुष्ट किती काळ विजयोत्सव करतील?
4 ते बडबड करतात आणि उर्मटपणे बोलतात
आणि फुशारकी मारतात.
5 हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांस चिरडतात;
जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात.
6 ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात,
आणि ते अनाथांचा खून करतात.
7 ते म्हणतात की, परमेश्वर बघणार नाही,
याकोबाचा देव लक्ष देत नाही.
8 अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या;
मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात?
9 ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय?
ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय?
10 जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो.
तो अज्ञानी असणार का?
11 परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो,
ते भ्रष्ट आहेत.
12 हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस,
ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
13 दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत,
तू त्यास संकटसमयी विसावा देशील.
14 कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही.
15 कारण न्याय नितीमानाकडे वळेल;
आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील.
16 माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल?
अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल?
17 जर परमेश्वराने मला मदत केली नसती,
तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता.
18 जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे,
तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.
19 जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.
20 जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट
योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय?
21 ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात,
आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;
22 परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे,
आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे.
23 त्याने त्यांचा अन्याय त्यांच्यावरच आणला आहे;
आणि त्यांच्याच दुष्टपणात तो त्यांना नाहीसे करील.
आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.
Chapter 95
उपकारस्मरणाचे गीत
1 याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू;
आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू.
2 उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू;
स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
3 कराण परमेश्वर महान देव आहे
आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.
4 त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत;
पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
5 समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला,
आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली.
6 याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू,
त्याची उपासना करू, त्यास नमन करू;
7 कारण तो आपला देव आहे,
आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत.
आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.
8 मरीबा [1] येथल्याप्रमाणे किंवा मस्सा [2] च्या दिवशी रानात केले
तसे आपली मने कठीण करू नका,
9 तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले,
आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली.
10 चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो,
आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत;
त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत [3] .
11 म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की,
हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.
Chapter 96
उपकारस्तुतीचे गीत
1इति. 16:23-33
1 अहो, परमेश्वरास नवीन गीत गा;
हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
2 परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या;
दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.
3 राष्ट्रात त्याचे गौरव,
त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.
4 कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे.
सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.
5 कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.
6 वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत.
सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.
7 अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा;
परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा.
8 परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा.
अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
9 पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा.
हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
10 राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो.
जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे.
तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
11 आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो;
समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत.
12 शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत.
मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील.
13 सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे;
पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे;
तो न्यायीपणाने जगाचा
व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.
Chapter 97
देवाचे राज्य व सामर्थ्य
1 परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो.
अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.
2 ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत.
निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत [1] .
3 अग्नी त्याच्यापुढे चालतो,
आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो.
4 त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले;
पृथ्वी हे पाहून थरथर कापली.
5 परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर
पर्वत मेणासारखे वितळले.
6 आकाशाने, त्याचा न्याय जाहीर केला,
आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले.
7 जे कोरीव मूर्तीची पूजा करतात,
जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले.
अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा.
8 सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली,
कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे
यहूदाच्या नगरांनी आनंद केला.
9 कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस.
तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस.
10 जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा,
तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो,
आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो.
11 नितीमानासाठी प्रकाश
आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
12 अहो नितीमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा.
त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.
Chapter 98
देवाच्या नीतिमत्त्वाबद्दल स्तुती
1 परमेश्वरास नवीन गीत गा,
कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत;
त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.
2 परमेश्वराने आपले तारण कळवले आहे;
त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे.
3 त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली;
पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
4 अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा;
उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा.
5 परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा,
वीणेवर मधुर स्वराने गायन करा.
6 कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने,
परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा.
7 समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत,
जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत.
8 नद्या टाळ्या वाजवोत,
आणि पर्वत हर्षनाद करोत.
9 परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे;
तो न्यायीपणाने जगाचा
आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.
Chapter 99
परमेश्वर इस्त्राएलाशी विश्वासू आहे
1 परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत.
तो करूबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो.
2 सियोनात परमेश्वर महान आहे;
तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे.
3 ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत.
तो पवित्र आहे.
4 राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे.
तू सरळपणा स्थापिला आहे;
तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस.
5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा
आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा.
तो पवित्र आहे.
6 त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते,
आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता.
त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7 तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला.
त्यांनी त्याच्या आज्ञा
आणि त्याचे नियम पाळले.
8 हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस.
तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस
तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास.
9 परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा,
आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा,
कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.
Chapter 100
उपकारस्तुती करण्याचा आदेश
1 हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा.
2 परमेश्वराची सेवा आनंदाने करा.
त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या.
3 परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या.
त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत.
आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत.
4 त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात,
आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा.
त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
5 कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे,
आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे.
Chapter 101
नीतीने वागण्याची प्रतिज्ञा
दाविदाचे स्तोत्र1 मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन;
हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन;
2 मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन.
अहा, तू माझ्याकडे कधी येशील?
मी माझ्या घरात सचोटीने चालेन.
3 मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही;
अनाचाराचा मी द्वेष करतो;
तो मला बिलगणार नाही.
4 हेकेखोर लोक मला सोडतील;
मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही.
5 आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन.
जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही.
6 देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील;
जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.
7 कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत;
लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.
8 देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन;
वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन.
Chapter 102
विपत्तीत धावा
परमेश्वराजवळ प्रार्थना1 हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक;
माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
2 मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस.
माझ्याकडे लक्ष दे.
जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे.
3 कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे,
आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत.
4 माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे.
मी जेवण खाण्यास असमर्थ आहे.
5 माझ्या सततच्या कण्हण्यामुळे,
मी फार क्षीण झालो आहे.
6 मी अरण्यातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे.
मी ओसाड ठिकाणातल्या गरुडाप्रमाणे झालो आहे.
7 मी जागरण करीत आहे;
धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे.
8 माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात;
ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात.
9 मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे,
आणि माझ्या पाण्यात माझे अश्रू मिसळले आहेत.
10 कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे,
तू मला वर उचलून घेऊन खाली फेकून दिलेस.
11 माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत,
आणि गवतासारखा मी कोमेजून गेलो आहे.
12 पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस,
आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील.
13 तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील.
तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे;
नेमलेला वेळ आला आहे.
14 कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात,
आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो.
15 हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील,
आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल,
आणि तो आपल्या गौरवाने प्रगट होईल.
17 आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल.
तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही.
18 पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल,
आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील.
19 कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहीले आहे.
परमेश्वराने स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहीले,
20 तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल,
ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली होती त्यास सोडविले.
21 नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील,
आणि यरुशलेमेत त्याची स्तुती करतील.
22 जेव्हा परमेश्वराची एकत्र सेवा करण्यासाठी
सगळी राष्ट्रे एकत्र येतील.
23 त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली.
त्याने माझे दिवस कमी केले.
24 मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस;
तू येथे सर्व पिढ्यानपिढ्यातून आहेस.
25 तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला;
आकाश तुझ्या हातचे कार्य आहे.
26 ते नाहीसे होईल, पण तू राहशील;
ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील;
कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील.
27 पण तू सारखाच आहे,
आणि तुझ्या वर्षांना अंत नाही.
28 तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील,
आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितित इथे राहतील.”
Chapter 103
देवाच्या उपकारांबद्दल धन्यवाद
दाविदाचे स्तोत्र1 हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
2 हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,
आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
3 तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो;
तो तुझे सर्व आजार बरे करतो.
4 तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो;
तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो.
5 तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो,
म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते.
6 जे सर्व अन्यायाने पीडलेले आहेत;
त्यांच्यासाठी परमेश्वर नितीचे आणि न्यायाची कृत्ये करतो.
7 त्याने मोशेला आपले मार्ग,
इस्राएल वंशजांना आपल्या कृत्यांची ओळख करून दिली.
8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे;
तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे.
9 तो नेहमीच शिक्षा करणार नाही;
तो नेहमीच रागावणार नाही.
10 तो आम्हाशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही
किंवा आमच्या पापाला साजेसे प्रतिफळ दिले नाही.
11 कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे,
तसे त्याचे जे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया आहे.
12 जसे पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे,
तसे त्याने आमच्या पापाचे दोष आम्हापासून काढून टाकले आहेत.
13 जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो,
तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो.
14 कारण आम्ही कसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो,
आम्ही धुळ आहोत हे त्यास माहित आहे.
15 मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत;
शेतातील फुलासारखा तो फुलतो.
16 वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते,
आणि कोणीही सांगू शकत नाही की, ते एकदा कोठे वाढत होते.
17 परंतु परमेश्वराची करार विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते.
त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो.
18 जे त्याचा करार पाळतात
आणि त्यांच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.
19 परमेश्वराने आपले सिंहासन स्वर्गात स्थापले आहे,
आणि त्याचे राज्य प्रत्येकावर सत्ता गाजवते.
20 अहो जे तुम्ही त्याचे दूत आहात,
ज्या तुम्हास महान सामर्थ्य आहे आणि जे त्याचे शब्द ऐकून,
त्याच्या आज्ञांचे आज्ञाधारकपणे पालन करता, ते तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
21 अहो परमेश्वराच्या, सर्व सैन्यांनो जे तुम्ही त्याचे सेवक आहात;
ते तुम्ही त्याची इच्छा सिद्धीस नेता ते तुम्ही धन्यवादित आहात.
22 परमेश्वराच्या राज्यातील सर्व ठिकाणातील,
त्याच्या सर्व प्राण्यांनो त्याचा धन्यवाद करा;
हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर.
Chapter 104
देव आपल्या निर्मितीची काळजी घेतो
उत्प. 1:1-31
1 हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर.
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस;
तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस.
2 जसे वस्राने तसे तू आपणाला प्रकाशाने झाकतोस;
तंबूच्या पडद्याप्रमाणे तू आकाश पसरतोस.
3 तू आपल्या खोल्यांच्या तुळ्या जलांमध्ये ठेवतो;
तू मेघांना आपले रथ करतोस;
तू वाऱ्यांच्या पंखावर चालतोस.
4 तू वाऱ्याला आपले दूत करतोस,
अग्नीच्या ज्वालांस आपले सेवक करतोस
5 त्याने पृथ्वीचा पाया घातला आहे,
आणि ती कधीही हलणार नाही.
6 तू पृथ्वीला वस्राप्रमाणे पाण्याने आच्छादिले आहेस;
पाण्याने पर्वत झाकले आहेत.
7 तुझ्या धमकीने पाणी मागे सरले आहे;
तुझ्या गर्जनेच्या आवाजाने ती पळाली.
8 ती पर्वतावरून जाऊन खाली दरितून वाहात गेली,
त्यांच्यासाठी नेमलेल्या जागी ती जाऊन राहिली.
9 तू त्यांना घालून दिलेल्या मर्यादा त्यांना ओलांडता येत नाही;
ते पृथ्वीला पुन्हा झाकून टाकणार नाहीत.
10 तो दऱ्यातून झरे वाहवितो;
डोंगरामधून प्रवाह वाहत जातात.
11 ते रानातल्या सर्व पशूंना पाणी पुरवितात;
रानगाढवे आपली तहान भागवितात.
12 नदीकिनारी पक्षी आपले घरटे बांधतात;
ते फांद्यामध्ये बसून गातात.
13 तो आपल्या वरच्या खोल्यातून पर्वतावर पाण्याचा वर्षाव करतो.
पृथ्वी त्याच्या श्रमाच्या फळाने भरली आहे.
14 तो गुरांढोरासाठी गवत उगवतो,
आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो;
यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे.
15 तो मनुष्यास आनंदित करणारा द्राक्षारस,
त्याचा चेहरा चमकविणारे तेल,
आणि त्याचे जीवन जिवंत ठेवणारे अन्नही त्याने उत्पन्न करावी.
16 परमेश्वराचे वृक्ष, जे लबानोनाचे गंधसरू
त्याने लावले आहेत, ते रसभरित आहेत;
17 तेथे पक्षी आपली घरटी बांधतात.
करकोचा देवदारूचे झाड तिचे घर करतो.
18 रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात;
खडक सशांचे आश्रयस्थान आहे.
19 त्याने ऋतुमान समजण्यासाठी चंद्र नेमला आहे;
सूर्याला त्याची मावळण्याची वेळ कळते.
20 तू रात्रीला काळोख करतोस,
तेव्हा जंगलातील सर्व जनावरे बाहेर येतात.
21 तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतात,
आणि देवाकडे आपले अन्न मागतात.
22 जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा ते परत जातात,
आणि आपल्या गुहेत झोपतात.
23 दरम्यान लोक आपल्या कामासाठी बाहेर जातात,
आणि ते संध्याकाळपर्यंत कष्ट करतात.
24 हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अधिक आणि किती विविध प्रकारची आहेत!
ती सर्व तुझ्या ज्ञानाने केली आहेत;
पृथ्वी तुझ्या समृद्धीने भरली आहे.
25 त्यावर हा समुद्र, खोल आणि अफाट आहे,
त्यामध्ये लहान व मोठे असंख्य प्राणी गजबजले आहेत.
26 तेथे त्यामध्ये जहाजे प्रवास करतात
आणि त्यामध्ये खेळण्यासाठी जो लिव्याथान तू निर्माण केला तोही तेथे आहे.
27 योग्य वेळी तू त्यांना त्यांचे अन्न द्यावे
म्हणून ते सर्व तुझ्याकडे पाहतात.
28 जेव्हा तू त्यांना देतोस, ते जमा करतात;
जेव्हा तू आपला हात उघडतोस तेव्हा त्यांची उत्तम पदार्थांनी तृप्ती होते.
29 जेव्हा तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकुळ होतात;
जर तू त्यांचा श्वास काढून घेतला, तर ते मरतात आणि परत मातीस मिळतात.
30 जेव्हा तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात,
आणि तू भूप्रदेश पुन्हा नवीन करतोस.
31 परमेश्वराचे वैभव सर्वकाळ राहो;
परमेश्वरास आपल्या निर्मितीत आनंद होवो.
32 तो पृथ्वीवर खाली बघतो आणि ती थरथर कापते;
तो पर्वताला स्पर्श करतो आणि ते धुमसतात.
33 मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन.
जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन.
34 माझे विचार त्यास गोड वाटो;
परमेश्वराजवळ मला आनंद होईल.
35 पृथ्वीवरून पापी नष्ट होवोत,
आणि दुष्ट आणखी न उरोत.
हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर.
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 105
इस्त्राएलासाठी देवाने केलेला चमत्कार
निर्ग. 7:8-10; 1इति. 16:8-22
1 परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या.
2 त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा;
त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला;
3 त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा.
जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो.
4 परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या.
त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या.
5 त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी,
त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो,
तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो,
7 तो परमेश्वर आपला देव आहे.
त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत.
8 तो आपला करार म्हणजे
हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो.
9 त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला.
आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली.
10 ही त्याने याकोबासाठी नियम,
आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला.
11 तो म्हणाला, “मी तुला कनान देश
तुझा वतनभाग असा म्हणून देईन.”
12 हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते,
होय फार थोडे, आणि देशात परके होते.
13 ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात,
आणि एका राज्यातून दुसऱ्यात गेले.
14 त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही;
त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली.
15 तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका,
आणि माझ्या संदेष्ट्यांची हानी करू नका.
16 त्याने त्या देशात दुष्काळ आणला.
त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला.
17 त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला;
योसेफ गुलाम म्हणून विकला गेला.
18 त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते;
त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या.
19 त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत,
परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले.
20 तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले;
लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले.
21 त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य,
आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले,
22 अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे,
आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे.
23 नंतर इस्राएल मिसरात आले,
आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला.
24 देवाने आपले लोक फारच वाढवले,
आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले.
25 आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा,
आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले.
26 त्याने आपला सेवक मोशे
आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले.
27 त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे,
हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली.
28 त्याने त्या देशात काळोख केला,
पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही.
29 त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले
आणि त्यांचे मासे मरण पावले.
30 त्यांचा देश बेडकांनी भरून गेला,
त्यांच्या अधिपतींच्या खोलितदेखील बेडूक होते.
31 तो बोलला, आणि गोमाशा व उवा
त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या.
32 त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने
गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला.
33 त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला.
त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली.
34 तो बोलला आणि टोळ आले.
असंख्य नाकतोडे आले.
35 टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ,
त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले;
36 त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले,
त्यांच्या सामर्थ्याचे सर्व प्रथमफळ ठार मारले.
37 त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले;
त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही.
38 ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला,
कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती.
39 त्याने आच्छादनासाठी ढग पसरला,
आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला.
40 इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले,
आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले.
41 त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले;
ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले.
42 कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची,
आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती.
43 त्याने आपल्या लोकांस आनंद करीत,
त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले.
44 त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले;
त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या.
45 ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम
आणि आपले नियमशास्त्र पाळावे.
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 106
इस्त्राएलाची बंडखोरी
1 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या.
कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते.
2 परमेश्वराच्या पराक्रमाची कृत्ये कोण कथन करू शकेल?
किंवा त्याची सर्व स्तुत्य कृत्ये कोण पूर्ण जाहीर करील?
3 जे काही योग्य आहे ते करतात
आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत.
4 हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर;
तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर.
5 मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा,
तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन,
आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन.
6 आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले;
आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली.
7 आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही;
त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वासनियतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले;
तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली.
8 तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले,
यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे.
9 त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला.
मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले.
10 त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातातून त्याने त्यास वाचवले,
आणि त्यांना त्यांच्या शत्रूंच्या शक्तीपासून सोडवले.
11 परंतु त्यांच्या शत्रूंना पाण्याने झाकून टाकले.
त्यापैकी एकही जण वाचला नाही.
12 नंतर त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला
आणि त्यांनी त्याची स्तुती गाइली.
13 परंतु ते लवकरच त्याने जे केले ते विसरले;
त्यांनी त्याच्या सूचनेची वाट पाहिली नाही.
14 रानात त्यांची अतृप्त हाव अनावर झाली,
आणि त्यांनी देवाला आव्हान दिले.
15 त्याने त्यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे दिले,
पण त्याने रोग पाठवला तो त्यांचे शरीर नष्ट करू लागला.
16 त्यांनी छावणीत मोशे
आणि परमेश्वराचा पवित्र याजक अहरोन यास चिडीस आणले.
17 जमीन दुभंगली आणि तिने दाथानाला गिळून टाकले,
आणि अबीरामाच्या अनुयांना झाकून टाकले.
18 त्यांच्यात अग्नीने पेट घेतला;
अग्नीने त्या दुष्टांना खाऊन टाकले.
19 त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले.
आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली.
20 त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या मूर्तीसाठी
आपल्या वैभवी देवाची अदलाबदल केली.
21 ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले,
ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती.
22 त्याने हामाच्या देशात आश्चर्यकारक गोष्टी केल्या
आणि लाल समुद्राजवळ पराक्रमी कृत्ये केली.
23 म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू.
जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला,
त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते.
24 नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला;
त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही,
25 पण आपल्या तंबूत त्यांनी कुरकुर केली,
आणि परमेश्वराचा शब्द मानिला नाही.
26 म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की,
मी त्यांना रानात मरू देईन.
27 त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन,
आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
28 त्यांनी बआल-पौराची पूजा केली,
आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले.
29 त्यांनी त्यांच्या कृतीने त्यास कोपविले,
आणि त्यांच्यात मरी पसरली.
30 पण फिनहास मध्यस्थी उठला;
आणि मरी बंद झाली.
31 हे त्यास नितीमत्व असे
सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले.
32 त्यांनी मरीबा येथील जलाजवळही त्यास संताप आणला,
आणि त्यांमुळे मोशेला दुःख सोसावे लागले.
33 त्यांनी त्याच्यात कडवटपणा आणला,
आणि तो अविचाराने बोलला.
34 परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे
त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही.
35 पण ते अन्यजाती लोकांच्या राष्ट्रात मिसळले,
व त्यांचे मार्ग शिकले.
36 आणि त्यांच्या मूर्तींची पूजा केली,
ते त्यांच्यासाठी सापळा बनले.
37 त्यांनी आपली मुले आणि मुली यांचा भुतांना यज्ञ केला.
38 त्यांनी निरपराध्यांचे रक्त पाडले,
त्यांनी आपली मुले आणि मुली,
ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला,
त्यांचे रक्त पाडले आणि भूमी रक्ताने विटाळली गेली.
39 ते आपल्या कृत्यांनी अशुद्ध झाले,
आणि आपल्या कृतींत अनाचारी बनले.
40 त्यामुळे परमेश्वर त्याच्या लोकांवर रागावला,
त्यास आपल्या स्वतःच्या वतनाचा वीट आला.
41 त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले,
आणि ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांनी त्यांच्यावर राज्य केले.
42 त्यांच्या शत्रूंनी त्यांना पीडीले,
आणि ते त्यांच्या अधिकाराखाली ते अधीन झाले.
43 अनेक वेळा तो त्यांना मदत करण्यास आला,
पण ते त्याच्याविरुध्द बंड करीत राहीले,
आणि ते आपल्या पापाने नीच करण्यात आले.
44 तथापि त्याने त्यांची मदतीसाठीची आरोळी ऐकली,
तेव्हा त्याने त्यांच्या क्लेशाकडे लक्ष दिले.
45 त्यांच्यासाठी त्याने आपल्या कराराची आठवण केली,
आणि आपल्या अपार दयेने सौम्यता धारण केली.
46 त्याने त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात
त्यांच्यावर दया येईल असे केले.
47 हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास तार.
आम्हास राष्ट्रातून काढून एकत्र गोळा कर;
म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू.
48 इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर,
ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो.
सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.”
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 107
देव विपत्तीतून सोडवतो
1 परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे.
आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
2 परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून
त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे,
3 त्याने त्यांना परक्या देशातून
पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण
या दिशातून एकवट केले आहे.
4 ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले;
आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही.
5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते;
आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले.
6 नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली,
आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तितून सोडवले.
7 त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले
यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी
8 अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता
आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत.
9 कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले,
आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.
10 काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता;
काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत.
11 त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले,
आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले.
12 त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले;
ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता.
13 तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली
आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले.
14 देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले,
आणि त्यांची बंधणे तोडली.
15 परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता
आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
16 कारण त्याने पितळेची दारे तोडली,
आणि लोखंडाचे गज तोडून टाकले.
17 आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते,
आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते.
18 सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना
आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले.
19 तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली,
आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले.
20 त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले,
आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.
21 परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता
व त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
22 ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत,
आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत.
23 काही जहाजातून समुद्र प्रवास करतात,
आणि महासागरापार व्यवसाय करतात.
24 ते परमेश्वराची कृत्ये पाहतात,
आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात.
25 कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो;
तेव्हा समुद्र खवळतो.
26 लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात.
मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते.
27 ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात,
आणि त्यांची बुद्धी गुंग होते.
28 तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात,
आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो.
29 तो वादळ शांत करतो,
आणि लाटांना स्तब्ध करतो.
30 समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात,
तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो.
31 परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियता
आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
32 लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो
आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो.
33 तो नद्यांना रान करतो,
पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो,
34 आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो.
कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.
35 तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो,
आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.
36 तेथे भुकेल्यास वसवतो,
आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो.
37 ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात,
आणि विपुल पिके काढतात.
38 तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते,
तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही.
39 नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळे
ते कमी होतात आणि नष्ट होतात.
40 तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो,
आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो.
41 पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो,
आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो.
42 सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात,
आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात.
43 जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे
आणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वासनियतेच्या कृतीवर मनन करावे.
Chapter 108
शत्रूंविरुद्ध साहाय्याची याचना
स्तोत्र. 57:7-11; 60:5-12
दाविदाचे स्तोत्र1 हे देवा, माझे मन स्थिर आहे;
मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.
2 हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा.
मी पहाटेला जागे करीन.
3 हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन;
मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन.
4 कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे;
आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.
5 हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे.
आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो.
6 म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे,
तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे.
7 देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन;
मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
8 गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे.
एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे.
यहूदा माझा राजदंड आहे.
9 मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन.
मी पलिष्टीया विषयी विजयाने आरोळी करीन.”
10 तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल?
मला अदोमात कोण नेईल?
11 हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का?
तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस.
12 आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे,
कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे.
13 देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ;
तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.
Chapter 109
सूडासाठी याचना
दाविदाचे स्तोत्र1 हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको.
2 कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात;
ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात.
3 त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात.
आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात.
4 माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात.
पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.
5 मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट,
आणि त्यांनी माझ्या प्रीतीची फेड द्वेषाने केली.
6 या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम;
त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव.
7 जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो;
त्याची प्रार्थना पापच मानली जावो.
8 त्याचे दिवस थोडे होवोत;
दुसरा त्याचा अधिकार घेवो;
9 त्याची मुले पितृहीन
आणि त्याची पत्नी विधवा होवो.
10 त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत,
ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत.
11 सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो;
त्याची कमाई परके लुटून घेवोत;
12 त्यांना कोणीही दया देऊ नये;
त्याच्या पितृहीन मुलांची कोणीही कीव करू नये.
13 त्याचे वंशज कापून टाकली जावोत;
पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जावो.
14 परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापांची आठवण राहो.
त्याच्या आईची पापे कधीही विसरली न जावोत.
15 परमेश्वरापुढे त्यांचे पातक सदैव असोत;
परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवरून काढून टाको.
16 कारण या मनुष्याने कधीही दया दाखविण्याची पर्वा केली नाही,
परंतु त्याऐवजी पीडलेल्यांचा छळ आणि गरजवंत
व धैर्य खचलेल्यांचा वध केला.
17 त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला.
त्याने आशीर्वादाचा द्वेष केला; म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत.
18 त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले,
आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात,
तेलासारखे त्याच्या हाडात आले.
19 त्याचे शाप त्यास पांघरावयाच्या वस्राप्रमाणे होवो,
ते नेहमी वापरावयाच्या कंबरपट्ट्याप्रमाणे तो त्यास वेढून राहो.
20 माझ्या आरोप्यास,
माझ्याविरूद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे
21 हे परमेश्वरा, माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागवून घे.
कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे म्हणून मला वाचव.
22 कारण मी पीडित आणि गरजवंत आहे,
आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायाळ झाले आहे.
23 मी संध्याकाळच्या सावल्यांप्रमाणे दिसेनासा झालो आहे;
मी टोळाप्रमाणे हुसकावला जात आहे.
24 उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत;
मी त्वचा आणि हाडे असा होत आहे.
25 माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे,
ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात.
26 हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर;
तुझ्या कराराच्या विश्वासनियतेने माझा उध्दार कर.
27 हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की,
ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस.
28 जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे;
जेव्हा ते हल्ला करतील, तेव्हा ते लज्जित होतील,
परंतु तुझा सेवक आनंदी होईल.
29 माझे विरोधी वस्राप्रमाणे लाज पांघरतील,
आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील.
30 मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन;
लोकसमुदायासमोर मी त्याची स्तुती करीन.
31 कारण तो पीडितांना धमकी देणाऱ्यांपासून,
त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो.
Chapter 110
देव राजाला राज्य देतो
मत्त. 22:44; प्रेषि. 2:34,35
दाविदाचे स्तोत्र1 माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना
तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.”
2 परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील;
तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.
3 तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात,
पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.
4 परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही,
“तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे
तू सर्वकाळ याजक आहेस.”
5 प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे.
तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील.
6 तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील;
तो प्रेतांनी दऱ्या भरील;
तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील.
7 तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल,
आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.
Chapter 111
परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो
1 परमेश्वराची स्तुती करा.
सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल.
2 परमेश्वराचे कार्य महान आहेत,
जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात.
3 त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे,
आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.
4 त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले;
परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.
5 तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो.
तो आपला करार नेहमी आठवतो.
6 त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन,
आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत.
7 त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे;
त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.
8 ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत,
ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
9 त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे;
त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे,
देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे.
10 परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे;
जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते.
त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.
Chapter 112
परमेश्वराचे भय धरणाऱ्याची भरभराट
1 परमेश्वराची स्तुती करा.
जो मनुष्य परमेश्वराच्या आज्ञा पाळतो,
जो त्याच्या आज्ञेत मोठा आनंद करतो, तो आशीर्वादित आहे.
2 त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तिमान होतील;
धार्मिक आशीर्वादित होतील.
3 धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत;
त्यांचे नितीमत्त्व सर्वकाळ टिकते.
4 धार्मिक मनुष्यांसाठी अंधकारात प्रकाश चमकवतो;
तो दयाळू, कृपाळू आणि न्यायी आहे.
5 जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो,
जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते.
6 कारण तो मनुष्य कधीही हलणार नाही;
नितीमान मनुष्याची आठवण सर्वकाळ राहील.
7 तो वाईट बातमीला भिणार नाही;
त्याचा परमेश्वरावर भरवसा असून त्यास खात्री आहे.
8 त्याचे हृदय निश्चल आहे,
आपल्या शत्रूवर विजय मिळालेला पाहीपर्यंत तो भिणार नाही.
9 तो गरीबांना उदारपणे देतो;
त्याचे नितीमत्त्व सर्वकाळ राहील;
तो सन्मानाने उंचविला जाईल.
10 दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील;
तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल;
दुष्टाची इच्छा नाश होईल.
Chapter 113
दीनाला उच्च केल्याबद्दल स्तुती
1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.
2 आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो.
3 सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो.
4 परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो.
5 आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे,
6 जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो,
7 तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो.
8 अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे.
9 अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 114
आश्चर्यकारक निर्गमन
निर्ग. 14:1-31
1 जेव्हा इस्राएल मिसरातून,
याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,
2 तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला,
इस्राएल त्याचे राज्य झाले.
3 समुद्राने पाहिले आणि पळाला;
यार्देन मागे हटली.
4 पर्वतांनी मेंढ्यांसारख्या,
टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.
5 हे समुद्रा, तू का पळून गेलास?
यार्देने तू का मागे हटलीस?
6 पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता?
लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?
7 हे पृथ्वी, तू प्रभूसमोर,
याकोबाच्या देवासमोर थरथर काप.
8 तो खडक पाण्याच्या तळ्यात,
कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.
Chapter 115
देव आणि मूर्ती
1 हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको,
तर आपल्या नावाचा सन्मान कर,
कारण तू दयाळू आणि सत्य आहेस.
2 ह्यांचा देव कोठे आहे,
असे राष्ट्रांनी का म्हणावे?
3 आमचा देव स्वर्गात आहे;
त्यास जे आवडते ते तो करतो.
4 राष्ट्रांच्या मूर्ति सोन्याच्या व रुप्याच्या आहेत.
त्या मनुष्यांच्या हातचे काम आहेत.
5 त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही;
त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही.
6 त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही,
त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही.
7 त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही.
त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही;
किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही.
8 जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच,
त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे.
9 हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव.
तो त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.
10 हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर विश्वास ठेव;
तोच त्याचे सहाय्य आणि ढाल आहे.
11 अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा;
तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.
12 परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हास आशीर्वाद देईल.
तो इस्राएलाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
तो अहरोनाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
13 जे परमेश्वराचा आदर करतात,
त्या तरुण आणि वृद्ध या दोघांना तो आशीर्वाद देईल.
14 परमेश्वर तुम्हास अधिकाधिक वाढवो,
तो तुमची आणि तुमच्या वंशजांची वाढ करो.
15 आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या
परमेश्वराचा तुम्हास आशीर्वाद असो.
16 स्वर्ग तर परमेश्वराचा आहे;
पण त्यांने मानवजातीला पृथ्वी दिली आहे.
17 मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले
कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
18 पण आम्ही आता आणि सदासर्वकाळ
परमेश्वरास धन्यवाद देत राहू.
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 116
मृत्यूपासून सुटका झाल्याबद्दल उपकारस्तुती
1 मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो
माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.
2 कारण तो माझे ऐकतो,
म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.
3 मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले,
आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या,
संकट व क्लेश मला झाले.
4 नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला,
“हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”
5 परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे;
आमचा देव कनवाळू आहे.
6 परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो;
मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.
7 हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये;
कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.
8 तू माझा जीव मृत्यूपासून,
माझे डोळे अश्रूपासून,
आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत.
9 जीवंताच्या भूमित परमेश्वराची
सेवा करणे मी चालूच ठेवीन.
10 मी फार पीडित आहे
असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे.
11 मी अविचाराने म्हणालो की,
सगळे माणसे खोटारडे आहेत.
12 परमेश्वराने माझ्यावर केलेल्या
सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?
13 मी तारणाचा प्याला उंचावून
परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.
14 त्याच्या सर्व लोकांसमोर,
मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
15 परमेश्वराच्या दृष्टीने
त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे.
16 हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे;
मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे;
माझी बंधने तू सोडली आहेस.
17 मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन
आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18 मी त्याच्या सर्व लोकांसमोर
परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
19 परमेश्वराच्या घराच्या अंगणात,
यरुशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन.
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 117
परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती
1 अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा;
अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा.
2 कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे,
आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे.
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 118
परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकारस्तुती
1 परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
2 इस्राएलाने आता म्हणावे,
“त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
3 अहरोनाच्या घराण्याने म्हणावे,
“त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
4 परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे,
“त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
5 मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली.
परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
6 परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही;
मनुष्य माझे काय करू शकेल?
7 माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे;
माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन.
8 मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा
परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.
9 मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा
परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.
10 सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे;
परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन.
11 त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे.
परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
12 त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे;
जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील.
परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
13 मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला,
परंतु परमेश्वराने मला मदत केली.
14 परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे.
आणि तो माझे तारण झाला आहे.
15 उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे;
परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
16 परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे;
परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
17 मी मरणार नाही, पण जगेन
आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.
18 परमेश्वराने मला जबर शिक्षा केली;
परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही.
19 माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा;
मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन.
20 हे परमेश्वराचे दार आहे;
नितीमान त्यातून प्रवेश करतील.
21 मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे
आणि तू माझे तारण झाला आहेस.
22 इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता,
तोच कोनाशिला झाला आहे.
23 परमेश्वराने हे केले आहे;
आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.
24 परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे;
ह्यात आपण आनंद व उल्लास करू.
25 हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर;
हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर.
26 परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो;
परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो.
27 परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे;
यज्ञाचा पशु वेदीच्या शिंगास दोरीने बांधा.
28 तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन.
तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन.
29 अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे;
कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
Chapter 119
देवाचे उत्कृष्ट नियमशास्त्र आलेफ
1 ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात
ते आशीर्वादित आहेत.
2 जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात
ते आशीर्वादित आहेत.
3 ते चुकीचे करीत नाहीत;
ते त्याच्या मार्गात चालतात.
4 तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे
म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत.
5 मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी
माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.
6 मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन
तेव्हा मी कधीही लाजणार नाही.
7 मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन,
तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन.
8 मी तुझे नियम पाळीन;
मला एकट्याला सोडू नकोस.
बेथ
9 तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील?
तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
10 मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे;
तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
11 मी तुझ्याविरुध्द पाप करू नये
म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
12 हे परमेश्वरा, तू धन्य आहेस;
मला तुझे नियम शिकव.
13 मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे
सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन.
14 तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती
असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.
15 मी तुझ्या नियमांचे मनन करीन,
आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.
16 मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन;
मी तुझे वचन विसरणार नाही.
गीमेल
17 आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे,
आणि तुझे वचन पाळावे.
18 माझे डोळे उघड म्हणजे
तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
19 मी या देशात परका आहे;
तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस.
20 तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे
माझा जीव चिरडून गेला आहे.
21 तू गर्विष्ठांना रागावतोस,
तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत.
22 माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर,
कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे.
23 अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात,
तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो.
24 तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे,
आणि ते माझे सल्लागार आहेत.
दालेथ
25 माझा जीव धुळीस चिकटून आहे;
आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
26 मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस;
तू मला आपले नियम शिकव.
27 मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे.
यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे.
28 माझा जीव दुःखाने गळून जातो;
आपल्या वचनाने मला उचलून धर.
29 असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर;
कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव.
30 मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे;
मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
31 मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे;
हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस.
32 मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन,
कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस.
हे
33 हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव
म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन.
34 मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन;
मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.
35 तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव,
कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे.
36 माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे,
आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.
37 निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव.
मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर.
38 तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन,
आपल्या सेवकासंबंधाने खरे कर.
39 ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर,
कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
40 पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे.
तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.
वाव
41 हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे.
तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो.
42 जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल,
कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे.
43 तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको,
कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.
44 मी सदैव तुझे नियमशास्त्र,
सदासर्वकाळ आणि कायम पाळीन.
45 मी सुरक्षितपणे चालेन,
कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
46 मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन,
आणि मी लज्जित होणार नाही.
47 मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन,
ज्या मला अतिशय प्रिय आहेत.
48 ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन;
मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
जायिन
49 तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव.
कारण तू मला आशा दिली आहेस.
50 माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की,
तुझे वचन मला नवजीवन देते;
51 गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे,
तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.
52 हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो,
आणि मी आपले समाधान करतो.
53 दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात,
म्हणून संताप माझा ताबा घेतो.
54 ज्या घरात मी तात्पुरता राहतो;
तुझे नियम मला माझे गीत झाले आहेत.
55 हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो,
आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो.
56 हे मी आचरिले आहे,
कारण मी तुझे विधी पाळले आहेत.
खेथ
57 परमेश्वर माझा वाटा आहे;
तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे.
58 मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो;
तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर;
59 मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले,
आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली.
60 मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली,
आणि मी उशीर केला नाही.
61 दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे;
तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
62 मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल
तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
63 तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा,
तुझे विधी पाळणाऱ्यांचा, मी साथीदार आहे.
64 हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वासनियतेने सर्व पृथ्वी भरली आहे.
तू आपले नियम मला शिकव.
ठेथ
65 हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे,
आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस.
66 योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे,
कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे.
67 पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो,
परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.
68 तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस.
मला तुझे नियम शिकव.
69 गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे,
पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन.
70 त्यांचे हृदय कठीण झाले आहे,
पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे.
71 मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले;
त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.
72 सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा,
मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत.
योद
73 तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला;
मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन.
74 तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील,
कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे.
75 हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत,
आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे.
76 तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार,
आपल्या कराराच्या विश्वासनियतेने सांत्वन कर.
77 मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन,
कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे.
78 गर्विष्ठ लज्जित होवोत,
कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे;
पण मी तुझ्या विधींचे मनन करीन;
79 तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत,
म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.
80 मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने,
तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे.
काफ
81 मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो;
मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे.
82 माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत;
तू माझे सांत्वन कधी करशील?
83 कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे;
तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
84 तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे?
जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील?
85 गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत,
तुझे नियमशास्त्र झुगारले आहे.
86 तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत;
ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर.
87 त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला;
पण मी तुझे विधी नाकारले नाहीत.
88 तुझ्या कराराच्या विश्वासनियतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे,
याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.
लामेद
89 हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे;
तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.
90 तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे;
तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते.
91 त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत,
कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात.
92 जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता,
तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता.
93 मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही,
कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे.
94 मी तुझाच आहे; माझा उध्दार कर.
कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
95 दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे,
पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन.
96 प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे,
पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत.
मेम
97 अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत!
दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
98 तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात,
कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.
99 माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे.
कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.
100 वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते;
कारण मी तुझे विधी पाळतो.
101 तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो.
या करता, मी तुझे वचन पाळावे.
102 मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही,
कारण तू मला शिकविले आहे.
103 तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत,
होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत.
104 तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते;
यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.
नून
105 तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे,
आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
106 तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे,
व ती पक्की केली आहे.
107 मी फार पीडित आहे;
हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव.
108 हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर,
आणि मला तुझे निर्णय शिकव.
109 माझे जीवन नेहमीच धोक्यात असते,
तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
110 दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे,
पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही.
111 तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे,
कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.
112 तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे
मी आपले मन लाविले आहे.
सामेख
113 परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
114 मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
115 वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा,
यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.
116 तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन,
आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस.
117 मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन;
मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन.
118 तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस,
कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत.
119 पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो;
म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो.
120 तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते,
आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते.
ऐन
121 मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो;
माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको.
122 तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो.
गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस.
123 तू सिद्ध केलेल्या तारणाची
व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.
124 तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव
आणि मला तुझे नियम शिकव.
125 मी तुझा सेवक आहे,
मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.
126 ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे,
कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.
127 खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा,
बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
128 यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो,
आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
पे
129 तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत;
म्हणूनच मी ते पाळतो.
130 तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो;
त्याने अशिक्षीतास ज्ञान प्राप्त होते.
131 मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या,
कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.
132 तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर,
जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस.
133 तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर;
माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.
134 मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर
याकरिता की, मी तुझे विधी पाळीन.
135 तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड,
आणि तुझे नियम मला शिकव.
त्सादे
136 माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात;
कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.
137 हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस,
आणि तुझे निर्णय योग्य आहेत.
138 तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय
असे लावून दिले आहेत.
139 रागाने माझा नाश केला आहे,
कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.
140 तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे,
आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.
141 मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे,
तरी मी तुझे विधी विसरत नाही.
142 तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे,
आणि नियमशास्त्र सत्य आहे.
143 मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
144 तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत;
मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
कोफ
145 मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे,
मी तुझे नियम पाळीन.
146 मी तुला हाक मारतो; तू मला तार
आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन.
147 मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो.
तुझ्या वचनात माझी आशा आहे.
148 तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी
रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
149 तुझ्या कराराच्या विश्वासनियतेने माझी वाणी ऐक;
हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव.
150 जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत,
पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत.
151 हे परमेश्वरा, तू जवळ आहेस
आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.
152 तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की,
ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
रेश
153 माझे दु:ख पाहा आणि मला मदत कर,
कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
154 तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर.
तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
155 दुष्टपासून तारण फार दूर आहे,
कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत.
156 हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे,
तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजिवन दे.
157 मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत,
तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही.
158 विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे.
कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत.
159 तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा,
तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वासनियतेने मला जिवंत ठेव.
160 तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे;
तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.
शीन
161 अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत;
तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते.
162 ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा
मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो.
163 मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो,
पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे.
164 मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य,
निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो.
165 तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते,
त्यास कसलेच अडखळण नसते.
166 हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे
आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.
167 मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो,
आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत.
168 मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत,
कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे.
ताव
169 हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक.
तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे.
170 माझी विनंती तुझ्यासमोर येवो;
तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.
171 तू मला आपले नियम शिकवितोस
म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.
172 माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो;
कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.
173 तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो,
कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत.
174 हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे
आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे.
175 माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील;
तुझे निर्णय मला मदत करो.
176 मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे;
तू आपल्या सेवकाचा शोध कर,
कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.
Chapter 120
कपटापासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना
1 माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो,
आणि त्याने मला उत्तर दिले.
2 हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात,
आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
3 हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल,
आणि आणखी तुला काय मिळणार?
4 तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी,
रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
5 मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो,
मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
6 शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर
मी खूप काळ राहिलो आहे.
7 मी शांतीप्रिय मनुष्य आहे,
पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.
Chapter 121
परमेश्वर तुझा रक्षक आहे
1 मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो.
मला मदत कोठून येईल?
2 परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा
त्याकडून माझी मदत येते.
3 तो तुझा पाय घसरू देत नाही;
जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
4 पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता
कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.
5 परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे;
परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.
6 दिवसा तुला सूर्य किंवा
रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.
7 परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील;
तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
8 परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील,
त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
Chapter 122
यरुशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते [1] मला म्हणाले,
तेव्हा मला आनंद झाला.
2 हे यरुशलेमे,
तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
3 हे यरुशलेमे,
एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे,
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,
परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
5 कारण तेथे न्यायासने,
दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
6 यरुशलेमाच्या शांतीसाठी प्रार्थना करा!
तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
7 तुझ्या कोटात शांती असो,
आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
8 माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता,
मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
9 परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता,
मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.
Chapter 123
दयेची याचना
1 स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या,
तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.
2 पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात,
जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात,
तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर
आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात.
3 हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर,
कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.
4 सुखवस्तु लोकांनी केलेली थट्टा,
आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी
आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.
Chapter 124
शत्रूंच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र1 आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर
आमच्या बाजूला नसता,
2 जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले,
तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,
3 जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला,
त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते.
4 जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते;
प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.
5 मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
6 परमेश्वराचा धन्यवाद होवो,
त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.
7 पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे;
पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
8 पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर
त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.
Chapter 125
परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे
1 जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात;
ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत.
2 यरुशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती
आता आणि सर्वकाळ आहे.
3 नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही.
नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील.
4 हे परमेश्वरा, जे चांगले आहेत,
आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.
5 पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात,
परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल.
इस्राएलांवर शांती असो.
Chapter 126
परत आणल्याबद्दल उपकारस्तुती
1 सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले,
तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले.
2 मग आमचे मुख हास्याने,
आणि आमची जीभ गायनाने भरली.
नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले;
परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.
3 परमेश्वराने आमच्यासाठी महानगोष्टी केल्या आहेत;
आम्ही किती हर्षित झालो आहोत!
4 परमेश्वरा, नेगेब येथील प्रवाहाप्रमाणे
आम्हास बंदिवासातून परत आण.
5 जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतील ते हर्षाने आरोळी मारून कापणी करतील.
6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो,
तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल.
Chapter 127
भरभराट परमेश्वराकडूनच प्राप्त होते
1 परमेश्वर जर घर बांधीत नाही,
तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे.
जर परमेश्वर नगर रक्षित नाही,
तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.
2 तुम्ही पहाटे लवकर उठता,
रात्री उशीराने घरी येता,
किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे
कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.
3 पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे,
आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
4 तरुणपणाची मुले हे वीराच्या
हातातील बाणांसारखी आहेत.
5 ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!
तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता,
ते फजीत होणार नाहीत.
Chapter 128
परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता
1 जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो,
जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.
2 तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील;
तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.
3 तुझी पत्नी तुझ्या घरात
फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या
जैतूनाच्या रोपांसारखी होतील.
4 होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो,
तो असा आशीर्वादित होईल.
5 परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो;
तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो.
6 तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत.
इस्राएलावर शांती असो.
Chapter 129
सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना
1 इस्राएलाने आता म्हणावे की,
माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.
2 त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला,
तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.
3 नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले;
त्यांनी आपली तासे लांब केली.
4 परमेश्वर न्यायी आहे;
त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.
5 जे सियोनेचा तिरस्कार करतात,
ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.
6 ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच
सुकून जाते त्यासारखे होवोत.
7 त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही,
किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.
8 त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की,
“परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो;
परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”
Chapter 130
परमेश्वराच्या द्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी आशा
1 हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
2 हे प्रभू, माझी वाणी ऐक;
माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान
लक्षपूर्वक लागलेले असोत.
3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर,
हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
4 पण त्यांनी तुझे भय धरावे,
म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
5 मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो,
आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
6 पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा
माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
7 हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव.
कारण परमेश्वर दयाळू आहे,
आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.
8 तोच इस्राएलास त्यांच्या
सर्व पापांपासून मुक्त करीन.
Chapter 131
परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे
दाविदाचे स्तोत्र1 हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही.
मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही,
किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.
2 खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे;
जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते;
तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.
3 हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ
तू परमेश्वरावर आशा ठेव.
Chapter 132
पवित्रस्थानाला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना
1 हे परमेश्वरा, दावीदाकरता
त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर.
2 त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली,
त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर.
3 तो म्हणाला “मी आपल्या घरात
किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही.
4 मी आपल्या डोळ्यांवर झोप
किंवा आपल्या पापण्यास विसावा देणार नाही.
5 परमेश्वरासाठी स्थान,
याकोबाच्या सर्वसमर्थ देवासाठी निवासमंडप सापडेपर्यंत मी असेच करीन.”
6 पाहा, आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले;
आम्हास तो जारच्या रानात सापडला.
7 आम्ही देवाच्या निवासमंडपात जाऊ;
आम्ही त्याच्या पदासनापाशी आराधना करू आणि म्हणू.
8 हे परमेश्वरा, ऊठ;
तू आपल्या सामर्थ्याच्या कोशासह आपल्या विश्रांतीस्थानी ये,
9 तुझे याजक नितीमत्तेचे वस्रे पांघरोत;
तुझे विश्वासू आनंदाने जयघोष करोत.
10 तुझा सेवक दावीदाकरिता,
तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस.
11 परमेश्वराने विश्वसनीय दावीदाजवळ शपथ वाहिली आहे;
तो त्याच्या शपथेपासून माघार घेणार नाही,
मी तुझ्या वंशातून तुझ्या राजासनावर एकाला बसवीन.
12 जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला,
आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले,
तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.
13 खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे;
त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.
14 “ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे;
मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे.
15 मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन;
मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन.
16 मी तिच्या याजकांना तारणाचे वस्त्र नेसवीन;
तिचे भक्त आनंदाने मोठ्याने जयघोष करतील.
17 तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन;
तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.
18 मी त्याच्या शत्रूंला लाजेचे वस्रे नेसवीन,
परंतु त्याचा मुकुट चमकेल.”
Chapter 133
बंधूंच्या ऐक्याची धन्यता
दाविदाचे स्तोत्र1 पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे
किती चांगले आणि आनंददायक आहे.
2 ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे,
त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या
बहुमूल्य तेलासारखे आहे.
3 सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या
हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे;
कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे
अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.
Chapter 134
रात्रीच्या पहारेकऱ्यांना आदेश
1 परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या,
जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.
2 पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा;
आणि परमेश्वरास धन्यवाद द्या.
3 आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर
तुला सियोनेतून आशीर्वाद देवो.
Chapter 135
परमेश्वराची थोरवी आणि मूर्तीची निरर्थकता
1 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.
परमेश्वराच्या सेवकांनो, तुम्ही त्याची स्तुती करा.
2 परमेश्वराच्या घरात उभे राहाणाऱ्यांनो,
आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो,
तुम्ही त्याची स्तुती करा.
3 परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे;
त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे.
4 कारण परमेश्वराने याकोबाला आपल्यासाठी निवडले आहे,
इस्राएल त्याच्या मालमत्तेप्रमाणे आहे.
5 परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे,
आमचा प्रभू सर्व देवांच्या वर आहे.
6 परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो
आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो.
7 तो पृथ्वीच्या शेवटापासून ढग वर चढवतो.
तो पावसासाठी विजा निर्माण करतो;
आणि आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.
8 त्याने मिसर देशातील मनुष्यांचे आणि प्राण्यांचे
दोघांचे पहिले जन्मलेले मारून टाकले.
9 हे मिसरा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक
यांच्याविरूद्ध चिन्ह व चमत्कार पाठवले.
10 त्याने पुष्कळ राष्ट्रांवर हल्ला केला,
आणि शक्तिमान राजांना मारून टाकले,
11 अमोऱ्यांचा राजा सीहोन
व बाशानाचा राजा ओग
आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला.
12 त्यांचा देश त्याने वतन असा दिला,
आपल्या इस्राएल लोकांसाठी वतन करून दिला.
13 हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल,
हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील.
14 कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील,
आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
15 राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत,
त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत.
16 त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण त्या बोलत नाहीत;
त्यांना डोळे आहेत पण त्या पाहत नाहीत.
17 त्यांना कान आहेत, पण त्या ऐकत नाहीत,
त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही.
18 जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण
त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्यांच्यासारख्याच त्या आहेत.
19 हे इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा;
अहरोनाच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.
20 लेवीच्या वंशजांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.
परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो परमेश्वराचा धन्यवाद करा.
21 जो परमेश्वर यरुशलेमेत राहतो,
त्याचा धन्यवाद सियोनेत होवो.
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 136
परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती
1 परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
2 देवांच्या देवाची उपकारस्तुती करा.
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
3 प्रभूंच्या प्रभूंची उपकारस्तुती करा.
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
4 जो एकटाच महान चमत्कार करतो त्याची उपकारस्तुती करा.
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
5 ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची, उपकारस्तुती करा,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
6 ज्याने जलावर पृथ्वी पसरवली,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
7 ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
8 दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्याची निर्मिती केली,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
9 त्याने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
10 त्याने मिसराचे पहिले जन्मलेले मारून टाकले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
11 आणि ज्याने इस्राएलाला त्यांच्यामधून बाहेर काढले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
12 ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
13 ज्याने लाल समुद्र दुभागला,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
14 ज्याने इस्राएलाला त्यामधून पार नेले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
15 ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले.
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
16 ज्याने आपल्या लोकांस रानातून नेले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
17 ज्याने महान राजांना मारून टाकले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
18 आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
19 ज्याने अमोऱ्यांच्या सीहोन राजाला मारून टाकले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
20 आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
21 आणि ज्याने त्यांचा देश वतन असा दिला,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
22 ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला.
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
23 ज्याने आमच्या कठीन परिस्थितीत आमची आठवण केली आणि आम्हास मदत केली,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
24 ज्याने आम्हास आमच्या शत्रूंवर विजय दिला त्याची,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
25 जो सर्व जिवंत प्राण्यांना अन्न देतो.
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
26 स्वर्गातील देवाची उपकारस्तुती करा.
कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Chapter 137
बाबेलमध्ये पाडावा करून नेलेल्यांचा आकांत
1 आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो;
आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.
2 तेथील वाळुंजावर
आम्ही आमच्या वीणा टांगल्या.
3 तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले
आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले,
सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.
4 परक्या देशात
आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
5 हे यरुशलेमे, मी जर तुला विसरलो,
तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
6 जर मी तुला विसरलो,
जर मी यरुशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य
विषयाहून अधिक मानले नाही
तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
7 हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरुशलेमेच्या
त्या दिवसाची आठवण कर,
ते म्हणाले, ती पाडून टाका,
पायापर्यंत पाडून टाका.
8 हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस,
कारण जसे तू आम्हास केले तसे,
जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.
9 जो तुझी बालके घेऊन त्यांना खडकावर आपटून ठार मारतो
तो आशीर्वादित होईल.
Chapter 138
परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र1 मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन;
मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
2 मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन,
तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन.
तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची [1] थोरवी वाढविली आहेस.
3 मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस.
तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
4 हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील,
कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत.
5 खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील
कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.
6 कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो,
पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
7 जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस.
माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस;
आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
8 परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे;
हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे.
तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.
Chapter 139
देव सर्वसाक्षी व सर्वज्ञानी आहे
दाविदाचे स्तोत्र1 हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस;
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे;
तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात.
3 तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो;
तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस.
4 हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द
तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही.
5 तू मागून व पुढून मला घेरले आहेस,
आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस.
6 हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे;
ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही.
7 मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो?
मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो?
8 मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस;
जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस.
9 जर मी पहाटेचे पंख धारण करून
आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस.
10 तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो.
आणि तू मला हाताने धरून नेतोस.
11 जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल,
आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल.
12 काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही.
रात्रही दिवसासारखीच प्रकाशते,
कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत.
13 तू माझे अंतर्याम निर्माण केलेस;
तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
14 मी तुला धन्यवाद देतो,
कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत,
हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
15 मी गुप्तस्थळी निर्माण होत असता,
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे
माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
16 तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस;
माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी
ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.
17 हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत,
त्यांची संख्या किती मोठी आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील.
जेव्हा मी जागा होतो, तेव्हाहि मी तुझ्याजवळच असतो.
19 हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील;
अहो हिंसाचारी मनुष्यांनो! माझ्यापासून दूर व्हा.
20 ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात;
तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात.
21 परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये?
तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये?
22 मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो;
ते माझे शत्रू झाले आहेत.
23 हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण;
माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24 माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा,
आणि मला सनातन मार्गाने चालीव.
Chapter 140
छळणाऱ्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव;
जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव.
2 ते आपल्या मनात वाईट योजना करतात;
ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात.
3 त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते;
त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे.
4 हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव;
मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव.
त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे.
5 गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत;
त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे;
त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे.
6 मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा,
माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे.
7 हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या,
माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस.
8 हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको,
त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील.
9 ज्यांनी मला घेरले आहे;
त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.
10 त्यांच्यावर जळते निखारे पडोत;
त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर
कधीही येता येणार नाही अशा खड्यात फेकण्यात येवो.
11 वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही;
जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल.
12 परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे,
आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे.
13 खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील;
सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील.
Chapter 141
वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये.
जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक.
2 माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे,
ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.
3 हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव;
माझ्या ओठांचे द्वार सांभाळ.
4 अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या
पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस,
जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस.
5 नितीमान मनुष्य मला तडाखा मारो; ती मला दयाच होईल.
तो मला दुरुस्त करो. ते माझ्या डोक्यावर तेलासारखे होईल.
माझे डोके ते स्वीकारण्यास नकार देणार नाही.
परंतु माझ्या प्रार्थना नेहमी दुष्ट लोकांच्या कृत्याविरूद्ध आहेत.
6 त्यांच्या अधिपतींना कड्यावरून खाली लोटून दिले आहे;
ते माझी वचने ऐकतील कारण ती गोड आहेत.
7 जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते,
तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत.
8 तरी हे प्रभू परमेश्वरा, खचित माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत;
मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; माझा जीव निराधार सोडू नकोस.
9 त्यांनी माझ्यासाठी जो पाश रचला आहे त्यातून व
दुष्कर्म करणाऱ्यांच्या सापळ्यातून माझे संरक्षण कर.
10 दुष्ट आपल्या स्वतःच्या जाळ्यात पडोत,
मी त्यातून निसटून जाईन.
Chapter 142
अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो;
मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो.
2 मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो;
त्यास मी आपल्या समस्या सांगतो.
3 जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला,
तेव्हा तू माझा मार्ग जाणला.
ज्या मार्गात मी चाललो,
त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे.
4 माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा,
कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही.
मला कशाचाही आश्रय नाही;
माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही.
5 हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो;
मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस,
जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस.
6 माझ्या आरोळीकडे लक्ष दे,
कारण माझी फार दुर्दशा झाली आहे;
माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव,
कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत.
7 मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी,
म्हणून माझा जीव बंदीतून काढ.
नितीमान माझ्याभोवती जमतील,
कारण तू माझ्याशी चांगला आहेस.
Chapter 143
सुटका आणि मार्गदर्शन ह्यांसाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे.
तू आपल्या विश्वासाने आणि न्यायीपणाने मला उत्तर दे.
2 तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस.
कारण तुझ्या दृष्टीने कोणीही नितीमान नाही.
3 शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत;
त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे;
पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे.
4 माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला आहे;
माझे हृदय घाबरे झाले आहे.
5 मी पूर्वीचे दिवस आठवतो;
मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो;
तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो.
6 मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो;
शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे.
7 हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे.
माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस,
किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन.
8 सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे,
कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे.
ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव,
कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
9 हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर.
मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो.
10 मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव,
कारण तू माझा देव आहेस.
तुझा चांगला आत्मा
मला सरळपणाच्या देशात नेवो.
11 हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर.
तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ.
12 तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर;
आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर,
कारण मी तुझा दास आहे.
Chapter 144
सुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र1 परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो,
जो माझ्या हाताला युद्ध करण्यास;
आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो.
2 तो माझा दयानिधी व माझा दुर्ग,
माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा,
माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो;
तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो.
3 हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी?
किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा?
4 मनुष्य एका श्वासासारखा आहे;
त्याचे दिवस नाहीशा होणाऱ्या सावलीसारखे आहेत.
5 हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर;
पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे.
6 विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक;
तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.
7 वरून आपले हात लांब कर;
महापुरातून, या परक्यांच्या हातून,
मला सोडवून वाचव.
8 त्यांचे मुख असत्य बोलते,
आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
9 हे देवा, मी तुला नवे गाणे गाईन.
दशतंतु वीणेवर मी तुझी स्तवने गाईन;
10 तूच राजांना तारण देणारा आहे;
तूच आपला सेवक दावीद याला दुष्टाच्या तलवारीपासून वाचवले.
11 मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव.
त्यांचे मुख असत्य बोलते;
आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
12 आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत.
आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत.
13 आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत.
आणि आमच्या शेतात आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत.
14 मग आमचे बैल लादलेले असावेत;
दरोडे, धरपकड व आकांत
हे आमच्या रस्त्यात नसावेत;
15 ज्यांना असे आशीर्वाद आहेत ते लोक आशीर्वादित आहेत;
ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते आनंदी आहेत.
Chapter 145
परमेश्वराचे चांगुलपण व सामर्थ्य ह्यांबद्दल स्तुती
दाविदाचे स्तोत्र1 माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन;
मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.
2 प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन.
मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन.
3 परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे;
त्याची महानता अनाकलनीय आहे.
4 एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील,
आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.
5 ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील,
मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन.
6 ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील,
मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.
7 ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील,
आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.
8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे,
तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.
9 परमेश्वर सर्वांना चांगला आहे;
त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
10 हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील;
तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.
11 ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील,
आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील.
12 हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये
आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी.
13 तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे.
आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.
14 पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो,
आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो.
15 सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात.
आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
16 तू आपला हात उघडून
प्रत्येक जीवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.
17 परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे;
आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.
18 जे कोणी त्याचा धावा करतात,
जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.
19 तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो;
तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो.
20 परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो.
परंतु तो वाईटांचा नाश करतो.
21 माझे मुख परमेश्वराची स्तुती करील.
सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो.
Chapter 146
परमेश्वराच्या न्याय्य कृत्यांबद्दल स्तुती
1 परमेश्वराची स्तुती करा.
हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर.
2 मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन.
मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन.
3 अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही,
अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका.
4 जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो;
त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो.
5 ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे,
ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे.
6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी,
समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले,
तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो.
7 तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो,
आणि तो भुकेल्यांना अन्न देतो.
परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो.
8 परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो;
परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो.
परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.
9 परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो.
तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो.
परंतु तो वाईटांचा विरोध करतो.
10 परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो,
हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो.
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 147
यरुशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती
1 परमेश्वराची स्तुती करा,
कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे;
ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे.
2 परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधतो;
तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो.
3 तो भग्नहृदयी जनांना बरे करतो,
आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
4 तो ताऱ्यांची मोजणी करतो;
तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.
5 आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे;
त्याची बुद्धी मोजू शकत नाही.
6 परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो;
तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.
7 गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा.
वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा.
8 तो ढगांनी आकाश झाकून टाकतो,
आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो,
तो डोंगरावर गवत उगवतो.
9 तो प्राण्यांना
आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.
10 घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही;
मनुष्याच्या शक्तिमान पायांत तो आनंद मानत नाही.
11 जे परमेश्वराचा आदर करतात,
जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.
12 हे यरुशलेमे, परमेश्वराची स्तुती कर;
हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर.
13 कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत;
त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत.
14 तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो;
तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.
15 तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो;
त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
16 तो लोकरीसारखे बर्फ पसरतो;
तो राखेसारखे दवाचे कण विखरतो.
17 तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो;
त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
18 तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो;
तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.
19 त्याने याकोबाला आपले वचन,
इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले.
20 त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही;
आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत.
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 148
अखिल निर्मितीने उपकारस्तुती करण्याचा आदेश
1 परमेश्वराची स्तुती करा.
आकाशातून परमेश्वराची स्तुती करा;
उंचामध्ये त्याची स्तुती करा.
2 त्याच्या सर्व देवदूतांनो त्याची स्तुती करा;
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा;
तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
4 आकाशावरील आकाशांनो
आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
5 ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत.
कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.
6 त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली;
त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.
7 पृथ्वीवरून परमेश्वराची स्तुती करा.
तुम्ही समुद्रातील प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो,
8 अग्नी [1] आणि गारा, बर्फ आणि धुके,
त्याचे वचन पूर्ण करणारे सर्व वादळी वारा,
9 पर्वत आणि सर्व टेकड्या,
फळझाडे व सर्व गंधसरू,
10 जंगली आणि पाळीव प्राणी,
सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी,
11 पृथ्वीवरचे राजे आणि सर्व राष्ट्रे,
अधिपती आणि पृथ्वीतले सर्व न्यायाधीश,
12 तरुण पुरुष आणि तरुण स्रिया, वृद्ध आणि मुले दोन्ही,
13 ही सर्व परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत,
कारण केवळ त्याचेच नाव उंचावलेले आहे;
आणि त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर पसरविले आहे.
14 त्याने आपल्या लोकांचे शिंग उंचाविले आहे;
कारण तो आपल्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना,
त्याच्याजवळ असलेल्या इस्राएलाच्या लोकांस स्तुतिपात्र आहे.
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 149
इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश
1 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वरास नवे गीत गा;
विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
2 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो.
सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
3 ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत;
ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
4 कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे;
तो दीनांना तारणाने गौरवितो.
5 भक्त विजयाने हर्षभरित होवोत;
ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
6 देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो,
आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
7 यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा
आणि लोकांस शिक्षा करावी.
8 ते त्यांच्या राजांना साखळंदडाने
आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
9 ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील.
हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे.
परमेश्वराची स्तुती करा.
Chapter 150
परमेश्वराचे स्तवन करा
1 परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
2 त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा;
त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
3 शिंग वाजवून त्याची स्तुती करा;
सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
4 डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा;
तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
5 जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा;
उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.
6 प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती करा.