लुक
Chapter 1
प्रस्तावना
1 पुष्कळ लोकांनी आमच्यामध्ये घडलेल्या घटनांची नोंद करण्याचा प्रयत्न केला आहे 2 जे सुरुवातीपासून त्याचे प्रत्यक्ष साक्षी आणि त्या वचनाचे सेवक झाले त्यांनीच आम्हाला ह्या गोष्टी कळविल्या 3 हे थियफिला महाराज मी काळजीपूर्वक सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे म्हणून मला असे वाटले की या सर्व घटनांविषयी आपणाला व्यवस्थित माहिती लिहावी 4 आपल्याला ज्या गोष्टींचे शिक्षण मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपल्याला कळावा अशी माझी इच्छा आहे 5 यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसात जखऱ्या नावाचा कोणीएक याजक होता तो अबीयाच्या याजक गटातील होता त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील असून तिचे नाव अलिशिबा होते 6 ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत 7 परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती शिवाय दोघेही फार म्हातारे झाले होते 8 एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असता 9 याजकपदाच्या रीतीप्रमाणे मंदिरात देवापुढे धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली 10 आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता 11 तेव्हा देवाचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला 12 त्याला पाहून जखऱ्या अस्वस्थ व भयभीत झाला 13 परंतु देवदूत त्याला म्हणाला जखऱ्या भिऊ नको कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी बायको अलिशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल तू त्याचे नाव योहान ठेव 14 तो तुला आनंद देईल व तुला उल्हासित करेल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील 15 तो देवाच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य पिणार नाही तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल 16 तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल 17 बापांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल 18 मग जखऱ्या देवदूताला म्हणाला हे घडणारच असे मी कशावरुन समजू कारण मी वृध्द मनुष्य आहे आणि माझी पत्नीसुध्दा उतारवयात आहे 19 देवदूताने त्याला उत्तर दिले मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे आणि तुझ्याशी बोलायला व तुलाही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे 20 पाहा हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील कारण माझे शब्द जे योग्यवेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस 21 तेव्हा जखऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकांना तो मंदिरात इतका वेळ का राहिला याचे आश्चर्य वाटले 22 तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना तेव्हा त्यांना जाणीव झाली की मंदिरात त्याने दृष्टांन्त पाहिला आहे तो त्यांना खुणा करत होता परंतु तो तसाच मुका राहीला 23 त्याच्या सेवेचा कालावधि पूर्ण झाल्यावर तो घरी परत गेला 24 त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली व पाच महिने लपून राहिली ती म्हणाली 25 लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले 26 अलीशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल दूताला गालीलांतील नासरेथ नावाच्या गावी 27 एका कुमारीकडे पाठवले तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते 28 देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला अभिवादन तुझ्यावर कृपा झालेली आहे प्रभू तुझ्याबरोबर आहे 29 परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली 30 देवदूत तिला म्हणाला मरीये भिऊ नकोस देवाने तुझ्यावर कृपा केली आहे 31 पाहा तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव 32 तो महान होईल व त्याला थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल 33 तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही 34 तेव्हा मरीया दूताला म्हणाली हे कसे होईल कारण मला पुरूष ठाऊक नाही 35 देवदूत तिला म्हणाला पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल त्याला देवाचा पुत्र म्हणतील 36 बघ तुझी नातेवाईक अलीशिबा हि सुध्दा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हटले जाई तिला आता सहावा महिना आहे 37 कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही 38 मरीया म्हणाली खरोखर मी प्रभूची दासी आहे आपल्या म्हणण्या प्रमाणे मला होवो मग देवदूत तिच्यापासून निघून गेला 39 त्याच दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावी गेली 40 तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले 41 जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली 42 ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे 43 माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला काेठून 44 जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली 45 जिने विश्वास ठेवला आहे ती धन्य कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल 46 मरिया म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो 47 आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे 48 कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली आतापासून मला सर्व पिढ्या आशीर्वादित म्हणतील 49 कारण जो सर्वसमर्थ आहे त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे 50 जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे 51 त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत जे गर्विष्ठ अंतःकरणाचे आहेत त्यांची त्याने पांगापांग केली आहे 52 त्याने राज्य करणाऱ्यांना त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे आणि गरीबास उंचावले आहे 53 त्याने भूकेल्यास चांगल्या पदार्थांने तृप्त केले आहे आणि धनवानास रिकाम्या हाताने परत पाठवले आहे 54 त्याने आपला सेवक इस्राएल ह्याला साहाय्य केले आहे 55 आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरण करावी 56 अलीशिबेबरोबर तीन महीने राहिल्यानंतर मरिया अापल्या घरी परत गेली 57 अलीशिबेची प्रसूतीची वेळ आल्यावर तिने एका मुलास जन्म दिला 58 प्रभूने तिच्यावर मोठी दया केली आहे हे तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले आणि ते तिच्या आनंदात सहभागी झाले 59 मग असे झाले की आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले असता त्याच्या पित्याच्या नावाप्रमाणे ते बाळाच नाव देखिल जखऱ्या ठेवणार होते 60 परंतु त्याच्या आईने उत्तर दिले नाही त्याऐवजी त्याचे नाव योहान ठेवायचे आहे 61 ते तिला म्हणाले तुझ्या नातलगात ह्या नावाचा कोणीच नाही 62 नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना हातवारे करून विचारले ह्याचे नाव काय ठेवावे अशी तुझी इच्छा आहे 63 तेव्हा त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि त्याचे नाव योहान आहे असे लिहीले यावरुन त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले 64 त्याच क्षणी त्याचे तोंड उघडले व त्याची जिभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाला धन्यवाद देऊ लागला 65 तेव्हा सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीयाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलू लागले 66 ज्या कोणी हे ऐकले ते प्रत्येक जण मनात विचार करत होते ते म्हणाले हे मूल पुढे कोण होणार आहे प्रभू त्याच्याबरोबर आहे असे त्यांच्या लक्षात आले 67 जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला आणि त्यानेही भविष्यवाणी केली तो म्हणाला 68 इस्राएलाचा देव प्रभू हयाची स्तुती असो कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांची खंडणी भरून सुटका केली 69 त्याने आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून आमच्यासाठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे 70 हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे युगाच्या प्रारंभापासून सांगितले होते 71 जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा व्देष करतात त्यांच्यापासून सुटका करण्याचे अभिवचन त्याने आम्हाला दिले 72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व आपल्या पवित्र कराराची आठवण ठेवणार आहे 73 हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्राहामाला वाहिली 74 ती अशी की तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सोडवले जाऊन 75 माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्वाने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल असे मी करीन 76 हे बालका तुला सर्वांहून श्रेष्ठाचा संदेष्टा म्हणतील कारण प्रभूचे मार्ग सिध्द करण्याकरीता तू त्यांच्यापुढे चालशील 77 ह्यासाठी की त्याच्या लोकास त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा 78 देवाच्या दयेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल 79 तीच्याकडून जे अंधारात आहेत व मृत्युच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल 80 मग तो मुलगा वाढत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला इस्राएल लोकांना प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला
Chapter 2
येशूचा जन्म
1 त्यादिवसात कैसर आगुस्तची आज्ञा झाली की सर्व जगाची नांवनोंदणी लिहिली जावी 2 ही पहिली नांवनोंदणी होती जेव्हा क्वीरीनिय हा सिरिया प्रांताचा राज्यपाल होता 3 प्रत्येक जण नांवनोंदणी करण्यासाठी आपापल्या गांवी गेले 4 मग योसेफसुध्दा गालीलातील नासरेथ गांवाहून यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता 5 व नावनिशी लिहून देण्यासाठी जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयला त्याने बरोबर नेले 6 आणि असे झाले ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन 7 तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तिने त्याला फडक्यामध्ये गुंडाळले व गव्हाणींत ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही 8 त्याच भागांत मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानांत राहून आपले कळप राखीत होते 9 अचानक देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खुप भ्याले 10 देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याचे सुवार्ता मी तुम्हास सांगतो 11 आज तुमच्यासाठी दावीदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभू आहे 12 तुमच्यासाठी ही खूण असेल की बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल 13 मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले 14 परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या माणसांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती 15 मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि घडलेली ही जी गोष्ट देवाने आम्हाला कळवली ती बघू या 16 तेव्हा ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना दिसले 17 जेव्हा मेंढपाळांनी त्याला पाहिले तेव्हा त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते त्यांनी सर्वांना जाहीर केले 18 मग एेकणारे सर्व जन त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले 19 परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या 20 नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी एेकूण व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत माघारी गेले 21 आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले हे तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते 22 पुढे मोशेच्या नियमशास्राप्रमाणे त्यांचे शुध्दीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर यरूशलेमेस घेउन आले ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे 23 म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे 24 आणि प्रभूच्या नियमशास्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा कबुतरांची दोन पिले यांचा यज्ञ अर्पावा म्हणून त्यांनी त्याला तेथे आणले 25 तेव्हा पाहा यरूशलेमेत शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य होता तो मनुष्य नीतिमान व भक्तिमान होता तो इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता 26 आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तू मरणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते 27 आणि तो आत्म्यांत असता मंदिरांत आला आणि जेव्हा आईवडिलांनी येशू बाळाला त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरीता आत आणले 28 तेव्हा शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले आणि त्याने देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले 29 हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस 30 कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे 31 ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले 32 ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे 33 त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले 34 आणि शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले पाहा इस्राएलातील अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे यांसाठी आणि ज्याविरूध्द बोलतील अशा चिन्हासाठी ठेवलेला आहे 35 ह्यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जिवांतून तलवार भोसकून जाईल 36 तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी होती ती अशेर वंशातील फनूएलाची मुलगी असून ती फार वृध्द झाली होती ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली 37 ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे 38 तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले जे यरुशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले 39 जेव्हा त्यांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पूर्ण केल्यावर ते गालीलातील आपले गाव नासरेथ येथे परत गेले 40 बालक मोठा होत गेला आणि बलवान झाला व ज्ञानातही वाढत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती 41 प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरुशलेमाला जात 42 जेव्हा तो बारा वर्षांचा झाला ते सणाच्या रीतीप्रमाणे वर यरूशलेमेस गेले 43 मग सणाचे पूर्ण दिवस तेथे घालविल्या नंतर ते घराकडे परत येण्यास निघाले परंतु येशू मुलगा मात्र यरुशलेमेतच मागे राहिला आणि हे त्याच्या आईवडिलांना माहीत नव्हते 44 तो बरोबर प्रवास करणाऱ्या घोळक्या सोबत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले नंतर त्यांनी नातलग व मित्रांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली 45 जेव्हा तो त्यांना सापडला नाही ते यरूशलेमेस परत आले आणि तेथे त्यांनी त्याचा शोध घेतला 46 असे घडले की तीन दिवसानंतर तो त्यांना मंदिरात सापडला तो शिक्षकांमध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता 47 ज्यांनी त्याचे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुध्दीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले 48 जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले त्याच्यी आई त्याला म्हणाली मुला तू आमच्याबरोबर असे का वागलास ऐक तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो 49 येशू त्यांना म्हणाला तुम्ही माझा शोध का करीत होतामी माझ्या पित्याच्या घरात असावे हे तुम्हाला माहीत नव्हते काय 50 परंतु तो जे शब्द त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही 51 मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या 52 येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढला
Chapter 3
बाप्तिस्मा करणारा योहान व त्याचा संदेश
1 आता तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता आणि हेरोद गालीलचा मांडलिक असताना आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा मांडलिक व लूसनिय हा अबिलेनेचा मांडलिक होता 2 आणि हन्ना व कयफा हे मुख्य याजक होते तेव्हा अरण्यात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले 3 तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला 4 यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हे झालेः रानांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी परमेश्वराचा मार्ग तयार करा त्याच्या वाटा सरळ करा 5 प्रत्येक दरी भरली जाईल आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल वांकडी सरळ होतील आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील 6 आणि सर्व मनुष्यप्राणी देवाचे तारण पाहतील 7 त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणालाः अहो विषारी सापाच्या पिलांनो येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला कोणी सावध केले 8 पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या आणि आपल्या मनात असे म्हणू नका की अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे कारण मी तुम्हास सांगतो की अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे 9 आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल 10 नंतर जमावातील लोकांनी त्याला विचारले आता आम्ही काय करावे 11 त्याने उत्तर दिले ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्याला एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे 12 काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते ते म्हणाले गुरुजी आम्ही काय करावे 13 तो त्यांना म्हणाला तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका 14 काही शिपायांनीसुध्दा त्याला विचारून म्हटले आणि आमच्या बद्दल काय आम्ही काय करावे तो त्यांना म्हणाला कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका कोणावरही खोटा आरोप करू नका तुम्हाला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा 15 तेव्हा लोक उत्सुकतेने वाट पाहत असता प्रत्येक जण आपल्या अंतःकरणात हाच ख्रिस्त असेल काय म्हणून विचार करीत असत 16 त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले तो म्हणाला मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे आणि त्याच्या वाहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील 17 त्याचे खळे अगदी स्वच्छ करायला व गहू त्याच्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे पण तो भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील 18 योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली 19 योहानाने हेरोद या सत्ताधीशाची कानउघडणी केली कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नीशीहेरोदीयाशी अनैतिक संबंध होते तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या 20 हे सर्व करून सुध्दा त्याने आणखी एक दुष्कर्म केले त्याने योहानाला तुरुंगात टाकले 21 तेव्हा असे झाले की जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहाना द्वारे केला जात होता तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले 22 आणि पवित्र आत्मा देह रूपाने कबुतरा प्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस मी तुइयाविषयी फार संतुष्ट आहे 23 जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता लोकांना असे वाटे की येशू योसेफाचा मुलगा आहे योसेफ एलीचा मुलगा होता 24 एली मत्ताथाचा मुलगा होता मत्ताथ लेवीचा मुलगा होता लेवी मल्खीचा मुलगा होता मल्खी यन्रयाचा मुलगा होता यन्रया योसेफाचा मुलगा होता 25 योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता मत्तिथ्य अमोसाचा मुलगा होता अमोस नहूमाचा मुलगा होता नहूम हेस्लीचा मुलगा होता हेस्ली नग्गयाचा मुलगा होता 26 नग्गय महथाचा मुलगा होता महथ मत्तिथ्याचा मुलगा होता मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता शिमयी योसेखाचा मुलगा होता योसेख योदाचा मुलगा होता 27 योदा योहानाचा मुलगा होता योहानान रेशाचा मुलगा होता रेशा जरुब्बाबेलाचा मुलगा होता जरुब्बाबेल शल्तीएलाचा मुलगा होता शल्तीएल नेरीचा मुलगा होता 28 नेरी मल्खीचा मुलगा होता मल्खी अद्दीचा मुलगा होता अद्दी कोसोमाचा मुलगा होता कोसोम एल्मदामाचा मुलगा होता एल्मदाम एराचा मुलगा होता 29 एर येशूचा मुलगा होता येशू अलिएजराचा मुलगा होता अलिएजर योरीमाचा मुलगा होता योरीम मत्ताथाचा मुलगा होता मत्ताथ लेवीचा मुलगा होता 30 लेवी शिमोनाचा मुलगा होता शिमोन यहूदाचा मुलगा होता यहूदा योसेफाचा मुलगा होता योसेफ योनामाचा मुलगा होता योनाम एल्याकीमाचा मुलगा होता 31 एल्याकीम मल्लयाचा मुलगा होता मल्लया मिन्नाचा मुलगा होता मिन्ना मत्ताथाचा मुलगा होता मत्ताथ नाथानाचा मुलगा होता नाथान दाविदाचा मुलगा होता 32 दावीद इशायाचा मुलगा होता इशाय ओबेदाचा मुलगा होता ओबेद बवाजाचा मुलगा होता बवाज सल्मोनाचा मुलगा होता सल्मोन नहशोनाचा मुलगा होता 33 नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता अम्मीनादाब अर्णयाचा मुलगा होता अर्णय हेस्रोनाचा मुलगा होता हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता पेरेस यहूदाचा मुलगा होता 34 यहूदा याकोबाचा मुलगा होता याकोब इसहाकाचा मुलगा होता इसहाक अब्राहामाचा मुलगा होता अब्राहाम तेरहाचा मुलगा होता तेरह नाहोराचा मुलगा होता 35 नाहोर सरुगाचा मुलगा होता सरुग रऊचा मुलगा होता रऊ पेलेगाचा मुलगा होता पेलेग एबराचा मुलगा होता एबर शेलहाचा मुलगा होता 36 शेलह केनानाचा मुलगा होता केनान अर्पक्षदाचा मुलगा होता अर्पक्षद शेमाचा मुलगा होता शेम नोहाचा मुलगा होता नोहा लामेखाचा मुलगा होता 37 लामेख मथुशलहाचा मुलगा होता मथुशलह हनोखाचा मुलगा होता हनोख यारेदाचा मुलगा होता यारेद महललेलाचा मुलगा होता महललेल केनानाचा मुलगा होता 38 केनान अनोशाचा मुलगा होता अनोश शेथाचा मुलगा होता शेथ आदामाचा मुलगा होता आदाम देवाचा मुलगा होता
Chapter 4
अरण्यांत येशूची परीक्षा
1 येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले 2 तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस परीक्षेत टाकले त्यादिवसात येशूने काहीही खाल्ले नाही आणि ती वेळ संपल्यानंतर येशूला भूक लागली 3 तेव्हा सैतान त्याला म्हणाला जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडाची भाकर हो अशी आज्ञा कर 4 येशूने त्याला उत्तर दिले असे लिहिले आहे की मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही 5 मग सैतान त्याला उंच जागेवर घेऊन गेला आणि एका क्षणांत जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली 6 सैतान त्याला म्हणाला मी तुला या सर्व राज्याचे अधिकार वैभव देईन कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो 7 म्हणून जर तू मला नमन करशील आणि माझी उपासना करशील तर हे सर्व तुझे होईल 8 येशूने उत्तर दिले पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर 9 नंतर सैतानाने येशूला यरूशलेमेस नेले आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले आणि तो त्याला म्हणाला जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार 10 असे लिहिले आहे की तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील 11 आणि तुझा पाय दगडावर आपटू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील 12 येशूने उत्तर दिले पवित्र शास्त्रात असेही म्हटले आहे प्रभू तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस 13 म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे परीक्षा घेण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला 14 मग आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालीलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली 15 त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली 16 मग जेथे तो लहानाचा मोठा झाला होता त्या नासरेथांत तो आला आणि शब्बाथ दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे सभास्थानात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी उभा राहिला 17 आणि यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला त्याठिकाणी असे लिहिले आहे 18 प्रभूचा आत्मा मजवर आला आहे कारण यासाठी की गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी 19 आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे मला पाठवले आहे 20 मग त्याने ग्रंथपट बंद करून सभास्थानाच्या सेवकाला परत करून तो खाली बसला सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता 21 त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले आहे 22 तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय 23 येशू त्यांना म्हणाला नक्कीच तुम्ही मलाही म्हण लागू कराल हे वैद्या तू स्वतःलाच बरे कर कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या गावातसुध्दा कर मग तो पुढे म्हणाला 24 मी तुम्हाला खरे सांगतो कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकारला जात नाही 25 मी तुम्हाला खरे सांगतो इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या जेव्हा साडेतीन वर्षापर्यंत आकाशातून पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता 26 तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही त्याला सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले 27 अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुध्द झाला नाही केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुध्द करण्यात आले होते 28 हे एकूण सभास्थानातील सर्व लोक संतापले 29 ते लोक उठले आणि त्यांनी त्याला येशूला शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते त्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले 30 परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला 31 नंतर तो गालीलातील कफर्णहूम गावी गेला तो शब्बाथ दिवशी सभास्थानात त्यास शिक्षण देत होता 32 ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे 33 त्या दिवशी सभास्थानात अशुध्द आत्मा लागलेला एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला 34 हे नासरेथकर येशू तू आमच्यामध्ये का पडतोस तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय तू कोण आहेस हे मला माहीत आहे देवाचा पवित्र तोच तू आहेस 35 येशूने त्याला धमकावून म्हटले शांत राहा आणि त्याच्यातून नीघ तेव्हा त्या अशुध्द आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली पाडले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो त्याच्यातून बाहेर निघाला 36 तेव्हा सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुध्द आत्म्याना देखील आज्ञा करतो व ते बाहेर येतात 37 अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली 38 येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला शिमोनाची सासू खुप तापाने आजारी होती त्यांनी तिला बरे करण्याविषयी त्याला विनंती केली 39 येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले आणि तिच्यातून ताप निघाला ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली 40 सूर्य मावळत असतांना सर्व निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या माणसांना त्याच्याकडे आणले त्याने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले 41 कित्येकांमधून अशुध्द आत्मे बाहेर आले ते अशुध्द आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते तू देवाचा पुत्र आहेस परंतु तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहिती असल्याने त्याने त्यांना दटावले व काही बोलू दिले नाही 42 दिवस उगवताच तो एकांत स्थळी गेला पण लोक त्याला शोधत होते तो जेथे होता तेथे ते लगेच आले आणि त्त्यांच्यातून त्याने निघून जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले 43 परंतु तो त्यांना म्हणाला देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे कारण याच कारणासाठी मला पाठवले आहे 44 मग तो संपूर्ण यहूदिया प्रदेशातील सभास्थानामध्ये उपदेश करीत गेला
Chapter 5
पहिल्या शिष्यांस पाचारण
1 मग असे झाले की तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाच वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले 2 तेव्हा त्याने सरोवरातील दोन होड्या पाहिल्या पण होडीतील कोळी बाहेर गेले होते व त्यांची जाळी धूत होते 3 त्यातील एका तारवात येशू गेला जो शिमोनाचा होता आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले नंतर तो तारवात बसला व लोकांना शिक्षण देऊ लागला 4 त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड 5 शिमोनाने उत्तर दिले गुरुजी संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो 6 मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली 7 तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की ते बुडू लागले 8 हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला प्रभू माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे 9 कारण त्यांनी धरलेल्या माश्यांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण आश्चर्यचकित झाले होते 10 तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले मग येशू शिमोनाला म्हणाला भिऊ नको कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील 11 मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले 12 आणि असे झाले की येशू कुठल्या एका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो पालथा पडला आणि त्याला विनंति केली प्रभूजी जर तुमची इच्छा असेल तर मला शुध्द करण्यास आपण समर्थ आहात 13 तेव्हा येशूने आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले माझी इच्छा आहे शुध्द हो आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले 14 मग येशूने त्याला निक्षून सांगितले की कोणालाही सांगू नकोस पण जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांच्यासाठी ही साक्ष व्हावी म्हणून मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे शुध्दीकरणासाठी अर्पण कर 15 परंतु येशूविषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व आपल्या रोगांपासून बरे होण्यासाठी जमू लागले 16 परंतु येशू रानांमध्ये एकांतात जाऊन प्रार्थना करीत असे 17 असे झाले की एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते जे गालील यहूदीया आणि यरूशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते प्रभूचे सामर्थ्य त्याच्याठायी होते त्यामुळे तो रोग बरे करत असे 18 काही लोक एका पक्षघात झालेल्या मनुष्याला बाजेवर घेऊन आले आणि त्यांनी त्याला आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला 19 परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना म्हणून त्यांनी घराच्या छपरावर चढून त्याला बाजे सकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले 20 त्यांचा विश्वास पाहून येशू म्हणाला मनुष्या तुझ्या पापांची क्षमा झाली आहे 21 नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी स्वतःशी विचार करू लागले हा दुर्भाषण करणारा कोण देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो 22 पण येशूने त्यांचे विचार जाणून त्यांना उत्तर देऊन म्हटले तुम्ही आपल्या अंतःकरणात असा विचार का करता 23 तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा ऊठ आणि चालू लाग यांतील कोणते म्हणणे सोपे आहे 24 पण तुम्हाला हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे म्हणून तो पक्षघात झालेल्या मणुष्याला म्हणला मी तुला सांगतो ऊठ आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा 25 ताबडतोब तो उभा राहिला व ज्या बाजेवर तो झोपला होता ती उचलून घेऊन देवाचे गौरव करीत आपल्या घरी गेला 26 ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि देवाची स्तुती करू लागले ते फार भयभीत होऊन म्हणाले आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत 27 या गोष्टी झाल्यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले येशू त्याला म्हणाला माझ्यामागे ये 28 तेव्हा लेवीने सर्वकाही तेथेच सोडले आणि उठून त्याच्यामागे गेला 29 नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली आणि जकातदारांचा व इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता 30 परंतु परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली ते म्हणाले तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता 31 येशू त्यांना म्हणाला जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही पण जे रोगी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे 32 मी नीतिमानास बोलवण्यास आलो नाही तर पापी लोकास पश्चातापासाठी बोलवायला आलो आहे 33 ते त्याला म्हणाले योहानाचे शिष्य नेहमी उपास आणि प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्यसुध्दा तसेच करतात पण तुझे शिष्य तर खातपीत असतात 34 येशू त्यांना म्हणाला कोण असे करेल वऱ्हाडाबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हाला त्यांना उपास करावयास लावता येईल काय 35 पण असे दिवस येत आहेत की वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्यादिवसात ते उपास करतील 36 त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही 37 आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या द्राक्षारसाच्या कातडी पिशवीत ठेवत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षारस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल 38 नवा द्राक्षारस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे 39 कोणालाही जुना द्राक्षारस प्याल्यानंतर नवा नको असतो कारण तो म्हणतो जुना द्राक्षारसच चांगला आहे
Chapter 6
शब्बाथाचे पालन
1 नंतर असे झाले की एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता आणि त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खात होते 2 मग परूश्यांपैकी काही म्हणाले शब्बाथ दिवशी जे करण्यास योग्य नाही ते तुम्ही का करता 3 येशूने त्यांना म्हटले जेव्हा दावीद व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही काय 4 तो देवाच्या घरात गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीच खाणे योग्य नाही त्या त्याने कशा घेऊन खाल्ल्या व आपल्याबरोबर जे होते त्यांनाही दिल्या 5 आणखी येशू त्यांना म्हणाला मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे 6 असे झाले की दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक मनुष्य तेथे होता 7 येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याच्यावर लक्ष ठेवून होते यासाठी की त्यांना आरोप ठेवण्यासाठी काहीतरी कारण मिळावे 8 परंतु तो त्यांचे विचार जाणून वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा आणि तो मनुष्य उठून तेथे उभा राहिला 9 येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला विचारतो शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे चांगले करणे की वाईट करणे कोणते कायदेशीर आहे एखाद्याचा जीव वाचवणे का त्याचा नाश करणे 10 मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहीले आणि म्हणाला तू आपला हात लांब कर तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला 11 पण परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक खूप रागावले व येशूविषयी काय करता येईल याविषयी आपसात चर्चा करू लागले 12 त्यादिवसात असे झाले की येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालवली 13 जेव्हा दिवस उगवला तेव्हा त्याने शिष्यांना आपणाकडे बोलावले त्याने त्यांच्यातील बाराजणांना निवडले व त्यांना प्रेषित असे नाव दिले 14 शिमोन ज्याला पेत्र हे सुध्दा नाव दिले तो अंद्रिया पेत्राचा भाऊ याकोब आणि योहान फिलिप्प बर्थलमय 15 मत्तय थोमा अल्फीचा पुत्र याकोब शिमोन ज्याला जिलोत म्हणत 16 याकोबचा पुत्र यहूदा व यहूदा इस्कर्योत जो पुढे विश्वासघात करणारा निघाला 17 तो प्रभू येशू त्यांच्याबरोबर डोंगरावरून खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला व यहूदीया यरूशलेम सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते 18 ते तेथे त्याचे ऐकण्यास व आपल्या रोगांपासून बरे होण्यास आले व ज्यांना अशुध्द आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधीपासून मुक्त करण्यात आले 19 सगळा लोकसमुदाय त्याला स्पर्श करू पाहत होता कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते आणि सर्वांना ते बरे करत होते 20 मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला अहो दीनांनो तुम्ही आशीर्वादित आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे 21 अहो जे तुम्ही आता भूकेले आहा ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही तृप्त व्हाल अहो जे तुम्ही आता रडता ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल 22 जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा व्देष करतील आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हाला दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हाला नाकारतील तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल 23 त्या दिवशी आनंद करून उड्या मारा कारण खरोखर स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुध्दा तसेच केले 24 पण श्रीमंतानो तुम्हाला दुःख होवो कारण तुम्हाला अगोदरच सर्व सुख मिळाले आहे 25 जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हाला दुःख होवो कारण तुम्ही भूकेले व्हाल जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल 26 जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हाला दुःख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले 27 परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो तुमच्या शत्रूंवर प्रीती करा जे तुमचा व्देष करतात त्यांचे चांगले करा 28 जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा 29 जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसरापण गाल करा जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्याला तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नको 30 जे तुम्हाला मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमची वस्तु हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको 31 आणि जसे माणसांनी तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा 32 तुमच्यावर जे पीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा तर त्यात तुमचा उपकार तो काय कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात 33 तुमचे जे चांगले करतात त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हाला काय लाभ पापीसुध्दा असेच करतात 34 ज्यांच्याकडून तुम्हाला परत मिळेल अशी आशा असते त्यांना जर उसने देता तर तुम्हाला काय लाभ पापीसुध्दा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात 35 परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे 36 जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा 37 दुसऱ्यांचा न्याय करू नका म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हाला दोषी ठरवले जाणार नाही दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल 38 द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल चांगले माप दाबून हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल 39 त्याने त्यांना एक दाखला सांगितलाः एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय ते दोघेही खड्डयात पडणार नाहीत काय 40 कोणताही शिष्य त्याच्या गुरुपेक्षा थोर नाही पण प्रत्येक शिष्य जेव्हा तो पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच असतो 41 स्वतःच्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यतील कुसळ का पाहतोस 42 अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की भाऊ तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे अरे ढोंग्या प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल 43 कोणतेही चांगले झाड असे नाही की जे वाईट फळ देते किंवा कोणतेही वाईट झाड असे नाही की जे चांगले फळ देते 44 कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते लोक काटेरी झुडुपातून अंजीरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत 45 चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठवलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार 46 तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही 47 प्रत्येक जण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या आज्ञा पाळतो तो कसा आहे हे मी तुम्हाला दाखवितो 48 तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा घरावर आदळला पण पाण्याने ते हलले नाही कारण ते चांगले बांधले होते 49 पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही तो ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे त्या घरावर पाण्याचा लोंढा आदळला आणि ते लागलेच पडले व त्या घराचा मोठा नाश झाला
Chapter 7
शताधिपतीचा चाकर
1 ऐकणाऱ्या लोकांना त्याने आपली सर्व वचने सांगणे संपवल्यानंतर त्याने कफर्णहूमात प्रवेश केला 2 तेव्हा कोणाएका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता 3 मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून तू येऊन माझ्या दासाला वाचवावे अशी त्याला विनंती केली 4 जेव्हा ते येशूजवळ आले तेव्हा त्यांनी त्याला आग्रहाने विनंती केली ज्याच्यासाठी तू हे करावे तो योग्य आहे 5 कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रीती करतो आणि त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले 6 त्यामूळे येशू त्यांच्याबरोबर मार्गात चालत गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता तोच त्या शताधीपतीने मित्रांना त्यांच्याकडे पाठवून म्हटले प्रभू आपण त्रास करून घेऊ नका कारण तुम्ही माझ्या घरी यावे असा मी योग्य नाही 7 त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही परंतु तुम्ही फक्त शब्द बोला म्हणजे माझा सेवक बरा होईल 8 कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत आणि याला मी म्हणतो जा म्हणजे हा जातो व दुसऱ्याला ये म्हणतो म्हणजे तो येतो आणि माझ्या दासाला म्हणतो हे कर म्हणजे तो ते करतो 9 जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्याला त्याच्याविषयी आश्चर्य वाटले तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला मी तुम्हाला सांगतो एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही 10 आणि जे पाठवलेले होते ते घरी परतले तेव्हा त्यांना आढळून आले की तो सेवक बरा झाला आहे 11 आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की तो नाईन नावाच्या गांवाकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते 12 जसा तो गांवाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा कोणाएका मेलेल्या माणसाला बाहेर नेत होते तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते 13 तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला रडू नकोस 14 मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले आणि तो म्हणाला तरूणा मी तुला सांगतो उठ 15 आणि तो मेलेला उठून बसला व बोलू लागला मग येशूने त्याला त्याच्या आईजवळ दिले 16 तेव्हा सर्वांना भय वाटले आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे 17 येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीयात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली 18 योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्वकाही सांगितले 19 नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलावले आणि त्याने त्यांना प्रभूकडे हे विचारण्यासाठी पाठवले की जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी 20 जेव्हा ते लोक त्याच्याकडे आले ते म्हणाले बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हाला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी 21 त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग आजार बरे केले पुष्कळांमधील भुते काढली आंधळ्यांना दृष्टी दिली 22 येशूने त्यांना उत्तर दिले जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा आंधळे पाहतात लंगडे चालतात कुष्ठरोगी शुध्द होतात बहिरे ऐकतात मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात 23 आणि जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो आशीर्वादित आहे 24 मग योहानाचे निरोप्ये गेल्यावर तो योहानाविषयी समुदायांशी बोलू लागला तुम्ही काय पाहायला बाहेर रानांत गेला वाऱ्याने हलवलेला बोरू काय 25 तर तुम्ही काय पाहायला बाहेर गेला मऊ वस्त्रे घातलेल्या माणसाला काय पाहा भडक पोषाख घातलेले व चैनीत असणारे लोक राजवाड्यांत असतात 26 तर तुम्ही काय पाहायाला बाहेर गेला भविष्यवाद्याला काय होय मी तुम्हास सांगतो भविष्यवाद्याहूनही जो अधिक मोठा आहे त्याला 27 पाहा मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे 28 मी तुम्हास सांगतो की स्त्रियांपासून जे जन्मले त्यांच्यांमध्ये योहानापेक्षा मोठा असा कोणी नाही तरी देवाच्या राज्यांत जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षां मोठा आहे 29 आणि जकातदारांसह सर्व लोकांनी ऐकून देव न्यायी आहे असे ठरवले कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता 30 परंतु परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली 31 तर मग मी या पिढीच्या माणसांना कोणती उपमा देऊ आणि ती कशासारखी आहेत 32 जी मुले बाजारामध्ये बसून एकमेकांना हाक मारतात त्यांच्यासारखी ती आहेत ती म्हणतात आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाही आम्ही विलाप केला तरी तुम्ही रडला नाही 33 कारण बाप्तिस्मा करणारा योहान भाकर न खाता आणि द्राक्षरस न पिता आला आहे आणि तुम्ही म्हणता त्याला भूत लागले आहे 34 मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता पाहा हा खादाड माणूस व दारूबाज जकातदारांचा व पाप्यांचा मित्र 35 परंतु ज्ञान आपल्या सर्व लेकरांकडून न्यायी ठरलेले आहे 36 तेव्हा परूश्यांपैकी कोणा एकाने तू माझ्याबरोबर जेवावे अशी येशूला विनंती केली मग तो परूश्याच्या घरात जाऊन जेवायला बसला 37 आणि पाहा कोणीएक पापी बाई त्या नगरांत होती येशू परूश्यांच्या घरात जेवायला बसला आहे हे एेकुण ती सुगंधी तेलाची अलाबास्र कुपी घेऊन आली 38 आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहूून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले 39 तेव्हा ज्या परूश्याने येशूला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनांत म्हटले हा भविष्यवादी असता तर जी बाई त्याला स्पर्श करीत आहे ती कोण व कोणत्या प्रकारची आहे म्हणजे ती पापी आहे हे त्याला कळले असते 40 तेव्हा येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले शिमोना तुझ्याशी मला काही बोलायचे आहे तेव्हा तो म्हणाला गुरूजी बोला 41 एका सावकाराचे दोन कर्जदार होते एकाला पांचशे रुपये देणे होते व दुसऱ्याला पन्नास 42 परंतु कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने दोघांना क्षमा केली तर त्यांच्यापैकी कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील 43 तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले ज्याला अधिक माफ केले तो असे मला वाटते मग येशू त्याला म्हणाला ठीक ठरवलेस 44 तेव्हा त्याने त्या बाईकडे वळून शिमोनाला म्हटले ही बाई तुला दिसते ना मी तुझ्या घरात आलो तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी ते पुसले 45 तू माझा मुका घेतला नाही परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही 46 तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले आहे 47 या कारणासाठी मी तुला सांगतो हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे कारण हिने पुष्कळ प्रीती केली परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो 48 तेव्हा येशूने तिला म्हटले तुझ्या पापांची क्षमा झाली आहे 49 मग त्याच्याबरोबर जेवायला बसले होते ते आपसांत म्हणू लागले पापांची देखील क्षमा करणारा हा कोण आहे 50 मग त्याने त्या बाईला म्हटले तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे शांतीने जा
Chapter 8
येशूची सेवा करण्याऱ्या स्त्रिया
1 त्यानंतर लवकरच असे झाले की तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गांवोगांवी फिरत होता तेव्हा ते बारा जण त्याच्याबरोबर होते 2 दुष्ट आत्मे व दुखणी यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या म्हणजे मग्दालीया म्हटलेल्या मरीयेतून सात भुते निघाली होती ती 3 हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको योहान्ना तसेच सूसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया ह्या आपल्या द्रव्याने त्यांची सेवा करीत असत 4 आणि मोठा समुदाय एकत्र जमला असता व गावोगावचे लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देऊन म्हणाला 5 पेरणारा आपले बी पेरायला निघाला आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले 6 आणि काही खडकाळीवर पडले आणि ते उगवल्यावर वाळून गेले कारण त्याला ओलावा नव्हता 7 आणि काही काटेरी झाडांमध्ये पडले आणि झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली 8 आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगवून त्याला शंभरपट पीक आले असे म्हटल्यावर तो मोठ्याने म्हणाला ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको 9 तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले ह्या दाखल्याचा अर्थ काय अाहे 10 मग तो म्हणाला देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हाला दिली आहे परंतु बाकीच्या लोकांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये 11 तर दाखला हा आहे बी हे देवाचे वचन आहे 12 आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो 13 आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात पण त्यांना मूळ नसते ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात 14 आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत पण पुढे जातां जातां चिंता व धन व ह्या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार पीक देत नाहीत 15 पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत् की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात 16 आणि कोणी दिवा लावल्यावर तो भांड्याने झाकत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो 17 कारण प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही 18 म्हणून तुम्ही कसे ऐकता यांविषयी जपा कारण ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल 19 तेव्हा त्याची आई व भाऊ त्याच्याकडे आली आणि दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना 20 तेव्हा कोणी त्याला सांगितले तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटायला पाहत असून बाहेर उभे राहिले आहेत 21 आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ आहेत 22 आणि त्यादिवसात असे झाले की तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली 23 नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला मग सरोवरांत वाऱ्याचे वादळ सुटले आणि जहाज पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले 24 तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले गुरुजी आम्ही बुडत आहो तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले 25 तेव्हा तो त्यांना म्हणाला तुमचा विश्वास कोठे आहे आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले हा आहे तरी कोण की वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती यांचे ऐकतात 26 मग ते गालीलाच्या समोरील गरसेकरांच्या देशास पोहोचले 27 आणि तो जमिनीवर उतरला तेव्हा नगरातील कोणीएक माणूस त्याला भेटला त्याला पुष्कळ भुते लागली होती व तो बऱ्याच काळापासून काही वस्र नेसला नव्हता व घरात न राहतां तो थडग्यांमध्ये राहत होता 28 तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा माझा तुझा काय संबध मी तुला विनंती करतो मला पिडू नको 29 कारण तो त्या अशुध्द आत्म्याला त्या माणसांतून निघून जाण्याची आज्ञा करीत होता कारण त्याने त्याला पुष्कळ वेळा धरले होते आणि लोक त्याला पहाऱ्यांत ठेवून साखळ्यांनी व बेड्यांनी बांधीत असत पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानांमध्ये हांकून लावला जात असे 30 आणि येशूने त्याला विचारले तुझे नाव काय तेव्हा त्याने म्हटले सैन्य कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती 31 आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको अशी ती भुते त्याला विनंती करीत होती 32 तेव्हा तेथे पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता आणि त्यांमध्ये शिरायला तू आम्हास परवानगी द्यावी अशी त्यांनी विनंती केली मग त्याने त्यांना परवानगी दिली 33 तेव्हा ती भुते त्या माणसांतून निघून त्या डुकरांमध्ये शिरली आणि तो कळप कड्यावरून धडक धावंत जाऊन खाली सरोवरात पडला व गुदमरून मेला 34 मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले 35 तेव्हा जे झाले ते पाहायला ते लोक बाहेर निघाले आणि येशूकडे आले आणि ज्या माणसांतून भुते निघाली होती तो वस्र पांघरलेला व शुध्दीवर आलेला असा येशूच्या पायांजवळ बसलेला त्यांना आढळला आणि ते भ्याले 36 मग ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यांना सांगितले 37 तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या भागांतील सर्व लोकांनी त्याला विनंती केली की तू आमच्यापासून जावे कारण ते मोठ्या भयाने व्याप्त झाले होते मग तो मचव्यात बसून माघारी आला 38 आणि ज्या माणसांतून भुते निघाली होती तो मला तुमच्याबरोबर राहू दयावे अशी येशूजवळ विनंती करीत होता परंतु तो त्याला निरोप देऊन म्हणाला 39 तू आपल्या घरी परत जा व देवाने तूझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते साग मग तो निघून येशूने त्याच्यासाठी केवढी मोठी कामे केली होती ते त्या सबंध नगरांतून घोषित करत गेला 40 नंतर येशू परत आल्यावर समुदायाने त्याला आनंदाने अंगीकारले कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते 41 तेव्हा पाहा याईर नावाचा कोणी माणूस आला तो तर सभास्थानाचा अधिकारी होता आणि त्याने येशूच्या पाया पडून तू माझ्या घरी यावे अशी त्याला विनंती केली 42 कारण त्याला सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते 43 आणि बारा वर्षे रक्तस्त्राव होत असलेली कोणीएक बाई जी आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून कोणाकडूनही निरोगी होईना 44 तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्राच्या कांठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला 45 मग येशू म्हणाला मला कोणी स्पर्श केला तेव्हा सर्व जण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्याला म्हणाले हे गुरूजी समुदाय दाटी करून तुम्हाला चेंगरीत आहेत 46 तेव्हा येशू म्हणाला कोणीतरी मला स्पर्श केला कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले 47 मग ती बाई आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून थरथर कांपत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले 48 तेव्हा त्याने तिला म्हटले मुली तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे शांतीने जा 49 तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला तुझी मुलगी मरण पावली आहे गुरूजीला आणखी श्रम देऊ नका 50 पण येशूने ते ऐकून त्याला उत्तर दिले भिऊ नको विश्वास मात्र धर म्हणजे ती बरी केली जाईल 51 मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा बाप व तिची आई यांच्यावांचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही 52 आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते पण तो म्हणाला रडू नका कारण ती मेली नाही तर झोपेत आहे 53 तरी ती मेलीच आहे हे जाणून ते त्याला हसू लागले 54 पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले मुली ऊठ 55 तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली मग तिला खायाला द्यावे अशी त्याने आज्ञा केली 56 आणि तिचे आईबाप थक्क झाले परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले
Chapter 9
बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठवणे
1 मग त्याने त्या बारा जणांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करायला सामर्थ्य व अधिकार दिला 2 आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले 3 तो त्यांना म्हणाला वाटेसाठी काही घेऊ नका काठी किंवा झोळी किंवा भाकर किंवा पैसा घेऊ नका आणि दोन दोन अंगरखेही घेवू नका 4 आणि ज्या कोणत्याही घरात तुम्ही जाल तेथेच राहा व तेथूनच निघून जा 5 आणि जितके तुम्हाला अंगीकारीत नाहींत तितक्यांच्याविरुध्द साक्ष व्हावी म्हणून तुम्ही त्या नगरातून निघते वेळी आपल्या पायांची धूळ झाडून टाका 6 तेव्हा ते निघाले आणि सर्व ठिकाणी सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गांवोगांवी फिरत गेले 7 घडत असलेल्या सर्व गोष्टी ऐकून हेरोद राजा फार घोटाळ्यात पडला कारण योहान मेलेल्यांमधून उठला आहे असे कित्येक म्हणत होते 8 आणि कित्येक म्हणत होते की एलिया प्रकट झाला आहे आणि दुसरे म्हणत होते की पुरातन भविष्यवाद्यांतील कोणीएक उठला आहे 9 तेव्हा हेरोद म्हणाला योहानाचे शीर मी तोडले पण ज्याच्याविषयी अशा गोष्टी मी ऐकतो तो हा कोण आहे आणि तो त्याला भेटायला पाहत होता 10 मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्याला सविस्तर सांगितले मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला 11 परंतु ह्याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्यामागे गेले तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलूं लागला आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले 12 दिवस संपत आला तेव्हा बारा जण जवळ येऊन त्याला म्हणाले समुदायाला निरोप दे म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो 13 पण तो त्यांना म्हणाला तुम्हीच त्यांना खायला द्या ते म्हणाले आम्ही जाऊन ह्या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही 14 कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा 15 मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले 16 त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले 17 तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले 18 आणि असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते तेव्हा त्याने त्यांना विचारून म्हटले लोकसमुदाय मला कोण म्हणून म्हणतात 19 मग त्यांनी उत्तर देऊन म्हटले बाप्तिस्मा करणारा योहान पण कित्येक म्हणतात एलीया व कित्येक म्हणतात की पुरातन भविष्यवाद्यांतील कोणीएक पुन्हा उठला आहे 20 त्याने त्यांना म्हटले पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले देवाचा ख्रिस्त 21 पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली 22 आणि म्हटले मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि वडील व मुख्य याजक व नियमशास्र शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे ह्याचे अगत्य आहे 23 आणि तो सर्वांना म्हणाला जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे 24 कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्याला गमावील परंतु जो कोणी माझ्याकरता आपला जीव गमावील तो त्याला वाचवील 25 कारण माणसाने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ होईल 26 जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयींची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या व बापाच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील 27 आणि मी तुम्हास खचीत सांगतो की येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही 28 आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसांनी असे झाले की पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला 29 तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे लखलखीत झाले 30 आणि पाहा दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते हे मोशे व एलीया होते 31 ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते 32 तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोंपेने भारावले होते परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज आणि जे दोन पुरूष त्याच्याजवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले 33 मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले हे गुरु येथे असणे आम्हास बरे आहे तर आम्ही तीन मंडप करू तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक आपण काय बोलत आहोत याचे त्याला भान नव्हते 34 तो या गोष्टी बोलत असता एक ढग येऊन त्यांच्यावर सावली करू लागला आणि ते ढगांत शिरले तेव्हा ते भ्याले 35 आणि ढगांतून वाणी आली ती म्हणाली हा माझा निवडलेला पुत्र आहे याचे तुम्ही ऐका 36 आणि ही वाणी झाल्यावर येशू एकटाच दिसला आणि ते उगेच राहिले व ज्या गोष्टी त्यांनी पहिल्या होत्या त्यांतले कांहींच त्यांनी त्या दिवसांमध्ये कोणाला सांगितले नाही 37 आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला भेटला 38 तेव्हा पाहा समुदायातील एक माणूस मोठ्याने ओरडून म्हणाला हे गुरु मी तुला विनंती करतो माझ्या मुलाकडे पाहा कारण तो माझे एकुलते मूल आहे 39 आणि पाहा कोणी आत्मा त्याला धरतो आणि हा एकाएकी ओरडतो मग तो ह्याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो तो याला पुष्कळ त्रास देतो व ह्याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो 40 आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली परंतु त्यांच्याने तो निघेना 41 तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले हे अविश्वासी व विपरीत पिढी मी कोठपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू तू आपल्या मुलाला इकडे आण 42 मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्याला खाली आपटले व भारी पिळून टाकले पण येशूने त्या अशुध्द आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले 43 मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्व जण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला 44 या गोष्टी तुम्ही लक्षांत ठेवा कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे 45 परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही व त्यांना ते समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते आणि ते या बोलण्याविषयी त्याला विचारायला भीत होते 46 त्यानंतर आपणांमध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला 47 तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्याला आपल्यापाशी उभे केले 48 आणि त्यांना म्हटले जो कोणी माझ्या नावाने या बालकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो कारण तुम्हा सर्वांमध्ये जो सर्वांहून लहान आहे तोच मोठा आहे 49 तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले हे गुरु आम्ही कोण एकाला तुझ्या नावाने भुते काढतांना पाहिले आणि आम्ही त्याला मना केले कारण तो आमच्याबरोबर तुझ्यामागे चालत नाही 50 तेव्हा येशूने त्याला म्हटले मना करू नका कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे 51 आणि असे झाले की त्याला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा यरूशलेमेस जाण्याच्या दृढनिश्चयाने त्याने आपले तोंड वळवले 52 मग त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शोमरोन्यांच्या एका गावात गेले 53 पण त्यांनी त्याला अंगीकारले नाही कारण यरूशलेमेकडे जाण्याचा त्याचा रोख होता 54 तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले हे प्रभू एलीयाने केले होते तसेच आकाशांतून अग्नीने पडून त्याचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी तुझी इच्छा आहे काय 55 परंतु त्याने वळून त्यांना धमकावले आणि म्हटले तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहा हे तुम्हास ठाऊक नाही 56 कारण मनुष्याचा पुत्र माणसांच्या जीवाचा नाश करायला नाही तर त्यांना तारायला आला आहे मग ते दुसऱ्या गावाला गेले 57 आणि ते वाटेने चालत असता कोणीएक त्याला म्हणाला जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन 58 तेव्हा येशू त्याला म्हणाला खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरांस घरटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही 59 मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले माझ्यामागे ये परंतु तो म्हणाला हे प्रभू पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या बापाला पुरूं दे 60 तेव्हा येशूने त्याला म्हटले मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे परंतु तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर 61 तेव्हा आणखी एकजण म्हणाला हे प्रभू मी तुझ्यामागे येईन परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहे त्यांचा निरोप घेऊ दे 62 पण येशूने त्याला म्हटले जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही
Chapter 10
सत्तर शिष्यांची कामगिरी व त्यांचे पुनरागमन
1 ह्यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले 2 तो त्यांना म्हणाला पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहेत यास्तव पिकाच्या प्रभूने आपल्या पिकात कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा 3 जा पाहा लांडग्यांच्या मध्ये जसे कोंकरांस पाठवावे तसे मी तुम्हास पाठवतो 4 पिशवी किंवा झोळी किंवा वाहणा घेऊ नका व वाटेने कोणाला सलाम करू नका 5 तुम्ही ज्या कोणत्याही घरात जाल तेथे पहिल्याने या घराला शांती असो असे म्हणा 6 जर तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तुमची शांती त्याच्यावर राहील पण तो नसला तर ती तुमच्याकडे परत येईल 7 तुम्ही त्याच घरात राहून ते देतील ते खातपीत जा कारण कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे घरोघरी फिरू नका 8 आणि तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुम्हाला स्वीकारतो त्यांत ते जे तुमच्यापुढे वाढतील ते खा 9 आणि त्यांत जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे 10 परंतु तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुमचे स्वागत नाही केले तर रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा 11 तुमच्या नगराची धूळ आमच्या पायांला लागली ती देखील आम्ही तुमच्याविरुध्द झाडून टाकतो तरी हे जाणा की देवाचे राज्य जवळ आले आहे 12 मी तुम्हाला सांगतो की त्या दिवशी सदोमाला त्या नगरापेक्षां अधिक सोपे जाईल 13 हे खोराजीना तुला हायहाय हे बेथसैदा तुला हायहाय कारण तुमच्यामध्ये जी सामर्थ्याची कृत्ये होत आहेत ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये झाली असती तर त्यांनी मागेंच गोणताट अंगावर घेऊन व राखेत बसून पश्चाताप केला असता 14 ह्यामूळे न्यायकाळी सोर व सिदोन यांना अधिक सोपे जाईल 15 हे कफर्णहूमा तू आकाशापर्यंत उंचावला जाशील काय तू नरकापर्यंत उतरशील 16 जो शिष्यांचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो शिष्यांना नाकारतो तो मला नाकारतो आणि जो मला नाकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला नाकारतो 17 ते सत्तर लोक आनंदाने परतले आणि म्हणाले प्रभू तुझ्या नावाने भूतेसुध्दा आम्हाला वश होतात 18 तेव्हा तो त्यांना म्हणाला मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले 19 पाहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हाला अपाय होणार नाही 20 तथापि तुम्हाला भुते वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना 21 त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुध्दीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस होय पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस 22 माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे 23 आणि शिष्यांकडे वळून तो एकांतात बोलला तुम्ही जे पाहता ते पाहणारे डोळे धन्य 24 मी तुम्हास सांगतो अनेक राजांनी व संदेष्ट्यांनी तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छा बाळगली परंतु त्यांनी ते पाहिले नाही आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्याची इच्छा बाळगली परंतु त्यांनी ते ऐकले नाही 25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला गुरुजी अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहीजे 26 तेव्हा येशू त्याला म्हणाला नियमशास्त्रात काय लिहिले आहे तू त्यांत काय वाचतोस 27 तो म्हणाला तू तुझा देव प्रभू याच्यावर पूर्ण अंतःकरणाने पूर्ण आत्म्याने पूर्ण शक्तिने प्रीती कर व स्वतःवर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर 28 तेव्हा येशू त्याला म्हणाला तू बरोबर उत्तर दिलेस हेच कर म्हणजे तू जगशील 29 पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले मग माझा शेजारी कोण 30 येशूने उत्तर दिले एक मनुष्य यरुशलेमाहून यरीहोस निघाला होता आणि तो लुटारुंच्या हाती सापडला त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारले व त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले 31 तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता याजकाने त्याला पाहिले पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला 32 त्याच रस्त्याने एक लेवी त्याठिकाणी आला लेव्याने त्याला पाहिले व तो सुध्दा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला 33 मग एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत असता तो होता तेथे आला त्या मनुष्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला 34 तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षारस ओतून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या गाढवावर बसवून त्याला उतारशाळेत आणले व त्याची देखभाल केली 35 दुसऱ्या दिवशी त्याने दोन दीनार सुमारे वीस रुपये काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन 36 लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते 37 तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला ज्याने त्याच्यावर दया केली तो तेव्हा येशू त्याला म्हणाला जा आणि तूही तसेच कर 38 मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता तो एका गावात आला तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले 39 तिला मरीया नावाची एक बहीण होती ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली 40 पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली ती येशूकडे आली आणि म्हणाली प्रभू माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय तेव्हा मला मदत करायला तिला सांग 41 प्रभूने उत्तर दिले मार्था मार्था तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस 42 पण एक गोष्ट आवश्यक आहे हे मी सांगतो कारण मरीयेने तिच्यासाठी चांगला वाटा निवडला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही
Chapter 11
प्रभुची प्रार्थना
1 मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता ती संपल्यावर शिष्यांपैकी एकजण त्याला म्हणाला प्रभू जसे योहानाने त्याच्या शिष्यांना शिकवले त्याचप्रमाणे तुम्ही देखिल आम्हाला प्रार्थना करायला शिकवा 2 मग तो त्यांना म्हणाला जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणाःहे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो 3 आमची दररोजची लागणारी भाकर आम्हास दे 4 आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाइटापासून सोडव 5 मग येशू त्यास म्हणाला समजा तुमच्यापैकी असा कोण आहे ज्याला मित्र आहे आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला मित्रा मला तीन भाकरी उसन्या दे 6 कारण माझा मित्र नुकताच प्रवास करून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीही नाही 7 आणि तो मनुष्य आतून म्हणाला मला त्रास देऊ नको मी अगोदरच दार लावलेले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत मी तुला भाकर देण्यासाठी उठू शकत नाही 8 मी तुम्हाला सांगतो की जरी तो उठून त्याला काही देण्यासाठी टाळाटाळ करीत असेल तरी त्याच्या मित्राच्या आग्रहामुळे तो खात्रीने उठून त्याला जितक्या भाकरींची गरज आहे तितक्या त्याला देईल 9 आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल 10 कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल 11 तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल 12 किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंचू देईल 13 जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हाला तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल 14 येशू एक भूत काढीत होता ते मुके होते मग असे झाले की जो मनुष्य बोलू शकत नव्हता ते भूत बाहेर आल्यावर तो बोलू लागला व लोकांचा जमाव अाश्चर्यचकित झाला 15 परंतु त्या जमावातील काही लोक म्हणाले की भूतांचा अधिपती जो बालजबूल याच्या साहाय्याने तो भुते काढतो 16 आणि काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले 17 पण त्यांच्या मनात काय होते हे तो जाणून होता म्हणून तो त्यांना म्हणाला आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरातील लोक एकमेकांविरुध्द भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात 18 आणि तुम्ही म्हणता तशी जर भूतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल मी तुम्हाला हे विचारतो कारण तुम्ही म्हणता मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो 19 पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो तर तुमचे शिष्य कोणाच्या साहाय्याने भुते काढतात म्हणून तेच तुमचा न्याय करतील 20 परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भुते काढतो तर मग यावरुन हे स्पष्टच आहे की देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे 21 जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते 22 परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव करतो तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने विश्वास ठेवला होता ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो 23 जो माझ्या पक्षाचा नाही तो माझ्याविरुध्द आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही तर तो उधळून टाकतो 24 जेव्हा भूत मनुष्याबाहेर येते व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते पण त्याला ती विश्रांती मिळत नाही तेव्हा तो म्हणतो मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन 25 तो त्या घराकडे परत जातो आणि तेव्हा त्याला ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते 26 नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे घेतो आणि ते त्या घरात जातात आणि तेथेच राहतात तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते 27 तो या गोष्टी बोलला तेव्हा असे घडले की गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली धन्य ते गर्भाशय ती माता किंवा ते उदर ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस 28 परंतु तो म्हणाला जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे आशीर्वादित 29 जसजसा लोकसमुदाय वाढू लागला तेव्हा तो बोलू लागला ही पिढी दुष्ट पिढी आहे ती चिन्ह मागत आहे आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही 30 कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल 31 दक्षिणेकडची राणी न्यायाच्या दिवशी या पिढीबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील कारण ती पृथ्वीच्या टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली आणि पाहा शलमोनापेक्षाही थोर असा एक येथे आहे 32 न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चाताप केला आणि पाहा योनापेक्षाही थोर असा एक येथे आहे 33 कोणीही दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत तर आत येणाऱ्यांना प्रकाश दिसवा म्हणून तो दिवठणीवर ठेवतात 34 डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे जर तुमचे डोळे चांगले आहेत तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे 35 पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारमय आहेत म्हणून तुमच्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना याची काळजी घ्या 36 जर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय आहे आणि त्याच्यातील कोणताही भाग अंधकारमय नाही तर जशी दिव्याची प्रकाशकिरणे तुला प्रकाश देतात तसे ते तुला पूर्णपणे प्रकाशित करील 37 येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परूश्याने त्याला आपल्या घरी येऊन स्वतः बरोबर जेवायला बोलावले तो आत गेला आणि आपल्या जागी जेवायला बसला 38 परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परूश्याला फार आश्चर्य वाटले 39 तेव्हा प्रभू त्याला म्हणाला तुम्ही परूशी प्याला व ताट बाहेरुन साफ करता पण तुम्ही आतून लोभीपणाने व दुष्टतेने भरलेले आहात 40 अहो बुध्दीहीन मनुष्यांनो ज्याने बाहेरील बाजू बनवली त्यानेच आतली बाजू बनवली नाही का 41 पण जे आतमध्ये आहे ते गरीबांना द्या आणि नंतर सर्वकाही तुमच्यासाठी शुध्द होईल 42 परंतु तुम्हा परूश्यांना हायहाय असो कारण तुम्ही पुदिना जीरे व प्रत्येक भाजीपाल्याचा दशांश देता परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रीती याकडे दुर्लक्ष करता तुम्ही नितीने जगावे व देवावर प्रीती करणे या गोष्टी प्रथम करणे आवश्यक आहे त्याचवेळेस इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये 43 तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्हाला सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते 44 तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरासारखे आहात अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात 45 एक नियमशास्त्राचा शिक्षक येशूला म्हणाला गुरुजी तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुध्दा अपमान करता 46 तेव्हा येशू म्हणाला नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे त्यांच्यावर लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुध्दा मदत करीत नाही 47 तुमचा धिक्कार असो कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता 48 असे करून तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता 49 यामुळे देवाचे ज्ञानसुध्दा असे म्हणाले मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवील त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील 50 तर भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दलचा दंड या पिढीस भरून द्यावा लागेल 51 होय मी तुम्हास खरोखर सांगतो की हाबेलाच्या रक्तापासून ते देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मारल्या गेलेल्या जखऱ्या याच्या रक्तापर्यंत या पिढीला जबाबदार धरण्यात येईल 52 तुम्हा नियमशास्त्र शिक्षकांची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला तुम्ही स्वतः आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांनाही जाऊ दिले नाही 53 येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याचा फार विरोध करू लागले व त्याला अनेक गोष्टींविषयी प्रश्न विचारु लागले 54 तो जे बोलेल त्या शब्दांमध्ये त्याला पकडण्यासाठी ते टपून होते
Chapter 12
ढोंगाविरूद्ध येशू आपल्या शिष्यांस इषारा देतो
1 आणि त्यादरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता अाणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोललाः परूश्यांच्या खमिराविषयी जपा म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी जपा 2 उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही 3 म्हणून तुम्ही जे काही अंधारात बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि तुम्ही कोणाच्या कानात जे काही एकांतात सांगाल ते घराच्या छपरावरुन घोषित केले जाईल 4 परंतु माझ्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही 5 तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ठार मारल्यांनतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे त्याची भीती धरा होय मी तुम्हास सांगतो त्याचेच भय धरा 6 पाच चिमण्या दोन पैशांना विकतात की नाही तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही 7 पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत भिऊ नका पुुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही किमंती आहात 8 जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो त्या प्रत्येक मनुष्याला देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील 9 परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल 10 प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुध्द बोलतो त्याला क्षमा केली जाईल परंतु जो पवित्र आत्म्याविरुध्द दुर्भाषण करतो त्याला क्षमा केली जाणार नाही 11 जेव्हा ते तुम्हाला सभास्थाने राज्यकर्ते व अधिकारी यांच्यासमोर धरुन आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका 12 कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्याचवेळी तुम्हाला शिकवील 13 नंतर लोकसमुदायातील एकजण त्याला म्हणाला गुरुजी माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा 14 परंतु येशू त्याला म्हणाला मनुष्या मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले 15 मग येशू त्यांना म्हणाला सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही 16 नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितलाः कोणाएका धनवान मनुष्याच्या शेतजमिनीत फार उत्तम पीक आले 17 तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला मी काय करू कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही 18 मग तो असे म्हणाला मी आता असे करतो मी माझी धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीतो मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन 19 आणि मी माझ्या जीवाला म्हणेन हे जीवा आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत आराम कर खा पी आणि मजा कर 20 पण देव त्याला म्हणतो अरे मूर्खा जर आज तूझा जीव गेला तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील 21 जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही अशा मनुष्यासारखे हे आहे 22 मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला म्हणून मी तुम्हास सांगतो स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका 23 कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर महत्त्वाचे आहे 24 कावळ्यांचा विचार करा ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत त्यांना कोठार नाही व कणगीही नाही तरीही देव त्याचे पोषण करतो पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलवान आहात 25 चिंता करून तुम्हापैकी कोण स्वतःच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास कोण समर्थ आहे 26 ज्याअर्थी तुम्हीही सर्वात लहान गोष्ट करू शकत नाही तर इतर गोष्टींविषयीची चिंता का करता 27 रानफुले कशी वाढतात याचा विचार करा ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत तरी मी तुम्हाला सांगतो शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही सजला नव्हता 28 तर जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला देवाने असा पोशाख घातला आहे तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हाला तो कितीतरी अधिक चांगला पोशाख घालणार नाही काय 29 तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी काळजीत असू नका आणि या गोष्टींविषयी चिंता करू नका 30 कारण जगातील राष्ट्रे हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची तुम्हाला गरज आहे हे तुमच्या पित्याला माहीत आहे 31 त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील 32 हे लहान कळपा भिऊ नको कारण तुम्हाला त्याचे राज्य द्यावे यात पित्याला संतोष वाटतो 33 तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही 34 कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल 35 तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या 36 लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून तो परत येतो व दार ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दार उघडावे 37 मालक परत आल्यावर जे नोकर त्याला जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य मी तुम्हाला खरे सांगतो तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील 38 तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो जर ते नोकर त्याला तयारीत आढळतील तर ते धन्य 39 परंतु याविषयी खात्री बाळगा चोर केव्हा येणार हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर त्याने आपले घर त्याला फोडू दिले नसते 40 तुम्हीही तयार असा कारण तुम्हाला वाटत नाही अश्या क्षणी मनुष्याचा पुत्र येईल 41 मग पेत्र म्हणाला प्रभू तुम्ही हा दाखला आम्हालाच सांगत आहात की सर्वांना 42 तेव्हा प्रभू म्हणाला प्रभू त्याच्या इतर नोकरांना त्यांचे धान्य योग्यवेळी देण्यासाठी ज्याची नेमणूक करील असा शहाणा व विश्वासू नोकर कोण आहे 43 त्याचा मालक येईल त्यावेळी असे करताना जो नोकर त्याला आढळेल तो धन्य 44 मी तुम्हाला खरे सांगतो मालक त्याला त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील 45 पण जर तो नोकर मनात म्हणतो माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरूष नौकरांना मारहाण करायला व खाण्यापिण्यास सुरुवात करतो व झिंगतो 46 तर तो नोकर वाट पाहत नाही त्या दिवशी आणि त्याला माहीत नाही अशा वेळी त्याचा मालक येईल व त्याला कापून त्याचे तुकडे करील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा ठेवील 47 आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही त्या नोकराला खूप मार मिळेल 48 परंतु ज्याला माहीती नव्हते म्हणून त्याने मालकाला न आवडणारे असे कृत्य जर नोकराने केले असेल तर त्याला कमी मार बसेल ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल 49 मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आणि जर ती अगोदरच पेटलेली असेल तर मग मला आणखी काय पाहीजे 50 मला बाप्तिस्मा घ्यावयाचा आहे आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे 51 मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे असे तुम्हाला वाटते का नाही मी तुम्हाला सांगतो मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे 52 मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकाविरुध्द फूट पडेल तिघे दोघांविरुध्द व दोघे तिघांविरुध्द अशी फूट पडेल 53 त्यांच्यात पित्याविरुध्द मुलगा व मुलाविरुध्द पिता अशी फूट पडेल आईविरुध्द मुलगी व मुलीविरुध्द आई अशी फूट पडेल सासूविरुध्द सून व सुनेविरुध्द सासू अशी त्यांच्यात फूट पडेल 54 तो लोकसमुदायाला म्हणाला जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की पाऊस पडेल आणि तसेच घडते 55 जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसेच घडते 56 अहो ढोंग्यांनो तुम्हाला पृथ्वीवरील व आकाशातील चिन्हांची लक्षणे पारखता येतात पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हाला का काढता येत नाही काय 57 आणि तुम्ही तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्ही स्वतःचे स्वतःच का ठरवीत नाही 58 तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हाला न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुम्हाला दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील आणि अधिकारी तुम्हाला तुरुंगात टाकील 59 मी तुम्हाला सांगतो अगदी शेवटली दमडी न दमडी फेडीपर्यंत तुम्ही तेथून सुटणारच नाही
Chapter 13
पश्चात्ताप करण्याविषयी बोध
1 त्यावेळी येशूला तेथे उपस्थित लोकांनी पिलाताने गालीलातील मनुष्यांचे रक्त त्यांच्याच यज्ञपशूंच्या रक्तात कसे मिसळले त्यांचाही यज्ञपशुंप्रमाणेच नरबळी कसा दिलोते त्याविषयी सांगितले 2 त्याने त्यांना उत्तर दिले ह्या गालीलकरांनी हे जे दुःख भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते असे तुम्हाला वाटते का 3 मी तुम्हास सांगतो की असे नाही जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल 4 किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठरा जण यरूशलेम येथे राहणाऱ्या ईतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते का 5 नाही मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही पश्चत्ताप केला नाही तर तुम्ही सर्व जण त्यांच्यासारखे मराल 6 नंतर त्याने हा दाखला सांगितला एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते त्यावर काही फळ असेल म्हणून तो ते पाहावयास आला परंतु त्याला काहीही आढळले नाही 7 म्हणून तो माळ्याला म्हणाला पाहा या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे परंतु मला त्यावर काही आढळत नाही ते तोडून टाक उगाच त्याने जागा तरी का अडवावी 8 माळ्याने उत्तर दिले मालक हे एवढे एक वर्षभर ते राहू द्या म्हणजे मी त्याच्याभोवती खणून त्याला खत घालीन 9 मग येत्या वर्षात फळ आले तर छानच जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे 10 आणि शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता 11 तेथे एक स्त्री होती तिला अशुध्द आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते 12 येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला बाई तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस 13 नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली 14 नंतर येशूने तिला बरे केले होते तो शब्बाथाचा शब्बाथ दिवशी कोणतेही काम करू नये असा यहूद्यांचा नियम आहे दिवस होता म्हणून सभास्थानाचा अधिकारी त्याच्यावर रागावला तो लोकांना म्हणाला काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका 15 येशूने त्याला उत्तर दिले आणि म्हणाला ढोंग्यांनो तुम्हापैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का 16 ही तर अब्राहामाची कन्या आहे सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय 17 तो असे म्हणाल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला 18 मग तो म्हणाला देवाचे राज्य कशासारखे आहे आणि मी त्याला कशाची उपमा देऊ 19 देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला व ते वाढून त्याचे मोठे झाड झाले आणि आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली 20 तो पुन्हा म्हणाला मी देवाच्या राज्याला आणखी कशाची उपमा देऊ 21 ते खमिरासारखे पिठ किंवा इतर पदार्थांना आंबविण्यासाठी उपयोगात येणारा पदार्थ आहे एका स्त्रीनेे तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले 22 येशू यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता गांवागांवातून आणि खेड्यापाड्यांतून तो लोकांना शिकवीत होता 23 कोणीतरी त्याला विचारले प्रभू अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल कातो त्यांना म्हणाला 24 अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा कारण मी तुम्हाला सांगतो की पुष्कळजण आत येण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना ते शक्य होणार नाही 25 घराच्या मालकाने उठून दार बंद केल्यावर तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोठवाल आणि म्हणाल प्रभू आम्हासाठी दार उघडा परंतु तो तुम्हाला उत्तर देईल तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही 26 नंतर तुम्ही म्हणाल आम्ही तुमच्याबरोबर जेवलो आम्ही तुमच्याबरोबर प्यालो आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले 27 आणि तो तुम्हाला म्हणेल तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही अन्याय करणाऱ्यांनो तुम्ही सर्व माझ्यापासून दूर व्हा 28 तेथे रडणे व दात खाणे चालेल तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल 29 आणि लोक पूर्वेकडून पश्चिमेकडून उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील 30 जे शेवटचे आहेत ते पहिले होतील व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील हे लक्षात ठेवा 31 त्यावेळी काही परूशी येशूकडे आले आणि ते त्याला म्हणाले येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा कारण हेरोद तुम्हाला ठार मारणार आहे 32 येशू त्यांना म्हणाला जा आणि त्या कोल्ह्याला सांगा ऐक मी लोकांतून भुते काढीन आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन 33 तरीही आज उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टा यरुशलेमाबाहेर मारला जावा हे शक्य नाही 34 यरुशलेमे यरुशलेमे जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे कितीतरी वेळा तुम्हा लोकांना एकवटण्याची माझी इच्छा होती पण तुमची तशी इच्छा नव्हती 35 पाहा देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे मी तुम्हाला सांगतो देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही
Chapter 14
जलोदर झालेल्या मनुष्यास शब्बाथ दिवशी बरे करणे
1 एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्याच्या एकाच्या घरी जेवावयास गेला तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते 2 आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता 3 येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही 4 परंतु ते गप्पच राहिले तेव्हा येशूने त्या आजारी माणसाला धरुन त्याला बरे केले व त्याला पाठवून दिले 5 मग तो त्यांना म्हणाला जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही काय 6 आणि ह्या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही 7 नंतर आमंत्रित पाहुणे स्वतःसाठी मानाच्या जागा कसे निवडून घेत होते हे पाहून त्याने त्यांना एक दाखला सांगितला तो म्हणाला 8 जेव्हा एखादा तुम्हाला लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या माणसाला त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल 9 मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हाला म्हणेल या माणसाला तुझी जागा दे मग अपमानित होऊन तुम्हाला खालच्या जागी बसावे लागेल 10 पण जेव्हा तुम्हाला आमंत्रित केलेले असेल तेव्हा जा आणि अगदी खालच्या शेवटच्या जागी जाऊन बसा यासाठी की जेव्हा यजमान येईल तेव्हा तो तुम्हाला म्हणेल मित्रा वरच्या आसनावर येऊन बैस तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल 11 कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल 12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्याला तो म्हणाला तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना भावांना किंवा तुझ्या नातेवाईकांना वा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशारीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल 13 पण जेव्हा तू मेजवानी देशील तेव्हा गरीब लंगडे पांगळे आंधळे यांना आमंत्रण दे 14 म्हणजे तुला आशीर्वाद मिळतील कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल 15 मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले तेव्हा तो येशूला म्हणाला जो देवाच्या राज्यात भाकर खाईल तो प्रत्येक जण धन्य 16 मग येशू त्याला म्हणाला एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले 17 भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना या कारण सर्व तयार आहे असा निरोप सांगण्यासाठी नोकराला पाठवले 18 ते सर्व जण सबब सांगू लागले पाहिला त्याला म्हणाला मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे कृपा करून मला क्षमा कर 19 दुसरा म्हणाला मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्यांची पारख करण्यासाठी मी चाललो आहे कृपा करून मला क्षमा कर 20 आणखी तिसरा म्हणाला मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही 21 तो नौकर परत आला व त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये लवकर जा व गरीब आंधळे असहाय्य लंगडे यांना घेऊन इकडे ये 22 नोकर म्हणाला मालक आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे आणि तरीही अाणखी जागा रिकाम्या आहे 23 मालक नोकराला म्हणाला रस्त्यावर जा कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल 24 कारण मी तुम्हाला सांगतो की त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही 25 मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला 26 जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील आई पत्नी मुले भाऊ बहिणी एवढेच नव्हे तर स्वतःच्या जीवाचासुध्दा व्देष करीत नाही तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही 27 जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही तो माझा शिष्य होऊ शकणार नाही 28 जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय 29 नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील 30 या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही 31 किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे त्याला त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय 32 जर तो त्याला तोंड देऊ शकणार नसेल तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील 33 त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही 34 मीठ चांगले आहे पण मिठाची जर चव गेली तर त्याला खारटपणा कशाने येईल 35 ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतीलज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको
Chapter 15
हरवलेले मेंढरू
1 सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते 2 तेव्हा परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले ते म्हणू लागले हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो 3 मग येशूने त्यांनाही दाखला सांगितला 4 तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय 5 आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो 6 आणि घरी येतो तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्याना एकत्र करून म्हणतो माइयाबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे 7 त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो 8 समजा एका स्त्रीकडे चांदीची दहा नाणी आहेत जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय 9 आणि तिला जेव्हा ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते माइयाबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे 10 त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो 11 मग येशू म्हणाला एका मनुष्याला दोन मुलगे होते 12 त्या दोघांपैकी धाकटा मुलगा म्हणाला बाबा मालमत्तेतला माझा वाटा मला द्या आणि मग त्यांच्या वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये वांटून दिली 13 त्यानंतर काही दिवसांनतरच लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली 14 त्याने सर्व पैसे खर्चून टाकले अाणि मग त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली 15 त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला त्या नागरिकाने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले 16 तेव्हा कोणी त्याला काहीही खावयास न दिल्याने न दिल्याने डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई 17 नंतर तो शुध्दीवर आला व स्वतःशीस म्हणाला माझ्या बापाच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे 18 आता मी उठून आपल्या बापाकडे जाईन आणि त्याला म्हणेन बाबा मी स्वर्गाविरुध्द देवाविरुध्द आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे 19 तुमचा मुलगा म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा मी राहीलो नाही मला आपल्या रोजंदारीवरील एखाद्या नोकरासारखे ठेवून घ्या 20 मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या बापाकडे गेला तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धांवत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले 21 मुलगा त्याला म्हणाला बाबा मी स्वर्गाविरुध्द व तुमच्याविरुध्द पाप केले आहे आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही नाही 22 परंतु बाप आपल्या नोकरांस म्हणाला त्वरा करा चांगला झगा आणून त्याला घाला त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला 23 आणि पुष्ट वासरु आणून कापा आपण खाऊ आणि आनंद करू 24 कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे तो हरवला होता पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले 25 ह्यावेळेस त्याचा वडील मुलगा शेतात होता तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला 26 त्याने एका नोकराला बोलावून विचारले हे सर्व काय चालले आहे 27 तो नोकर त्याला म्हणाला तुमचा भाऊ आला आहे तो तुमच्या बापाला सुखरुप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरु कापले आहे 28 तेव्हा तो रागे भरला आणि तो आत जाईना तेव्हा त्याचा बाप बाहेर येऊन त्याला समजावूं लागला 29 परंतु त्याने बापाला उत्तर दिले पाहा इतकी वर्षे मी तुमची सेवाचाकरी केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी साधे करडूसुध्दा खाण्यासाठी दिले नाही 30 आणि ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांवर उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरु कापले 31 तेव्हा बापाने त्याला म्हणाले बाळा तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे 32 परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे तो हरवला होता तो सापडला आहे
Chapter 16
अन्यायी कारभाऱ्याचे शहाणपण
1 येशूने त्याच्या शिष्यांना एक दाखला सांगितला काेणीएक श्रीमंत मनुष्य असून त्याचा एक कारभारी होता हा कारभारी तुमचे पैसे उधळतो अशी तक्रार त्या श्रीमंत मनुष्याकडे करण्यात आली 2 म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावून म्हटले तुझ्याविषयी मी हे काय ऐकत आहे तर आता तुझ्या कारभाराचा हिशोब दे कारण यापुढे तुला कारभार पाहावयचा नाही 3 तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत तर मी आता काय करू शेतात कष्ट करण्याएवढे बळ माझ्या अंगात नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते 4 मला कारभाऱ्याच्या कामावरून ते काढून टाकतील तरीही लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे यासाठी मी काय करावे हे मला माहिती आहे 5 मग कारभाऱ्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले पहिल्याला तो म्हणाला तू माझ्या मालकाकडून किती कर्ज घेतले आहे जे तुला फेडायचे आहे 6 तो म्हणाला शंभर मण तेल त्याने त्याला म्हटले ही तुझी हिशेबाची वही घे आणि लवकर बसून ह्यावर पन्नास मांड 7 नंतर दुसऱ्याला म्हटले तुला किती देणे आहे तो म्हणाला शंभर खंड्या गहू तो त्याला म्हणाला ही तुझी हिशेबाची वही घे व ऐंशी मांड 8 अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात 9 मग येशूने म्हटले मी तुम्हास सांगतो तुमच्यासाठी तुमच्या अनीतीच्या धनाने मित्र मिळवा यासाठी की जेव्हा हे धन संपेल तेव्हा त्यांनी तुम्हाला सार्वकालिक वस्तीत घ्यावे 10 एखाद्यावर थोडासा विश्वास टाकणे शक्य असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास टाकणे शक्य आहे व जो कोणी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी आहे तो जास्त गोष्टींविषयी अन्यायी राहील 11 म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू नाही तर मग खऱ्या धनाविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील 12 जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हाला कोण देईल 13 कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही एकाचा तो राग करील व दुसऱ्यावर तो प्रीती करील किंवा एकाला तो धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही 14 मग ते परूशी धनाचे लोभी होते त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी येशूचा तिरस्कार केला 15 येशू त्यांना म्हणाला तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो जे लोकांना त्यांच्या दृष्टीत महान वाटते ते देवाच्या नजरेमध्ये अमंगळ आहे 16 योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे हे होते आणि तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवली जात आहे व प्रत्येक जण त्यामध्ये शिरण्याचा नेटाने प्रयत्न करीत आहे 17 नियमशास्त्राचा एकही काना किंवा मात्रा नाहीसा होण्यापेक्षा आकाश व पृथ्वीचे नाहीसे होणे सोपे आहे 18 जो कोणी आपल्या बायकोला सोडून देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी पतीने सोडून दिलेल्या बाई सोबत लग्न करतो तो व्यभिचार करतो 19 काेणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे 20 त्याच्या फाटकाजवळ लाजार नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोड आलेले होते 21 त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करत असे ह्याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत 22 मग असे झाले की तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या ऊराशी नेऊन ठेवले नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले 23 श्रीमंत माणूस मृतलोकात यातना भोगीत होता तेथून त्याने वर पाहीले व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले 24 तो ओरडून म्हणाला हे बापा अब्राहामा माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जिभ थंड करील कारण या आगीमध्ये मी भयंकर दुखःसहन करीत आहे 25 परंतु अब्राहाम म्हणाला माझ्या मुला ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या पण आता त्याला आराम मिळत आहे व तू दुःखात आहेस 26 आणि या सगळ्याशिवाय तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे यासाठी की येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही 27 तो श्रीमंत मनुष्य म्हणाला मग तुला मी विनंति करतो की हे बापा लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव 28 लाजराला माझ्या पाच भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत 29 पण अब्राहाम म्हणाला तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे 30 तो श्रीमंत मनुष्य म्हणाला नाही हे बापा अब्राहामा मेलेल्यामधून कोणी माझ्या भावांकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील 31 अब्राहाम त्याला म्हणाला जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही
Chapter 17
येशूची काही वचने
1 मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच पण ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार 2 त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात त्याचे हित आहे 3 स्वतःकडे लक्ष द्या जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्याला धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्याला माफ करा 4 जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुध्द पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो मी पश्चात्ताप करतो तरीही तू त्याला माफ कर 5 मग शिष्य प्रभू येशूला म्हणाले आमचा विश्वास वाढव 6 प्रभू येशू म्हणाला जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता मुळासकट उपटून समुद्रात लावली जा तर ते झाड तुमचे ऐकेल 7 तुमच्यापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल आत्ताच येऊन जेवायला बस 8 उलट माझे जेवण तयार कर माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी असे तो त्याला म्हणणार नाही काय 9 ज्या गोष्टी करण्याबद्दल तुम्ही नोकराला हुकुम करता ते केल्याबद्दल तुम्ही त्याला धन्यवाद म्हणता का 10 तुमच्या बाबतीतही तसेच आहे जेव्हा तुम्हाला करण्यास सांगितलेली सर्व कामे केल्यावर तुम्ही असे म्हटले पाहिजे आम्ही कोणत्याही मानास लायक नसलेले नोकर आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे 11 मग असे झाले की तो यरुशलेमेकडे चालला असता शोमरोन व गालीलच्या सीमा ह्यांमधून गेला 12 तो कोणाएका खेड्यात जात असताना तेथे त्याला कुष्ठरोगाने ग्रस्त दहा पुरूष भेटले 13 आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले येशू स्वामी आमच्यावर दया करा असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली 14 जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना कुष्ठरोगी याजकांद्वारे निरीक्षण करून घेतल्यावर समाजात घेतले जात असता पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला जा आणि स्वतःला याजकांना दाखवा ते याजकाकडे जात असतांनाच शुध्द झाले 15 जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला 16 तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्याला नमन केले तसेच त्याने त्याचे उपकार मानले तो एक शोमरोनी होता 17 येशू त्याला म्हणाला दहाजण शुध्द झाले नाहीत काय बाकीचे नऊजण कोठे आहेत 18 या विदेशी माणसाशिवाय कोणीही देवाचे गौरव करण्यासाठी परत आला नाही काय 19 तो त्याला म्हणाला ऊठ आणि जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे 20 परूश्यांनी येशूला विचारले देवाचे राज्य केव्हा येईल येशूने त्यांना उत्तर दिले देवाचे राज्य दृश्य स्वरुपात येत नाही 21 पाहा ते येथे आहे किंवा तेथे आहेअसे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे 22 शिष्यांना तो म्हणाला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसापैकी एका दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहाल पण तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही असे दिवस येतील 23 आणि लोक तुम्हाला म्हणतील पाहा तो तर येथे आहे किंवा पाहा तो तेथे आहे तेव्हा तुम्ही मला पाहाण्यासाठी त्यांच्यामागे जाऊ नका 24 कारण जशी वीज आकाशाच्या एका सिमेपासुन दुसऱ्या सिमेपर्यंत चमकते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे त्याच्या दिवसात होईल 25 पण पहिल्याने त्याने खूप दुःख भोगावे व या पिढीकडून नाकारले जावे याचे अगत्य आहे 26 जसे नोहाच्या दिवसात झाले तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात पण होईल 27 नोहाने तारवांत प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत ते खात होते पीत होते लग्न करून घेत होते आणि लग्न करुनही देत होते 28 त्याचप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले तसे होईलः ते खात होते पीत होते विकत घेत होते विकत देत होते लागवड करीत होते बांधीत होते 29 पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्या दिवशी आकाशातून आग व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला 30 मनुष्याचा पुत्र प्रकट होण्याच्या दिवशीही असेच घडेल 31 त्या दिवशी जर एखादा छपरावर असेल व त्याचे सामान घरात असेल तर त्याने ते बाहेर काढण्यासाठी घरात जाऊ नये त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये 32 लोटाच्या बायकोची आठवण करा 33 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपला जीव गमवेल आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्याला वाचवील 34 मी तुम्हाला सांगतो त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील त्यांच्यामधून एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल 35 दोन स्त्रिया दळण करत असतील तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल 36 शेतात दोघे असतील एकाला घेतले जाईल व दुसऱ्यायाला ठेवले जाईल. 37 शिष्यांनी त्याला विचारले कोठे प्रभू येशूने उत्तर दिले जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील
Chapter 18
अत्याग्रही विधवा
1 निराश न होता नेहमी प्रार्थना कशी करावी हे शिष्यांनी शिकावे म्हणून त्याने त्यांना एक दाखला सांगितला 2 तो म्हणाला एका नगरात एक न्यायाधीश होता तो देवाला भीत नसे व लोकांचीही भीड धरीत नसे 3 त्या नगरात एक विधवा होती ती नेहमी येऊन न्यायधिशाला म्हणत असे माझ्या विरोधकांविरुध्द माझा न्याय करा 4 त्याची इच्छा काही काळ नव्हती पण शेवटी तो मनात म्हणाला मी जरी देवाला भीत नाही व लोकांना मान देत नाही 5 तरीही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन नाही तर ती नेहमी येऊन मला अगदी त्रासून सोडेल 6 मग प्रभू म्हणाला लक्ष्य द्या अन्यायी न्यायाधीश काय म्हणाला 7 आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवसरात्र त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय तो त्यांना मदत करण्यास वेळ लावेल का 8 मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करील तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय 9 आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी विश्वास धरून इतर सर्वांस तुच्छ मानीत होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा 10 दोन जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले एक परूशी होता आणि दुसरा जकातदार होता 11 परूशी उभा राहिला आणि त्याने अशी प्रार्थना केली हे देवा मी तुझे उपकार मानतो कारण मी इतर लोकांसारखा म्हणजे चोर अन्यायी व्यभिचारी व या जकातदारासारखा नाही 12 उलट मी आठवड्यातून दोनदा उपास करतो आणि माझ्या सर्व उत्त्पन्नाचा दहावा भाग देतो 13 परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला हे देवा मज पाप्यावर दया कर 14 मी तुम्हाला सांगतो हा मनुष्य त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा न्यायी ठरुन घरी गेला कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला कमी केले जाईल आणि जो कोणी स्वतःला कमी करतो त्याला उंच केले जाईल 15 आणि लोक आपल्या मुलांनाही त्याच्याकडे स्पर्श करण्यास आणत असता हे शिष्यांनी पहिल्यावर त्यांनी लोकांना धमकावले 16 पण येशू बालकांना स्वतःकडे बोलवून म्हणाला बालकांना माझ्याकडे येऊ द्या त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे 17 मी तुम्हाला खचीत सांगतो जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा स्वर्गात प्रवेश होऊ शकणार नाही 18 एका यहूदी अधिकाऱ्याने त्याला विचारले उत्तम गुरुजी सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करू 19 येशू त्याला म्हणाला मला उत्तम का म्हणतोस देवाशिवाय कोणीही उत्तम नाही 20 तुला आज्ञा माहीत आहेत व्यभिचार करू नको खून करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको तुझ्या आईवडिलांचा मान राख 21 तो अधिकारी म्हणाला या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणासून पाळल्या आहेत 22 जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा तो त्याला म्हणाला तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची कमी आहे तुझ्याजवळचे सर्वकाही विकून ते गरिबांना वाट म्हणजे स्वर्गात तुला धन मिळेल मग ये माझ्यामागे चल 23 पण जेव्हा त्या अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला कारण तो फार श्रीमंत होता 24 तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लाेकांना म्हणाला ज्यांच्याजवळ धन आहे त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे 25 होय श्रीमंत मनुष्याचे देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे 26 नंतर ज्या लोकांनी हे ऐकले ते म्हणाले तर मग कोणाचे तारण होईल 27 ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत 28 मग पेत्र म्हणाला बघा आमच्याकडे जे होते ते सर्व टाकून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत 29 येशूने त्यांना म्हटले मी तुम्हाला खचीत सांगतो देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर बायको भाऊ आईबाप किंवा मुलेबाळ सोडली 30 त्यांना ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही 31 येशूने निवडलेल्या बाराजणांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला ऐका आपण वर यरुशलेमात जात आहोत आणि संदेष्टयांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते सर्व पूर्ण होईल 32 म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील त्याची थट्टा होईल त्याची निंदा करतील त्याच्यावर थुंकतील 33 त्याला फटके मारतील त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल 34 त्याने म्हटलेले काहीच शिष्यांना समजले नाही कारण हे वचन त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते आणि तो कोणत्या गोष्टीविषयी बोलत आहे हे त्यांना माहीत नव्हते 35 येशू यरीहोजवळ येत असतांना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता 36 जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या लोकांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले ही कशाची गडबड चालली आहे 37 लोकांनी त्याला सांगितले नासरेथकर येशू जवळून जात आहे 38 तो ओरडून म्हणाला अहो येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा 39 जे पुढे चालले होते त्यांनी त्याला शांत राहण्यास सांगितले पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा 40 येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला स्वतःकडे आणण्याची आज्ञा केली तो आंधळा जवळ आल्यावर येशूने त्याला विचारले 41 मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे तो म्हणाला प्रभो मला पुन्हा दृष्टी यावी 42 येशू त्याला म्हणाला तुला दृष्टी येवो तुझ्या विश्वासाने तुला चांगले केले आहे 43 ताबडतोब त्याला दिसू लागले आणि तो देवाचे गौरव करीत येशूच्या मागे गेला सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुती केली
Chapter 19
जक्कय
1 येशूने यरीहोत प्रवेश केला आणि त्यामधून जात होता 2 तेव्हा पाहा जक्कय नावाचा कोणीएक मनुष्य होता तो मुख्य जकातदार असून खूप श्रीमंत होता 3 येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना कारण तो ठेंगणा होता 4 तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता 5 मग येशू त्याठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला जक्कया त्वरा करून खाली ये कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे 6 तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले 7 हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे 8 तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला प्रभूजी पाहा मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो 9 येशू त्याला म्हणाला आज या घराचे तारण झाले आहे कारण हा मनुष्यसुध्दा अब्राहामाचा मुलगा आहे 10 कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे 11 ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला कारण तो यरुशलेमेजवळ होता आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते 12 तो म्हणाला कोणीएक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूरदेशी गेला 13 त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा नाणी देऊन सांगितले मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा 14 त्याच्या नगरचे लोक त्याचा व्देष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही 15 परंतु राज्य मिळवून तो परत आला व त्याने ज्या नोकरांना पैसे दिले होते त्यांना बोलावणे पाठवले यासाठी की त्यांनी त्यापासून किती नफा मिळवला हे पाहावे 16 पहिला पुढे आला आणि म्हणाला धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत 17 तेव्हा तो त्याला म्हणाला चांगल्या दासा छान केलेस तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील 18 मग दुसरा नोकर आला व म्हणाला तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली 19 आणि तो त्याला म्हणाला तू पाच नगरांवर अधिकारी असशील 20 मग आणखी एक नोकर आला आणि म्हणाला धनी आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते 21 आपण कठोर आहात जे आपण ठेवले नाही ते आपण काढता आणि जे पेरले नाही ते कापता म्हणून मला तुमची भीती वाटत होती 22 धनी त्यास म्हणाला दुष्ट दासा तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा माणूस आहे मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो 23 तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते 24 त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला त्याच्याजवळून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत त्याला द्या 25 ते त्याला म्हणाले धनी त्याच्याजवळ दहा नाणी आहेत 26 धन्याने उत्तर दिले मी तुम्हाला सांगतो ज्याच्याजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याकडे जे काही असेल तेसुध्दा काढून घेतले जाईल 27 परंतु मी राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्यांचा माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा 28 येशूने या गोष्टी सांगितल्यावर तोवर यरुशलेमापर्यंत गेला 29 तोवर जातांना जेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजीक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठवले की 30 तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा तुम्ही प्रवेश करताच ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास बांधलेले आढळेल ते सोडून येथे आणा 31 जर तुम्हाला कोणी विचारले की तुम्ही ते का सोडता तर म्हणा की प्रभूला याची गरज आहे 32 ज्यांना पाठवले होते ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले 33 ते शिंगरु सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला तुम्ही शिंगरु का सोडता 34 ते म्हणाले प्रभूला याची गरज आहे 35 त्यांनी ते येशूकडे आणले त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले 36 येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते 37 तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व शिष्यसमुदाय त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला 38 ते म्हणाले प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असोस्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव 39 जमावातील काही परूशी येशूला म्हणाले गुरुजी आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा 40 त्याने उत्तर दिले मी तुम्हाला सांगतो जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील 41 तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला 42 कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत 43 तुझ्यावर असे दिवस येतील की तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील 44 ते तुला तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही 45 येशूने मंदिरात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर घालवू लागला 46 आणि त्यांना म्हणाला असे लिहिले आहे की माझे घर प्रार्थनेचे घर होईल पण तुम्ही ते लुटारुची गुहा केली आहे 47 तो दररोज मंदिरात शिकवीत असे मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक लोकांचे पुढारी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते 48 पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता कारण सर्व लोक त्याचे मन लावून एेकत असत
Chapter 20
येशूच्या अधिकाराविषयी संशय
1 एके दिवशी येशू मंदिरात लोकांना शिक्षण देत असता व सुवार्ता सांगत असता एक मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र वर त्याच्याकडे आले 2 ते त्याला म्हणाले कोणत्या अधिकाराने तू या गोष्टी करत आहेस हे आम्हाला सांग तुला हा अधिकार कोणी दिला 3 तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले मीसुध्दा तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही मला सांगा 4 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की मनुष्यापासून होता 5 त्यांनी आपसात चर्चा केली आणि एकमेकांना म्हणाले जर आपण स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही 6 पण जर आपण मनुष्यांकडून म्हणावे तर सर्व लोक आपणास दगडमार करतील कारण त्यांची खात्री आहे की योहान हा एक संदेष्टा होता 7 म्हणून तो कोणापासून होता हे आम्हाला माहीत नाही असे त्यांनी त्याला उत्तर दिले 8 मग येशू त्यास म्हणाला मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे मीसुध्दा तुम्हाला सांगणार नाही 9 मग तो लोकांना हा दाखला सांगू लागला एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूरदेशी गेला 10 हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठवले यासाठी की त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठवले 11 नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठवले पण त्यालासुध्दा त्यांनी मारले त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली आणि रिकाम्या हाताने परत पाठवले 12 तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठवले पण त्यालाही त्यांनी जखमी करून बाहेर फेकून दिले 13 द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला मी काय करू मी माझा स्वतःचा प्रिय पुत्र पाठवतो कदाचित ते त्याला मान देतील 14 पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले हा तर वारस आहे आपण त्याला ठार मारू म्हणजे वतन आपले होईल 15 त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व ठार मारले तर मग द्राक्षमळ्याचा मालक काय करील 16 तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईलत्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले असे कधीही न होवो 17 येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोनशिला झाला 18 जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल 19 नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक यांनी त्याचवेळी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना लोकांची भीती वाटत होती त्यांना त्याला अटक करायचे होते कारण त्यांना माहीत होते की हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता 20 तेव्हा त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्यांला बोलण्यांत धरून राज्यपालाच्या अधिकाराच्या अधीन करावे म्हणून आपण प्रामाणिक धार्मिक आहोत असे भासविणारे हेर पाठवले 21 म्हणून त्या हेरांनी त्याला प्रश्न विचारला ते म्हणाले गुरुजी आम्हाला माहीत आहे की जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता 22 आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही 23 ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होतीम्हणून तो त्यांना म्हणाला मला एक नाणे दाखवा 24 त्यावर कोणाचा मुखवटा व लेख आहे ते म्हणाले कैसराचा 25 तेव्हा तो त्यांना म्हणाला कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या 26 तेव्हा लोकांसमोर तो जे काही बोलला त्यात त्याला धरणे त्यांना शक्य झाले नाही त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि निरुत्तर झाले 27 मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले त्यांनी त्याला प्रश्न विचारला ते म्हणाले 28 गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मेला व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्याला मुले व्हावीत 29 सात भाऊ होते पहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मेला 30 नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले 31 नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली कोणालाही मुले न होता ते मरण पावले 32 नंतर ती स्त्रीही मरण पावली 33 तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते 34 तेव्हा येशू त्यांना म्हणाला या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात 35 परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत 36 आणि ते मरणार नाहीत कारण ते देवदूतासारखे आहेत ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत 37 जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले तेव्हा त्याने परमेश्वराला अब्राहामाचा देव इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हटले व मेलेलेसुध्दा उठवले जातात हे दाखवून दिले 38 देव मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत 39 तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले गुरुजी उत्तम बोललात 40 मग त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही 41 परंतु तो त्यांना म्हणाला ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात 42 कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले 43 मी तुझ्या शत्रूला तुझ्या पायाखालचे आसन करीत नाही तोपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस 44 अशा रीतिने दावीद त्याला प्रभू म्हणतो तर मग ख्रिस्त दावीदाचा पुत्र कसा 45 सर्व लोक हे ऐकत असताना तो शिष्यांना म्हणाला 46 नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते 47 ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात या माणसांना अत्यंत वाईट शिक्षा होईल
Chapter 21
विधवेचे दोन पैसे
1 येशूने दृष्टि वर करून श्रीमंत लोकांना दानपेटीत दान टाकताना पाहीले 2 त्याने एका गरीब विधवेलाही दोन नाणी टाकताना पाहिले 3 तेव्हा तो म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले 4 कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले 5 शिष्यातील काहीजण मंदिराविषयी असे बोलत होते की ते सुंदर दगडांनी आणि अर्पणांनी सुशोभित केले आहे येशू म्हणाला 6 असे दिवस येतील की हे जे तुम्ही पाहता त्यांतून जो पाडून टाकला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही 7 त्यांनी त्याला प्रश्न विचारला गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल 8 येशू म्हणाला तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि तो मी आहे असे म्हणतील आणि ते म्हणतील वेळ जवळ आली आहे त्यांच्यामागे जाऊ नका 9 जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत पण एवढ्यात शेवट होणार नाही 10 मग तो त्यांना म्हणाला एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल 11 मोठे भूंकप होतील दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील 12 परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानासमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील माझ्या नावासाठी ते तुम्हाला राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील 13 यामुळे तुम्हाला माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल 14 तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी अाधीच विचार करायची नाही अशी मनाची तयारी करा 15 कारण मी तुम्हाला असे शब्द व अशी बुध्दी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही 16 परंतु आईवडील भाऊ नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील 17 माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा व्देष करतील 18 परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही 19 तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवून घ्याल 20 तुम्ही जेव्हा यरूशलेमेस सैन्यानी वेढा घातलेला पाहाल तेव्हा तुम्हाला कळून येईल की तिचा नाश होण्याची वेळ आली आहे 21 जे यहूदीयांत आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये 22 ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत 23 त्यादिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर क्रोध येईल 24 ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेमस पायाखाली तुडवतील 25 सूर्य चंद्र तारे यांच्यात चिन्हे होतील पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील 26 भीतीमुळे व जगावर कोसळणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मरणाेन्मुख हाेतील व आकाशातील बळे डळमळतील 27 नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील 28 परंतु या गोष्टी घडण्यास आरंभ होईल तेव्हा सरळ उभे राहा आणि तुमचे डोके वर करा कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे 29 नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला अंजिराचे झाड व इतर दुसऱ्या झाडांकडे पाहा 30 त्यांना पालवी येऊ लागली की तुमचे तुम्हीच समजता की उन्हाळा अगदी जवळ आला आहे 31 त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे 32 मी तुम्हास खरे सांगतो की ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही 33 आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळींच नाहीशी होणार नाही 34 परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा दारुबाजी आणि अधाशीपणा व ह्या हल्लीच्या जीवनासंबंधीच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल 35 खरोखर तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोंकावर येईल 36 यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा 37 दर दिवशी तो मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर राहत असे 38 सर्व लोक मंदिरात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे येत असत
Chapter 22
यहूदाने केलेला विश्वासघात
1 नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात तो जवळ आला 2 मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक येशूला कसे मारता येईल ह्या बाबतीत चर्चा करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती 3 तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा ज्याला इस्कर्योत म्हणत त्याच्यात सैतान शिरला 4 यहूदा मुख्य याजक व मंदिराचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि येशूला त्यांच्या हाती कसे धरुन देता येईल याविषयी त्याने बोलणी केली 5 त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्याला पैसे देण्याचे मान्य केले 6 म्हणून त्याने संमती दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधी शोधू लागला 7 बेखमीर भाकरीचा सण ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला 8 तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठवले की जा आणि आपणासाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ 9 पेत्र व योहान येशूला म्हणाले आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे 10 तो त्यांना म्हणाला तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हाला भेटेल तो ज्या घरात जाईल तेथे जा 11 आणि त्या घरमालकास सांगा गुरुजींनी तुम्हाला विचारले आहे की माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे 12 तो मनुष्य तुम्हाला माडीवरील सजविलेली खोली दाखवील तेथे तयारी करा 13 तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली 14 वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या शिष्यांसह भोजनास बसला 15 तो त्यांना म्हणाला मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती 16 कारण मी तुम्हास सांगतो की देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही 17 नंतर येशूने पेला घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला हा घ्या आणि आपसात ह्याची वाटणी करा 18 कारण मी तुम्हास सांगतो की देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षफळांचा रस घेणार नाही 19 नंतर त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी दिले जात आहे माझ्या आठवणीसाठी हे करा 20 त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे जो तुमच्यासाठी ओतला जात आहे 21 परंतु पाहा माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे 22 कारण मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा पण ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार 23 आणि ते आपापसात एकमेकाला प्रश्न विचारु लागले हे करणारा आपणापैकी कोण असावा 24 तसेच त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की त्यांच्यामध्ये सर्वांत मोठा कोण आहे 25 तेव्हा त्याने त्यांना म्हटले परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभूत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे वाटतात 26 परंतु तुम्ही तसे नाही त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे 27 तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो जो मेजावर बसतो तो नाही का परंतु मी तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे 28 परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात 29 ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ति केली तशी मी तुमची नियुक्ति राज्यावर करतो 30 म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.
पेत्र आपणांस नाकारील हे येशू आधीच सांगून ठेवतो
31 शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे. 32 परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.” 33 परंतु शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभू, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.” 34 पण येशू म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
35 येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हास थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठवले, तेव्हा तुम्हास काही कमी पडले का?” ते म्हणाले, “काहीही नाही.” 36 तो त्यांना म्हणाला, “पण आता, ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी व त्याने पिशवीसुद्धा घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकावा आणि ती विकत घ्यावी. 37 मी तुम्हास सांगतो, तो अपराध्यांत गणलेला होता, असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्याठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्या विषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.” 38 ते म्हणाले, “प्रभू, पहा, येथे दोन तरवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “तेवढे पुरे!”
गेथशेमाने बागेत येशू
39 मग तो निघून आपल्या रीतीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. 40 तेव्हा त्याठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.” 41 तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले आणि अशी प्रार्थना केली, 42 “पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” 43 स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्यास सामर्थ्य देत राहिला 44 दु:खाने ग्रासलेला असतांना त्याने अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता. 45 आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तो पहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यास आढळले. 46 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का झोपत आहात? उठा आणि परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
येशूला अटक
47 तो बोलत असतांनाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एकजण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला. 48 परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस काय?” 49 त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, “प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?” 50 त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला. 51 येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले. 52 नंतर येशू मुख्य याजक लोक, परमेश्वराच्या भवनाचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते, त्यांना म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात, जसा काय मी लुटारु आहे. 53 मी तर तुम्हाबरोबर दररोज परमेश्वराच्या भवनात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची वेळ आणि अंधाराची सत्ता आहे.”
पेत्र येशूला नाकारतो
54 त्यांनी त्यास अटक केली व ते त्यास महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र दुरून त्यांच्यामागे चालला. 55 त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला आणि त्याच्याभोवती बसले व पेत्रही त्यांच्यात बसला. 56 तेव्हा कोणाएका दासीने तेथे त्यास विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.” 57 पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्यास ओळखत नाही.” 58 थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्यास पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!” पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!” 59 नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एकजण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालील प्रांताचा आहे.” 60 परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!” तो बोलत असतांना त्याच क्षणी कोंबडा आरवला. 61 आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले, “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्यास आठवले. 62 मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
63 येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली. 64 त्यांनी त्याचे डोळे बांधले व त्यास प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?” 65 आणि ते त्याची निंदा करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले.
मुख्य याजकांपुढे येशू
66 दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली आणि ते त्यास त्यांच्या सभेत घेऊन गेले. 67 ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हास सांग” येशू त्यांना म्हणाला, जरी “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. 68 आणि जरी मी तुम्हास प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही. 69 पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.” 70 ते सर्व म्हणाले, तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय? त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही म्हणता की, मी आहे.” 71 मग ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे? आपण स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत.”
Chapter 23
रोमी सुभेदार पिलात याच्यापुढे येशू
1 मग त्यांचा सर्व समुदाय उठला व त्यांनी येशूला पिलाताकडे नेले. 2 व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, “आम्ही या मनुष्यास लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.” 3 मग पिलाताने येशूला विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशू म्हणाला, “आपण म्हणता तसेच.” 4 मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या मनुष्यावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही. 5 पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीया प्रांतातील सर्व लोकांस तो आपल्या शिकवणीने चिथावित आहे, त्याने गालील प्रांतापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.”
हेरोद पुढे येशू
6 पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालील प्रांताचा आहे काय?” 7 जेव्हा त्यास समजले की, येशू हेरोदाच्या अधिकाराखाली येतो, तेव्हा त्याने त्यास हेरोदाकडे पाठवले. तो त्यादिवसात यरुशलेम शहरामध्येच होता. 8 हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्यास फार आनंद झाला, कारण त्याने त्याजविषयी ऐकले होते व त्यास असे वाटत होते की, तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल अशी आशा त्यास होती. 9 त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्यास उत्तर दिले नाही. 10 मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे राहून त्याच्याविरुध्द जोरदारपणे आरोप करीत होते. 11 हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले. 12 त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले त्यापुर्वी ते एकमेकांचे वैरी होते.
पिलात, बरब्बा व येशू
13 पिलाताने मुख्य याजक लोक, पुढारी आणि लोकांस एकत्र बोलावले. 14 “हा मनुष्य लोकांस फितवणारा म्हणून याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष चौकशी केल्यावर मला या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही. 15 हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही कारण त्याने त्यास परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही. 16 म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो.” 17 कारण त्यास त्या सणात त्यांच्याकरिता एकाला सोडावे लागत असे.
18 पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या मनुष्यास ठार करा! आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा!” 19 बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांस ठारही केले होते, त्यामुळे त्यास तुरुंगात टाकले होते. 20 मग पिलात येशूला सोडण्याची इच्छा धरून फिरून त्यांच्याशी बोलला. 21 पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा!” 22 पिलात तिसऱ्यांदा त्यांना म्हणाला, “का? या मनुष्याने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.” 23 पण याला वधस्तंभावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले. 24 तेव्हा पिलाताने त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असे ठरवले. 25 जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्यास त्याने सोडून दिले. पिलाताने त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले.
येशूला वधस्तंभावर खिळतात
26 ते त्यास घेऊन जात असताना, कुरेनेकर शिमोन नावाचा कोणीएक शेतावरून येत होता त्यांनी त्यास धरले व त्याने येशूच्या मागे चालून वधस्तंभ वाहावा म्हणून तो त्याच्यावर ठेवला. 27 लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या. 28 येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. 29 कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही. 30 तेव्हा ‘ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा आणि ते टेकड्यांस म्हणतील. आम्हास झाका’ 31 ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय?”
32 आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जिवे मारण्यास नेले. 33 आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. 34 नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. 35 लोक तेथे पाहात उभे होते आणि पुढारी थट्टा करून म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे! 36 शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली. 37 आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!”
38 त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”
39 तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव! 40 पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. 41 पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही.” 42 नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.” 43 येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
येशूचा मृत्यु
44 त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही. 45 आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. 46 येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे बोलून त्याने प्राण सोडून दिला. 47 जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.” 48 हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. 49 परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालील प्रांताहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या.
येशूची उत्तरक्रिया
50 तेथे योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद व चांगला आणि नीतिमान मनुष्य होता. 51 त्याने त्याच्या कामाला व विचारला संमती दिली नव्हती. तो यहूदीया प्रांतातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. 52 हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. 53 ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते. 54 तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ सुरु होणार होता. 55 गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. 56 नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केला. शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.
Chapter 24
प्रभू येशूचे पुनरुत्थान
1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या आणि त्यांनी स्वतः तयार केलेले सुगंधी मसाले आणले. 2 त्यांना धोंड कबरेवरुन लोटलेला आढळला. 3 त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. 4 यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले. 5 तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्यांमध्ये का करता? 6 तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. 7 ते असे की, मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्यास वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे. 8 नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली. 9 त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले. 10 त्या स्त्रिया मग्दालीया नगराची मरीया, योहान्ना आणि याकोबाची आई मरीया या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या. 11 पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. 12 पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्यास तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.
अम्माऊस गावाच्या रस्त्यावर येशूचे दोन शिष्यांना दर्शन
13 त्याच दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरुशलेम शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. 14 ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते. 15 ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. 16 पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. 17 येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?” चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले. 18 त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्यास म्हणाला, “या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेम शहरात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?” 19 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्यास म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला. 20 आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खिळले. 21 आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत. 22 आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हास आश्चर्यचकित केले आहे. आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, 23 परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे. 24 तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्यास पाहिले नाही.” 25 मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात. 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?” 27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्टयापर्यंत सांगून, शास्त्रलेखात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले. 28 ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे. 29 परंतु जास्त आग्रह करून ते म्हणाले, “आमच्याबरोबर राहा कारण संध्याकाळ झालीच आहे आणि दिवसही मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर रहावयास आत गेला. 30 जेव्हा तो त्यांच्याबरोबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला. 31 तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यास ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला. 32 मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?” 33 मग ते लगेच उठले व यरुशलेम शहरास परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले. 34 प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभू उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.” 35 नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्यांना सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्यास कसे ओळखले ते सांगितले.
येशूचे प्रेषितांना दर्शन
36 ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 37 ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत. 38 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या? 39 माझे हात व पाय पाहा तुम्हास मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भूताला नसते.” 40 असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना. 41 तरी आनंदामुळे विश्वास न धरता आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?” 42 मग त्यांनी त्यास भाजलेला माशाचा तुकडा दिला. 43 त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.
44 तो त्यांना म्हणाला, “याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हाबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे यामध्ये माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.” 45 नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली. 46 मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे, 47 आणि यरुशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी. 48 या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात. 49 पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा,”
येशूचे स्वर्गारोहण
50 नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला. 51 तो आशीर्वाद देत असतानाच तोपर्यंत आकाशात घेतला गेला. 52 नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेम शहरास परतले. 53 आणि ते परमेश्वराच्या भवनात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.