Luke
Chapter 1
1 प्रिय थियफीला,
आमच्यामध्ये घडलेल्या आश्चर्यकारक घटनांचा अनेक लोकांनी अहवाल लिहिलेला आहे. 2 ह्या सर्व घटना सुरुवातीपासून ज्या लोकांनी पाहिल्या त्यांच्याकडून आम्हांला त्या घडलेल्या घटनांविषयी कळाले. या लोकांनी इतरांना देवाचा संदेश शिकवला. 3 मी स्वतः त्या लोकांनी जे काही लिहिले व शिकविले त्या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. म्हणून हे थोर थियफीला, मी देखील या गोष्टींबाबतचा अचूक वृत्तांत तुझ्यासाठी लिहिल्यास बरे होईल असे ठरवले. 4 तुला शिकविण्यात आलेल्या गोष्टी सत्याच्या आहेत हे कळावे म्हणून मी हे करत आहे.
5 यहूदाच्या प्रांतावर हेरोद राजा जेव्हा राज्य करीत असतां, तिथे जखऱ्या नावाचा एक यहूदी याजक होता. याजकांच्या ज्या एका वर्गाला अबीया असे संबोधित त्या वर्गातून तो आला होता. तो व त्याची पत्नी अलीशिबा हे दोघेही अहरोनाच्या वंशातून होते. 6 देवाच्या दृष्टीने दोघेही नीतीमान होते, कारण देवाने आज्ञपिलेले सर्वकाही ते कोणतीही चूक न करता पाळीत असत. 7 परंतु अलीशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मुलबाळ नव्हते. याशिवाय, ती आणि तिचा पती वृद्ध झाले होते.
8 एके दिवशी जखऱ्या यरुशलेममधील मंदिरात त्याच्या वर्गाला ठरवून दिलेल्या नेहमीच्या वेळी याजकपणाचे काम करीत होता. 9 त्यांच्या चालीरितीप्रमाणे, देवाच्या मंदिरात जाऊन तिथे धूप जाळण्यासाठी याजकांनी चिठ्या टाकून त्याची निवड केली. 10 तेव्हा धूप जाळण्यासाठी त्याची वेळ आली, अनेक लोक मंदिराच्या बाहेरील अंगणात प्रार्थना करीत होते. 11 देवाने पाठविलेला एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. देवदूत धूपवेदीच्या उजव्याबाजूस उभा राहीलेला होता. 12 देवदूताला पाहून जखऱ्या अतिशय भयभीत आणि अस्वस्थ झाला. 13 परंतु देवदूताने त्याला म्हटले, “जखऱ्या भिऊ नको! तू जेव्हा प्रार्थना केली, देवाने तुझी विनंती ऐकली आहे. तर तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी मुलाला जन्म देईल. तू त्याचे नाव योहान असे ठेव. 14 त्याच्या जन्मामुळे तुला खूप आनंद होईल आणि इतर लोक देखील आनंदी होतील. 15 देवाच्या दृष्टीने तो अतिशय महत्वाचा असेल. त्याने कधीही द्राक्षरस पिऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नये. त्याचा जन्म होण्यापूर्वीच तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला असेल.
16 इस्राएलाच्या अनेक वशंजांचे मन वळवून तो त्यांना पाप करणे थांबवून त्यांचा देव, प्रभू परमेश्वराचे पुन्हा आज्ञा पालन सुरु करावे असे करील. 17 तुझा पुत्र प्रभूच्या अगोदर त्याचा अग्रदूत म्हणून पुढे जाईल आणि एलीया संदेष्टा होता तसा तो त्याच्या आत्म्यामध्ये बलवान होईल. पालकांनी आपल्या मुलांवर पुन्हा प्रेम करावे असे तो करील. तसे देवाचे न ऐकणाऱ्या अनेक लोकांनी, नीतीमान लोक शहाणपणाचे जीवन जगतात तसेच जीवन जगावे असे तो करील. प्रभूचे आगमन होईल तेव्हा अनेक लोकांनी तयार असावे म्हणून तो हे करेल.”
18 मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “मी खूप म्हातारा आहे, आणि माझी पत्नी देखील फार म्हातारी आहे. तर जे काही तुम्ही बोलला आहात त्या गोष्टी खरोखर घडतीलच यावर मी विश्वास कसा ठेवू?”
19 मग देवदूत त्याला म्हणाला, “मी गब्रीएल आहे! मी देवाच्या उपस्थितीत उभा राहतो! तुझ्यासोबत जे काही घडणार आहे त्याची सुवार्ता तुला सांगण्यासाठी मला पाठवण्यात आलेले आहे. 20 मी सांगितलेल्या गोष्टी देवाने ठरवलेल्या वेळी निश्चितच घडून येतील, परंतु तू मात्र माझ्या शद्बांवर विश्वास ठेवला नाही. मग आता देव तुला तुझा पुत्र जन्म घेईल त्या दिवसापर्यंत तू बोलू शकणार नाहीस असे करेल!”
21 जखऱ्या आणि देवदूत मंदिरात बोलत असतांना, अंगणातील लोक जखऱ्या बाहेर येण्याची वाट पाहत होते. जखऱ्या मंदिरात इतका वेळ का थांबला असावा याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. 22 तो बाहेर आला तेव्हा, त्याला त्यांच्याशी बोलता येईना. तो बोलू शकत नव्हता, म्हणून जे काही घडले ते त्याने त्यांना हाताचे इशारे करून समजावून सांगितले. मग मंदिरात असतांना त्याने देवापासून एक दृष्टांत पाहिलेला आहे असे त्यांच्या लक्षात आले.
23 जखऱ्याची मंदिरात याजकपणाचे काम करण्याची वेळ पूर्ण झाल्यानंतर, यरुशलेम सोडून तो त्याच्या घरी निघून गेला.
24 ह्यानंतर काही काळाने, त्याची पत्नी अलीशिबा गर्भवती झाली, पण ती पाच महिन्यापर्यंत बाहेर लोकांमध्ये गेली नाही. 25 ती स्वतःला म्हणाली, “मी गर्भवती व्हावे अशी देवाने माझ्यात योग्यता निर्माण केली आहे. ह्याप्रकारे, माझ्यावर त्याने दया केली व ज्या कारणामुळे लोक मला तुच्छ लेखायचे ते कारण दूर केले आहे.”
26 अलीशिबा जवळ जवळ सहा महिन्यांची गर्भवती असतांना, देवाने गब्रीएल दूताला गालील जिल्ह्यातील नासरेथ गावामध्ये पाठविले. 27 मरीया नावाच्या कुमारीशी बोलण्यासाठी तो तेथे गेला. तिचा योसेफ नावाच्या एका पुरुषाशी विवाह होण्याचे ठरलेले होते, तो दावीद राजाच्या वंशातून होता. त्या कुमारीचे नाव मरीया होते. 28 देवदूत तिला म्हणाला, “अभिवादन! प्रभू तुझ्याबरोबर आहे आणि त्याने तुझ्याबद्दल महान दया दाखविली आहे!” 29 मग मरीयेने त्याचे आभिवादन ऐकल्यावर ती अतिशय गोंधळून गेली. देवदूताच्या या शब्दाचा काय अर्थ असावा याचे तिला आश्चर्य वाटले.
30 मग देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नको! देवाचा अनुग्रह तुझ्यावर झाला आहे! 31 तू गर्भवती होशील व पुत्राला जन्म देशील आणि तू त्याचे नाव ‘येशू’ ठेव. 32 तो थोर होईल आणि त्याला सर्वोच्च देवाचा पुत्र असे म्हणतील. प्रभू परमेश्वर त्याला आपल्या लोकांवर, त्याचा पूर्वज दावीद याच्याप्रमाणेच राजा बनवील. 33 तो सदासर्वकाळ याकोबाच्या वंशजांवर राज्य करील. तो सदासर्वकाळ राज्य करील!”
34 नंतर मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे घडून येईल, मी तर अजून कुमारीका आहे?” 35 देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ज्या बाळाला तू जन्म देशील तो पवित्र असेल, आणि त्याला देवाचा पुत्र म्हणतील.
36 आणि हे ऐक. तुझ्या नात्यातील अलीशिबा ही अती वृद्ध असूनही ती गर्भवती असून तिला पुत्र होणार आहे. आणि जरी लोक तिच्याबद्दल ती मुलांना जन्म देऊ शकत नाही असा विचार करायचे, तरी आता ती जवळ जवळ सहा महिन्यांची गर्भवती आहे. 37 कारण देव काहीही करू शकतो!” 38 मग मरीया म्हणाली, “ठिक आहे, मी प्रभूची दासी आहे, जे काही तुम्ही माझ्याबद्दल बोलला आहात ते घडून येवो!” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
39 त्यानंतर लवकरच, मरीया तयार झाली आणि यहूदीयाच्या डोंगराळ भागात, जखऱ्या राहत होता त्या शहरात त्वरेने निघून गेली. 40 तिने त्याच्या घरात प्रवेश केला व त्याची पत्नी अलीशिबा हिला आभिवादन केले. 41 मरीयेने अलीशिबाला केलेले आभिवादन ऐकताच, अलीशिबाच्या गर्भातील बाळाने उडी मारली. त्याच क्षणी पवित्र आत्म्याने अलीशिबेला देवाची स्तुती करण्यास प्रवृत्त केले.
42 तिने मरीयेला आश्चर्याने मोठ्याने म्हटले, “देवाने आशीर्वादित केलेल्या इतर स्त्रिंयापेक्षा तुला आधिक आशीर्वादित केले आहे, व तू जन्म देणाऱ्या बाळाला त्याने आशीर्वादित केले आहे! 43 माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे किती हे अद्भुत आहे! 44 तू केलेले आभिवादन मी ऐकताच, माझ्या गर्भातील बाळाने उडी मारली कारण तुझ्या येण्याने त्याला आंनद झाला. 45 तू आशीर्वादित आहेस कारण देवाने तुला जे काही सांगितले ते घडून येईल असा विश्वास तू धरीला आहे.”
46 मग असे म्हणून मरीयेने देवाची स्तुती केली:
“आहा, मी प्रभूची स्तुती कशी करू!
47 मी देवाविषयी अतिशय आंनदी आहे,
माझा तारणारा तोच होय.
48 मी तर केवळ त्याची एक नीच दासी होते. परंतु तो मला विसरला नाही.
तर आता येथून पुढे, देवाने मला आशीर्वादित केले आहे असे लोक सर्वकाळासाठी म्हणतील.
49 पराक्रमी देवाने, माझ्याकरीता जी मोठी कृत्ये केली आहेत, त्यामुळे ते असे म्हणतील.
त्याचे नाम पवित्र आहे!
50 जे त्याचा आदर करितात, त्यांच्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, तो दयाळूपणाणे वागतो.
51 तो फार पराक्रमी आहे असे तो लोकांना दाखवितो.
आपल्या अंतःकरणात गर्विष्ठपणे विचार करणाऱ्यांची तो पागांपाग करतो.
52 त्याने राजांना राज्य करण्यापासून थांबवले आहे,
व त्याने पीडीत लोकांचा सन्मान केला आहे.
53 जे भुकेले आहेत त्यास त्याने उत्तम पदार्थ खावयाला दिले आहे,
आणि धनवान लोकांना काहीही न देता त्याने पाठवून दिले आहे.
54-55 त्याची सेवा करणारे लोक, इस्त्राएल, ह्याला त्याने मदत केली आहे,
त्याने आमच्या पूर्वजांना फार पूर्वी वचन दिले की तो त्यांच्याशी दयाळूपणे वागेल.
त्याने ते अभिवचन पूर्ण केले आहे आणि अब्राहाम आणि त्याचे वंशज या सर्वांशी त्याने दयाळूपणे कृत्ये केली आहेत.
56 मरीया सुमारे तीन महिने अलीशिबेसोबत राहिली. नंतर ती आपल्या घरी परत गेली.
57 अलीशिबेने तिच्या बाळाला जन्म देण्याची वेळ आली, तेव्हा तिला एक मुलगा झाला. 58 प्रभूने अलीशिबेवर किती दया केली आहे हे ऐकून तिचे शेजारी व नातेवाईक तीच्याबरोबर आंनदी झाले.
59 ह्यानंतर आठव्या दिवशी, बाळाची सुंता करण्याच्या विधीसाठी लोक एकत्र जमले. त्याच्या वडिलाचे नाव जखऱ्या होते म्हणून बाळालाही तेच नाव द्यावे अशी त्यांची इच्छा होती. 60 पंरतु त्याची आई म्हणाली, “नाही, त्याचे नाव योहान असेच ठेवावे!” 61 तर ते तिला म्हणाले, “परंतु योहान या नावाचा तर तुझ्या नातेवाईकांमध्ये कोणीही नाही!”
62 मग त्यांनी तो मुलाला कोणते नाव देवू इच्छितो हे विचारण्यासाठी त्याच्या वडिलांकडे हाताचे इशारे करीत खुणाविले. 63 तेव्हा त्याने लिहण्यासाठी एक पाटी द्यावी असा संकेत त्यांना केला. मग त्यांनी त्याला ती दिली तेव्हा त्यावर त्याने लिहिले “याचे नाव योहान आहे”.तेथे उपस्थित सर्वांना आश्चर्य वाटले!
64 तत्क्षणी जखऱ्याला पुन्हा बोलता येऊ लागले, आणि त्याने देवाची स्तुती करण्यास सुरूवात केली. 65 देवाने केलेले कृत्य पाहून त्यांच्या आजुबाजूस राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आदराने पुर्णतः भयचकित झाला. जे काही घडले त्याबद्दल त्यांनी दुसऱ्या पुष्कळ लोकांना सांगितले आणि ही वार्ता यहूदीयाच्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशामध्ये पसरली. 66 ऐकणारा प्रत्येकजण ह्यावर विचार करत होता. ते म्हणत होते, “आम्हांला आश्चर्य वाटते की हा बाळक मोठा झाल्यावर कोणते कार्य करेल!” कारण जे सर्वकाही घडले, ते पाहून त्यांना खात्री होती की देव त्याला सामर्थ्यशाली रित्या मदत करेल.
67 जखऱ्याच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर, जखऱ्याला पवित्र आत्म्याने नियंत्रित केले आणि तो देवाकडून आलेले हे शब्द बोललाः
68 “आम्ही इस्त्राएलचे लोक ज्याची उपासना करतो, त्या प्रभू देवाची स्तुती असो.
कारण तो आम्हांला, त्याच्या लोकांना, मुक्त करण्यासाठी आला आहे.
69 जो आम्हांला पराक्रमाने तारेल अशा कोणाला तरी, तो आम्हांसाठी पाठवत आहे.
दावीद राजा, जो त्याचा सेवक, याच्या घराण्यातून तो आलेला असेल.
70 तो हे कार्य करेल हे फार पूर्वी देवाने त्याच्या संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते.
71 हा सामर्थ्यवान तारणारा आम्हांला आमच्या शत्रुपासून मुक्त करेल,
आणि तो आम्हांला आमचा द्वेष करणाऱ्या सर्वांच्या शक्तीपासून वाचवेल.
72 त्याची आमच्या पूर्वजांवर दया आहे आणि त्याचा पवित्र करार,
73 म्हणजेच आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी त्याने शपथ वाहून अभिवचन दिलेला करार तो आठवतो, म्हणून त्याने हे केले आहे.
74-75 देवाने आम्हास वचन दिले आहे की तो आमच्या शत्रुच्या शक्तीपासून आमचा बचाव करेल,
आणि कुठलीही भीती न बाळगता पवित्रतेने आणि नितीने जीवनभर त्याची सेवा करता यावी यासाठी त्याने आम्हांस सक्षम करण्याचे अभिवचन दिले आहे.
76 मग जखऱ्या त्याच्या तान्ह्या मुलाला असे म्हणालाः
“माझ्या मुला,
तुला सर्वोच्च देव याचा संदेष्टा म्हणतील.
प्रभूच्या येण्यासाठी तू लोकांना तयार व सज्ज करण्यासाठी
तू त्याच्या पुढे चालशील.
77 देव लोकांना क्षमा करण्यास आणि त्यांच्या पापांच्या शिक्षेपासून त्यांना वाचवण्यास समर्थ आहे असे तू त्यांना सांगशील.
78 देव आमच्यावर कृपा आणि दया करतो म्हणून तो आम्हाला क्षमा करेल.
आणि ह्यामुळेच, हा तारणारा, उगवत्या सुर्यासारखा,
आम्हांला मदत करण्यासाठी स्वर्गातून येईल.
79 जे लोक आत्मिक अंधारात आणि मृत्यूच्या भयात जगत आहेत अशांवर त्याचा हा संदेश चमकेल.
आम्ही शांतीने जीवन जगू असे मार्गदर्शन तो आम्हांला करेल.
80 कालांतराने, जखऱ्या आणि अलीशिबाचा लहान मुलगा मोठा झाला आणि आत्म्याने बलवान झाला. पुढे तो एका ओसाड प्रदेशात, देवाच्या लोकांना, इस्राएलात उपदेश करण्यास सुरूवात करेपर्यंत तो तेथेच राहिला.
Chapter 2
1 त्या वेळेच्या सुमारास कैसर औगुस्त ह्याने रोमन शासनामध्ये वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोदंणी सार्वजनिक दस्ताएवेजामध्ये होणे आवश्यक आहे असा एक शासन अधिकृत आदेश बाहेर पाठवला. 2 क्विरीनिय हा सूरिया प्रांतावर राज्य करत होता त्यावेळी ही नोदंणी पहिल्यांदा झाली. 3 म्हणून प्रत्येकाला नोदंणी करण्यासाठी त्यांना आपल्या परिवाराच्या मूळगावी जावे लागले.
4-5 योसेफ सुद्धा त्याच्याशी वागदत्त असलेली व जी गर्भवती होती, त्या मरीयेसोबत त्याच्या परिवाराच्या मूळगावाकडे प्रवासास निघाला. योसेफ आणि मरीया सार्वजनिक दस्ताएवेजामध्ये नोंदणी करण्यासाठी तेथे गेले होते. कारण योसेफ हा दावीद राजाच्या वंशाचा होता, ते गालील प्रांतातील नासरेथ या गावाला सोडून व यहूदीया प्रांतातील बेथलेहेम या गावी गेले, ज्याला दावीदाचे शहर म्हणून ओळखले जाते.
6-7 बेथलहेमामध्ये ते पोहचल्यावर, तेव्हा जेथे प्रवासी सहसा थांबतात त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती. म्हणून एक रात्र राहता येईल अशा ठिकाणी ते राहिले. ते तेथे असतांना मरीयेची प्रसुतीची वेळ आली आणि तिने आपल्या प्रथम मुलाला जन्म दिला, तो एक मुलगा होता. तिने त्याला रुंद कापडाच्या पट्ट्यामध्ये गुंडाळले आणि प्राणी जेथे अन्न खातात त्या ठिकाणी ठेवले.
8 त्या रात्री, बेथलेहेम जवळील शेतामध्ये काही मेंढपाळ त्यांच्या मेंढरांच्या कळपाची राखण करत होते. 9 अचानक प्रभू देवाचा एक दूत त्यांना दिसला. देवाची महिमा दर्शवणारा एक उज्ज्वल प्रकाश तिथे पसरला आणि त्यांना आच्छादित केले. म्हणून ते अतिशय भयभीत झाले.
10 परंतु देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका! तुम्हांला एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. ज्याने सर्व लोकांना फायदा होईल आणि तुम्हांला मोठा आनंद होईल. 11 आज, दावीदाच्या नगरात, एक बाळ जन्माला आले आहे तो मसीहा, प्रभू आहे! जो तुम्हांला तुमच्या पापापासून वाचवेल! 12 अशा रितीने तुम्ही त्याला ओळखू शकाल: बेथलहेमामध्ये एक बाळ तुम्हास आढळेल जे कापडाच्या पट्ट्यामध्ये गुंडाळलेले आणि प्राणी जेथे अन्न खातात त्या ठिकाणी ठेवलेले तुम्हांला दिसेल.”
13 अचानक स्वर्गातून देवदूतांचा एक मोठा समुह दिसला आणि दुसऱ्या देवदूतांमध्ये सामिल झाला. ते सर्व, देवाची स्तुती करीत म्हणाले,
14 “सर्वोच्च स्वर्गामध्ये सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा! आणि देवाला संतुष्ट करणाऱ्या पृथ्वीवरील लोकांवर शांती असो!”
15 नंतर देवदूत त्यांना सोडून स्वर्गात गेले, मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, ‘चला, ताबडतोब आपण बेथलहेमला जाऊ आणि घडलेली गोष्ट जी देवाने आम्हांला कळविली ती पाहू या.” 16 मग ते त्वरीत गेले आणि जेथे मरीया आणि योसेफ थांबले होते ते ठिकाण त्यांना सापडले, तेव्हा बाळाला प्राणी जेथे अन्न खातात त्या ठिकाणी ठेवलेले त्यांनी पाहिले.
17 त्याला पाहिल्यानंतर, या बाळाबद्दल त्यांना जे सर्वकाही सांगितले गेले होते ते त्यांनी सर्वांना सांगितले. 18 मेंढपाळांनी सांगितलेले सर्वकाही ज्या लोकांनी ऐकले, त्या सर्वांना आश्चर्य वाटले. 19 पण मरीयेने ऐकलेल्या सर्व गोष्टींचा विचार केला आणि काळजीपूर्वक त्या मनात ठेवल्या. 20 मेंढपाळ जेथे त्यांची मेंढरे होते त्या शेतामध्ये परत आले. त्यांनी जे काही पाहिले व ऐकले होते त्याबद्दल त्याची स्तुती करीत होते, आणि देव किती महान आहे असे ते बोलू लागले कारण देवदूताने त्यांना सांगितले होते अगदी त्याप्रमाणेच सर्व गोष्टी घडल्या होत्या.
21 बाळाच्या जन्मानंतरच्या आठव्या दिवशी, त्याची सुंता केली गेली आणि त्यांनी त्याला ‘येशू’ हे नाव दिले. हे नाव तर तो उदरात संभवण्यापूर्वीच, देवदूताने त्यांना देण्यास सांगितले होते.
22 मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या शुद्धिकरणासाठी आवश्यक असलेल्या दिवसांची संख्या पूर्ण झाली, तेव्हा मरीया आणि योसेफ आपल्या मुलाला प्रभूला समर्पित करण्यासाठी यरुशलेमला प्रवास करुन गेले. 23 परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “प्रत्येक प्रथम जन्मलेल्या पुरुष संततीला प्रभूसाठी पवित्र म्हणून वेगळे केले जाईल.” 24 परमेश्वराच्या नियमशास्त्रात हे देखील सांगतिले आहे की, एका नवजात मुलाच्या पालकांनी “दोन होले किंवा दोन कबुतराची पिल्ले” याचा यज्ञ करायलाच हवा.
25 त्यावेळी यरुशलेमात एक वृद्ध पुरुष होता त्याचे नाव शिमोन होते. देवाच्या नियमांचे पालन आणि देवाला ज्याने संतुष्टी मिळते ते काम त्याने केले होते. देवाने इस्राएली लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी मशीहाला पाठवावे यासाठी तो उत्सुकतेने देवाची प्रतीक्षा करीत होता आणि त्यासाठी त्याला पवित्र आत्मा चालवत असे. 26 प्रभूचे अभिवचन असलेल्या मसीहाला पाहिल्यावर तुला मरण येईल असे पवित्र आत्म्याद्वारे त्याला आधीच प्रकट करण्यात आले होते. 27 जेव्हा योसेफ आणि मरीया आपल्या मुलाला, येशूला, देवाने नियमशास्त्रात आज्ञा केलेल्या विधी प्रमाणे करण्याकरिता त्यांनी मंदिरात आणले, तेव्हा आत्मायुक्त शिमोनाने मंदिराच्या अंगणात प्रवेश केला. 28 मग त्याने येशूला हातामध्ये धरून वर केले आणि देवाची स्तुती करीत म्हणाला, 29 हे प्रभू, तू मला दास बनवले आणि आता तुझ्या वचनाप्रमाणे मी शांतीने मरू शकेन. 30 लोकांना त्यांच्या पापापासून जो वाचवेल ज्याला तू पाठवलेस त्या एकाला मी पाहिले आहे, 31 तू ज्याला सर्व लोकांच्या मध्यभागी तयार केलेस. 32 तो तुझे सत्य परराष्ट्रीय लोकांना प्रकट करणारा प्रकाश बनेल, आणि तो इस्राएली लोकांवर आदर सन्मान आणेल. 33 येशूचे आईवडील त्याच्याबद्दल शिमोनच्या सांगण्यावर खूपच आश्चर्यचकित झाले होते. नंतर शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि येशूची आई, मरीया, हिला म्हणाला 34 “मी काय म्हणतो ते लक्षात घे मरीये: देवाने असे ठरविले आहे की या मुलामुळे, अनेक इस्राएल लोक देवाकडे वळतील, आणि पुष्कळ इतर लोक देवाकडे वळतील. लोकांना चेतावणी देण्यासाठी एका चिन्हांसारखा तो बनेल, आणि अनेक लोक त्याला विरोध करतील. 35 याचा परिणाम म्हणजे, अनेक लोकांच्या विचारांना प्रकट केले जाईल. तुझ्या स्वतःच्या जिवात तलवार भोसकतील.”
36 तसेच मंदिराच्या अंगणामध्ये फार वयोवृध्द झालेली हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती. तिचे वडील फनूएल हे आशेर वंशातील सदस्य होते. ती सात वर्षे विवाहित होती आणि त्यानंतर तिचा पती मरण पावला. 37 त्यानंतर, ती एक विधवा म्हणून चौऱ्याऐंशी वर्षे आयुष्य जगली. ती नेहमी मंदिराच्या परिसरात सेवा करीत असे आणि रात्रंदिवस देवाची आराधना करीत असे. तिने अनेकदा उपवास आणि प्रार्थना केली. 38 त्या क्षणी, हन्ना त्यांच्याजवळ आली आणि बाळाबद्दल देवाचा धन्यवाद करू लागली. मग, अनेक लोक जे यरुशलेमेच्या मुक्ततेची देवाकडे अपेक्षा करीत होते त्यांना ती येशूविषयी बोलली.
39 नंतर योसेफ आणि मरीयेने प्रभूच्या नियमांनुसार आवश्यक त्या सर्वकाही गोष्टी पूर्ण केल्यावर, ते गालील जिल्ह्यातील नासरेथ येथे आपल्या गावी परत आले. 40 जसे बालक वाढत गेले, तसे ते बलवान व बुद्धिमान होत गेले आणि देव त्याच्यासोबत फार संतुष्ट होता. 41 प्रत्येक वर्षी येशूचे पालक वल्हांडण सण साजरा करण्यासाठी यरुशलेमला जात असत. 42 जेव्हा येशू बारा वर्षांचा झाला तेव्हा नेहमीप्रमाणे ते सणासाठी यरुशलेमेकडे गेले. 43 मग सणाचे सर्व दिवस संपले, तेव्हा त्याचे आईवडील घरी परतण्यास निघाले, पण येशू यरुशलेमध्येच पाठीमागे राहिला. त्याच्या पालकांना माहित नव्हते की तो अजूनही तेथेच आहे. 44 त्यांनी असे गृहित धरले की तो त्यांच्याबरोबर प्रवास करीत असलेल्या इतर लोकांबरोबर येत असेल. नंतर संपूर्ण दिवस चालत गेल्यानंतर, त्यांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरु केले. 45 जेव्हा त्यांना तो सापडला नाही तेव्हा, त्याला शोधण्यासाठी ते परत यरूशलेमेला आले. 46 तीन दिवसांनंतर, तो मंदिराच्या अंगणात, यहूदी धार्मिक शिक्षकांच्या मध्यभागी बसलेला त्यांना सापडला. तो त्यांना शिकवण्यासाठी त्यांचे ऐकून घेत होता, आणि तो त्यांना प्रश्न विचारीत होता. 47 शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तो किती उत्तमप्रकारे देतो आणि त्याला किती समजते व त्याने बोललेले ऐकून तिथल्या सर्व लोकांना त्याचे मोठे नवल वाटले. 48 त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहिले तेव्हा, ते खूप आश्चर्यचकित झाले. त्याची आई त्याला म्हणाली, आमच्याबरोबर तू असे का केलेस? आम्ही तुला शोधत होतो तुझे वडील आणि मी खूप चिंतीत झालो! 49 मग तो त्यास म्हणाला, “तुम्ही माझा शोध का घेत आहात? तुम्हांला माहित नाही काय माझा पिता काय करतो? त्यामध्ये मी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. 50 परंतु तो हे जे त्यांना बोलला त्याचा अर्थ त्यांना समजला नाही. 51 मग तो त्यांच्यासोबत नासरेथला गेला आणि त्याने नेहमीच त्यांच्या आज्ञेचे पालन केले. ह्या सर्व गोष्टींचा त्याच्या आईने मनात सखोल विचार केला. 52 जस जशी वर्षे उलटली, तसा येशू अधिक ज्ञानी होत गेला आणि तो उंचीने वाढला. देव आणि लोक त्याला अधिक आणि अधिक मान्यता देत गेले.
Chapter 3
1 तिबिर्य कैसर रोमन साम्राज्यावर पंधराव्या वर्षी राज्य करत होता, त्यावेळेस पंत पिलात, यहूदीया प्रांताचा राज्यपाल होता, हेरोद अंतिपा गालील जिल्ह्यावर राज्य करत होता, त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती प्रदेशावर राज्य करत होता, आणि लूसनिय हा अबिलेन प्रदेशावर राज्य करत होता. 2 त्या वेळेच्या सुमारास, हन्ना आणि मुख्य याजक कयफा हे यरुशलेममध्ये उच्च याजक होते, तेव्हा देव जखऱ्याचा पुत्र योहानाशी बोलला जेव्हा तो रानावनात राहत असे. 3 योहान हा यार्देन नदीजवळच्या सर्व क्षेत्रामध्ये सर्वत्र फिरत असे. आणि तो लोकांना सांगत असे, “जर तुम्हांला आपल्या पापांची क्षमा पाहिजे असेल, तर मग तुम्ही पश्चाताप केला पाहिजे; मगच मी तुमचा बाप्तिस्मा करीन!” 4 फार पूर्वीच यशया संदेष्ट्याने चर्मपत्राच्या गुंडाळीवर हे शब्द लिहून ठेवले होते: “रानावनामध्ये, कोणीएक घोषणा करेल: प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा.
5 प्रत्येक दरी भरली जाईल,
आणि प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट होईल;
कुटिल रस्ते सरळ होतील,
आणि खडबडीत रस्ते गुळगुळीत तयार होतील.
6 मग प्रत्येकजण लोकांचे तारण करणारा देवाचा मार्ग पाहतील.”
7 योहान जे त्याच्यापासून बाप्तिस्मा घेण्यासाठी येत होते त्या लोकांच्या गर्दीस म्हणाला, “तुम्ही लोक विषारी सापांसारखे वाईट आहात! एके दिवशी देव पाप करणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा करील, त्यापासून वाचण्यासाठी कोणी तुम्हांला सावध केले का? आपण त्याच्यापासून पळून जाऊ शकतो असा विचार करू नका!
8 चांगल्या गोष्टी करून चांगले फळ उत्पन्न करा ह्याद्वारे दिसून येईल की खरोखर तुम्ही आपल्या पापी वर्तणुकीपासून दूर वळाले आहात! आणि स्वतःला, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत!’ असे म्हणू लागू नका कारण मी तुम्हांला सांगतो की, देव ह्या धोंड्याना सुद्धा अब्राहामाचे वंशज बनवू शकतो.
9 आताच कुऱ्हाड झाडांच्या मुळाशी ठेवलेली आहे, तर मग जे प्रत्येक झाड चांगले फळ उत्पन्न करत नाही ते तोडण्यात येईल व अग्नीत फेकले जाईल.”
10 नंतर लोकसमुदायातील काही लोकांनी त्याला विचारले, “तर, मग, आम्ही काय केले पाहिजे?” 11 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्यापैकी कोणाला दोन अंगरखे आहेत, तर तुम्ही त्यापैकी एक ज्याला अंगरखा नाही त्याला द्यायला पाहिजे. जर तुमच्यापैकी कोणाजवळ भरपूर अन्न असेल तर, तुम्ही ज्याच्याजवळ अन्न नाही त्यास काही द्यायला पाहिजे.”
12 काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास योहानाजवळ आले. त्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, आम्ही काय करायला पाहीजे?” 13 मग तो त्यास म्हणाला, “रोमी सरकारने जितके ठरवून दिले तितकेच गोळा करा त्यापेक्षा अधिक पैसे लोकांकडून गोळा करू नका!”
14 काही शिपायांनी त्याला विचारले. “आणि आमच्यासाठी काय? आम्ही काय करावे?” मग तो त्यास म्हणाला, “लोकांना धमकावून त्यांना पैसे देण्यास भाग पाडू नका, आणि एखाद्याने गैरकृत्य केले आहे असा खोटा आरोप त्याच्यावर तुम्ही लावू नका! तुम्ही कमावत असलेल्या पैशांच्या रकमेमध्ये समाधानी राहा.”
15 मसीहा आता लवकरच येणार आहे ह्यामुळे लोक ह्रदयात अतिशय आशावादी झाले होते, आणि त्यांच्यापैकी कित्येकजंणाना तर योहान हाच मसीहा असेल म्हणून आश्चर्य वाटत असे. 16 परंतु योहानाने त्या सर्वांना उत्तर दिले, “नाही, मी तो नाही. माझ्यापेक्षाही खूप महान असा मसीहा श्रेष्ठ आहे. तो इतका महान आहे की त्याच्या वाहाणांचा बंद सोडण्यास देखील मी योग्य नाही! मी तुम्हांला बाप्तिस्मा दिला, तेव्हा मी फक्त पाणी वापरले. पण मसीहा येईल, तेव्हा तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील.
17 निरुपयोगी भुसकटापासून चांगले धान्य वेगळे तयार करण्यासाठी त्याच्या हातात उफणणी काटा आहे. त्याचा धान्याच्या कोठाऱ्यामध्ये तो धान्याला सुरक्षितपणे साठवून ठेवेल परंतु तो भुसा पेटवून कधीही न विझणाऱ्या अग्नीत टाकून देईल.
18 यासारख्या विविध प्रकारच्या मार्गाने, योहानाने लोकांना पश्चाताप करून देवाकडे परत जाण्याची विनंती केली, आणि तो त्यांना देवाकडून आलेला हा उत्तम उपदेश सतत सांगत राहिला. 19 त्याने हेरोद राजाला देखील, त्याचा भाऊ जिवंत असूनही त्याची पत्नी हेरोदिया हिच्याशी लग्न केल्याबद्दल आणि इतर अनेक वाईट गोष्टी केल्याबद्दल धमकावले. 20 म्हणून हेरोदाच्या सैनिकांनी योहानाला तुरुंगात टाकले, ही आणखी खूप वाईट गोष्ट होती.
21 परंतु योहानाला तुरुंगात टाकण्यापूर्वी, अनेक लोकांचा बाप्तिस्मा झाला होता, आणि येशूचा देखील बाप्तिस्मा झाला. त्यानंतर, तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले. 22 मग पवित्र आत्मा, कबुतरासदृश्य, खाली आला आणि येशूवर उतरला. आणि देव स्वर्गातून येशूला बोलला, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्यावर फार प्रीती करतो, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे!”
23 जेव्हा येशूने देवाकरिता त्याचे कार्य सुरू केले, तो तीस वर्षांचा होता. तो योसेफाचा पुत्र होता (म्हणून विचार केला गेला). योसेफ हा एलीचा पुत्र होता. 24 एली हा मत्ताथाचा पुत्र होता. मत्ताथा हा लेवीचा पुत्र होता. लेवी हा मल्खीचा पुत्र होता. मल्खी हा यन्नयाचा पुत्र होता. यन्ना हा योसेफाचा पुत्र होता.
25 योसेफ मत्तिथियाचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसचा मुलगा होता. अमोस नहूमाचा मुलगा होता. नहूम हेस्लीचा मुलगा होता. हेस्ली हा नग्गयाचा मुलगा होता. 26 नग्गया हा महथाचा मुलगा होता. महथ हा मत्तिथ्याचा पुत्र होता. मत्तिथ्या हा शिमयीचा पुत्र होता. शिमयी हा योसेखाचा पुत्र होता. योसेख हा योदाचा पुत्र होता.
27 योद हा योहानाचा पुत्र होता. योहान हा रेशाचा पुत्र होता. रेश हा जरूब्बाबेलाचा पुत्र होता. जरूब्बाबेल हा शल्तीएलाचा पुत्र होता. शल्तीएल हा नेरीचा पुत्र होता. 28 नेरी हा मल्खीचा पुत्र होता. मल्खी हा अद्दीचा पुत्र होता. अद्दी हा कोसामाचा पुत्र होता. कोसाम हा एल्मदामाचा पुत्र होता. एल्मदाम हा एराचा पुत्र होता. 29 एर हा यहोशवाचा पुत्र होता. यहोशवा हा अलियेजरचा पुत्र होता. अलियेजर हा योरीमाचा पुत्र होता. योरीम हा मत्ताथाचा पुत्र होता. मत्ताथा हा लेवीचा पुत्र होता.
30 लेवी हा शिमोनाचा पुत्र होता. शिमोन हा यहूदाचा पुत्र होता. यहूदा हा योसेफाचा पुत्र होता. योसेफ हा योनामाचा पुत्र होता. योनाम हा एल्याकीमाचा पुत्र होता. 31 एल्याकीम हा मलआचा पुत्र होता. मलआ हा मिन्नाचा पुत्र होता. मिन्ना हा मत्ताथाचा पुत्र होता. मत्ताथा हा नाथानाचा पुत्र होता. नाथान हा दावीदाचा पुत्र होता. 32 दावीद हा इशायाचा पुत्र होता. इशाय हा ओबेदाचा पुत्र होता. ओबेद हा बवाजाचा पुत्र होता. बवाज हा सल्मोनाचा पुत्र होता. सल्मोन हा नहशोनाचा पुत्र होता.
33 नहशोन हा अम्मीनादाबाचा पुत्र होता. अम्मीनादाब हा अदामीनाचा पुत्र होता. आदमीन हा अर्णयाचा पुत्र होता. अर्णय हा हेस्त्रोनाचा पुत्र होता. हेस्त्रोन हा पेरेसाचा पुत्र होता. पेरेस हा यहूदाचा पुत्र होता. 34 यहूदा हा याकोबाचा पुत्र होता. याकोब हा इसहाकाचा पुत्र होता. इसहाक हा अब्राहामाचा पुत्र होता. अब्राहाम हा तेरहाचा पुत्र होता. तेरह हा नाहोराचा पुत्र होता. 35 नाहोर हा सरूगाचा पुत्र होता. सरूग हा रऊचा पुत्र होता. रऊ हा पेलेगाचा पुत्र होता. पेलेग हा एबराचा पुत्र होता. एबर हा शेलहाचा पुत्र होता.
36 शेलेह हा केनानाचा पुत्र होता. केनान हा अर्पक्षदाचा पुत्र होता. अर्पक्षद हा शेमाचा पुत्र होता. शेम हा नोहाचा पुत्र होता. नोहा हा लामेखाचा पुत्र होता. 37 लामेख हा मथुशलहाचा पुत्र होता. मथुशल हा हनोखाचा पुत्र होता. हनोख हा यारेदाचा पुत्र होता. यारेद हा महललेलाचा पुत्र होता. महललेला हा केनानाचा पुत्र होता. 38 केनान हा अनोशाचा पुत्र होता. अनोश हा शेथाचा पुत्र होता. शेथ हा आदामाचा पुत्र होता. आदाम हा देवाचा पुत्र होता, देवाने निर्माण केलेला मनुष्य होता.
Chapter 4
1 मग पवित्र आत्म्याने भरल्यानंतर, येशूने यार्देन नदी सोडली, आणि पवित्र आत्म्याने त्याला रानात नेले. 2 पवित्र आत्मा त्याला चाळीस दिवसांपर्यंत रानात घेऊन गेला. तो तेथे असतांना, सैतानाने त्याची सतत परिक्षा घेतली. त्या संपूर्ण वेळेत येशू हा रानात होता. आणि त्याने काहीही खाल्ले नाही, मग जेव्हा चाळीस दिवस संपले, तेव्हा त्याला अतिशय भुक लागली.
3 तेव्हा सैतान येशूला म्हणाला, “तू खरोखर देवाचा पुत्र आहेस तर, तुला खाण्यासाठी ह्या धोडंयाची भाकर व्हावी अशी आज्ञा कर!” 4 येशूने उत्तर दिले, “नाही, मी तसे करणार नाही, कारण शास्त्रालेखांमध्ये असे लिहिले आहे, ‘लोकांना जगण्यासाठी अन्नापेक्षाही इतर काहीची आवश्यकता असते.’”
5 मग सैतान येशूला उंच पर्वताच्या माथ्यावर घेऊन गेला आणि त्याला एका क्षणात जगातली सर्व राष्ट्रे दाखवली. 6 मग सैतान येशूला म्हणाला, “मी तुला ह्या सर्व राष्ट्रांवर शासन करण्याचा अधिकार देईन आणि त्या सर्व प्रदेशांचे वैभव आणि संपत्ती तुझ्या ताब्यात देईन. कारण देवाने मला ह्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी दिली आहे, आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर जे काही करू इच्छितो ते करू शकतो. 7 जर तू माझी उपासना करशील, तर मी ह्या सर्वांवर तुला राज्य करण्यास अधिकार देईन!”
8 पण येशूने उत्तर दिले, “नाही, मी तुझी उपासना करणार नाही, कारण शास्त्रालेखामध्ये असे लिहिले आहे, ‘तू केवळ तुझा देव प्रभू परमेश्वर, याचीच उपासना करावी. ज्याची तू सेवा करावी असा केवळ तोच एकमेव आहे!’”
9 नंतर सैतानाने येशूला यरुशलेमेस नेले. त्याने त्याला मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि म्हटले, “जर तू खरोखर देवाचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक. 10 कारण शास्त्रालेखांमध्ये असे लिहिले आहे, ‘तुला इजा होऊ नये म्हणून,
‘देव तुझे रक्षण करण्यासाठी त्याच्या देवदूतांना आज्ञा देईल.’ 11 आणि असे देखील म्हटले आहे,
‘तू पडू नये आणि तुला इजा होऊ नये म्हणून ते तुला त्यांच्या हातावर उचलून धरतील, तुझ्या पायाला धोंडयांची साधी ठेच देखील लागणार नाही.’”
12 परंतु येशू त्याला म्हणाला, “नाही, मी तसे करणार नाही, कारण शास्त्रलेखांत असेही लिहिले आहे: ‘आपला देव परमेश्वर ह्याची परिक्षा घेण्याचा प्रयत्न करू नको.”
13 तेव्हा, सैतानाने बऱ्याच मार्गांनी येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर, काही वेळेसाठी तो त्याला सोडून निघून गेला.
14 ह्यानंतर, येशू अरण्यातून निघून आला आणि गालील जिल्ह्यात परतला. पवित्र आत्मा त्याला सक्षम करीत गेला. त्या संपूर्ण प्रदेशात, लोकांनी येशूविषयी ऐकले व त्याच्याबद्दल इतरांना सांगितले. 15 त्याने लोकांना त्यांच्या सभास्थानांमध्ये शिकविले आणि त्याच्या शिकवणीमूळे लोक त्याची प्रशंसा करू लागले.
16 मग येशू नासरेथ येथे गेला, जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, ते हेच नगर होते. नित्यक्रमाप्रमाणे, तो शब्बाथ दिवशी सभास्थानात गेला. शास्त्रलेखांमधून काही भाग मोठ्याने वाचण्यासाठी तो तेथे उभा राहिला. 17 सभास्थानाच्या एका सेवकाने त्याच्या हातात यशया संदेष्टयाने फार पूर्वी लिहिलेले लेख असलेला एक ग्रंथपट दिला. येशूने तो ग्रंथपट उघडला आणि त्यात जेथे असे शब्द लिहिलेले आहेत तो भाग काढला:
18 “प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये आहे.
त्याने मला गरीब लोकांना देवाच्या सुवार्तेची घोषना करण्यास नियुक्त केले आहे.
कैदी मुक्त होतील अशी घोषणा करण्यासाठी
आणि जे आंधळे आहेत ते पुन्हा पाहू शकतील हे त्यांना सांगण्यासाठी, त्याने मला येथे पाठवले आहे.
रंजलेल्या-गांजलेल्या लोकांना मी मुक्त करीन.
19 प्रभूने लोकांसाठी अनुकूल कार्य करण्याची आता वेळ आली आहे, हे घोषित करण्यासाठी त्याने मला येथे पाठवले आहे.
20 मग त्याने तो ग्रंथपट लपेटला आणि सेवकाला परत केला, आणि तो जाऊन खाली बसला. तेव्हा सभास्थानातील सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत होते. 21 तो त्यांना म्हणाला, “आज जो हा शास्त्रलेख तुम्ही ऐकला तो पूर्ण झाला आहे.” 22 तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनी ते ऐकले आणि त्यांना आश्चर्य वाटले की हा इतका चांगला कसा बोलू शकतो. मग काही लोकांनी म्हटले, “हा तर योसेफाचाच मुलगा आहे ना?”
23 तो त्यांना म्हणाला, “तुम्हापैकी काहीजण मला अशी म्हण लावतील, ‘अरे वैद्या, स्वतःलाच बरे कर!’ तू जसे तुझ्या स्वतःच्या गावी चमत्कार केले तसे तू कफर्णहूमांतही कर!’” 24 मग तो त्यांना म्हणाला, “हे निश्चितच सत्य आहे की, संदेष्ट्याच्या स्वतःच्या गावातील लोक त्याच्या संदेशाचा स्वीकार करत नाहीत.
25 परंतु ह्याचा विचार करा: एलीया संदेष्ट्यांच्या काळात इस्राएलामध्ये पुष्कळ विधवा राहत होत्या, त्यावेळेस सर्व देशभरात साडेतीन वर्ष पाऊस पडला नाही म्हणून, भयंकर दुष्काळ पडला. 26 परंतु देवाने इस्राएलामध्ये असलेल्या विधवांच्या मदतीसाठी एलीयाला पाठवले नाही. देवाने त्याला सिदोन प्रदेशातील सारफथ येथे इस्राएली नसलेल्या अशा एका विधवेला मदत करण्यास पाठविले. 27 एलीया संदेष्ट्याच्या काळात पुष्कळसे कुष्ठरोगी इस्त्राएलामध्ये होते. पण एलीयाने त्यातील कोणालाही बरे केले नाही, परंतु सिरीयातील यहूदी नसलेल्या नामानाला बरे केले.”
28 त्याने हे म्हटलेले सभास्थानातील सर्व लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते फार संतापले. 29 म्हणून ते सर्व उठले आणि त्याला त्यांनी गावाबाहेर काढले. त्यांनी त्याला गावाबाहेरील एका डोंगराच्या माथ्यावर नेले, ते त्याला तेथील कड्यावरून ढकलून देऊन ठार करणार होते. 30 परंतु तो अगदी सहज चालत त्यांच्यामधून निघून गेला.
31 एके दिवशी तो गालील जिल्ह्यातील कफर्णहूम या शहरात आपल्या शिष्यांबरोबर खाली गेला. पुढील शब्बाथ दिवशी, त्यांनी लोकांना सभास्थानामध्ये शिकविले. 32 त्यांना त्याच्या शिक्षणा बद्दल सतत आश्चर्य वाटले कारण तो अधिकाराने बोलत असे.
33 त्या दिवशी, सभास्थानामध्ये एक मनुष्य होता त्याला एका दृष्ट आत्म्याने पछाडले होते. तो मनुष्य मोठ्याने ओरड्ला, 34 “हे! नासरेथकरापासून आलेल्या येशू! आम्ही दृष्ट आत्म्याचे तुझ्याविषयी आम्हांला काही घेणे देणं नाही! आमचा नाश करावयास तू आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवापासून आलेला तू एक पवित्र आहेस!”
35 येशू ने दृष्ट आत्म्याला असे म्हणून धमकावले, “गप्प राहा व याच्यातून बाहेर निघ” मग त्या भूताने त्या मनुष्याला लोकांमध्ये पाडून काही उपद्रव न करिता त्यांच्यातून निघून गेला. 36 सभास्थानामध्ये असलेले सर्व लोक खूप आश्चर्यचकित झाले. ते एकमेकांना म्हणाले, “तो आत्मविश्वासाने बोलतो, आणि त्याच्या शब्दामध्ये फार सामर्थ्य आहे! दृष्ट आत्मे देखील त्याच्या आज्ञा पाळतात आणि तो त्यांना आज्ञा देतो, तेव्हा ते लोकांमधून बाहेर येतात” 37 आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये प्रत्येक ठिकाणी, येशूने जे केले त्या बद्दल लोक सतत बोलत असत.
38 मग येशूने सभास्थान सोडले आणि शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू आजारी होती आणि तिला खूप ताप आला होता. तेथे असलेल्या काही लोकांनी येशूला तिला बरे करावे म्हणून विनंती केली. 39 म्हणून तो तिच्याजवळ उभा राहिला आणि त्या तापाला तिला सोडून जाण्यास त्याने आज्ञा केली. तत्क्षणी ती बरी झाली! ती उठली आणि तिने त्यांना जेवण वाढले.
40 त्या दिवशी सूर्य मावळत होता, तेव्हा बऱ्याच लोकांनी आपल्या मित्रांना किंवा जे विविध रोगांनी आजारी पडले होते त्या नातेवाईकांना येशूकडे आणले. त्याने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले आणि त्या सर्वांना बरे केले. 41 अनेक लोकांमधून दृष्ट आत्म्यांना बाहेर येण्यास दटाविले, ज्यावेळेस दृष्ट आत्मे लोकांना सोडत होते तेव्हा ते मोठ्याने आरोळी मारत येशूला म्हणत होते, “तू देवाचा पुत्र आहेस!” परंतु त्याने त्या दृष्ट आत्म्याला त्याच्याबद्दल लोकांना सांगू नये अशी आज्ञा दिली, कारण त्यांना ठाऊक होते तो मसीहा आहे.
42 दुसऱ्या दिवशीच्या अगदी पहाटे येशूने ते घर सोडले आणि प्रार्थना करण्यासाठी तो एका निर्जन जागी गेला. असंख्य लोक त्याला शोधत होते, आणि ज्यावेळेस तो त्यांना सापडला तेव्हा त्याने त्यांना सोडून जाऊ नये म्हणून विनंती करू लागले. 43 परंतु तो त्यांना म्हणाला, “मला इतर लोकांना देखील त्यांच्या शहरात जाऊन देव कसा सर्वांवर राज्य करणार आहे हा संदेश सांगायचा आहे, कारण ते करण्याकरिता मला पाठवले आहे.” 44 म्हणून त्याने यहूदीया प्रांतातील वेगवेगळ्या शहरांमधील सभास्थानांमध्ये उपदेश देणे चालू ठेवले.
Chapter 5
1 एके दिवशी, तो शिकवित असलेला देवाचा संदेश ऐकण्यासाठी बरेच लोक येशूभोवती गर्दी करीत होते. तो गनेसरेत सरोवरच्या काठी उभा होता. 2 त्याने सरोवरच्या काठी लागलेल्या मासेमारीच्या दोन होड्या पाहिल्या. मासेमारांनी होड्या सोडल्या होत्या आणि ते मासे धरणारी जाळी धूत होते. 3 येशूने त्या दोन होड्यांपैकी एका होडीमध्ये प्रवेश केला; ही होडी शिमोनाची होती. येशूने शिमोनाला होडी किनाऱ्यापासून थोडी दूर ढकलायला सांगितले. येशू त्या होडीत बसला आणि तिथून जमावाला शिकवू लागला.
4 त्याने त्यांना शिक्षण शिकवल्यानंतर, त्याने शिमोनाला म्हटले, “होडी बाहेर खोल पाण्यात घेऊन जा आणि काही मासे पकडण्यासाठी पाण्यात जाळी सोड.” 5 शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही संपूर्ण रात्रभर मेहनत केली, आणि तरीही आम्हांला कोणतेही मासे पकडता आले नाही. परंतु तुमच्या सांगण्यावरून, मी परत जाळे खाली सोडतो. 6 म्हणून शिमोन आणि त्याच्या माणसांनी त्यांचे जाळे खाली सोडले आणि त्यांनी इतके मासे पकडले की त्यांचे जाळे फाटू लागले. 7 त्यांनी त्यांच्या मासेमारीच्या सहकाऱ्यांना दुसऱ्या होडीने येऊन त्यांना मदत करण्यास सांगितले. तेव्हा ते आले आणि त्यांनी इतके मासे भरले की, दोन्ही होड्या बुडू लागल्या.
8 शिमोन पेत्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, “मला सोडून जा, कारण प्रभू, मी एक पापी मनुष्य आहे.” 9 त्याने असे म्हटले कारण त्यांनी धरलेल्या माशांचा समुदाय पाहून तो चकित झाला होता. तेव्हा जे लोक त्याच्याबरोबर होते ते देखील चकित झाले, ज्यात जब्दीचे दोन्ही मुले याकोब व योहान यांचा समावेश होता, हे दोघेही शिमोनाच्या मच्छिमारीच्या भागीदारांपैकी होते. 10 परंतु येशू शिमोनाला म्हणाला, “घाबरू नको! आतापर्यंत तू मासे जमा करत होतास, परंतु आता येथून पुढे तू माझे शिष्य होण्याकरीता लोकांना जमा करशील. 11 मग त्या पुरुषांनी होड्या किनाऱ्यावर आणल्यानंतर, त्यांनी आपला मासेमारीचा व्यवसाय सोडला आणि दुसरे सर्वकाही सोडले आणि येशूसह गेले.
12 येशू जवळपासच्या एका खेड्यात असता, तेथे एक मनुष्य होता जो त्वचेच्या एका रोगाने पीडीत होता ज्याला कुष्ठरोग असे म्हणतात. येशूला त्याने पाहिले, तेव्हा त्याने त्याच्या समोर जमिनीवर लोटांगण घातले आणि त्याला विनवणी केली, “प्रभू, कृपा करुन मला बरे करा, तुमची इच्छा असेल तर मला बरे करा कारण तुम्ही मला बरे करण्यास सक्षम आहात!” 13 मग येशूने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला. तो म्हणाला, “तुला बरे करण्याची माझी इच्छा आहे, आणि आता मी तुला बरे करितो! “ताबडतोब तो मनुष्य बरा झाला. त्याला आता कुष्ठरोग नव्हता!
14 मग येशूने त्याला म्हटले, “तुझ्या उपचारांबद्दल लोकांना लगेच सांगू नको, ह्याची खात्री बाळग. प्रथम, यरूशलेममध्ये एका याजकाकडे जा आणि तू आता कुष्ठरोगी नाहीस हे त्याला तपासता यावे म्हणून तु स्वतःला दाखव. मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे जे लोक कुष्ठरोगापासून बरे होतात त्यांनी याजकाला अर्पण द्यावे त्याप्रमाणे तू देखील घेऊन जा.”
15 परंतु येशूने त्या माणसाला कसे बरे केले हे याविषयी अनेक लोकांनी ऐकले होते. याचा परिणाम असा झाला की त्याचे शिक्षण ऐकण्याकरता आणि त्याने त्यांचा रोग बरा करावायासाठी मोठा लोकसमुदाय येशूकडे आला. 16 परंतु अनेकदा तो त्यांच्यापासून दूर वेगळ्या क्षेत्रात जात आणि प्रार्थना करीत असे.
17 एके दिवशी येशू शिकवत होता, तेव्हा परूशी पंथातील माणसे जवळच बसले होते. त्यांच्यापैकी काही जण यहूदी नियमांचे तज्ञ शिक्षक होते. ते गालील जिल्ह्यातील अनेक गावांतून आणि यरुशलेमच्या आणि यहूदीया प्रांतातील इतर नगरामधून आले होते. त्याचवेळी, लोकांना बरे करण्यासाठी देव येशूला सामर्थ्य देत होता.
18 येशू तेथे असता, काही पुरुषांनी अर्धांगवायू झालेल्या एका मनुष्याला त्याच्याकडे आणले. त्या मनुष्याला घेऊन जाण्यासाठी एका बाजेवर त्याला ठेवले होते आणि येशूसमोर त्याला खाली ठेवण्याकरता त्याला घरात नेण्यासाठी प्रयत्न करू लागले. 19 परंतु तेथे एक मोठा लोकसमुदाय त्या घरात जमला होता त्यामुळे त्यांना त्याला आत नेता येईना, म्हणून ते बाहेरील पायऱ्याने वर छप्परावर गेले. मग त्यांनी छत उघडे करावे म्हणून छप्परावरील काही कौलारू काढून छत उघडे केले. त्यांनी त्या माणसाला बाजेवरून उघडलेल्या छतातून गर्दीचा मध्यभागी सोडले आणि त्याला खाली अगदी येशूच्या पुढे ठेवले.
20 येशूला हे समजले ते असा विश्वास ठेवत होते तो ह्या मनुष्याला बरे करू शकतो, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मित्रा, मी तुझ्या पापांची क्षमा करतो.” 21 यहूदी नियमामध्ये तरबेज असलेले शिक्षक आणि बाकीचे परूशी स्वत:शी विचार करायला सुरूवात केली, “हा मनुष्य गर्विष्ट आहे आणि असे बोलून हा देवाचा अपमान करितो! देवाशिवाय पापाची क्षमा कोणीही करू शकत नाही हे आम्हां सर्वांना ठाऊक आहे.
22 येशूला माहित होते की, ते काय विचार करत होते. म्हणून तो त्यांना म्हणाला, “मी जे म्हणालो त्या गोष्टीविषयी तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू नका! याचा विचार करा: 23 ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ कारण कोणीही पाहू शकत नाही खरोखरच त्या व्यक्तीची क्षमा होते किंवा नाही. हे सांगणे सोपे आहे. परंतु ‘ऊठ आणि चाल’ असे म्हणणे सोपे नाही कारण तो बरा झाला किंवा नाही हे लोक ताबडतोब पाहू शकतात. 24 म्हणून मी या माणसाला बरे करीन जेणेकरून तुम्हाला माहिती होईल देवाने मला मानव पुत्र म्हणून पृथ्वीवरील लोकांच्या पापांची क्षमा करण्यास परवानगी दिली आहे.” मग त्याने अर्धांगवायू झालेल्या माणसाला म्हटले, “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी बाज उचल, आणि घरी जा.”
25 ताबडतोब तो मनुष्य बरा झाला! तो त्या सर्वां समोर उभा राहिला. तो झोपत असलेली बाज त्याने उचलली, आणि देवाची स्तुती करीत घरी गेला. 26 तेथे असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले! त्यांनी देवाची स्तुती केली आणि पूर्णपणे अस्ताव्यस्त झाले. ते म्हणत राहिले, “आज आम्ही अद्भुत गोष्टी पाहिल्या आहेत!”
27 मग येशूने ते ठिकाण सोडले आणि त्याला लेवी नावाचा एक मनुष्य दिसला जो रोमी सरकारसाठी कर गोळा करीत असे. सरकारला आवश्यक असलेले कर लोक जेथे भरत त्या जकातदाराच्या मंडपामध्ये तेथे तो बसला होता जेथे लोक त्याच्याकडे येत होते. येशूने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर चल आणि माझा शिष्य हो!” 28 लेवीने आपले काम सोडले आणि येशूबरोबर गेला.
29 नंतर, लेवीने येशू आणि त्याच्या शिष्यांसाठी आपल्या घरी एक मोठी मेजवानी तयार केली. जकातदाराचा एक मोठा समुह तिथे होता आणि इतरही त्यांच्याबरोबर एकत्र खात होते. 30 काही माणसे परूशी पंथाचे होते, त्यासह त्यांच्यापैकी काहीजण यहूदी नियम शिकवणारे होते, त्यांनी येशूच्या शिष्यांना असे म्हणून तक्रार केली, “तुम्ही जकातदार व इतर भयंकर पाप्यांसोबत खाऊ नये. 31 मग येशू त्यांना म्हणाला, “असे लोक आहेत जे आजारी आहेत ज्यांना माहित आहे की त्यांना वैद्याची गरज आहे, असे नाहीत जे विचार करतात की ते निरोगी आहेत. 32 तसेच, जे धार्मिक आहेत, असा विचार करतात त्यांना माझ्याकडे बोलवण्याचे आमंत्रण देण्यासाठी मी स्वर्गातून आलो नाही. तर ज्यांना माहित आहे की ते पापी आहेत त्यांना त्यांच्या पापमय वागणूकीपासून दूर करून माझ्याकडे बोलवण्याचे आमंत्रण देण्यासाठी मी आलो आहे.”
33 ते यहूदी पुढारी येशूला म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य उपास व प्रार्थना करतात, आणि परुश्यांचे शिष्यही तसेच करतात परंतु तुझे शिष्य खात आहेत आणि पित आहेत! ते दुसऱ्यांसारखे उपास का करत नाहीत?” 34 येशूने उत्तर दिले, वराच्या मित्रांला तो त्यांच्या सोबत असतांना उपास करायला सांगत नाहीत, तुम्ही असे सांगता का? नाही, कोणीही असे करणार नाही! 35 पण एकेदिवशी वर त्याच्या मित्रांपासून काढून घेतला जाईल. नंतर, त्यावेळी, ते उपवास करतील.
36 नंतर त्याचे म्हणणे स्पष्ट करण्यासाठी येशूने त्यांना दुसरे उदाहरण दिले: तो म्हणाला, “लोक कधीही नवीन कापडाचा तुकडा फाडून तो जुन्या कपड्याला दुरुस्त करण्यासाठी जोडत नाही. जर त्यांनी असे केले तर ते नवीन कापडाला फाडून त्याचा नाश करतील आणि नवीन कापडाचा तुकडा जुन्या कापडासोबत जुळणार नाही.
37 आणि कोणीही नवीन निचरा केलेला द्राक्षरस जुन्या चामडयाच्या पिशवीत साठवून ठेवत नाही. जर कोणी असे केले तर चामडयाची पिशवी फाटून उघडी पडेल कारण जेव्हा नवीन द्राक्षरस आंबेल आणि विस्तारीत होईल तेव्हा ती पिशवी ताणणार नाही. म्हणून ती चामडयाची पिशवी नाश पावेल, आणि त्यातील द्राक्षरस सुध्दा खाली सांडून नाश पावेल. 38 याउलट, नवीन द्राक्षरस नवीन चामडयाच्या पिशवीतच ठेवायला पाहिजे.
39 यापुढे, जो फक्त जुना द्राक्षरस पितो त्यात त्याने समाधानी असावे. त्यांना नवीन द्राक्षरस नको आहे कारण ते म्हणतात, ‘जुना द्राक्षारस चांगला आहे!’”
Chapter 6
1 एका शब्बाथ दिवशी, येशू आणि त्याचे शिष्य काही धान्याच्या शेतामधून जात होते, तेव्हा शिष्य कणसे तोडू लागले त्यांनी टरफलापासून वेगळे करण्यासाठी त्यांनी ते त्याच्या हातावर चोळली, आणि त्यांनी धान्य खाल्ले 2 काही परूशी जे त्यांना बघत होते ते त्यांना म्हणाले, “शब्बाथ दिवशी काम करण्यास आपला करार आपल्यास मनाई करतो; तुम्ही काम करायला नको होते!”
3 येशूने परुश्यांना उत्तर दिले, “खरोखर जेव्हा दावीद आणि त्याच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले या विषयी जे वचनात लिहले आहे ते निश्चीतच तुम्ही वाचले आहे! 4 जसे तुम्हांला माहित आहे, दावीदाने देवाच्या मंदिरात प्रवेश केला आणि त्याने जेवण मागीतले. याजकाने देवासमोर ठेवलेली भाकर त्याला दिली. मोशेच्या एका करारात देवाने सांगितले की, केवळ याजकाला ती भाकर खावयाची परवानगी आहे. परंतु जरी दावीद व त्याची माणसे याजक नसूनही, त्याने काही भाकरी खाल्या, आणि त्याने त्याच्या सोबतच्या माणसांनाही दिल्या!” 5 येशू त्यांना हे देखील म्हणाला, “याचप्रमाणे, मनुष्याच्या पुत्राला शब्बाथ दिवशी लोकांसाठी काय करण्यास योग्य आहे हे ठरवाण्याचा अधिकार आहे!”
6 दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी, येशू सभास्थानात लोकांना शिकवत होता आणि तिथे एक मनुष्य होता ज्याचा उजवा हात वाळलेला होता. 7 जी माणसे यहूदी नियम शिकवत होते आणि परूशी लोक तिथे होते जे येशूला निरखून पाहत होते. जर त्यांने त्या माणसाला बरे केले तर शब्बाथ दिवशी काम करू नये या कराराचा आज्ञाभंग करण्यासाठी ते त्याला दोषी ठरवू शकतील हे त्यांना बघायाचे होते. 8 परंतु ते काय विचार करतात ते येशूला माहित होते म्हणून तो वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “ये आणि येथे सर्वासमोर उभा राहा म्हणून तो मनुष्य उठला आणि उभा राहिला.
9 येशू त्यांना म्हणाला, “मी हे तुम्हांला विचारतो: देवाने मोशेला जो करार दिला त्यानुसार शब्बाथ दिवशी लोकांचे भले करावे की वाईट करावे? शब्बाथ दिवशी, जीवन वाचवावे की त्याचा नाश करावा?” 10 कोणीही त्याला उत्तर दिले नाही, म्हणून त्याने सर्वांकडे बघितले आणि नंतर त्या माणसाला म्हणाला, “तुझा वाळलेला हात लांब कर!” त्या मनुष्याने तसेच केले, आणि त्याचा हात परत पुर्णपणे बरा झाला! 11 परंतु धार्मिक नेते खूप संतापले, आणि येशूपासून सुटका कशी करता येईल याविषयी ते आपआपसात चर्चा करू लागले.
12 एक दिवस, त्यानंतर, येशू डोंगरावर प्रार्थना करण्यास गेला. त्याने तेथे रात्रभर देवाची प्रार्थना केली. 13 दुसऱ्या दिवशी त्याने सर्व शिष्यांना त्याच्या जवळ येण्याची आज्ञा केली. त्यामधून त्याने बारा माणसांची निवड केली ज्याला त्याने प्रेषित असे संबोधले 14 हे पुरुष होते: शिमोन, ज्याला त्याने नवीन नाव दिले, पेत्र; अंद्रिया, पेत्राचा लहान भाऊ; याकोब आणि त्याचा लहान भाऊ, योहान; फिलिप्प; बर्थलमय; 15 मत्तय, ज्याचे दुसरे नाव लेवी होते; थोमा; अल्फीचा पुत्र दुसरा याकोब; शिमोन जो जिलोत, 16 वेगळा मनुष्य ज्याचे नाव याकोब त्याचा पुत्र यहूदा; आणि यहूदा इस्कार्योत, ज्याने नंतर येशूला धरून दिले.
17 येशू त्याच्या शिष्यांसोबत डोंगरावरून खाली आला आणि त्याच्या शिष्यां सोबत सपाट जागेवर उभा राहिला. तेथे त्याच्या शिष्यांचा मोठा जमाव होता. यरूशलेमेहून आलेल्या लोकांचा एक मोठा समुह देखील तेथे होता आणि यहूदा येथील अनेक प्रांतातून आणि सोर व सिदोन शहराच्या समुद्रकिनाऱ्या जवळच्या भागातून अनेक लोकांचा मोठा समुदाय तिथे आला होता. 18 येशूची शिकवण ऐकण्यासाठी आणि त्यांच्या रोगांपासून बरे होण्यास ते आले होते. ज्यांना अशुद्ध आत्म्याने पिडलेले होते त्यांना त्याने बरे केले. 19 जमावातील प्रत्येकजण त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत होता. कारण त्याने त्याच्या सामर्थ्याने सर्वांना बरे केले होते.
20 मग त्याने त्याच्या शिष्याकडे बघितले आणि म्हणाला, “जो दीन आहे त्याच्यासाठी हे फार चांगले आहे कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्याकरीता आहे. 21 जो आता भुकेला आहे हे त्याच्यासाठी फार चांगले आहे, कारण तुला जे पाहिजे ते सर्व देव तुला देणार आहे.
जे आता दु:ख करत आहेत ते त्यांच्यासाठी फार चांगले आहे, कारण एके दिवशी देव तुम्हांला आंनदाने हसायला लावणार आहे.
22 हे तुमच्यासाठी फार चांगले आहे जेव्हा लोक तुमचा तिरस्कार करतात, जेव्हा ते तुम्हांला नाकारतात, जेव्हा ते तुमचा अपमान करतात आणि म्हणतात, तू दुष्कर्मी आहे कारण तुम्ही माझ्या म्हणजे मनुष्याच्या पुत्राच्या मागे आलात. 23 जेव्हा हे घडेल तेव्हा, आनंद करा! वर आणि खाली उड्या मारा कारण तुम्ही खूप आनंदी आहात! देव स्वर्गात तुम्हांला मोठे बक्षिस देईल! हे विसरू नका फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी देवाच्या संदेष्टयाशी अशाच गोष्टी केल्या होत्या.
24 परंतु जे श्रीमंत आहेत त्याच्यांसाठी हे फार वाईट आहे; जो आराम तुम्हांला मिळणार आहे ते अगोदरच तुमच्या श्रीमंतीने दिले आहे. 25 आता ज्याची तुम्हास गरज आहे ते सर्व तुमच्या कडे आहे असा विचार करणाऱ्यासाठी ही फार दु:खाची गोष्ट आहे; तुम्हांला हे अवगत होईल ह्या सर्व गोष्टी तुमचे सांत्वन करणार नाहीत. 26 हे किती दु:खद आहे जेव्हा प्रत्येक जण तुमच्या विषयी चांगल्या गोष्टी सांगतो. अशाचप्रमाणे, तुमचे पूर्वज देवाच्या संदेष्ट्याविषयी खोटी साक्ष देणाऱ्या माणसांविषयी चांगल्या गोष्टी बोलत असत.
27 “परंतु जे मी सांगतो ते ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी हे सांगतो: फक्त तुमच्या मित्रांवर नव्हे तर तुमच्या शत्रुवर प्रेम करा! जे तुमचा तिरस्कार करतात त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करा! 28 जे तुम्हांला शाप देतात त्यांच्यासाठी देवाकडे आशीर्वाद माग! त्यांच्यासाठी प्रार्थना करा ज्यांनी तुम्हांला वाईट वागणूक दिली!
29 जो कोणी तुमच्या एका गालावर मारून तुमचा अपमान केला तर तुमचा चेहरा त्याच्याकडे वळवा जेणे करुन तो तुमच्या दुसऱ्या गालावर पण मारू शकेल. जर कोणी तुझा अंगरखा काढू इच्छितो, तर तुझा सदराही त्याला दे. 30 जो प्रत्येकजण तुझ्याकडे मागतो त्याला काहितरी दे. जर कोणी तुझ्या मालकीची वस्तु तुला मागतो तर त्याला ती दे परत मागु नकोस. 31 ज्या प्रकारे दुसऱ्यांनी तुझ्याशी वागावे अशी तुझी इच्छा आहे त्याच प्रकारे तू सुध्दा त्याच्याशी वागले पाहिजे. 32 तू फक्त तुला प्रेम करणाऱ्यावर प्रेम करशील, तर देवाकडून स्तुतीची अपेक्षा करू नकोस, कारण पापी सुध्दा त्याच्यावर प्रेम करणाऱ्यावर प्रेम करतात. 33 जर तुझ्याशी चांगल्या गोष्टी करण्यासाठी फक्त तू चांगल्या गोष्टी करत असशील तर, हे करण्याऱ्या देवाकडून बक्षिसाची अपेक्षा करू नकोस, कारण पापी सुध्दा हेच करतात. 34 जर तुझा पैसा किंवा संपत्त्ती तुला परत देणाऱ्याला जर तू देत असशील, तर हे करण्यासाठी देव तुला बक्षिस देईल ह्याची अपेक्षा करू नकोस! पापी सुध्दा दुसऱ्या पाप्याला देतात कारण ते सर्व परत मिळवण्याची त्याच्याकडून अपेक्षा करतात. 35 त्याऐवजी, तुमच्या शत्रुवर प्रेम करा! त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करा! त्यांना उधार घ्या, आणि त्याच्या कडून परत कोणतीही किंमत मिळवण्याची अपेक्षा करू नका! तेव्हा देव तुम्हांला मोठे प्रतिफळ देईल. आणि तुम्ही सर्वच परमेश्वराची मुले व्हाल, जसा देव अपकारी आणि दुष्ट लोकांवर सुध्दा दया करतो. 36 तसे तुम्ही सुध्दा दुसऱ्या लोकांशी दयेने वागा, जसा तुमचा स्वर्गीय पिता लोकांशी दयेने वागतो.
37 कठोरपणे लोकांची टीका करू नका आणि मग देव तुम्हांला कठोरपणे टीका करणार नाही. इतर लोकांचा निषेध करू नका, आणि मग तो तुम्हांला दोष देणार नाही. इतरांना त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींबद्दल क्षमा करा, आणि मग देव तुम्हांला क्षमा करील.
38 इतरांना चांगल्या गोष्टी द्या, आणि मग देव तुम्हांला चांगल्या गोष्टी देईल. हे असे होईल जसे तो उदारतेने धान्यांचे माप तुम्हांला देत आहे, एक टोपलीमध्ये खाली दाबून आणि टोपली हलवून यासाठी पूर्णपणे भरली आहे ह्याची खात्री व्हावी, अगदी वरपर्यंत काही धान्य देखील त्याच्याच बाजूस पसरले आहेत! लक्षात ठेवा ज्या मापाचा तुम्ही दुसऱ्यांना न्याय करण्यासाठी किंवा दुसऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपयोग कराल देव त्याच मापाचा उपयोग तुमचा न्याय करण्यासाठी किंवा तुम्हांला आशीर्वाद देण्यासाठी करतो.
39 त्याने हा दाखला त्याच्या शिष्यांना सुध्दा दिला: “एक आंधळा मनुष्य दुसऱ्या आंधळ्या मनुष्याला चालवू शकत नाही. जर त्याने असे केले तर ते दोघेही खडयात पडतील! 40 शिष्य त्याच्या गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. परंतु जेव्हा तो पूर्ण पणे तयार होतो, तो त्याच्या गुरुसारखा होतो. म्हणून तुम्ही सुध्दा माझ्यासारखे बना.
41 जे दुसऱ्याच्या चुका लक्षात घेतात परंतु स्वतःच्या चुका दुर्लक्षित करतात? ते अशासारखे आहे दुसऱ्या माणसाच्या डोळ्यातील कुसळ लक्षात आणणे असे करतांना स्वताःच्या डोळ्यातील मोठे मुसळ दुर्लक्षित करणे. 42 जर तू असे करतोस, तर तू ढोंगी आहेस! तू पहिले स्वतःच्या डोळ्यातील मुसळ काढ दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ काढण्यापुर्वी. म्हणजे, पाप करणे थांबव आणि नंतर तू दुसऱ्यांना त्यांच्या पापापासून मुक्ती देण्यासाठी आध्यात्मिक दुष्टी तुला मिळेल.
43 प्रत्येकाला माहित आहे की निरोगी झाड वाईट फळ देणार नाही आणि रोगीष्ट झाड चांगले फळ देणार नाही. 44 आणि झाडाच्या फळाला पाहून ते झाड कोणत्या प्रकारचे आहे हे कोणीही सांगू शकेल. उदाहरणार्थ, काटेरी झुडपे अंजिराचे फळ उत्पन्न करणार नाही आणि झुडपातून द्राक्षे उत्पन्न करणार नाही अशाप्रकारे मनुष्याचे कृत्ये बघून त्याने अंर्तयामी अंतःकरण ओळखने हे खूप सोपे आहे.
45 चांगले मनुष्य चांगली कामे करतात जे हे दाखवतात की ते चांगल्या गोष्टीचा विचार करतात, आणि दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात जे हे दाखवतात की वाईट विचार योजतात मनुष्य जसा मनात विचार करतो तसाच तो बोलतो आणि वागतो.
46 येशू लोकांना म्हणाला, मी जे सांगतो त्या आज्ञा सुद्धा तुम्ही पाळत नाही तर “तुम्ही मला ‘प्रभू’ का म्हणता? 47 मला तुम्हांला सांगू द्या की जे लोक माझ्या जवळ येतात माझी शिकवन ऐकून त्याप्रमाणे वागतात ते कशा प्रमाणे आहेत. 48 ते अशा माणसा सारखे आहे जो आपले घर बांधण्यासाठी जमीनीत खोल खणले, घराचा पाया मजबूत खडकावर बांधला जाईल ह्याची त्याने काळजी घेतली. नतंर पूर आणि पाण्याचा मोठा प्रवाह घरावर आदळला परंतु तो प्रवाह घराला हालवू शकला नाही, कारण ते घर मजबूत पायावर बांधले होते.
49 परंतु काही लोक जे माझी शिकवण ऐकतात परंतु त्याचे पालन करत नाहीत ते अशा मनुष्यासारखे आहेत, जो आपले घर कोणत्याही पायाविना जमिनीवर बांधतो. जेव्हा नदीला पूर येतो घर त्वरीत कोलमडले आणि त्याचा पूर्णपणे नाश झाला.
Chapter 7
1 लोकांशी बोलणे संपल्यानंतर येशू कफर्णहूम शहरात गेला. 2 त्या शहरामध्ये रोमी सैन्याचा एक जमादार होता, त्याचा एक दास त्याला खूप प्रिय होता. हा दास खूप आजारी असून तो मरणास टेकला होता किंवा मरणाच्या जवळ होता. 3 जेव्हा त्या जमादाराने येशूविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडिलधाऱ्या लोकांना दासाला बरे करण्यासाठी येशूकडे बोलवण्यास पाठविले. 4 जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी कळकळीने जमादाराच्या दासाला मदत करण्यासाठी विचारले ते म्हणाले, “तू हे त्याच्यासाठी करावे यासाठी तो योग्य आहे, 5 कारण तो आमच्या लोकांवर प्रेम करतो आणि आमच्यासाठी आमचे सभास्थान त्याने बांधले आहे.”
06 म्हणून येशू त्यांच्या सोबत अधिकाऱ्याच्या घरी जाण्यासाठी निघाला. जेव्हा तो अगदी घराच्या जवळ होता, तेव्हा अधिकाऱ्याने काही मित्रांना पाठवून येशूला हा संदेश देण्यास सांगितले: “प्रभू येशू पुढे येऊन तुम्ही स्वतःला त्रास देऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावे यासाठी मी योग्य नाही. 7 या कारणास्तव मी स्वतःला तुमच्याकडे येण्यास योग्य मानत नाही. परंतु तुम्ही जर एक शब्द बोलला तर तुम्ही माझ्या दासाला बरे करू शकाल. 8 मला माहित आहे की तुम्ही हे करू शकता कारण मी असा मनुष्य आहे जो आधिकाऱ्यांची आज्ञा पाळतो, आणि मला शिपाई आहेत जे माझी आज्ञा पाळतात. जेव्हा मी त्यापैकी एकाला म्हणतो, “जा!” तो जातो, आणि जेव्हा मी माझ्या दासाला म्हणतो, “ये” तो येतो. जेव्हा मी माझ्या दासाला म्हणतो, “हे कर!” तो ते करतो”.
09 अधिकारी जे म्हणाला हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा त्याला त्याचे आश्चर्य वाटले. तेव्हा त्याच्या सोबत असलेल्या जमावाकडे वळून येशू म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, मला एकही इस्त्राएली असा सापडला नाही जो या विदेशी माणसासारखा माझ्यावर विश्वास ठेऊ शकेल!” 10 जेव्हा ते लोक जे जमादारा कडून आले होते त्याच्या घरी पोहचले, तेव्हा तो दास बरा झालेला त्यांना आढळला.
11 त्यानंतर लवकरच येशू नाईन शहरात गेला. त्याचे शिष्य आणि मोठा जमाव त्याच्या सोबत गेला. 12 जेव्हा येशू शहराच्या फाटकाजवळ आला, तेव्हा त्याने एक मोठा जमाव नुकत्याच मेलेल्या माणसाला घेऊन शहराच्या बाहेर जातांना बघितला. त्याची आई एक विधवा होती आणि तो तिचा एकुलता एक मुलगा होता. ती जमावासोबत होती आणि ते तिच्या मुलाला पुरण्यासाठी घेऊन जात होते. 13 जेव्हा प्रभूने तिला पाहिले, तेव्हा त्याला तिचा कळवळा आला आणि तिला म्हणाला, “रडू नकोस!” 14 तेव्हा तो त्यांच्या जवळ आला आणि ज्या तिरडीवर शरीर ठेवले होते त्याला स्पर्श केला. जी माणसे ते घेऊन जात होते ते शांत उभे राहिले. तो म्हणाला, “हे तरूण मुला, मी तुला सांगतो, ऊठ!” 15 तो मनुष्य उठून बसला आणि बोलू लागला! नंतर येशूने त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.
16 त्या ठिकाणी असलेले लोक समुदायातील प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि ते एकमेकांना म्हणाले, “आमच्यामध्ये एक महान संदेष्टा आला आहे!” आणि, “देव आपल्या लोकांची काळजी करण्यास आला आहे!” 17 नंतर येशूने जे केले त्याविषयीची बातमी यहूदाचा सर्व प्रांत आणि जवळपासच्या सर्व परिसरात पसरली.
18-19 बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांनी ह्या सर्व गोष्टीविषयी त्याला सांगितले. म्हणून योहानाने त्याच्या दोन शिष्यांना येशूकडे पाठवले आणि त्याला विचारले; “देवाच्या वचनाप्रमाणे जो येणार आहे ते आपणच आहात का? की आम्ही दुसऱ्या कोणाची वाट पाहावी?” 20 जेव्हा ते दोन माणसे येशूकडे आली ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने तुम्हांला हे विचारण्यासाठी आम्हास पाठविले की, देवाच्या वचनाप्रमाणे जो येणार आहे ते आपणच आहात का किंवा आम्ही दुसऱ्या कोणाची वाट पाहावी?”
21 त्याच वेळी येशू बऱ्याच लोकांना आजारापासून आणि गंभीर रोगांपासून आणि दुष्ट आत्म्यांपासून बरे करीत होता. त्याने बऱ्याचश्या आंधळ्या लोकांना सुध्दा बरे केले त्यामुळे ते पाहू शकत होते. 22 म्हणून त्याने त्या दोन माणसांना उत्तर दिले, “योहानाला सांगा: जे लोक आंधळे होते ते आता पाहत आहेत जे लोक पांगळे होते ते आता चालत आहेत. ज्या लोकांना त्वचा रोग होता ते बरे झाले. जे लोक बहीरे होते ते ऐकू शकतात जे लोक मरण पावले होते ते परत जिवंत केले गेले आहेत आणि शुभवार्ता गरिबांस सांगण्यात येत आहे 23 आणि हे सुद्धा त्याला सांगा, “जो पाहतो की मी काय करतो आणि जे मी शिकवतो ते तो ऐकतो आणि माझ्यापासून दूर जात नाही अशांना देव आशीर्वाद देतो.
24 जेव्हा योहानाने पाठवलेली माणसे गेली, येशूने जमावातील लोकांना योहानाविषयी बोलण्यास सुरवात केली. तो म्हणाला, “तुम्ही वाळवंटात काय बघण्यासाठी गेला होता? वाऱ्याने हललेले रोपटयाचे पातळ देठ? 25 परंतु तुम्ही बाहेर काय पाहावयास गेला होता? भपकेदार-भडक कपडे घातलेला मनुष्य? हे पाहा जे कपडे घालतात आणि ज्यांना प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम मिळाली आहेत ते राजाच्या राजवाड्यात राहतात. 26 मग तुम्ही काय बघण्यासाठी बाहेर गेला होता? संदेष्टा? हो! परंतु मी तुम्हास सांगतो की एखाद्या साधारण संदेष्ट्यापेक्षा योहान खूप महत्त्वाचा आहे.
27 संदेष्ट्यांनी फारपूर्वी ज्याच्याविषयी लिहून ठेवले आहे तो हा आहे: ‘पाहा, मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवत आहे. तो तुझ्या येण्यासाठी लोकांना तयार करील.’
28 मी तुम्हास सांगतो की सर्व लोकांमधून ज्या लोकांनी आतापर्यंत वास्तव्य केले आहे, त्यामध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तथापि, अगदी सर्वात क्षुल्लक लोक ज्याच्यावर त्यांनी राज्य करण्यास सहमत होईल तो योहानापेक्षा मोठा होईल असा देव विचार करतो.
29 सर्व लोकांनी, जकातदार यांनी येशूने जे सांगितले ते ऐकले तेव्हा देव न्यायी आहे हे त्यांनी मान्य केले, कारण योहानापासून त्यांचा बाप्तिस्मा झाला होता. 30 परंतु परूशी आणि यहूदी शास्त्री यांनी योहानापासून बाप्तिस्मा घेतला नाही आणि त्यांनी देवाची त्यांच्याविषयी असलेली इच्छा त्यांनी अमान्य केली.
31 नंतर येशू हे सुध्दा म्हणाला, “या काळाच्या पिढीत जगणाऱ्या लोकांनो तुम्ही कशासारखे आहात? मी तुम्हास सांगतो: 32 मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसारखे तुम्ही आहात. ते एकमेकांना असे म्हणून हाका मारतात, आम्ही बासरीवर तुमच्यासाठी आनंदी संगीत वाजवले, परंतु तुम्ही नाचला नाही!” मग आम्ही तुमच्यासाठी दुःखी अंत्यविधी गाणी गायली, पण तुम्ही रडला नाहीत!”
33 त्याचप्रमाणे, जेव्हा योहान तुमच्याकडे आला आणि त्याने साधारण जेवण खाल्ले नाही किंवा द्राक्षारस पिला नाही, तुम्ही त्याला नाकराले आणि म्हणाले, “त्याला भूताने ग्रासले आहे!” 34 परंतु जेव्हा मनुष्याचा पुत्र तुमच्याकडे आला आणि इतरांसारखे खात आणि पित बसला तुम्ही त्याला सुद्धा नाकारले आणि म्हणाले, “पाहा! हा मनुष्य खादाड आणि मद्यपी आहे, आणि तो जकातदार आणि पापी लोकांचा मित्र आहे!” 35 परंतु जे देवाच्या मागे जातात त्यांच्याद्वारे देवाचे ज्ञान खरे सिध्द होते.
36 एके दिवशी एका शिमोन नावाच्या परूश्याने येशूला जेवणाचे आमंत्रण दिले म्हणून येशू त्या मनुष्यासोबत त्याच्या घरी गेला आणि मेजाजवळ जेवणासाठी बसला. 37 त्या नगरात एक स्त्री होती जिच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती होती की ती वेश्या आहे. येशू त्या परूश्याच्या घरी जेवत आहे असे तिने ऐकले, तेव्हा तिच्यासोबत एक दगडी रूंद तोंडाची बरणी ज्यामध्ये सुगंधी द्रव्ये होतो ते घेऊन ती तिथे गेली. 38 येशू जेवायला बसणार, इतक्यात ती स्त्री त्याच्या पायाजवळ उभी राहिली. ती रडत होती आणि तिचे अश्रु येशूच्या पायावर पडले. ती सतत तिच्या केसाने त्याचे पाय पुसत होती आणि त्यांचे चुंबन घेत होती आणि त्यांना सुगंधी तेलाचा अभिषेक करत होती.
39 येशूला आमंत्रित केले होते त्या परूश्याने ती स्त्री काय करत आहे हे पाहिले, त्याने विचार केला, “जर हा मनुष्य खरंच संदेष्टा असता, तर जी स्त्री त्याला स्पर्श करत आहे की ती एक पापी आहे हे त्याला समजले असते. 40 त्याला प्रतिसाद देण्यासाठी येशू त्याला म्हणाला, “शिमोना, मला तुला काही सांगायचे आहे” तो म्हणाला, “गुरूजी, ते काय आहे?”
41 येशूने त्याला ही गोष्ट सांगितली: “ज्या मनुष्याचा लोकांना पैसे देण्याचा व्यवसाय होता त्या मनुष्याचे दोन कर्जदार होते. त्यापैकी एकाला पाचशे चांदीचे नाणे देणे होते, आणि दुसऱ्या एकाला पन्नास चांदीचे नाणे देणे होते. 42 दोघांपैकी एकही त्यांनी घेतलेल्या कर्जाची फेड करू शकत नव्हता, म्हणून त्या मनुष्याने दयापूर्वक त्यांना सांगितले की त्यांना पैसे परत करायचे नाही. तर त्या दोघांपैकी कोण त्या मनुष्यावर जास्त प्रेम करेल? 43 शिमोनाने उत्तर दिले, “ज्या एकाला त्याचे जास्त पैसे देणे आहे तो जास्त प्रेम करेल असे मी गृहीत धरतो.” येशू त्याला म्हणाला. “तू बरोबर आहेस.”
44 नंतर तो त्या स्त्रीकडे वळला आणि शिमोनाला म्हणाला, “या स्त्रीने काय केले याविषयी विचार कर! जेव्हा मी तुझ्या घरात प्रवेश केला, तेव्हा यजमान त्याच्या पाहूण्यांचे स्वागत करायला जे करतात ते तू केले नाही, तू माझे पाय धुण्यासाठी मला पाणी दिले नाही, परंतु ह्या स्त्रीने तिच्या आसवांनी माझे पाय धुतले आणि नंतर तिच्या केसानी पुसले! 45 तू चुंबन घेऊन माझे अभिवादन केले नाहीस, परंतु ज्या क्षणापासून मी आलो तिने माझ्या पायाचे चुंबन घेणे थांबवले नाही.
46 तू जैतून तेलाने माझ्या डोक्याला अभिषेक केला नाही, परंतु तिने सुगंधी तेलाने माझ्या पायांना अभिषेक केला. 47 म्हणून मी तुला सांगतो की तिच्या पुष्कळश्या पापासाठी तिची क्षमा झाली आहे आणि म्हणून ती मला खूप प्रेम करते. परंतु जो मनुष्य विचार करतो की त्याचे पाप थोडे आहे आणि त्याची क्षमा झाली आहे, तो मला फार थोडे कमी प्रेम करेल.
48 नंतर तो त्या स्त्रिला म्हणाला, “तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे.” 49 नंतर जे त्याच्यासोबत जेवत होते ते एकमेकांना बोलू लागले, “हा कोण मनुष्य आहे जो म्हणतो की तो पापांची क्षमा करू शकतो?” 50 परंतु येशू त्या स्त्रीला म्हणाला, “तू माझ्यावर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे देवाने तुला वाचविले आहे. तू जात असतांना देव तुला शांती देवो!”
Chapter 8
1 त्यानंतर, येशू आणि त्याचे बारा शिष्य वेगवेगळ्या शहरांमध्ये व खेड्यांमध्ये ठिकठिकाणी प्रवास करत असत. ‘देव लवकरच त्यांच्यावर स्वतःला राजा म्हणून प्रकट करणार आहे’,ही आनंदाची बातमी गाजवत येशू लोकांना उपदेश करत असे. 2 आणि त्यांच्यासोबत, दुरात्म्यांपासून आणि आजारांपासून बऱ्या झालेल्या कित्येक स्त्रियाही प्रवास करत असत. त्यामध्ये मग्दाला ह्या खेड्याची मरीया, तिच्यातून त्याने सात दुरात्मे घालवली होती, 3 योहान्ना, जी खुजाची बायको होती, आणि ती राजा हेरोद अंतिपास याच्या व्यवस्थापकांपैकी एक होती, सूसान्ना आणि अशा कित्येक स्त्रिया त्यात होत्या. त्या आपल्या स्वतःच्या मालमत्तेतून पुरवठा करून येशू आणि त्याच्या शिष्यांना सहकार्य करत असत.
4 वेगवेगळ्या गावातील लोक येशूला पाहावे म्हणून प्रवास करत एकत्र येत होते. म्हणून एके दिवशी फार मोठा जमाव गोळा झाला. मग त्याने त्यांना एक गोष्ट सांगितली: 5 “एक मनुष्य आपल्या शेतामध्ये धान्याचे बीं पेरण्यासाठी गेला. तो त्या जमिनीवर पेरत असता काही बीं पाय वाटेवर पडले. लोकांनी चालतांना ते पायाखाली तुडवले आणि पक्षांनी खाऊन टाकले. 6 काही बीं खडकाळ जमिनीवर पडले आणि तेथे फारशी माती नव्हती. त्यामुळे जसे ते बीं वाढले लागलीच त्याचे रोपटे सुकून गेले कारण तेथे ओलावा नव्हता. 7 काही बीं, जेथे अगोदरच काटेरी झाडे होती, अशा जमिनीवर पडले. ती काटेरी झुडपेही वाढली आणि सोबत ही धान्याची नवीन रोपटेही वाढू लागली. आणि काटेरी झाडांनी रोपट्याची वाढ खुंटवली, अशारितीने दोघांचीही वाढ सोबतच होत असल्याने काटेरी झाडांनी त्यांची वाढ खुंटवली. 8 परंतु काही धान्याचे बीं सुपीक जमिनीवर पडले, आणि ते इतके चांगले वाढले की त्याने काही काही ठिकाणी शंभरपट एवढे पिक दिले.” ह्या गोष्टी बोलल्यानंतर येशू त्यांना मोठ्याने म्हणाला, “मी जे तुम्हांला आता सांगितले त्याविषयी तुम्ही फार लक्षपूर्वक विचार केला पाहिजे!”
9 मग येशूच्या शिष्यांनी त्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगावा अशी त्याला विनंती केली. 10 मग तो त्यांना म्हणाला, “देव राजा म्हणून राज्य कसा करणार आहे याविषयीच्या गुप्त गोष्टी जाणण्याचे विशेषाधिकार तुम्हांला दिलेले आहेत. परंतु इतर सर्वांसोबत मी दृष्टांताद्वारे बोलतो,
जेणेकरून, ‘जरी ते पाहतील परंतु त्यांना कळू नये, आणि जरी ते ऐकतील तरी त्यांना समजू नये.’
11 आता त्या गोष्टींचा अर्थ असा आहे: बीं हे देवाचे वचन होय. 12 लोक देवाचे वचन ऐकतात परंतु त्यानंतर सैतान येतो, आणि ते वचन त्यांच्या मनातून आणि हृदयातून काढून घेतो. हे पाय वाटेवर पडलेले बीं दर्शवते. परिणामी ते विश्वास ठेवत नाहीत आणि त्याचे तारण होत नाही. 13 जे लोक देवाचे वचन ऐकतात आणि आनंदाने स्वीकारतात परंतु त्यांचे मूळ खोलवर नसते, खडकाळ जमिनीवर पडलेले बीं अशा लोकांना दर्शवते. परिणामी ते थोडक्या वेळेपुरतेच विश्वास ठेवतात. मग त्यांच्यावर अवघड परिस्थिती आली तर ते लगेच देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्याचे बंद करतात.
14 काटेरी झाडांमध्ये पडलेले बीं त्या लोकांना दर्शवते जे देवाचे ऐकतात परंतु ते आपल्या जीवनामध्ये काळजी, श्रीमंतीचा मोह किंवा ह्या जीवनातील सुखविलासाची आवड धरतात. आणि त्यामुळे देवाचे वचन त्यांच्या जीवनात वाढत नाही. परिणामी ते आध्यात्मिकरीत्या प्रौढतेपर्यंत पोहंचू शकत नाहीत. 15 परंतु, लोक देवाचे वचन ऐकतात आणि आपल्या सालस व सरळ मनात साठवतात, तेव्हा काय होते हे सुपीक जमिनीत पडलेले बीं दर्शवते. ते देवाचे वचन आपल्या अंतःकरणात टिकवून ठेवतात आणि त्या वचनावर विश्वास ठेवून त्यानूसार आज्ञापालन करतात आणि त्यामुळे ते चांगले आध्यात्मिक फळ उत्पन्न करतात.
16 दिवा लावून कोणीही त्याच्यावर टोपले ठेवत नाहीत, किंवा दिव्याला बिछाण्याखाली ठेवत नाहीत. त्याऐवजी, त्याला दिवठणीवर ठेवतात, म्हणजे खोलीत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकावर त्याचा उजेड पडतो. 17 ह्याचा अर्थ असा होतो, की सध्या जे काही लपलेले आहे ते एक दिवस सर्वांसमोर उघड केले जाईल. आणि सध्या जे काही गुप्त आहे ते एकेकाळी सर्वांच्या समोर मोकळे केले जाईल. 18 म्हणून मी तुम्हांला जे सांगतो ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकण्याची खात्री करा, कारण जे लोक देवाच्या सत्यावर विश्वास ठेवतात त्यांना अधिक समज प्राप्त होईल असे देव करील. परंतु जे देवाच्या सत्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना मला काहीतरी समजते असे वाटते त्याही गोष्टी त्यांना समजणार नाहीत असे देव करील.”
19 एके दिवशी येशूची आई आणि त्याचे भाऊ त्याला भेटावयास आले, परंतु ज्या घरात तो होता तेथे लोकांची बरीच गर्दी त्याच्या अवतीभोवती असल्यामुळे ते त्याच्या जवळपासही येऊ शकले नाहीत. 20 मग कोणीतरी त्याला सांगितले, “तुझी आई व तुझे बंधू बाहेर उभे आहेत, तुझी भेट व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.” 21 परंतु तो त्यांना म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि त्याच्या आज्ञापालन करतात ते माझी आई आणि माझ्या भावांसारखेच मला प्रिय आहेत.”
22 नंतर एके दिवशी, येशू व त्याचे शिष्य मचव्यांत चढले. तो त्यांना म्हणाला, “आपण ह्या सरोवराच्या पलिकडे जावे अशी माझी इच्छा आहे.” म्हणून ते त्या सरोवरापलीकडे जाण्यास मचवा हाकारू लागले. 23 परंतु ते मचवा हाकारत असता येशू झोपी गेला. मग एक मोठे वादळ त्या सरोवरात उठले. लवकरच मचव्यांत पाणी भरू लागले, आणि ते धोक्यात पडले.
24 मग येशूचे शिष्य त्याच्याकडे आले व त्याला उठवले. ते त्याला म्हणाले, “गुरूजी! गुरूजी! आपण मरतो आहोत!” मग तो झोपेतून उठला आणि त्याने वाऱ्याला आणि उचंबळणाऱ्या लाटांना त्यांनी शांत व्हावे अशी आज्ञा केली आणि सर्व काही शांत झाले. सर्वत्र शांतता पसरली. 25 मग तो त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास एवढा कमजोर का आहे?” इतक्यात जे काही घडले त्यामुळे शिष्य आश्चर्यचकित झाले होते, आणि घाबरलेले होते. ते एकमेकांस म्हणत राहिले, “हा कोण आहे की, तो ह्या वादळाला आणि ह्या समुद्रालाही आज्ञा करतो, ते त्याचे पालन करतात?”
26 येशू आणि त्याचे शिष्य यांनी मचवा हाकारने सूरूच ठेवले आणि ते गरसेकर लोकांच्या प्रदेशात आले. गालील जिल्हा ज्या सरोवरावराच्या किनाऱ्यांवर होता, त्याच्या पलिकडे हा प्रदेश होता. 27 येशू मचव्यांतून उतरून जमिनीवर आला, तेव्हा त्या भागातील एका गावातला कोणी एक मनुष्य त्याला भेटला. ह्या माणसामध्ये दुरात्मे होते. बऱ्याच काळापासून ह्या मनुष्याने कपडे घातलेले नव्हते. आणि तो घरात देखील राहत नसे. त्याऐवजी, तो कबरांमध्ये राहत असे.
28 येशू त्याच्या दृष्टीस पडताच, तो मनुष्य मोठ्याने ओरडला, आणि त्याने त्याच्या समोर लोटांगण घेतले आणि मोठ्या आवाजात म्हणाला “तुला माझ्या संगती काय काम, येशू, हे सर्वोच्च देवाच्या पुत्रा, मी तुला विनंती करतो. मला त्रास देऊ नकोस!” 29 येशूने त्या माणसातील अशुद्ध आत्म्याला बाहेर येण्याची आज्ञा केली होती म्हणून तो मनुष्य असे येशूला म्हणाला. ह्या मनुष्याचे हात आणि पाय लोकांनी बऱ्याचदा साखळदंडांनी बांधले होते व ते त्याच्यावर पहारा देत असत परंतु, अनेकदा अशुद्ध आत्मा त्याच्यावर येऊन अचानक झडप घालत असे. तेव्हा तो मनुष्य त्या साखळदंडाना तोडून टाकत असे. आणि तो अशुद्ध आत्मा त्याला घेऊन अरण्यात जात असे.
30 मग येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव ‘सहस्त्रे’ आहे.” कारण पुष्कळ दुरात्म्यांनी त्याच्या आत प्रवेश केला होता म्हणून तो असे बोलला. 31 ते येशूने त्यांना ‘देव ज्या खोल दरीमध्ये दुरात्म्यांना शिक्षा करीतो तिथे जाण्याची आज्ञा करू नये’ म्हणून ते दुरात्मे सारखी विनंती करत होते.
32 जवळच डोंगराच्या कड्यावर डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. त्या दुरात्म्यांनी ‘त्या डुकरांत शिरू द्यावे’ अशी येशूला विनंती केली आणि त्याने त्यांना परवानगी दिली. 33 म्हणून ते सगळे दुरात्मे त्या माणसातून निघाले आणि त्या डुकरांमध्ये शिरले, आणि तो डुकरांचा कळप त्या पठारावरून धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि बुडून मरण पावला.
34 डुकरांच्या कळपाची काळजी घेणाऱ्या लोकांनी या गोष्टी घडतांना पाहिल्या आणि ते तेथून पळून गेले! जे काही त्यांनी पाहिले ते त्यांनी गावात आणि त्या प्रदेशात जाऊन सर्व लोकांना सांगितले. 35 मग सगळीकडून लोक काय घडले ते पाहण्यासाठी तेथे आले. येशू होता तेथे ते आले, तेव्हा ज्या माणसातून भूते निघाली होती, तो मनुष्य शुद्धिवर आलेला व येशूच्या पायांशी बसून त्याचे ऐकत असतांना त्यांना दिसला. त्याने कपडे घातलेले व तो पुन्हा सर्वसाधारण झाला आहे हे त्यांना दिसले आणि ते फार घाबरले.
36 हे सगळे घडतांना ज्या लोकांना पाहिले होते त्यांनी नुकत्याच आलेल्या लोकांना येशूने त्या माणसाला कसे बरे केले आणि त्याच्यातून दुरत्म्यांना कसे घालवले हे सांगितले. 37 मग गरसेकरांच्या अवतीभोवती राहणाऱ्या प्रदेशातील बऱ्याच लोकांनी येशूने त्यांचा प्रदेश सोडून जावे अशी त्यांना विनंती केली कारण ते फार घाबरले होते. म्हणून येशू आणि त्याचे शिष्य पुन्हा मचव्यांत बसले आणि सरोवराच्या पलीकडे गेले.
38 ते निघण्यापुर्वी ज्या माणसातून दुरात्मे घालवले होते तो येशूला कळवळीची विनंती करून म्हणाला, “कृपया मलाही तुझ्या सोबत येऊ दे!” परंतु त्या ऐवजी येशूने त्याला असे म्हणून परत पाठवून दिले, 39 “नाही तू आपल्या घराकडे परत जा आणि देवाने तुझ्यासाठी काय केले आहे ते सर्व आपल्या लोकांना सांग!” म्हणून तो मनुष्य निघून गेला आणि त्याच्या गावात जाऊन येशूने त्याच्यासाठी काय काय केले ते सगळे सांगितले.
40 मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे कर्फणहूमांस गेले. तेथे लोकांची मोठी गर्दी त्याची वाट पाहत होती आणि त्याने त्याचे स्वागत केले. 41 तेव्हा तेथील सभास्थानाच्या पुढाऱ्यांपैकी एक, याईर नावाचा कोणी एक मनुष्य तेथे होता. तो येशूच्या जवळ आला आणि त्याच्या पायाजवळ त्याने दंडवत घातले व प्रभू येशूला विनंती केली की त्याने त्याच्या घरी यावे. 42 कारण त्याची एकुलती एक बारा वर्षांची मुलगी मरायला टेकली होती आणि त्याची इच्छा होती की येशूने तिला बरे करावे.
परंतु येशू त्याच्यासोबत जायला निघाला तेव्हा लोकांची गर्दी येशूच्या अंगावर पडत होती.
43 तेव्हा आता त्या गर्दीमध्ये जिला बारा वर्षापासून रक्तस्त्रावाचा आजार होता अशी एक स्त्री होती. तिने आपला सर्व पैसा वैद्यांवर खर्च केला होता परंतु कोणीही तिला बरे करू शकला नाही. 44 ती येशूच्या मागे आली आणि येशूच्या वस्त्राच्या काठाला तिने स्पर्श केला. लागलेच तिचा रक्तस्त्राव थांबला.
45 येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला!” तेव्हा येशूच्या अवतीभोवतीचे सगळेजण म्हणू लागले की त्यांनी त्याला स्पर्श केला नाही. तेव्हा पेत्र म्हणाला, “गुरूजी ऐवढ्या लोकांची गर्दी तुझा अवतीभोवती आहे आणि ते तुला लोटत आहेत, त्यांच्यापैकी कोणाचाही तुला स्पर्श झाला असेल.” 46 परंतु येशू त्याला म्हणाला, “मला कोणीतरी मुद्दाम स्पर्श केला आहे हे मला माहिती आहे कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले आणि त्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त झाले आहे.”
47 आपण आता आणखी लपू शकत नाही ही जाणिव त्या बाईला झाल्यानंतर, ती थरथर कापत त्याच्या समोर आली आणि जमिनीपर्यंत टेकून त्याच्यासमोर टेकून नमन केले. इतर लोक ऐकत असता तिने त्याला का स्पर्श केला आणि ती लागलीच कशी बरी झाली हे तिने येशूला सांगितले. 48 मग येशू तिला म्हणाला, “माझ्या प्रिय मुली, मी तुला बरे करू शकतो हा तू विश्वास ठेवल्यामुळे तू आता बरी झाली आहेस. आता तू तुझ्या मार्गाने जा आणि देवाची शांती तुझ्यासोबत असो.”
49 तो तिच्या संगती बोलत असतांनाच याईराच्या घरातून एक मनुष्य आला आणि याईरास म्हणाला, “तुझी मुलगी मरण पावली आहे. तर गुरूजींना अधिक त्रास देऊ नको!” 50 तर येशूने जेव्हा हे ऐकले तो याईरास म्हणाला, “घाबरू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि ती पुन्हा जिवंत होईल!”
51 जेव्हा ते घराच्या बाहेर पोहचले, येशूने आपल्या सोबत घरात कोणालाही येऊ दिले नाही, तर केवळ पेत्र, योहान आणि याकोब व मुलीची आई आणि वडील यांनाच घेऊन तो आत गेला. 52 तेथे जमलले सगळे लोक फार मोठमोठ्याने रडत होते आणि ती मुलगी मरण पावली म्हणून ते किती दुःखी आहे हे दाखवत होते. येशू त्या सर्वांना म्हणाला, “रडणे थांबवा! ती मेलेली नाही! ती तर केवळ झोपेत आहे!” 53 आणि ते लोक त्याला हसू लागले, कारण त्यांना ठाऊक होते की ती मुलगी मरण पावलेली आहे.
54 परंतु येशूने तिचा हात धरला आणि तिला आवाज देऊन म्हटले, “मुली, ऊठ!” 55 आणि लागलीच तिचा आत्मा तिच्या शरीरात परत आला आणि ती ऊठून बसली. तिला काहीतरी खायला द्या असे येशूने त्यांना सांगितले. 56 तिचे आईवडिल आश्चर्यचकित झाले, पंरतु येशूने त्यांना सांगितले की जे काही घडले ते कोणालाही सांगू नका.
Chapter 9
1 मग येशूने आपल्या बारा शिष्यांना एकत्र केले आणि सर्व प्रकारचे दुरआत्मे काढण्याची आणि लोकांचे आजार बरे करण्याचे अधिकार व सामर्थ त्यांना दिले. 2 देव स्वतःला त्यांचा राजा कशा प्रकारे दाखवणार आहे; या विषयीचे शिक्षण त्यांनी लोकांना द्यावे व लोकांना बरे करावे म्हणून त्याने त्यांना पाठवले.
3 ते निघण्यापूर्वी येशूने त्यांना म्हटले, “आपल्या प्रवासासाठी तुम्ही सोबत काहीही घेऊ नका. चालण्यासाठी एखादी काठी किंवा एखादी प्रवासाची झोळी किंवा अन्न किंवा पैसा हे काहीही सोबत घेऊ नका सोबत एखादा आणखी एका कापडाचा जोळ घेऊ नका. 4 ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल तो भाग सोडेपर्यंत तुम्ही तेथेच राहा. 5 ज्या शहरात लोक तुमचे स्वागत करत नाहीत त्या ठिकाणी राहू नका. तुम्ही ते शहर सोडतांना आपल्या पायाची धुळ झटकून टाका तुम्हांला त्याने नाकारले म्हणून एक इशारा म्हणून त्याच्या विरुध्द तुम्ही ते करा. 6 मग येशूचे शिष्य गेले आणि वेगवेगळ्या खेड्यांमधून प्रवास करत गेले जेथे कुठे ते गेले तेथे त्यांनी लोकांना देवापासून ची शुभवार्ता सांगितली आणि त्यांनी लोकांना बरे केले.
7 गालील जिल्ह्याचा शासक हेरोदाने जे काही घडत आहे हे त्याने ते सर्व ऐकले. तो चिंताक्रांत झाला कारण काही लोक असे म्हणत होते की बाप्तिस्मा करणारा योहान पुन्हा जिवंत झाला आहे. 8 एलीया संदेष्टा प्रगट झाला आहे आणि खूप पूर्वी ज्या संदेष्ट्यांपैकी कोणीतरी एक पुन्हा जिवंत झाला आहे असे ही काही लोक म्हणत आहे. 9 परंतु हेरोदाने म्हटले, “मी ज्या योहानाचे शीर कापले तो हा असू शकत नाही. मग ज्या माणसा विषयी मी ऐकतो तो मनुष्य कोण आहे?” आणि म्हणून तो येशूला भेटण्याचा मार्ग शोधू लागला.
10 जेव्हा प्रेषित आपल्या यात्रा संपवून परत आले तेव्हा त्यांनी जे काही केले ते सगळे येशूला सांगितले. मग तो त्यांना घेऊन एकांतात जाण्यासाठी बैथसैदा शहरा कडे गेला. 11 परंतु येशू कोठे गेला आहे हे जेव्हा जमावास समजले तेव्हा तेही त्याच्या मागोमाग तिथे गेले. त्याने त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्याशी देव स्वतःला राजा म्हणून कसा लवकरच करेल ह्या विषयी तो बोलला आणि ज्यांना आरोग्याची गरज होती त्या सर्वांना त्याने आरोग्य दिले.
12 आता दिवस मावळल्यामुळे उशीर होत होता म्हणून त्याचे बारा शिष्य त्याचाजवळ गेले आणि त्याला म्हणाले, “आपण येथे दूर एकांत जागेत आहोत म्हणून तुम्ही ह्या मोठ्या लोकांची गर्दीला आजुबाजूंच्या खेड्यांमध्ये आणि शेतामध्ये पाठवा म्हणजे स्वतःसाठी ते काही अन्न घेऊ शकतील आणि त्यांना राहायला काही जागा मिळेल.” 13 परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या!” त्यांनी उत्तर दिले, “आमच्याकडे तर केवळ पाच भाकरी आणि दोन छोटे मासे आहेत. आणि एवढ्या सगळ्या लोकांसाठी आम्ही कोठून विकत आणावे!” 14 ते असे म्हणाले कारण तिथे जवळ पास पाच हजार पुरुष होते. मग येशूने शिष्यांना म्हटले, “लोकांना गटागटाने बसण्यास सांगा प्रत्येक गटात पन्नास लोकांचा एक गट बनवा.” 15 सांगितल्या प्रमाणे शिष्यांनी केले आणि लोक रांगेत बसले. 16 मग त्याने त्या पाच भाकरी आणि ते दोन मासे घेतले. त्याने आपली दृष्टी स्वर्गा कडे केली आणि देवाची स्तुती केली. आणि मग त्याने त्या भाकरी टोपल्यांमध्ये मोडल्या आणि त्या आपल्या शिष्यांना दिल्या की त्यांनी त्या लोकांना वाटावेत. 17 आणि ते सर्व जेवले आणि प्रत्येकाला भरपूर जेवण मिळाले. मग शिष्यांनी उरलेल्या भाकरीचे तुकडे गोळा केले तेव्हा बारा टोपले भरले.
18 एके दिवशी येशू एकांतात प्रार्थना करत असतांना त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले आणि त्याने त्यांना विचारिले, “लोक मला काय म्हणून म्हणतात?” 19 काही लोक म्हणतात की बाप्तिस्मा करणारा योहान आहेस परंतु इतर काही म्हणतात की तू एलीया संदेष्टा आहेस आणि आणखी काही जनांचे म्हणणे आहे की बऱ्याच काळा पूर्वीचा संदेष्टा आमच्या मध्ये परत जिवंत होऊन आला आहे.!”
20 त्याने त्यांना विचारिले, “तुमचे म्हणणे काय? मी कोण आहे असे तुम्ही म्हणता?”पेत्राने उत्तर दिले, “तू, देवापासून आलेला, मसीहा आहेस.” 21 मग येशूने त्यांना गंभीरपणे चेतावणी दिली आणि त्यांस सांगितले की हे कोणालाही सांगू नका. 22 मग तो त्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला म्हणजे मला अनेक गोष्टी सहन करावे लागतील: वडील, मुख्य याजक, यहूदी नियमशास्त्राचे शिक्षक माझा नकार करतील आणि मग मला ठार करतील. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी पुन्हा जिवंत होईन.”
23 मागतो त्या सर्वांना म्हणाला, “जर तेव्हा कोणाला माझा शिष्य होऊन माझ्या मागे यायचे असेल तर तुम्ही कोणी ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू नये. तुम्हांला जीव द्यावा लागला तरी दुःख सहन करण्यासाठी तुम्ही तयार असावे. 24 तुम्ही हे करणे आवश्यक आहे कारण जे स्वतःचा जीव वाचवू पाहतात ते अनंतकाळा करीता त्यांना गमावतील, परंतु जे माझे शिष्य असल्या मुळे आपला जीव गमावतील ते अनंतकाळा करिता स्वतःचा जीव वाचवतील. 25 तुम्ही ह्या जगातील सर्व काही मिळवले परंतु आपला स्वतःचा नाश केला तर तुम्हांला काय फायदा? 26 तसेच जे लोक माझ्या संदेशाचा अव्हेर करतात आणि माझे होण्यास नाकार देतात, जेव्हा मी माझ्या गौरवाने येईन माझ्या पित्याच्या आणि पवित्र देवदूतांमध्ये गौरवात येईन तेव्हा मी ते माझी नाहीत असा त्यांचा नकार मनुष्याचा पुत्र म्हणून करीन. 27 परंतु मी तुम्हास सत्य सांगतो: देव स्वतःला राजा म्हणून प्रगट करेपर्यंत तुम्ही जे येथे उभा आहेत त्यातले काही मरणार नाहीत.
28 हे शब्द बोलल्या नंतर जवळपास आठ दिवसांनी येशूने आपल्यासोबत पेत्र, योहान आणि याकोब, यांना घेऊन डोंगरावर प्रार्थनेसाठी गेला. 29 तो प्रार्थना करत असतांना त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला त्याचे कपडे वीज चकाकते असे शुभ्र होते. 30 अचानक बऱ्याचकाळा पूर्वीचे दोन संदेष्टे येशू सोबत बोलतांना उभा राहिले: ते मोशे आणि एलीया हे होते. 31 ते गौरवाने व्याकलेले होते आणि यरूशलेमेमध्ये येशू लवकरच जे प्रस्तान करणार होता त्या विषयी ते बोलत होते. 32 पेत्र आणि त्याच्या सोबत चे जे दोन शिष्य होते ते फार झोपेस आले होते. परंतु जेव्हा ते उटले तेव्हा त्याने येशूचे गौरव पाहिले आणि त्यांनी ते दोन माणसे जवळ उभी असलेली पाहिली. 33 मोशे आणि एलीया येशूला सोडून जाऊ लागले तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “गुरूजी तुम्ही येथे असावे हे खूप छान आहे! मी एक मंडप तयार करतो; एक तुझ्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयासाठी! परंतु ते काय बोलत आहेत ते त्याला कळाले नाही. 34 तो हे बोलत असता एक ढग त्यांच्यावर उतरला आणि त्याने त्यांना आच्छादन केले. म्हणून शिष्य घाबरून गेले. 35 त्या ढगातून देवाचा आवाज त्यांच्याशी बोलला, “तो म्हणाला हा माझा पुत्र आहे मी ह्याला निवडले आहे ह्याचे तुम्ही ऐका! 36 ती वाणी संपल्यानंतर त्या तिन्ही शिष्यांना तेथे केवळ येशूच दिसला, ते शांत राहिले आणि बराच वेळ त्यांनी कोणालाही ही घटना सांगितली नाही.
37 दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली उतरल्या नंतर लोकांचा मोठा समूदाय येशूला भेटला. 38 तेव्हा जमावातून एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरूजी मी तुला विनंती करतो कृपया माझ्या मुलाची मदत करा! तो माझा एकुलता एक मुलगा आहे. 39 एक अशुद्ध आत्मा अचानक त्याचा ताबा देतो आणि त्याला आरडा ओरडा करायला लावतो. तो त्याला जोर जोराने हालवतो त्याच्या तोंडातून फेस येतो. तो दुरात्मा त्याला फार त्रास देऊन सोडतो आणि जेव्हा तो त्याला सोडून जातो तो पर्यंत हा खूप जखमी झालेला असतो. 40 मी तुझ्या शिष्यांना विनंती केली की त्यांनी त्या अशुद्ध आत्म्याला त्यातून घालवावे परंतु ते त्याला घालवू शकण्यात असमर्थ होते!” 41 त्याला प्रतिउत्तर देत येशू म्हणाला, “लोकांची ही पिढी विश्वास ठेवत नाही म्हणून तुझे विचार भ्रष्ट झाले आहेत! तुम्ही विश्वास ठेवे पर्यंत किती काळ मी तुमच्या सोबत राहू?” आणि मग तो त्या मुलाच्या वडिलांना म्हणाला, “तुझ्या मुलाला येथे माझ्या कडे घेऊन ये!” 42 ते त्या मुलाला त्याच्या कडे आणत असतांना त्या अशुद्ध आत्म्याने त्या मुलाला जमिनीवर आदळले, आणि त्याला खूप हालवले. परंतु येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले आणि त्या मुलाला बरे केले. आणि मग त्याला त्याच्या वडिलाच्या हातात सोपवले.
43 देवाच्या ह्या महान सामर्थ्याने जमलेले सर्व लोक पुर्णपणे आश्चर्यचकित झाले. येशू जे चमत्कार करत होता त्या चमत्कारांमुळे ते आश्चर्यचकित झालेल्या असातांना येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, 44 “मी आता तुम्हांला जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका: मनुष्याचा पुत्र शत्रूंच्या हाती दिला जाईल.” 45 परंतु तो काय म्हणत होता त्याचा अर्थ शिष्यांना समजला नाही. त्यांना समजू नये असे देवाने केले. आणि त्यांनी पुन्हा त्याला विचारावे अशी त्यांना भीती वाटली.
46 काही वेळे नंतर शिष्य आपसात वाद विवाद करू लागले की त्यांच्या मध्ये सर्वात महत्त्वाचा कोण होता. 47 परंतु ते आपसात काय विचार करत होते ते येशूला ठाऊक होते म्हणून त्यांने एका लहान मुलांना त्यांच्या मध्ये आणून त्यांच्या मध्ये उभे केले. 48 तो त्यांना म्हणाला, “माझ्या मुळे जो कोणी ह्या लहान मुलांसारखे स्वागत करतो तो माझे स्वागत करत आहेत. आणि जो कोणी माझे स्वागत करतो तो देवाचे स्वागत करतो ज्याने मला पाठवले आहे. हे लक्षात घ्या की तुम्हा मध्ये जे सर्वात कमी महत्त्वाचे आहे असे समजले जाता ते देवाच्या दृष्टी ने सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत!”
49 योहानाने येशूला म्हटले, “गुरूजी एक मनुष्य तुझ्या नावाचा उपयोग करून लोकांमधून दुरआत्म्यांना आज्ञा देऊन काढतांना आम्ही पाहिला. म्हणून आम्ही त्याला म्हटले की तसे करू नकोस कारण तो आमच्या सोबत तुझ्या मागे चालत नाही.” 50 परंतु येशू त्याला म्हणाला, “तो जे करत आहे ते करण्या पासून त्याला तुम्ही थांबवू नका! जर कोणी तुमचे नुकसान होईल असे काही करत नसेल तर तो जे काही करत आहे ते तुमच्यासाठी फायद्याचे असेल!”
51 देव त्याला पुन्हा स्वर्गात घेणार होता तो दिवस जसा जसा जवळ आला तसे तसे येशूने यरुशलेमेकडे जाण्यासाठी पक्का निश्चय केला. 52 त्याने आपल्या पुढे जाण्यासाठी काही संदेश वाहाक पाठवले आणि तो तेथे जाण्या अगोदर शोमरोन भागातील एका खेड्यात जाऊन ते त्याच्यासाठी तयार केले. 53 परंतु तो यरुशलेमेस जात असल्यामुले शोमरोनी लोक त्याला आपल्या गावातून जाऊ देईनात. 54 याकोब आणि योहान ह्या येशूच्या दोन शिष्यांनी जेव्हा हे ऐकले. ते म्हणाले, “प्रभू देवाने स्वर्गातून अग्नी पाठवून ह्या लोकांना नाश करावा अशी प्रार्थना करावी अशी तुझी इच्छा आहे काय.?” 55 परंतु येशू त्यांच्या कडे वळाला आणि त्यांना कठोर शब्दात सांगितले की जसे तुम्ही बोलत आहात ते चुकीचे आहे. 56 म्हणून ते दुसऱ्या एका खेड्यात गेले.
57 येशू आणि त्याचे शिष्य रस्त्याने चालत असता एक व्यक्ती त्याला म्हणाला, “जेथे कोठे तू जातो तेथे मी देखील येईन!” 58 येशूने उत्तर दिले, “कोल्ह्याला देखील लपण्यासाठी जमिनीत घरे आहेत, आणि आकाशातील पक्षांना घरटे आहे परंतु मनुष्याच्या पुत्राला झोप घेण्यासाठी कोठे ही घर नाही!” 59 येशूने आणखी दुसऱ्या व्यक्तीला सांगितले, “माझ्या मागे या!” परंतु त्या व्यक्तीने म्हटले, “प्रभूजी पहिल्याने मला माझ्या घरी जाऊ द्या, आणि माझे वडील मेल्यानंतर मी त्यांना पुरेन.” 60 परंतु येशूने त्याला म्हटले, “जे मेलेले आहेत त्यानाच आपल्या मेलेल्यांना पुरू द्या, परंतु तू जा आणि देव लवकरच स्वतःला राजा म्हणून प्रकट करेल हे सगळीकडे लोकांना सांग!” 61 आणखी कोणी तरी म्हणाला, “प्रभूजी मी तुझ्यासोबत आणि तुझ्या शिष्यांसोबत येईल परंतु पहिल्याने मला घरी जाऊन माझ्या लोकांचा निरोप घेऊ द्या.” 62 येशूने त्याला म्हटले, “जो कोणी शेत नांगरायला सुरवात करतो आणि मागे बघत राहतो जो देव सर्वांवर राज्य करतो त्याची सेवा करण्यास योग्य नाही.
Chapter 10
1 त्यानंतर, प्रभू येशूने आणखी सत्तर लोकांस उपदेश करण्यासाठी नेमीले. ज्या खेड्यात आणि ज्या शहरात त्याचा जाण्याचा हेतू होता तेथे दोघांची जोडी बनवून बाहेर जाण्यासाठी त्याने त्यांना तयार केले आणि आपल्या पुढे तिथे पाठवले. 2 तो त्यांना म्हणाला, “खरोखर पीक हे फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. तर पिकांच्या प्रभूला प्रार्थना करून पीकांच्या कापणीसाठी आणखी कामकरी पाठवावे अशी विनंती त्याला करा.
3 आता जा, पंरतु लक्षात असू द्या मी माझा उपदेश अशा लोकांना सांगण्यासाठी तुम्हांला बाहेर पाठवत आहे जे तुम्हांला ठार मारण्याचा प्रयत्न करतील. लांडग्यांमध्ये कोकऱ्यांसारखे तुम्ही असाल. 4 कोणताही पैसा सोबत घेऊ नका. प्रवासाची पिशवी घेऊ नका. जास्तीचे पायतण घेऊ नका. वाटेने लोकांना सलाम करणाऱ्यांसाठी थांबु नका.
5 जेव्हा कधीही तुम्ही एका घरात प्रवेश कराल, प्रथम तिथल्या घरातील लोकांस म्हणा, ‘तुम्हास देव शांती देवो!’ 6 जर कोणी तेथे देवाची शांती त्यांच्यात असावी अशी इच्छा बाळगेल, तर तुम्ही देवू केलेल्या शांतीचा ते अनुभव घेतील. पण कोणी तेथे देवाची शांती त्यांच्यात असावी अशी इच्छा बाळगणार नाही, तेव्हा तुम्ही देऊ केलेली शांती तुमच्याकडे परत येईल. 7 ते गाव सोडेपर्यंत तुम्ही त्याच घरात राहा. जे काही तुम्हास ते देतील ते खा व प्या, कारण कामकरी आपल्या कामाचा पगार घेण्यास योग्य आहे.
8 तुम्ही ज्या कोणत्याही एका शहरात प्रवेश कराल आणि तिथल्या लोकांनी तुमचे स्वागत केले, तर ते जे काही अन्न तुम्हांला खायला देतील ते खा. 9 तिथे आजारी असलेल्यांना बरे करा. त्यांना सांगा, ‘देव लवकरच राजा म्हणून सगळीकडे राज्य करेल.’
10 परंतु ज्या एका नगराचे लोक तुमचे स्वागत करणार नाहीत अशात तुम्ही प्रवेश कराल, तेव्हा त्याच्या मुख्य रस्त्यावर जाऊन म्हणा, 11 ‘तुमच्याविरुध्द एक चेतावणी देत आहोत, जसे आम्ही तुमचे नगर सोडीत आहोत तेव्हा आमच्या पायास चिकटलेली धूळही आम्ही झटकून पुसून टाकीत आहोत. याविषयी खात्री बाळगा; देव सर्व गोष्टींवर राजा म्हणून राज्य करेल.’ 12 मी तुम्हांला सांगतो शेवटच्या दिवशी देव सर्वांचा न्याय करेल, तेव्हा फार पूर्वी सदोम या शहरात राहणाऱ्या पापी लोकांना झालेल्या शिक्षेपेक्षा अधिक कठोर त्या नगरातील लोकांना होईल. !
13 खोराजीना आणि बेथसैदा या शहरात राहणाऱ्या लोकांना तुमच्यासाठी ते किती भयंकर असेल, कारण तुम्ही पश्चाताप करण्यास धिक्कारीले! मी तुमच्यासाठी केलेले चमत्कार ते सोर आणि सीदोन या प्राचीन शहरात केले असते तेव्हा तिथे राहणाऱ्या पापी लोकांनी ते पाहिले असते तर फार पूर्वीच गोणपाट नेसून आणि आपल्या डोक्यावर राख लावून त्यांचा पापाचा पश्चाताप करण्यासाठी ते मैदानात बसले असते. 14 त्यामुळे शेवटल्या दिवशी प्रत्येकाचा न्याय देव करेल, तेव्हा तो सोर आणि सीदोन येथे जे पापी लोक राहतात त्यापेक्षा अधिक शिक्षा तुला तो करणार आहे कारण तू माझे चमत्कार पाहून सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेविला नाहीस आणि पश्चाताप केला नाहीस. 15 कफर्णहूमात राहणाऱ्या लोकांनो तुम्हांला सांगण्यासाठी माझ्यापाशी काहीतरी आहे. स्वर्गात तुझा सन्मान होईल असे तुम्हास वाटते का? उलट तुम्ही खाली मरणाच्या ठिकाणी घेतले जाल!”
16 येशू शिष्यांना देखील म्हणाला, “जो कोणी तुमचा उपदेश ऐकतो तो मला ऐकतो, आणि जो कोणी तुमच्या उपदेशाला नाकारतो तो मला नाकारतो. आणि जो कोणी मला नाकारतो तो त्या देवाला ज्याने मला पाठवले त्याला नाकारतो”.
17 येशूने नेमलेले ते सत्तर लोक गेले आणि जे त्याने करावायस सांगितले होते ते त्यांनी केले. ते अत्यंत आनंदी माघारी परतले, तेव्हा ते म्हणाले. “प्रभूजी, तुमच्या आधिकाराने आम्ही भूतांना, लोकांना सोडून निघून जा” अशी आज्ञा केली आणि भूतांनी देखील आमची आज्ञा पाळली. 18 येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे दूर करत असता त्यावेळेस, मी सैतानाला अचानक क्षणार्धात आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले! 19 ऐका! सैतानी शक्तींवर हल्ला करण्यासाठी मी तुम्हास आधिकार देत आहे. त्या तुम्हांला कुठलीही दुखापत करू शकणार नाहीत. आपला शत्रू सैतान, यापेक्षा अधिक बलवान होण्याचा आधिकार मी तुम्हास दिला आहे. काही एकाची तुम्हांला दुखापत होणार नाही. 20 तथापि वाईट आत्मे तुमची आज्ञा मानतात याचा आंनद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गामध्ये लिहिली गेली आहेत यासाठी तुम्ही अधिक आंनद करा.”
21 त्याच घटकेस, येशू पवित्र आत्म्यापासून आलेल्या महान आनंदाने भरला. तो म्हणाला, “हे पित्या, स्वर्गात आणि पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा तू प्रभू आहेस. काही लोक उच्चशिक्षित असल्यामुळे ते बुध्दीमान आहेत असा विचार करतात. परंतु तू ह्या गोष्टी समजण्यासाठी त्यांना मना केले आहेस याबद्दल मी तुझी स्तुती करितो. त्याउलट, लहान मूले करतात त्याप्रमाणे ज्या लोकांनी तुझे सत्य खुशीने स्वीकारीले अशांना तू ते प्रकट केलेस. होय, पित्या, तू हे केलेस कारण तुला असे करण्याने संतुष्टी प्राप्त होते.” 22 येशू शिष्यांना देखील म्हणाला, “देव, माझा पित्याने, मला सर्वकाही दिले आहे. मी त्याचा पुत्र आहे, हे केवळ माझा पिताच ओळखू शकतो. याशिवाय, केवळ मला, त्याच्या पुत्राला, पिता कोण आहे हे खरोखर ठाऊक आहे. आणि ज्या लोकांना केवळ मी त्याला ओळखण्यासाठी निवडतो त्यांनाच तो खरोखर ओळखता येतो.”
23 मग येशू शिष्यांसोबत एकांतात असतांना, आणि त्यांच्याकडे वळून तो म्हणाला, “मी केलेल्या गोष्टी तुम्ही पाहाल हे कळवून देवाने तुम्हास महान उपहार दिले आहे! 24 तुम्हास कळावे म्हणून मला सांगू वाटते की फार पूर्वीं होऊन गेलेले अनेक राजे आणि संदेष्टे यांना मी करत असलेल्या गोष्टी करतांना तुम्ही जे पाहता ते पाहण्याची इच्छा बाळगली, पंरतु त्यांनी ते पाहिले नाही, कारण ह्या गोष्टी तेव्हा घडल्या नाहीत. मी बोललेले जे तुम्ही ऐकता ते ऐकण्यासाठी त्यांनी आतुरतेने वाट पाहिली, पंरतु त्यावेळी त्या गोष्टी मी आंतापर्यंत प्रकट केल्या नाही.”
25 एके दिवशी येशू नेहमीप्रमाणे लोकांना शिकवीत होता, तेथे कोणीएक यहूदी नियमशास्त्राचा शिक्षक होता. त्याला एक अवघड प्रश्न विचारून येशूची परीक्षा घ्यायची होती. म्हणून तो उभा राहिला आणि विचारले, “गुरूजी, देवासोबत अंनतकाळ राहण्यासाठी मला काय करणे गरजेचे आहे?” 26 येशूने त्याला म्हटले “मोशेने नियमशास्त्रात लिहलेले नियम तू वाचलेले आहेस जे देवाने त्याला दिले आहेत. मग नियमशास्त्र काय करावयास सांगते?” 27 त्या मनुष्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण आत्म्याने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.” 28 येशूने उत्तर दिले, “तू दिलेले उत्तर बरोबर आहे. हे तू सर्व करशील तर देवासोबत अंनतकाळासाठी जगशील.”
29 पंरतु त्या माणसाला तो इतर लोकांशी न्यायाने वागला हे दाखवण्यासाठी एक कारण शोधू लागला. म्हणून तो येशूला म्हणाला, “माझा शेजारी तो कोण त्याजवर मी प्रीती करावी?”
30 येशूने उत्तर दिले, “एके दिवशी, एक यहूदी मनुष्य यरूशलेमेहून यरीहोस जाणाऱ्या वाटेने प्रवासास निघाला. तो प्रवास करत असतांना, काही लुटारूंनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी त्या मनुष्याचे बहुतेक सर्व कपडे काढून घेतले आणि त्याच्याजवळ असलेल्या सर्वकाही गोष्टी काढून घेतल्या, आणि जवळ जवळ मरेपर्यंत त्यास मार दिला. ते त्यास सोडून गेले. 31 असे घडले त्यावेळी एक यहूदी याजक त्याच वाटेने जात होता. त्याने त्या मनुष्याला पाहिले तेव्हा त्याचक्षणी त्याला मदत करण्याऐवजी, तो वाटेच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. 32 तशाचप्रकारे, एक लेवीही, जो देवाच्या मंदिरात काम करीत असे, त्या ठिकाणी आला आणि त्या मनुष्याला पाहिले. पंरतु तो देखील वाटेच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
33 मग शोमरोन प्रदेशातील एक मनुष्य त्या वाटेवर जेथे मनुष्य पडला होता तिथे तो आला. त्या मनुष्याला त्याने पाहिले, तेव्हा त्याला त्याची दया आली. 34 तो त्याच्या जवळ गेला आणि त्याला बरे वाटावे म्हणून त्याने त्याच्या जखमांवर जैतूनाचे तेल आणि द्राक्षरस लावून त्यास मदत केली. त्याने जखमांना कपड्याच्या पट्ट्याने बांधिले. मग त्याने त्या मनुष्याला आपल्या मालकीच्या गाढवावर बसविले आणि उतारशाळेत नेले आणि त्याची काळजी घेतली. 35 दुसऱ्या सकाळी त्याने दोन चांदीची नाणी उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, “ह्या माणसाची काळजी घ्या. ह्याची काळजी घेण्यासाठी दिलेल्या रकमेहून जर अधिक खर्च तुम्हांला लागला, तर मी परत आल्यावर तो तुम्हांला देईन.” 36 मग येशू म्हणाला, “ज्या मनुष्यावर लुटारूंनी हल्ला केला होता त्याला तीन लोकांनी पाहिले. त्यापैकी कोण त्या मनुष्याचा खरा शेजारी आहे असे दिसून येते?”
37 नियमशास्त्राच्या शिक्षकांने उत्तर दिले, “ज्याने त्याजवर दयेचे कृत्ये केली तो.” येशू त्याला म्हणाला, “होय, तर मग आता जा आणि तू ही असेच ज्यांना तुला मदत करता येईल त्यांच्याशी असे कृत्य कर!” 38 मग येशू आणि त्याचे शिष्य ह्यांचा प्रवास सुरू असतांना, त्यांनी यरुशलेमजवळील गावात प्रवेश केला. तेथे मार्था नावाच्या एका स्त्रीने त्यांना तिच्या घरामध्ये येण्यासाठी आमंत्रित केले. 39 तिची लहान बहीण, जिचे नाव मरीया होते, ती येशूच्या’ चरणापाशी बसली होती. जे तो शिकवीत होता ते ती ऐकत होती.
40 पण मार्था तर भोजन तयार करण्यात फार चिंताकुल झाली होती. ती येशूजवळ आली आणि म्हणाली, “प्रभो, माझ्या बहिणीने मीच सर्वकाही तयार करावे म्हणून माझ्यावर टाकून दिले आहे ह्याची तुला काळजी नाही काय?” तेव्हा तिने मला मदत करावी म्हणून तिला कृपया करून सांग. 41 पण प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू फार गोष्टींबद्दल चिंता करीत असतेस. 42 परंतु एकाच गोष्टीची खरोखर आवश्यकता आहे ते म्हणजे मी जे काय शिकवितो आहे ते ऐकणे. मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे. जो आर्शिवाद तिने तिच्या करण्याद्वारे प्राप्त केला तो तिजपासून काढून घेतला जाणार नाही.”
Chapter 11
1 एके दिवशी येशू एका निश्चित ठिकाणी प्रार्थना करीत होता. त्याने प्रार्थना संपविली तेव्हा त्याचा एक शिष्य त्याला म्हणाला, “प्रभूजी, योहानाने त्याच्या शिष्यांना शिकवले तसेच, आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्ही काय बोलावे ते आम्हांस शिकवा!” 2 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा अशा पध्दतीच्या गोष्टी बोला: ‘हे पित्या, सर्व लोक तुझ्या नामाचा पवित्र म्हणून आदर करावे. सगळीकडील सर्व लोकांवर लवकरच तू राज्य करावे. 3 आम्हांला दररोज आवश्यक असलेले अन्न कृपया देत जा. 4 आम्ही आमच्या विरुध्द लोक ज्या वाईट गोष्टी करतात त्याबद्दल आम्ही त्यांना क्षमा करतो, त्याचरीतिने आम्ही केलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल आम्हांला कृपया माफ करत जा. आम्ही मोहात पडतो तेव्हा आम्ही पाप करू नये म्हणून मदत कर.’”
5 मग तो त्यांना म्हणाला, “समजा तुमच्यापैकी एकजण मध्यरात्री आपल्या एका मित्राच्या घरी गेला. समजा तुम्ही बाहेर उभे राहिला आणि त्याला बाहेर येण्यासाठी बोलावले, ‘माझ्या मित्रा, कृपया मला तीन भाकरी उसन्या दे! 6 माझा दुसरा एक मित्र जो प्रवास करून आताच माझ्या घरी आला आहे, परंतु त्याला देण्यासाठी माझ्याकडे अन्न तयार नाही!’ 7 समजा तुम्हांला तो घराच्या आतून उत्तर देत असेल की, ‘मला त्रास देऊ नकोस! दार बंद केले आहेत आणि माझे सर्व कुटूंब अंथरुणावर आहेत. त्यामुळे मी उठून तुला काही देऊ शकत नाही!’ 8 मी तुम्हास सांगतो, जरी त्याला उठायचे नसेल आणि तुम्ही त्याचे मित्र असूनही त्याला तुम्हांला काही अन्न द्यायचे नसेल. परंतु तुम्ही तिथेच राहून त्याला सतत मागीतल्यामुळे, तो लगेच उठेल आणि जे काही तुमची गरज असेल तो देईल. 9 म्हणून मी तुम्हांला हे सांगतो: आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्यासाठी देवाला विनंती करत राहा, आणि तो ती तुम्हांला देईल. त्याची इच्छा शोधत राहा आणि तो ती तुम्हांला दाखवील. दरवाजा ठोठावण्याप्रमाणे देवाकडे प्रार्थना लगेच करीत राहा, आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली ते प्राप्त करण्यासाठीचे मार्ग तो तुमच्यासाठी उघडेल. 10 लक्षात ठेवा की, जो कोणी मागतो त्यास मिळेल जो कोणी शोधतो त्याला सापडेल, आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. 11 तुमच्यापैकी कोणा एकाच्या मुलाने खाण्याकरिता एक मासा तुम्हांला मागीतला असता, तेव्हा तू त्याला एक विषारी साप देशील का? कदापी देणार नाहीस; 12 आणि त्याने एक अंडे मागीतले, तेव्हा तू त्याला विंचू देशील का? कदापी देणार नाहीस. 13 तुम्ही लोक पापी असुनही, आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे तुम्हांला कळते. त्यामुळे हे अजून निश्चित आहे तुम्ही त्याला पवित्र आत्मा देण्यास सांगितले तर तुमचा स्वर्गातील पिता पवित्र आत्मा तुम्हांला देईल.”
14 एके दिवशी तिथे एक मनुष्य होता जो बोलू शकत नव्हता, कारण एका भूताने त्याला वश केले होते. , येशूने त्या भूताला जबरदस्तीने बाहेर काढल्यानंतर, तो मनुष्य बोलू लागला. तिथे असलेले बहुतेक लोक आश्चर्यचकित झाले. 15 परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले, “भूतांचा शासक, जो बालजबूल, भुते बाहेर काढण्यासाठी ह्या मनुष्याला सक्षम करतो!” 16 तिथे असलेल्या इतर लोकांनी तो देवापासून आहे हे सिद्ध करण्यासाठी एक चमत्कार करण्यासाठी त्याला विचारले. 17 पंरतु ते काय विचार करत आहेत हे त्याला माहिती होते. मग तो त्यांना म्हणाला, “एका राष्ट्रातील लोक एकमेकांविरुद्ध लढले, तेव्हा त्यांचा देश नष्ट होईल. एका कुटूंबातील लोक एकमेकांचा विरोध करतात, त्यांचे कुटूंब वेगवेगळे पडतील. 18 त्याचप्रमाणे, सैतान आणि त्याचे दुरात्मे एकमेकांशी भांडण करत असले, तेव्हा त्यांचे राज्य नक्कीच टिकणार नाही! मी हे सांगतो कारण तुम्ही म्हणत आहात की मी भुतांचा शासक बालजबूल याच्या शक्तीने भुते बाहेर काढतो! 19 आता, बालजबूल मला भुते बाहेर काढण्यासाठी सक्षम करतो हे जर खरे असेल, तर तुमचे शिष्य जे भूते बाहेर काढतात ते देखील सैतानाच्या सामर्थ्याने काढतात हे खरे आहे का? नक्कीच नाही! म्हणून तुम्ही चुकीचे आहात असे ते सिध्द करतात. 20 पंरतु प्रत्यक्षात म्हणजे देवाच्या सामर्थ्याने मी भूते बाहेर काढतो, मी तुला दाखवत आहे की देवाने तुझ्यावर राज्य करने सुरू केले आहे.”
21 येशू म्हणाला, “एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षितेसाठी ज्याच्याकडे अनेक शस्त्रे आहेत, तेव्हा कोणीही त्यांच्या घरातील कोणतीही गोष्ट चोरू शकत नाही. 22 पंरतु कोणीतरी त्याच्यावर एक मजबूत हल्ला करतो आणि त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रांवर तो मनुष्याचा भरवसा होता ते काढून घेण्यास तो सक्षम आहे. मग त्याला त्या माणसाच्या घरातून त्यास जे काही हवे ते घेता येईल. 23 जो कोणी मला आधार देत नाही तो माझा विरोध करीत आहे, आणि जो कोणी इतरांना माझ्यापाशी आणणार नाही तो त्यांना माझ्यापासून निघून जायला कारण ठरेल.”
24 मग येशू असे म्हणाला: “कधीकधी एखादा अशुद्ध आत्मा कोणा एकाला सोडून जातो, तेव्हा तो आराम शोधण्यासाठी निर्जन क्षेत्रांत भटकतो. त्याला ते सापडत नसल्यास, तो स्वतः म्हणतो, ज्या व्यक्तीमध्ये मी जगायचो त्याच्याकडे परत जाईन! 25 म्हणून तो परत जातो आणि स्वच्छ धुतलेले व पुसलेल्या घरासारखे ती व्यक्ती त्यास आढळते, पण तरीही ती रिक्त असते. 26 नंतर हा अशुद्ध आत्मा जातो आणि त्यापेक्षाही अधिक वाईट जे सात भुते आहेत त्यास तो घेऊन येतो. ते सर्व त्या व्यक्तीत प्रवेश करतात आणि तिथे राहण्यास सुरू करतात. त्यामुळे त्या व्यक्तीची स्थिती पूर्वी वाईट होती, ती आणखी खराब होऊन जाते.”
27 येशूने असे म्हटले तेव्हा, ते ऐकत असलेल्या एका स्त्रीने त्याला मोठ्याने ओरडून म्हटले, “तुला जन्म देणारी आणि जिच्या स्तनाने तुझी काळजी घेतली तिला प्रभूने किती महानरित्या आर्शिवादीत केले आहे!” 28 मग त्याने उत्तर दिले, “जे त्याचा उपदेश ऐकतात आणि त्याला पाळतात त्यांना देव ह्यांपेक्षाही अधिक आर्शिवादीत करेल!”
29 येशूसभोवतीच्या गर्दीमध्ये सामिल होण्यासाठी अधिक लोक येत होते, तेव्हा तो म्हणाला, “या युगाचे लोक दृष्ट आहेत. मी देवापासून आलेलो आहे म्हणून मी एखादा चमत्कार करून दाखवून त्याचा पुरावा द्यावा असे तुमच्यापैकी अनेकांना हवे असते. परंतु योनासोबत काय घडले होते केवळ हाच पुरावा तुम्हांला एक चमत्कार म्हणून प्राप्त होईल. 30 ज्याप्रमाणे देवाने अनेक वर्षांपूर्वी योनासाठी केलेला चमत्कार म्हणून निनवे शहरातील लोकांना साक्ष दिली, तसेच देव मनुष्याच्या पुत्रासाठी असाच एक चमत्कार करेल तो आताच्या युगातील राहणांऱ्या तुमच्या लोकांसाठी एक साक्ष होईल. 31 फार पूर्वीं शेबाची राणी शलमोनाच्या शहाणपणाच्या गोष्टी ऐकण्याकरता फार दूरचे अंतर पार करून आली होती. आणि आता शलमोनापेक्षाही येथे कोणीतरी महान आहे, परंतु मी काय बोललो हे तुम्ही खरोखर ऐकले नाही. म्हणून, न्यायाच्या दिवशी देव सर्व लोकांचा न्याय करेल तेव्हा, त्यावेळी ती राणी तिथे उभे राहील आणि आता राहणांऱ्या लोकांस दोषी ठरवेल. 32 योनाने त्यांना शिकविल्यानंतर तेव्हा निनवे या प्राचीन शहरामध्ये जे पुरूष राहत होते तेव्हा ते त्यांच्या पापी मार्गापासून वळाले. आणि आता, योनापेक्षाही अधिक थोर जो मी, आलो आहे आणि तुम्हांला उपदेश दिला, तरीदेखील तुम्ही तुमच्या पापी मार्गापासून वळाला नाही. त्यामुळे, देव सर्व लोकांचा न्याय करेल त्यावेळी, फार पूर्वीं राहणारे निनवेतील पुरूष तिथे उभे राहतील आणि आताच्या राहणाऱ्या लोकांना दोषी ठरवतील.”
33 “दिवा लावणारे लोक त्याला लावून मग त्याच्या प्रकाशाला झाकून अथवा टोपलीच्या खाली ठेवत नाहीत, त्याउलट, ते खोलीमध्ये किंवा घरामध्ये प्रवेश करणाऱ्यांना प्रकाश दिसावा म्हणून तो एका दिवठणीवर ठेवतात. 34 डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे निरोगी असतील तेव्हा मग तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशाने भरलेले आहे. जर, दुसरीकडे, तो रोगी असेल, मग तुमचे संपूर्ण शरीर अंधकाराने भरलेले असेल. 35 म्हणून, तुमच्यातील प्रकाश हा अंधार नसावा ह्याची काळजी घ्या. 36 जर तुमचे सर्व शरीर पूर्ण प्रकाशाने भरलले आहे आणि त्याच्यातील कुठलाही भाग अंधकारमय नाही, तुमचे संपूर्ण शरीर एका दिव्याचा प्रकाश जो सर्वगोष्टी स्पष्ट पाहता यावी यासाठी सक्षम करतो त्यासारखे तुमचे शरीरे प्रकाशमय होतील.”
37 येशूने या गोष्टी बोलल्यानंतर, एका परुश्याने त्याला त्याच्याबरोबर भोजन करण्यासाठी आमंत्रित केले. मग येशू त्या परुश्याच्या घरी गेला आणि आपल्या जागी मेजावर बसला. 38 येशूने विधीप्रमाणे खाण्याआधी त्याचे हात धुतले नाहीत हे त्याने पाहिले तेव्हा त्या परूश्याला अतिशय आश्चर्य वाटले. 39 प्रभू येशू त्याला म्हणाला, तुम्ही परूशी खाण्यापूर्वी प्याल्याला आणि ताटल्यांना बाहेरून धुता, परंतु स्वत: आत तुम्ही खूप लोभी आणि दुष्ट आहात. 40 तुम्ही मूर्ख लोकांनो! देवाने केवळ बाहेरची बाजू बनविली नाही, परंतु त्याने आतील बाजूही बनविली आहे! हे खात्रीने तुम्हांला माहित आहे. 41 ताटल्याची चिंता करण्याऐवजी विवेक शुद्ध असावा, दयाळू व्हा, आणि गरज असलेल्यांना जे काही ताटल्यांमध्ये आहे ते देऊन टाका, आणि नंतर तुमची आतील आणि बाहेरील दोन्ही बाजू शुद्ध होतील. 42 परंतु परुश्यांनो! तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल. तुमच्या उद्यानात वाढलेल्या औषधी वनस्पतींसह, तुमच्याकडे जे काही आहे त्याचा दशंमाश तुम्ही काळजीपूर्वक देवाला देता. परंतु तुम्ही देवावर प्रेम करत नाही किंवा इतरांसोबत न्यायीपणे वागत नाही. देवाला देण्याव्यतिरिक्त तुम्ही देवावर प्रेम करा आणि इतरांसोबत न्यायीपणे वागणे आवश्यक आहे ह्याची तुम्ही खात्री ठेवा. 43 परुश्यांनो तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल, कारण सभास्थानांमध्ये तुम्हास सर्वात महत्त्वाच्या जागांवर बसण्यास आवडते, आणि बाजारातील लोकांचा विशेष सन्मानांसोबत आदर घेण्यास तुम्हांला आवडते. 44 तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल, कारण तुम्ही खूण नसलेल्या कबरांसारखे व्हाल जी लोकांस दिसणार नाही आणि ते लक्षात न घेता तिच्यावरून चालून जातील आणि तुम्ही अशुद्ध व्हाल.” 45 ज्या लोकांच्या नियमांच्या कोणी एका शिक्षकांनी असे उत्तर दिले, “गुरूजी, हे म्हणण्याद्वारे तुम्ही आम्हांवर सुद्धा टीका करत आहात!” 46 येशू म्हणाला, “यहूदी कायद्यांचे शिक्षकांनो तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल! कारण लोकांना खूप जड ओझे देऊन खाली पाडता, परंतु त्या लोकांचा भार सहन करण्यासाठी लहान गोष्टींची देखील मदत करत नाहीत! 47 तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल, कारण तुमच्या या पूर्वजांनी ज्या संदेष्टयांना मारले त्यांच्या कबरा तुम्ही चिन्ह ठेवण्याकरता त्यावर इमारती बांधतात. 48 म्हणून तुम्ही या इमारती बांधता तेव्हा, तुम्ही आपल्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना जिवे मारल्याबद्दल त्यांना मान्यता दिली असल्याचे तुम्ही जाहिर करीत आहात. 49 म्हणून देव, जो फार हुशार आहे, तो म्हणतो, ‘ मी माझ्या लोकांना मार्गदर्शन करण्याकरिता संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन. परंतु ते खूप दु:ख सहन करतील आणि त्यापैकी काही ठार मारले जातील.’ 50 परिणामी, सध्याच्या काळात राहणाऱ्या बऱ्याच जणांना सर्व जगाच्या निर्मितीपासून देवाच्या संदेष्ट्यांच्या खूनाचा दोषी मानण्यात येईल, 51 होय, या काळातील देशवासीयांना त्या संदेष्ट्यांचा झालेल्या खूनाबद्दल दोषी मानण्यात येईल! सुरूवातीला हाबेलाचा त्याच्या भावाने खून केल्यापासून मंदिर व पवित्र स्थान यांच्या दरम्यान मारल्या गेलेल्या संदेष्टा जखऱ्यापर्यंत. 52 यहूदी कायदा शिकवणाऱ्या पुरूषांनो तुमच्यासाठी ते किती भयंकर होईल, कारण तुम्ही लोकांना देवाचे सत्य कळवले नाही! हे असे आहे की तुम्ही घराची किल्ली घेतली आहे. तुम्ही स्व:त घरात जात नाही, आणि इतर लोकांनाही तुम्ही आत येऊ देत नाही.”
53 येशूने या गोष्टी बोलणे संपविल्यानंतर, तो तिथून निघून जात असतांना. मग यहूदी लोकांचे नियम शिकवणारे पुरूष आणि परूशी त्याच्याविरुध्द अतिशय द्वेषपूर्ण अशा पद्धतीने वागण्यास सुरूवात केली. त्यांनी पुष्कळ गोष्टींबद्दल त्याला हेतूपूर्वक प्रश्न विचारले. 54 तो काहीतरी चुकीचे बोलण्याची त्याची वाट पाहत राहिले जेणेकरून ते त्याच्यावर आरोप ठेवू शकतील.
Chapter 12
1 दरम्यान, हजारो लोकांची गर्दी येशूच्या अवतीभोवती जमा झाली. ते एवढे होते की ते एकमेकांना तुडवू लागले. परंतु प्रथम तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “तुम्ही परूशांसारखे होऊ नये म्हणून काळजी घ्या, ते लोकांसमोर धार्मिक असल्याचे दाखवतात, परंतु गुप्तमध्ये ते दृष्ट गोष्टी करीतात. जसे थोडेसे खमिर संपूर्ण पिठाला व्यापते तसेच त्यांची दृष्टता ही इतर लोकांसाठी ढोंगीपणास कारण ठरते. 2 लोक आपले पाप लपवू शकत नाहीत. एके दिवशी देव प्रत्येकाला लोक जे काही लपवू इच्छीता ते सगळे काही प्रगट करेल. 3 तुम्ही जे काही अंधारात बोलता एके दिवशी ते सगळे सर्व लोकांसमोर उजेडात बोलण्यात येईल. जे काही तुम्ही आतल्या कोठड्यात कानात सांगतात ते एके दिवशी जणू काही धाब्यावरून मोठ्याने सांगण्यात येईल.”
4 “माझ्या मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका! लोकांची भीती बाळगू नका ते तुम्हांला ठार मारू शकतात; परंतु त्याहून अधिक ते तुम्हांला काहीही करू शकत नाही! 5 परंतु ज्याची तुम्ही खरोखर भीती बाळगावी त्याविषयी मी आता तुम्हांला सांगतो. तुम्ही खरोखर देवाची भीती बाळगावी, कारण तो लोकांना केवळ ठारच करू शकत नाही, तर त्यानंतर तो त्यांना नरकात टाकण्याचा ही आधिकार दाखवतो! होय, त्याची तुम्ही भीती बाळगावी असा तो खरोखर आहे. 6 चिमण्याच्या विषयी विचार करा. केवळ दोन छोट्या नाण्यांनी तुम्ही पाच चिमण्या विकत घेऊ शकता एवढीच त्यांची किंमत आहे परंतु तरीही देव त्यांच्यापैकी एकाला ही विसरत नाही! 7 तुमच्या डोक्यावर किती केस आहेत ते देखील देवाला ठाऊक आहे. भिऊ नका, असंख्य चिमण्यापेक्षाही देवासाठी तुम्ही अधिक मौल्यवान आहात.
8 मी तुम्हांला हे देखील सांगतो जर लोक इतरांनाही म्हणतील की ते माझे शिष्य आहेत, तर मी मनुष्याचा पुत्र, देवाच्या दूतांसमोर ते माझे शिष्य आहेत असे स्वीकारील. 9 परंतु जर ते इतरांच्या समोर माझे शिष्य असल्याचे नाकारतील, तर मी ही देवाच्या दूतांसमोर त्यांना माझे शिष्य म्हणून नाकारेन. 10 मी तुम्हास हे देखील सांगतो मनुष्याच्या पुत्रा विषयी जर लोक दृष्ट गोष्टी बोलतील, तर देव त्यांना त्यांची क्षमा करेल. परंतु देवाच्या पवित्र आत्म्याविषयी, जर ते दृष्ट गोष्टी बोलतील तर देव त्यांना त्याची क्षमा करणार नाही.
11 तर जेव्हा लोक धार्मिक पुढाऱ्यांपुढे सभास्थानात तुम्हांला प्रश्न विचारण्यासाठी धरून आणतील, तेव्हा सताधाऱ्यांशी काय बोलावे ह्याची काळजी तुम्ही करू नका, 12 कारण पवित्र आत्मा त्यावेळेस त्या क्षणाला तुम्ही काय म्हणावे हे तुम्हांला सुचवेल.”
13 तेव्हा गर्दीतील लोकांपैकी कोणी एक येशूला म्हणाला, “गुरूजी, माझ्या भावाने माझ्या वडिलांची जमीन माझ्यासगंती वाटावी म्हणून त्याला सांगा!”. 14 परंतु येशूने त्याला उत्तर दिले, “लोकांमध्ये जमिनीचे जे वाद आहेत ते सोडविण्यासाठी कोणी मला न्यायधीश म्हणून निवडीले नाही!” 15 मग तो गर्दीस म्हणाला, “तुम्ही कोणत्याही प्रकारे लोभी होऊ नये म्हणून जपा! एखाद्या मनुष्याकडे किती वस्तू आहेत त्यावरून मनुष्याच्या जीवनाची किंमत ठरत नाही.”
16 मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला: “कोणी एका श्रीमंत मनुष्याच्या शेतामध्ये भरपूर पीक आले. 17 म्हणून त्याने स्वताःशीच विचार केला, ‘आता मी काय करावे ते मला माहिती नाही, कारण ऐवढे धान्य जमा करण्यासाठी माझ्याकडे एवढे मोठे कोठार नाही!’ 18 मग त्याने स्वतःशी विचार केला, “हा मी काय करावे ते आता मला कळाले! मी माझे जुने कोठार तोडीन त्याहूनही मोठी बांधेन! आणि मग मी माझे सर्व नविन धान्य त्या कोठाऱ्यात साठवीन. 19 मग मी स्वतःला म्हणेल, “अनेक वर्षे पुरेल एवढे अधिक धान्य माझ्याकडे साठवलेले आहे. आता मी माझे जीवन आरामात जगेन आता मी खाऊन-पिऊन आंनद करेन!”’ 20 परंतु देव त्याला म्हणाला, ‘हे मूर्ख माणसा! आज रात्रीस तू मरशील! तर ज्या सर्व गोष्टी तू स्वताःसाठी साठविल्या आहेत त्या तुझ्या नव्हेत त्या इतरांच्या होतील!’”
21 येशूने हा दाखला हे शब्द बोलून संपवला, “देवाच्या दृष्टीने जे मौल्यावान त्या गोष्टी त्यांचा दृष्टीने मौल्यवान नाहीत आणि, जे स्वतः:साठी वस्तू साठवून ठेवतात त्यांच्याबाबतित असेच घडेल.”
22 मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला हे सांगू इच्छितो: जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्याविषयी काळजी करू नका. तुम्हांला खायला पुरेसे अन्न आणि घालायला पुरेसे कपडे असतील का याच्याविषयी काळजी करत बसू नका. 23 जे जेवण तुम्ही करता त्यापेक्षा तुमचे जीवन महत्वाचे आहे आणि तुमच्या शरीरावर तुम्ही कपडे घालता त्यापेक्षा ही अधिक तुमचे शरीर महत्वाचे आहे. 24 पक्षांविषयी विचार करा: ते बीं पेरीत नाहीत, किंवा ते पिकांची कापणी ही करत नाहीत. त्यांच्याकडे कोणत्याही खोल्या किंवा इमारती नाहीत कोठारे नाहीत जेथे त्यांनी आपले धान्य साठवावे. परंतु देव त्यांना अन्न पुरवतो. तुम्ही त्यापेक्षाही नक्कीच अधिक मौल्यवान आहात. 25 काळजीकरून तुमच्यापैकी कोणीही आपल्या आयुष्याचा एकही मिनिट जास्त जोडू शकत नाही! 26 तुम्ही एवढीशी छोटी गोष्ट करू शकत नाही म्हणून तुम्ही नक्कीच मोठ्या गोष्टींविषयी काळजी करू नये. 27 फुले कशी वाढतात याचा थोडावेळ विचार करा. पैसा कमवण्यासाठी ते कष्ट करत नाहीत आणि स्वत:साठी वस्त्रे ही ते करत नाहीत. परंतु मी तुम्हांला सांगतो की बराच काळ आधी राहणारा राजा शलमोन, जो सुंदर वस्त्रे घालीत असे, त्यानेही ह्या फुलासारखे एखादे सुंदर वस्त्र घातले नाही. 28 ही झाडे थोड्या वेळेसाठी जगतात तरी देव त्यांना ऐवढ्या सुंदर रितीने सुशोभीत करतो. मग त्यांना कापले जाते आणि आगीत घातले जाते. परंतु तुम्ही देवासाठी मौल्यावान आहात मग तो ह्या फुल झाडांपेक्षाही तुमची अधिक काळजी घेईल. तर तुम्ही एवढा थोडा विश्वास का ठेवता? 29 तुम्ही काय खाल किंवा काय प्याल ह्याची काळजी करत बसू नका, ह्या सर्व गोष्टीविषयी चिंता करत राहू नका. 30 जे लोक देवाला ओळखत नाहीत ते सर्व अशा गोष्टींविषयी काळजी करत बसतात. परंतु ह्या सर्वांची तुम्हांला गरज आहे हे तुमच्या स्वर्गातील पित्यास ठाऊक आहे. 31 त्याऐवजी, देव तुमच्यावर राज्य करतो ही गोष्ट तुमच्या जीवनात स्वीकारलेली सर्वात महत्वाची गोष्ट असू द्या. मग तो तुम्हांला जे काही हवे आहे ते सर्व काही देईल.
32 म्हणून हे लहान कळपा, तू घाबरलेला नसावा. तुझा स्वर्गातील पिता जेव्हा सर्व गोष्टींवर राज्य करेल तेव्हा त्याने तुला सर्वकाही द्यावे अशी त्याची इच्छा आहे. 33 म्हणून सध्या जे तुमच्या मालकीचे आहे ते विका. ज्यांना खायला अन्न नाही ज्यांना कपड्यांची गरज आहे आणि राहायला जागा नाही अशा लोकांना तुम्ही तुमचा पैसा द्या. तुम्ही स्वत:साठी असे पाकीट तयार करा जे झिजत नाही, आणि तुम्ही स्वत:साठी स्वर्गात धन साठवा जेथे ते नेहमी सुरक्षित असेल. तिथे, कोणीही चोर येऊन त्याला चोरू शकत नाही आणि तेथे तुमच्या कपड्यांना कसर लागणार नाही. 34 ज्या कशाला तुम्ही मौल्यवान समजता त्याविषयी तुम्ही विचार कराल आणि त्याच्यावरच तुम्ही वेळ घालवाल.
35 ज्या लोकांनी कामकऱ्यांचे कपडे घातलेत त्या लोकांसारखे देवाचे कार्य करण्यासाठी नेहमी तयार असा, आणि रात्री आपले दिवे जळत ठेवा. 36 एखादा स्वामी विवाहाच्या भोजनास गेल्यानंतर जसे त्याचे सेवक त्याच्या परत येण्याची वाट पाहतात तसे तुम्ही माझी वाट पाहा. तो परत आल्यावर दार ठोठावतो त्याचक्षणी दार उघडावे ह्याची ते वाट पाहत राहतात. 37 तो परत येतो, तेव्हा त्याचे सेवक जागे असतील तर तो त्यांना प्रतिफळ देईल. आणि मी तुम्हांला हे सांगतो ‘तो स्वत: त्यांची सेवा करण्यासाठी कपडे घालेल, त्यांना तो खाली बसवेल आणि स्वत: तो मालक त्यांना जेवण वाढेल. 38 मध्यरात्र सरल्यावर पहाट होण्याच्या आधी जरी तो आला, आणि त्याने आपल्या सेवकांना जागे पाहिले त्यासाठी वाट पाहतांना पाहिले, तर तो नक्कीच त्यांच्यावर प्रसंन्न होईल. 39 परंतु तुमच्या हे लक्षात असू द्या: घर मालकाला चोर कधी येत आहे ह्याची वेळ जर माहिती असती तर, तो जागा राहिला असता आणि चोराला घरात शिरू दिले नसते. 40 म्हणून तुम्ही तयार असा, कारण मी, मनुष्याचा पुत्र, तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा वेळेस पुन्हा येणार आहे.”
41 पेत्राने विचारले, “प्रभू, हे जे उदाहरण तू देत आहेस ते केवळ आमच्यासाठी आहे किंवा इथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी आहे?” 42 प्रभूने त्याला उत्तर दिले, “मी हे त्या सर्वांसाठी सांगत आहे जे आपल्या स्वामींच्या घरात विश्वासू आणि शहाणे सेवक आहेत. त्याचा मालकाने त्याला इतर सेवकांना वेळेवर अन्न मिळावे म्हणून त्याला आधिकार देऊन ठेवला. 43 जेव्हा स्वामी परत येतो तेव्हा तो सेवक ते काम करतांना त्याला आढळला, तर मालक त्याला प्रतिफळ देईल. 44 मी तुम्हांला हे सांगतो: तो मालक त्या सेवकाला जे काही त्याच्या मालकीचे आहे त्या सर्वांवर आधिकारी बनवेल. 45 परंतु जर सेवकांचा कारभारी जर स्वतःशीच म्हणू लागेल, ‘आता तर माझा धनी माझा मालक बऱ्याच वेळेसाठी निघून गेला आहे’, आणि मग त्याच्या आधिकाराखालील इतर सेवकांना मग ते पुरूष असो अथवा स्त्री त्यांना तो मारहाण करू लागेल. कदाचित तो खादाडपणे अन्न सेवन करून दारूने मस्त होऊ लागेल. 46 जर तो असे करेल तर, त्याचा धनी त्याला अपेक्षा नाही अशा वेळेस परत येईल. मग त्याचा मालक त्याला कठोर शिक्षा करेल आणि त्याला अशा जागी नेमेल जेथे त्याच्यासोबत कोणीही विश्वास योग्यतेने सेवा करणार नाही. 47 आपल्या मालकाला काय हवे ते त्या सेवकाला ठाऊक होते परंतु त्याने तसे केले नाही म्हणून, त्याला कठोर शासन होईल. 48 परंतु माझ्या मालकाला काय हवे होते ते ज्या ज्या सेवकाला माहित नव्हते, आणि ते त्यांनी केले नाही किंवा काही चूक केली तर, त्यांना साधी शिक्षा होईल. ज्यांना खूप काही दिले आहे त्याच्याकडून खूप अपेक्षा काही केली जाते. आणि ज्यांच्या हाती खूप काही दिले आहे त्यांच्याकडूनच भरपूर गोष्टीविषयी अपेक्षाही केली जाते.”
49 “मी या पृथ्वीवर आग लावायला आलो आहे. ती आग जर आधीच लागली असती तर किती बरे झाले असते. 50 लवकरच मला भयंकर वेदनाचा बाप्तिस्मा घ्यायचा आहे. माझ्या ह्या वेदनासंपेपर्यंत मी अतिशय त्रासात राहणार आहे. 51 तुम्हांला काय वाटते माझ्या येण्याने पृथ्वीवरील लोक ऐकामेकांसोबत शांतीने राहू शकतील? नाही! तर मी तुम्हांला सांगतो, त्याऐवजी, लोक आपसांत विभागले जातील. 52 कारण एका घरातील काही लोक माझ्यावर विश्वास ठेवतील तर काही ठेवणार नाहीत, अशाने त्यांच्यात फूट पडेल. एका घरातील जे तीन लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ते त्याच घरातील जे दोन माझ्यावर विश्वास करतील त्यांचा ते विरोध करतील. 53 एखादा मनुष्य आपल्या पुत्राचा विरोध करील, किंवा एखादा पुत्र आपल्या वडिलांचा विरोध करेल. एक स्त्री आपल्या मुलीचा विरोध करील, किंवा एखादी मुलगी आपल्या आईचा विरोध करेल. एखादी सासू आपल्या सूनेचा विरोध करेल, किंवा एखादी सून आपल्या सासूचा विरोध करेल.”
54 तसेच तो जमलेल्या लोकांस म्हणाला, “पश्चिमेकडून, जेव्हा एखादे काळे ढग वर येते तेव्हा तुम्ही लगेच म्हणता ‘अरे आता पाऊस पडणार आहे! आणि तसेच घडते. 55 दक्षिणेकडून, वारा वाहतो तेव्हा तुम्ही म्हणता, ‘अरे आजचा दिवस खूप गरमीचा असेल!’ तेव्हा तुम्ही बरोबर म्हणता आणि बरोबर ठरता. 56 अहो ढोंग्यानो! ढग आणि वारे पाहून हवामान कसे असेल, ते तुम्हांला ओळखता येते. तर देव ह्या सांप्रतकाळी काय करत आहे हे तुम्हांला समजत नाही काय, हे तुम्हांला ओळखण्याची शक्ती नाही काय?
57 तुम्हांकडे वेळ आहे तेव्हा तुम्ही कोणती योग्य गोष्ट करावी ह्याचा, तुम्हातील प्रत्येकाला निर्णय घेणे आवश्यक आहे! 58 एखाद्याने तुमच्यावर आरोप लावला आणि तो तुम्हांला न्यायालयात घेऊन जात आहे तेव्हा रस्त्यातच तुम्ही त्या गोष्टींवर समेट करण्याचा प्रयत्न करावा. जर तो तुला न्यायधिशाकडे घेऊन गेला तर न्यायाधीश तुझा न्याय करेल आणि तुला दोषी ठरवून तो न्यायालयाच्या आधिकाऱ्याकडे सोपवून देईल आणि मग तो आधिकारी तुला तुरुंगात टाकेल. 59 मी तुला सांगतो जर तू तुरुंगात गेला, तर न्यायधीशाने म्हटल्याप्रमाणे तुम्ही जो पर्यंत प्रत्येक पैसा फेडत नाही तोपर्यंत, तुम्ही बाहेर निघणार नाही.”
Chapter 13
1 त्यावेळेस, काही लोकांनी यरूशलेमेत मागील काही दिवसात सैनिकांनी गालीली लोकांना ठार केले त्याबद्दल येशूला सांगितले. मंदिरामध्ये ते बलिदान अर्पणे करीत असतांना रोमी राज्यपाल, पिलात ह्याने, त्यांना ठार मारण्याची आज्ञा केली होती. 2 येशूने त्यांना प्रतिउत्तर केले, “इतर सर्व गालीलांतील लोकांपेक्षा जे ठार झाले ते सर्व गालीली अधिक पापी होते असे तुम्हांला वाटते का? 3 मी तुम्हांला खात्रीने सांगतो की, त्याचे ते कारण नव्हते! परंतु मी तुम्हांला खात्रीने सांगतो जर तुम्ही आपल्या पापी स्वभावापासून फिरला नाहीत तर देवही तुम्हास तशीच शिक्षा करेल.
4 किंवा यरूशलेमच्या बाहेर शिलोहामध्ये त्या अठरा लोकांवर बुरूज पडला आणि ते मरण पावले. त्या विषयी तुम्हास काय वाटते? यरूशलेमेतील इतर सर्व लोकांपेक्षा ते जास्त पापी होते म्हणून त्यांच्या सोबत ते घडले असे तुम्हास वाटते का? 5 मी तुम्हांला खात्रीने सांगतो ते त्याचे कारण नाही! परंतु त्याऐवजी, हे सांगतो की जर तुम्ही आपल्या पापी स्वभावापासून फिरले नाहीत तर परमेश्वर नक्कीच तुम्हांला तसेच शासन करेल!”
6 मग येशूने त्यांना ही एक गोष्ट सांगितली: “एका मनुष्याने आपल्या बागेत अंजिराचे एक झाड लावले. दरवर्षी तो आपले अंजिर घेण्यासाठी येत असे, परंतु त्या झाडावर कधीही फळ आले नाही. 7 म्हणून मालक माळ्याला म्हणाला, ‘ह्या झाडाकडे पाहा! मागील तीन वर्षापासून मी ह्यांच्यावर काही फळ लागेल म्हणून प्रत्येक वर्षी मी पाहत असतो, परंतु त्याला कधीच अंजिर लागत नाहीत. ह्याला तोडून टाक! उगाच जमिनीतील खत ते वापरत आहे परंतु काहीच फळ येत नाही!
8 परंतु माळ्याने उत्तर दिले, “स्वामी, हे एवढे वर्ष आणखी ह्याला राहू द्या. मी त्याच्या अवतीभोवती खणेन आणि अधिक खत घालेन. 9 पुढील वर्षी ह्यावर अंजिर आले, तर आपण त्याला वाढू देवू! परंतु पुढल्यावर्षी जर फळ आले नाही, तर आपण ह्याला कापू शकता.’”
10 यहूद्यांचा विसाव्याच्या एका दिवशी, येशू एका सभास्थानात त्यांना शिकवत होता. 11 तेथे एक स्त्री होती. अठरा वर्षांपासून तिला दृष्ट आत्म्याने अपंग करून ठेवले होते. ती नेहमी कमरेत वाकलेली होती; आणि त्यामुळे तिला सरळ उभा राहता येत नव्हते.
12 येशूने तिला पाहिले, तेव्हा त्याने तिला आपल्याजवळ बोलावले. तो तिला म्हणाला, “बाई, तुझ्या ह्या आजारापासून मी तुला बरे करीत आहे!” 13 त्याने आपले हात तिच्यावर ठेवले. लगेचच ती पूर्णपणे सरळ उभी राहीली आणि देवाची स्तुती करू लागली! 14 परंतु येशूने तिला यहूद्यांच्या विसावा घेण्याच्या दिवशी बरे केले म्हणून त्या सभास्थानाचा पुढारी खूप चिडला होता. म्हणून तो लोकांना म्हणाला, “आमच्या नियमशास्त्राप्रमाणे आठवड्याच्या सहा दिवसात काम करण्याची लोकांना परवानगी आहे. जर तुम्हांला बरे व्हायचे असेल, तर तुम्ही त्या दिवसामध्ये सभास्थानात या आणि बरे व्हा.” आमच्या विसाव्याच्या दिवशी येऊ नका!”
15 मग प्रभूने त्याला उत्तर दिले, “तू आणि तुझ्या सोबतीचे धार्मीक पुढारी ढोंगी आहात! तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती हा विसाव्याच्या दिवशी देखील कधी कधी काम करतात! तुमचे बैल किंवा तुमचे गाढव ह्याला तुम्ही त्याच्या गव्हाणीपासून त्याला सोडून पाणवठ्यावर पाणी प्यायला नेत नाहीत काय? 16 ही बाई एक यहूदी आहे, जी अब्राहामाची वंशज आहे! परंतु सैतानाने हिला मागील अठरा वर्षांपासून अपंग करून ठेवले होते, जणू काय तिला त्याने बांधून ठेवले होते! नक्कीच मी तिला सैतानापासून जर मोकळे केले तर ते योग्य केले, आणि ते जरी मी विसाव्याच्या दिवशी केले तरीही ह्यात सहमत व्हायला पाहिजे होते!
17 त्याने हे उत्तर दिल्यावर, त्याच्या शत्रूंना त्यांचीच लाज वाटली. परंतु इतर सर्व लोक तो जे काही अद्भुत गोष्टी करत होता त्याबद्दल खूप आंनदी झाले.
18 मग तो म्हणाला, “देव स्वतःला राजा बनवेल तेव्हा गोष्टी कशा होतील त्या मी तुम्हांला कशा समजावून सांगू? त्या कशासारख्या असतील ते मी तुम्हांला सांगतो. 19 एका मनुष्याने आपल्या शेतात एक छोटेशे मोहरीचे बीं पेरले. ते एका मोठ्या झाडासारखे होईपर्यंत ऐवढे मोठे झाले. ते एवढे मोठे झाले की पक्षी त्याच्या फांद्यावर घरटे करून राहू लागले.”
20 मग तो पुन्हा त्यांना म्हणाला, “देव स्वतःला राजा म्हणून प्रकट करेल तेव्हा ते कशासारखे होईल ह्याबद्दल आणखी एक गोष्ट मी तुम्हांला सांगतो. 21 एखाद्या बाईने पचंवीस किलोग्राम पीठामध्ये थोडेसे खमिर घेऊन ते मिसळले. आणि त्या छोट्याशा खमिराने त्या पूर्ण पिठाच्या गोळ्याला वाढवून मोठे केले त्यासारखे ते असेल.”
22 येशू यरुशलेमेकडे प्रवास करत राहिला. रस्त्याने लागणाऱ्या प्रत्येक गावात आणि खेड्यात तो थांबला आणि लोकांना शिकविले. 23 कोणीतरी त्याला विचारले, “प्रभू, देव केवळ थोडक्याच लोकांना वाचवणार आहे काय?” 24 येशूने उत्तर दिले, “अंरूद प्रवेशद्वारतून जातांना तुम्हाला अधिक कठोर परिश्रम करण्याची गरज असते. मी तुम्हाला सांगतो खूप लोक त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतील पण ते त्यातून आत जाऊ शकणार नाहीत.
25 देव कोणा एका घर मालकासारखा आहे एखाद्या दिवशी तो आपल्या दाराला कुलूप लावेल. मग तुम्हातील काही बाहेर उभे राहतील आणि दार ठोठावतील. तुम्ही म्हणाल, “प्रभू आम्हांसाठी दार उघडा!” परंतु तो तुम्हांला उत्तर देईल, ‘नाही मी उघडणार नाही, कारण मी तुम्हास ओळखत नाही, आणि तुम्ही कोठून आला आहात ते ही मला ठाऊक नाही.’ 26 मग तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुझ्यासोबत भोजन केले प्रभू हे तू नक्कीच विसरला असशील, आणि तू आमच्या शहरात येऊन आमच्या रस्त्यावर उपदेश केलेला आहेस!’ 27 परंतु तो त्यांना म्हणेल, ‘मी तुम्हांला पुन्हा सांगतो मी तुम्हांला ओळखत नाही, आणि तुम्ही कोठून आला आहात ते मला ठाऊक नाही. अहो दुष्ट लोकांनो! माझ्यापासून दूर व्हा!’” 28 मग प्रभू येशू पुढे बोलत राहिला, “तुम्ही दुरून अब्राहाम आणि इसहाक आणि याकोबाला पाहा. तुमच्या फार पूर्वीं होऊन गेलेले सर्व संदेष्टे तेथे असतील, आणि देव तेथे सर्वांवर राज्य करेल. परंतु तुम्ही बाहेर राहाल. रडाल आणि वेदनेत आपले दात खाल. ! 29 एवढेच नव्हे तर अनेक गैर यहूदी लोकही आत असतील. आणि ते सर्व उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम ह्या सर्व देशातून आलेले असतील. देव सर्वांवर राज्य करत आहे ह्या आंनदोत्सवात ते भोजन घेत असतील. 30 ह्याविषयी विचार करा आज तुम्हांला जे लोक अतिशय कमी महत्वाचे वाटतात ते त्या दिवसात सर्वात जास्त महत्वाचे असतील आणि आज तुम्हांला जे जास्त महत्वाचे वाटतात ते त्या दिवशी सर्वात कमी महत्वाचे असतील.”
31 त्याच दिवशी काही परूषी आले आणि येशूला म्हणाले, “हा भाग सोडून निघून जा कारण हेरोद अंतिपास तुला ठार करू इच्छितो!” 32 तो त्यांना म्हणाला, “माझ्याकडून त्या हेरोद कोल्ह्याला हा संदेश द्या: ऐक!, “आज मी दुरात्मे काढतो आणि चमत्कार करतो, आणि मी हे आणखी थोडा वेळ करणार आहे. आणि त्यानंतर मी माझे काम पूर्ण करेन. 33 परंतु यरुशलेमेकडे येणाऱ्यां दिवसात मी माझा प्रवास सुरू ठेवला पाहिजे कारण संदेष्टयाने येरुशलेमच्या बाहेर मारले जावे हे योग्य नव्हे.
34 यरूशलेमच्या लोकांनो! फार पूर्वी तुम्ही संदेष्ट्यांना ठार केले देवाने पाठविलेल्या इतंरानाही तुम्ही ठार केले देवाने पाठविलेल्या इतंरानाही तुम्ही धोंडमार करून ठार केले. एखादी कोंबडी आपल्या लहान पिल्लांना घेऊन त्यांची सुरक्षा करते तशीच मी तुम्हांला एकत्र करून तुमची सुरक्षा करावी असे मला अनेकदा वाटले परंतु मी ते करावे अशी तुमची इच्छा नव्हती. 35 परंतु पाहा! देव यरूशलेमच्या लोकांना यापुढे सुरक्षा देणार नाही. आणि मी तुम्हांला हे ही सांगतो‘मी तुमच्या शहरात केवळ एकदाच प्रवेश करेन. त्यानंतर मी पुन्हा येईपर्यंत तुमच्या दृष्टीस पडणार नाही, त्यावेळेस तुम्ही म्हणाल, देवाच्या आधिकाराने राज्य करणारा आशीर्वादित असो!’
Chapter 14
1 एके दिवशी, जो विसाव्याचा दिवस होता, परूश्यांच्या पुढाऱ्यांपैकी कोणा एकाच्या घरी येशू जेवावयास गेला, आणि ते त्याच्याकडे न्याहाळून पाहत होते. ते त्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करत होते. 2 तेव्हा येशूच्या अगदी पुढे हात आणि पाय सुजलेला असा मनुष्य होता. 3 तेव्हा उपस्थितीत परूशी आणि यहूद्यांच्या नियमशास्त्रातील विद्वान यांना येशूने विचारले, “विसाव्याच्या दिवशी एखाद्या आजारी माणसाला बरे करण्याची नियमशास्त्रात परवानगी आहे काय?” 4 त्यांनी उत्तर दिले, नाही. म्हणून येशूने आपले हात त्या आजारी माणसांवर ठेविले आणि त्या मनुष्यास बरे केले. आणि मग त्यास सांगितले तू जाऊ शकतो. 5 आणि तेथे उपस्थितांना तो म्हणाला, “विसाव्याच्या दिवशी तुम्हापैकी एखाद्याचा बैल किंवा गाढव विहिरीत पडले तर तुम्ही त्याला लगेचच बाहेर काढणार नाही काय?” 6 पुन्हा ते त्याला उत्तर देण्यास समर्थ नव्हते.
7 त्या दिवशीच्या जेवणास आंमत्रित महत्वाची लोक ज्या ठिकाणी बसतात त्या जागा स्वतःसाठी निवडून घेत होते हे येशूच्या लक्षात आले. मग त्याने आपला सल्ला त्यांना दिला: 8 “जर कोणी तुम्हांला विवाहाच्या जेवणावळीस बोलवतो तर महत्वाची लोक बसतात त्याठिकाणी बसू नको. कदाचित तुझ्यापेक्षा ही महत्त्वाच्या एखाद्या मनुष्याला त्या जेवणावळीस आंमत्रण केले गेले असेल. 9 मग तो मनुष्य जेव्हा येतो तेव्हा ज्या माणसांनी तुम्हा दोघांनाही आंमत्रण दिले तो तुझ्याकडे येऊन तुला म्हणेल, “कृपया तुझी जागा ह्या माणसाला बसण्यासाठी दे!” मग तुला कमी महत्त्वाच्या जागेवर बसावे लागेल आणि तुला लाज वाटेल. 10 त्याऐवजी जेव्हा तुला जेवणावळीस बोलावले जाते तेव्हा, जा, आणि जी जागा कमी महत्वाची आहे तिथे जाऊन बस. तेव्हा ज्या माणसांनी सर्वांना आंमत्रित केले तो येईल, आणि तो तुला म्हणेल, ‘मित्रा, कृपया ये आणि चांगल्या जागी माझ्यासोबत बस!’ तेव्हा तुझ्यासमवेत जे सगळे जेवण करतील ते पाहतील की तो तुझा सन्मान करत आहे. 11 कारण जे स्वतःला उंच करतात देव त्यांना नम्र करतो आणि जे स्वतःला नम्र करतात त्यांना तो उंचावतो 12 ज्या परुशांनी येशूला आंमत्रित केले होते त्याला येशू म्हणाला, “जेव्हा कधी तू लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणावळीस बोलावीतोस, तुझ्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा श्रीमंताना बोलवू नकोस. कारण ते ही तुला परत आमंत्रण देऊन जेवणावळीसाठी बोलवून तुझी परतफेड करतील. 13 त्याऐवजी जेव्हा तू जेवणासाठी आमंत्रण देतोस तेव्हा गरीब लोक अशक्त आंधळे ह्यांना बोलव. 14 कारण तुझी ते परतफेड करण्यास असमर्थ असतील. परंतु देव तुला आर्शिवाद देईल! नितिमानाचे पुनरुत्थान होईल तेव्हा तो तुला प्रतिफळ देईल. तो तुझी परतफेड करेल.
15 त्याच्यासोबत जेवणाऱ्यांना एकाने हे बोलतांना ऐकले आणि तो येशूला म्हणाला, “देवाच्या राज्याची सुरूवात होईल तेव्हा त्याचा राज्याच्या उत्सवात जे सहभागी होतील ते खरोखरच आर्शिवादीत आहेत. 16 येशूने त्याला उत्तर दिले, “एकदा एका मनुष्याने एक मोठी जेवणावळ तयार केली. आणि त्यांनी जेवणासाठी खूप लोकांना आंमत्रित केले. 17 जेवणावळीचा दिवस आला, तेव्हा त्याने आपल्या सेवकांना आंमत्रितास बोलवण्यास पाठवले, चला कारण सर्व तयार आहे! 18 परंतु जेव्हा सेवकांनी ते केले आमंत्रित केलेले लोक एकामागून एक कार्यक्रमाला येऊ न शकण्याची कारणे देऊ लागले. सेवक ज्या पाहिल्या माणसाकडे गेले तो त्यास म्हणाला, “इतक्यात मी एक शेत घेतले आहे मला तिथे जाऊन ते पाहणे आवश्यक आहे. कृपया तुझ्या धन्यास मी येत नाही याबद्दल मी क्षमा मागतो असा निरोप दे! 19 दुसरा व्यक्ती म्हणाला, “बैलांच्या पाच जोड्या मी इतक्यातच विकत घेतल्या आहेत मला जाऊन त्यांचे परीक्षण केले पाहिजे. मी येऊ शकत नाही त्याबद्दल तुझ्या मालकाला माझी क्षमा सांग. 20 दुसऱ्याने म्हटले, “माझे इतक्यातच लग्न झाले आहे मी येऊ शकत नाही. 21 म्हणून ते सेवक आपल्या धन्याकडे परत आले आणि सर्वांनी जी कारणे सांगितली होती ती कळविली. घराचा मालक रागावला आणि तो आपल्या दासांना म्हणाला, “रस्त्यावर लवकर जा शहराच्या गलोगल्ली जा आणि गरीब आंधळे अपंग लंगडे लोक शोधून आणा आणि त्यांना माझ्या घरी घेऊन या. 22 तो सेवक गेला आणि त्यांनी तसे केले म्हणून तो परत आला आणि म्हणाला, “महोदय तुम्ही मला जे सांगितले ते मी केले आहे परंतु आणखी ही काही लोकांसाठी जागा शिल्लक आहे. 23 म्हणून स्वामीने दासाला म्हटले, “शहराच्या बाहेर जा राजमार्गावर जे लोक आहेत त्यांना शोध त्यानंतर त्याच्या बाजूस ज्या पायवाटा आहेत तिथे काही लोक असतील त्यांना शोध. तेथील लोकांना मनापासून विनंती कर की त्यांनी माझ्या घरी यावे. माझी इच्छा आहे की माझे घर भरून जावे! 24 आणखी मी तुला सांगतो ज्यांना मी अगोदर आमंत्रण दिले होते ते माझ्या मेजवानीत सहभागी होऊ शकणार नाहीत. कारण त्यांनी येण्यास नकार दिला.
25 येशू सोबत लोकांचा एक मोठा जमाव प्रवास करत होता. तो लोकांकडे वळला आणि त्यांना म्हणाला, 26 “जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपल्या बापावर आपल्या आईवर आणि बायकोवर आणि लेकरांवर आणि भावांवर आणि बहीणीवर माझ्यापेक्षा जास्त प्रीती करतो, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. त्याने तर आपल्या जिवाहून जास्त प्रीती माझ्यावर करायला हवी. 27 जर कोणी आपला स्वतःचा वधस्तंभ उचलत नाही आणि माझ्या आज्ञाचे पालन करत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही. 28 जर तुम्हापैकी कोणाला एखादयाला बुरूज बांधायचा असेल तर असा कोण आहे की जो बसत नाही आणि त्याला किती खर्च येईल त्याचा अंदाज काढत नाही? ते केल्यास तुम्ही ठरवू शकता की तो बुरूज पूर्ण करण्यास तुम्हांकडे पुरेसे पैसे आहेत की नाही. 29 किंवा तुम्ही त्याचा पाया घालाल आणि ऊरलेला बुरूज तुम्ही पूर्ण करू शकणार नाही तर तुम्हांला पाहणारे तुमची थट्टा उडवतील 30 ते म्हणतील, “ह्या मनुष्याने बुरूज बांधण्यास सुरुवात केली परंतु तो ते पूर्ण करू शकला नाही! 31 किंवा एखादा राजा दुसऱ्या राजाविरुध्द युद्ध करावयास जातो तेव्हा तो त्यांचा सल्लागारासोबत बसून पहिल्याने हिशोब करत नाही काय? ते हिशोब करतात की त्यांचे दहा हजार सैनिकांचे सैन्य त्या दुसऱ्या राजाच्या वीस हजार सैनिकांच्या सैन्याला हरवू शकते का? 32 जर त्यांनी निर्णय घेतला की त्यांचे सैन्य दुसऱ्या राजाच्या सैनिकाला हरवू शकत नाही तर तो राजा दुसरे सैन्य दूर असेल तोवरच दूत पाठवतो. तो राजा त्या दूताला हा संदेश सांगण्यास सांगतो, “तुझ्यासोबत शांती करण्यास मी काय केले पाहिजे? 33 म्हणून अशाचप्रकारे जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही सोडू इच्छीत नाही त्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्ही माझे शिष्य होऊ शकत नाही. 34 येशूने हे देखील म्हटले, “तुम्ही मिठासारखे आहात जे फार उपयोगी आहे. पंरतु जर मीठाचा खारटपणा गेला तर पुन्हा त्याला कशाने खारट करता येईल? 35 आणि जर मिठाची चव खारट नसेल तर ते जमिनीसाठी किंवा खतामध्ये घालण्याचे योग्येतेचे राहणार नाही. लोक त्याला फेकून देतील. मी तुम्हांला जे सांगत आहे ते तुम्हापैकी प्रत्येकांनी लक्षपूर्वक ऐकणे गरजेचे आहे!
Chapter 15
1 जकात गोळा करणारे बरेच लोक आणि ज्यांना निरंतर पाप करणारे असे समजले जात होते असे लोक येशूचे शिक्षण ऐकण्यासाठी येशूकडे येत राहिले. 2 आणि परूशी व यहूदी नियमाचे शिक्षक कुरकुर करू लागले, आणि ते म्हणत होते, “हा मनुष्य तर पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत जेवण देखील करतो. येशू असे करून स्वतःला शुद्ध करत आहे असे ते समजत होते. 3 म्हणून येशूने त्यांना हा दाखला सांगितला: 4 “तुमच्या पैकी एकाकडे शंभर मेंढरे आहेत अशी कल्पना करा आणि त्यातले एक तुम्ही हरवले. तर तुम्ही नक्कीच इतर नव्याण्णव रानात सोडून द्याल आणि जोपर्यंत ते हरवलेले मेढंरू सापडत नाही ते शोधत राहाल. 5 आणि जेव्हा तुम्हांला ते सापडेल तुम्ही त्याला आपल्या खाद्यांवर घेऊन घरापर्यंत आणाल. 6 घरी आल्यानंतर तुमचे मित्र आणि शेजारी ह्यांना तुम्ही बोलवाल आणि त्यांना म्हणाल, “माझ्यासोबत आंनद करा कारण की माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे. 7 अगदी याचप्रकारे, जे लोक स्वतःला नितिमान समजता आणि असा विचार करता की त्यांना पश्चातापाची गरज नाही त्यापेक्षा त्या एका व्यक्तीमूळे जो आपल्या पापांचा पश्चाताप करतो स्वर्गामध्ये अधिक मोठा आंनद होईल असे मी तुम्हास सांगतो.
8 किंवा एखाद्या बाईकडे चांदीच्या सात मौल्यवान मोहरा आहेत आणि त्यापैकी एक तिच्यांकडून हरवली. नक्कीच ती दिवा लावेल आणि सर्व घर झाडेल आणि जोपर्यंत ते तिला सापडत नाही ती लक्षपूर्वक शोधत राहील; 9 आणि जेव्हा ते तिला सापडेल, ती आपल्या मैत्रिंनीना शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणेल, “माझी हरवलेली मोहर मला सापडलेली आहे, या माझ्यासोबत आंनद करा. 10 मी तुम्हांला हे सांगतो अगदी ह्याचप्रमाणे, स्वर्गात देखील एक पापी जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा देवदूत ह्यापेक्षाही जास्त आंनद करतात.
11 येशूने आपले बोलणे चालू ठेवले आणि तो म्हणाला, “एक मनुष्य होता त्याला दोन मुले होते. 12 एके दिवशी लहान मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, “बाबा, तू मरण पावल्यानंतर तुझी जी मालमत्ता मला मिळणार होती त्या मालमत्तेचा वाटा मला आताच दे. म्हणून त्या बापाने आपली मालमत्ता दोन्ही मुलांमध्ये वाटून टाकली. 13 थोड्याच दिवसांनंतर आपले सर्वकाही गोळा करून आपली सर्व मालमत्ता जमा करून तो लहान मुलगा एका दूर देशास जाण्यासाठी निघाला. त्या देशात गेल्यानंतर त्यांनी आपला सर्व पैसा मूर्खपणाच्या गोष्टीवर आणि अनैतिक जीवन जगण्यात घालवला. 14 त्याचा पूर्ण पैसा खर्च झाल्यानंतर त्या संपूर्ण देशात भंयकर दुष्काळ पडला. आणि लवकरच त्याला जीवन जगण्यासाठी काहीच उरले नाही. 15 म्हणून तो त्या देशातील एका रहिवाशाच्या घरी गेला आणि कामावर ठेवून घ्यावे अशी विनंती त्याला त्याने केली. म्हणून त्या मनुष्याने त्याला आपल्या शेतामध्ये डुकरांना चारा देण्याचे काम दिले. 16 थोड्यावेळानंतर त्याला एवढी भूक लागली की डुकरे खातात त्या शेगां तरी खाऊन आपले पोट भरावे असा विचार त्याचा मनात येऊ लागला. कारण कोणीही त्याला काहीही देईना. 17 शेवटी आपण किती मूर्खपणाने वागलो ह्याविषयी तो स्पष्टतेने विचार करू लागला आणि तो स्वतःला म्हणाला: ‘माझ्या वडिलांनी जेवढे मोलकरी कामांवर ठेवलेत त्या सगळ्यांना देखील पुरेल एवढे अन्न आहे. परंतु मी येथे माझ्याकडे काही खायला नाही म्हणून उपाशी मरत आहे. 18 म्हणून मी येथे राहणार नाही. आणि माझ्या वडिलाकडे परत जाईल. मी त्यांना म्हणेन, “बाबा मी तुमच्याविरुध्द आणि स्वर्गाविरुद्ध पाप केले आहे. 19 आणि आता मी तुमचा मुलगा म्हणून घ्यावयाच्या योग्यतेचा राहीलो नाही: तुझ्या एका मोलकऱ्यांप्रमाणे मला केवळ तू कामावर ठेवून घ्यावे अशी मी विनंती करतो. 20 म्हणून त्याने तो देश सोडला आणि आपल्या बापाच्या घरी जाण्यासाठी परतीच्या प्रवासास निघाला. तो आपल्या बापाच्या घरापासून दूर असतांनाच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा खूप कळवळा आला. तो आपल्या मुलाकडे धावत गेला. आणि त्याने त्याला मिठी मारली, आणि त्याच्या गालाचे मुके घेतले. 21 मुलगा त्याला म्हणाला, “बाबा मी देवाविरुध्द आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे, म्हणून तुमचा मुलगा घ्यावयाची योग्यता आता माझ्यात नाही. 22 परंतु त्या बापाच्या सेवकांनी सांगितले, : ‘त्वरा करा आणि माझे सर्वोत्तम वस्त्र माझ्या मुलावर घाला. आणखी त्याच्या बोटांमध्ये अंगठी घाला. आणि त्याच्या पायात जोडे घाला. 23 जे वासरू महत्वाच्या कामासाठी पोसले गेले आहे ते ही आणा आणि त्याला कापा म्हणजे आपण सर्वजण आंनद उत्सव करू आणि मेजवानी करू. 24 आंनद करणे आवश्य आहे कारण हा माझा मुलगा मेलेल्या माणसांसारखा होता, परंतु तो आता पुन्हा जिवंत झाला आहे. तो एका हरवलेल्या व्यक्तीसारखा होता, पण आता तो सापडला आहे. म्हणून ते सर्व आंनद उत्सव करू लागले. 25 हे सर्वकाही घडत असंताना, त्या पित्याचा मोठा मुलगा शेतामध्ये काम करीत होता. तो आपले काम संपवून जेव्हा आपल्या घराच्या जवळ येत होता, लोक मोठ्याने गीत गात आहेत आणि वाद्ये वाजवत आहेत ह्याचा आवाज त्याच्या कानी पडला. 26 त्याने एका दासाला आवाज देऊन बोलवले आणि त्याला विचारले काय चालू आहे. 27 त्या दासाने त्याला सांगितले, तुझा भाऊ घरी परत आला आहे. तुझ्या वडिलांनी पोसलेले वासरू मेजवानीसाठी कापावे असे आम्हांला सांगितले आहे कारण तुझा भाऊ सुरक्षित आणि सुखरूप परतला आहे. 28 परंतु मोठ्या भावास खूप राग आला तो घरात जाण्याची त्याची इच्छा नव्हती म्हणून त्याचे वडील बाहेर आले आणि त्याला विनवणी करू लागले की आत ये आणि येण्यास त्याला विनंती करू लागले. 29 परंतु त्याने आपल्या वडिलांना उत्तर दिले, “ऐका! एखाद्या गुलामांसारखा मी ऐवढे सर्व वर्ष तुझ्यासाठी कठोर कष्ट केले. तू मला जे काही सांगितले त्या सर्वात मी तुझे आज्ञापालन केले. परंतु तू मला एक छोटे बकरीचे पिल्लू देखील माझ्या मित्रांसोबत मेजवानी करण्यासाठी दिले नाहीत. 30 परंतु आता हा तुझा मुलगा घरी परत आला आहे. वेश्यांवर तुझा सर्व पैसा ऊधळून टाकल्यावर आता हा तुझा मुलगा घरी परतल्यानंतर तू पोसलेले वासरू मेजवाणी करण्यासाठी आणि उत्सव करण्यासाठी कापावे असे तुझ्या सेवकांना सांगितले आहेस. 31 परंतु बाप त्याला म्हणाला, “माझ्या मुला तू तर नेहमी माझ्यासोबत आहेस जे काही माझे ते सर्व तुझे आहे. 32 परंतु आंनदोत्सव करणे आणि मेजवानी करणे योग्य आहे कारण जणू काय तुझा भाऊ मेला होता तो आता पुन्हा जिवंत झाला आहे तो जवळपास हरवला होता पण तो आता पुन्हा सापडला आहे.
Chapter 16
1 येशू त्याच्या शिष्यांस म्हणाला, “एके काळी एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याच्याकडे घराच्या सर्व मालमत्तेवर देखरेख ठेवणारा एक कारभारी होता. एके दिवशी श्रीमंत मनुष्याला असे सांगण्यात आले की हा कारभारी त्याच्या मालमत्तेचे वाईट रीतीने व्यवस्थापन करत आहे. परिणामी तो श्रीमंत मनुष्याला त्याची संपत्ती गमावून टाकण्यास कारणीभूत होता. 2 तर त्याने कारभारी त्याच्याकडे बोलाविले आणि त्याला म्हणाला, ‘तू जे काही करत आहेस ते भयानक आहे! तू जे व्यवस्थापन केले आहेस त्याचा मला अंतिम अहवाल दे, कारण येथून पुढे कदाचित तू माझा कारभार पाहणार नाहीस!’
3 मग कारभारी स्वतःला म्हणाला, ‘माझा मालक त्याचा कारभारी कामावरून मला काढणार आहे, तर काय करायचे याचा विचार करावा लागेल. माझ्यामध्ये इतकी ताकद नाही की खड्डे खोदण्याचे मी काम करेन, आणि पैशांची भिक मागण्यासाठीही मला लाज वाटेल. 4 माझ्या कारभारी कार्यावरून मला काढल्यानंतर, मला माहित आहे मी काय करणार जेणेकरून लोक मला त्यांच्या घरांमध्ये घेतील आणि माझी काळजी करतील!’
5 मग त्याने सर्वांना बोलावून एकानंतर एकाला विचारीले की त्यांना त्याच्या मालकाचे किती पैसे देणे आहे. त्याने पहिल्याला विचारीले, ‘तुला माझ्या मालकाला किती पैसे देणे आहे?’ 6 त्या मनुष्याने उत्तर दिले, ‘तीन हजार लिटर जैतूनाचे तेल.’ कारभारी त्याला म्हणाला, ‘तुझ्या हिशोबाचा आकडा घे, खाली बस, आणि त्यात एक हजार पाचशे लिटरचा लवकर बदल कर!’ 7 त्याने दुसऱ्या माणसाला सांगितले, ‘तुला माझ्या मालकाला किती पैसे देणे आहे?’ त्या मनुष्याने उत्तर दिले, ‘एक हजार गव्हाच्या टोपल्या.’ कारभारी त्याला म्हणाला, तुझ्या हिशोबाचा आकडा घे आणि आठशे टोपल्यांमध्ये बदल कर!’
8 त्याच्या कारभाराने काय केले आहे हे ज्यावेळेस त्याच्या मालकाने ऐकले, बेईमानी कारभाऱ्याने केलेल्या हुशारीची त्यांने प्रशंसा केली. ह्या जगात अधार्मिक लोक इतरांसोबत धार्मिक लोकांपेक्षा जास्त हुशारीने वागतात हे सत्य आहे. 9 तर मी आता तुम्हांला सांगतो: ह्या जगात असतांना जे पैसे तुमच्याकडे आहेत ते सर्व इतरांसाठी त्याचा वापर करा जेणे करून ते तुमचे मित्र होतील. जेव्हा कधी तुम्ही मराल, तेव्हा ते तुमचे सार्वकालिक घरामध्ये स्वागत करतील.
10 जे लोक विश्वासू राहून छोट्या गोष्टींना ताब्यात ठेवतात ते विश्वासू राहून महत्वाच्या गोष्टी देखील ताब्यात ठेवतील. जे लोक छोट्या गोष्टी सांभाळण्याकरिता अप्रामाणिक आहेत ते महत्वाच्या गोष्टी देखील सांभाळ्यणाकरिता अप्रामाणिक राहतील. 11 जो पर्यंत तुम्ही ह्या जगामध्ये आहात जर विश्वासूपणे पैशांना हाताळले नाही तर, आध्यात्मिक संपत्ती हाताळण्यासाठी तुम्ही कसे विश्वासयोग्य राहू शकता? 12 आणि जर तुम्ही इतर लोकांच्या गोष्टी विश्वासूपणे सांभाळू शकत नाही तर, कोण तुम्हांला तुमच्या स्वतःच्या गोष्टी सांभाळण्यासाठी देईल?
13 कोणताही सेवक एका वेळी दोन वेगवेगळ्या धन्यांची सेवा करू शकत नाही. आणि जर तो असा करतो तर, तो त्यांच्या पैकी एकाचा द्वेष करील आणि एकावर प्रीती करील, किंवा तो त्याच्या पैकी कोणा एकासोबत इमानदार राहील. ह्याच प्रकारे, जर तुमचे जीवनात तुम्ही पैसा आणि इतर साहित्य व मालमत्ता मिळविण्याच्या मागे आहात तर तुम्ही तुमचे जीवन देवाची सेवा करण्यासाठी अर्पण करू शकत नाही.”
14 त्या वेळेस जे परूशी तेथे होते येशूने सांगितलेले ते ऐकून, त्यांनी त्याची खिल्ली उडवली कारण त्यांना पैसे मिळविण्याची आवड होती. 15 परंतु येशू त्यांना म्हणाला, “इतर लोकांनी तुम्हांला नितिमान समजावे म्हणून तुम्ही त्यांना विचार करण्यासाठी भाग पाडता, परंतु देवाला तुमचे हृदय ठाऊक आहे. लक्षात ठेवा लोक जे अतिशय महत्वाचे आहे त्याची प्रशंसा करतात, देवाला ते घृणास्पद आहे.
16 जे नियम देवाने मोशेला दिले आणि जे काही संदेष्ट्यांनी लिहिले ते बाप्तिस्मा करणारा योहान येईपर्यंत घोषित केले. तेव्हा पासून मी हा संदेश सांगत आहे की लवकरच देव स्वतःला राजा म्हणून सिद्ध करेल. पुष्कळसे लोक हा संदेश स्वीकार करत आहेत खूप उत्सुकतेने देवाला मागत आहेत की त्यांच्या जीवनावर राज्य करावे. 17 सर्व देवाचे नियम, जरी त्यातील काही शिल्लक वाटत असले तरीही, ते स्वर्ग आणि पृथ्वी पेक्षाही अधिक स्थिर आहेत.
18 जो मनुष्य त्याच्या पत्नीला घटस्फोट देतो आणि दुसऱ्या बाई सोबत विवाह करतो तो व्यभिचार करतो, आणि तिच्या पती कडून घटस्फोट मिळलेल्या स्त्री सोबत कोणताही मनुष्य विवाह करतो तो देखील व्यभिचार करतो.”
19 येशू हे देखील म्हणाला, “एकदा एक श्रीमंत मनुष्य होता ज्याने जांभळ्या रंगाचा सुरेख आणि तागाचे वस्त्र घातले होते. दररोज तो महाग मेजवानी देत असे. 20 आणि दररोज लाजर नावाचा गरीब मनुष्य श्रीमंत मनुष्याच्या घराच्या फाटका समोर झोपलेला असे. लाजराचे शरीर फोड्याने झाकलेले होते. 21 तो इतका भुकेला होता की त्या श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून खाली पडलेले खरकटे अन्न खाण्याची त्याची इच्छा होती. पुढे, अजून वाईट स्थिती, कुत्रे येवून त्याची फोडे चाटत असत.
22 अखेरीस तो गरीब मनुष्य मरण पावला. मग देवदूतांद्वारे त्याच्या पूर्वज अब्राहामाकडे त्यास नेण्यात आले. श्रीमंत मनुष्य देखील मरण पावला, आणि त्याचे शरीर पुरण्यात आले. 23 मेलेल्यांच्या जागेत, श्रीमंत मनुष्य भयंकर त्रास सहन करत होता. त्याने वरती बघितले आणि अब्राहाम त्याला खूप लांब दिसला आणि अब्राहामाच्या फार जवळ लाजर बसला होता.
24 तर मग श्रीमंत मनुष्य ओरडला, ‘हे पित्या अब्राहाम, मला ह्या अग्नी मध्ये खूप त्रास होत आहे! कृपया माझ्यावर दया कर, आणि लाजराला येथे पाठव जेणे करून तो पाण्यात बोट बुडवील आणि माझी जिभ थंडी होण्यासाठी तो तिला स्पर्श करेल!’
25 परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘मुला, त्या गोष्टींची आठवण कर ज्या वेळेस तू जगात जिवंत होतास आणि पुष्कळ चांगल्या गोष्टींचा आनंद घेतलास. पण लाजर दुःखी होता. आता तो येथे आनंदित आहे, आणि तू त्रासात आहेस. 26 त्याव्यतिरिक्त, देवाने आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये विशाल दरी ठेवली आहे. तर ज्या कोणाला येथून तू आहेस तिकडे जाता येऊ नये. शिवाय, एक तर जेथे आम्ही आहोत, तिथून कोणीही उल्लंघन करून जाऊ शकत नाही.’
27 नंतर श्रीमंत मनुष्य म्हणाला, ‘जर असे आहे तर, हे पित्या अब्राहाम, माझ्या पित्याच्या घरी लाजराला पाठवा, अशी मी विनंती करतो. 28 मला पाच भाऊ आहेत जे तेथे जगात आहेत. त्यांने त्यांना इशारा द्यावा म्हणजे, जेथे आम्ही भयंकर त्रास सहन करत आहोत, ते देखील येथे येणार नाही.
29 परंतु अब्राहामाने उत्तर दिले, ‘नाही मी ते नाही करणार, कारण तुझ्या भावांकडे जे मोशेने आणि संदेष्ट्यांनी पूर्वी लिहिले ते आहे. त्यांनी जे काही लिहिले आहे त्याचे त्यांनी पालन करावे!’ 30 परंतु श्रीमंत मनुष्याने उत्तर दिले, ‘नाही, हे पित्या अब्राहाम, तेवढे पुरेसे नाही! परंतु जर कोणी मेलेल्यांतून त्यांच्याकडे परत जाईल आणि त्यांना इशारा देईल, तर ते त्यांच्या पापी सवयींपासून वळतील.’ 31 अब्राहाम त्याला म्हणाला, ‘नाही! जे काही मोशेने आणि संदेष्ट्यांनी लिहिले ते त्यांनी ऐकले नाहीतर, जरी कोणी मेलेल्यांतून जिवंत होऊन त्याच्याकडे जाऊन त्यांना चेतावणी दिली, तरी त्यांना त्यांच्या पापी सवयींपासून वळण्यासाठी त्यांची खात्री पटणार नाही.’”
Chapter 17
1 येशू त्याच्या शिष्यांस म्हणाला, “लोकांनी पाप करावे असे त्यांना मोहात पाडणाऱ्या गोष्टी निश्चितच घडतील, परंतु जो ह्या गोष्टी घडण्यास कारणीभूत आहे त्या व्यक्तीसाठी हे किती भयानक आहे! 2 जो विश्वासामध्ये कमकुवत आहे त्याला जर कोणी पापात पाडण्यासाठी कारणीभूत होतो, तर अशा व्यक्तीच्या गळ्याला मोठा धोंडा बांधून त्याला समुद्रात फेकने हे योग्य आहे.
3 तुम्ही कशाप्रकारे वागता ह्याची काळजी घ्या. तुझ्या भावांपैकी कोणी पाप करतो तर, त्याला दोष लाव. जर त्याने केलेल्या पापाची त्याला जाणिव आहे आणि तो तुला क्षमा मागतो तर त्याला क्षमा कर. 4 तरीही तो पुन्हा एका दिवसात सात वेळा तुझ्या विरुद्ध पाप करतो, जर तो त्या प्रत्येक वेळेस तुझ्याकडे येऊन तुला सांगतो, ‘जे काही मी केले आहे त्या बद्दल मला क्षमा कर,’ तर तू पुन्हा पुन्हा त्याला क्षमा करत जा.”
5 मग प्रेषितांनी प्रभूला म्हटले, “आम्हांला आणखी विश्वास दे!” 6 प्रभूने उत्तर दिले, “तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्या एवढा असला, आणि तुम्ही त्या तुतीच्या झाडाला म्हटले, ‘जमिनीतून आपल्या मुळांसकट उपटली जा आणि समुद्रात लावली जा’ आणि ते झाड तुमची आज्ञा ऐकेल!”
7 येशू हे देखील म्हणाला, “समजा, तुमच्यातील कोणा एकाकडे, तुमच्या शेताला नांगरणारा आणि तुमच्या मेंढरांचे राखण करणारा असा एक दास आहे. ज्यावेळेस तो शेतातून घरी परत येतो, तेव्हा तुम्ही असे म्हणत नाही की, ‘ये लवकर खाली बस आणि जेवण कर!’ 8 त्याऐवजी, ‘माझ्यासाठी जेवण तयार कर! भोजन वाढण्याचे कपडे घालून मला ते वाढ म्हणजे मी खाणे-पिणे करीन! नंतर तू खाणे-पिणे करू शकतोस’ असे म्हणाल.
9 तुम्ही आपल्या सेवकाला सांगितलेले काम त्याने केल्याबद्दल त्याचे आभार मानणार नाही! 10 त्याच प्रकारे, ज्या वेळेस देवाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करता, तुम्ही असे म्हणायला पाहिजे, ‘आम्ही तर केवळ देवाचे सेवकच आहोत आणि त्याने आमचे आभार मानावे एवढ्या पात्रतेचे आम्ही नाहीत. आम्ही केवळ त्याच गोष्टी केल्या ज्या त्याने आम्हास करण्यास सांगितल्या.’”
11 येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमेच्या वाटेने जात असता, ते शमरोन आणि गालील प्रांताच्या क्षेत्रातून जात होते. 12 येशूने गावात प्रवेश करताच, दहा कुष्ठरोगी त्याच्याकडे आले, पण ते काही अंतरावर दूर उभे राहिले. 13 त्यांनी हाक मारली, “येशू, गुरूजी, कृपया आमच्यावर दया करा!”
14 त्याने त्यांच्याकडे पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.” तर ते गेले, आणि ते जात असता, ते बरे झाले. 15 तेव्हा त्यांच्यापैकी एकाने, तो बरा झाला आहे हे पाहून, माघारी फिरून तो मोठ्याने देवाची स्तुती करू लागला. 16 तो येशूकडे आला आणि येशूच्या चरणी गुडघे टेकून नमन केले, आणि त्याचे आभार मानिले. हा मनुष्य शमरोनी होता.
17 नंतर येशू म्हणाला, “मी दहा कुष्ठरोग्यांना बरे केले! बाकीचे नऊ परत का आले नाहीत? 18 हा एकच परराष्ट्रीय मनुष्य देवाचे आभार माणण्यासाठी परत आला; इतरांपैकी कोणीही परत आले नाही!” 19 मग त्याने त्या मनुष्याला सांगितले, “ऊठ आणि आपल्या वाटेने जा. देवाने तुला बरे केले आहे कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला.”
20 एके दिवशी काही परुशांनी येशूला विचारले, “देव सर्वांवर राज्य करण्यास कधी आरंभ करणार आहे?” त्याने उत्तर दिले. “लोक आपल्या डोळ्यांनी पाहतील, असे ते असणार नाही. 21 लोक असे म्हणू शकणार नाहीत, ‘बघा! तो येथे राज्य करत आहे!’ किंवा ‘तो तिथे राज्य करत आहे!’ कारण, तुमच्या विचार करण्याच्या उलट, देवाने तुमच्यामध्ये पुर्वीच काम करण्यास सुरूवात केली आहे.”
22 येशू त्याच्या शिष्यास म्हणाला, “अशी वेळ येणार आहे ज्या वेळेस तुम्ही मला, म्हणजे मनुष्याचा पुत्र, सामर्थ्याने राज्य करतांना पाहण्याची इच्छा धराल, परंतु तुम्ही ते पाहू शकणार नाही. 23 लोक तुम्हांला म्हणतील ‘पाहा, मसीहा तेथे आहे!’ किंवा ते म्हणतील ‘पाहा! मसीहा येथे आहे!’ ते असे म्हणतील तेव्हा, त्यांच्या मागे जाऊ नका. 24 कारण वीज चकाकते तेव्हा ती आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तिचा प्रकाश पसरतो आणि तो सर्वांना दिसतो. अशाच प्रकारे ज्यावेळेस मी, मनुष्याचा पुत्र, परत येईन, तेव्हा सर्वजण मला पाहतील. 25 परंतु हे सर्व होण्यापूर्वी, मला वेगवेगळ्या दुःखातून जावे लागेल, आणि लोक मला नाकारतील. 26 परंतु नोहा जगात असतांना त्याच्या काळी लोक जसे करत होते तसेच ज्यावेळेस मी, मनुष्याचा पुत्र, परत येईन तेव्हा देखील लोक तसेच करत असतील. 27 त्या काळी, नोहा आणि त्याच्या परिवाराने मोठ्या तारवांत प्रवेश केला तोपर्यंत लोक नेहेमीप्रमाणे खातपीत होते, नेहेमीप्रमाणे ते विवाह करत होते. परंतु नंतर पूर आला आणि जे त्या तारवांत नव्हते त्या सर्वांचा नाश झाला. 28 ह्याच प्रकारे, ज्यावेळेस लोट सदोम ह्या शहरात राहता होता, नेहेमी प्रमाणे लोक खातपीत होते. ते वस्तू विकत घेत होते आणि वस्तू विकत होते. ते पेरणी करत होते, नेहमीप्रमाणे ते घरेही बांधत होते. 29 परंतु ज्या दिवशी लोटाने सदोम सोडले, आग आणि जळते गंधक आकाशातून खाली आले आणि जे कोणी शहरात राहत होते ते सर्व नाहीसे झाले. 30 ह्याच प्रकारे, ज्या वेळेस मी, मनुष्याचा पुत्र, पृथ्वीवर परत येईन, लोक तयार नसतील. 31 त्या दिवशी, जर कोणी त्यांच्या घरांच्या बाहेर असतील, त्यांनी त्यांच्या घरातील आपापल्या वस्तूंना आणण्यासाठी पुन्हा आपल्या घरात जावूच नये. ह्याच प्रकारे, जे कोणी शेतात काम करत आहेत त्यांनीही काही आणण्यासाठी मागे फिरूच नये; त्यांनी लवकर पळून जावे.
32 लोटाच्या पत्नीचे काय झाले ह्याची आठवण करा! 33 जो कोणी स्वतःच्या मनाने चालत राहतो तो मरेल. परंतु जर कोणी आपला मार्ग माझ्या नावासाठी सोडून देईल, तो सर्वकाळ जगेल. 34 मी तुम्हांला हे सांगतो: ज्या रात्री मी परत येईन, त्यावेळेस दोन लोक एका बाजेवर झोपलेले असतील. त्या पैकी कोणी एक माझ्यावर विश्वास करतो त्याला नेण्यात येईल आणि दुसऱ्याला मागेच सोडण्यात येईल. 35-36 दोन स्त्रिया एकत्र गहू दळत असतील; एकीला नेण्यात येईल आणि दुसरीला मागेच ठेवण्यात येईल.” 37 त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “प्रभू, हे कोठे होईल?” त्याने त्यांना उत्तर दिले, “जेथे मृतदेह आहेत, ते खाण्यासाठी गिधाडे एकत्रित होतील.”
Chapter 18
1 जर देव आपल्या प्रार्थनेचे लगेच उत्तर देत नाही तर निराश होवून निरंतर प्रार्थना करने त्यांना आवश्यक आहे हे समजून सांगण्यासाठी येशूने त्याच्या शिष्यांना आणखी एक गोष्ट सांगितली. 2 तो म्हणाला, “कोणा एका शहरात एक न्यायधीश होता तो देवाचा सन्मान करीत नसे आणि कोणत्याही लोकांची भीड धरत नसे.
3 त्याच शहरात एक विधवा होती जी नेहमी न्यायाधिशाकडे येत असे, त्याला म्हणत असे, ‘मला न्यायालयामध्ये जो विरोध करत आहे त्या माणसापासून न्याय मिळून द्या. 4 बराच काळापर्यंत तो न्यायाधीश तिला मदत करण्याचे नाकारत राहिला. परंतु नंतर, तो स्वतःलाच म्हणाला, ‘मी देवाचा सन्मान करत नाही आणि लोकांशी मला काहीच घेणे देणे नाही, 5 परंतु ही विधवा मला फार त्रास देते! म्हणून मी तिच्या वादाचा न्याय करीन आणि तिचा योग्य न्याय व्हावा ह्याची खात्री करीन, कारण जर मी तसे केले नाही तर, ती निरंतर माझ्याकडे येऊन येऊन मला थकवून टाकील!’”
6 मग प्रभू येशू म्हणाला, ‘ह्या अन्यायी न्यायधीशाने काय म्हटले त्याच्यावर काळजी पूर्वक विचार करा. 7 तर मग देव जो न्यायी आहे त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी किती विशेष करून न्याय करील जे त्याच्या कडे रात्रंदिवस कळवळून प्रार्थना करतात! आणि तो त्यांच्या विषयी नेहेमी धीराने वागतो. 8 मी तुम्हांला सांगतो, देव त्यांच्या निवडलेल्यांसाठी लवकरच न्याय करील! तरी देखील मनुष्याचा पुत्र मी ज्या वेळेस पृथ्वीवर परत येईन त्या वेळेस असे असंख्य लोक असतील माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.”
9 जे लोक स्वतःला स्वताःच्या दृष्टीने नितिमान समजतात आणि इतरांना खालच्या नजरेने पाहतात त्यांच्याविषयी येशूने खालील गोष्टी सांगितल्या. 10 तो म्हणाला, “दोन पुरुष यरुशलेमेत मंदिरात प्रार्थना करण्याकरीता गेले. त्यापैकी एक परूशी होता. तर दुसरा रोमी सरकारसाठी लोकांपासून जकात गोळा करणारा होता.
11 तो परूशी उभा राहिला आणि त्याने स्वतःविषयी अशा प्रकारे प्रार्थना केली, ‘हे देवा, मी इतर लोकांसारखा नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. काही लोक दुसऱ्यांपासून पैसे चोरतात, काही इतरांवर अन्याय करतात, आणि काही लोक व्यभिचार करतात. मी तर ह्यापैकी काहीही करत नाही. आणि नक्कीच ह्या पापी जकात जमा करणाऱ्यासारखा मी लोकांना फसवत तर नाहीच! 12 मी आठवड्यातून दोन दिवस उपास करतो आणि मी जे काही कमावतो त्याचा दहावा भाग मंदिरात देतो!’
13 परंतु जकात गोळा करणारा मंदिरातील अंगणात जमलेल्या लोकांपासून दूर उभा राहिला. आपली दृष्टी तो स्वर्गाकडे वर करण्यासाठी धजला नाही. त्या ऐवजी, त्याने आपला ऊर बडावून घेतला, ‘हे देवा, माझ्यावर दया कर आणि कृपया माला क्षमाकर कारण, मी महापापी आहे!’” 14 मग येशू म्हणाला, “जेव्हा ते दोघे घरी जावयास निघाले तेव्हा जकात जमा करणाऱ्याला क्षमा मिळाली परंतु परूश्याला क्षमा केली गेली नाही हे मी तुम्हास सांगतो. हे ह्यासाठी की जो कोणी स्वतःला उंच करू पाहतो त्याला नमविले जाईल आणि जो कोणी स्वतःला नम्र करतो त्याला उंचावले जाईल.’
15 एके दिवशी लोक लेकरांना येशूकडे आणत होते, त्याने आपले हात त्यांच्यावर ठेवून त्यांना आशीर्वाद द्यावा ही त्यांची इच्छा होती. जेव्हा शिष्यांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी त्या लोकांना ते करण्यास मनाई केली. 16 परंतु येशूने लेकरांना माझ्याकडे येऊ द्यावे असे म्हटले. तो म्हणाला, “लेकरांना माझ्याकडे येऊ द्या! त्यांना थांबवू नका! ह्या लेकरांसारखेच नम्र आणि विश्वास ठेवणारे लोकांवरच देव आपले राज्य करणार आहे. 17 मी तुम्हांला खरोखर सांगतो लहान लेकरांच्या विनम्रतेप्रमाणे जर कोणी देवाचे राज्य स्वीकारणार नाही तर देव त्या व्यक्तीलाही स्वीकारणार नाही.”
18 एकदा एका यहूदी पुढाऱ्याने येशूला विचारले, “हे उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करायला पाहिजे?” 19 येशूने त्याला उत्तर दिले, “तू मला उत्तम का म्हणतोस? केवळ देवच खरोखर उत्तम आहे!
20 आता तू जो प्रश्न विचारला त्याचे उत्तर मी तुला देतो, देवाने मोशेला आम्ही पाळाव्या म्हणून दिलेल्या आज्ञा तर तुला नक्कीच ठाऊक असतील: व्यभिचार करू नकोस, कोणाचाही खून करू नकोस, चोरी करू नकोस, कोणाविषयी खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा सन्मान कर,’” 21 तो मनुष्य म्हणाला, “मी अगदी बाळपणा पासून मी ह्या सर्व आज्ञांचे पालन करत आलो आहे.”
22 त्याने दिलेले उत्तर ज्या वेळेस येशूने ऐकले, तो त्याला म्हणाला, “तुला आणखी एक गोष्ट करण्याची गरज आहे. जे काही तुझ्या मालकीचे आहे ते सगळे विकून टाक. आणि ज्या लोकांना अगदी थोडे आहे त्यांना तो पैसा देऊन टाक. ह्याचा परिणाम असा होईल की तुला स्वर्गामध्ये आध्यात्मिक धन प्राप्त होईल. आणि मग तू परत ये आणि माझा शिष्य हो!” 23 हे ऐकल्या नंतर तो मनुष्य फार उदास झाला, कारण तो खूप श्रीमंत होता.
24 तो मनुष्य किती उदास झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले, तो देखील खूप दूःखी झाला. तो म्हणाला, “देवाने जे फार श्रीमंत आहेत त्यांच्यासाठी देवाने आमच्यावर राज्य करावे ह्याच्याशी सहमत होणे फारच कठीण आहे.” 25 वास्तविक पाहता श्रीमंत मनुष्यांसाठी देवाने त्यांच्या जीवनावर राज्य करने हे एखाद्या ऊंटाने सुईच्या नाकातून जाण्यापेक्षा ही अवघड आहे.”
26 ज्यांनी येशूचे ऐकले त्यांनी येशूला उत्तर दिले, “ह्या वरून तर असे वाटते कोणाचेही तारण होणे अशक्य आहे!” 27 पण येशू म्हणाला, “जे मनुष्यांसाठी अशक्य आहे ते देवासाठी शक्य आहे.”
28 मग पेत्र म्हणाला, “तुझे शिष्य बनण्यासाठी जे काही आमचे होते ते सर्व सोडून आम्ही तुझ्या मागे आलो आहोत.” 29 येशूने त्यांना उत्तर दिले, “होय, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपली घरे, आपल्या बायका, आपले भाऊ बहिणी, आपले आई वडील किंवा आपल्या मुलांना सोडले आहे. 30 ते ह्याच जीवनात त्यांनी जे काही सोडले त्याच्या बहुत पट प्राप्त करतील आणि येणाऱ्या युगात त्यांना अंनतकाळचे जीवन मिळेल.”
31 मग येशूने आपल्या बारा शिष्यांना एकांतात नेले आणि तो त्यांना म्हणाला, “लक्ष पूर्वक ऐका! आता आपण यरुशलेमेस जात आहोत. आपण तेथे असतांना संदेष्ट्यांनी मनुष्याच्या पुत्राविषयी म्हणजे माझ्या विषयी खूप पूर्वी जे लिहिले ते सगळे काही पूर्ण होईल. 32 माझे शत्रू मला गैर यहूद्यांच्या अधिकारात देतील. ते माझी थट्टा करतील, ते माझा अपमान करतील, आणि माझ्यावर थुंकतील. 33 ते मला चाबकांनी मारतील आणि मग मला ते ठार करतील. ते मला जीवे मारतील. परंतु हे घडल्यावर तिसऱ्या दिवशी मी मेलेल्यातून परत जिवंत होईन! तो जेकाही बोलला त्याच्यातले काहीही शिष्यांना समजले नाही.
34 परंतु तो जे काही बोलला त्यातील काहीही शिष्यांना समजले नाही. तो जे काही बोलत आहे त्याचा अर्थ त्यांना समजू नये असे देवाने केले होते.
35 येशू आणि त्याचे शिष्य यरीहो शहराजवळ आले तेव्हा एक आंधळा मनुष्य रस्त्याच्या बाजूला बसून होता. तो भिक मागत होता. 36 जेव्हा त्याने जवळून जाणाऱ्या गर्दीचा आवाज ऐकला, त्याने कोणालातरी विचारिले, “काय घडत आहे?” 37 त्यांनी त्याला सांगितले, “नासरेथकर येशू बाजूने जात आहे.”
38 तो मोठ्याने ओरडला, “येशू दावीद राजाच्या वंशजा, माझ्यावर दया करा!” 39 त्या गर्दीच्या पुढे जे जात होते ते त्याच्यावर चिडले आणि त्यांनी त्याला गप्प राहण्यासाठी सांगितले. परंतु तो अधिक मोठ्याने ओरडला, “हे दावीद राजाच्या वंशजा माझ्यावर दया करा!”
40 येशू थांबला आणि लोकांना आज्ञा दिली की त्या माणसाला त्याच्याकडे घेऊन या. जेव्हा तो आंधळा मनुष्य जवळ आला, येशूने त्याला विचारिले, 41 “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” त्याने उत्तर दिले, “प्रभू माझी इच्छा आहे की तू मला दृष्टी द्यावी!”
42 येशूने त्याला म्हटले, “पाहू लाग! तू माझ्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून मी तुला बरे केले आहे!” 43 लागलेच तो पाहू लागला. आणि मग तो येशू सोबत देवाची स्तुती करत चालू लागला. तेथे उपस्थित सर्व लोकांनी जेव्हा हे पहिले तेही देवाची स्तुती करू लागले.
Chapter 19
1 येशूने यरीहो मध्ये प्रवेश केला आणि तो शहरातून जात होता. 2 जक्कय नावाचा एक व्यक्ती तिथे होता. लोकांकडून जकात गोळा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती आणि तो फार श्रीमंत होता.
3 त्याला येशूला पाहायचे होते परंतु गर्दीमुळे त्याला येशू दिसत नव्हता. तो फार बुटका मनुष्य होता आणि येशूच्या अवती भोवती बरेच लोक होते. 4 म्हणून तो रस्त्याने धावत पुढे गेला. आणि तो एका उंबराच्या झाडावर चढला आणि तेथून येशू येत असता तो पाहू शकला.
5 जेव्हा येशू तेथे पोहोंचला, त्याने वर पाहिले आणि तो त्याला म्हणाला, “जक्कया लवकर खाली उतर, आज रात्री मला तुझ्या घरी मूक्काम करायचा आहे!” 6 म्हणून तो लवकर खाली आला. आपल्या घरात येशूचे स्वागत करतांना तो खूप आनंदीत होता. 7 परंतु येशू त्याच्या घरात जात आहे असे लोकांनी पाहून ते कुरकुर करू लागले, “खरोखर एका पापी मनुष्याचा पाहूणा म्हणून तो गेला आहे!”
8 ते जेवण करत असता जक्कय उठून उभा राहिला आणि येशूला म्हणाला, “प्रभू, माझी जी काही संपत्ती आहे त्यातला अर्धा वाटा मी गरिबांना देणार आहे हे मला तुला सांगायचे आहे. आणि ज्या लोकांना मी फसवले त्यांच्याकडून मी जे काही घेतले, त्याच्या चार पट मी त्यांना परत देईन.” 9 येशू त्याला म्हणाला, “आज देवाने ह्या संपूर्ण कुटूंबाचे तारण केले आहे, कारण ह्या मनुष्याने तो अब्राहामाचा खरोखर वंशज हे दाखवून दिले आहे. 10 हे लक्षात ठेवा: मी, मनुष्याचा पुत्र, देवापासून भटकलेल्यांना शोधावयास व वाचवण्यास आलेलो आहे.”
11 येशू जे काही बोलत होता ते सर्व काही लोक ऐकत होते. तो यरुशलेमेच्या अधिक जवळ जात होता म्हणून त्याने त्यांना आणखी एक गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतला. तो यरूशलेमेत पोहोंचताच, देवाच्या इच्छेप्रमाणे राजा बनणार आहे अशा त्यांच्या कल्पनेला तो दुरूस्त करू इच्छित होता. 12 तो म्हणाला, “एक राजकुमार एका दूर देशात गेला तेथे सम्राटाकडून ज्या देशात तो राहत होता त्या देशाचा राजा बनण्याची आज्ञा घेण्यासाठी तो गेला. तेथून त्याला राज्य करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर, तो आपल्या लोकांवर राज्य करणार होता.
13 म्हणून जाण्याअगोदर, त्याने आपल्या दहा सेवकांना बोलवले. त्याने त्या सर्वांना एक सारखी रक्कम दिली. तो त्यांना म्हणाला, ‘मी पुन्हा येईपर्यंत तुम्ही ह्या पैशावर व्यापार करा!’ आणि मग तो गेला. 14 परंतु त्याच्या देशातील अनेक लोक त्याचा तिरस्कार करत असत. म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग राजाकडे दूत पाठवले की ‘आम्हांला हा मनुष्य राजा म्हणून नको!’ 15 परंतु तरी त्याला राजा बनविण्यात आले. आणि मग तो नवीन राजा बनून परत आला. ज्या सेवकांना त्याने पैसे दिले होते त्यांना त्याने आपल्याकडे पुन्हा बोलवले. त्याने त्यांना जी रक्कम दिली होती त्यातून त्यांनी व्यापार करून किती नफा कमवला हे जाणण्याची त्याची इच्छा होती.
16 पहिला मनुष्य त्याच्या कडे आला आणि त्याला म्हणाला, ‘महोदय तू दिलेल्या रकमेवर मी दहा पट कमाई केली आहे!’ 17 तो ह्या माणसाला म्हणाला, ‘तू चांगला सेवक आहेस! तू खूप चांगले काम केले आहेस! तू एवढ्या छोट्या रकमेच्या बाबतीत विश्वासयोग्य राहिला आहेस म्हणून मी तुला दहा शहरांवर राज्य करू देईन.’
18 मग दुसरा सेवक त्याच्या कडे आला आणि त्याला म्हणाला, ‘तू, मला जी रक्कम दिली आहे आता ती तिच्या पेक्षा पाच पट अधिक झाली आहे!’ 19 त्याने त्या दासाला आणि त्या सेवकाला देखील म्हटले, ‘खूप छान! मी तुला पाच शहरांवर अधिकारी बनवीन.’
20 मग आणखी एक तिसरा सेवक आला तो म्हणाला, “महोदय, हा तुमचा पैसा आहे. मी तो एका कापडाने गुंडाळला आणि सुरक्षित असा झाकून ठेवला. 21 जर माझ्या व्यवसायात मी अपयशी ठरलो तर तुम्ही काय कराल ह्याची मला भीती वाटत होती. आणि मला तर ठाऊक आहे की तुम्ही एक कठोर मनुष्य आहात आणि जे तुमचे स्वतःचे नाही ते तुम्ही इतरांकडून काढून घेता. दुसऱ्या एखाद्या मनुष्याने पेरलेल्या शेताची तुम्ही कापणी करणाऱ्या शेतकऱ्यासारखे आहात.’
22 तो त्या सेवकाला म्हणाला, “अरे दुष्ट सेवका! तू जे शब्द बोललास त्यानेच मी तुला दोषी ठरविले. तुला ठाऊक होते की मी एक कठोर मनुष्य आहे कारण जे माझे नाहीत ते मी हिसकून घेतो आणि जे शेत मी पेरले नाही त्याची मी कापणी करतो. 23 म्हणून तू माझी रक्कम व्याज देणाऱ्या सावकारांकडे ठेवायची असती! तर जेव्हा मी परत आलो तेव्हा माझी रक्कम तर मला मिळालीच असती आणि यावर मला व्याजही मिळाले असते!
24 जे त्याच्या जवळ उभे होते त्यांना राजा म्हणाला, ‘त्याच्या कडून पैसे घ्या आणि ज्याने दहा पट नफा मिळवला त्या सेवकाकडे द्या!’ 25 त्यांनी विरोध केला, ‘परंतु महोदय, त्याच्या कडे तर आधीच एवढा सगळा पैसा आहे.’
26 परंतु राजा त्यांना म्हणाला, ‘मी तुम्हांला हे सांगतो: जे काही प्राप्त होते, त्याचा उत्तम उपयोग करणाऱ्या लोकांना मी अधिक देईन. परंतु जे काही मिळाले आहे त्याचा जे लोक उपयोग करत नाहीत, त्यांच्याकडे जे काही आहे तेही मी काढून घेईन. 27 तर, आता ज्या शत्रूंना मी त्यांच्यावर राज्य करू नये अशी इच्छा आहे, त्यांना माझ्याकडे आणा आणि माझ्यासमोर त्यांना ठार करा!’”
28 येशूने ह्या गोष्टी बोलल्या, आणि तो आपल्या यरुशलेमेच्या रस्त्यावर आपल्या शिष्यां संगती पुढे प्रवास करत गेला.
29 जैतूनाच्या डोंगराशेजारी बेथफगे आणि बेथानी ह्या गावाजवळ तो आल्यानंतर, 30 तो आपल्या दोन शिष्यांना म्हणाला, “तुमच्या समोरील ह्या गावामध्ये जा. तेथे तुम्हांला एक शिंगरू बांधलेले आढळेल ज्यावर आजपर्यंत कोणीही बसलेले नाही त्याला सोडा आणि माझ्याकडे घेऊन या. 31 जर तुम्हांला कोणी काही विचारले, ‘तुम्ही ह्या गाढवाला का सोडत आहात!’ तुम्ही त्यांना उत्तर द्या, ‘प्रभूला ह्याची गरज आहे.’”
32 तर ते दोन शिष्य त्या गावांमध्ये गेले आणि येशूने सांगितल्या प्रमाणेच त्यांना तेथे एक गाढव आढळले. 33 ते त्याला सोडत असता त्याच्या मालकाने त्यांना म्हटले “तुम्ही ह्या गाढवाला का सोडत आहात?’ 34 त्यांनी उत्तर दिले, “प्रभूला ह्याची गरज आहे”. 35 मग त्या शिष्यांनी गाढवाला येशूकडे आणिले. त्यांनी आपले अंगरखे त्या गाढवाच्या पाठीवर टाकले आणि येशूला त्याच्यावर बसण्यास मदत केली. 36 आणि जसा जसा तो पुढे जात होता इतरांनी आपले अंगरखे रस्त्यांवर त्याच्या पुढे टाकत त्याचा सन्मान केला.
37 जैतून पर्वतावरून खाली उतरणाऱ्या रस्त्यावर आले असता त्याच्या शिष्यांचा संपूर्ण समुह येशूने जे चमत्कार केले होते त्या सगळ्या मोठ्या चमत्कारांची आठवण करून आनंदीत होऊन देवाची स्तुती मोठ्याने करू लागला. 38 ते अशा प्रकारच्या गोष्टी म्हणत होते, “देवाच्या अधिकाराने येणाऱ्या राजाला देव आशीर्वादीत करो!” “स्वर्गात आणि त्याच्या लोकांना देवाकडून शांती लाभो!” “प्रत्येकजण देवाची स्तुती करो!”
39 त्या जमावामध्ये काही परूशी होते ते त्याला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांनी हे म्हणू नये म्हणून त्यांना थांबण्यास सांगा आपले शिष्य जे बोलत आहे ते त्यांनी बोलू नये म्हणून त्यांना थांबवा!” 40 त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास हे सांगतो: जर हे लोक शांत राहतील तर हे धोंडे स्वताहून माझी स्तुती करतील!”
41 येशू जेव्हा यरुशलेमजवळ आला आणि त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्याच्यातील लोकांसाठी रडू लागला तो म्हणाला. 42 “देवाची शांती कशी स्वीकारावी हे तुम्हा लोकांना कळायला हवे होते अशी माझी मनोमन इच्छा आहे. आत तुम्ही ते जाणणे अशक्य आहे.
43 माझी इच्छा आहे की तुम्ही हे सामजावे: लवकरच तुमचे शत्रू येतील आणि तुमच्या शहाराभोवती बांधणी करतील. ते शहराला सगळीकडून वेढतील आणि सर्व बाजूंनी 44 ते ह्या भिंती तोडतील आणि सर्व काही नाश करतील आणि तुम्हांला तुमच्या मुलाबाळांना. सर्व काही नाश केल्यानंतर दगडावर एक दगडही उरणार नाही. देव तुमचा बचाव करण्यासाठी आला होता ते तुम्ही ओळखले नाही म्हणून हे सगळे तुम्हा संगती घडेल!”
45 येशूने यरुशलेमेत प्रवेश केला आणि तो मंदिराच्या अंगणात गेला. लोक तेथे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू विकत आहेत हे त्याने पाहिले, 46 आणि तो त्यांना तेथून हाकलून देऊ लागला. तो त्यांना म्हणाला, “शास्त्र लेखात असे लिहिले आहे की, ‘माझे घर हे प्रार्थनेचे घर व्हावे जेथे लोक प्रार्थना करतील अशी माझी इच्छा आहे,’ ‘परंतु तुम्ही त्याला लुटारूंची गुहा बनवली आहे!”
47 त्या आठवड्यात येशू लोकांना मंदिराच्या अंगणात शिकवण देत असे मुख्य याजक, धार्मिक नियमांचे शिक्षक, यहूदी पुढारी त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधत होते. 48 परंतु त्यांना तसे करता येईना कारण लोक त्याचे ऐकण्यास फार उत्सुक होते.
Chapter 20
1 त्या आठवड्यातील एके दिवशी येशू मंदिराच्या अंगणात लोकांना देवाचा चांगला संदेश सांगत होता. जसे तो सांगत होता, तेंव्हा मुख्य याजक, यहूद्यांच्या नियमांचे शिक्षक, आणि इतर वडील त्याच्याकडे आले. 2 ते त्याला म्हणाले, ‘‘आम्हांला सांगा, ह्या गोष्टी करण्याचा तुम्हांला काय अधिकार आहे? आणि या गोष्टी सांगण्याचा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
3 त्याने उत्तर दिले, ‘‘मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो. 4 योहानाने लोकांचा बाप्तिस्मा केला, ह्या विषयी मला सांगा: देवाने त्याला बाप्तिस्मा करण्याची आज्ञा दिली किंवा मनुष्याने आज्ञा दिली होती?”
5 या विषयी त्यांनी आपसात चर्चा केली. ते म्हणाले, “जर आपण असे उत्तर दिले, की देवाने त्याला सांगितले होते, तर तो म्हणेल, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?” 6 जर आपण असे म्हटले, ‘ते मनुष्यच होते ज्यांनी त्याला बाप्तिस्मा देण्यास सांगितले,’ तर लोक आपल्याला मरेपर्यंत धोंडमार करतील, कारण योहान हा देवाने पाठवलेला संदेष्टा होता असा ते विश्वास ठेवतात.”
7 म्हणून त्यांनी उत्तर दिले की योहानाने बाप्तिस्मा द्यावा हे त्याला कोणी सांगितले हे आम्हास ठाऊक नाही. 8 मग येशूने त्यांना उत्तर दिले, “तर ह्या गोष्टी करण्यासाठी मला कोणी अधिकार दिला हे, मी पण तुम्हांला सांगत नाही.”
9 मग येशूने लोकांना हा दाखला सांगितला, “एका मनुष्याने द्राक्षाच्या मळ्याची लागवड केली. त्याने द्राक्षाच्या मळ्याची काळजी घेण्यासाठी काही मनुष्यांना भाड्याने दिला. मग तो दुसऱ्या देशात निघून गेला व तिथे तो बराच काळ राहिला. 10 जेव्हा द्राक्षाच्या कापनीची वेळ आली होती, तेव्हा त्याने एका सेवकाला द्राक्षमळ्याची काळजी घेणाऱ्या लोकांकडे पाठवले, जेणेकरून त्यांनी द्राक्षाच्या उत्पंनाचा त्याचा वाटा त्याला द्यावा. परंतु तो सेवक आल्यावर, त्यांनी त्याला मारहाण करून कोणतेही द्राक्ष न देता परत पाठवून दिले.
11 नंतर, मालकाने दुसऱ्या सेवकाला पाठवले. परंतु त्यांनी त्यालाही मारहाण केली आणि त्याचा अपमान केला. त्यांनी त्याला कोणतेही द्राक्ष न देता परत पाठवून दिले. 12 असे असूनही नंतर, मालकाने दुसऱ्या सेवकाला पाठवले. ह्या तिसऱ्या सेवकाला त्यांनी जखमी करून द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले.
13 आता द्राक्षमळ्याचा मालक स्वतःशीच बोलला, ‘मी आता काय करू? माझा मुलगा जो मला खूप प्रिय आहे त्याला मी पाठवतो. कदाचित ते त्याचा सन्मान करतील.’ 14 म्हणून त्याने आपल्या मुलाला पाठवले, परंतु द्राक्षमळ्याची काळजी घेणाऱ्या माणसांनी त्याला येतांना पाहिले, ते एकमेकांना म्हणाले, ‘हा जो मनुष्य येत आहे तो काही दिवसांनी द्राक्षमळ्यास वतन करून घेईल! तर चला त्याला मारून टाकू या कदाचित द्राक्षमळा आपला होईल!’
15 म्हणून त्यांनी त्याला द्राक्षमळ्या बाहेर काढून मारून टाकले. तर मी तुम्हांला सांगतो द्राक्षमळ्याचा मालक त्यांचे काय करील! 16 तो येईल आणि द्राक्षमळ्याची काळजी घेत होते त्या माणसांना मारून टाकिल. नंतर तो त्याची काळजी घेण्यासाठी दुसऱ्या लोकांना ठेवील.” येशूचे बोलणे ऐकनाऱ्या लोकांनी हे ऐकले तेव्हा, ते म्हणाले, “अशी परिस्थिती कधीही न घडो!”
17 परंतु येशूने थेट त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, “तुम्हांला असेही म्हणता येईल, परंतु शास्त्रात लिहिलेल्या या शब्दाच्या अर्थाविषयी विचार करा,
‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नाकारला तोच इमारती मधला अती महत्वाचा दगड ठरला.’
18 जो कोणी या दगडावर पडेल त्याचे तुकडे होतील, आणि ज्याच्यावर तो पडेल त्याचा तो पूर्णपणे नाश करील.”
19 मुख्य याजक आणि यहूद्यांच्या नियमांचे शिक्षक यांना जानीव झाली की त्याने त्या दुष्ट लोकांची गोष्ट सांगून त्यांना दोष देत आहे. म्हणून लगेचच ते त्याला अटक करू पाहत होते, परंतु त्यांनी त्याला अटक केली नाही, कारण जर आपण असे केले तर लोक काय करतील ह्याची त्यांना भीती वाटत होती. 20 म्हणून त्यांनी लक्षपूर्वक त्याच्यावर नजर ठेवली. स्वतःला प्रामाणिक दाखवणारे हेर सुध्दा त्यांनी पाठवले. परंतु खरोखर त्यांना असे वाटत होते की येशूने काहितरी चूकिचे बोलावे जेणेकरून त्यांना त्याला दोष देता येईल. आपण त्याला प्रांताच्या राज्यपालाच्या तावडीत देण्यासाठी सिध्द व्हावे असे त्यांना वाटत होते.
21 हेरांपैकी एकाने त्याला विचारले, “गुरूजी, जे योग्य आहे तेच तुम्ही बोलता आणि शिकवता हे आम्हांला ठाऊक आहे. विशिष्ट लोकांना आवडत नसले तरी तुम्ही खरे तेच सांगता. जसे देव आमच्या कडून करण्याचे इच्छितो तसे तुम्ही प्रामाणिक पणे शिकवता. 22 म्हणून तुम्ही या विषयी काय विचार करता ते आम्हांला सांगा: “आम्ही रोमी सरकारला कर देणे हे योग्य आहे, किंवा नाही?”
23 परंतु त्याने त्यांची चाल ओळखली की ते त्याला संकटामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत, एक तर असे यहूदी, ज्यांना कर देण्याचा तिटकारा वाटतो, किंवा रोमी शासनाचा. म्हणून तो त्यांना म्हणाला, 24 “मला रोमी नाणे दाखवा, आता मला सांगा यावर कोणाचा छाप आहे. आणि त्याच्यावर कोणाचे नाव आहे.” मग त्यांनी त्याला एक नाणं दाखवले आणि म्हटले, “यावर कैसराचे नाव आणि कैसराचा छाप आहे, जो रोमी सरकारचा मुख्य आहे.”
25 त्याबाबतित, तो त्यांना म्हणाला, “जे सरकारचे आहे ते सरकारला द्या, आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.” 26 त्याच्या उत्तराने हेरांना खूप आश्चर्य वाटले, असे की त्यांना त्याला काही उत्तर देता आले नाही. त्याच्या आजुबाजूला उभे असलेल्या लोकांसमोर येशू जे काही बोलला त्या मध्ये हेरांना कोणतीही चूक सापडली नाही.
27 त्या नंतर, काही सदूकी येशूकडे आले. ते अशा गटांपैकी होते जे म्हणतात कोणीही मरणातून उठणार नाही. 28 त्यांना येशूला प्रश्न विचारायचा होता. त्यांच्या पैकी एकाने त्याला विचारले, “गुरूजी, मोशेने आम्हां यहूद्यांसाठी लिहले आहे की एका पुरुषाला पत्नी होती व त्याला मुलबाळ न होता तो मरण पावला, त्याच्या भावाने त्या विधवेशी विवाह करावा जेणेकरून तिला त्याच्या द्वारे मुले होतील. याच प्रकारे, लोक मुलांस जो मरण पावला त्याचा वंशज असे समजतील.
29 बरे मग, एका कुटूंबात सात भाऊ होते. सर्वात मोठ्या मुलाने एका स्त्री सोबत विवाह केला, परंतु त्याला आणि त्याच्या पत्नीला कोणतेही मुलबाळ झाले नाही. नंतर तो मरण पावला. 30 दुसऱ्या भावाने हा नियम पाळला व विधवेशी विवाह केला, परंतु त्याच्या सोबत देखिल तशीच गोष्ट घडली. 31 मग तिसऱ्याने तिच्या सोबत विवाह केला, परंतु तिच गोष्ट पुन्हा घडली. सर्व सात भावांनी, एकामागून एक, त्या स्त्री सोबत विवाह केला, परंतु त्यांना मुले झाली नाही, आणि एक एक करून ते मरण पावले. 32 त्या नंतर ती स्त्री देखील, मरण पावली. 33 म्हणून, एक अशी वेळ येईल की मेलेले लोक पुन्हा उठवीले जातील हे जर खरे आहे, तर मग ती स्त्री कोणाची पत्नी असेल असे तुम्हांला वाटते? तिने तर सर्व सात भावांशी विवाह केला होता हे लक्षात असू द्या!”
34 येशूने त्यांना उत्तर दिले, “ह्या जगात, मनुष्य पत्नी करून घेतात, आणि लोक विवाहामध्ये त्यांच्या मुली मनुष्यांना देतात. 35 परंतु ज्या लोकांना स्वर्गात जाण्यासाठी देव पात्र समजतो त्यांच्या मरणातून उठल्यावर ते विवाह करत नाहीत. 36 शिवाय, ते येथून पुढे मरतही नाहीत, कारण ते देवदूतांप्रमाने अविनाशी होतात. खरे तर देव त्यांना पुन्हा उठवून हे दाखवतो की ते त्याची मुले आहेत.
37 परंतु मरणातून पुन्हा उठणाऱ्यां लोकांविषयी, मोशेने त्या विषयी काहीतरी लिहिले आहे. त्याठिकाणी जेथे त्याने जळत्या झुडूपा विषयी लिहिले आहे, त्याने उल्लेख केला आहे प्रभू म्हणून ज्या देवाची अब्राहामाने आराधना केली, ज्याची इसहाकाने आराधना केली, ज्याची याकोबाने आराधना केली. 38 हे मृत लोक नव्हते ज्यांनी देवाची आराधना केली, त्या उलट ते जिवंत लोक होते ज्यांनी देवाची आराधना केली. ज्या लोकांचा आत्मा मेल्यानंतर पुन्हा उठविला जातो ते सर्व लोक निरंतर त्याचा आदर करत राहतात!”
39 यहूद्यांच्या नियमांच्या काही शिक्षकांनी उत्तर दिले, “गुरूजी, तुम्ही खूप चांगले उत्तर दिले!” 40 त्यानंतर, त्याला जाळ्यात अडकवण्यासारखे प्रश्न विचारण्याचे कोणीही धैर्य केले नाही.
41 नंतर येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा लोक म्हणतात ख्रिस्त हा केवळ दावीदाचे वंशज आहे ते चूक आहे, मी तुम्हांला दाखवतो! 42 दावीदाने स्वतः स्तोत्रांमध्ये ख्रिस्ताविषयी लिहिले आहे.
देव माझ्या प्रभूला म्हणतो.
‘माझ्या जवळ माझ्या उजविकडे बस, जेथे मी तुझा अतिशय सन्मान करील.
43 तुझ्या शत्रूचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत तू येथे बस.’
44 दावीद राजा ख्रिस्ताला माझा प्रभू म्हणतो’! म्हणून ख्रिस्त फक्त दावीद वंशातून आलेला कोणीतरी असा नाही! जे काही मी बोललो तोच पुरावा आहे की तो दावीदा पेक्षा श्रेष्ठ आहे, हेच खरे आहे ना?”
45 जेव्हा हे सर्व इतर लोक ऐकत होते, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, 46 जे मनुष्य आपल्याच यहूदी नियमांचे शिक्षण देतात अशांसारखे वर्तन तुम्ही करू नये म्हणून सावध असा. मोठे झगे घालणे त्यांना आवडते आणि असे फिरतात की ते फार महत्वाचे आहेत हे लोकांना वाटले पाहिजे. बाजार भरतो अशा ठिकाणी लोकांनी त्यांना आदर पूर्वक सलाम करावा हेही त्यांना आवडते. सभास्थानातील अती महत्वाच्या ठिकाणी बसने त्यांना आवडते. मेजवानीच्या वेळीही अतिशय आदरनीय लोकांच्या जागेवर बसने त्यांना आवडते. 47 ते विधवांची सर्व मालमत्ता देखील चोरतात. त्यांना लोकांसमोर जास्त वेळ प्रार्थना करने आवडते. नक्कीच देव त्यांना अतिशय कठोरपणे शिक्षा करील.”
Chapter 21
1 येशू जेथे बसला होता तेथून त्याने दृष्टी वर केली आणि मंदिराच्या दानपेटीमध्ये धनवान लोकांना त्यांची भेट टाकतांना पाहिले. 2 त्याने एका गरीब विधवेलाही फार कमी किमतीचे दोन छोटे नाणे टाकतांना पाहिले. 3 आणि तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “त्या गरीब विधवेने दानपेटी मध्ये या सर्व धनवानांपेक्षा सर्वात जास्त पैसे टाकले हेच सत्य आहे. 4 कारण त्या सर्वांकडे पुष्कळ पैसा आहे, परंतु त्यांनी त्या पैकी छोटासा भागच टाकला आहे. परंतु ही विधवा जी खूप गरीब आहे, जे काही तिला आवश्यक असे तिने विकत घ्यायचे होते तो सर्व पैसा तिने दिला.
5 येशूचे काही शिष्य’ मंदिराविषयी चर्चा करत होते की किती सुंदर दगडांनी सुशोभीत केले आहे आणि लोकांनी त्याची कशी सजावट केली आहे. परंतु येशू म्हणाला, 6 “ह्या ज्या गोष्टी तुम्ही पाहत आहात त्या लवकरच पूर्णपणे नष्ट होतील. होय, अशी वेळ येत आहे की येथे एकावर एक असा एकही दगड राहणार नाही.”
7 तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, ह्या गोष्टी केव्हा होतील? आणि त्या गोष्टी आता घडणार आहे ते दर्शवण्यासाठी काय होईल?” 8 येशूने उत्तर दिले, “कोणी तुम्हांला फसवू नये म्हणून सावध असा. कारण पुष्कळ लोक येतील व प्रत्येक जन तो मीच आहे असा दावा करतील. प्रत्येकजण स्वतः विषयी म्हणेल, ‘मीच मसीहा आहे!’ ते असेही म्हणतील, ‘आता वेळ आलीच आहे, जेव्हा देव एक राजा म्हणून राज्य करील!’ त्याचे शिष्य होण्याकरीता त्यांच्या मागे जाऊ नका! 9 आणखी, तुम्ही जेव्हा कधी युद्धांविषयी आणि लोकांचे एकमेकांसोबत मारामारी करणे याविषयी ऐकाल, तेव्हा भीतीपोटी घाबरून जाऊ नका. कारण जगाचा शेवट होण्याची वेळ येण्याअगोदर ह्या गोष्टी घडल्याच पाहिजे.”
10 “विविध प्रकारच्या लोकांचा समुदाय एकमेकांवर हल्ला करतील, आणि वेगवेगळे राजे एकमेकांविरुद्ध युद्ध करतील. 11 वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे भुमीकंप, अशाच प्रकारे दुष्काळ आणि भयानक रोगराई होतील. लोकांना अतिशय भीती वाटेल अशा भयंकर घटना घडतील, आकाशात विचित्र गोष्टी घडतांना लोक पाहतील त्यावरून त्यांना कळून येईल की अतिशय महत्वाचे असे काहितरी घडणार आहे.
12 परंतु ह्या सर्व गोष्टी घडून येण्यापूर्वी, ते तुम्हांला अटक करतील, ते तुमच्याशी वाईट वागतील, आणि तुमची परिक्षा व्हावी म्हणून ते तुम्हांला सभास्थानामध्ये घेऊन जातील, आणि तुम्हांला तुरुंगात टाकतील. तुम्ही मला अनुसरता म्हणून तुमची परिक्षा होण्याकरिता ते तुम्हांला राजांच्या आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर आणतील. 13 तुमच्यासाठी हिच ती वेळ असेल की तुम्ही त्यांना माझ्या विषयीचे सत्य सांगावे.
14 म्हणून असे ठरवा की समोर येणाऱ्या वेळेत तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी काय बोलावे ह्याची काळजी करू नका, 15 कारण तुम्ही काय बोलावे यासाठी मी तुम्हांला योग्य शब्द आणि बुध्दी देईन. परिणामी, लोकांपैकी कोणीही तुम्हांला दोष देऊ शकणार नाही की तुम्ही चूक आहात.
16 आणि तुमचे पालक व भाऊ आणि इतर नातलग आणि मित्रजण हे तुमचा विश्वासघात करतील, आणि तुमच्यापैकी काहींना ते मारून टाकतील. 17 स्वाभाविकपणे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून सर्वजण तुमचा द्वेष करतील. 18 परंतु तुमच्या डोक्याचा एक केस देखील नष्ट होणार नाही. 19 जर ह्या सर्व गोष्टी सहन करण्याचे तुम्ही स्विकार करता, तर तुम्ही प्रत्यक्षात सार्वकालीक जीवन तुमच्यासाठी प्राप्त करता.”
20 “जेव्हा तुम्ही यरुशलेमेभोवती सैन्य पाहाल, तेव्हा तुम्हांला कळेल की लवकरच ते ह्या शहराला नष्ट करतील. 21 अशा वेळेस तुमच्यापैकी जे यहूदिया प्रांतात असतील त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जे ह्या शहरात आहेत त्यांनी ते सोडून जावे. जे शहराच्या जवळपास आहेत त्यांनी शहरात येऊ नये. 22 हिच ती वेळ असेल जेव्हा देव ह्या शहराला नष्ट करील; तो असे करील तेव्हा, शास्त्रात लिहिलेली वचने पूर्ण होतील.
23 गर्भवती स्त्रियांसाठी आणि त्या दिवसात ज्या आपल्या बाळांचे संगोपण करतात त्यांच्यासाठी हे किती भयानक असेल, कारण त्या वेळी पृथ्वीवर मोठ्या वेदना असतील, आणि लोक मोठ्या प्रमाणात दुःख सहन करतील कारण देवाला त्यांच्या राग आलेला असेल. 24 सैन्यांच्या हल्ल्यात त्यांच्यातील पुष्कळजन ठार होतील. बाकीचे लोक कैदेत ठेवतील आणि ते संपूर्ण पृथ्वीवर परागंदा होतील, जो पर्यंत देव परवानगी देत आहे तो पर्यंत परराष्ट्रीय यरूशलेमेला तुडवतील.
25 “या वेळेस, सूर्य, चंद्र, आणि तारे यांच्या सोबत विचित्र गोष्टी घडतील. आणि पृथ्वीवरही, लोकसमुदाय अतिशय भयभीत होईल, समुद्राच्या गर्जनेने आणि त्याच्या मोठ्या लाटांमुळे ते गोंधळून जातील. 26 लोक अस्वस्थ होऊन अतिशय भयभीत होतील, कारण जगात पुढे काय घडणार ह्याची ते वाट पाहतील. आकाशातील तारे त्यांची सामान्य ठिकाणे सोडतील.
27 तेव्हा सर्व लोक मला पाहतील, मनुष्याचा पुत्र, अती तेजस्वी प्रकाशात आणि सामर्थ्याने मेघावर येईल. 28 म्हणून जेव्हा या भयानक गोष्टी होण्यास सुरवात होईल, सरळ उभे राहा आणि वरती पाहा, कारण लवकरच देव तुमचा बचाव करील.”
29 मग येशूने त्यांना एक दाखला सांगितला: “अंजिराचे झाड, आणि सर्व झाडांविषयी सुध्दा विचार करा. 30 जेव्हा तुम्ही पाहता की त्यांच्या पानांना अंकूर फुटतो, तेव्हा तुम्हांला कळते की उन्हाळा जवळ आला आहे. 31 तशाच प्रकारे, मी सांगितलेल्या गोष्टी घडतांना तुम्ही पाहाल, तेव्हा तुम्हांला समजेल की लवकरच देव स्वतः एका राजासमान प्रकट होणार आहे.
32 मी तुम्हांला सत्य सांगत आहे: मी आताच सांगितल्या प्रमाणे ह्या सर्व गोष्टी घडण्यापुर्वी या पिढीतील लोक मरणार नाहीत. 33 आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु जे काही मी तुम्हांला सांगितले ते कधिच नाहीसे होणार नाही.
34 “स्वतःला नियंत्रनात ठेवण्यासाठी खूप काळजी पुर्वक जपा. असंस्कृत पक्ष किंवा दारू पिणे, जीवनातील दुःखामुळे अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. जर तुम्ही असे केले, तर तुम्ही जास्त वेळ माझी वाट पाहू शकणार नाही, आणि लगेचच जसे एखादा प्राणी जाळ्यात अडकतो तसे, माझ्या परत येण्याने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 35 खरंच, मी कोणताही इशारा न देता परत येईन, संपूर्ण पृथ्वीवर प्रत्येकजण जो जिवंत आहे त्याला जसे जाळ्यात अडकावे.
36 तुम्ही या सर्व कठीन प्रसंगातून सुरक्षितरित्या जाण्यासाठी सिध्द असावे, आणि तो मी, जो मनुष्याचा पुत्र, जेव्हा जगाचा न्याय करण्यासाठी येईन तेव्हा तुम्हांला निष्पाप असे घोषीत करावे म्हणून नेहमी प्रार्थना करा.”
37 प्रत्येक दिवशी येशू मंदिरात लोकांना शिकवत होता. तरी प्रत्येक संध्याकाळी तो शहराच्या बाहेर जाऊन जैतून डोंगरावर पूर्ण रात्र थांबत असे. 38 आणि दररोज अगदी सकाळी सर्व लोक त्याचे ऐकण्यासाठी मंदिरात येत असत.
Chapter 22
1 आता जवळ जवळ बेखमीर भाकरीचा उत्सव करण्याची वेळ आली होती, ज्याला लोक वल्हांडण देखील म्हणतात. 2 तेव्हा मुख्य याजक आणि यहूद्यांच्या नियमांचे शिक्षक येशूला ठार मारण्याचा मार्ग शोधत होते कारण जे लोक त्याच्या मागे जात होते त्यांची त्यांना भीती वाटत होती.
3 मग सैतानाने यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणतात त्याच्याआत प्रवेश केला, तो बारा प्रेषितांपैकी एक होता. 4 तो मुख्य याजक आणि मंदिराचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन येशूला कशा प्रकारे तो त्यांच्या हातात देईल याविषयी बोलला.
5 तो असे करणार यामुळे त्यांना फार आनंद झाला. हे काम करण्यासाठी त्यांनी त्याला पैसे दिले. 6 मग यहूदा तयार झाला, आणि येशू भोवती गर्दी नसेल तेव्हा त्याला अटक करता यावे यासाठी तो त्यांना मदत करण्याचा मार्ग शोधत राहिला.
7 मग तो दिवस ज्या दिवशी वल्हांडणाचा कोकरा मारला पाहिजे, तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. 8 म्हणून येशू पेत्र व योहानाला म्हणाले, “जा आणि आपल्याला वल्हांडणाचा उत्सव करण्यासाठी जेवण तयार करा मग आपण ते एकत्र खाऊ.” 9 त्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्ही ते खाण्यासाठी कोठी तयारी करावी असे तुम्हांला वाटते?”
10 त्याने उत्तर दिले, “काळजी पूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही शहरात जाल, तेव्हा पाण्याची मोठी घागर घेऊन जाणारा मनुष्य तुम्हांला भेटेल; ज्या घरात तो जाईल त्याच्या मागे जा. 11 घराच्या मालकाला सांगा, ‘आमचे गुरूजी म्हणतात आम्हा शिष्यांबरोबर, वल्हांडणाचे भोजन कोठे करायचे ती खोली आम्हास दाखवा?”
12 तो तुम्हांला घराच्या वरच्या मजल्यावरील मोठी खोली दाखवून देईल. त्या खोलीत पाहूण्यांसाठी सर्वकाही पूर्णपणे तयार असेल. तिथेच आपल्यासाठी भोजन तयार करा.” 13 मग दोन शिष्य शहरात गेले, त्यांना येशूने सांगितल्याप्रमाणे सर्व काही तसेच आढळले. म्हणून त्यांनी वल्हांडण उत्सव करण्यासाठी तिथेच भोजन तयार केले.
14 भोजनाची वेळ झाली तेव्हा, येशू प्रेषितांबरोबर बसला. 15 तो त्यांना म्हणाला, “मी दुःख सहनकरून मरण्याआधी तुमच्या सोबत वल्हांडणाचे भोजन करण्याची माझी खूप इच्छा होती. 16 मी तुम्हास सांगतो, जो पर्यंत देव सर्वांवर आणि सर्व ठिकाणी राज्य करील, आणि वल्हांडणामध्ये जे काही करण्याची त्याने सुरवात केली होती ते पूर्ण होईल तो पर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” 17 मग त्याने द्राक्षरसाचा प्याला घेतला व त्याबद्दल देवाचे आभार मानले. तो म्हणाला, “हे घ्या, आणि आपसात वाटणी करा. 18 यासाठी मी सांगतो की जेव्हा देव सर्वांवर आणि सगळिकडे राज्य करील तो पर्यंत मी पुन्हा यापैकी कोणताही द्राक्षरस पिणार नाही.”
19 मग येशूने भाकर घेतली आणि तिच्याबद्दल देवाचे आभार मानले, त्याने तिचे तुकडे केले आणि त्यांना ती खाण्यासाठी दिली. त्याने असे केले मग, तो म्हणाला, “ही भाकर माझे शरीर आहे, ज्याचा मी तुमच्या साठी त्याग करत आहे. माझा आदर करण्यासाठी नंतर हे करा.” 20 याच प्रकारे, त्यांचे भोजन खाऊन झाल्यावर, त्याने द्राक्षरसाचा प्याला घेतला आणि म्हणाला, “मी हा नविन करार माझ्या स्वतःच्या रक्ताद्वारे करत आहे, जे तुमच्यासाठी ओतले जाणार आहे.
21 परंतु, पाहा! जो व्यक्ती मला माझ्या शत्रूच्या हातात धरून देणार आहे तो येथे माझ्या सोबत खात आहे. 22 खरोखर, मी, मनुष्याचा पुत्र मारला जाईल, कारण देवाने अशीच योजना केली होती. परंतु त्या मनुष्यासाठी किती वाईट असेल जो मला माझ्या शत्रुच्या हातात धरून देईल!” 23 मग प्रेषित एकमेकांना विचारू लागले, “आमच्यापैकी तो कोण आहे जो हे करण्याची योजना करत आहे?”
24 त्यानंतर, प्रेषित आपसात वाद करू लागले; ते म्हणत होते, “जेव्हा येशू राजा होईल तेव्हा आपल्यापैकी कोणाला खूप जास्त आदर मिळेल?” 25 येशूने त्यांना उत्तर दिले, “गैर यहूदी राष्ट्रांचे लोकांना असे दाखवतात की ते खूप प्रबळ आहे. तरीही ते स्वतःला असे शिर्षक देतात, की ‘असे लोक जे लोकांना मदत करतात.’
26 परंतु तुम्ही त्या राज्यकर्त्यांसारखे होऊ नका! त्याऐवजी, जो तुमच्यामध्ये अतिशय आदरनीय व्यक्ती आहे त्याने सर्वात लहान असल्यासारखे वर्तन करावे, जो नेतृत्व करतो त्याने सेवकासारखे वर्तन करावे. 27 जसे की तुम्हांला हे माहित आहे एखादी विशेष व्यक्ती मेजाभोवती बसून भोजन करते, जो सेवक त्याला भोजन वाढतो तो नाही. परंतु मी तुमचा सेवक आहे.
28 मी ज्या कोणत्या कठीण वेदनांमधून गेलो आहे त्या प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या सोबत राहिला आहात. 29 म्हणून, जेव्हा देव सर्वांवर राज्य करील तेव्हा मी तुम्हांला सामर्थ्यशाली अधिकृत बनवेन माझ्या पित्याने जसा मला राजा म्हणून नियुक्त केले आहे, तसेच मी तुम्हांलाही करतो. 30 जेव्हा मी राजा होईन तेव्हा तुम्ही माझ्या सोबत बसून खाणे आणि पिणे कराल. खरे तर, इस्राएलाच्या बारा वंशातील लोकांचा न्याय करण्यासाठी तुम्ही न्यायासनाच्या सिंहासनावर बसाल.”
31 “शिमोना, शिमोना, ऐक! चाळणीत टाकून धान्य हालवावे तशी तुझी परीक्षा व्हावी म्हणून सैतानाने देवाकडे मागणी केली आहे, आणि देवाने त्याला तसे करण्यासाठी परवानगी दिली आहे. 32 परंतु शिमोना, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे, की माझ्यावर विश्वास ठेवने तू पूर्णपणे थांबवणार नाहीस. म्हणून जेव्हा तू माझ्याकडे परत येशील तेव्हा, पुन्हा हे जे तुझे भाऊ आहेत, त्यांना प्रोत्साहन दे.
33 पेत्र त्याला म्हणाला, “प्रभू, मी तुझ्या सोबत तुरूंगातही जाण्यास तयार आहे; तुझ्या सोबत मरण्याची माझी इच्छा आहे!” 34 येशूने उत्तर दिले, “पेत्रा, तुला हे माहित असावे की आज रात्री, कोंबडा अरवण्यापूर्वी, तू तीन वेळेस असे म्हणशील की तू मला ओळखत नाहीस!”
35 मग येशूने प्रेषितांना विचारले, “जेव्हा मी तुम्हांला बाहेर गावांमध्ये पाठवले, आणि तुम्ही कोणतेही पैसे न घेता, अन्न न घेता, किंवा वहाना न घेता गेला तरी असे काही होते का ज्याची तुम्हांला गरज होती व ते तुम्हांला मिळाले नाही?” त्यांनी उत्तर दिले, “काहिच नाही!” 36 आणि तो म्हणाला, “परंतु आता, जर तुमच्यापैकी कोणाकडे जर काही पैसे असतील, तर त्याने ते आपल्या सोबत घ्यावे. आणि ज्या कोणाकडे तलवार नसेल तर त्याने आपले वस्त्र विकून ती विकत घ्यावी!”
37 कारण संदेष्ट्याने माझ्याविषयी शास्त्रात लिहल्याप्रमाणे घडलेच पाहिजे म्हणून मी तुम्हांला हे सांगतो: ‘लोक त्याला गुन्हेगार समजतात.’ माझ्याविषयी शास्त्रात लिहिलेल्या सर्व गोष्टी घडत आहेत. 38 प्रेषित म्हणाले, “बघा, प्रभू! आमच्याकडे दोन तलवारी आहेत!” त्याने उत्तर दिले, “बस. या पुढे असे बोलत राहू नका.”
39 जसे तो नेहमी करत असे त्यानुसार येशू शहर सोडून जैतून डोंगरावर गेला; त्याचे शिष्य त्याच्या सोबत गेले. 40 त्याला जेथे जायचे होते त्या ठिकाणी तो आला तेव्हा, तो त्यांना म्हणाला, “पाप करण्यासाठी मोहात पडू नये म्हणून देवाने तुम्हांला मदत करावी यासाठी प्रार्थना करा.”
41 मग तो त्यांच्या पासून सुमारे तीस (मिटर) फुट दूर जाऊन, गुडघ्यावर गेला आणि प्रार्थना केली. तो म्हणाला, 42 “पित्या, माझ्या सोबत अतिशय भयंकर गोष्टी घडणार आहेत: जर तुझी इच्छा असेल तर हे घडण्यापासून तू थांबवू शकतो. परंतु मला पाहिजे तसे नाही, तर तुला काय पाहिजे तसे कर.”
43 मग स्वर्गातून देवदूत आले आणि त्यांनी त्याला धैर्य दिले. 44 तो प्रचंड वेदनेतून जात होता. म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली. त्याचा घाम रक्ताच्या मोठाल्या थेंबासारखा जमीनीवर पडत होता.
45 तो प्रार्थना करून उठला, तेव्हा तो आपल्या शिष्यांकडे परत आला. तेव्हा त्याला आढळले की त्याचे शिष्य त्यांच्या क्लेशामुळे अतिशय थकलेले, व झोपी गेलेले होते. 46 त्याने त्यांना झोपेतून उठवले आणि म्हटले, “उठा झोपू नका तुमच्यापैकी कोणीही कसल्याही प्रकारचे पाप करण्यास प्रवृत्त होऊ नये म्हणून देवाने तुम्हांला मदत करावी यासाठी प्रार्थना करा.”
47 येशू हे बोलत असता लोकांचा एक जमाव त्याच्याकडे आला. त्याच्या शिष्यांपैकी एक यहूदा, त्यांचे नेतृत्व करत होता, येशूचे चुंबन घेण्यासाठी तो येशूच्या जवळ आला. 48 परंतु येशू त्याला म्हणाला, “यहूदा, मनुष्याच्या पुत्राचा, माझे खरोखर चुंबन घेऊन मला माझ्या शत्रुच्या हवाली करतोस काय?”
49 काय घडत आहे हे जेव्हा शिष्यांना कळाले, ते म्हणाले, “प्रभू आम्ही आमच्या तलवारीने त्यांच्यावर हल्ला करावा काय?” 50 त्यांच्यातील एकाने मुख्य याजकाच्या सेवकावर वार केला, आणि त्याचा उजवा कान छाटून टाकला. 51 परंतु येशूने म्हटले, “पुरे झाले आणखी काही करू नका.” मग त्याने त्या सेवकाच्या कानाला स्पर्श केला आणि त्याला बरे केले. 52-53 मुख्य याजक, मंदिरातील शिपाई, आणि यहूदी पुढारी जे त्याला अटक करण्यासाठी आले होते त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि भाले घेऊन मला अटक करण्यासाठी आला आहात याचे मला आश्चर्य वाटते, जणू काय मी कोणी दरोडेखोर आहे. मी तुमच्या सोबत अनेक दिवस मंदिरात होतो तेथे तुम्ही मला अटक करण्याचा अजीबात प्रयत्न केला नाही! परंतु ही वेळ तुमची आहे ज्यात तुम्हांला जे पाहिजे ते तुम्ही करा. आणि ह्याच वेळेस सैतानही दुष्ट गोष्टी करेल ज्या त्याला करायच्या आहेत.
54 त्यांनी येशूला धरले आणि त्याला नेले. त्यांनी त्याला मुख्य याजकाच्या घरी आणले. पेत्र दुरून मागे मागे चालत होता. 55 लोकांनी अंगणाच्या मधोमध शेकोटी पेटवली आणि तेथे ते एकत्र बसले. पेत्रही त्यांच्या मध्ये जाऊन बसला.
56 शेकोटीचा उजेड पेत्रावर पडला तेव्हा एका दासीने पेत्राला पाहिले. तिने लक्षपूर्वक त्याच्याकडे पाहिले आणि ती म्हणाली, “ज्याला आताच अटक करण्यात आली त्या माणसासोबत हाही पुरूष होता!” 57 परंतु त्याने नकार दिला आणि असे म्हणाला, “बाई, मी त्याला ओळखत नाही!” 58 थोड्यावेळाने आणखी एकाने पेत्राला पाहिले आणि म्हटले, “ज्या माणसाला त्यांनी अटक केली त्या मनुष्यासोबत जे होते त्यामध्ये तू ही होतास!” पण पेत्र म्हणाला, माणसा, मी त्यांच्या पैकी नाही!”
59 जवळपास एका तासानंतर आणखी कोणीतरी मोठ्याने म्हटले, “हा मनुष्य ज्या प्रकारे बोलतो त्यावरून हा गालिल प्रदेशाचा आहे. नक्कीच ज्या माणसाला आम्ही अटक केली त्याच्या बरोबर हा होता!” 60 परंतु पेत्र म्हणाला, “माणसा, तू काय बोलत आहेस हे मला कळत नाही!” तो हे बोलत असतांनाच, कोंबडा आरवला.
61 प्रभू येशू वळला आणि त्याने पेत्राकडे पाहिले. मग प्रभूने काय म्हटले होते ह्याची त्याला आठवण झाली, “आज रात्री कोंबडा अरवण्यापूर्वी तू मला ओळखतोस याचा तीनदा नाकार करशील.” 62 मग तो अंगणातून बाहेर गेला आणि मोठ्या दुःखाने त्याने विलाप केला.
63 येशूवर पहारा देणाऱ्या शिपायांनी त्याची थट्टा केली आणि त्याला मारले. 64 त्यांनी त्याच्या डोळ्यांवर कापड बांधले आणि त्याला म्हटले, “तू संदेष्टा आहेस हे आम्हांला सिध्द करून दाखव! तुला कोणी मारले हे आम्हास सांग!” 65 त्यांनी त्याच्याविषयी बऱ्याच वाईट गोष्टी केल्या आणि त्याचा अपमान केला.
66 दुसऱ्या दिवशी पहाटे अनेक यहूदी पुढारी एकत्र आले. त्या जमावात जेथे मुख्य याजक आणि यहूदी नियम शास्त्र शिकवणारे मनुष्य होते. त्यांनी येशूला यहूदी परिषदेच्या खोलित नेले. तेथे ते त्याला म्हणाले, 67 “जर तू मसीहा आहेस, तर आम्हास तसे सांग!” परंतु त्याने उत्तर दिले, “जर मी म्हणालो की तो मीच आहे, तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही. 68 आणि मसीहा विषयी तुम्ही काय विचार करता असे जर मी तुम्हास विचारले, तर तुम्ही मला उत्तर देऊ शकणार नाही.
69 परंतु आतापासून पुढे मी मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या बाजूला बसेन व राज्य करीन!” 70 मग त्या सर्वांनी त्याला विचारले, “जर असे आहे तर, तू देवाचा पुत्र आहेस असे तुला म्हणायचे आहे काय?” त्याने उत्तर दिले, “होय, जसे तुम्ही म्हणता तसेच आहे.” 71 मग ते एकमेकांस म्हणू लागले, “आता आम्हांला त्याच्या विरुध्द कोणी साक्ष द्यावी अशा इतर लोकांची गरज नाही! आम्ही स्वतःच्या कानांनी ऐकले आहे की हा स्वतःला देवा समान समजतो!”
Chapter 23
1 मग तो सर्व जमाव उठून उभा राहिला, आणि त्यांनी त्याला पिलात रोमी राज्यपाल याच्याकडे नेले. 2 त्यांनी पिलातासमोर त्याच्यावर आरोप केला: “आमच्या लोकांना खोटे बोलून ह्या मनुष्याने गोंधळ उडवला. कैसराला कर देऊ नये असे त्याने त्यांना सांगतांना, व रोमन सम्राट कैसर ह्याला लोकांनी कर देऊ नये असे हा म्हणतो. आणखी, तो स्वतःला मसीहा म्हणतो, म्हणजेच एक राजा!”
3 मग पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, जसे तू मला विचारलेस तसेच.” 4 मग पिलात मुख्य याजकांना व जमलेल्या लोकांना म्हणाला “ह्या मनुष्यावर कोणत्याही गुन्ह्याचा दोष मला दिसत नाही.” 5 परंतु त्यांनी येशूवर दोषारोप ठेवने चालूच ठेवले; ते म्हणाले, “तो लोकांमध्ये दंगल घडवत आहे! संपूर्ण यहूदिया प्रांतात तो आपले विचार लोकांना शिकवत आहे. गालीलाच्या प्रदेशात त्याने हे सर्व करायला सुरू केले आणि आता तो येथे ही आला!”
6 हे शब्द पिलाताने ऐकले, व त्याने विचारले, “हा मनुष्य गालील प्रांतातील आहे काय?” 7 येशू हा गालीलाचा आहे हे पिलाताने ऐकले तेव्हा तेथे राज्य करणाऱ्या हेरोद अंतिपा हा त्या दिवसात यरुशलेमेत होता म्हणून त्याने येशूला त्याच्याकडे पाठवले.
8 जेव्हा हेरोदाने येशूला पाहिले, तेव्हा त्याला खूप आनंद झाला. बऱ्याच वेळेपासून येशूला भेटायाची तो वाट बघत होता, कारण त्याने त्याच्या विषयी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या आणि त्याने एखादा चमत्कार त्याच्या समोर करावा अशी त्याची इच्छा होती. 9 म्हणून त्याने येशूला बरेच प्रश्न विचारले परंतु येशूने त्यातील एकाचेही उत्तर दिले नाही. 10 तेव्हा मुख्य याजक आणि इतर यहूदी नियम शास्त्राचे पारंगत लोक त्याच्या बाजूला उभे राहून, त्याच्यावर वेगवेगळ्या गुन्ह्याचे दोष आरोप करू लागले.
11 मग हेरादाने आणि त्याच्या सैनिकांनी येशूची थट्टा उडवली. त्यांनी त्याच्या अंगावर महागडी वस्त्र घातली आणि तो जणू काय राजा आहे अशी ते त्याला वागणूक देऊ लागले. मग हेरोदाने त्याला पुन्हा पिलाता कडे पाठवले. 12 त्या दिवसापर्यंत हेरोद आणि पिलात एकमेकांचे विरोधी होते, परंतु त्याच दिवशी ते एकमेकांचे मित्र झाले.
13 मग पिलाताने मुख्य याजक व काही यहूदी पुढारी आणि लोकांच्या जमावाला एकत्र करून. 14 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या मनुष्याला माझ्याकडे आणले, आणि हा आरोप लावला की हा लोकांना बंडाळी करण्यास उकसावत आहे.
15 हेरोदालाही त्यात कोणता दोष आढळला नाही. मला हे माहित आहे, कारण त्याने त्याला कोणतीही शिक्षा न करता माझ्याकडे पाठवले. म्हणून हे स्पष्ट आहे की ह्या माणसाला मरण दंड द्यावा असे कोणतेही काम त्याने केलेले नाही. 16 म्हणून मी माझ्या सेवकाला त्याला फटके मारून सोडून देण्याची मी आज्ञा देईन.” 17 (पिलाताने हे म्हटले कारण वल्हांडणाच्या सणाच्या दिवशी एका कैद्याला मुक्त करावे लागत असे). 18 परंतु सर्व लोकांनी एकत्र ओरडने सुरू केले, “ह्या माणसाला वधस्तंभी द्या! आणि आम्हासाठी बरब्बाला मोकळे करा!” 19 बरब्बा नावाचा तो मनुष्य होता ज्याने शहरातील लोकांनी रोमी सरकारच्या विरुध्द बंडाळी करण्यास चिथवले होते. तो एक खुनी देखील होता. त्याला ह्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात टाकले होता. आणि त्याच्या मरण दंडाची तो वाट बघत होता.
20 परंतु पिलाताची इच्छा होती की येशूला मोकळे करावे, परंतु जमाव अधिकच ओरडू लागला. त्याने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. 21 परंतु ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभी द्या! त्याला वधस्तंभी द्या!” 22 तो तीसऱ्यांदा त्यांच्याशी बोलला आणि त्यांना म्हणाला, “का? त्याने कोणता गुन्हा केला! मरण दंडास पात्र असे कोणतेही काम त्याने केले नाही. म्हणून मी माझ्या सैनिकांना त्याला चाबकाने फटके मारण्याची शिक्षा देईन मग मी त्याला सोडून देईन.”
23 परंतु ते त्याला आधिक- अधिक मोठ्याने ओरडून आग्रह करत राहिले येशूला त्याने वधस्तंभी देण्यासाठी द्यावे. शेवटी, ते मोठ- मोठ्याने आरडाओरडा करत होते, 24 म्हणून पिलाताने त्यांच्या मर्जीप्रमाणे केले. 25 लोकांचा खून केला म्हणून आणि सरकारच्या विरुध्द बंडाळी केल्यामुळे ज्या मनुष्याला तुरुंगात टाकण्यात आले होते त्याला त्याने सोडले! आणि मग त्याने सैनिकांना आज्ञा दिली येशूला घ्या आणि ह्या जमावाची इच्छा आहे त्या प्रमाणे करा.
26 अफ्रिकेतील कुरेनशहरातील, शिमोन नावाचा कोणी एक व्यक्ती तिथे होता. तो गावातून यरुशलेम शहाराकडे येत होता. सैनिक येशूला घेऊन जात असता त्यांनी शिमोनाला धरले. येशू जो वधस्तंभ वाहून नेत होता तो येशूच्या खांद्यावरून काढून शिमोनाच्या खांद्यावर ठेवला. त्यांनी त्याला तो उचलून येशूच्या मागे जायला सांगितले. 27 आता येशूच्या मागे खूप लोकांची गर्दी होती. त्या मध्ये उर बडवून घेणाऱ्या असंख्य स्त्रिया होत्या आणि त्या त्याच्यासाठी विलाप करत होत्या. 28 येशू त्याच्याकडे वळाला आणि त्यांना म्हणाला, “यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका! तर तुम्हांला आणि तुमच्या मुलाबाळांसोबत काय घडणार आहे त्यासाठी रडा!
29 कारण मी तुम्हांला सांगू इच्छितो की, ‘अशी वेळ येईल की ज्यात लोक म्हणतील की ज्या स्त्रियांनी कधीच मुलांना जन्म दिला नाही आणि तान्ह्या मुलांना पाजले नाही त्या किती आशीर्वादीत आहेत!’ 30 आणि मग ह्या शहरातील लोक असे म्हणतील, ‘हे डोंगर आम्हावर पडले तर किती बरे होईल ह्या पर्वतांनी आम्हास गिळून टाकले तर किती बरे होईल!’ 31 मी जरी काही चूक केली नाही तरी मी मरत आहे, तर ज्या लोकांनी खरोखर मरण दंड होईल अशा चुका केल्या तर त्याच्यासंगती किती विशेष करून वाईट होईल.
32 आणखी दोन पुरूष जे गुन्हेगार होते. तेही येशू संगती, ज्याठिकाणी त्यांना मारणार होते तेही त्याच्या सोबत जात होते.
33 मग ते ‘गुलगुथा’ नावाच्या, टेकडी जवळ आले तेथे त्यांनी येशूला वधस्तंभाला खिळले. इतर दोन गुन्हेगारांसोबतही त्यांनी असेच केले. एकाला येशूच्या उजव्या बाजूला व एकाला येशूच्या डाव्या ठेवले. 34 परंतु येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांना त्याची क्षमा कर, कारण त्यांना खरोखर हे ठाऊक नाही की ते कोणासोबत काय करतात.” आणि मग सैनिकांनी त्याचे कपडे आपसामध्ये वाटून घेण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. ते ह्यासाठी की त्याच्या वस्त्रांपैकी कोणते कोणी घ्यावे हे त्यांना कळेल.
35 बरेच लोक ह्या घटना घडतांना पाहण्यासाठी, आजू बाजूस उभे होते. तेव्हा यहूदी पुढारी येशूची थट्टा करत म्हणाले: “ह्याने इतर लोकांचा बचाव केला! जर देवाने त्याला खरोखर मसीहा म्हणून निवडले आहे तर त्याने स्वतःला वाचवावे!” 36 सैनिकांनी त्याची थट्टा उडवली. ते त्याच्या जवळ आले आणि त्यांनी त्याला आंब पाजण्याचा प्रयत्न केला. 37 ते त्याला म्हणू लागले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःचा बचाव कर!” 38 त्यांनी त्याच्या वधस्तंभावर त्याच्या डोक्याच्यावर एक पाटी लावली त्या पाटीवर ‘हा यहूद्यांचा राजा आहे असे लिहिले होते.’
39 येशूच्या बाजूला वधस्तंभावर टांगलेल्या त्या गुन्हेगारांपैकी एकाने येशूचा अपमान करत म्हटले; तो म्हणाला, “तू मसीहा आहेस ना हो की नाही? तर तू स्वतःचा, आणि आमचा ही बचाव कर!” 40 परंतु दुसऱ्या गुन्हेगाराने त्याला तसे बोलण्यापासून थांबवले; त्याला म्हटले, “देव तुला शासन करत आहे ह्याची तुला भीती वाटत नाही काय! ते त्याला आणि आम्हांला एक सारखी शिक्षा देत आहेत. 41 आपण दोघेही मरणास पात्र आहोत. आपण ज्या दुष्ट गोष्टी केल्या त्यासाठी योग्य अशी शिक्षा तो आम्हांला देत आहे. परंतु ह्या मनुष्याने काहीही चूक केली नाही!”
42 मग त्याने येशूला म्हटले, “येशू जेव्हा तू राजा म्हणून राज्य करण्यास येशील तेव्हा मला वाचवण्याची आठवण ठेव!” 43 येशूने त्याला उत्तर दिले, “आज तू माझ्या बरोबर सुखलोकांत असशील हे तुला माहित असावे अशी माझी इच्छा आहे.”
44 तेव्हा दुपारची वेळ झाली. परंतु दुपारी तीन वाजे पर्यंत संपूर्ण देशावर अंधकार पसरला. 45 सूर्य संपूर्ण अंधकारमय झाला आणि मंदिरामध्ये जो पडदा पवित्रस्थान आणि परमपवित्रस्थान ह्याला दुभागत असतो तो दोन तुकड्यांमध्ये फाटला.
46 जेव्हा ते घडले, येशू मोठ्याने ओरडला, “पित्या मी माझा आत्मा तुझ्या हातात देतो!” हे म्हटल्या नंतर त्याचा श्वास बंद झाला आणि तो मेला. 47 त्या सैनिकांवर जो शताधिपती होता त्याने हे घडतांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “खरोखर ह्या मनुष्याने काहीही चूक केली नव्हती!”त्याने हे बोलून देवाचा सन्मान केला. 48 जेव्हा ह्या मनुष्यांना मरतांना पाहण्यासाठी जो लोकांचा जमाव जमला होता, त्यांनी वास्तविक काय घडले हे पाहिले तेव्हा आपल्या स्वतःचे ऊर बडवीत दुःखाने घरी परत गेले. 49 येशूच्या ओळखीचे जे सगळे गालीलाहून आले होते ज्या मध्ये स्त्रियाही होत्या त्या थोड्याश्या अंतरावर उभा राहून हे सगळे घडतांना पाहत होत्या.
50-51 योसेफ नावाचा अरिमथाईचा एक मनुष्य तेथे होता अरिमथच्या यहूदी गावात तो गेला, तो एक चांगला आणि नितिमान मनुष्य होता, आणि तो यहूदी धर्म सभेचा सदस्य ही होता. हे सर्व घडतांना त्याने पाहिले परंतु धर्म सभेच्या सदस्यांनी येशूला मरण्याकरीता सोपवून दिले आणि त्यांनी ते केले म्हणून तो त्यांच्याशी सहमत नव्हता. आणि देव त्याच्या राजाला पुन्हा राज्य करण्यासाठी पाठवणार ह्याची तो फार तळमळीने वाट बघत होता. 52 योसेफ पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर पुरण्यासाठी द्यावे अशी परवानगी मागीतली. पिलाताने त्याला ती परवानगी दिली, 53 म्हणून त्याने येशूचे शरीर वधस्तंभावरून खाली काढून घेतले. त्याने ते तागाच्या कापडामध्ये गुंडाळले. आणि मग डोंगर कपारीमध्ये कोणीतरी स्वतःला पुरण्यास जी कबर तयार केली होती त्या कबरेमध्यॆ त्याने ते शरीर ठेवले. या अगोदर कोणीही तेथे प्रेत ठेवले नव्हते. 54 शब्बाथ दिवसाच्या तयारी साठी यहूदी लोक शब्बाथ नावाच्या विसाव्याच्या दिवसाची तयारी करण्याचा तो दिवस होता, आणि लवकरच सूर्य मावळणार होता आणि शब्बाथ सुरू होणार होता. 55 गालीलाहून येशू संगती आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे आणि जे मनुष्य त्याला घेऊन गेले त्यांच्या मागे गेल्या. त्यांनी जेथे येशूचे शरीर ठेवले ती कबर पाहिली आणि त्यांनी येशूला आत कसे ठेवले तेही पाहिले. 56 आणि मग ते राहत होते त्या ठिकाणी त्या स्त्रिया परत गेल्या. आणि येशूच्या शरीरावर लावण्यासाठी मसाले व सुगंधी तेल त्यांनी विकत घेतले. परंतु यहूदी नियम शास्त्राप्रमाणे शब्बाथ सुरू झाला म्हणून त्यांनी काहीही काम केले नाही.
Chapter 24
1 आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवारी पहाट होण्यापूर्वी त्या स्त्रिया कबरेकडे निघाल्या. येशूच्या शरीरावर लावण्यासाठी त्यांनी जे मसाले तयार केले होते ते त्यांनी आपल्या सोबत घेतले. 2 जेव्हा त्या तिथे पोहोंचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की त्या कबरेच्यावर लावलेल्या धोंड्याला कोणीतरी बाजूला केले आहे. 3 त्या कबरेच्या आत गेल्या परंतु प्रभू येशूचे शरीर तेथे नव्हते!
4 त्या भांबाहून गेल्या, काय विचार करावा त्यांना कळत नव्हते. तेव्हा अचानक शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्या भोवती उभा राहिले! 5 त्या स्त्रिया घाबरल्या. त्या जमीनीवर पडल्या असता, त्या दोन पुरुषांनी त्याला म्हटले, “मेलेल्यांना पुरतात अशा ठिकाणी तुम्ही जिवंत मनुष्याचा शोध करू नये!
6 तो येथे नाही; तो पुन्हा जिवंत झाला आहे! तो गालीलात तुम्हा संगती होता तेव्हा त्याने काय म्हटले ह्याची आठवण करा. 7 ‘ते मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हातात देतील. ते वधस्तंभावर खिळतील आणि मला ठार करतील. परंतु तिसऱ्या दिवशी, मी पुन्हा जिवंत होईन. '
8 येशूने काय म्हटले होते ते त्या स्त्रियांनी आठवले. 9 म्हणून त्या कबर सोडून निघून गेल्या आणि अकरा प्रेषित व इतर शिष्यांना जाऊन भेटल्या आणि जे काही घडले ते त्यांनी त्यांना सांगितले. 10 प्रेषितांना जेव्हा महिलांनी ह्या गोष्टी सांगितल्या त्या मग्दाला गावची मरीया, योहान्ना, याकोबाची आई मरीया, आणि त्यांच्या सोबतच्या इतर स्त्रिया.
11 परंतु त्या काहितरी मूर्खतेच्या गोष्टी बोलत आहेत, असे समजून प्रेषितांनी त्यांच्या कडे दुर्लक्ष केले. 12 परंतु, पेत्र उठला आणि धावतच कबरेकडे गेला. आणि बाहेरूनच खालीवाकून आत पाहू लागला. ज्या तागाच्या वस्त्रात येशूचे शरीर गुंडाळलेले होते ते त्याने पाहिले, परंतु येशू तेथे नव्हता. म्हणून, आश्चर्य करत काय घडले असावे, असे म्हणत तो घरी परत गेला.
13 त्याच दिवशी येशूचे दोन शिष्य अम्माऊस या खेड्याकडे निघाले होते. ते यरुशलेमेहून दहा किलोमीटर लांबीवर होते. 14 रस्त्याने जातांना ते एक मेकांसगती येशूसोबत जे काही घडले त्या सर्व गोष्टी विषयी चर्चा करत होते.
15 त्या घटने विषयी चर्चा करत असतांना येशू स्वतः त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या सोबत चालू लागला. 16 परंतु देवाने ते त्याला ओळखतील असे होऊ दिले नाही.
17 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही चालत असता आपसात काय बोलत होता?” ते थांबले आणि त्यांचे चेहरे उदास झाले. 18 त्यांच्या पैकी एक जण ज्याचे नाव क्लयपा असे होते तो म्हणाला, “मागील दिवसात ज्या घटना घडल्या त्या ज्याला ठाऊक नाही असा यरुशलेमेतील केवळ तुच एक व्यक्ती असावा!”
19 तो त्यांना म्हणाला, “कोणत्या घटना?” त्यांनी उत्तर दिले, “नासरेथ येथिल एक मनुष्य येशू जो एक संदेष्टा होता त्याच्या संबंधी घडलेल्या घटना. ‘देवाने त्याला मोठमोठे चमत्कार करण्याची शक्ती दिली आणि तो अद्भुत उपदेश करत असे. लोकांनी विचार केला की ते फार अद्भुत आहे.’” 20 परंतु आमचे मुख्य याजक आणि पुढाऱ्यांनी त्याला रोमी अधिकाऱ्यांच्या हाती दिले. अधिकाऱ्यांनी त्याला मृत्यूदंड दिला आणि त्यांनी वधस्तंभावर त्याला ठार केले.
21 आम्हां इस्राएलांना आमच्या शत्रूंपासून स्वतंत्र करणारा तोच असावा अशी आमची आशा होती! परंतु आता ते शक्य नाही असे दिसते, त्याला मरणपावून आजचा हा तीसरा दिवस झाला आहे.
22 हे सगळे असुनही आमच्या काही स्त्रियांनी आम्हांला आश्चर्य चकित केले. आज सकाळी जेथे त्याला पुरले होते त्या कबरेकडे त्या गेल्या असता, 23 त्यांना तेथे येशूचे शरीर आढळले नाही! त्या पळत आल्या आणि त्यांनी आम्हांला सांगितले की त्यांनी दृष्टांतांत काही देवदूत पाहिले आहे. देवदूतांनी त्यांना सांगितले की तो जिवंत आहे! 24 आमच्या पैकी काही लोक त्या कबरे कडे गेले. महिलांनी सांगितले तसेच त्यांनाही आढळले. परंतु त्यांना येशू दिसला नाही.” 25 तो त्यांना म्हणाला, “अहो मूर्ख माणसांनो! मसीहा विषयी संदेष्ट्याने जे काही लिहले त्या गोष्टी न समजनाऱ्यांनो! 26 मसीहाने त्या सर्व गोष्टींच्या वेदनेतून जावे आणि मरावे आणि त्यानंतर आपल्या गौरवी घरात प्रवेश करावा हे घडने आवश्यक होते हे तुम्हांला ठाऊक असायला पाहिजे होते!” 27 शास्त्रलेखामध्ये स्वतःविषयी संदेष्ट्यांनी जे काही लिहले आहे त्या सगळ्या गोष्टी त्याने त्यांना समजून सांगितल्या.
28 ते दोन पुरूष ज्या खेड्यात जाणार होते त्या खेड्याजवळ ते पोहोंचले. त्याने त्यांना असे दाखवले की त्याला पुढे जायचे आहे, 29 परंतु त्यांनी त्याला विनंती केली की कृपया तू पुढे जाऊ नकोस. ते म्हणाले, “आजची रात्र आमच्या सोबत घालव, कारण संध्याकाळ झाली आहे आणि आता लवकरच अंधार पडेल.” म्हणून तो त्यांच्या संगती त्यांच्या घरी राहायला गेला.
30 जेव्हा ते जेवायला बसले त्याने भाकर घेतली, आणि देवाचे त्या भाकरीसाठी आभार मानले. त्याने ती भाकर मोडली आणि ती त्यांच्यात वाटली. 31 आणि त्या वेळेस देवाने त्या दोघांना त्याला ओळखण्याची क्षमता दिली. परंतु लगेच तो अदृष्य झाला! 32 ते एकमेकांना म्हणाले, “आपण जेव्हा रस्त्याने चालत होतो आणि तो आपल्या सोबत बोलत होता आणि त्याने आपल्याला शास्त्रलेख समजून सांगितला, तेव्हा आपल्या मनात आपण विचार करत होतो आणि आपल्याला सारखे वाटत होते काहितरी खूप चांगले घडणार आहे, जरी ते काय घडणार हे आपल्याला माहित नव्हते. आपण आता येथे राहणे योग्य नाही; आपण इतरांना काय घडले ते सांगण्यासाठी परत जाऊया!”
33 म्हणून ते लगेच ऊठले आणि यरुशलेमेस परतले. तेथे गेल्यावर त्यांना आढळले की अकरा प्रेषित आणि इतर लोकही एकत्र आलेले आहेत. 34 त्या दोन माणसांना त्याने सांगितले, “प्रभू पुन्हा जिवंत झाला आहे, हे सत्य आहे आणि त्याने शिमोनाला दर्शन दिले आहे!” 35 मग त्या दोन पुरुषांनी रस्त्याने काय घडले हे त्यांना सांगितले. भाकर मोडतांना व त्यावर आशीर्वाद मागतांना त्या दोघांनी त्याला कसे ओळखले हेही त्यांनी त्यांना सांगितले.
36 ह्या गोष्टी ते त्यांच्याशी बोलत असताच येशू त्यांच्यामध्ये प्रकट झाला. तो त्यांना म्हणाला, “देवाची शांती तुम्हासह असो!” 37 ते आश्चर्य चकित झाले आणि घाबरले, कारण त्यांना असे वाटले की ते भुत पाहत आहेत!
38 तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला आश्चर्य वाटायला नको! आणि मी जिवंत आहे ह्याची तुम्ही शंका बाळगू नका. 39 माझ्या हातातील जखमा आणि माझ्या पायातील जखमा बघा! तुम्ही मला स्पर्श करू शकता आणि माझे शरीर पाहा. मग तुम्हांला कळेल की तुम्ही खरोखर मलाच पाहत आहात. मी खरोखर जिवंत झालो हे तुम्ही पाहू शकता कारण भुतांना शरीर नसते जसे मला आहे!” 40 त्याने हे त्यांना सांगितल्यानंतर, त्याने त्यांना त्याच्या हाताच्या आणि पायाच्या जखमा दाखवल्या.
41 ते खूप आनंदी झाले आणि त्यांना आश्चर्य वाटले परंतु तरीही तो खरंच जिवंत झाला आहे ह्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. म्हणून तो त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याकडे काही खावयास आहे काय?” 42 म्हणून त्यांनी त्याला माशाचा भाजलेला एक तुकडा दिला.
43 आणि ते सगळे पाहत असता, त्याने तो घेतला आणि खाल्ला.
44 तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हा संगती होतो तेव्हा मी तुम्हांला जे सांगितले ते पुन्हा एकदा सांगतो: मोशेच्या नियमशास्त्र आणि इतर संदेष्ट्याच्या द्वारे तसेच स्तोत्रांमध्ये जे काही माझ्या विषयी लिहिले आहे ते परिपुर्ण होणे आवश्यक आहे!”
45 शास्त्रलेखात त्याच्या विषयी लिहिलेल्या गोष्टी त्यांना समजाव्या अशी त्याने त्यांची बुद्धी उघडली. 46 तो त्यांना म्हणाला, “माझ्या विषयी हेच तर लिहिले आहे: ख्रिस्ताने दुःख सहन करावे आणि मरावे, परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत होईल. 47 आणि त्यांनी हेही लिहिले आहे की जे कोणी त्याच्यावर विश्वास करतील, त्यांनी सगळिकडे जाऊन उपदेश करावा लोकांनी पापाचा मार्ग सोडून देवाकडे वळावे म्हणजे तो त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करील. ख्रिस्ताच्या अनुयायांनी त्या संदेशाचा उपदेश करावा कारण देवाने त्यांना तेच करण्यासाठी पाठवले आहे. त्यांनी हे लिहिले की त्यांनी त्या संदेशाचा उपदेश करण्याची सुवार्ता यरुशलेमेतून करावी, आणि त्यानंतर जावे आणि सर्व लोक जातींना त्या संदेशाचा उपदेश करावा. त्यांनी हे लिहिले की त्यांनी त्या संदेशाचा उपदेश करण्याची सुवार्ता यरुशलेमेतुन करावी, आणि त्यानंतर जावे आणि सर्व लोकजातींना त्या संदेशाचा उपदेश करावा. 48 तुम्ही लोकांना जाऊन हे सांगितले पाहिजे की माझ्या विषयी जे काही घडले ते सत्य आहे. 49 आणि मी तुमच्यासाठी पवित्र आत्मा पाठवतो हे तुम्ही लक्षात घ्या, पित्याने अभिवचन दिल्याप्रमाणे मी करीन. देव तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जोपर्यंत भरत नाही तो पर्यंत तुम्ही या शहरातच राहिले पाहिजे.”
50 मग येशूने त्यांना शहराच्या बाहेर नेले, जो पर्यंत ते बेथानी म्हटलेल्या गावाजवळ पोहोंचले नाही. तेथे त्याने आपले हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिला. 51 तो हे करत असतांनाच त्याने त्यांना सोडले आणि तो वर घेतला गेला. 52 त्यांनी त्याची उपासना केली आणि ते अतिशय आनंदाने यरुशलेमेत परतले. 53 दररोज ते मंदिराच्या अंगणात जात आणि तेथे देवाची स्तुती करत खूप वेळ घालवत.