मराठी: Unlocked Dynamic Bible - Marathi

Updated ? hours ago # views See on DCS

3 John

Chapter 1

1 माझ्या प्रिय मित्रा गायस, ज्यावर मी खरी प्रीती करतो, मी तुला हे पत्र लिहीत आहे. तू मला प्रमुख वडील म्हणून ओळखतो. 2 प्रिय मित्रा, मी देवाला विनंती करतो प्रत्येक गोष्टी ज्या तुझ्याकडून जातात त्या चांगल्या प्रकारे जावो, आणि देवाचा आदर करण्यात ज्याप्रकारे तू निरोगी आहेस तसेच तू आपल्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावे. 3 मी खूप आनंदी आहे कारण काही सहविश्वासणारे येथे आले आहेत आणि त्यांनी मला सांगितले तू ख्रिस्ताविषयी खऱ्या संदेशानुसार जगतोस. ते म्हणाले की तुम्ही अशा पद्धतीने वागत आहात जे देवाच्या सत्याशी सुसंगत आहे. 4 जेव्हा मी ऐकले, मी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास मदत केलेल्या त्या लोकांनी देवाच्या सत्यतेशी जुळत असलेल्या मार्गाने जगतात तेव्हा मला आनंद होतो!

5 प्रिय मित्रा, जेव्हा तुम्ही आपल्या सहविश्वासू बांधवांना मदत करता तेव्हा देखील एकनिष्ठपणे येशूची सेवा करत असता, ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अनोळखी लोकांना जे देवाला आदर देणारे असे कार्य करतात त्यांनाही तू मदत करतोस. 6 त्यांच्यापैकी काहीनी मंडळीसमोर अहवाल दिला आहे की तू त्यांना कशा प्रकारे प्रीती दाखवली. अशा लोकांना तुम्ही त्यांच्या कार्यात अशा प्रकारे मदत करत जा, ज्यामुळे ते देवाला सन्मानित करतील.

7 जेव्हा हे सहविश्वासू येशूबद्दल लोकांना सांगण्यासाठी बाहेर गेले, जे ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवत नाहीत, त्यांना त्या लोकांकडून पैसे मिळाले नाही. 8 म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आपण अशा लोकांना अन्न आणि पैसे द्यावे, जेणेकरून ते देवाच्या सत्य संदेशाबद्दल इतरांना पोहचवण्यास मदत करतील.

9 मी तुमच्या मंडळीला हे पत्र लिहिले आहे जेणेकरून त्यांना त्या सहविश्वासू बांधवांना मदत करावी. तथापि, दियत्रेफस माझे पत्र स्वीकारत नाही, कारण त्याला तुमच्यावर वर्चस्व करायचे आहे. 10 म्हणून जेव्हा मी परत तेथे येईन तेव्हा त्याने काय केले हे मी सर्वांसमोर बोलेन; तो आमच्याबद्दल इतरांना मूर्खपणाच्या वाईट गोष्टी बोलण्याद्वारे आपल्याला इजा पोहचवण्याचा प्रयत्न करतो. तो केवळ तेच करू शकत नाही, तर स्वतःच देवाच्या कार्याचा पाठपुरावा करणाऱ्या बांधवांचे स्वागत करण्यास नकार देतो. आणि जे त्यांचे स्वागत करू इच्छितात—तो त्यांना मंडळी सोडण्यास भाग पाडतो.

11 प्रिय मित्रा, अशा वाईट उदाहरणाचे अनुकरण करू नका. त्याऐवजी, चांगल्या उदाहरणांचे अनुकरण करा. लक्षात ठेवा जे लोक चांगले कार्य करतात ते खरंच देवाचे आहेत.

12 देमेत्रियसला ओळखत असलेले सर्व विश्वासू असे म्हणतात तो एक चांगला माणूस आहे. जर सत्य एक व्यक्ती असेल, तर तो त्याच गोष्टी सांगेल! आम्ही असेही म्हणतो की तो एक चांगला माणूस आहे! आणि आम्हीपण म्हणतो तो चांगला व्यक्ती आहे, आणि तुम्हाला माहित आहे की आम्ही त्याच्याबद्दल जे म्हणतो ते खरे आहे.

13 जेव्हा मी हे पत्र लिहायला सुरुवात केली, तेव्हा मला खूप काही सांगायचे होते तरी मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता मला एका पत्रात म्हणायचे नाही. 14 त्याऐवजी, मी लवकरच तुमच्याकडे येवू आणि तूम्हाला भेटायला येईन अशी अपेक्षा करतो. मग आपण थेट एकमेकांशी बोलू. 15 देव तुला शांति देवो अशी मी प्रार्थना करतो. येथे आमचे मित्र तुम्हाला त्यांच्या शुभेच्छा देतात.