मराठी: Unlocked Dynamic Bible - Marathi

Updated ? hours ago # views See on DCS

1 Thessalonians

Chapter 1

1 मी, जो पौल, हे पत्र लिहत आहे, तीमथ्य आणि सिल्वान हे माझ्या बरोबर आहेत. देव जो पिता आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याजबरोबर जुळलेल्या, थेस्सलनीका येथील विश्वासणाऱ्या मंडळीस, हे पत्र आम्ही पाठवत आहोत, देवाकडून तुम्हास कृपा व शांती लाभो.

2 आम्ही प्रार्थनेत तुमची आठवण करत असता, देवाचे सदैव तुम्हा सर्वांबद्दल आभार मानतो. 3 आम्ही सतत लक्षात ठेवतो की तुम्ही देवासाठी कार्य करता, कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे, ह्यास्तव तुम्ही लोकांवर प्रेम करता आणि त्यांची कळकळीने मदत करता आणि जेव्हा लोक तुम्हाला त्रास देतात तेव्हा तुम्ही ते सहनही करता. तुम्ही धीराने ते अशासाठी सहन करता की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून तुम्हाला वाचवण्यास येईल अशी तुम्ही आशा धरता. 4 ज्यांच्यावर देव प्रेम करतो अशा माझ्याबरोबरच्या सहविश्वासू बंधुनो, आम्ही त्याचे आभार मानतो कारण आम्हास माहित आहे की त्याने तुम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडले आहे. 5 हे असे काही आहे जे शब्दांच्या पलिकडले आहे, जेव्हा आम्ही, तुम्हास सुवार्ता सांगितली, तेव्हा आम्हांला माहित होते की त्याने तुम्हाला निवडले आहे. आणि पवित्र आत्म्याने तुमच्यामध्ये सामर्थ्याने काम करण्याद्वारे आपल्याला खात्री दिली आहे की तो असे करीत आहेत. त्याच प्रकारे, आम्ही तुमच्यासोबत असतांना, कशाप्रकारे बोललो आणि वागलो हे तुम्ही जाणता, हे अशासाठी की आम्ही तुमची मदत करावी. 6 जेव्हा लोकांनी तुमचा छळ केला, तेव्हा तो त्रास तुम्ही सहन केला, कारण तुमचा विश्वास ख्रिस्ताच्याठायी आहे, असे आम्ही ऐकले. ज्याप्रमाणे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला छळास कारणीभूत झाले आणि त्याने ते सहन केले, त्याचप्रमाणे आम्हीपण सहन केले व असेच तुम्हीही सहन केले. त्या वेळेस पवित्र आत्म्याने तुम्हाला फार आनंदित केले असेल. 7 तुम्ही येशू ख्रिस्तासाठी त्रास सहन केल्यामुळे, मासेदोनिया आणि अखया प्रांतांमध्ये राहणाऱ्या विश्वासी मंडळ्यांनी हे ऐकले की तुम्ही देवाच्या विश्वासात किती दृढतापूर्वक राहिला. त्यामुळे त्यांना हे ठाऊक आहे की ज्याप्रकारे तुम्ही देवावर दृढपणे भरवसा ठेवला तचास आपण ही ठेवावा. 8 इतर लोकांनी ऐकले आहे की तुम्ही प्रभू येशूचे संदेश सांगत आहा. नंतर त्यांनीही मासेदोनिया व अखयात राहणाऱ्यांना सुवार्ता सांगितली. एवढेच नाही तर, फार दुरवर राहणाऱ्या लोकांनी देखील तुम्ही देवावर विश्वास ठेवला आहे हे ऐकले आहे. म्हणून देवाने आपल्या जीवनात जे केले आहे त्याबद्दल लोकांना सांगण्याची गरज नाही. 9 जे लोक तुमच्यापासून दूर राहतात ते इतरांना सांगत आहेत की जेव्हा आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा आपण किती आनंदाने आमचे स्वागत केले. ते असेही सांगतात की तुम्ही खोट्या मुर्तींची उपासना थांबवली आणि आता तुम्ही त्या देवाची सेवा करता जो खरोखर देव आहे आणि जो सर्वकाही करू शकतो. तुम्ही विश्वासी झाला हे त्याच्याद्वारे आहे. 10 ते असे देखील आपल्याला सांगतात की आपण आता त्याचा पुत्र स्वर्गातून पृथ्वीवर परत यावा अशी अपेक्षा करत आहोत. आपण निश्चितपणे विश्वास ठेवला की तो मेल्यानंतर देवाने त्याला पुन्हा जिवंत केले. जेव्हा संपूर्ण जगभरातील सर्व लोकांना देव शिक्षा करणार, तेव्हा जे त्याच्यावर भरवसा ठेवतात, ते आपण असाही विश्वास ठेवतो की येशू आपल्यापैकी प्रत्येकजणांचे रक्षण करणार.

Chapter 2

1 माझ्या विश्वासातील बंधूनो, तुम्हाला माहिती आहे की तुमच्याबरोबरचा आमचा वेळ अगदी मौल्यवान होता. 2 जरी फिलिप्पै शहरातील लोकांनी पूर्वी आमच्याशी वाईट वागणुक केली आणि आमचा अपमान केला, तरी देव आमच्या धैर्याचे कारण होता हे तुम्ही जाणता. याचा परिणाम असा झाला की, देवाने जे तुम्हास सांगण्यास पाठवले होते; जरी तुमच्या शहरातील काही लोकांनी आम्हांस विरोध केला तरी तो शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितला. 3 जेव्हा आम्ही तुम्हांला देवाचे वचन पालन करण्यासाठी उत्तेजन दिले, तेव्हा आम्ही तुमच्याशी खोटे असे काही बोललो नाही. आणि अनैतिक मार्गांनी आम्ही स्वत: साठी काही मिळवू इच्छिले नाही किंवा आम्ही तुम्हाला व इतर कोणालाही फसवण्याचा प्रयत्नही केला नाही. 4 उलट, तुम्हाला सुवार्ता सांगण्यास देवाने आम्हावर भरोसा ठेवला, कारण त्याने आम्हांला पारखले आणि आम्ही हे काम करण्यास योग्य लोक असल्याचे त्याने समजले. आम्ही लोकांना शिकवतो तेव्हा, त्यांना जे ऐकावेसे वाटते ते आम्ही बोलत नाही. उलट, देव जे आमच्याशी बोलतो, ते आम्ही सांगतो, कारण आमच्या सर्व विचारांची तो पारख करतो. 5 तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडून काहीही मिळविण्यासाठी आम्ही तुमची स्तुती करीत नाही, आणि कुठलीही गोष्ट देण्याबद्दल आम्ही तुम्हाला राजी केले नाही. हे सत्य आहे, देवाला माहित आहे. 6 किंवा तुमच्या कडून काही घेण्याचा प्रयत्न केला अथवा तुमच्यातील कोणीही आमचा आदर करावा असे इच्छीले नाही, जेव्हा की, आम्हास ख्रिस्ताने पाठवले आहे, ह्याकारणास्तव आम्ही तुमच्याकडे काहीही मागणी करू शकलो असतो. 7 याउलट, ज्या प्रकारे एखादी आई आपल्या स्वतःच्या बाळाची काळजी करते, त्याप्रमाणे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य असे होतो. 8 कारण आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, म्हणून देवाने दिलेली सुवार्ता वैयक्तिकरित्या आपल्याला सांगत असतांना आम्हांला आनंद झाला. आम्ही तुमच्याकरता जे काही करू शकलो ते सर्व काही करण्यास आम्हांला आनंद झाला कारण आम्ही तुम्हावर खूप प्रेम करायला सुरूवात केली आहे. 9 माझ्या सहविश्वासू बंधूनो, तुम्हाला ठाऊक आहे की आम्ही दिवसभर आणि रात्रीही कसे कष्टाने काम केले. अशा प्रकारे आम्ही पैशांची कमाई केली, जेणेकरून आम्हांला आवश्यक असलेल्या गोष्टी देण्यासाठी आम्हांला आपल्यापैकी कोणासही विचारण्याची गरज भासणार नाही. आम्ही देवाकडून आलेली सुवार्ता सांगत असतांना ह्या गोष्टी केल्या. 10 तुम्हा विश्वासणाऱ्यांप्रती आम्ही चांगले आणि योग्य असे जीवन जगलो आहे, अशासाठी की कोणीही टीका करू नये, हे देवाला आणि तुम्हालाही ठाऊक आहे. 11 तुम्हाला हे देखील ठाऊक आहे की, तुमच्यातील प्रत्येकाशी आपल्या मुलांवर जसे प्रेम करावे अशा पित्याप्रमाणे आम्ही तुमच्याशी वागलो. 12 तुम्ही देवाच्या लोकांसारखे असावे, यासाठी आम्ही सदैव तुम्हास जोरदारपणे उत्तेजीत आणि प्रोत्साहित करतो, कारण त्याने तुम्हास त्याचे लोक होण्यास निवडले आहे, ज्यांना तो त्याच्या महान सामर्थ्याने स्वत:स राजा असे प्रगट करील.

13 ह्याकारणास्तव आम्ही देवाचे आभार मानतो, अशासाठी की आम्ही सांगितलेली सुवार्ता जेव्हा तुम्ही ऐकली व खऱ्या वचनास अंगीकारले आहे. असे वचन जे देवाने आम्हास दिले आहे. आम्हा स्वत:कडून ते बोलावले गेले नाही. आम्ही देवाचे यासाठी ही आभार मानतो की तुम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवल्या कारणाने, तो तुमचे जीवनात बदलत आहे. 14 आम्ही या गोष्टींविषयी निश्चित आहोत कारण तुम्ही यहूदीयातील विश्वासू बांधवांच्या कृत्यांप्रमाणे कार्य केले आहे. जेव्हा ख्रिस्ता मुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तणूक केली, अशाच रितीने, जेव्हा तुमच्या सहकाऱ्यांनी तुमच्याशी गैरवर्तणूक केली आणि ती तुम्ही सहन केली आणि ते सहन करण्याद्वारे ते देखील ख्रिस्त येशूमध्ये सामील झाले आहेत. 15 त्या यहूदी लोकांनी सुद्धा प्रभू येशू आणि अनेक संदेष्ट्यांना ठार मारले होते. आणि इतर गैरयहूदीयांनी आम्हास पुष्कळ गावे सोडून जाण्यास भाग पाडले. जे सर्व मनुष्यास चांगले आहे, त्याच्या विरुद्धात त्यांनी काम करुन, देवाला क्रोधीत केले आहे. 16 उदाहरणार्थ, ते आम्हांला गैरयहूद्यांना सुवार्ता सांगण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात, देवाने त्यांना वाचवावे अशी त्यांची बिलकूल इच्छा नाही. त्यांनी एवढे पाप केले आहे की, त्यांच्यावरील देवाच्या क्रोधाची परिसीमा झाली आहे.

17 माझ्या विश्वासातील बंधूनो, आपल्यापासून थोड्या काळासाठी जरी आम्ही दूर गेलो तरी आईवडीलांचे बाळ हरवावे असे आम्हास वाटते. आम्हांला तुमच्यासोबत राहण्याची तीव्र इच्छा आहे. 18 ह्याच कारणास्तव, मी, पौल, तुम्हाला पाहण्यासाठी दुसऱ्यांदा तुमच्याकडे परत येण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येक वेळी सैतानाने आम्हास परत येण्यापासून रोखले. 19 खरंच, तुम्ही असल्या कारणाने आम्ही अशी आशा करतो की देवाचे काम व्यवस्थीत चालू आहे, आम्हांला हर्षीत करणारे तुम्हीच आहात. तुम्ही असल्या कारणाने आम्ही आशा करतो की, देवाची सेवा करण्यात आम्ही यशस्वी झालो. हे आपल्यामुळे तसेच इतरांच्यामुळेही आहे की आम्ही आशा करतो की प्रभू येशू जेव्हा पृथ्वीवर परत येईल तेव्हा आपल्याला प्रतिफळ देईल. 20 खरंच, तुमच्यामुळेच आजही आम्ही प्रसन्न झालो आणि आनंदी आहोत!

Chapter 3

1 याचा परिणाम असा की, तुमच्या बाबतीत असणारी काळजी मी अधिक सहन न करावी, यासाठी मी आणि सिल्वान अथेनै शहरात मागेच राहावे, 2 आणि तीमथ्याला तुमच्याकडे पाठवावे याचा निश्चय केला आहे. तुम्हाला ठाऊक आहे की तो आमचा जवळचा मित्र आणि ख्रिस्ताविषयीची सुवार्ता घोषित करून देवाकरिता कार्य करीत आहे. सिल्वान आणि मी त्याला अशासाठी पाठवले आहे की, तो तुम्हास ख्रिस्तामध्ये दृढपणे चालण्यास प्रोत्साहित करील. 3 ज्या दु:खातून तुम्ही जात आहा, तर आमची अशी इच्छा आहे की, त्या द्वारे तुमच्यातील कोणीही ख्रिस्तापासून दूर जाऊ नये. तुम्हाला हे ठाऊक आहे की, देवाला हे माहित आहे की इतर जण तुम्हाला ख्रिस्तामुळे वाईट वागणुक देतील. 4 हे लक्षात असू द्या की जेव्हा आम्ही तुमच्याबरोबर उपस्थित होतो, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगत होतो की इतर जण आपल्याशी वाईट वागतील. आणि पाहा हे असे घडले. 5 याच कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवत आहे, अशासाठी की मला हे कळकळीने जाऊन घ्यायचे आहे तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवून आहात की नाही. मला याचे भय वाटत आहे, सैतान, जो आपल्याला मोहात पाडण्यासाठी कारणीभूत ठरतो, तोच तुमचा देवावरील विश्वास कमी होण्यास कारणीभूत ठरला आहे काय? जर असे असेल तर आम्ही केलेले सर्व श्रम व्यर्थ होतील.

6 परंतु तुमच्यापासून तीमथ्य हा नुकताच परतला आहे, आणि त्याने आम्हास चांगली बातमी सांगितली आहे की, ज्या ख्रिस्तावर तुम्ही प्रेम करता त्याच्या वरील तुमचा विश्वास अजून कमी झाला नाही. त्याने आणखी आम्हास सांगितले की तुम्ही सदैव आम्हास आठवणीत ठेवता, ज्याप्रकारे तुम्हास भेटण्याची आम्हांला उत्कंठा आहे, तशीच उत्कंठा तुम्हाला देखील आहे. 7 माझ्या सहविश्वासू बांधवा, जरी आम्ही लोकांच्याद्वारे इथे छळले जात आहोत, तरी आम्ही तुमच्या देवामधील विश्वासात कायम राहण्याने आमचे मन हर्षीत झाले आहे, कारण तीमथ्याने आम्हांला हे सर्व सांगितले की तुमचा देवावर विश्वास अजून आहे. 8 तर आता येशू वर भक्कम विश्वास ठेवण्याच्या द्वारे आपण नवीन जीवन जगत आहोत. 9 तर देवाने जे काही केले त्यासाठी आपण देवाला कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहेत. आम्ही आमच्या देवाची प्रार्थना करतो तेव्हा तुमच्यासाठी मोठा आनंद करतो. 10 आम्ही सतत आणि कळकळीने देवाला विनंती करतो की आम्ही तुम्हास भेटू शकू जेणेकरून आम्ही तुम्हास ख्रिस्तावर अधिक दृढ विश्वास ठेवण्यास मदत करू शकू.

11 आम्ही देव आमचा पिता आणि प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करीत आहोत, अशासाठी की ते आम्हास तुमच्याकडे येण्यास सक्षम करतील. 12 तुमच्यासाठी, आम्ही प्रार्थना करतो की प्रभू येशू तुम्हाला एकमेकांना आणि इतरांनाही अधिकाधिक प्रेम करायला मदत करणार, ज्या प्रकारे आम्ही अधिकाधिक तुमच्याप्रती प्रेमळ आहोत. 13 आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता जवळ प्रार्थना करतो की, तुम्ही त्याला अधिकाधिक हर्षविणारे बना. आम्ही अशीही प्रार्थना करतो की तुम्ही अगदी देवासारखे व्हावे याकरिता तो तुम्हास सक्षम करेल, अशासाठी की कोणीही तुम्हास दोष लावू नये. म्हणजे आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह पृथ्वीवर येईल त्यावेळेस, तो तुमच्याबरोबर आनंदीत होईल.

Chapter 4

1-2 आता, माझ्या सहविश्वासू बांधूनो, मला इतर काही गोष्टींबद्दल लिहायचे आहे. मी तुम्हास विनंती करतो आणि जेव्हा मी विनंती करतो तेव्हा, येशू ख्रिस्त स्वत: विनंती करतो असे ते आहे, अशासाठी की तुम्ही देवाला संतुष्ट करणारे जीवन जगा. आम्ही तुम्हांला तसे करण्यास शिकवले कारण प्रभू येशूने आम्हास तसे बोलण्यास सांगितले. आम्हांला माहित आहे की तुम्ही आपले जीवन त्याप्रकारे चालवित आहात, परंतु आम्ही अधिक आग्रह करतो की त्यामध्ये तुमची आणखी वाढ व्हावी.

3 देवाची इच्छा आहे की त्याला दर्शविणारे जीवन जगताना जे पुर्णपणे त्याच्याशी संबंधित आहेत, त्यात तुम्ही कोणत्याही प्रकारचे पाप करू नये. त्याची अशी इच्छा आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचे जारकर्म करू नये. 4 म्हणजेच, आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या पत्नीबरोबर कसे जगावे हे जाणून घ्यावे अशी त्याची इच्छा आहे, अशाने तुम्ही तिचा आदर करणार आणि तिच्या विरुध्द पाप करणार नाही. 5 तुम्ही फक्त आपल्या वासनायुक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचा वापर करू नये, ( ज्या प्रकारे यहूदी लोक करतात, कारण त्यांना देव काय आहे हे माहित नाही). 6 देवाची इच्छा आहे की, तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावे, यासाठी की आपल्यापैकी कोणीही आपल्या सोबतच्या विश्वासणाऱ्या बंधू किंवा भगिनींविरुध्द अशा वाईट गोष्टी करून फायदा घेता कामा नये. हे नेहमी लक्षात ठेवा की आम्ही तुम्हाला पूर्वीच ताकीद दिली होती की, जो कोणी जारकर्म करतो त्याला येशू ख्रिस्त शिक्षा दिल्या वाचून राहणार नाही. 7 जेव्हा देवाने आम्हांला विश्वासी म्हणून निवडले, तेव्हा त्याने अशी इच्छा होती की आपण शरीर वासनेच्या अनैतिक मार्गाने वागू नये. त्याउलट, त्याची अशी इच्छा आहे की आपण असे पाप करणारे लोक बनू नये. 8 म्हणून मी तुम्हाला ताकीद देतो की ज्यांनी माझ्या या शिकवणीकडे दुर्लक्ष केले आहे ते फक्त माझ्याकडे दुर्लक्ष करीत नाही, एका मनुष्याप्रमाणे, याउलट, ते देवाला नाकारत आहेत, कारण देवाने ती आज्ञा दिली आहे. लक्षात ठेवा की जे पाप करत नाहीत त्याच्यामध्ये देव त्याचा आत्मा पाठवतो, अशासाठी की त्याने तुमच्यामध्ये राहावे.

9 मी तुम्हाला पुन्हा एकदा उत्साहित करू इच्छितो की तुम्ही आपल्या बांधवांवर प्रेम करावे. ह्यासाठी तुम्हाला कोणी लिहिलेच पाहिजे ह्याची गरज नाही, कारण देवाने आधीच तुम्हाला शिकवले आहे की एकमेकांवर कसे प्रेम करावे, 10 आणि तुम्ही दाखवत आहात की तुम्ही तुमच्या बांधवांवर प्रेम करत आहा, जे तुमच्या कार्यक्षेत्राखाली मासेदोनिया प्रांतात राहतात. तरीसुद्धा, माझ्या सहविश्वासू बंधूनो, आम्ही एकमेकांना अधिक आणि अधिक प्रेम करावे ह्यासाठी मी आपल्याला प्रोत्साहित करतो. 11 मी तुम्हास आणखी विनंती करतो की, तुम्ही स्वत: च्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावा असा आग्रह करतो आणि इतरांच्या घडामोडी मध्ये पडू नका. आम्ही आपणास आपल्या स्वतःच्या व्यवसायावर कार्य करण्यास प्रोत्साहित करतो, अशासाठी की जगण्यासाठी जे तुम्हास आवश्यक आहे ते तुम्ही कमवावे. लक्षात ठेवा की आम्ही पूर्वी अशा प्रकारे जगावे यासाठी आपल्याला शिकवले होते. 12 जर तुम्ही या गोष्टी करता तर अविश्वासू लोक हे मान्य करतील की तुम्ही नीट वर्तन केले, आणि ह्याप्रकारे तुम्हास लागणाऱ्या गोष्टींसाठी कोणावर अवलंबून रहावे लागणार नाही.

13 माझ्या सहविश्वासू बांधवांनो, आपण हेही समजावे की, आता मरण पावलेल्या आपल्या बंधूभगिनींचे काय होईल. जे अविश्वासणारे आहेत, त्यांच्या सारखे तुम्ही होता कामा नये. ते मरण पावलेल्या लोकांसाठी सखोल दुःख करतात, कारण त्यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांना पुन्हा जीवन नाही असे त्यांना वाटते. 14 आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी येशू मेला हे माहित आहे आणि तो पुन्हा मरण्यातून उठेल हे ही माहित आहे. त्यामुळे आपल्याला हे देखील ठाऊक आहे की देव पुन्हा येशूमध्ये जिवंत होण्यासाठी सामील झालेल्यांना कारणीभूत ठरेल, आणि त्याद्वारे तो त्यांना येशू सोबत परत आणणार. 15 मी हे जे काही सांगत आहे, ते प्रभू येशूने ते मला प्रकट केले म्हणून मी ते तुम्हास लिहित आहे. तुमच्यातील काही जणांना असे वाटते की प्रभू येशू परत येणार तेव्हा, आम्ही विश्वासी जे जगत आहोत, ते जे आधीच मेलेले त्यांच्याआधी येशूला लवकरच भेटणार, हे खचितच सत्य नाही. 16 मी हे अशासाठी लिहत आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त जो स्वत: स्वर्गातून खाली येईल तेव्हा. तो आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना पुनरूत्थानासाठी(मरणातून उठण्यासाठी) आज्ञा देईल. आद्यदेवदूत मोठ्याने ओरडतील आणि दुसरे देवदूत देवासाठी कर्णा वाजवतील. मग जे पहिली गोष्ट होईल ते अशी की जे लोक ख्रिस्तामध्ये सामील झाले आहेत ते पुन्हा जिवंत होतील. 17 त्यानंतर देव सर्व त्या विश्वासणाऱ्यांस वर ढगात घेऊन जाईल, जे ह्या पृथ्वीवर अजूनही जगत आहेत. तो आम्हांला आणि त्या सर्व विश्वासणाऱ्यांना आकाशात घेऊन जाईल जे मरण पावले आहेत जेणेकरून आम्ही सर्वांनी एकत्रितपणे स्वर्गात प्रभू येशूला भेटू. याचा परिणाम म्हणून, आम्ही सर्व त्याच्याबरोबर कायमस्वरूपी राहू. 18 कारण हे सर्व सत्य आहे, त्यासाठी तुम्ही एकमेकांना ह्या शिक्षणाद्वारे उत्तेजन देऊन एकमेकांना प्रोत्साहन द्या.

Chapter 5

1 माझ्या विश्वासातील बंधूंनो, प्रभू येशू परत येईल त्या वेळेबद्दल मी तुम्हास आणखी सांगावे अशी माझी इच्छा आहे, खचित, ह्या बद्दल मी तुम्हास लिहावे ह्याची काही गरज नाही, 2 कारण तुम्हास स्वत: अचूकपणे आधीच ह्याबद्दल माहित आहे‍! तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशू अनपेक्षितपणे परत येईल. लोक त्याची अपेक्षा करणार नाही, ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी जेव्हा एखादा चोर येतो तेव्हा कोणीही अपेक्षा करीत नाही. 3 "भविष्यात काही काळ लोक म्हणतील, "सगळे शांत आहे आणि आम्ही सुरक्षित आहोत!" ज्या प्रमाणे एक प्रसूत होणारी स्त्री त्या वेदनांचा अनुभव घेते, ते तिच्याच्याने थांबवल्या जाऊ शकत नाहीत, त्याच प्रकारे अचानक देव त्यांना कठोरपणे शिक्षा करण्यासाठी येईल. त्या लोकांना देवापासून वाचण्याचा कोणताही मार्ग नसेल. 4 परंतु विश्वासातील माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही अशातले नाही जे काळोखात राहतात, कारण देवाविषयीचे सत्य तुम्ही जाणता. म्हणून जेव्हा येशू परत येईल, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तयार असाल. 5 तुम्ही प्रकाशाशी, दिवसाशी संबंधित आहा. अंधाराचे, जे काळोखाचे आहेत त्यांच्यासारखे तुम्ही नाही. 6 तर विश्वासणाऱ्यांनी ज्या गोष्टी घडत आहेत, त्या संबंधाने सतर्क राहायला हवे. आपण स्वत: ला नियंत्रणाखाली आणावे आणि येशूच्या येण्याकरिता तयार असणे आवश्यक आहे. 7 रात्रीच्या वेळी लोक झोपतात आणि काय होत आहे हे त्यांना माहिती नाही, आणि रात्रीच्या वेळीच लोक दारू पितात. 8 परंतु आम्ही विश्वासणारे दिवसाची प्रजा आहोत, म्हणून आपण स्वत:ला ताब्यात ठेवू. आपण सैनिकांसारखे होऊया; ज्या प्रकारे ते आपल्या छातीचा बचाव चिलखताने करतात, त्याच प्रकारे ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आणि त्याच्यावर प्रेम करण्याने आपण स्वत:स संरक्षित करू या. ज्या प्रकारे ते आपल्या डोक्याचे संरक्षण शिरस्त्राण घालून करतात, त्याच प्रकारे सैताना पासून ख्रिस्त आम्हास तारेल ह्या आशेने आपण स्वत:स संरक्षीत करूया.

9 जेव्हा देवाने आपल्याला निवडले, त्याने आपल्यासाठी अशी योजना केली नाही की आपण शिक्षेस पात्र असणाऱ्या लोकांतील असावे. त्याउलट, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे काही केले आहे त्यावर आम्ही भरवसा ठेवल्याच्याद्वारे, त्याने आमचा बचाव करण्याचा निश्चय केला आहे. 10 आमच्या पापांसाठी प्रायश्चित म्हणून येशू मरण पावला अशासाठी की आपण जरी जिवंत राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जेव्हा तो पृथ्वीवर परत येईल एकत्र राहू शकू. 11 कारण तुम्हाला माहिती आहे की हे सत्य आहे, ह्यासाठी एकमेकांना प्रोत्साहन देत चला, ज्या प्रकारे तुम्ही आता करत आहा.

12 माझ्या विश्वासातील बंधूंनो, आम्ही अशी विनंती करतो की आपण आपल्यासाठी कठोर परिश्रम घेतात असे पुढारी तुम्ही ओळखा. याचा असा अर्थ होतो की जे तुमचा विश्वासी बंधू म्हणून पुढारी आहेत, त्यांना प्रभू येशूमध्ये सामील होण्यासाठी आपण त्यांचा आदर करावा, असे पुढारी जे तुम्हास काय वाईट आहे त्याबद्दल सावध करतात. 13 आम्ही अशी विनंती करतो की, तुम्ही त्यांना प्रेम करता म्हणून त्यांचा आदर करता आणि ते तुमची मदत करण्यास कठोर परिश्रम घेतात. आणि आम्ही आणखी विनंती करतो की तुम्ही एकमेकांशी शांततेत जगावे.

14 माझ्या विश्वासातील बंधूंनो, जे विश्वासी कामाच्या ऐवजी दुसऱ्यांनी दिलेल्या गोष्टींबद्दल मार्गातून भटकतात, त्यांच्यापासून सावध रहा. आम्ही आणखी अशी विनंती करतो की, जे भयभीत आहेत त्यांना प्रोत्साहीत करा, आणि कोणत्याही प्रकारे दुर्बल असणाऱ्या सर्वांना मदत करा, आणि सर्वांबरोबर धीराने रहा. 15 ज्यांनी तुमच्याप्रती वाईट केले आहे, त्यांच्या करता तुमच्यातील कोणीही वाईट कृत्ये करणार नाही ह्याची खात्री करा. त्याउलट, आपण नेहमी एकमेकांना आणि इतर प्रत्येकासाठी चांगली कामे करण्याचा प्रयत्न करावा.

16 सर्वदा आनंदीत रहा, 17 निरंतर प्रार्थना करा, 18 आणि सर्व परिस्थितीत देवाचे आभार माना. येशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी केले त्या कारणास्तव देवाची अशी इच्छा आहे की आपण असे वागावे.

19 देवाच्या आत्म्याला तुमच्यामध्ये काम करण्यापासून रोखू नका. 20 उदाहरणार्थ, पवित्र आत्म्याने कोणास सांगितलेल्या गोष्टींचा तिरस्कार करू नका. 21 उलट, अशा सर्व संदेशांचे मूल्यमापन करा. जे भाग चांगले आहेत ते स्विकार आणि त्यांचे पालन करा. 22 कोणत्याही प्रकारचे वाईट संदेश ऐकू नका.

23 देव तुम्हाला शांती देवो आणि तुम्हास निर्दोष असे करो, अशासाठी की तुम्ही पाप करू नये. आपला प्रभू येशू ख्रिस्त परत पृथ्वीवर येईपर्यंत तो तुम्हास पाप करण्यापासून राखून ठेवो. 24 कारण देवाने तुम्हाला त्याचे लोक म्हणून निवडले आहे, आपण त्या प्रकारे मदत करण्यास सतत त्याच्यावर विश्वास ठेवू शकता.

25 माझ्या विश्वासातील बंधूंनो, माझ्यासाठी, तीमथ्यासाठी, आणि सिल्वानासाठी, प्रार्थना करा. 26 जेव्हा तुम्ही विश्वासू म्हणून एकत्र जमता, तेव्हा एकमेकांना प्रेमाने अभिवादन करा, ज्या प्रकारे विश्वासी करतात. 27 मी तुम्हाला प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा. 28 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर असो.