मराठी: Unlocked Dynamic Bible - Marathi

Updated ? hours ago # views See on DCS

John

Chapter 1

1 प्रारंभी शब्द होता. शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता. 2 देवाने कोणतीही गोष्ट निर्माण करण्यास सुरवात करण्याआधीपासूनच तो त्याच्याबरोबर होता. 3 हा तोच आहे ज्याने प्रत्येक गोष्ट निर्माण करण्याची देवाची आज्ञा पाळली आहे!—होय, जी प्रत्येक गोष्ट निर्माण केली गेली होती.

4 सर्व जीवन त्या शब्दात आहे, म्हणून तो प्रत्येकाला आणि प्रत्येक गोष्टीला जीवन देऊ शकत होता. तो शब्द देवाचा प्रकाश होता, जो प्रत्येकावर आणि प्रत्येक ठिकाणी प्रकाशीत झाला. 5 हा प्रकाश अंधकारात प्रकाशीत झाला, आणि अंधकाराने त्याला बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तसे करू शकला नाही.

6 देवाने योहान नावाच्या एका मनुष्याला पाठवले. 7 तो प्रकाशाविषयी लोकांना साक्ष देण्यासाठी आला होता. प्रत्येकाने विश्वास ठेवावा म्हणून त्याने त्या संदेशाची घोषणा केली, आणि जे काही तो बोलला ते खरे होते. 8 योहान स्वतः तो प्रकाश नव्हता, परंतु तरी त्या प्रकाशाविषयी लोकांना सांगण्यासाठी तो आला होता.

9 जो खरा प्रकाश जगात येणार होता, आणि जो प्रत्येकाला प्रकाशीत करतो, तो हाच होता.

10 तो शब्द जगात होता, आणि त्याने जग निर्माण केले असले तरी, तो कोण होता हे त्यातील लोकांनी ओळखले नाही. 11 त्याच्या स्वतःच्या मालकीच्या जगात, आणि जे यहूदी त्याचे स्वतःचे लोक आहेत त्यांच्याकडे तो आला, तरी त्यांनी त्याला नाकारले.

12 परंतु जे सर्व त्याला आपल्या जीवनात घेतात आणि त्याच्यावर भरवसा ठेवतात, त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार त्याने दिला आहे. 13 देवापासून जन्मलेली ही मुले आहेत. ते एक सामान्य मानवी जन्म किंवा एका मनुष्याची इच्छा किंवा निवड किंवा एका पतीचा पिता बनण्याची इच्छा होती म्हणून ते या अर्थाने जन्मलेले नाहीत.

14 आता शब्द प्रत्यक्ष मानव झाला आणि जेथे आम्ही थोड्या काळासाठी राहत आहोत तेथे राहिला आहे. जो देव आम्हावर विश्वासूपणे प्रीती करतो आणि त्याच्या सत्यतेविषयी आम्हाला शिकवतो, हे दर्शवणाऱ्या पित्याच्या एकमात्र पुत्राचे भव्य आणि अप्रतिम स्वभावाचे दर्शन घडवतांना आम्ही त्याला पाहीले आहे.

15 एके दिवशी बाप्तिस्मा करणारा योहान त्या शब्दाविषयी लोकांना सांगत होता, आणि येशू त्याच्याकडे आला. योहान त्याच्या सभोवार असलेल्या लोकांच्या लोकसमुदायाला ओरडून म्हणाला, “कोणीतरी माझ्या मागून येत आहे, कोणीतरी जो माझ्या पेक्षा खूप महत्वाचा आहे, हे मी तुम्हाला सांगतो. तो माझा जन्म होण्याआधी, सार्वकालीक युगांपासून अस्तित्वात होता. हा मनुष्य येथे आहे! हाच तो मनुष्य आहे, मी ज्याच्या विषयी बोलत होतो!”

16 त्याने जे काही केले त्यातून आपल्या सर्वांचा खूप फायदा झाला आहे. पुन्हा आणि पुन्हा, त्याने आमच्याशी अत्यंत दयाळूपणे वर्तन केले आहे. 17 मोशेने यहूदी लोकांना देवाच्या नियमशास्त्राची घोषणा केली. देवाचे सत्य येशू ख्रिस्ताने आपल्याला उदारतेणे शिकवले आहे. 18 देवाला कोणीही कधीच पाहीले नाही. परंतु देवाचा एकुलता एक पुत्र, येशू ख्रिस्त जो नेहमीच आपल्या पित्याच्या जवळ असतो, त्याने आपल्याला त्याची ओळख करून दिली आहे.

19 योहानाने त्याची साक्ष दिली ती ही आहे: यहूद्यांनी यरूशलेमहून याजक आणि लेवी ह्यांना पाठवले; “तू कोण आहेस?” असे विचारण्यासाठी ते योहानाकडे आले. 20 मग योहानाने त्यांना साक्ष दिली आणि म्हटले, “मी ख्रिस्त नाही!” 21 मग त्यांनी त्याला विचारले, “मग आपण स्वतःबद्दल काय म्हणता? तुम्ही एलिया आहात काय?” तो म्हणाला, “नाही.” त्यांनी पुन्हा विचारले, “संदेष्ट्यांनी सांगितल्यानुसार जो येणारा संदेष्टा तो आपणच आहात काय?” योहानाने उत्तर दिले, “नाही.”

22 मग पुन्हा एकदा त्यांनी त्याला विचारले, “मग आपण कोण असल्याचा दावा करता? आम्हाला सांगा म्हणजे ज्यांनी आम्हाला पाठवले आहे त्यांना आम्ही जाऊन सांगू. आपण स्वतःबद्दल काय म्हणता?” 23 यशया संदेष्ट्याने लिहिल्याप्रमाणे त्याने उत्तर दिले, “प्रभूचे आमच्याकडे येणे होण्यासाठी चांगला मार्ग तयार करा, असे अरण्यात ओरडणारा मी एक आहे.’”

24 त्यांच्यापैकी काही लोक परूश्यांकडून योहानाकडे आले. 25 त्यांनी त्याला विचारले, “आपण ख्रिस्त नाही, एलिया किंवा संदेष्टा नाही, असे आपण म्हणता, मग तुम्ही बाप्तिस्मा का करता?”

26 योहानाने उत्तर दिले, “मी पाण्याने लोकांचा बाप्तिस्मा करतो, मात्र आता येथे ज्याला तुम्ही ओळखत नाही असा कोणीतरी तुम्हामध्ये उभा आहे. 27 तो माझ्यामागून येत आहे, मात्र त्याच्या जोड्यांचे बंद सोडण्यास देखील मी पुरेसा महत्वाचा नाही.”

28 यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या भागातील बेथानी गावात ह्या गोष्टी घडल्या. योहान याच ठिकाणी बाप्तिस्मा करत होता.

29 दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला त्याच्याकडे येतांना पाहिले. तो लोकांना म्हणाला, “पाहा! जगाचे पाप काढून टाकण्यासाठी, आपल्या स्वतःच्या जिवनाचे बलिदान म्हणून अर्पण करणारा देवाचा कोकरा. 30 ‘कोणीतरी माझ्या मागून येत आहे, तो माझ्या पेक्षा कोणीतरी खूप महत्वाचा आहे’ कारण तो माझा जन्म होण्याआधी, सार्वकालीक युगांपासून अस्तितवात होता’ असे मी ज्याच्या विषयी बोललो होतो, तोच हा आहे. 31 प्रथम मी त्याला ओळखत नव्हतो, मात्र आता तो कोण आहे हे मला ठाऊक आहे. ज्यांना त्यांच्या पापांबद्दल दुःख वाटते आणि जे त्यापासून वळतात त्यांना मी येऊन पाण्याने बाप्तिस्मा द्यावा एवढेच माझे काम होते. तो कोण आहे हे इस्राएल लोकांनी ओळखावे अशी माझी इच्छा आहे.”

32 योहानाने काय पाहिले ते आम्हाला सांगणे हे त्याचे काम होते. तो अशाप्रकारे बोलला, “मी देवाच्या आत्म्याला कबूतराच्या रूपात त्याच्यावर उतरतांना पाहिले. आत्मा खाली आला आणि येशूवर राहिला. 33 अगदी प्रथम, मी स्वतः त्याला ओळखत नव्हतो, परंतु ज्या लोकांनी आपल्या पापी मार्गापासून वळायचे आहे असे म्हटले आहे, त्या लोकांना पाण्याने बाप्तिस्मा देण्यासाठी देवाने मला पाठवले आहे. देवाने मला सांगितले, ‘माझा आत्मा ज्या मनुष्यावर उतरतांना आणि त्याच्यावर राहतांना पाहशील हाच तो एक असेल जो तुम्हा सगळ्यांना पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देईल.’ 34 तो देवाचा पुत्र आहे हे मी पाहिले आहे आणि तुम्हाला त्याची साक्ष दिली आहे.

35 बाप्तिस्मा करणारा योहान त्याच्या शिष्यांतील दोन शिष्यांसोबत दुसऱ्या दिवशीही पुन्हा त्याच ठिकाणी होता. 36 येशूला जवळून जातांना त्याने पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “हा पाहा! देवाचा कोकरा, आपल्या पापांची खंडणी म्हणून इस्राएलाच्या लोकांद्वारे एका कोकऱ्याला ठार करण्यात येते तसेच हा देवाचा कोकरा, ज्या मनुष्याला देवाने त्याचे जीवन देण्यासाठी नियुक्त केले!”

37 योहानाच्या दोन शिष्यांनी, योहानाला हे बोलतांना ऐकले, तेव्हा ते योहानाला सोडून त्याच्या मागे गेले. 38 येशू मागे फिरला आणि त्यांना आपल्यामागे येतांना पाहिले, आणि त्याने त्यांना विचारले, “तुम्ही काय शोधत आहात?” ते त्याला म्हणाले “रब्बी (ज्याचा अर्थ गुरूजी), आपण कोठे राहता ते आम्हाला सांगा.” 39 त्याने उत्तर दिले, “माझ्याबरोबर या आणि तुम्ही पाहा!” मग ते आले आणि फार उशीर होत होता म्हणून, ते त्याच्याबरोबर थांबले आणि येशू कोठे राहतो हे त्यांनी पाहिले. (जवळपास 4 वाजेची ती वेळ होती).

40 येशूच्या मागे आलेल्या त्या दोन शिष्यांपैकी एका शिष्याचे नाव अंद्रिया होते; तो शिमोन पेत्राचा भाऊ होता. 41 अंद्रिया प्रथम आपला भाऊ शिमोनाला शोधण्यासाठी गेला. तो त्याच्याकडे आला असता, तो म्हणाला, “आम्हाला मसीहा (ज्याचा अर्थ ख्रिस्त) सापडला आहे!” 42 अंद्रियाने शिमोनास येशूकडे आणिले. येशूने पेत्राकडे न्याहाळून पाहिले, आणि म्हणाला, “तू शिमोन आहेस. तुझ्या पित्याचे नाव योहान आहे. तुला केफा हे नाव दिले जाईल.” केफा हे एक अरामीक नाव आहे, त्याचा अर्थ ‘मजबूत खडक.’ (पेत्राचा ग्रीकमध्ये अर्थ देखील असाच आहे.)

43 दुसऱ्या दिवशी येशूने यार्देन नदीच्या खोऱ्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तो गालील प्रांताच्या सभोवतालच्या प्रदेशात गेला आणि फिलिप्प नावाचा एक मनुष्य त्याला आढळला. येशू त्याला म्हणाला, “माझ्या बरोबर ये.” 44 फिलिप्प, अंद्रिया आणि पेत्र हे सर्व बेथसैदा गावातील होते (गालीलातील). 45 मग फिलिप्प त्याचा मित्र नथनेल याला शोधण्यासाठी गेला. तो त्याच्याकडे आला असता, तेव्हा तो म्हणाला, “मोशेने ज्या ख्रिस्ताविषयी लिहिले आहे, तो एक आम्हाला सापडला आहे. तो येईल असे जे संदेष्ट्यांनी भाकीत केले होते. येशू हा ख्रिस्त आहे. तो नासरेथ या गावाचा आहे. त्याच्या पित्याचे नाव योसेफ आहे.”

46 नथनेलाने उत्तर दिले, “नासरेथामधून? नासरेथामधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय?” फिलिप्पाने उत्तर दिले, “ये आणि तुला दिसेल!” 47 जेव्हा येशूने नथनेलास जवळ येतांना पाहिले, तेव्हा त्याला भेटण्या अगोदरच त्याने नथनेलाचे असे वर्णन केले, “प्रामाणिक आणि उत्तम असा एक इस्राएली येथे आहे! तो कोणालाही कधीच फसवत नाही!” 48 नथनेलाने त्याला विचारले, “मी कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे हे आपणास कसे समजले? आपण मला ओळखत नाही.” येशूने त्याला उत्तर दिले, “तुला फिलिप्पाने बोलावले त्यापूर्वी, तू स्वतः अंजिराच्या झाडाखाली बसला असता, तेव्हा मी तुला पाहिले आहे.”

49 मग नथनेलाने जाहीर केले, “गुरूजी, देवाचे पुत्र आपणच असले पाहीजे! ज्याची आम्ही वाट पाहात आहोत ते इस्राएलाचे राजे आपण आहात!” 50 येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले आहे असे तुला सांगितले म्हणून एवढ्यावरूनच तू माझ्यावर विश्वास ठेवतोस काय? तू मला ह्याच्यापेक्षा अतिशय महान गोष्टी करताना मला पाहशील!” 51 मग येशू म्हणाला, “मी तुला सत्य सांगत आहे: तुमचा पूर्वज याकोब याने फार काळापूर्वी दृष्टांत पाहिला होता अगदी तसेच, एखाद्या दिवशी तुम्ही स्वर्ग उघडलेला पहाल, आणि देवाचे देवदूत वर चढताना आणि खाली माझ्यावर, म्हणजे मनुष्याच्या पुत्रावर उतरत असतांना तुम्ही पहाल.”

Chapter 2

1 तिसर्‍या दिवशी गालील प्रातांतील, कानामध्ये एक लग्नसमारंभ होता. येशूची आई तेथे होती. 2 येशू आणि त्याच्या शिष्यांना देखील त्यांनी त्या लग्नाचे आमंत्रण दिले होते.

3 लग्नात उपस्थित असणाऱ्यांना त्यांनी द्राक्षारस वाढला आणि त्यांच्याकडे जेवढा द्राक्षारस होता तो सर्व ते प्याले. येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांचा द्राक्षारस संपला आहे.” 4 येशू तिला म्हणाला, “बाई, त्याच्याशी माझा काय संबंध? माझे अगदी महत्वाचे कार्य सुरू करण्याची निवडलेली वेळ अजून आलेली नाही.” 5 येशूची आई मागे वळून आणि नोकरांना म्हणाली, “तो जे काही तुम्हाला सांगेल ते करा.”

6 तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण होते. ते यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे पाहूणे आणि नोकरांना त्यांचे हात आणि पाय धूता यावे, म्हणून ते त्यामध्ये पाणी भरून ठेवत असत. प्रत्येक रांजणात 75 ते 115 लीटर इतके पाणी भरू शकत होते. 7 येशूने नोकरांना सांगितले, “रांजण पाण्याने भरा!” मग त्यांनी ते रांजण काठोकाठ भरले. 8 मग त्याने त्यांना सांगितले, “रांजणामधून थोडे पाणी काढा आणि भोजन कारभार्‍याकडे घेऊन जा.” मग नोकरांनी तसे केले.

9 भोजन कारभार्‍याने पाणी चाखले, तेच आता द्राक्षारस झाले होते. हा द्राक्षारस कोठून आला हे नोकरांना माहित होते तरी त्याला माहित नव्हते. म्हणून त्याने वराला आपल्याकडे बोलावले. 10 “प्रत्येकजण प्रथम सर्वोत्कृष्ट द्राक्षारस वाढतो, आणि जेव्हा पाहूणे यथेच्छ पिऊन झाल्यावर व सर्वात उत्तम द्राक्षारस संपतो, तेव्हा तो कमी दर्जाचा द्राक्षारस वाढतो. परंतु तू तर उत्तम दर्जाचा द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस.”

11 येशूचे सत्य सूचित करणारा हा एक, येशूने केलेला पहिला चमत्कार होता. जो त्याने गालील प्रांतातील काना गावामध्ये केला. तो अद्भुत गोष्टी करू शकतो हे तेथे त्याने दाखवून दिले. म्हणून त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला.

12 या नंतर येशू आणि त्याची आई व त्याचे भाऊ, त्याच्या शिष्यांसह, खाली कफर्णहूम शहराकडे गेले, आणि ते काही दिवस तेथे राहिले.

13 आता जवळपास यहूद्यांच्या वल्हांडण सणाच्या उत्सवाची वेळ आली होती. येशू आणि त्याचे शिष्य वर यरूशलेमेकडे गेले. 14 तेथे मंदिराच्या अंगणात त्याने माणसांना गुरे, मेंढरे आणि पारवे विकतांना पाहिले. ज्यांना मंदिरात अर्पणे करायची आहेत त्यांना प्राणी विकले जात होते. मेजाभोवती बसून मंदिरातील नाणे विकनाऱ्या पुरुषांना देखील त्याने पाहिले.

15 मग येशूने चामड्याच्या दोरी पासून एक चाबूक तयार केला आणि मंदिरातून मेंढरे आणि गुरे ढोरे बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला. त्याने नाण्यांची अदला बदल करणाऱ्यांचे मेज पालथे केले, आणि त्यांची नाणी जमिनीवर विखरून टाकली. 16 पारवे विकणाऱ्यांना त्याने धमकावले, “ह्या पारव्यांना येथून बाहेर काढा! माझ्या पित्याच्या घराला बाजारपेठ बनवू नका!”

17 ह्या विषयी फार काळापूर्वी कोणी एकाने शास्त्रवचनात लिहून ठेवले होते, “हे देवा, मी तुझ्या घरावर खुप प्रीती करतो, त्याच्यासाठी मी मरेन” हे त्याच्या शिष्यांना आठवले.

18 यहूदी पुढाऱ्यांनी त्याला विचारले, “तुम्ही जे काही करत आहात ते करण्यासाठी देवाने तुम्हाला परवानगी दिली आहे हे आम्हाला सिद्ध होण्यासाठी तुम्ही कोणता चमत्कार करू शकता?” 19 येशूने त्यांना उत्तर दिले, “हे मंदिर मोडून टाका आणि मी ते तीन दिवसात पुन्हा बांधेन.”

20 त्यांनी त्याला विचारले “हे संपूर्ण मंदिर तुम्ही केवळ तीनच दिवसात पुन्हा उभारणार असे तुम्ही म्हणत आहात काय?” “ह्या मंदिराला बांधण्यासाठी शेहचाळीस वर्षे लागले.” 21 तथापि, येशू ज्या मंदिराविषयी बोलला ते तो मंदिराच्या इमारती विषयी नाही, तर त्याच्या स्वतःच्या शरीराविषयी बोलत होता. 22 नंतर येशूचा मृत्यू झाल्यावर देवाने त्याला मरणातून उठवले, तेव्हा मंदिराविषयी तो काय म्हणाला होता, हे त्याच्या शिष्यांना आठवले. येशू स्वतः काय बोलला होता आणि शास्त्रवचन ह्या दोघांनी जे काही म्हटले होते त्यावर त्यांनी विश्वास ठेवला.

23 येशू वल्हांडण सणाच्या वेळी यरूशलेममध्ये होता तेव्हा, पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला कारण येशूचे सत्य दाखवणारे चमत्कार त्यांनी पाहिले होते. 24 तरीसुद्धा, लोकांना काय आवडते हे येशूला ठाऊक होते, आणि तो त्यांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता म्हणून त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. 25 ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत, असे त्याला कोणीतरी सांगण्याची त्याला आवश्यकता नव्हती. त्याला त्यांच्याविषयी सर्वकाही ठाऊक होते.

Chapter 3

1 निकदेम नावाचा एक मनुष्य तेथे होता. तो त्या दिवसातील यहूदी विश्वासातील एक अतिशय कट्टर गटाच्या, परूश्यांचा एक सभासद होता. एका उच्च यहूदी शासन करणाऱ्या समितीचा तो एक महत्वाचा सभासद होता. 2 रात्रीच्या समयी तो येशूला भेटण्यासाठी गेला. तो येशूला म्हणाला, “गुरूजी, तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे. कारण देवाने मदत केल्याशिवाय तुम्ही करता तसे चमत्कार कोणीही करू शकत नाही हे आम्हाला ठाऊक आहे.”

3 निकदेम जे काही म्हणाला त्याला येशूने उत्तर दिले, “मी तुम्हाला सत्य सांगत आहे, कोणीही पुन्हा जन्म घेतल्याशिवाय तो देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही.” 4 मग निकदेम त्याला म्हणाला, “वृद्ध झालेला एक व्यक्ती पुन्हा जन्म कसा घेऊ शकेल? कोणालाही आपल्या आईच्या उदरात पुन्हा प्रवेश करने आणि दुसऱ्यांदा जन्म घेणे शक्य होणार नाही!”

5 येशूने उत्तर दिले, “मी खात्री देतो, जोपर्यंत पाणी आणि आत्मा ह्या दोघांपासून जन्म घेतल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही, हे देखील खरे आहे.” 6 जर कोणीतरी एखादा मनुष्यापासून जन्मलेला आहे, तर तो मनुष्य मानवी आहे. परंतु देवाच्या आत्म्याच्या कार्याद्वारे जे पुन्हा जन्मले आहेत, त्यांच्या मध्ये देवाने बनवलेला एक नवीन स्वभाव असतो.

7 तुम्ही पुन्हा जन्म घ्यावा हे मी तुम्हाला सांगितले याचे आश्चर्य मानू नका. 8 ते ह्या प्रकारे आहे: वाऱ्याला पाहिजे तिकडे तो वाहतो. तुम्ही वाऱ्याचा आवाज ऐकता मात्र तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक नाही. ज्यांना आत्म्यापासून जिवंत करण्यात आले त्यांचे देखील अगदी असेच आहे: आत्मा त्याच्या इच्छेनुसार त्याला पाहिजे त्या कोणालाही नवीन जन्म देतो.”

9 निकदेमाने त्याला उत्तर दिले, “हे कसे खरे असू शकते?” 10 येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएल मधले एक महत्वाचे शिक्षक आहात, आणि असे असूनही मी काय बोललो हे तुम्हाला समजत नाही? 11 मी तुम्हास खरे तेच सांगतो, ज्या गोष्टी खऱ्या होणार आहेत त्याच आम्ही सांगतो, आणि जे काही आम्ही पाहिले आहे तेच आम्ही तुम्हाला सांगत आहोत, तरीसुद्धा तुम्हापैकी कोणीही ज्यांना आम्ही ह्या गोष्टी सांगितल्या त्यांनी आमच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही.

12 मी या पृथ्वीवरील गोष्टी विषयी तुम्हाला बोललो त्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही तर, मी तुम्हाला स्वर्गा विषयीच्या गोष्टी सांगितल्या तर त्यावर तुम्ही विश्वास कसा ठेवाल? 13 मी, मनुष्याचा पुत्र, जो स्वर्गात चढलेला केवळ मी एकटाच आहे, आणि खाली पृथ्वीवर आलेला तो केवळ मी एकटाच आहे.

14 निर्गमन च्या काळात फार काळापूर्वी मोशेने, अरण्यात विषारी सर्प एका खांबावर ऊंच केला होता, आणि ज्या लोकांनी वर त्याच्याकडे पाहिले ते सर्व वाचले होते. तसेच मनुष्याचा पुत्राला उंच केले पाहिजे. 15 म्हणून जो कोणी वर त्याच्याकडे पाहिल आणि त्याच्यावर विश्वास ठेवील त्याला सार्वकालीक जीवन मिळेल.

16 देवाने जगावर ह्या प्रकारे प्रीती केली: त्याने आपला एकमात्र पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मरणार नाही, तर त्याला सार्वकालीक जीवन मिळेल. 17 देवाने त्याच्या पुत्राला न्याय करण्यासाठी जगामध्ये पाठवले नाही, परंतु त्याच्याद्वारे वाचवण्यासाठी पाठवले आहे. 18 पुत्रावर विश्वास ठेवणाऱ्या, त्या प्रत्येकाला देव कधीही दोषी ठरवणार नाही. परंतु प्रत्येकजण जो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, देवाने त्यांना दोषी ठरवले आहे, कारण त्यांनी देवाच्या एकमात्र पुत्रावर विश्वास ठेवला नाही.

19 देवाने पापी लोकांसाठी सर्वांना पाहता येईल असा त्याचा न्याय तयार केला आहे: त्याचा प्रकाश या जगामध्ये आला, परंतु ह्या जगाच्या लोकांना त्यांचा अंधकार आवडतो आणि ते प्रकाशापासून लपतात. ते जे काही करतात ते दुष्ट आणि वाईट आहे म्हणून त्यांनी अंधकाराची आवड धरली आहे. 20 दुष्ट कृत्ये करणारा प्रत्येकजण प्रकाशाचा द्वेष करतो, कारण ते किती वाईट आहे हे प्रकाश प्रकट करतो आणि ते काय करतात हे प्रकाशच उघडकीस आणितो म्हणून ते कधिच प्रकाशाकडे येणार नाहीत. 21 परंतु जे कोणी चांगले व सत्य आचरतात ते प्रकाशाकडे येतात जेणेकरून ते जे काही करतात ते सर्वांद्वारे पाहिले जाऊ शकते आणि सर्वांना हे कळावे की ते या गोष्टी करत असता ते देवाची आज्ञा पाळत होते.

22 ह्या गोष्टी घडल्यानंतर, येशू आणि त्याचे शिष्य यहूदा प्रांतात गेले. तो आपल्या शिष्यांबरोबर काही काळ तेथेच राहिला आणि त्याने पुष्कळ लोकांचा बाप्तिस्मा केला.

23 बाप्तिस्मा करणारा योहान देखील शमरोन प्रांतातील शालिमाजवळील एनोन गावात लोकांचा बाप्तिस्मा करत होता. त्या ठिकाणी भरपूर पाणी होते, आणि म्हणून अनेक लोक योहानाकडे येत असत. 24 योहानाच्या शत्रूंनी त्याला तुरूंगात टाकण्या अगोदरची ही वेळ होती.

25 देवाला स्वीकार्य होण्यास स्वतःला धुण्याविषयी योहानाचे काही शिष्य आणि एका विशिष्ट यहूदी मनुष्य ह्यांच्यामध्ये एक वाद निर्माण झाला. 26 जे कोणी वाद करत होते ते योहानाकडे आले आणि म्हणाले, “गुरूजी, तेथे एक मनुष्य होता जो तुम्ही यार्देन नदीच्या दुसऱ्या बाजूस लोकांचा बाप्तिस्मा करत असता तो मनुष्य तुमच्या सोबत होता. तुम्ही आमच्यामधून त्याला निदर्शनास आणिले आणि तो कोण होता हे तुम्ही आम्हाला सांगितले. परंतु आता तो, यहूदामधील रस्त्याच्या पलीकडे लोकांचा बाप्तिस्मा करत आहे, आणि पुष्कळ लोक त्याच्याकडे जात आहेत.”

27 योहानाने त्यांना उत्तर दिले, “देव जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट देत नाही तोपर्यंत तो एक देखील वस्तू स्वीकार करू शकत नाही. 28 ‘मी मसीहा नाही, परंतु तो येण्याआधी त्याच्यासाठी चांगला मार्ग तयार करण्यासाठी मला त्याच्या अगोदर पाठवण्यात आले होते, मी तुमच्याशी बोलतांना हेच सत्य मी तुम्हाला सांगितले होते, हे तुम्हाला माहितच आहे.”

29 मी वराच्या मित्राप्रमाणे आहे. मी, वर येण्याची वाट पाहात तेथे उभा आहे. शेवटी वर आल्यावर त्या वराची वाणी ऐकून त्याच्या मित्राला अत्यंत आनंद होतो. म्हणूनच, हे सर्व घडले आहे कारण तो आला आहे म्हणून त्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. 30 त्याची स्थिती आणि महत्त्व ह्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होवो, आणि मी कमी आणि कमी महत्वाचा होवो.

31 येशू स्वर्गातून येतो, आणि तो इतर कोणापेक्षाही उच्चस्थानी आहे. आम्हाला पृथ्वीवर आपले घर आहे, आणि आम्ही त्याच गोष्टी बोलतो ज्या पृथ्वीच्या आहेत. जो एक स्वर्गातून येतो तो पृथ्वीवरील सर्व गोष्टी, आणि तेथे जे काही आहे त्या सर्वांच्यावर आहे. 32 आता जे त्याने ऐकले आणि पाहिले त्याची साक्ष देणारा एक येथे आहे, परंतु तो जे काही सांगतो त्याचा कोणीही स्वीकार करत नाहीत किंवा ते खरे होईल असा भरवसा ठेवत नाहीत. 33 तथापि, तो जे काही सांगतो त्यावर जे कोणी विश्वास ठेवतात, ते अशी साक्ष देतात की देव सर्व सत्याचा उगम आहे आणि तो एकटाच केवळ जे सर्वकाही सत्य आहे, त्याचे मानक आणि प्रमाण आहे.

34 देवाने त्याच्यासाठी बोलणाऱ्या मनुष्याला पाठवले, तो देवाचे वचन बोलतो, आणि तो जे काही बोलतो ते खरे आहे. आणि तो त्याचा आत्मा किती देत आहे ह्याची चिंता न करता देतो. 35 पिता पुत्रावर प्रीती करतो आणि प्रत्येक गोष्ट तो त्याच्या अधिकाराखाली ठेवतो. 36 देवाच्या पुत्रावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सार्वकालीक जीवन मिळेल. देवाच्या पुत्राचे जो कोणी आज्ञापालन करणार नाही त्याला सार्वकालीक जीवन कधीच मिळू शकत नाही, आणि त्या व्यक्तीने केलेल्या प्रत्येक पापाबद्दल देवाचा नीतिसंपन्न क्रोध त्याच्यावर सर्वकाळ राहिल.”

Chapter 4

1 येशूला परूश्यांविषयी अहवाल मिळाला. येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा जास्त लोकांचा बाप्तिस्मा करीत आहे, आणि योहानापेक्षा जास्त अनुयायी त्याला मिळत आहेत हे त्यांना आढळले. 2 परंतु बाप्तिस्मा करण्याचे काम येशू स्वतःवैयक्तीकरित्या करत नव्हता; त्याचे शिष्य ते करत होते. 3 मग येशू आणि त्याच्या शिष्यांनी यहूदा प्रांत सोडला आणि पुन्हा एकदा गालीलात परतले.

4 आता त्यांना शमरोनाच्या प्रांतातून जायचे होते. 5 मग ते शमरोन प्रांतातील सूखार नावाच्या गावात आले. सूखार हे याकोबाने फार काळापूर्वी आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते.

6 याकोबाची विहीर सूखार गावाच्या अगदी बाहेरच होती. येशू त्याच्या दूरच्या प्रवासामुळे खूप थकला होता म्हणून तो आराम करण्यासाठी त्या विहीरीच्या जवळ खाली बसला. ती दुपारची वेळ होती. 7 शमरोनामधून एक स्त्री थोडे पाणी काढण्यासाठी विहीरीकडे आली. येशू तिला म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.” 8 आता त्याचे शिष्य त्याच्या जवळ नव्हते, कारण ते जेवण विकत घेण्यासाठी गावात गेले होते.

9 ती स्त्री त्याला म्हणाली, “तुम्ही, एक यहूदी असून, एका शमरोनी स्त्रीला, पिण्यासाठी पाणी मागत आहात, ह्याचे मला आश्चर्य वाटत आहे.” 10 येशूने तिला उत्तर दिले, “देव जे दान तुला देऊ इच्छितो हे जर तू ओळखले असते आणि प्यायला दे असे मागणारा कोण आहे, हे तुला समजले असते, तर तू माझ्याकडे मागितले असते आणि मी तुला जीवनाचे पाणी दिले असते.”

11 “साहेब, ही विहीर खोल आहे, आणि विहीरीतून पाणी काढण्यासाठी बादली किंवा एक दोरी तुमच्याकडे नाही. तुम्हाला ते जीवनाचे पाणी कोठे मिळेल? 12 तुम्ही आमचा पिता याकोब ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. त्यानेच ही विहीर खणली आणि तो स्वतः त्यातून प्यायचा, जसे त्याच्या मुलांनी आणि गुरांनी केले, तीच विहीर आज आम्ही देखील वापरत आहोत.”

13 येशूने तिला उत्तर दिले, “ह्या विहीरीतून पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा तहान लागेल, 14 परंतु मी दिलेले पाणी जो कोणी पिईल तो पुन्हा तहानेला होणार नाही. मी जे पाणी देईन ते त्यांच्यामध्ये उपळत्या पाण्याचा झरा असे होईल आणि त्यांना सार्वकालीक जीवन असे होईल.”

15 ती स्त्री त्याला म्हणाली, “साहेब, मला कधीही तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.” 16 तो काय बोलत होता हे तिला समजले नाही, म्हणून येशू तिला म्हणाला, “बाई, जा आणि तुझ्या पतीला बोलव आणि त्याला येथे घेऊन ये.”

17 ती स्त्री त्याला म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “तुला पती नाही हे तू खरे बोललीस, 18 कारण तुला एक पती नव्हता, मात्र पाच होते, आणि आता ज्या पुरुषासोबत तू राहत आहेस तो ही तुझा पती नाही. पती नाही ह्या विषयी तू जे काही बोललीस ते खरे आहे.”

19 ती स्त्री त्याला म्हणाली, “साहेब, तुम्ही संदेष्टे आहात असे मला दिसत आहे. 20 यरूशलेमच ते स्थान आहे जेथे देवाची उपासना केली पाहीजे असे तुम्ही यहूदी म्हणता, परंतु ह्याच डोंगरावर आमच्या पूर्वजांनी देवाची उपासना केली. कोण बरोबर आहे?

21 येशू तिला म्हणाला, “बाई, लोक पित्याची उपासना, ह्या डोंगरावर किंवा यरूशलेमेतही करणार नाहीत अशी वेळ येत आहे, ह्या माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. 22 शमरोनातील तुम्ही लोक जे तुम्हाला माहित नाही त्याची उपासना करत आहात. तारण यहूद्यांमधूनच आहे, म्हणून आम्ही कोणाची उपासना करतो हे यहूदी उपासकांना ठाऊक आहे.

23 जे कोणी खरोखर देवाची उपासना करतात ते पित्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करतील, अशी वेळ येत आहे आणि आता आलीच आहे. अशाच प्रकारे पित्याची उपासना केली जावी म्हणून तो अशाच लोकांच्या शोधात आहे. 24 देव आत्मा आहे; आणि जे कोणी त्याची उपासना करतात त्यांनी त्याची उपासना आत्म्याने केली पाहिजे, आणि सत्याने त्यांना उपासनेत घेऊन जायला पाहिजे.”

25 ती स्त्री त्याला म्हणाली, “मसीहा, जो ख्रिस्त येणार आहे, हे मला ठाऊक आहे. तो येईल तेव्हा, जे काही आम्ही ऐकायला हवे ते सर्व तो आम्हाला सांगेल.” 26 येशू तिला म्हणाला, “आता, जो मी तुझ्याशी बोलत आहे, मी तोच आहे!”

27 त्यानंतर लगेच, त्याचे शिष्य गावातून परत आले. येशूच्या परिवाराची सभासद नसलेल्या एका स्त्री सोबत बोलत होता हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. (ते यहूदी रुढींच्या विरूद्ध होते.) असे असून देखील, “तुम्ही स्वतः ह्या स्त्री सोबत बोलून काय करत होता?” किंवा “तुम्ही तिच्याशी का बोलत आहात?” असे त्याला विचारण्याचे कोणाला धैर्य नव्हते.

28 मग त्या स्त्रीने आपली घागर तेथेच ठेवली आणि परत गावात गेली. ती गावातील लोकांना म्हणाली, 29 “मी आता पर्यंत जे काही केले ते, ज्या मनुष्याने मला सांगितले त्याला येऊन पाहा! तो ख्रिस्त असू शकत नाही, किंवा असू शकतो का? 30 पुष्कळ लोकांनी शहराबाहेर, जेथे येशू होता तेथे जाण्यास सुरवात केली.

31 आत्ताच जेवण घेऊन आलेल्या, त्याच्या शिष्यांनी त्याला विनंती केली, “गुरूजी, काहीतरी खाऊन घ्या.” 32 येशू त्यांना म्हणाला, “माझ्याकडे खाण्यासाठी अन्न आहे, ज्या विषयी तुम्हाला माहित नाही!” 33 म्हणून ते एकमेकांना म्हणून लागले, “कोणीतरी त्याला खाण्यासाठी काहीतरी आणिले असेल, नाही का?”

34 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो: माझ्या पित्याने त्याच्या इच्छेप्रमाणे जे काही करण्यासाठी मला पाठवले आहे ते कार्य पूर्ण करावे, ह्या करीता मी खूप भुकेला आहे. 35 वर्षाच्या ह्या समयी तुम्ही सामान्यपणे असे म्हणता, ‘अजून चार महिने शिल्लक आहे, आणि मग आपण पिकांची कापणी करू.’ अजून तुमच्या आजुबाजूला बघा! आत्ताच पिक कापणीसाठी तयार आहे. देवाने त्यांच्यावर राज्य करावे असे गैर यहूद्यांना वाटते; ते कापणीसाठी तयार असलेल्या पिकाप्रमाणे आहेत. 36 जो कोणी ह्यावर विश्वास ठेवतो आणि अशा प्रकारच्या कापणीमध्ये काम करण्यासाठी तयार आहे, त्याला अगोदरच त्याचे वेतन, आणि सार्वकालीक जीवनासाठी पुरेसे फळ प्राप्त झाले आहे. जो कोणी बीं पेरतो आणि जो कोणी कापणी करतो ते एकत्र आनंद करतील.

37 एक व्यक्ती बीं पेरतो, आणि दुसरा व्यक्ती पिकांची कापणी करतो, हे विधान सत्य आहे. 38 ज्या पिकांची तुम्ही लागवड केली नाही त्यांची कापणी करून गोळा करण्यासाठी मी तुम्हाला पाठविले. इतरांनी पुष्कळ कठीण श्रम केले आहेत, परंतु आता तुम्ही त्यांच्या कामाचे सहभागी होणार आहात.”

39 येशूविषयी त्या स्त्रीकडून त्यांनी जे काही ऐकले होते त्यामुळे सुखार गावात राहणाऱ्या पुष्कळ शमरोनी लोकांनी त्याच्यावर त्यांचा भरवसा टाकला. ती म्हणाली होती, “मी आतापर्यंत केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले.” 40 शमरोनी येशूकडे आले असता, त्यांच्या सोबत अधिक जास्त वेळ राहण्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. म्हणून तो अजून दोन दिवस तेथे राहिला.

41 येशूने त्यांना जी काही घोषणा केली त्यामुळे त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 42 ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता आम्ही येशूवर विश्वास ठेवत आहोत, कारण तू आम्हाला त्याच्याविषयी सांगितले त्यावरूनच केवळ नाही तर आमच्यासाठी त्याचा संदेश देखील आम्ही ऐकला आहे. हा पुरुष खरोखर जगाचा तारणारा आहे हे आता आम्हाला कळले आहे.

43 शमरोनातील त्या दोन दिवसानंतर, येशू आणि त्याच्या शिष्यांनी ते सोडले आणि गालील प्रांतात निघून गेले. 44 (एका संदेष्ट्याला पुष्कळ ठिकाणात सन्मान प्राप्त होतो, मात्र ज्या ठिकाणात तो वाढला तेथे प्राप्त होत नाही, हे येशू स्वतः जाणून होता.) 45 तथापि, तो गालीलात आला असता तेथील पुष्कळ लोकांनी त्याचे स्वागत केले. तो कोण आहे हे त्यांना कळून चूकले होते, कारण यरूशलेममध्ये नुकत्याच झालेल्या वल्हांडण सणाच्या साजरीकरणाच्या काळात त्याने केलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या.

46 येशू पुन्हा गालीलातील काना येथे गेला. (जेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता.) तेथे एक राजाचा अधिकारी कफर्णहूमात राहत होता ते केवळ सत्तावीस किलोमीटर दूर होते, आणि त्याचा मुलगा फार आजारी होता. 47 येशू यहूदाहून गालीलात परत आला आहे हे त्या मनुष्याने ऐकले तेव्हा, तो येशूकडे काना येथे गेला आणि त्याला विनंती करू लागला, “खाली कफर्णहूमाकडे या आणि माझ्या मुलाला बरे करा” तो मरणार आहे!”

48 येशू त्याला म्हणाला, “मी कोण आहे असे ज्या गोष्टी प्रमाणीत करतात त्या मी केल्यावर आणि जो पर्यंत तुम्ही मला तसे करताना पाहणार नाही तो पर्यंत तुम्ही माझ्यावर भरवसा ठेवणार नाही!” 49 तरीही तो अधिकारी त्याला म्हणाला, “साहेब, कृपया माझा मुलगा मरण पावण्यापूर्वी खाली माझ्या घरी या!” 50 येशू त्याला म्हणाला, “जा. तुझा मुलगा जगेल.” येशू जे काही बोलला त्यावर त्या मनुष्याने भरवसा ठेवला आणि तो आपल्या घराच्या मार्गाने जाण्यास निघाला.

51 जसे तो आपल्या घराच्या दिशेने खाली प्रवास करत असता. वाटेतच त्याचे नोकर त्याला भेटले. त्यांनी त्याला सांगितले, “आपला मुलगा जिवंत आहे.” 52 “माझ्या मुलामध्ये कोणत्या क्षणी सुधारणा होण्यास सुरवात झाली?” असे त्याने त्यांना विचारले. ते त्याला म्हणाले, “काल दुपारी सुमारे एक वाजता त्याचा ताप नाहीसा झाला.”

53 “तुझा मुलगा जगेल” हे येशूने त्याला सांगितलेली हिच ती वेळ होती हे नंतर त्या मुलाच्या पित्याच्या लक्षात आले. म्हणून जे कोणी त्याच्या घरात राहत होते त्या प्रत्येकासह, त्याने येशूवर भरवसा टाकला.

54 तो कोण आहे हे लोकांना प्रमाणीत करण्यासाठी त्याने दुसऱ्यांदा काहीतरी केले होते. यहूदाकडून प्रवासात असतांना, गालील प्रांतात आल्यावर त्याने ते केले.

Chapter 5

1 यहूद्यांच्या दुसऱ्या एका सणाची वेळ आली, आणि त्यासाठी येशू वर यरूशलेमेस गेला. 2 यरूशलेममध्ये जवळच शहरात जाण्यासाठी तेथे एक फाटक होते, त्या ठिकाणाला मेंढरे फाटक म्हणतात. त्या फाटकामध्ये बेथसैदा नावाचे एक तळे होते (जसे इब्री भाषेत म्हटले जाते). त्या तळ्याच्या समोर पाच छप्परांचे अंगण किंवा रांगा होत्या. 3-4 ज्यांना चालता येत नव्हते, जे आंधळे आणि आजारी होते असे लोक मोठ्या संख्येने तेथे होते. अनेक लोक ज्यांना चालता येत नसे ते अंगणात झोपलेले होते.

5 एक मनुष्य ज्याला चालता येत नाही, तो अडतीस वर्षांपासून तेथे होता. 6 येशूने त्याला तेथे पडलेले पाहीले आणि त्याला तसे पडून आता पुष्कळ काळ लोटला आहे असे ओळखले. तो त्या मनुष्याला म्हणाला, “तुला स्वस्थ आणि बलवान होण्याची इच्छा आहे काय?”

7 त्या मनुष्याने त्याला उत्तर दिले, “साहेब, पाणी हालवील्यावर तळ्यात उतरण्यासाठी मला मदत करणारा असा कोणी एक माझ्याकडे येथे नाही. मी तळ्यात उतरण्याचा प्रयत्न करत असता, नेहमीच कोणीतरी एक माझ्या अगोदर त्यामध्ये उतरतो.” 8 येशू त्याला म्हणाला, “ऊठ! आपला बिछाना उचल आणि चालू लाग!”

9 लगेचच तो मनुष्य बरा झाला, आणि त्याने आपला बिछाना उचलला आणि चालू लागला.

आता तो दिवस विश्रामाचा, शब्बाथ दिवस होता.

10 म्हणून जो मनुष्य बरा झाला होता त्याला यहूदी पुढारी म्हणाले, “आज तर शब्बाथ आहे, आणि ह्या विश्रामाच्या दिवशी तू आपली चटई उचलून चालावे हे आपल्या नियमाच्या विरूद्ध आहे, हे तुला माहित आहे.” 11 जो मनुष्य बरा झाला होता तो त्यांना म्हणाला, “परंतू ज्याने मला बरे केले त्याने मला सांगितले, आपला बिछाना उचल आणि चालू लाग!’”

12 त्यांनी त्याला विचारले, “तो मनुष्य कोण होता?” 13 आता येशूने त्या मनुष्याला बरे केले असले तरीसुद्धा, त्या मनुष्याला त्याचे नाव माहित नव्हते. येशूने त्या मनुष्याला बरे केल्यानंतर, त्याला सोडले आणि गर्दीमध्ये परतला.

14 नंतर, तो मनुष्य येशूला मंदिरात आढळला आणि तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस. तुझ्यासोबत ह्यापेक्षा काही वाईट घडू नये म्हणून, येथून पूढे पाप करू नको.” 15 तो मनुष्य गेला आणि यहूदी पुढाऱ्यांना सांगितले, त्याला ज्या मनुष्याने बरे केले होते तो येशूच होता.

16 येशू आश्चर्यकारक गोष्टी करत आणि त्याचे सामर्थ्य दाखवत आणि म्हणून शब्बाथ दिवशी देखील ती कार्ये करत होता म्हणून यहूद्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न चालू केला. 17 येशूने त्यांना हे उत्तर दिले, “माझा पिता आत्ता सुध्दा काम करत आहे, आणि मी देखील काम करत आहे.” 18 ह्यामुळेच यहूदी येशूला मरणासाठी देण्याचा अधिकाधिक प्रयत्न करू लागले, कारण तो केवळ शब्बाथ दिवस मोडत होता म्हणून नव्हे, परंतु तो देवाला त्याचा स्वतःचा पिता म्हणवत होता, तो देवाच्या बरोबरीचा आहे असा तो दावा देखील करत होता.

19 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला सत्य सांगत आहे: मी, जो मनुष्याचा पुत्र, माझ्या स्वतःच्या अधिकाराने काहीच करू शकत नाही. पित्याला जे काही करताना मी पाहतो तेच मी करू शकतो. पिता जे काही करतो, ते मी, पुत्र देखील, तेच करतो. 20 पिता माझ्यावर, म्हणजे पुत्रावर प्रीती करतो, आणि तो जे काही करतो ते मला दाखवतो. मी जे काही करतो ते तुम्हाला पाहता यावे आणि तुम्हाला आश्चर्य वाटावे म्हणून, ह्यापेक्षाही मोठ-मोठी कार्ये पिता मला दाखवील.

21 पिता, जे मरण पावले आहेत त्यांना जसा उठवतो आणि त्यांना पुन्हा जीवन देतो, तसेच मी, पुत्र देखील, माझी इच्छा असेल त्या कोणालाही जीवन देतो. 22 पिता कोणाचा न्याय करत नाही, परंतु संपूर्ण न्यायनिवाडा करणे माझ्याकडे सोपवून दिले आहे, 23 यासाठी की सर्व लोक जसा पित्याचा सन्मान करतात तशाचप्रकारे त्यांनी माझा, म्हणजे पुत्राचा, सन्मान करावा. जो कोणी माझा सन्मान करत नाही तो पित्याचा सन्मान करत नाही.

24 मी तुम्हाला सत्य सांगत आहे: जो कोणी माझा संदेश ऐकतो आणि मला देवाने पाठवले आहे असा भरवसा ठेवतो त्याला सार्वकालीक जीवन लाभले आहे. तो देवाच्या न्यायाखाली येत नाही, परंतु तो मरणातून जीवनाकडे निघून गेला आहे.

25 मी तुम्हाला सत्य सांगत आहे: अशी एक वेळ येत आहे. तेंव्हा जे कोणी मरण पावले आहेत, ते माझी वाणी ऐकतील, आणि मी जो देवाचा पुत्र, ते माझे जे ऐकतील ते जगतील.

26 कारण पिता जसे लोकांना जिवंत करण्यास सक्षम आहे, त्याच प्रकारे त्यांना जिवंत करण्यासाठी त्याने मला, म्हणजे पुत्राला, सामर्थ्य दिले आहे. 27 मी मनुष्याचा पुत्र आहे, म्हणूनच पित्याला जे काही माहित आहे ते करण्याचा अधिकार त्याने मला दिला आहे.

28 ह्यावरूनच आश्चर्यचकीत होऊ नका कारण अशी वेळ येत आहे तेथे जे कोणी मरण पावले आहेत ते सर्व लोक माझी वाणी ऐकतील, 29 आणि ते त्यांच्या कबरांमधून बाहेर येतील. देव ज्यांनी उत्तम केले आहे त्यांना सार्वकालीक जीवनासाठी उठवील. परंतु ज्यांनी वाईट ते केले आहे—त्यांना देव उठवेल, परंतु केवळ त्यांना दोषी ठरवण्यासाठी आणि त्यांना सर्वकाळची शिक्षा देण्यासाठी.

30 मला स्वतःहून काही करता येत नाही. पित्याकडून मी जे काही ऐकतो, मी तसाच न्यायनिवाडा करतो, आणि मी योग्य रीतीने न्यायनिवाडा करतो. ज्याने मला येथे पाठवले, त्या पित्याला पाहिजे तसेच मी करतो, मी माझी इच्छा आहे तसे करण्याचा प्रयत्न करत नाही, मी न्यायीपणाने न्यायनिवाडा करतो.

31 जर माझ्या स्वतःविषयी साक्ष देणारा मी एकटाच असलो तर, माझी साक्ष विश्वसनीय आहे किंवा खरी आहे ह्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 32 तरीसुद्धा, माझ्याविषयी साक्ष देणारा असा कोणीतरी एक तेथे आहे, आणि माझ्याविषयी त्याची साक्ष खरी आहे हे मला ठाऊक आहे.

33 बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे तुम्ही संदेशवाहक पाठवले, आणि त्याने माझ्याविषयी तुम्हाला सत्य सांगितले. 34 खरे पाहता माझ्याविषयी त्याने किंवा कोणीतरी साक्षीदार व्हावे ह्याची मला गरज नाही, देव तुम्हाला वाचवू शकतो म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. 35 बाप्तिस्मा करणारा योहान हा एक जळणारा आणि चमकणारा दिवा होता, आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात थोड्या काळासाठी आनंदीत होता.

36 तथापि, योहानाने माझ्याविषयी दिलेली साक्ष ह्या पेक्षा मी माझ्या विषयी दिलेली साक्ष कितीतरी महान आहे. त्या सर्व गोष्टी ज्या करण्यासाठी पित्याने मला परवानगी दिली आहे—मी त्या गोष्टी प्रत्येक दिवशी करत असतो, आणि तुम्ही मला त्या करताना पाहता—मी कोण आहे असे त्या गोष्टी पुरे-पूर सांगतात; त्या माझा येथे येण्याचा उद्देश स्पष्ट करतात. पित्याने मला पाठवले आहे त्याचा ते पुरावा आहेत. 37 माझा पिता, ज्याने मला पाठवले आहे, त्यानेच माझ्या विषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याला कधीच दैहिकरित्या पाहिलेले नाही, आणि तुम्ही कधीच त्याची वाणी ऐकली नाही. 38 त्याचा शब्द तुम्हामध्ये नाही ह्याचा पुरावा म्हणजे, ज्या एकाला त्याने पाठवले, त्या माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही.

39 शास्त्रलेखांचा तुम्ही काळजी पूर्वक अभ्यास करता कारण त्यांचा अभ्यास केल्याने तुम्हाला सार्वकालीक जीवन मिळेल असे तुम्हाला वाटते, आणि तेच शास्त्रलेख माझ्या विषयी सांगतात. 40 तरी पण अजूनही माझ्याकडे येऊन माझ्यापासून सार्वकालीक जीवन स्वीकार करण्यास तुम्ही नकार देतो.

41 जरी लोक माझे अभिनंदन करतात, माझी प्रशंसा करतात, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. 42 तुम्ही देवावर प्रीती करत नाही, असे मला तुम्हाविषयी माहित आहे.

43 मी माझ्या पित्याच्या अधिकाराने आलो आहे, परंतु अजुनही तुम्ही माझ्यावर भरवसा ठेवला नाही किंवा माझे स्वागतही केले नाही. जर कोणी तरी त्याच्या स्वतःच्या अधिकाराने येतो, तुम्ही त्याचे ऐकाल. 44 तुम्हापैकी इतरांनी तुमचा सन्मान करावा म्हणून तुम्ही फार कठीण परिश्रम करता तेव्हा तुम्ही माझ्यावर कसा विश्वास ठेवू शकाल? तरीसुद्धा, तुम्ही एकच आणि एकमात्र देवाकडून मिळणारा खरा सन्मान शोधण्यास तुम्ही नकार दिला आहे.

45 माझ्या पित्यासमोर तुम्हाला दोषी ठरवणारा तो एक मीच आहे असा विचार करू नका. मोशे तुमचा बचाव करेल असे तुम्हाला वाटले, त्याच्यावर तुम्ही आपल्या आशा ठेवल्या. तथापि, तुम्हाला दोष देणारा मोशेच असेल. 46 मोशे जे काही बोलला ते जर तुम्ही स्वीकारले असते, तर मी जे काही सांगितले ते तुम्ही सत्य समजून स्वीकारले असते. 47 मोशेने जे काही लिहिले त्यावर देखील तुम्ही विश्वास ठेवला नाही, तर मी जे काही सांगितले त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल हे कसे शक्य होईल!”

Chapter 6

1 येशू सरोवर ओलांडून पलीकडच्या बाजूस गेला. त्या सरोवराचे नाव काही लोकांसाठी “गालील सरोवर” असे होते; इतर लोक त्याला “तिबिर्य समुद्र” असे म्हणत. 2 मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे मागे गेला कारण अतिशय आजारी असणाऱ्या लोकांना तो बरे करताना त्याने केलेल्या अद्भुत गोष्टी त्यांनी पाहील्या होत्या. 3 येशू वरती एका उंच डोंगराळ भागात गेला आणि आपल्या शिष्यांसोबत खाली बसला.

4 आता यहूद्यांचा एक विशेष उत्सव, वल्हांडण सणाची तयारी करण्याचे वर्ष होते. 5 येशूने वरती दृष्टी लावली आणि पाहिले की तेथे लोकांचा एक मोठा समुदाय त्याच्या दिशेने येत आहे. येशू फिलिप्पाला म्हणाला, “ह्या सर्व लोकांना खाण्यासाठी काहीतरी मिळावे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही भाकरी कोठून विकत आणाव्यात?” 6 फिलिप्पाची परीक्षा घेण्यासाठी तो कोणत्या प्रकारे उत्तर देतो हे पाहण्यासाठी त्याने त्याला हा प्रश्न विचारला. तथापी, ह्या समस्येविषयी तो काय करणार होता हे येशूला अगोदर पासूनच माहित होते.

7 फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, एखादा मनुष्य दोनशे दिवस काम करून कमावू शकतो एवढे पैसे जरी आपल्याकडे असले तरी, ते ह्या मोठ्या लोक समुदायातील प्रत्येक एकाला एखादा लहानसा तुकडा देखील देता येईल एवढ्या भाकरी विकत घेण्यास हा पैसा पुरेसा असू शकणार नाही.” 8 त्याच्या शिष्यांपैकी दुसरा एक, अंद्रिया, शिमोन पेत्राचा भाऊ, येशूला म्हणाला, 9 “येथे एक मुलगा आहे त्याच्याकडे पाच जवाच्या भाकरी आणि दोन लहान मासे आहेत. असे असून सुध्दा, इतके कमी अन्न इतक्या लोकांना कसे काय खाऊ घालता येईल?”

10 ज्या ठिकाणात सर्व लोक एकत्र झाले होते तेथे पुष्कळ गवत होते. म्हणून येशू म्हणाला, “लोकांना खाली बसण्यास सांगा.” मग सर्व लोक खाली बसले, शिष्यांनी लोक समुदायाची मोजणी केल्यावर त्यांना आढळले की तेथे सुमारे पाच हजार लोक होते. 11 मग येशूने भाकरीचा आणि माशाचा छोटासा तुकडा घेतला, आणि त्यासाठी देवाचे आभार मानले. मग मैदानावर बसलेल्या सर्वांमध्ये त्याने भाकर आणि मासा वाटून दिला. लोकांनी त्यांना पाहिजे तेवढ्या भाकरी आणि मासे खाल्ले. 12 प्रत्येकाचे खाऊन झाल्यावर तो शिष्यांना म्हणाला, “लोकांनी खाल्ल्या नाहीत अशा जवाच्या भाकरीचे सर्व तुकडे गोळा करा. काहीही व्यर्थ जाऊ देऊ नका.”

13 म्हणून त्यांनी पाच जवाच्या भाकरीचे तुकडे गोळा केले, आणि जे काही उरले होते त्यातून त्यांनी बारा टोपल्या काठोकाठ भरल्या.

14 येशूने त्यांच्या समोर केलेला तो चमत्कार लोकांनी पाहिल्या नंतर, ते म्हणाले, “देव ज्या संदेष्ट्याला जगात पाठवणार होता नक्की तो हाच आहे!” 15 लोक काय योजना करत होते ते येशूला समजले; ते त्याला त्यांचा राजा करून घेण्यासाठी भाग पाडणार होते. म्हणून तो त्यांना सोडून स्वतः डोंगरावर निघून गेला.

16 संध्याकाळ झाल्यावर, त्याचे शिष्य खाली गालील समुद्राकडे गेले, 17 नावेमध्ये बसले, आणि कफर्णहूमाच्या शहराच्या दिशेने नाव हाकरण्यास सुरवात केली. आता अंधार झाला होता, आणि येशू त्यांच्या बरोबर नव्हता. 18 एक जोरदार वारा वाहण्यास सुरवात झाली, आणि समुद्रावरील लाटा देखील उग्र झाल्या होत्या.

19 त्यांनी पाच किंवा सहा किलोमीटर हाकारल्यानंतर, येशूला पाण्यावर चालतांना आणि नावेच्या जवळ येतांना शिष्यांनी पाहिले. ते भयभीत झाले! 20 येशू त्यांना म्हणाला, “तो मी आहे! भिऊ नका!” 21 त्याला नावेमध्ये घेतांना ते फार आनंदी होते. जसे तो त्यांच्या सोबत होता, जेथे त्यांना जायचे होते तेथे त्यांची नाव आली.

22 दुसऱ्या दिवशी सरोवराच्या दुसऱ्या बाजूस थांबलेल्या लोकांच्या गर्दीला लक्षात आले की एक दिवस अगोदर तेथे केवळ एकच नाव होती. येशू त्याच्या शिष्यांसोबत नावेत गेला नाही हे देखील त्यांना समजले 23 तिबिर्या शहराहून सरोवराच्या पलीकडून काही पुरुष दुसऱ्या नावेत त्यांच्या जवळ आले. प्रभूने ज्या भाकरीसाठी देवाचे आभार मानले होते, त्या भाकरी लोकांनी जेथे खाल्ल्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या होड्या ठेवल्या.

24 येशू किंवा त्याचे शिष्य तेथे नाहीत हे लोक समुदायाच्या लक्षात आले तेव्हा, येशूला शोधण्यासाठी त्यांच्यापैकी काहीजण त्या नावेत बसले आणि त्या कफर्णहूमाकडे हाकारल्या.

25 त्यांनी शोधले आणि त्यांना येशू गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूस कफर्णहूममध्ये आढळला. त्यांनी त्याला विचारले, “गुरूजी आपण येथे केव्हा आला आहात?”

26 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला सत्य सांगत आहे: मी कोण आहे हे दर्शवणारे चमत्कार मी केले म्हणून तुम्ही मला शोधत आहात असे नाही! कारण तुम्ही जवाच्या भाकरी खाऊन तृप्त झाले आहात म्हणून तुम्ही मला शोधत आहात. 27 नाश होणाऱ्या अन्नासाठी श्रम करणे थांबवा! त्याऐवजी, तुम्हाला सार्वकालीक जीवनात घेऊन येणाऱ्या अन्नासाठी श्रम करा! देवाचा एकमेव निवडलेला, मी, जो मनुष्याचा पुत्र, तिच ती भाकर आहे. तसे करण्यासाठी देव पित्याने मला सर्व मार्गात तसे करण्याची परवानगी दिली आहे.”

28 मग लोकांनी त्याला विचारले, “देवाला संतुष्ट करण्यासाठी आम्ही कोणती सेवा आणि कार्य करावे?” 29 येशूने उत्तर दिले, “देवाची काय इच्छा आहे की तुम्ही काय करावे ती ही आहे: ज्या एकाला त्याने पाठवले, त्या माझ्यावर विश्वास ठेवा.”

30 म्हणून ते त्याला म्हणाले, “मग तुम्ही देवापासून आला आहात आणि तुम्ही कोण आहात हे प्रमाणीत करण्यासाठी दुसरा एक चमत्कार करून दाखवा जो आम्हाला पाहता येईल आणि विश्वास ठेवता येईल. आम्हासाठी तुम्ही काय करणार आहात? 31 शास्त्रभागात सांगितल्यानुसार, आमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला: ‘देवाने त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’”

32 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला सत्य सांगत आहे: तुमच्या पूर्वजांना स्वर्गातून ज्याने ती भाकर दिली तो मोशे नव्हता. तो माझा पिता होता, तोच एक तुम्हाला स्वर्गातली खरी भाकर देत आहे. 33 देवाची खरी भाकर मीच आहे, जी स्वर्गातून खाली आली आहे ती जगातल्या प्रत्येकाला खरोखर जगण्यासाठी सक्षम करते.”

34 ते त्याला म्हणाले, “साहेब, आम्हाला ही भाकर सर्वदा द्या.”

35 येशू त्यांना म्हणाला, “मीच ती भाकर आहे जी तुम्हाला जीवन देते. जो कोणी माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला राहणार नाही. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. 36 तरीसुद्धा, मी तुम्हाला सांगितले ते हे की, तुम्ही मला पाहत असला तरी, अजून देखील तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. 37 माझ्या पित्याने मला दिलेले सर्व लोक माझ्याकडे येतील, आणि जे कोणी माझ्याकडे येतात त्यांना मी दूर करणार नाही.

38 माझी इच्छा आहे तसे करण्यासाठी मी स्वर्गातून खाली आलो आहे असे नाही, परंतु ज्याने मला पाठवले आहे त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आलो आहे. 39 त्याने मला दिलेल्यांपैकी एकाला देखील मी गमावू नये, आणि शेवटच्या दिवशी मी त्या सर्वांना उठवावे, हिच काय ती ज्याने मला पाठवले त्याची इच्छा आहे. 40 प्रत्येकजण जो माझ्याकडे, पुत्र म्हणून विश्वासाने पाहतो, आणि माझ्यावर भरवसा ठेवतो, त्याला सार्वकालीक जीवन मिळेल, हेच ते आहे जे माझ्या पित्याला पाहिजे. मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवीन.”

41 येशू म्हणाला, “मीच ती भाकर आहे जी स्वर्गातून खाली उतरली आहे” म्हणून यहूद्यांनी त्याच्याविषयी कुरकुर करण्यास सुरवात केली. 42 ते म्हणाले, “योसेफ ज्याचा पिता आहे, हा तो येशू नाही काय? त्याचे आई आणि वडील आम्हाला माहित नाही का? ‘मी स्वर्गातून आलो आहे,’ असे तो कोणत्याही सत्याच्या आधारावर कसे म्हणू शकतो’?”

43 येशू त्यांना म्हणाला, “आपसात कुरकुर करणे थांबवा. 44 पिता जोपर्यंत त्यांना माझ्याकडे पाठवत नाही तोपर्यंत कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. जो कोणी माझ्याकडे येतो, त्याला मी शेवटच्या दिवशी उठवेन. 45 ‘देव त्या सर्वांना शिकवेल’ असे, संदेष्ट्यांच्या ग्रंथात ते लिहिले आहे. पित्यापासून जे कोणी शिकतात आणि त्याचे ऐकतात ते माझ्याकडे येतात.

46 देवापासून जो आला आहे, त्या माझ्याशिवाय पित्याला कोणीही पाहिले नाही. मी एकट्याने पित्याला पाहिले आहे. 47 मी तुम्हाला सत्य सांगत आहे: माझ्यावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला सार्वकालीक जीवन मिळाले आहे.

48 मी खरे जीवन देणारी भाकर आहे. 49 तुमच्या पूर्वजांनी अरण्यामध्ये मान्ना खाल्ला, परंतु तरीसुद्धा ते मरण पावले.

50 तथापि, जी भाकर स्वर्गातून खाली येते, त्या भाकरी बाबत मी बोलत आहे, आणि जो कोणी ती खातो तो कधीच मरणार नाही. 51 मीच ती भाकर आहे जी स्वर्गातून खाली आली आहे, जी लोकांना खरोखर जिवंत ठेवते. जो कोणी ही भाकर खाईल, तो सर्वकाळ जगेल. जगाच्या जीवनासाठी जी भाकर मी देतो, ते म्हणजे माझ्या शारीरिक देहाचा मृत्यू होय.”

52 येशूचे ज्या यहूद्यांनी ऐकले होते ते आता आपसात वादविवाद करत होते. इतर कोणी तरी त्याचे स्वतःचे शरीर खातील असे वचन कोणीही कसे देऊ शकतो, हे ते समजू शकले नाही. 53 मग येशू त्यांना कठोर शब्दांसह म्हणाला: “मी तुम्हाला सत्य सांगत आहे: तुम्ही जो पर्यंत माझा, मनुष्याच्या पुत्राचा देह खात नाही तोपर्यंत, तुम्ही सर्वकाळ जगणार नाही.

54 जे कोणी माझा देह खातात आणि माझ्या रक्तातून पितात ते सर्वकाळ जगतील, आणि शेवटच्या दिवशी मी त्यांना पुन्हा जिवंत करेन. 55 कारण माझा देह खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. 56 जो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्याशी जोडून राहील, आणि मी त्याच्याशी जोडून राहील.

57 माझा पिता, ज्याने मला पाठवले आहे, तो सर्वांना जिवंत करतो, आणि माझ्या पित्याने मला सक्षम केले आहे म्हणून मी जगत आहे. त्याच प्रकारे मी त्यांच्यासाठी जे काही करेन त्यामुळे जे कोणी माझ्याद्वारे खातील ते सर्वकाळ जगतील. 58 मी स्वर्गातून खाली आलेली खरी भाकर आहे. जो कोणी—ही भाकर माझ्यातून खातो—तो कधीच मरणार नाही, मात्र सर्वकाळ जगेल! मी जे काही करतो ते तुमच्या पूर्वजांसोबत काय घडले त्यासारखे नाही कारण त्यांनी मान्ना खाल्ला आणि मग ते मरण पावले.” 59 येशूने कफर्णहूम शहरातील सभास्थानात तो शिक्षण देत असतांना ह्या गोष्टी सांगितल्या.

60 त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ म्हणाले, “तो जे काही शिकवत आहे ते समजण्यासाठी कठीण आहे. तो जे काही सांगत आहे ते कोणीही कसे स्वीकार करू शकतो?” 61 येशूच्या शिष्यांपैकी काहीजण तक्रार करत आहे याची, त्याला जाणीव होती, म्हणून तो त्यांना म्हणाला, “मी जे काही तुम्हाला शिकवतो ते तुम्हाला त्रासदायक आहे का?

62 जर तुम्ही मला, मनुष्याच्या पुत्राला, पुन्हा स्वर्गात जातांना पाहाल तर तुम्ही काय म्हणाल? 63 आत्माच केवळ कोणालाही सर्वकाळ जिवंत ठेऊ शकतो. ह्या बाबतीत मानवी स्वभाव काहीच मदत करू शकत नाही. मी तुम्हाला शिकवलेले शब्दच आत्मा आहेत, आणि तेच लोकांना सर्वकाळ जिवंत ठेवते.

64 तरीसुद्धा मी तुम्हाला जे काही शिकवत आहे त्यावर विश्वास ठेवत नाहीत असे तुमच्यापैकी काहीजण तेथे आहेत.” येशू असे बोलला कारण ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही ते कोण होते आणि त्याचा विश्वासघात करणारा व्यक्ती देखील, त्याच्या कार्याच्या सुरवाती पासूनच त्याला ठाऊक होते.

65 मग तो म्हणाला, “म्हणूनच जोपर्यंत पिता माझ्याकडे येण्यासाठी कोणालाही सक्षम करत नाही तोपर्यंत कोणीही माझ्याकडे सार्वकालीक जीवन जगण्यासाठी येऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगितले होते.”

66 त्याच वेळेपासून, येशूच्या शिष्यांपैकी पुष्कळजण त्याला अनुसरण्यापासून मागे फिरले. 67 मग तो त्या बारा जणांना म्हणाला, “तुम्हाला देखील मला सोडून जाण्याची इच्छा नाही का, तुम्ही पण?” 68 शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जावे? आम्हाला सार्वकालीक जीवन जगण्यासाठी परवानगी देणारा संदेश केवळ तुमच्याकडे आहे! 69 देवाने पाठवलेले पवित्र ते तुम्हीच आहात हे आम्हाला खात्रीने माहित आहे, आणि आम्ही तुम्हावर विश्वास ठेवतो!”

70 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बारा शिष्यांची, निवड केली नाही का? तरी सुध्दा तुमच्यापैकी एक सैतान आहे!” 71 तो शिमोन इस्कार्योतचा पुत्र यहूदा, ह्याच्याविषयी बोलत होता. यहूदा जरी त्या बाराजणांपैकी एक होता तरी, नंतर येशूला धरून देणारा देखील तोच एक होता.

Chapter 7

1 यानंतर, येशू गालील प्रांतातील इतर भागात गेला. यहूदी अधिकारी त्याला शोधून त्याच्यावर गुन्ह्याचा दोषारोप करण्यासाठी आणि त्याला मरणाची शिक्षा देण्याचा मार्ग शोधत होते म्हणून त्याने यहूदीयामधून प्रवास करण्याचे टाळले. 2 आता यहूद्यांच्या मंडपाच्या सणाची वेळ जवळ आली होती. फार काळापूर्वी यहूदी लोक ज्या तंबूमध्ये राहिले होते ते आठवण करण्याची ही वेळ होती.

3 येशूचे भाऊ त्याला म्हणाले, “येथून निघ आणि यहूदीया येथे जा जेणेकरून तुझ्या इतर अनुयायांना तू करू शकतोस असे सामर्थ्यशाली कृत्ये पाहता येऊ शकतात. 4 आपण कोणत्या प्रकारची व्यक्ती आहोत हे लोकांनी ओळखावे असे ज्याला वाटते तो आपली कार्ये लपवत नाही. स्वतःस जगाला प्रकट करा!”

5 त्याच्या स्वतःच्या भावांनी देखील तो सांगत असलेल्या सत्याच्या विचारांवर किंवा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. 6 म्हणून येशू त्यांना म्हणाला, “माझे काम शेवटपर्यंत आणण्याची वेळ अजून आली नाही. तथापि, जे काही पूर्ण करण्यासाठी तुम्ही इच्छिता त्यासाठी तुम्हाला पाहिजे ती वेळ तुम्ही निवडू शकता. 7 जे लोक स्वतःसाठी जगतात आणि ह्या जगाच्या गोष्टींवर प्रीती करतात ते तुमचा द्वेष करू शकत नाहीत, मात्र ते माझा द्वेष करतात. ते आपल्या जीवनाद्वारे जे काही करतात ते वाईट आहे हे त्यांना सांगणारा मी एकटाच आहे.

8 तुम्ही सण साजरा करण्यासाठी पूढे जा. मी आत्ताच वर जात नाही; माझ्यासाठी ही योग्य वेळ नाही.” 9 तो हे म्हणाल्या नंतर, येशू थोड्या काळासाठी गालीलात थांबला.

10 तथापि, त्याचे भाऊ सणाला गेल्याच्या काही दिवसानंतर, तो सुध्दा गेला, तो येत आहे हे कोणालाही न सांगण्याविषयी तो सावध होता. 11 येशूचे यहूदी विरोधक त्याला शोधत होते, ते सणामध्ये त्याला शोधण्याची आशा बाळगून होते. ते लोकांना विचारत होते, “येशू कोठे आहे? तो येथे आहे का?”

12 गर्दीमधील पुष्कळ लोक येशूविषयी हळुवार पणे एकमेकांशी बोलत होते. कोणी असे म्हणत होते, “तो चांगला मनुष्य आहे!” त्याऐवजी इतर म्हणत होते, “नाही! तो फसवणारा आणि लोकसमुदायाची दिशाभूल करणारा आहे!” 13 कारण येशूच्या यहूदी शत्रूंची त्यांना भीती वाटत होती, ते काय बोलत आहे हे सार्वजनिकरित्या लोक ऐकू शकतील अशा ठिकाणात कोणीही त्याच्याविषयी बोलत नव्हते.

14 आश्रयस्थानाचा सण अर्धा आटोपला तेव्हा, येशू मंदिराच्या अंगणात गेला आणि तेथे शिकवण्यास आरंभ केला. 15 तो जे काही सांगत होता त्यामुळे यहूद्यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ह्या मनुष्याने आमच्या शिकवणुकींचा एका मान्यता प्राप्त प्रशिक्षकाकडून अभ्यास कधीच केला नाही. त्याने आमच्या शाळांमध्ये कधीच नोंदणी केली नाही! त्याला एवढे कसे माहित आहे?” 16 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी जे काही शिकवतो ते माझ्या स्वतःपासून आले नाही. ज्याने मला पाठवले त्याच्यापासून ते येते.

17 जर देवाची इच्छा आहे तसे करण्याची कोणी निवड करतो, तर मी केवळ माझ्या स्वतःच्या अधिकाराने बोललो किंवा मी जे काही शिकवतो ते देवापासून येते हे त्याला आढळेल. 18 जो कोणी त्याच्या स्वतःच्या अधिकाराने बोलतो तर तो इतरांनी त्याचा सन्मान करावा म्हणून बोलतो. तथापि, ज्याने आपल्याला पाठवले त्याचा सन्मान करण्यासाठी, त्याला चांगले नाव लौकिक देण्यासाठी, एखादा नोकर एक निष्ठावान मनुष्य म्हणून कठीण श्रम करतो तर, अशा प्रकारच्या नोकरामध्ये काही दोष नाही.

19 मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले नाही का? परंतु तुमच्यातील कोणीही नियमशास्त्राला पाहिजे तसे करत नाही. तुम्हीच आता मला ठार करण्याचा कट रचणारे आहात!

20 लोकसमुदायामधून कोणीतरी उत्तर दिले, “तुला भूत लागले आहे! तुला कोण ठार करणार आहे त्या मनुष्याचे नाव सांग!”

21 येशूने लोकसमुदायाला उत्तर दिले, “तुम्हाला पाहता यावे म्हणून मी एक सामर्थ्याचे कार्य केले, त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकीत झाला आहात. 22 मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले आहे, आणि तुम्ही आपल्या पुरुष संतानांची सुंता केली पाहिजे आणि ते मुल जन्मल्याच्या अगदी सात दिवसानंतरच तुम्ही ती केली पाहिजे, असे ते नियमशास्त्र सांगते. (अगदी अचूक असण्यासाठी, आणि मोशे, ज्याने हा विधी करण्याविषयी नियम लिहिले, त्याच्या पासून नाही, तर आपले पूर्वज अब्राहाम, इसहाक, आणि याकोब, ह्यांच्यापासून आहे.) नियमशास्त्रात याची गरज भासल्यामुळे, तुम्हाला कधीकधी शब्बाथ दिवशी मुलाची सुंता करावी लागते आणि ते सुध्दा कामच असते!

23 मोशेच्या नियमाचे तुमच्याकडून उल्लंघन होऊ नये म्हणून कधीकधी तुम्ही शब्बाथ दिवशी मुलांची सुंता करता. म्हणून मी एका आजारी मनुष्याला बरे केले असता मी शब्बाथ दिवशी कार्य करतो म्हणून तुम्ही का रागवला आहात! कोणाला तरी आरोग्य देणे हे एका बाळाची सुंता करण्यापेक्षा श्रेष्ठ कार्य आहे आणि अधिक आश्चर्यकारक आहे! 24 देवाच्या नियमशास्त्राचे चुकीच्या लागुकरणानुसार, आणि कोणताही विचार न करता, ह्या मनुष्याला आरोग्य देणे योग्य आहे किंवा अयोग्य ते ठरवणे थांबवा! त्याऐवजी, देवाच्या वतीने जे काही न्याय्य आणि जे काही योग्य आहे त्या तत्वानुसार एका व्यक्तीने काय करावे आणि त्याचा न्याय कसा व्हावा ते ठरवा, मनुष्याद्वारे नाही.”

25 यरूशलेमकरांपैकी काहीजण म्हणू लागले, “हा तोच मनुष्य नव्हे काय ज्याला ते ठार करण्याचा प्रयत्न करत आहेत? 26 तो ह्या गोष्टी उघडपणे बोलत आहे, अधिकारी त्याला विरोध करण्यासाठी काहीही म्हणत नाहीत. तो ख्रिस्त आहे हे त्यांना कळले आहे की काय? 27 परंतु मनुष्य कोठून आला आहे, हे आम्हाला ठाऊक आहे म्हणून हा ख्रिस्त असू शकत नाही. ख्रिस्त येईल तेव्हा, तो कोठून येईल हे कोणालाही ठाऊक नसेल.”

28 मग येशू मंदिराच्या अंगणात शिक्षण देत असता, तो मोठ्याने म्हणाला, “होय, तुम्ही मला ओळखता असे तुम्ही म्हणता, आणि मी कुठला आहे हे तुम्हाला माहित आहे असा तुम्ही विचार करता. परंतु मी स्वतः माझी नेमणूक केली म्हणून मी येथे आलो असे नाही. त्याऐवजी, ज्याने मला पाठवले तो त्याची साक्ष म्हणून सत्य सांगतो, आणि तुम्ही त्याला ओळखीत नाही. 29 मी त्याच्यापासून आलो आहे, म्हणून मी त्याला ओळखतो. तोच एक आहे ज्याने मला पाठवले आहे.”

30 नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला अटक करू शकले नाही, कारण त्याच्यासाठी त्याचे कार्य पूर्णत्वास नेण्याची आणि त्याचे जीवन संपवण्याची वेळ अद्याप आली नव्हती. 31 लोकसमुदायातील पुष्कळांनी, त्याचे कार्य पाहिल्यावर आणि त्याचे ऐकल्यावर, त्याच्यावर त्यांचा भरवसा बसला. ते म्हणाले, “ख्रिस्त येईल तेव्हा, ह्या मनुष्याने केलेल्या चमत्कारीक चिन्हापेक्षा अधिक जास्त करण्यासाठी तो सक्षम असेल काय?” 32 येशूविषयी ते लोक ह्या गोष्टी बोलत आहेत अशी कुजबुज परूश्यांनी ऐकली. म्हणून त्यांनी त्याला अटक करण्यासाठी मुख्य याजक, परूशी आणि काही अधिकारी एकत्रित पाठवले.

33 मग येशू म्हणाला, “मी फार थोड्या वेळासाठी तुमच्याबरोबर आहे. मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी जात आहे. 34 तुम्ही माझा शोध कराल परंतु मी तुम्हाला सापडणार नाही. मी जेथे जात आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”

35 म्हणून यहूदी लोक जे त्याचे शत्रू होते ते आपसात म्हणून लागले, “ह्या मनुष्याला आपण शोधू शकणार नाही, असा हा कोठे जाऊ शकतो? ग्रीक जगात पांगलेले यहूदी लोक जेथे आहेत तेथे जावे, आणि त्यांना ह्या नवीन गोष्टी शिकवाव्या असा त्याचा बेत आहे काय? 36 ‘तुम्ही माझा शोध कराल परंतु मला शोधण्यासाठी तुम्ही सक्षम होणार नाही,’ आणि जेव्हा तो म्हणतो, जेथे मी जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही, तेव्हा त्याच्या ह्या म्हणण्याचा अर्थ काय आहे?’”

37 मग सणाच्या शेवटल्या दिवशी, म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “जर कोणी तहानलेला आहे, तर त्याला माझ्याकडे येऊ द्या आणि पिऊ द्या.” 38 जो कोणी माझ्यावर भरवसा ठेवतो, ‘शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.’”

39 त्याच्यावर जे कोणी भरवसा ठेवतील त्यांना पिता जो आत्मा देणार होता त्या आत्म्याविषयी तो हे बोलला होता. जे त्याच्यावर भरवसा ठेवतात त्यांच्यामध्ये राहण्यासाठी देवाने अजून पर्यंत त्याचा आत्मा पाठवला नव्हता, कारण येशूने त्याच्या मरणाद्वारे लोकांना वाचवण्याच्या कार्याद्वारे देवाला जो मोठा सन्मान मिळणार होता, ते कार्य त्याने अजून पर्यंत संपवले नव्हते.

40 लोकसमुदायातील काही लोकांनी त्याचे हे शब्द ऐकले तेव्हा ते म्हणाले, “ज्याची आम्ही अपेक्षा करत होतो खरोखर हा तोच संदेष्टा आहे.” 41 इतर म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येऊ शकत नाही. 42 ख्रिस्त दावीदाच्या वंशातून यायला हवा आणि जे गाव दावीदाचे घर होते त्या बेथलेहेममध्ये त्याचा जन्म व्हावा असे शास्त्रलेखात सांगितले नाही काय?”

43 म्हणून येशूविषयीच्या मतावरून तेथे विभाजन आले. 44 त्याला अटक करावी असे काही लोकांना वाटत होते. तरीसुद्धा कोणीही त्याच्यावर हात टाकला नाही.

45 मग अधिकारी मुख्य याजक आणि परूश्यांकडे परत गेले. शासन करणाऱ्यांनी येशूला अटक करण्यासाठी पाठवलेले अधिकारी ते हेच होते. मग परूशी अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्ही त्याला ताब्यात घेऊन येथे का आणिले नाही?” 46 अधिकाऱ्यांनी उत्तर दिले, “आत्ता पर्यंत कोणीही ह्या मनुष्यासारखे बोलले नाही.”

47 मग परूश्यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्ही देखील, फसवले गेले आहात काय? 48 यहूदी अधिकाऱ्यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीही येशूवर भरवसा ठेवला नाही. 49 ह्या लोकसमुदायाला आपल्या नियमशास्त्राची शिकवण माहित नाही, ते शापित होऊ द्या.

50 मग निकदेम बोलला. तोच एकमेव होता जो येशूला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी रात्रीचा गेला होता. तो परूश्यांपैकी एक होता, आणि तो त्यांना म्हणाला, 51 “एखाद्या मनुष्याचे ऐकण्याअगोदर त्याला आपण दोषी ठरवावे याची आपल्या यहूदी नियमशास्त्रात परवानगी दिलेली नाही. आम्ही प्रथम त्याचे एकदा ऐकून घेतो, त्याने काय केले आहे हे आम्हाला माहित करून घेतले पाहिजे.” 52 त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीपण गालीली आहात काय? शास्त्रभागात काय लिहिले आहे ते काळजीपूर्वक शोधा आणि वाचा! गालीलातून कोणताही संदेष्टा येत नाही हे तुम्हाला आढळेल.”

53 [मग ते सर्वजण आपआपल्या घरी निघून गेले.

Chapter 8

1 येशू त्याच्या शिष्यांसोबत जैतूनाच्या डोंगराकडे गेला, त्या रात्री ते तेथेच राहिले. 2 दुसऱ्या दिवशी सकाळी, ते मंदिराच्या अंगणात परत आले. येशूच्या अवती भोवती पुष्कळ लोक एकत्र आले, आणि त्यांना शिकवण्यासाठी तो खाली बसला. 3 मग यहूदी नियमशास्त्र शिकवणारे मनुष्य आणि काही जे परूशी होते त्यांनी एका स्त्रिला त्याच्याकडे आणिले. ती व्यभिचार करत असतांना पकडण्यात आली होती—ती एका पुरुषाबरोबर झोपलेली होती जो तिचा पती नव्हता. तिला प्रश्न विचारता यावे म्हणून त्यांनी तिला ह्या समुहा (गट) समोर उभे केले.

4 ते येशूला म्हणाले, “गुरूजी, कोणीतरी असा एक पुरुष जो ह्या स्त्रिचा पती नसून, त्याच्यासोबत व्यभिचार करत असतांना हिला पकडण्यात आले. 5 आता अशा स्त्रीला दगडांनी मारून टाकावे अशी मोशेने आम्हाला नियमशास्त्रात आज्ञा दिली आहे. तरी सुध्दा, आम्ही काय करावे असे तुम्ही म्हणता?” 6 काहीतरी चुकीच्या बोलण्याद्वारे त्याच्यावर दोषारोप करण्यासाठी एक सापळा म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला. त्यांनी तिला ठार मारू नये असे जर तो म्हणाला असता, तर तो मोशेच्या नियमशास्त्राचा अनादर करतो असे ते म्हणाले असते. तथापि, त्यांनी तिला ठार मारावे असे जर तो बोलला असता, तर लोकांना शिक्षा देण्याचे सामर्थ्य असलेल्या राज्यपालासाठी राखून ठेवलेल्या रोमी कायद्यांचे त्याच्याकडून उल्लंघन झाले असते.

तथापि, येशू खाली वाकला आणि त्याच्या बोटाने जमिनीवर काहीतरी लिहू लागला.

7 त्यांनी त्याला प्रश्न विचारने चालूच ठेवले असता, तो उठला आणि त्यांना म्हणाला, “तुम्हापैकी कोणा एकाने जर कधीच पाप केले नसेल, तर तुम्हीच ते आहात जे हिला शिक्षा देण्यासाठी बाकीच्यांना चालवाल. त्या तुम्हीच पहिला दगड मारावा!” 8 मग येशू खाली वाकला आणि जमिनीवर आणखी थोडे लिहू लागला.

9 तो काय बोलला हे त्यांनी ऐकल्यानंतर, त्याला प्रश्न विचारणारे, प्रथम वृद्ध, आणि तरूण, एक एक करून, दूर निघून जाऊ लागले. आपण सगळेच पापी आहोत हे त्यांना कळून आले. शेवटी त्या स्त्री सोबत केवळ येशूच तेथे होता. 10 येशू उभा राहिला आणि तिला विचारले, “बाई, तुला दोषी ठरवणारे कोठे आहेत? जी शिक्षा तुला व्हायची होती, त्याबद्दल कोणीही तुझ्यावर हल्ला केला नाही?” 11 ती म्हणाली, “नाही, साहेब, कोणीही नाही.” मग येशू म्हणाला, “मी देखील तुला दोषी ठरवीत नाही. आता घरी जा, आणि आतापासून पूढे, ह्यासारखे आणखी काही पाप करू नको!”]

12 येशू पुन्हा लोकांशी बोलला. तो म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी मला अनुसरतो त्याच्या जवळ जीवन देणारा प्रकाश असेल, आणि तो पुन्हा कधीच अंधारात चालणार नाही. 13 म्हणून परूशी त्याला म्हणाले, “हे असे ऐकू येत आहे जणूकाय तुम्ही वारंवार स्वतःविषयी बोलून आम्ही तुम्हावर भरवसा ठेवण्यास आमचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहात! तुम्हाविषयी जे काही तुम्ही बोलत आहात त्याने काहीच सिद्ध होत नाही!”

14 येशूने उत्तर दिले, “माझ्याविषयी साक्ष देणारा केवळ मी एकटाच जरी असलो तरी, मी जे काही सांगतो ते सत्य आहे हे मला माहित आहे, कारण मी कोठून आलो आणि मी कोठे जाणार आहे हे मला ठाऊक आहे. तथापि, मी कोठून आलो हे तुम्हाला माहित नाही आणि मी कोठे जाणार आहे हे तुम्हाला माहित नाही. 15 तुम्ही मनुष्याच्या नियमानुसार आणि देहबिद्धीने लोकांचा न्याय करता. मी ह्या वेळेत कोणाचाही न्याय करण्यासाठी आलो नाही. 16 मी न्याय करेन तेव्हा, तो योग्य आणि बरोबर असेल कारण मी केवळ एकटाच तो नाही जो न्याय मिळवून देणार आहे. पिता आणि मी ज्याने मला पाठवले, आम्ही एकत्रितपणे तो न्याय अंमलात आणू.

17 एखाद्या प्रकरणात पुरावा देण्यासाठी किमान दोन साक्षीदार असल्यावरच प्रकरणाचा निकाल लावला जाऊ शकतो असे तुमच्या नियमशास्त्रात लिहिले आहे. 18 मी तुम्हाला माझा पुरावा देत आहे, आणि माझा पिता ज्याने मला पाठवले तो देखील माझ्या विषयी पुरावा देतो. म्हणून आम्ही जे काही सांगत आहोत त्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे.

19 मग त्यांनी त्याला विचारले, “तुझा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला ओळखत नाही आणि माझ्या पित्याला ही तुम्ही ओळखत नाही.” 20 मंदिराच्या अंगणात जेथे लोक त्यांचे अर्पण आणतात त्या ठिकाणाजवळ म्हणजे खजिन्या जवळ असतांना तो बोलला होता. तरीसुद्धा कोणीही त्याला अटक केली नाही कारण त्याची मरणाची वेळ अजून आली नव्हती.

21 येशू त्यांना हे देखील म्हणाला, “मी निघून जात आहे, आणि तुम्ही माझा शोध कराल, परंतु तुम्ही तुमच्या पापातच मरणार हे निश्चित आहे. मी जात आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही.” 22 त्याचे यहूदी विरोधक आपसात म्हणाले, “‘मी जात आहे, तेथे तुम्ही येऊ शकत नाही’ असे तो म्हणतो तेव्हा, तो स्वतःलाच ठार करणार आहे का? असा त्याचा अर्थ आहे की काय?”

23 येशू त्यांना बोलतच राहिला, “तुम्ही खालचे म्हणजे या पृथ्वीवरील आहात, परंतु मी वरील म्हणजे स्वर्गातून आहे. तुम्ही या जगाचे आहात. मी ह्या जगाचा नाही. 24 मी तुम्हाला सांगतो तुम्ही मराल आणि देव तुम्हाला तुमच्या अपराधांबद्दल दोषी ठरवेल. मी म्हणतो तसा मी देव आहे असा जर तुम्ही विश्वास ठेवत नाही तर हे निश्चितच घडेल.”

25 त्यांनी त्याला विचारले “तू कोण आहेस?” येशू त्यांना म्हणाला, “सुरवातीपासूनच, मी तुम्हाला सांगत आहे! 26 मी तुमचा न्याय करू शकतो आणि तुम्ही पुष्कळ गोष्टींबाबत दोषी आहात असेही म्हणू शकतो. त्याऐवजी, मी केवळ एवढेच म्हणतो: ज्याने मला पाठवले तो सत्य सांगतो, आणि मी त्याच्याकडून जे काही ऐकले आहे, केवळ तेच मी जगातील लोकांना सांगतो.”

27 तो पित्याविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही.

28 म्हणून येशू म्हणाला, मी—जो मनुष्याचा पुत्र, —म्हणजे मला वधस्तंभावर मारण्यासाठी उंच कराल तेव्हा, तुम्हाला कळेल की मी देव आहे, आणि मी काहीही माझ्या स्वतःच्या अधिकाराने करत नाही, हे तुम्हाला कळेल. 29 ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे, आणि मी त्याच गोष्टी करतो ज्याद्वारे त्याला आनंद होतो म्हणून तो मला एकटे सोडून गेला नाही.” 30 येशू ह्या गोष्टी बोलत असता अधिक जास्त लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

31 मग आता त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या यहूद्यांना येशू म्हणाला, “मी जे काही सांगितले ते सर्व तुम्ही ऐकले आणि तुम्ही जे काही करता त्यामध्ये असेच जगलात तर, तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात.” 32 तुम्हाला सत्य समजेल आणि ज्याही गोष्टीने तुम्हाला त्यांचे दास करून ठेवले आहे, त्यापासून मुक्त होण्यासाठी ते सत्य तुम्हाला घेऊन चालेल.” 33 त्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत, आणि कधीही कोणाचे दास नव्हतो. आम्हाला मुक्त होण्याची आवश्यकता आहे असे तुम्ही का म्हणता?

34 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हाला खरे सांगत आहे: जसा एखाद्या दासाला त्याच्या धन्याची आज्ञा पालन करण्याची सक्ती असते, तसेच जो कोणी पाप करतो तो देखील त्याच्या पापी इच्छेच्या आज्ञा पालन करतो. 35 एक दास कुटूंबात कायमचा सदस्य म्हणून राहत नाही परंतु कदाचीत त्याला घरी जाण्यासाठी मुक्त केले जाते किंवा विकले जाते. तथापी, एक पुत्र कुटूंबाचा सर्वकाळचा सदस्य आहे. 36 म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करेल तर, तुम्ही खरोखर बंधनमुक्त व्हाल.

37 तुम्ही अब्राहामाच्या कुटुंबातील आहात; तुम्ही त्याचे वंशज आहात, हे मला ठाऊक आहे. तरीसुद्धा, तुमचे लोक मला ठार मारण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काहीही सांगितले त्यावर तुम्ही भरवसा ठेवत नाहीत. 38 माझ्या पित्याने मला दाखवलेल्या अद्भुत गोष्टी आणि शहाणपणा ह्या सर्वांविषयी मी तुम्हाला सांगतो, परंतु तुम्ही केवळ तेच करत आहात जे तुमच्या पित्याने तुम्हाला करण्यासाठी सांगितले.”

39 त्यांनी त्याला उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पूर्वज आहे.” येशू त्यांना म्हणाला, “जर तुम्ही अब्राहामाचे वंशज असता तर, ज्या गोष्टी त्याने केल्या त्या तुम्ही देखील केल्या असत्या. 40 देवाकडून ऐकलेले सत्य मी तुम्हाला सांगितले आहे, परंतु तुम्ही मला ठार मारू पाहत आहात. अब्राहामाने अशा प्रकारच्या गोष्टी केल्या नाहीत. 41 नाही! तुमच्या खऱ्या पित्याने ज्या गोष्टी केल्या त्याच तुम्ही करत आहात.” ते त्याला म्हणाले, “आम्हाला तुझ्याविषयी तर ठाऊक नाही, परंतु आम्ही व्यभिचारापासून झालेली मुले नाही आहोत. आम्हाला केवळ एकच पिता आहे, आणि तो देव आहे.”

42 येशू त्यांना म्हणाला, “जर देव तुमचा पिता आहे, तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती कारण मी देवापासून आलो आहे आणि आता मी ह्या जगामध्ये आलो आहे. मी स्वतः येण्याचे ठरवले म्हणून मी आलो आहे असे नाही, कारण त्याने मला पाठवले म्हणून मी स्वतः येण्याचा निर्णय घेतला. 43 मी जे काही सांगतो ते तुम्हाला का समजत नाही हे मी तुम्हाला सांगतो. याचे कारण म्हणजे तुम्ही माझा संदेश किंवा माझे शिक्षण स्वीकारणार नाही. 44 तुम्ही आपला पिता, म्हणजे सैतानाचे आहात, त्याची जशी इच्छा आहे तसेच करण्याची तुम्ही इच्छा धरता. लोकांनी प्रथमच पाप केले होते त्या वेळे पासूनच तो घात करणारा आहे. त्याने देवाचे सत्य सोडून दिले आहे; ते त्याच्यामध्ये नाही. तो लबाड बोलतो तेव्हा तो त्याच्या स्वभावानुसार लबाड बोलतो, कारण तो लबाड आहे; जो प्रत्येकजण लबाड बोलतो तर तो सैतान त्याच्याकडून जे काही करू इच्छितो ते करतो.

45 मी तुम्हाला सत्य सांगतो, म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही! 46 तुमच्यापैकी कोणाला मी पाप केल्या बद्दल दोषी सापडतो? मी तुम्हाला सत्य सांगत असता, तुम्ही माझ्यावर विश्वास न ठेवण्याचे कोणते कारण द्याल? 47 जो कोणी देवाचा आहे तो त्याने जे काही सांगितले ते ऐकतो आणि तो जे काही सांगेल ती आज्ञा पाळतो. तुम्ही देवाचे नाहीत म्हणून तुम्ही त्याचे ऐकत नाही आणि त्याच्या संदेशाचे आज्ञापालन करत नाही.”

48 त्याच्या यहूदी शत्रूंनी त्याला उत्तर दिले, “तुम्ही खरोखर एक सत्य यहूदी नाही—तुम्ही एक शमरोनी आहात असे आम्ही म्हणालो तरी निश्चितच आम्ही योग्य आहोत!—आणि सैतान तुमच्यामध्ये राहतो!” 49 येशूने उत्तर दिले, “सैतान माझ्यामध्ये राहत नाही! मी माझ्या पित्याचा सन्मान करतो, आणि तुम्ही माझा अनादर करता!

50 माझी स्तुती करण्यास मी लोकांना भाग पाडत नाही. तेथे असा कोणीतरी आहे, जो मी ज्यासाठी पात्र आहे ते मला देऊ इच्छितो, आणि तोच मी जे काही बोलतो आणि करतो त्याचा न्याय करेल. 51 मी तुम्हाला सत्य सांगत आहे: जर कोणी माझे शब्द दृढ धरून राहतो, आणि मी दिला तसा त्यावर भरवसा ठेवतो, तर तो मनुष्य मरणार नाही!”

52 नंतर त्याचे यहूदी शत्रू त्याला म्हणाले, “आता आम्हाला खात्री झाली आहे की तुझ्यामध्ये भूत राहत आहे! अब्राहाम आणि संदेष्टेही फार काळापूर्वी मरण पावले आहेत! तरीसुद्धा तुम्ही म्हणता, जे काही तुम्ही शिकवले ते जर कोणी दृढ धरून राहतो तो मरणार नाही! 53 आमचा पिता अब्राहाम ह्याच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ नाही. तो मरण पावला आणि सर्व संदेष्टेही त्याच्याबरोबर मरण पावले. तुला काय वाटते तू कोण आहेस?”

54 येशूने उत्तर दिले, “लोकांनी माझी स्तुती करावी असे करण्याचा मी प्रयत्न केला तर, ते कदाचीत व्यर्थ होईल. जो माझी स्तुती करतो तो माझा पिता आहे, माझे चारित्र्य आणि माझे चांगूलपण, आणि तरीसुद्धा ज्याला तुम्ही म्हणता, ‘तो आमचा देव आहे’ तो हाच आहे. 55 तरी मी त्याला ओळखतो, तुम्ही त्याला ओळखत नाही. मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हटले तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेल. मी त्याला ओळखतो आणि जे काही तो सांगतो ते मी सर्वदा पाळीत असतो. 56 तुमचा पिता अब्राहाम आनंदी होता, जेव्हा एक संदेष्टा म्हणून, त्याने पुढे पाहिले आणि मी काय करू शकतो ते पाहिले.”

57 मग यहूदी पुढारी त्याला म्हणाले, “तुम्ही अजून पन्नास वर्षाचे देखील नाहीत! तुम्ही अब्राहामाला कधीच पाहिले नाही?” 58 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हाला सत्य सांगत आहे: मी, अब्राहामाच्या अगोदर होतो.” 59 यावरुन त्यांनी त्याला ठार मारण्यासाठी धोंडे उचलले. तथापि, येशूने स्वतःला लपवून, मंदिर सोडले आणि कुठेतरी निघून गेला.

Chapter 9

1 येशू हा तेथून पुढे जात असता, त्याने जो आपले संपूर्ण जीवन तो जन्मला, त्या दिवसापासून आधंळा होता असा एक मनुष्य पाहिला. 2 शिष्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, कोणाच्या पापामुळे हा मनुष्य आंधळा जन्मास आला? ह्या मनुष्याने स्वतःच पाप केले होते, किंवा त्याच्या आई-वडीलांमुळे हे होते?”

3 येशूने उत्तर दिले, “या व्यक्तीने किंवा त्याच्या आई-वडीलांनी पाप केले आहे असे नाही. तर देव त्याच्यामध्ये जे शक्तिशाली कार्य करणार आहे हे आज लोकांना पाहता यावे म्हणून तो आंधळा जन्मास आला. 4 ज्याने मला पाठविले त्याचे काम आम्ही दिवस आहे तोपर्यंत केले पाहिजे. रात्र तिच्या मार्गावर आहे आणि जेव्हा ती येते, तेव्हा कोणीही काम करू शकणार नाही. 5 मी या जगात आहे, तोपर्यंत मी या जगाचा प्रकाश आहे.

6 त्याने हे म्हटले असता, तो जमिनीवर थुंकला. त्याच्या लाळेने त्याने चिखल तयार केला आणि एका औषधाप्रमाणे त्याने त्या मनुष्याच्या डोळ्यांस लावला. 7 मग येशूने त्याला म्हटले, “जा आणि शिलोहाच्या तळ्यात धू.” (या तळ्याचा नावाच अर्थ म्हणजे ‘पाठवलेला’).म्हणून तो मनुष्य गेला आणि त्या तळ्यात जाऊन धुतले. तो परत आला तेव्हा तो पाहू शकत होता.

8 त्या मनुष्याचे शेजारी आणि तो भीक मागायचा तेव्हा त्याला इतर ज्यांनी पाहिले होते ते म्हणाले, “येथे जो बसत असे आणि भीक मागत असे हाच तो मनुष्य नाही का?” 9 काही म्हणाले, “हा तोच एक आहे.” इतर म्हणाले, “नाही, परंतु केवळ त्या मनुष्यासारखा तो दिसतो.” तथापि, तो मनुष्य स्वतः म्हणाला, “होय, मी तोच मनुष्य आहे!”

10 म्हणून तेव्हा ते त्याला म्हणाले, “आता तू पाहू शकतो हे कसे काय झाले आहे?” 11 त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने काही चिखल तयार केला आणि औषधाप्रमाणे त्याला माझ्या डोळ्यावर लावून त्याचा वापर केला. मग त्याने मला शिलोहाच्या तळ्यात जायला आणि ते तेथे धुवायला सांगितले. म्हणून मी तेथे गेलो आणि ते धुतले आणि, नंतर प्रथम वेळेस मी पाहू लागलो.” 12 ते त्याला म्हणाले, “तो मनुष्य कोठे आहे?” तो म्हणाला, “मला माहित नाही.”

13 त्या मनुष्याला तेथे असलेल्या काही लोकांनी त्याला परूश्यांच्या सभेत घेऊन गेले. 14 आता येशूने हा चमत्कार केला तेव्हा तो शब्बाथ दिवस होता. 15 म्हणून आता तो कसे काय पाहण्यास सक्षम झाला याबद्दल परूश्यांनी पुन्हा त्या मनुष्याला विचारले. तो त्यांना म्हणाला, “त्या मनुष्याने माझ्या डोळ्यांस चिखल लावला आणि तो मी धुऊन टाकला आणि आता मी पाहू लागलो.”

16 परूश्यांतील काही म्हणाले, “तो शब्बाथ दिवसाला पाळीत नाही म्हणून येशू हा मनुष्य देवापासून नाही हे आम्हाला माहिती आहे.” त्या गटातील इतरांनी विचारले, “प्रत्येकजण पाहतात असे शक्तीशाली कार्य तो एक पापी असला, तर तो कसे काय करू शकतो?” म्हणून परूश्यांच्या मध्ये तेथे एक मतभेद होता. 17 त्यांनी पुन्हा एकदा त्या आंधळ्या मनुष्याला विचारले, “तुझे डोळे पुनर्स्थापीत करणारा तोच आहे, असे तू त्याच्याबद्दल म्हणतोस काय?” तो मनुष्य म्हणाला, “तो एक संदेष्टा आहे.”

18 आता तो मनुष्य आंधळा होता नंतर पुन्हा पाहण्यासाठी सक्षम झाला आहे यावर येशूच्या विरूद्ध असलेल्या यहूद्यांनी यावर विश्वास ठेवला नाही. म्हणून त्या मनुष्याच्या आई-वडिलांची देखील चौकशी करता यावी ह्यासाठी त्यांना सभेत आणण्यासाठी त्यांनी कोणीतरी पाठवले.

19 त्यांनी त्याच्या आई-वडिलांना विचारले, “हा तुमचा मुलगा आहे का? त्याचा जन्म झाला होता त्या दिवसापासून तो आंधळा होता का? मग आता तो कसे काय पाहू शकतो?” असे तुम्ही म्हणता का? 20 त्याच्या आई-वडीलांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे हे आम्हाला माहित आहे. तो जन्मला तेव्हा तो आंधळा होता हे आम्हाला माहित आहे. 21 असे असले तरी, आता तो कसा काय पाहू शकतो हे आम्हाला माहित नाही. त्याचे डोळे कोणी बरे केले हे देखील आम्हाला माहित नाही. त्याला विचारा, स्वतःविषयी बोलण्याकरता तो पुरेसा वयात आलेला आहे.

22 येशू हा ख्रिस्त होता हे घोषित करणाऱ्या कोणालाही घ्यावे आणि सभास्थानातून त्याला बंदी घालावी या मताशी येशूविरूद्ध असणाऱ्या यहूदी पूर्वी एकमेकांशी सहमत होते. 23 म्हणूनच त्याचे आई-वडील म्हणाले, “त्याला विचारा, तो स्वतः:साठी बोलण्याकरता पुरेसा वयात आलेला आहे.”

24 मग जो मनुष्य आंधळा होता त्याला त्यांनी बोलाविले, आणि त्यांच्यापुढे या दुसऱ्यावेळी येण्यासाठी त्यांनी त्याला विचारले, तो तेथे आला, तेव्हा ते त्याला म्हणाले, “तू केवळ सत्य बोलशील हे वचन देवाला दे! तुला बरे केले तो हा मनुष्य एक पापी आणि आम्हाला मोशेने दिलेल्या नियमांना तो पाळीत नाही हे आम्हाला माहित आहे. 25 त्याने उत्तर दिले, “तो एक पापी आहे किंवा नाही हे मला माहित नाही. एक गोष्ट मला माहित आहे ती म्हणजे मी पूर्वी आंधळा होतो, परंतु आता मी पाहू शकतो.”

26 म्हणून ते त्याला म्हणाले, “त्याने तूला काय केले? आता तू पाहू शकतोस म्हणून त्याने तुला कसे बरे केले?” 27 त्याने त्यांना उत्तर दिले, “आधीच हे मी तुम्हाला सांगितले आहे, परंतु माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगावे अशी तुम्ही इच्छा का धरता?” तुम्ही देखील खंरच त्याचे शिष्य होऊ इच्छिता का?”

28 तेव्हा ते क्रोधित झाले आणि त्याचा अपमान केला: “तू त्या मनुष्याचा शिष्य आहेस, परंतु आम्ही मोशेचे शिष्य आहोत! 29 देव मोशेबरोबर बोलला हे आम्हाला माहित आहे; परंतु या मनुष्याबद्दल, तो अगदी कोठून येतो हे देखील आम्हाला माहित नाही.”

30 त्या मनुष्याने उत्तर दिले, “हेच अतिशय आश्चर्यकारक आहे! तो कोठून येतो हे तुम्हाला माहित नाही, परंतु तोच केवळ एक आहे ज्याने माझे डोळे उघडले आहे म्हणून मी पाहू शकतो! 31 देव जे लोक त्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करतात, अशा पाप्यांची प्रार्थना ऐकत नाही, परंतु जे लोक त्याची उपासना करतात आणि जे त्याला हवे आहे ते करतात त्यांची प्रार्थना तो ऐकतो.

32 जन्मापासून अंध असलेल्या एका मनुष्याला त्याचे डोळे उघडण्यास कोणीतरी सक्षम होते हे जगाच्या प्रारंभापासून ते कोठेही ऐकण्यात आले नव्हते! 33 हा मनुष्य देवाकडून आला नसता, तर त्यासारखे त्याला काहीच करता आले नसते!” 34 त्यांनी त्याला उत्तर दिले, तुझा जन्म पापामध्ये झाला आहे आणि तुझे सर्व आयुष्य संपूर्णपणे पापामध्ये जगला आहेस! आम्हाला शिकवण्यासाठी तू पात्र आहेस असे तुला वाटते काय?” मग त्यांनी त्याला सभास्थानातून बंदी घातली.

35 त्याने बरे केलेल्या मनुष्यासोबत परूश्यांनी काय केले, सभास्थानातून कसे त्यांनी त्याला बाहेर घालवून लावले याबद्दल येशूने ऐकले. म्हणून तो गेला आणि त्या मनुष्याला शोधू लागला. तो त्याला सापडला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? 36 त्या मनुष्याने उत्तर दिले, “गुरूजी, तो कोण आहे? मला सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो.” 37 येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहे. तुझ्याबरोबर जो आता बोलत आहे तोच तो आहे.” 38 तो मनुष्य म्हणाला, “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो.” मग तो त्याच्या गुडघ्यावर गेला आणि त्याची उपासना केली.

39 येशू म्हणाला, “जे पाहू शकत नाही त्यांनी पाहावे आणि जे पाहू शकतात त्यांनी आंधळे व्हावे म्हणून मी जगाचा न्याय करण्यासाठी या जगात आलो आहे.” 40 परूश्यांतील काही, जे येशूच्या आजुबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलतांना ऐकले, आणि त्यांनी येशूला विचारले, “आम्ही देखील आंधळे आहोत काय?” 41 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुमच्याकडे दोष नसता. तथापि, तुम्ही आता स्वतःचा बचाव करता आणि म्हणता, ‘आम्ही पाहत आहोत,’ म्हणून तुमचे दोष तुमच्या बरोबर आहेत.

Chapter 10

1 “मी तुम्हाला सत्य सांगत आहे: जो कोणी मेंढवाड्यांत प्रवेश करतो, त्याने नेहमी प्रवेशदारातून प्रवेश करावा. तो इतर कोणत्याही प्रकारे चढून जातो, तर तो मेंढराची काळजी घेणारा नाही, परंतु तो एक चोर आहे आणि मेंढरू चोरणारा एक गुन्हेगार आहे. 2 जो मनुष्य दरवाजाद्वारे मेंढवाड्यांत प्रवेश करतो तोच खरा मेंढपाळ आहे, कारण मेंढरांची तो काळजी घेतो.

3 मेंढपाळ दूर असतांना तो येतो तेव्हा दाराची काळजी घेणारा भाडोत्री मनुष्य त्याच्यासाठी दार उघडेल. तथापि, मेंढरे केवळ मेंढपाळाचाच आवाज ओळखतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो तेव्हा तो त्यांना खाऊ घालण्यासाठी आणि पाणी पाजण्यासाठी मेंढवाड्यातून बाहेर काढतो. 4 आपल्या सर्व मालकीची मेंढरे त्याने बाहेर आणल्यानंतर, तो त्यांच्या समोर जातो. ते त्याची वाणी ओळखतात म्हणून त्याची मेंढरे त्याच्या मागे जाण्यासाठी उत्सुक असतात.

5 एखाद्या अनोळखी व्यक्तीने त्यांना बाहेर येण्यासाठी बोलावले तर त्याच्या मागे ते कधीही जाणार नाहीत. ते त्या अनोळखीची वाणी ओळखत नाहीत म्हणून ते त्याच्यापासून दूर पळून जातील.”

6 येशूने या दृष्टातांचा उपयोग मेंढपाळांच्या कामापासून केला होता. असे असले तरी, तो त्यांना काय सांगत होता हे त्याच्या शिष्यांना समजले नाही.

7 म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हाला सत्य सांगत आहे: मी ते दार आहे ज्याद्वारे सर्व मेंढरे मेंढवाड्यांत प्रवेश करतील. 8 माझ्या अगोदर आलेले सर्वजण, ते चोर होते आणि मेंढरे चोरणारे गुन्हेगार होते; परंतु मेंढरांनी त्यांचे ऐकले नाही, आणि त्यांच्या मागे ते गेले नाही.

9 मी स्वतः त्या दारासारखा आहे. जो कोणीही प्रवेशदारातून आत प्रवेश करतो आणि मेंढ्वाड्यात जेथे मेंढरे आहेत तेथे जातो, तर तो सुरक्षित असेल, आणि तो बाहेर जाईल आणि चांगले कुरण शोधेल. मी त्याला त्या हिरव्यागार कुरणात घेऊन जाईन. 10 चोर केवळ चोरी, मारणे आणि नष्ट करण्यासाठी येतो; मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि कशाचीही उणीव पडू नये म्हणून आलो आहे.

11 मी एका उत्तम मेंढपाळासारखा आहे. उत्तम मेंढपाळ त्याच्या मेंढरांचे रक्षण आणि त्यांचा बचाव करण्यासाठी आपला जीव देतो. 12 मेंढरांची राखण करण्यासाठी कोणीतरी भाडोत्री मनुष्याला पैसे देतो. तो मेंढरांना ते त्याच्या मालकीचे आहेत त्याप्रमाणे वागवत नाही; तो केवळ नोकरी करणारा एक कर्मचारी आहे. म्हणून मेंढरांना मारण्यासाठी एक लांडगा येत आहे असे तो पाहतो, तेव्हा तो त्याचा जीव धोक्यात घालत नाही. तो मेंढरांना सोडतो आणि दूर पळून जातो म्हणून लाडंग्याला मेंढरावर हल्ला करण्यासाठी, त्यांच्यापैकी काहींना पकडण्यासाठी आणि, इतरांना छिन्नभिन्न करण्यासाठी शक्य होते. 13 भाड्याने घेतलेला कामगार केवळ पैशांसाठी काम करत आहे म्हणून तो दूर पळून जातो. मेंढरांसोबत काय होईल याबद्दल त्याला काळजी नाही.

14 मी स्वतः एक उत्तम मेंढपाळ आहे. माझी स्वतःची मेंढरे मला माहित आहे, आणि माझ्या स्वतःच्या मेंढराना मी माहित आहे. 15 जसे माझा पिता मला माहित आहे तसेच माझ्या पित्याला मी माहित आहे. म्हणून, मी माझ्या मेंढरांकरीत मरण्यासाठी तयार आहे. 16 तुम्ही ज्या मेंढराच्या गटात आहात त्या गटाशी ते संबधित नाहीत अशी माझी दुसरीही मेंढरे आहेत. त्यांनी माझे देखील ऐकावे असे मी करेन. ते माझे ऐकतील, त्यामुळे अखेरीस माझ्या अंतर्गत, केवळ मेंढ्याचा एकच कळप आणि एकच मेंढपाळ तयार असेल.

17 मी माझ्या जीवनाचा त्याग करणार आहे म्हणून माझा पिता माझ्यावर प्रीती करतो याचे हे एक कारण आहे. माझे जीवन मी देऊन टाकेन, आणि मी पुन्हा जगण्याकरता मला वर घेण्यात येईल. 18 कोणीही माझा जीव घेऊ शकत नाही. माझ्या स्वतःला बलिदान करण्यासाठी मी निवडले आहे. माझा जीव पुन्हा घेण्याचा मला अधिकार आहे आणि पुन्हा जगण्याचा देखील अधिकार मला आहे. हे कार्य माझ्या पित्याकडून आहे, आणि ते करण्यासाठी त्याने मला आज्ञा दिली आहे.”

19 येशू बोलत असतांना हे शब्द ऐकल्यानंतर, यहूदी लोक येशूबद्दलच्या त्यांच्या मतांमध्ये विभागले गेले. 20 त्यांच्यातील अनेकजण म्हणाले, “त्याला एक भूत नियंत्रित करत आहे आणि तो वेडा होण्यासाठी कारणीभूत झाले आहे. त्याचे ऐकत राहून वेळ वाया घालवू नका!” 21 इतर म्हणाले, “एक भूत एका मनुष्याच्याद्वारे असे कधी म्हणेल काय. तो काहीतरी म्हणत नाही. कोणत्याही भूताला एका आंधळ्या मनुष्याचे डोळे उघडता येत नाही!”

22 आता समर्पण नावाच्या सणाला साजरे करण्याची वेळ आली होती, यहूदी लोकांच्या पूर्वजांनी जेव्हा यरूशलेम मधील मंदिरास शुद्ध केले होते आणि ते पुन्हा देवाला समर्पित केले होते तेव्हा याची आठवण करण्याची तेव्हा ती वेळ होती. हिवाळ्यात ते होते. 23 येशू मंदिराच्या अंगणात ज्या जागेला शलमोनाची देवडी म्हणतात त्या ठिकाणी फिरत होता. 24 येशूचे यहूदी विरोधक त्याच्याजवळ जमले आणि म्हणाले, “आपण कोण आहात याबद्दल तुम्ही आम्हाला किती काळ आश्चर्यचकित ठेवाल? तुम्ही ख्रिस्त आहात तर आम्हाला स्पष्ट सांगा म्हणजे आम्हाला कळेल.

25 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले आहे, पंरतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. माझ्या पित्याच्या नावाने आणि त्याच्या अधिकाराच्याद्वारे मी चमत्कार आणि इतर गोष्टी करत आहे म्हणून मी कोण आहे हे तुम्हाला माहित आहे. माझ्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला जे काही आवश्यक आहे ते सर्व त्या गोष्टी सांगतात. 26 तुम्ही माझे नाही म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही दुसऱ्या मेंढपाळाची मेंढरे आहात.

27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांच्यापैकी प्रत्येकास नावानुसार ओळखतो; ती माझ्या मागे येतात आणि माझे ऐकतात. 28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. कोणीही कधीही त्यांचा नाश करू शकणार नाही, आणि माझ्यापासून कोणीही कधीही त्यांना चोरी करू शकणार नाही.

29 माझ्या पित्याने त्यांना मला दिले आहे; तो कोणापेक्षाही श्रेष्ठ आहे, म्हणून त्याच्यापासून कोणीही त्यांना चोरून दूर नेऊ शकत नाही. 30 मी आणि पिता एक आहोत.”

31 येशूच्या शत्रूंनी त्याच्यावर फेकण्यासाठी आणि त्याला ठार मारण्यासाठी पुन्हा दगड उचलले.

32 येशू त्यांना म्हणाला, “माझ्या पित्याने मला करण्यास सांगितले ते अनेक चांगल्या कार्यांना, गोष्टींना करताना तुम्ही मला पाहिले आहे. त्यापैकी कशासाठी तुम्ही मला दगड मारणार आहात?” 33 यहूदी विरोधकांनी उत्तर दिले, “तू काही चांगले काम केले आहे म्हणून आम्ही तुझे जीवन घेऊ इच्छित नाही, परंतु, तू केवळ एक मनुष्य असूनही, देवाचा अपमान करत आहेस आणि तुझ्या स्वतःला देव बनवत आहेस.”

34 येशूने त्यांना म्हटले, “देवाने ज्यांना राज्यकर्त्ये म्हणून नेमले होते त्यांना तो काय म्हणाला होता हे शास्त्रवचनामध्ये लिहिले आहे: तू देवा सारखा आहेस मी असे म्हटले आहे (महान सन्मानासह आणि अनेक प्रती शक्तीसह).’ 35 देवाने त्या नेत्यांना नेमले तेव्हा त्यांना तो हे म्हणाला. तर कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही, आणि हे खोटे आहे दर्शविले जाऊ शकते असे शास्त्रामध्ये काहीही नाही. 36 माझ्या पित्याने पूर्णपणे आणि केवळ त्याच्यासाठी वेगळे केले तो मी एक आहे. ज्याने मला येथे या जगात पाठविले होते तो एक आहे. मग ‘मी देवाचा पुत्र आहे’ मी देवाबरोबर समान आहे असे सांगण्यासाठी मी म्हटले, तेव्हा तुम्ही माझ्यावर का रागावलात?

37 माझ्या पित्याने मला करायला सांगितले ती कार्ये मी करत नसेन तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल अशी अपेक्षा मी करणार नाही. 38 तथापि, मी काय सांगतो तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही तरी ही कार्ये माझ्याबद्दल काय सांगत आहेत करत आहे, त्यावर त्या कामांवर तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही ते केले, तर माझा पिता माझ्यामध्ये आहे आणि मी माझ्या पित्यामध्ये आहे हे नंतर तुम्हाला कळेल आणि समजेल.”

39 त्यांनी हे ऐकल्यानंतर, ते येशूला पुन्हा धरावयास पाहू लागले, पंरतु तो त्यांच्यापासून आणखी एक वेळी दूर निघून गेला.

40 मग येशू पुन्हा यार्देन नदीच्या पूर्वेकडील भागा पलीकडे गेला. त्याच्या सेवेच्या सुरूवातीस बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने अनेक लोकांचा बाप्तिस्मा केला त्या ठिकाणी तो गेला. येशू काही दिवस तेथे राहिला. 41 पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने कधीही एक चमत्कार केला नाही, परंतु या मनुष्याने अनेक चमत्कार केले आहेत! योहानाने या मनुष्याविषयी जे सर्वकाही म्हटले आहे ते सर्व सत्य आहे!” 42 अनेक लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; तो कोण होता आणि तो त्यांच्यासाठी काय करणार आहे यावर त्यांनी आपला विश्वास ठेवला.

Chapter 11

1 लाजर नावाचा एक मनुष्य खूप आजारी पडला. बेथानी गावात मरीया आणि मार्था जेथे राहत तेथे तो राहत होता. 2 प्रभूवर तिची प्रीती दर्शविण्यासाठी आणि आदर देण्यासाठी जिने नंतर त्याच्यावर सुवासिक तेल ओतले होते आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले होते ती हीच मरीया होती. आजारी असलेला हा लाजर तिचा भाऊ होता.

3 म्हणून लाजराबद्दल येशूला सांगण्यासाठी त्या दोघी बहिणींनी कोणीतरी पाठवले; ते म्हणाले, “प्रभूजी, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे.” 4 येशूने लाजरच्या आजारपणाबद्दल ऐकले, तेव्हा तो म्हणाला, लाजरच्या मृत्यूनंतरही हा आजार संपणार नाही. देव अद्भुत गोष्टी करतो तेव्हा तो किती महान आहे म्हणून लोकांनी पाहावे आणि मी देवाच्या पुत्राने देखील शक्ती दाखवावी असा ह्या आजाराचा उद्देश आहे.”

5 आता मार्था, व तिची बहीण मरीया आणि लाजर यांच्यावर येशू प्रीती करत होता. 6 असे असले तरी, लाजर आजारी होता हे येशूने ऐकले तेव्हा, त्याला भेटण्यास जाण्यासाठी त्याने उशीर केला. तो जेथे होता तेथेच आणखी दोन दिवस राहिला.

7 तेव्हा आम्हा शिष्यांस तो म्हणाला, “चला आपण पुन्हा यहूदीया प्रांतात जाऊ या.”

8 शिष्य त्याला म्हणाले, “गुरूजी, केवळ थोड्या वेळेपूर्वी जे यहूदी तुझे विरोधक आहेत त्यांनी तुला दगडांनी मारून तुझा खून करण्याचा प्रयत्न करू पाहत होते, आणि आता आपणाला पुन्हा तेथे परत जायचे आहे!” 9 येशूने त्यांना उत्तर दिले, “एका दिवसामध्ये बारा तास प्रकाश असतो हे तुम्हाला माहिती आहे, हे खरे नाही का? दिवसाच्या वेळी चालत असलेला सुरक्षितपणे चालेल कारण रस्त्यात काय आहे हे तो पाहू शकतो.

10 तथापि, रात्रीच्या वेळे दरम्यान एखादा व्यक्ती चालतो तेव्हा तो पाहू शकत नाही म्हणून तो सहज अडखळू शकेल.”

11 येशूने या गोष्टी बोलल्यावर, तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु त्याला झोपेतून जागे करण्यासाठी मी तेथे जाईन.”

12 त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “प्रभूजी, तो झोपी गेला आहे, तर तो बरा होईल.” 13 येशू लाजराच्या मृत्यूविषयी खरे बोलत होता, परंतु झोपेतून विश्रांती मिळते हे आम्हाला सर्वांना माहिती आहे त्याबद्दल तो बोलतो आहे असे शिष्यांना वाटले. 14 मग त्याने स्पष्टपणे त्यांना सांगितले, “लाजर मरण पावला आहे;

15 परंतु, तुमच्याकरिता, तुम्ही माझ्यावर भरवसा का ठेवावा हे तुम्हाला पाहता यावे म्हणून तो मेल्यावर मी तेथे नव्हतो म्हणून मी आंनदीत आहे.” 16 मग ज्याला दिदुम म्हणत, तो थोमा आपल्या सोबतीच्या बाकीच्या शिष्यांना म्हणाला, “चला आपण येशूसोबत जाऊ या म्हणजे आम्ही देखील याच्याबरोबर मरावयास जाऊ शकतो.”

17 येशू बेथानीमध्ये आला, तेव्हा लाजर हा आधीच मरण पावला होता आणि त्याला कबरेत ठेऊन चार दिवस झाले आहेत असे त्याला कळले. 18 आता यरूशलेम शहर बेथानी नगरपासून केवळ सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होते. 19 लाजर आणि त्याच्या कुंटुबाला अनेक यहूदी ओळखत होते, मार्था आणि मरीया यांच्याकडे ते त्यांच्या भावाच्या मृत्युबद्दल त्यांचे सांत्वन करण्यास यरूशलेमहून आले होते. 20 येशू जवळपास आहे असे कोणीतरी बोलतांना मार्थाने ऐकले, तेव्हा त्याला भेटण्यासाठी ती बाहेर रस्त्यावर गेली. परंतु मरीया उठली नाही तर घरातच बसून राहिली.

21 मार्थाने येशूला पाहिले, तेव्हा ती त्याला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता. 22 तरीही, जे काही आपण देवाकडून मागता, ते देव आपल्याला देईल हे मला माहित आहे.” 23 येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”

24 मार्था त्याला म्हणाली, “देव शेवटच्या दिवशी सर्व मृत लोकांना उठवेल तेव्हा त्या दिवशी तो देखील पुन्हा जिवंत होईल हे मला माहित आहे.” 25 येशू तिला म्हणाला, मरणातून जो लोकांना उठवतो तो मीच आहे; जो त्यांना जीवन देतो तो मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवेल तो मेला असला तरीही, तो पुन्हा जिवंत होईल. 26 जे सर्वजण जीवन प्राप्त करतात ते माझ्याशी जुळले जातात आणि जे माझ्यावर विश्वास ठेवतात—ते कधीही मरणार नाहीत. तुझा माझ्यावर विश्वास आहे का?”

27 ती त्याला म्हणाली, “होय, प्रभूजी! देवाने जगामध्ये जो एक येईल असे अभिवचन दिले होते तो एक, जो देवाचा पुत्र ख्रिस्त, आपण आहात, आपण काय म्हणता त्यावर माझा विश्वास आहे आणि तुम्ही कोण आहात यावर माझा विश्वास आहे.

28 ती हे बोलल्यानंतर, ती घरी परत निघून गेली आणि तिची बहीण मरीया हिला एकांतात बाजूला घेतले आणि तिला म्हणाली, “गुरूजी येथे आहेत, आणि ते तुला बोलावत आहेत.” 29 मरीयेने हे ऐकले, तेव्हा ती लवकर उठली आणि त्याच्याकडे बाहेर गेली.

30 आता अजूनसुद्धा येशू त्या गावाच्या आत आला नव्हता; तो त्याच ठिकाणी होता जेथे त्याला मार्थाची भेट झाली होती. 31 जे लोक बहिणींना सांत्वन करण्यासाठी घरी आले होते. मरीयेला त्वरीत उठताना आणि बाहेर जातांना त्यांनी पाहिले. म्हणून लाजराला त्यांनी जेथे पुरले होते तेथे आपल्या भावासाठी शोक करण्यासाठी ती कबरेकडे जात आहे असा विचार त्यांनी केला म्हणून तेही तिच्या मागे गेले.

32 येशू होता त्या ठिकाणी मरीया आल्यावर; तिने त्याला पाहिले तेव्हा, ती त्याच्यासमोर जाऊन त्याच्या पाया पडली आणि म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मरण पावला नसता.”

33 येशूने तिला दुःखी आणि रडतांना पाहिले आणि तिच्या बरोबर जे शोक करणारे लोक होते त्यांना देखील रडतांना पाहिले तेव्हा तो त्याच्या आत्म्याच्या आंतरिक दुःखात मोठ्याने कळवळला आणि तो फारच अस्वस्थ झाला. 34 तो म्हणाला, तुम्ही त्याचे शरीर कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, या आणि पाहा.” 35 येशू रडला.

36 यावरून यहूदी लोक म्हणाले, “पाहा, लाजरावर त्याची किती प्रीती होती!” 37 तथापि, इतर काही म्हणाले, आंधळ्या मनुष्याचे डोळे याने उघडले नाहीत काय? मग या मनुष्याला मरण्यापासून याने का वाचवले नाही?”

38 येशू कबरेजवळ गेला तेव्हा तो शारीरिकरित्या खवळला आणि भावनिकरित्या उदास झाला. ती एक गुहा होती, आणि तिचे प्रवेशद्वार एका मोठ्या धोंड्याने झाकलेले होते. 39 येशूने त्या ठिकाणी उभे असलेल्या लोकांना आज्ञा दिली, “धोंड बाजूला करा.” तथापि, मार्थाने आक्षेप घेतला, “प्रभूजी, आता या वेळी तेथे एक दुर्गंधी वास येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.” 40 येशू तिला म्हणाला, “तू माझ्यावर भरवसा ठेवशील तर देव कोण आहे आणि देव काय करू शकतो हे मी तुला सांगितले तेव्हा हे मी तुला सत्य सांगितले नव्हते काय?”

41 मग त्यांनी ती धोंड काढून टाकली. येशूने वर स्वर्गाकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. 42 तू माझे नेहमी ऐकतोस हे मला माहित आहे. तू मला पाठविले हे खरे आहे आणि त्यांनी तुझ्यावर त्यांचा विश्वास ठेवावा म्हणून येथे जे उभे आहेत त्या लोकांच्या फायद्यासाठी मी हे बोललो आहे.”

43 त्याने असे म्हटल्यानंतर, मोठ्या आवाजात त्याने हाक मारली, “लाजरा, बाहेर ये!” 44 जो मनुष्य मरण पावला होता तो बाहेर आला! त्याचे हात आणि पाय अजूनही तागाच्या कपड्याच्या पट्ट्याने लपेटलेले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर गुंडाळलेले एक कापड तसेच तेथे होते. येशू त्यांना म्हणाला, “त्याला बांधून ठेवलेल्या त्या कपडाच्या पट्ट्या काढून टाका आणि त्याला सोडा. त्याला जाऊ द्या.”

45 परिणामी, अनेक यहूदी जे मरीयेला भेटण्यासाठी आले होते आणि येशूने काय केले हे ज्यांनी पाहीले, त्या सर्वांनी आपला विश्वास त्यावर ठेवला. 46 असे असले तरी, कित्येक इतर काही परूश्यांकडे गेले आणि येशूने जे काय केले ते त्यांना सांगितले.

47 तेव्हा मुख्य याजक आणि परूशी यहूदी धर्मसभेचे सर्व सदस्य एकत्रित जमले. ते एकमेकांशी म्हणाले, “आम्ही काय करणार आहोत? हा मनुष्य अनेक चमत्कार करत आहे. 48 आम्ही त्याला ते करत राहण्यासाठी परवानगी दिली, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमविरुद्ध बंड करेल. मग रोमी सैन्य येईल आणि आमचे मंदिर आणि आपले राष्ट्र दोन्ही नष्ट करतील!”

49 धर्मसभेवर त्यांच्यापैकी एक असलेला कयफा, हा त्या वर्षाचा मुख्य याजक होता. तो त्यांना म्हणाला, “तुम्हा सर्वांना काहीच माहित नाही! 50 संपूर्ण देशाचा नाश होण्यापेक्षा मनुष्यासाठी एक मनुष्य मरतो हे तुमच्यासाठी चांगले आहे हेही तुमच्या लक्षात येत नाही.”

51 आपल्या स्वतःच्या मनाला वाटले म्हणून तो बोलला असे नाही. तर त्याऐवजी, तो त्या वर्षाचा प्रमुख याजक होता, व येशू हा यहूदी राष्ट्रासाठी मरेल ही भविष्यवाणी त्याने केली होती. 52 परंतु येशू हा केवळ यहूदी राष्ट्रासाठीच नाही, परंतु देवाचे सर्व मुले जे इतर देशांत सर्वत्र वास्तव्य करतात त्यापासून तो त्यांना एका राष्ट्रात एकत्र आणून एक करावे म्हणून तो मरेल ही देखील भविष्यवाणी त्याने केली होती. 53 म्हणून त्या दिवसापासून पुढे, धर्मसभा परिषद येशूला कोणत्याही प्रकारे अटक करण्याचा आणि त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले.

54 यामुळे, येशू यापुढे आपल्या यहूदी विरोधकांमध्ये सार्वजनिकरित्या प्रवास करत नव्हता. त्याऐवजी, त्याने यरूशलेम सोडले आणि शिष्यांसोबत, रानाजवळच्या आणि वाळवंटी प्रदेशातील प्रांतांत एफ्राईम नावाच्या नगरास गेला. तेथे तो थोडा काळ त्याच्या शिष्यांबरोबर राहिला.

55 आता यहूद्यांचा वल्हांडण सण साजरा करण्याची वेळ अगदी जवळ आली होती, आणि देश आणि गावातून अनेक उपासक वर यरूशलेमला गेले. वल्हांडण सण साजरा करण्याची परवानगी त्यांना दिली जावी म्हणून यहूद्यांच्या नियमांनुसार स्वतःला शुद्ध करावे लागत, म्हणून ते तयारी करताना स्वतःला धुत असत. 56 वल्हांडण सणासाठी यरूशलेम येथे आलेले सर्व उपासक येशूला शोधत होते. ते मंदिरात गेले आणि उभे राहिले तेव्हा, ते एकमेकांना म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? वल्हांडणासाठी तो येणार आहे किंवा नाही?” 57 येशूला अटक करता यावे म्हणून यहूदी मुख्य याजक आणि परूश्यांनी तो कोठे आहे हे कोणालाही समजले, तर त्याने ते त्यांना कळवावे हे आदेश काढले होते.

Chapter 12

1 येशू वल्हांडण सण सुरू होण्याच्या सहा दिवस आधीच बेथानी येथे आला. बेथानी ते गाव होते जेथे लाजर हा मनुष्य राहत असे ज्याला मृत्यूनंतर येशूने पुन्हा जिवंत केले होते. 2 बेथानीमध्ये, येशूचा सन्मान करण्यासाठी तेथे त्यांनी एक मेजवानी दिली. मार्था जेवणाची तयारी करत होती, आणि लाजर जेवायला एकत्र बसले होते त्याचांमध्ये भोजन करत बसला होता. 3 मग मरीयेने महाग सुंगधी द्रव्याची एक कुपी घेतली (फासळी नावाची) आणि, येशूचा सन्मान करण्यासाठी, त्याच्या पायावर तिने ती ओतली आणि मग त्याचे पाय तिच्या केसांनी पुसले. सुगंधी द्रव्याच्या सुवासाने संपूर्ण घर भरून गेले.

4 तथापि, त्याच्या शिष्यांतील एकजण, यहूदा इस्कार्योत, (येशूचा त्याच्यामध्ये असलेला विश्वास ज्याने तोडला हा तो एक होता, आणि लवकरच तो येशूला त्याच्या शत्रूंना धरून देणार होता)—त्याने विरोध केला आणि म्हणाला, 5 “आम्ही हे सुगंधी द्रव्य तीनशे दिवसासाठी मजुरी मिळण्याकरता विकले पाहिजे असते आणि ते पैसे गरिबांना दिले असते.” 6 गरीब लोकांबद्दल त्याला काळजी होती म्हणून तो हे बोलला असे नाही, तर तो चोर होता म्हणून तो हे बोलला. त्याने ज्यात पैसे असे त्या पिशव्यांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती, पंरतु त्याला हवे तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या गरजेसाठी पैसे चोरून घेऊन टाकायचा.

7 तेव्हा येशू म्हणाला, “तिला एकटीला सोडून द्या! मी मरणार आहे आणि ते मला पुरणार आहेत त्या दिवसासाठी तिने हे सुगंधी द्रव्ये विकत घेतले आहे. 8 गरीब नेहमी तुमच्याबरोबर व तुमच्याजवळ असतील, परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असणार नाही.”

9 येशू बेथानीमध्ये आहे, हे यरूशलेममधील यहूद्यांच्या एका मोठ्या समुहाने ऐकले, म्हणून ते तेथे गेले. येशू तेथे होता म्हणून ते केवळ तेथे आले नाही, परंतु येशूने ज्याला जिवंत केले होते, त्या लाजराला देखील पाहायला ते तेथे आले होते. 10 तेव्हा मुख्य याजकांनी लाजराला ठार मारणे आवश्यक आहे हा निर्णय घेतला. 11 तसेच मुख्य याजकांनी जे काय शिकवले होते त्यावर अनेक यहूदी आता विश्वास न ठेवावयास हा त्याला कारण होता; त्याऐवजी, येशूवर ते त्यांचा विश्वास ठेवत होते.

12 दुसऱ्या दिवशी वल्हांडण सणासाठी आलेल्या मोठ्या जमावाने येशू यरूशलेमस परत येत आहे असे ऐकले. 13 म्हणून त्यांनी खजुरीच्या झाडाच्या फांद्या तोडल्या आणि तो शहराच्या नजीक आला म्हणून त्याचे स्वागत करण्यासाठी ते बाहेर गेले. ते गजर करत होते, “होसान्ना! प्रभूची स्तुती! प्रभूच्या नावाने जो एक येत आहे देव त्याला आशीर्वादित करो! इस्राएलाच्या राजाचे स्वागत आहे!”

14 येशू यरूशलेमच्या जवळ आला, तेव्हा त्याला एक गाढवाचे शिगंरू सापडले आणि त्यावर तो बसून, शहरात प्रवेश करू लागला. असे करण्याद्वारे, शास्त्रामध्ये जे काय लिहले आहे ते त्याने पूर्ण केले:

     15 “यरूशलेममध्ये राहणाऱ्या तुम्ही, घाबरू नका.

     पाहा! तुमचा राजा येत आहे.

     गाढवीच्या एका शिंगरावर बसून येत आहे!”

16 हे घडले तेव्हा, त्याच्या शिष्यांना ही भविष्यवाणीची पूर्णता होती हे समजले नाही. तथापि, येशूने आपले कार्य पूर्ण केल्यानंतर आणि देव म्हणून पूर्ण आधिकार त्याला पुन्हा प्राप्त झाले, त्यांनी परत मागे पाहिले आणि त्याच्याविषयी जे काही लिहिले होते आणि लोकांनी त्याच्या सोबत काय केले ते आठवले.

17 येशू सोबत चाललेल्या जमावाने जे पाहिले होते त्याविषयी ते इतरांना सारखे सांगत होते: येशूने लाजराला कबरेतून बाहेर बोलावले आणि त्याला पुन्हा जिवंत केले हे ते म्हणत होते. 18 येशूने आपली शक्ती त्यांना दाखवण्याकरता त्याने पुष्कळ सामर्थ्यशाली कृत्ये केली आहेत हे त्यांनी ऐकले होते म्हणूनही लोकसमुदायातील इतर लोक, त्याला भेटण्यासाठी शहराच्या दरवाजातून बाहेर गेले होते. 19 म्हणून परूशी एकमेकांस म्हणाले, “पाहा! येथे आम्हाला काही फायदा मिळत नाही. पाहा! संपूर्ण जग त्याच्या मागे चालत आहे!”

20 यरूशलेम येथे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी वर गेलेल्या काही लोकांपैकी काही ग्रीक होते. 21 ते फिलिप्पाकडे आले, जो गालील जिल्हयातील बेथसैदा येथील होता. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते; ते म्हणाले, “महाशय, येशूशी आमचा परिचय कराल का?” 22 म्हणून फिलिप्पाने हे अंद्रियाला सांगितले; आणि ते दोघेही गेले आणि त्यांनी येशूला सांगितले.

23 येशूने फिलिप्प आणि अंद्रियाला उत्तर दिले, “मी, मनुष्याच्या पुत्राने, केलेले सर्वकाही आणि त्या सर्व गोष्टी मी ज्या मी त्यांना सांगितल्या आहेत हे सर्व गोष्टी लोकांना दर्शविण्याची देवाची वेळ आली आहे. 24 मी तुम्हाला खरे सांगतो: गव्हाच्या एका दाण्याची पेरणी जोपर्यंत पृथ्वीवरील जमिनीत केली जात नाही आणि जोपर्यंत तो मरत नाही, तोपर्यंत तो केवळ एक बीज राहतो; परंतु तो जमिनीत मरण पावल्यानंतर, तो वाढतो आणि अनेक बींयाची निर्मिती करतो.

25 जो कोणीही स्वत:ला संतुष्ट करण्यासाठी जगतो, तो अयशस्वी होईल; परंतु जो कोणीही स्वत:ला संतुष्ट करण्यासाठी जगत नाही, तो सार्वकालिक जीवनासाठी त्याचे रक्षण करेल. 26 जर कोणी माझी सेवा करू इच्छित असेल, तर मी आहे तेथे माझा सेवकही असावा म्हणून माझ्या पाठीमागे तो असला पाहिजे. माझा पिता माझी सेवा करणाऱ्या प्रत्येकाचा आदर करेल.

27 आता माझा आत्मा मोठा अस्वस्थ होत आहे. मी असे बोलू काय, ‘पित्या, मी दु:ख सोसेन आणि मरेन तेव्हा त्या घटकेपासून मला वाचव!’? नाही, कारण या जगामध्ये मी येण्याचे हेच कारण आहे. 28 माझ्या पित्या, तू जे काही बोलला त्या सर्वांमध्ये, तू जे काही केले त्या सर्वांमध्ये, आणि या सर्वांमध्ये तू किती सामर्थ्यशाली आहेस ते दाखव!”

तेव्हा स्वर्गातून देव बोलला, मी आधीच माझा स्वभाव, माझे शब्द, आणि माझे काम दर्शविले आहे; आणि पुन्हा मी ते करीन!” 29 देवाचा आवाज तेथे असलेल्या जमावाने ऐकला, परंतु काही जण म्हणाले की केवळ मेघगर्जना झाली. इतर म्हणाले एक देवदूत येशूशी बोलला.

30 येशूने त्यांना उत्तर दिले, जो आवाज तुम्ही ऐकला तो देवाचा आवाज बोलत होता. तथापि, तो माझ्यासाठी नाही, परंतु तुमच्या लाभासाठी बोलला होता! 31 आता देवाने जगाचा न्याय करावा अशी वेळ आली आहे. आता या जगावर शासन करणाऱ्या सैतानाला काढण्याची ती वेळ आता आली आहे.

32 माझ्याकरिता, लोक मला वधस्तंभावर उंच करतात, तेव्हा माझ्या स्वतःकडे प्रत्येकाला मी आकर्षित करीन. 33 तो कसा मरेल हे लोकांना कळवण्यासाठी त्याने हे सांगितले.

34 जमावातील कोणी एकाने त्याला उत्तर दिले, “मसीहा सर्वकाळ जिवंत राहील असे आम्हाला शास्त्रांपासून समजले आहे, तर मनुष्याचा पुत्र मरेल तुम्ही असे का म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?” 35 येशूने उत्तर दिले, “माझा प्रकाश केवळ एका थोड्या वेळेकरता तुमच्यावर प्रकाशेल. माझा प्रकाश तुमच्याकडे आहे तोपर्यंत या प्रकाशात तुम्ही चाला, किंवा अंधकार तुम्हाला गाठेल. अंधारात चालणारे आपण कोठे जात आहोत हे ते पाहू शकत नाहीत! 36 तुमच्याकडे प्रकाश असतांना त्या प्रकाशात विश्वास ठेवा; नंतर तुम्ही त्या प्रकाशाचे व्हाल.

त्याने या गोष्टी बोलल्यानंतर, मग येशूने त्यांना सोडले आणि त्यांच्यापासून लपवून ठेवले.

37 येशूने अनेक चमत्कार केले असले, तरी त्याने त्यांना काय सांगितले होते त्यावर बहुतेक लोकांनी विश्वास ठेवला नाही. 38 फार काळापूर्वी यशया संदेष्ट्याने जे काय लिहिले होते ते पूर्ण होण्यासाठी असे झाले:

     “प्रभू, त्यांनी आमच्याकडून ऐकले आहे त्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवला आहे?

     प्रभू आमचा सुरक्षितपणे बचाव कसा करू शकतो हे आम्हाला त्याने दाखवले आहे!”

39 तरीदेखील, ज्या कारणासाठी यशयाने लिहिले होते ते त्याच्यावर विश्वास ठेवू शकले नाहीत:

     40 या कारणाने यशया पुन्हा म्हणाला,

     त्यांनी डोळ्यांनी पाहू नये म्हणून प्रभूने त्यांना तसे बनवले आहे,

     देवाने त्यांना हट्टी बनवले आहे;

     आपल्या डोळ्यांनी देखील ते पाहू शकत नाहीत,

     ते करू शकले असते तर त्यांना समजले असते;

     त्यांनी पश्चाताप केला असता आणि त्यांना क्षमा करावी म्हणून मी प्रार्थना केली असती.

     या कारणास्तव, मी त्यांना बरे करू शकत नाही!”

41 ख्रिस्त शक्तिशाली रीतीने देवाची सेवा करेल हे यशयाला समजले होते म्हणून त्याने या शब्दांना फार पूर्वीच लिहून ठेवले.

42 जरी हे सत्य होते, तरी यहूदी लोकांच्या अनेक पुढाऱ्यांनी त्यांचा विश्वास येशूवर ठेवला. असे असले तरी, परूशी त्यांना सभास्थानातून बंदी घालतील याची त्यांना खूप भीती वाटली म्हणून ते येशूमध्ये विश्वास ठेवतात याबद्दल त्यांनी बाहेर काहीही सांगितले नाही. 43 देव त्यांची प्रशंसा करेल यापेक्षा इतरांची प्रशंसा आणि आदर घेण्यास त्यांनी प्राधान्य दिले.

44 येशू एकत्रित आलेल्या जमावाला मोठ्याने म्हणाला, “जे कोणी त्यांचा विश्वास माझ्यावर ठेवतात तर केवळ ते आपला विश्वास माझ्यावर ठेवत नाहीत तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर देखील त्यांचा विश्वास ठेवतात. 45 तुम्ही मला पाहता, तेव्हा ज्याने मला पाठवले आहे त्याला देखील तुम्ही पाहत आहात.

46 मी या जगाचा प्रकाश म्हणून या जगामध्ये आलो आहे; जो कोणी त्याचा विश्वास माझ्यावर ठेवतो तो अंधारामध्ये राहणार नाही.

47 जे कोणी माझे वचन ऐकतात परंतु माझ्या आज्ञांचे पालन करण्यास नकार देतात त्यांचा न्याय मी करत नाही. मी जगाला दोष देण्याकरता या जगात आलो नाही.

48 जे कोणी मला नाकारतात आणि माझ्या संदेशाला पाळीत नाहीत तरीदेखील एक गोष्ट त्यांना दोषी करेल. मी त्यांच्याशी बोललो त्याला देशाच्याद्वारे ते दोषी ठरतील. 49 मी देवाबद्दल शिकवले, तेव्हा माझे विचार केवळ मी शिकवले नाही. तर ज्या पित्याने मला पाठविले आहे, त्यानेच मला मी काय बोलले पाहिजे आणि मी त्याला कसे बोलावे, याच्या मला सुस्पष्ट सूचना दिल्या आहेत. 50 लोकांनी सदासर्वकाळ कसे जगावे हे लोकांना शिकवावे, आणि माझ्या पित्याने मला जे काही बोलण्यासाठी सांगितले आहे तेच मी सांगितले आहे ह्या पित्याच्या सर्वात महत्वाच्या सूचना आहे हे मला माहित आहे.”

Chapter 13

1 आता, वल्हांडण सण सुरू होण्या आधीचा तो दिवस होता. येशूला आपल्या पित्याकडे परत जाण्याची आणि या जगाला सोडण्याची त्याची वेळ आली आहे हे माहित होते. या जगात जे त्याच्याबरोबर होते त्यांच्यावर त्यांनी किती प्रीती केली, आणि त्याच्या जीवनाच्या शेवटपर्यंत त्याने त्यांच्यावर प्रीती केली हे त्याने दाखवून दिले. 2 येशू आणि त्याचे शिष्य त्यांचे रात्रीचे भोजन घेण्याआधी, येशूला धरून त्याच्या शत्रूंच्या हाती द्यावे असे विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात आधीच घातले होते.

3 पित्याने येशूला पूर्ण शक्ती आणि सर्व गोष्टींवर पूर्ण अधिकार दिला आहे हे त्याला आधीच माहित होते. तो स्वतः देवाकडून आला आहे आणि देवाकडे लवकरच परत जाईल हे देखील त्याला माहित होते. 4 येशू भोजनावरून उठला. त्याने आपली बाह्यवस्त्रे काढली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधले. 5 त्याने एका गंगाळात थोडे पाणी ओतले आणि शिष्यांचे पाय धुवायला सुरूवात केली आणि त्या कापडाने पुसून त्यांच्या पायांना कोरडे करू लागला.

6 मग तो शिमोन पेत्राकडे आला, जो त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुण्यासाठी येता काय?” 7 येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुमच्यासाठी काय करत आहे, ते तुला आता समजणार नाही, परंतु नंतर तुला ते कळेल.” 8 पेत्र म्हणाला, “आपणास माझे पाय कधीही धुवू देणार नाही!” येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुझा माझा काही संबंध नाही.” 9 म्हणून शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका! माझे हात धुवा आणि माझे डोके देखील धुवा!”

10 येशू त्याला म्हणाला, “ज्याने स्नान केले आहे तर त्याला केवळ पाय धुण्याची आवश्यकता आहे. त्याचे उर्वरित शरीर आधीच स्वच्छ आहे. तुम्ही स्वच्छ आहात, परंतु तुम्ही सर्व नाही.” 11 त्याला धरून देणारा कोण आहे हे त्याला माहित होते. यामुळे तो म्हणाला “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”

12 त्याने त्यांचे पाय धुऊन झाल्यानंतर, त्याने आपली बाह्यवस्त्रे पुन्हा घातली. मग तो पुन्हा त्याच्या जागी बसला आणि म्हणाला, “मी तुमच्यासाठी काय केले आहे ते तुम्हाला समजले काय? 13 तुम्ही मला ‘गुरूजी’ आणि ‘प्रभू’ म्हणता. तर तुम्ही हे बरोबर म्हणता, कारण मी तसाच आहे. 14 मी तुमचा गुरू आणि प्रभू असून तुमचे पाय धुतले तर तुम्ही देखील एकमेकांचे पाय धुवावेत. 15 जसे मी तुमच्यासाठी केले तसे तुम्ही केले पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे अनुसरण्यासाठी एक उदाहरण दिले आहे.

16 मी तुम्हाला खरे सांगतो: एक दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही, किंवा एका संदेशवाहकाला ज्याने पाठवले त्या पाठवणाऱ्यापेक्षा तो मोठा नाही. 17 जर तुम्हाला या गोष्टी माहित आहेत, तुम्ही त्या कराल तर, तुम्ही किती धन्य व्हाल. 18 मी तुमच्या सर्वांबद्दल हे बोलत नाही. मी ज्याला निवडले आहे त्याला मी ओळखतो. तथापि, शास्त्रलेखामध्ये जे काय लिहिले आहे ते झाले पाहिजे: ‘एक मित्र म्हणून ज्याने माझ्याबरोबर माझी भाकर खाल्ली, तोच माझ्याविरुध्द गेला आहे आणि मला एका शत्रूप्रमाणे वागवले आहे.’

19 आता ते होईल तेव्हा मी देव आहे यावर तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून त्याने मला त्यांना धरून देण्यापूर्वीच मी तुम्हाला हे सांगत आहे. 20 मी तुम्हाला खरे सांगतो: मी ज्याला तुमच्याकडे पाठवतो त्याचा स्वीकार तुम्ही केला, तर तुम्ही माझा देखील स्वीकार करत आहात; आणि जो कोणी मला स्वीकारतो, तर ज्याने मला पाठवले आहे त्या माझ्या पित्याचा देखील स्वीकार करतो.”

21 येशूने हे बोलल्यानंतर, तो त्याच्या स्वतःमध्ये अस्वस्थ झाला. त्याने गंभीरतेने घोषीत केले, “मी तुम्हाला सत्य सांगत आहे: तुमच्यापैकी एकजण मला माझ्या शत्रूच्या हाती धरून देणार आहे.” 22 शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्यापैकी कोणाविषयी तो बोलत आहे याबद्दल ते गोंधळून गेले होते.

23 शिष्यांतील एक जण, ज्याला येशू विशेषकरून प्रीती करत असे, तो योहान, येशूच्या उराशी टेकलेला होता. 24 येशू कोणत्या शिष्याविषयी बोलत होता हे त्याने त्याला विचारले पाहिजे असे शिमोन पेत्राने योहानाकडे खुणावून म्हटले. 25 म्हणून योहान येशूच्या सामोरे झाला आणि शांतपणे त्याला विचारले, “प्रभूजी, तो कोण आहे?”

26 येशूने उत्तर दिले, “मी या वाटीत हा भाकरीचा तुकडा वाटीत बुडविल्यानंतर ज्याला देईन तोच तो एक आहे.” मग त्याने भाकरीचा तुकडा वाटीत बुडवून घेतला आणि तो शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत याला दिला. 27 यहूदाने जसेच त्या भाकरीच्या तुकडयाला घेतले, लागलीच सैतानाने त्याच्यामध्ये प्रवेश केला आणि त्याचा ताबा घेतला. येशू त्याला म्हणाला, “तुला जे करावयाची आवश्यकता आहे, ते लवकर करून टाक.”

28 येशू त्याला असे का म्हणाला होता हे मेजावर बसलेल्या एकालाही समजले नाही. 29 काहींना वाटले की कारण यहूदाजवळ पैशांची थैली होती, म्हणून येशू त्याला सांगतो आहे की, जा आणि वल्हांडण सणाच्या आवश्यक गोष्टी विकत घे. येशू गरिबांना काहीतरी देण्याकरिता यहूदाला सांगत होता असे इतरांना वाटले. 30 भाकरीचा तुकडा घेतल्यानंतर, यहूदा त्याच क्षणी बाहेर निघून गेला. त्यावेळी रात्र होती.

31 यहूदा बाहेर गेल्यानंतर, येशू म्हणाला, “आता मी, मनुष्याचा पुत्र, मी काय करत आहे देव त्याच्याबद्दल लोकांना कळवेल. तसेच देव काय करत आहे त्याबद्दल मी सुध्दा लोकांना कळवणार आहे आणि लोक त्यासाठी त्याची स्तुती करतील. 32 मी, मनुष्याचा पुत्र, लोकांना देवाशी ओळख करून देणार आहे आणि मी जसे त्याला सन्मान देत आलो आहे तसेच देव देखील मला सन्मानित करणार आहे. देव विलंब न लावता असे करणार आहे.

33 लहान मुलानों, मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल; परंतु, मी जसे यहूद्यांना सांगितले, आणि मी तुम्हाला देखील सांगतो, जेथे मी जात आहे, तेथे तुम्हाला येता येणार नाही.

34 मी ही नवी आज्ञा तुम्हाला देतो: जशी मी तुमच्यावर प्रीती करतो तसे तुम्ही देखील एकमेकांवर प्रीती करायला पाहिजे. 35 जर तुम्ही एकमेकांवर प्रीती केली, तर तुम्ही माझे शिष्य आहात हे सर्व लोकांना माहित होईल.”

36 शिमोन पेत्राने त्याला म्हटले, “प्रभूजी, आपण कोठे जात आहात?” येशूने उत्तर दिले, “जेथे मी जात आहे, तेथे आता तुला माझ्याबरोबर येता येत नाही; परंतु नंतर तू येशील.” 37 पेत्र म्हणाला, “प्रभूजी, मी आताच आपणाबरोबर का येऊ शकत नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण देईन! 38 येशूने उत्तर दिले, “पेत्रा, खरोखर माझ्यासाठी तू आपला प्राण देशील काय? मी तुला खरे सांगतो: तू मला ओळखत नाहीस असे तू तीन वेळा म्हणशील त्याआधी सकाळी कोंबडा आरवणार नाही!”

Chapter 14

1 “उदास किंवा चिंतित होऊ नका. तुम्ही देवावर विश्वास ठेवता; तसा माझ्यावरही विश्वास ठेवा. 2 माझा पिता जेथे राहतो तेथे राहण्याकरता पुष्कळ जागा आहेत. त्या नसत्या, तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तेथे तुमच्यासाठी एक जागा तयार करण्यासाठी जातो. 3 मी तुमच्यासाठी तेथे एक जागा तयार करण्यासाठी जात आहे, तर जेथे मी आहे तेथे तुम्ही माझ्याबरोबर असले पाहिजे म्हणून मी परत येईन आणि तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाईन.

4 मी कोठे जात आहे हे तुम्हाला माहिती आहे, आणि तो मार्ग तुम्हाला माहित आहे.

5 थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जात आहात हे आम्हाला माहित नाही. आम्हाला तो मार्ग कसा कळू शकेल?” 6 येशू त्याला म्हणाला, “मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मी जीवन आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही आणि तो त्याच्याबरोबर राहू शकत नाही. 7 तुम्ही मला ओळखले असते, तर तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे, तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिले आहे.”

8 फिलिप्प, येशूला म्हणाला, “प्रभूजी, आम्हाला पित्याला दाखवा, म्हणजे आमची जी इच्छा आहे ती सर्व पूर्ण होईल!” 9 येशू त्याला म्हणाला, “फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याबरोबर आहे, आणि अजूनही तू मला ओळखत नाहीस. ज्यांनी मला पाहिले आहे, त्यांनी माझ्या पित्याला पाहिले आहे. तर ‘आम्हाला पित्याला दाखवा’ असे तू का म्हणतोस?

10 मी माझ्या पित्यामध्ये आहे आणि पिता माझ्यामध्ये आहे, यावर तू विश्वास धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत—मी या गोष्टींचा विचार केला नाही; त्याऐवजी, माझा पिता माझ्यामध्ये आहे आणि माझ्याद्वारे कार्य करत आहे म्हणून या सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी ज्याने मला पाठविले आहे त्या गोष्टी माझ्या पित्याच्या आहेत. 11 मी पित्यामध्ये आहे आणि तो पिता हा माझ्यामध्ये आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा, किंवा तुम्ही सर्व चिन्हे आणि पराक्रमी कृत्ये करताना मला पाहिले आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा.

12 मी तुम्हाला खरे सांगतो: मी करतो त्या गोष्टी माझ्यावर विश्वास ठेवणारा कोणीही करेल. मी पित्याबरोबर असण्यासाठी जात आहे म्हणून तो याच्यापेक्षाही मोठे कार्य करेल. 13 माझ्या नावाने तुम्ही जे काही मागाल, ते मी देईन. मी, त्याचा पुत्र, सर्वकाही करतो म्हणून प्रत्येक जणांनी पित्याचा मान राखावा आणि त्यांनी पित्याला ओळखावे म्हणून मी हे सर्व करणार आहे. 14 तुम्ही माझ्यामध्ये आहात म्हणून पित्याला तुम्ही काहीही मागितले तर मी ते करेन.

15 माझ्यावर तुम्ही प्रीती करता तर मी तुम्हाला शिकवले आहे तसे तुम्ही जगाल. 16 मग पित्याने तुम्हाला आणखी एक भेट द्यावी म्हणून मी त्याला विनंती करीन, आणि तो तुमच्यासाठी दुसरा मदतनीस पाठवेल जो तुमच्याबरोबर सर्वकाळ राहण्यासाठी तो तुमच्याबरोबर येईल. 17 तो देवाबद्दलचे सत्य सांगणारा आत्मा आहे. या जगातील अविश्वासणारे लोक त्याचे स्वागत कधीही करणार नाहीत. हे जग त्याला पाहू शकत नाही किंवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तुमच्या बरोबर तो राहतो आणि तुमच्यामध्ये तो असेल.

18 मी तुमचा त्याग करणार नाही आणि तुमची काळजी घेण्याकरिता कोणीही नाही असे मी तुम्हाला सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन. 19 लवकरच जग मला पाहू शकणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्ही जिवंत राहाल. 20 तुम्ही मला पुन्हा पाहाल, तेव्हा मी पित्यामध्ये सहभागी झालो आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये सहभागी झाले आहात आणि मी तुमच्यामध्ये सहभागी झालो आहे.

21 माझ्या आज्ञा ज्या प्रत्येकांनी ऐकल्या आहेत आणि त्यांना पाळत आहेत, तर माझ्यावर प्रीती करणारे तेच आहेत. आणि ज्यांनी माझ्यावर प्रीती केली त्यांच्यावर माझा पिता देखील प्रीती करेल; मी त्यांच्यावर प्रीती करेन आणि मी स्वतःला त्यांच्यापुढे प्रकट करेन.”

22 मग यहूदा (इस्कार्योत नव्हे, परंतु त्याच समान नावाचा दुसरा शिष्य) येशूला बोलला. तो म्हणाला, “प्रभूजी, केवळ आम्हाला तुम्ही स्वतःला कसे प्रकट कराल आणि एवढ्या मोठ्या जगाला प्रकट होणार नाही?”

23 येशूने त्याला उत्तर दिले, “लोक माझ्यावर प्रीती करतात की नाही हे तुम्ही असे सांगू शकता: मी तुम्हाला जे काय सांगितले आहे ते करतात तर ते माझ्यावर प्रीती करतात. कोणतेही लोक याची आवड धरतात तर माझा पिता त्यांच्यावर प्रीती करेल. तो आणि मी त्याच्याकडे येईन आणि त्याच्यासोबत राहीन. 24 जे माझ्यावर प्रीती करत नाही म्हणून त्याच्यासाठी, मी त्यांना काय करण्यास सांगितले आहे ते पाळीत नाहीत. मी तुम्हाला सांगितले आहे त्या गोष्टी अशा काही नाहीत ज्या मी माझ्या स्वतः: च्या सांगण्याने ठरवल्या आहेत; त्याऐवजी, या गोष्टी माझ्या पित्याने मला तुम्हाला सांगण्यासाठी पाठविले आहे.

25 मी तुम्हांजवळ राहत असतांनाच तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. 26 मदतनीस, जो एक तुमचा असतो व बरोबर येतो—माझा पिता त्याला माझ्या नावाने पाठवील. तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे अशी प्रत्येक गोष्ट तो तुम्हाला शिकवेल. मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या सर्व गोष्टींची आठवण देखील तो तुम्हाला करून देईल. 27 मी तुम्हास शांती देऊन ठेवितो आहे म्हणून, मी तुम्हाला देत आहे ती माझी शांती आहे. या जगाचे असे काहीही आणि कोणीही तुम्हाला कधीच देऊ शकत नाही अशी एका प्रकारची शांती मी तुम्हाला देत आहे. म्हणून उदास किंवा चिंतित होऊ नका; आणि भयभीत होऊ नका.

28 मी निघून जात आहे आणि नंतर तुमच्याकडे परत येईन असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. जर तुमची प्रीती माझ्यावर असती तर मी परत पित्याकडे जात आहे कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे म्हणून तुम्हाला आंनद वाटला असता. 29 ते घड्ण्यास सुरू होईल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवावा, म्हणून या गोष्टी आता होण्याआधीच, मी तुम्हाला सांगितल्या आहेत.

30 मी जास्त काळ तुमच्याशी बोलू शकणार नाही कारण या जगाचा अधिपती येत आहे. तथापि, त्याला माझ्यावर अधिकार नाही, 31 आणि पित्याने मला जे काय करण्यासाठी आज्ञा दिली आहे ते मी करेन. मी पित्यावर प्रीती करतो हे जगाला सदासर्वकाळ माहित असावे म्हणून हे असे आहे. चला, आपण येथून जाऊया.”

Chapter 15

1 “मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. 2 माझ्यातील प्रत्येक शाखा जी फळ वाढवू शकत नाही—माझा पिता तिला कापून टाकतो आणि तिला काढून दूर फेकून देतो. प्रत्येक शाखा जी चांगली फळे देते, तिने आणखी अधिक फळ उत्पन्न करावे म्हणून तो तिची छाटणी करून तो तिला स्वच्छ करतो.

3 जो उपदेश मी तुम्हाला बोललो आहे त्यामुळे तुम्ही आधीच शुद्ध झाला आहात. 4 तुम्ही माझ्याशी जुळून राहा, आणि मी तुमच्याशी जुळून राहीन. शाखा म्हणून कोणत्याही प्रकारचे फळ तुम्ही स्वतःहून घेऊ शकत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही माझ्यावर अंवलबून राहत नाही आणि माझ्याशी जुळून राहत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही करू शकता येणार नाही.

5 मीच द्राक्षवेल आहे; तुम्ही त्याच्या शाखा आहात. तुम्ही माझ्याशी जुळून राहिला आणि मी माझ्या पित्याशी जुळून राहिलो, तर तुम्ही पुष्कळ फळ उत्पन्न कराल, कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्ही काहीही करू शकत नाही. 6 प्रत्येकजण जो माझ्याशी जुळून राहत नाही आणि माझ्यातून त्याचे जीवन काढून घेतो तर जसे एका मृत शाखेला फेकून टाकले जाते तसेच त्याला फेकले जाईल. तसल्या शाखांना एकत्रित गोळा केले जाईल आणि अग्नीमध्ये फेकण्यात येईल आणि त्या जळून जातील. 7 तुम्ही माझ्याशी जुळून राहिलात आणि माझ्या उपदेशानुसार जगलात, तर देवाला तुम्ही कोणतीही गोष्ट मागू शकता, आणि तो त्याला करेल.

8 तुम्ही खूप फळे उत्पन्न कराल, तेव्हा पित्याचा सन्मान लोकांनी करावा म्हणून ते कारण होईल. मग तुम्ही माझे शिष्य व्हाल.

9 पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे, म्हणून तशीच प्रीती मी तुमच्यावर देखील केली आहे. मला तुमच्यावर प्रीती करत राहण्याची परवानगी देत रहा.

10 मी तुम्हाला जे काय करण्यासाठी सांगितले आहे ते तुम्ही पाळले, तर तुमच्यावर प्रीती करण्याची परवानगी तुम्ही मला देत राहाल. या प्रकारे तुम्ही माझ्यासारखे व्हाल: माझ्या पित्याने मला काय करायचे आहे, ते मी पाळले आहे, आणि माझ्या आज्ञाधारकपणामुळे, मी त्याच्या प्रीतीमध्ये राहिलो आहे. ते तुमच्याबद्दल देखील खरे असेल. 11 माझा आंनद तुमच्यामध्ये असावा म्हणून, आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत.

12 मी तुम्हाला काय करण्यास आज्ञा दिली आहे ते हे आहे: मी तुमच्यावर प्रीती करतो तसेच एकमेकांना त्या प्रकारे प्रीती करा. 13 तुमचा जीव आपल्या मित्रांसाठी द्यावा, यापेक्षा आधिक मोठी प्रीती तुमच्याकडे असू शकत नाही.

14 माझ्या आज्ञा तुम्ही केवळ ऐकतच नाही परंतु त्यानुसार आपले जीवन देखील तुम्ही जगता तर तुम्ही माझे मित्र आहात. 15 मी तुम्हाला माझे दास म्हणून आता जास्त वेळ म्हणणार नाही, कारण दासाला त्याचा मालक काय करतो आहे हे समजत नाही, कारण माझ्या पित्याकडून जे सर्वकाही मी ऐकले ते सर्व तुम्हाला समजतील असे मी ते बनवले आहे जेणेकरून तुम्हाला देखील ते समजून घेता येतील.

16 तुम्ही मला निवडले नाही, परंतु मी तुम्हाला एका कारणासाठी निवडले आहे, यासाठी की, तुम्ही बाहेर जावे आणि जाऊन आधिक फळ द्यावे आणि यासाठी की, तुमचे फळ सदासर्वकाळ टिकावे. परिणामी, माझ्या नावाने जे सर्वकाही तुम्ही पित्याला मागाल, ते तुमच्यासाठी तो करेल. 17 मी तुम्हाला जी काय आज्ञा करतो आहे ती ही आहे: एकमेकांवर प्रीती करा.

18 जग तुमचा द्वेष करते, तर पाहिल्याने ते माझा द्वेष करतात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. 19 तुम्ही या जगातील अविश्वासणाऱ्यांमध्ये असाल, तर जग तुमच्यावर प्रीती करेल, आणि ते कशावर प्रीती करतात आणि ते काय करतात त्यावर तुम्ही प्रीती कराल. परंतु तुम्ही त्याच्यांमध्ये नाही; त्याऐवजी, त्यांच्यामधून बाहेर येण्यासाठी मी तुम्हाला निवडले आहे. म्हणून या जगाचे अविश्वासणारे तुमचा द्वेष करतात हे याचे कारण आहे.

20 मी तुम्हाला शिकवले तेव्हा हे लक्षात ठेवा: ‘एक सेवक त्याच्या धन्यापेक्षा मोठा नाही.’ त्यांनी मला दुःख दिले आहे म्हणून ते तुम्हाला देखील दुःख देतील याची तुम्हाला खात्री असू द्या. माझ्या शिकवणुकींचा त्यांच्यापैकी कोणी स्वीकार केला आणि त्यांचे पालन केले, तर तुम्ही जे काही शिकवाल त्याच्या मागे देखील ते चालतील. 21 ज्याने मला तुमच्याकडे पाठविले आहे, त्या माझ्या पित्याला ते ओळखत नाहीत आणि तुम्ही माझे प्रतिनिधित्त्व करत आहात म्हणून या जगातील अविश्वासणारे तुमच्यासोबत अत्यंत वाईट गोष्टी करतील. 22 मी आलो नसतो आणि त्यांना देवाचा संदेश सांगितला नसता, तर मला त्यांनी नकार दिला आणि माझा संदेश नाकारला म्हणून ते दोषी ठरले नसते. तथापि, आता मी आलो आहे आणि देवाचा संदेश त्यांना सांगितला आहे, आणि आता त्यांच्या पापाबद्दल त्यांना अजिबात क्षमा नाही.

23 जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. 24 माझे सामर्थ्य मी त्या गोष्टीत दाखवले, ज्या गोष्टी इतर कोणीही कधीही केल्या नाहीत, मी त्या गोष्टी त्यांच्यामध्ये केल्या नसत्या, तर ते त्या पापाबद्दल दोषी झाले नसते. आता त्यांनी मला पाहिले आहे, तरीही त्यांनी माझा द्वेष केला, आणि म्हणून माझ्या पित्याचा देखील त्यांनी द्वेष केला आहे. 25 हे शब्द त्यांच्या नियमशास्त्रामध्ये लिहिले होते आणि आता ते खरे ठरले आहेत: ‘कोणत्याही कारणाशिवाय त्यांनी माझा द्वेष केला.’

26 मदतनीस येतो, तेव्हा पित्याकडून येणारा आणि तुम्हाला सांत्वन देणारा तो एकच आहे. देव आणि माझ्याबद्दल असलेल्या सत्याला सांगणारा तो आत्मा आहे. मी कोण आहे हे तो सर्वांना सांगेल, आणि मी जे केले आहे ते सर्व तो प्रत्येकाला दाखवेल. 27 मी लोकांना शिकवणे आणि चमत्कार करणे सुरू केले तेव्हा तुम्ही त्या पाहिल्या दिवसापासून संपूर्णकाळ माझ्यासोबत आहात म्हणून माझ्याबद्दल जे काय तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही प्रत्येकाला सांगायलाच पाहिजे.”

Chapter 16

1 तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागले तर तुम्ही अडखळवले जाऊ नये किंवा माझ्यावर विश्वास ठेवणे थांबवू नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. 2 कठीण दिवस पुढे आहेत. तुम्हाला सभास्थानांमध्ये उपासना करण्यापासून तुमचे शत्रू थांबवतील. तथापि, यापेक्षा ही वाईट असे काहीतरी घडेल. लोक तुम्हाला ठार मारतील तेव्हा ते देवाला संतुष्ट करत आहेत असा विचार ते करतील असे दिवस येत आहेत.

3 पित्याला किंवा मला ते ओळखत नाहीत म्हणून ते हे करतील. 4 हे कठीण त्रास ज्यावेळी येतील, तेव्हा मी तुम्हाला चेतावणी दिली होती ते तुम्हाला आठवेल म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. मी तुमच्याबरोबर होतो म्हणून सुरूवातीला या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत.

5 “आता मी पित्याकडे परत जात आहे. ज्याने मला पाठविले हा तो एक आहे. ‘आपण कुठे जात आहोत’ हे विचारण्याचे धैर्य तुमच्यापैकी कोणाकडे सुध्दा नाही. 6 या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत म्हणून आता तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे. 7 मी तुम्हाला सत्य सांगतो, मी जात आहे हे तुमच्यासाठी चांगले आहे. मी जात नाही तोपर्यंत, जो तुम्हाला सांत्वन देतो तो मदतनीस तुमच्याकडे येणार नाही. मी जातो, तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.

8 तो मदतनीस येतो, तेव्हा त्यांनी केलेल्या पापाविषयी तो त्यांना दोषी ठरवेल; ते देवाच्या चांगुलपणाच्या दर्जा पर्यंत पोहचू शकणार नाहीत हे तो त्यांना दाखवेल; आणि देवाने त्यांना ते करू नये ही आज्ञा दिली परंतु त्यांनी ते केले म्हणून देव त्यांचा न्याय करेल हे वचन तो त्यांना देतो. 9 ते माझ्यावर त्यांचा विश्वास ठेवू शकत नाहीत म्हणून पापापासून त्यांचा दोष येतो. 10 मी माझ्या पित्याकडे परत जात आहे म्हणून देवाच्या चांगुलपणाच्या दर्जाची मोजमाप करणे त्यांना अशक्य आहे हे निश्चित होते, आणि पुढे तुम्हाला जास्त वेळ मला पाहता येणार नाही. 11 देव त्यांच्या पापाबद्दल त्यांच्या विरोधात त्याची शिक्षा आणेल तेव्हा त्यांचा अंतिम हिशोब होईल. सैतान, या जगाचा राजपुत्र, त्याने देवाविरुद्ध लढा दिला आहे म्हणून त्याला शिक्षा मिळेल हे शिक्षेद्वारे दर्शविले गेले आहे.

12 माझ्याजवळ अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. तथापि, मी त्यांना आताच सांगितले, तर या गोष्टी जाणल्यावर तुम्ही जगू शकणार नाही. 13 तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे त्या सर्व सत्यात तुम्हाला घेऊन जाईल. तो त्याच्या स्वतःच्या अधिकाराने बोलणार नाही, परंतु जे काही ऐकतो तेच तो बोलेल, आणि होणाऱ्या गोष्टींबद्दल तो तुम्हाला त्यावेळे अगोदर सांगेल. 14 मी कोण आहे हे तुम्हाला सांगून आणि मी काय केले ते तुम्हाला दाखवून तो आत्मा त्याद्वारे माझा सन्मान करेल. माझ्याकडून त्याने ऐकलेले सर्वकाही तो तुम्हाला समजावून सांगेल. 15 माझ्या पित्याचे सर्व काही माझ्या मालकीचे आहे. माझ्याकडून तो आत्मा जे काही प्राप्त करतो ते तो घेईल आणि तुम्हाला ते समजावून सांगेल म्हणूनच मी हे म्हटले आहे.

16 थोड्याच वेळात, तुम्ही मला पाहू शकणार नाही. मग थोड्या वेळानंतर, तुम्ही मला पाहू शकाल.”

17 म्हणून त्याच्या शिष्यांतील काही एकमेकांना म्हणाले, “‘थोड्याच वेळात, तुम्ही मला पाहू शकणार नाही,’ आणि मग थोड्या वेळानंतर, तुम्ही मला पाहू शकाल’ हे येशू आपल्याला म्हणतो तेव्हा त्याचा काय अर्थ आहे आणि मी माझ्या पित्याकडे परत जातो असे जे तो म्हणतो आणि त्याचा अर्थ काय?” 18 ते विचारत पुढे म्हणाले, ‘थोड्या वेळानंतर’ असे जे म्हणतो याचा अर्थ काय? तो काय म्हणत आहे हे आम्हाला समजत नाही.”

19 येशूला अधिक प्रश्न विचारण्याची त्यांची इच्छा आहे हे त्याने पाहिले. म्हणून येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मला काय म्हणायचे आहे हे तुम्ही एकमेकांना का विचारत आहात? मी म्हणालो की थोड्या वेळात, तुम्ही मला पाहू शकणार नाही; आणि नंतर थोड्या वेळाने, तुम्ही मला पुन्हा पाहू शकाल. 20 मी तुम्हाला खरे सांगतो: तुम्ही रडाल आणि शोक कराल, पंरतु जे जगाशी जुळले आहेत ते आनंद करतील. फार मोठ्या दुःखातून तुम्ही पुढे जाल, परंतु तुमचे दुःख आंनदात बदलेल. 21 एक स्त्री जी प्रसूत होत असते तेव्हा तिला श्रमाच्या वेदंनाचे दुःख होते हे असे आहे. तिच्या बाळाच्या जन्मानंतर, तिचे मूल जगामध्ये जन्माला आले म्हणून ती तिच्या आनंदामुळे ती तिच्या वेदना विसरून जाते.

22 तुम्हाला, तिच्यासारखे, आता दुःख आहे, पंरतु मी तुम्हाला पुन्हा पाहीन आणि देव तुम्हाला मोठा आनंद देईल तो आनंद तुमच्याकडून कोणीही घेऊ शकत नाही. 23 त्या दिवशी, मला विचारण्यासाठी आणखी प्रश्न तुमच्याकडे असणार नाहीत. मी तुम्हाला खरे सांगतो: तुम्ही पित्याजवळ काहीही मागाल, तर तुम्ही माझ्याशी जुळलेले आहात म्हणून तुम्ही मागाल तेव्हा तो तुम्हाला देईल. 24 आतापर्यंत, तुम्ही तसे काहीही मागितले नाही. मागा आणि तुम्हाला ते प्राप्त होईल, आणि देव तुम्हाला सर्व आनंदाने भरलेला असा आनंद देईल.

25 दृष्टांत आणि बोधकथेची भाषा वापरून, मी या गोष्टी बोलल्या आहेत, परंतु लवकरच एक वेळ येईल तेव्हा मी यापुढे या प्रकारची भाषा वापरणार नाही. त्याऐवजी, तुम्हाला स्पष्टपणे समजून घेता येईल अशा भाषेत माझ्या पित्याविषयीचे सर्व काही मी तुम्हाला सांगेन.

26 त्या वेळी माझ्या नावाने आणि देवाच्या उद्देशाच्या सांगण्यानुसार तुम्ही देवाला विनंती कराल. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला पित्याला विचारण्याची गरज नाही, 27 कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि तुमचा विश्वास माझ्यावर ठेवला आहे आणि मी देवापासून आलो हे तुम्हाला माहित आहे म्हणून पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो. 28 मी पित्यापासून आलो आहे, आणि मी या जगात प्रवेश केला आहे. आता मी या जगाला सोडून जात आहे, आणि मी पित्याकडे परत जात आहे.”

29 तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, “शेवटी! आता तुम्ही स्पष्टपणे बोलत आहात आणि लाक्षणिक भाषा वापरत नाही. 30 तुम्हाला सर्वकाही माहित आहे हे आता आम्हाला समजले आहे. तुम्हाला प्रश्न विचारण्याची आता गरज नाही. म्हणूनच आम्ही आमचा विश्वास तुम्हाला दिला, आणि तुम्ही देवाकडून आला आहात हे आम्हाला निश्चितपणे माहित झाले आहे.”

31 येशूने त्यांना उत्तर दिले, “आता शेवटी तुम्ही तुमचा विश्वास माझ्यावर ठेवता का? मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. जगात तुमच्यावर परीक्षा व दुःख आहेत,

32 पाहा! अशी वेळ येत आहे तेव्हा इतर लोक तुमची सर्वत्र दाणादाण करतील! प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या घरी जाईल, आणि तुम्ही मला सोडून जाल. तथापि, पिता नेहमी माझ्यासोबत असतो म्हणून मी एकटा असणार नाही. 33 तुम्हाला माझ्यामध्ये शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. या जगामध्ये तुमच्यावर दुःख आणि परीक्षा येतील, पण शूर व्हा! मी जगाला जिंकले आहे!”

Chapter 17

1 येशूने या गोष्टी बोलल्यानंतर, त्याने वर आकाशाकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पित्या, मी कोण आहे, मी तुझा पुत्र आहे, हे प्रत्येकाला प्रकट करण्याची आणि, त्यांना हे सांगण्यासाठी मी केले आहे ते सर्वांना दाखवण्याची आता तुझी वेळ आहे. मी, तुझा पुत्र, तू खरोखर कोण आहेस, तू एक महान राजा आहेस जो काहीही करू शकतो हे सर्वांना मला प्रकट करता यावे म्हणून हे कर. 2 तू मला, तुझ्या मुलाला, सर्व लोकांवर राज्य करण्याचा आधिकार दिला आहे म्हणून तू तसे कर. पित्या, तू मला या सर्वांना दिले आहेस—यासाठी की, मी त्यांना सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू हे केले आहेस.

3 हेच सार्वकालिक जीवन आहे: खरा पिता, व देव कोण आहे हे तुम्हाला माहित असणे, आणि तो एक तू या जगात पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला, म्हणजे मला माहित असणे. 4 तुझ्याबद्दलचे सर्व त्यांना दाखवण्यासाठी सर्व प्रकारचे लोक मी आणले आहेत. तू मला जे काम दिले ते पूर्ण करण्याद्वारे मी हे केले. 5 हे माझ्या पित्या, आम्ही जगाची निर्मिती केली त्याआधी आम्ही होतो, तसे मला तुझ्या स्वतःच्या उपस्थित घेऊन जाण्याद्वारे मला सन्मान दे.

6 या जगातून ज्या प्रत्येकाला तू माझ्याशी जुळण्यासाठी मला दिले आहेस—तर खरोखर तू कोण आहेस आणि तू कशासारखा आहेस हे मी त्यांना शिकविले आहे. ते तुझे आहेत आणि तू त्यांना मला दिले आहेस. तू त्यांना काय म्हणाला आहेस त्यामध्ये त्यांनी विश्वास ठेवला आहे, आणि त्यांनी त्याचे पालन केले आहे. 7 जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्याकडून आले आहे हे आता त्यांना माहित आहे. 8 तू मला जे संदेश दिले तेच मी त्यांना दिले, त्यांनी ते स्वीकारले, आणि आता, मी तुझ्याकडून आलो आहे याची त्यांना खात्री आहे, आणि तू मला पाठवले आहेस असा विश्वास ते धरतात.

9 मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. जे या जगामध्ये आहेत, जे तुझा सारखा विरोध करतात त्याच्यांसाठी मी प्रार्थना करत नाही. ज्यांना तू मला दिले आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो कारण ते तुझे आहेत. 10 माझ्याजवळ जे सर्वकाही आहे ते तुझे आहे, आणि तुझे जे सर्वकाही आहे ते माझे आहे. मी कोण आहे हे त्यांना माहित आहे, आणि मी कोण आहे याबद्दल ते प्रामाणिकपणे सत्य सांगतात. 11 मी आता यापुढे या जगात राहणार नाही. तथापि, ते जगामध्ये राहतात. मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, त्यांना सुरक्षित ठेव; जसे आम्ही आहोत, तसेच ते दोघे मिळून एकत्र असावे म्हणून तू मला दिलेल्या आहे त्याच शक्ती द्वारे तू त्यांना तुझ्यामध्ये ठेव.

12 मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत, मी त्यांना सुरक्षित ठेवले आणि तुझ्या स्वतःच्या शक्तीद्वारे त्यांच्यावर लक्ष ठेवले. शास्त्रलेखाने खूप आधी भाकीत केले होते म्हणून, ज्या एकाचा नाश करण्यासाठी त्यांनी ज्याला ठरवले होते त्याला वगळता, त्यांच्यापैकी कोणा एकाचाही नाश झाला नाही.

13 पित्या, आता मी तुझ्याकडे येत आहे. मी त्यांना माझा पूर्ण आनंद द्यावा म्हणून मी जगात होतो तोपर्यंत मी या गोष्टी त्यांना सांगितल्या आहेत. 14 तुझे संदेश मी त्यांना बोललो आहे, आणि जे या जगाचा भाग आहेत त्यांनी तुझ्या लोकांचा द्वेष केला आहे कारण ते या जगाचे नाहीत.

15 तू त्यांना या जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करत नाही, परंतु त्याऐवजी तो दुष्ट त्यांना नुकसान करू शकतो म्हणून त्याच्यापासून तू त्यांचे रक्षण करावे अशी मी विनंती करतो. 16 जसा मी जगाचा नाही, तसे तेही या जगाचे नाहीत. 17 तुझ्या स्वतःबद्दल त्यांना सत्य शिकवून तुझ्या स्वतःसाठी त्यांना वेगळे कर. तुझे संदेश पूर्णपणे खरे आहेत म्हणून तू त्यांना वेगळे करावे म्हणून त्यांना जे काही माहित असणे आवश्यक आहे ते त्यांना शिकव.

18 तू मला या जगात पाठवले, तसे मीही त्यांना या जगात पाठवित आहे. 19 त्यांना स्वतःला तुला देता यावे म्हणून मी माझ्या स्वतःला पूर्णपणे तुला दिले आहे.

20 मी केवळ त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाही, परंतु त्यांचे संदेश त्यांनी ऐकले तेव्हा ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी देखील मी प्रार्थना करत आहे. 21 जसा तू आणि मी एकत्र आहे तसे ते सर्व एकत्र व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पित्या, मी आणि तू एकत्र आहे, आणि मी तुमच्यासाठी सुध्दा—तसे ते देखील आमच्याशी एकत्र होऊ शकतात. तू मला पाठवले आहेस हे जगाला कळावे म्हणून हे कर.

22 मी कोण आहे हे मी त्यांना दाखवले आहे, आणि मी काय केले आहे हे त्यांनी पाहिले आहे. जसे तू आणि मी एकत्र आहोत तसे त्यांनी एकत्र व्हावे म्हणून मी त्यांना या गोष्टी शिकविल्या आहेत. 23 मी त्यांच्याबरोबर एकत्र आहे आणि तू माझ्याबरोबर एकत्र आहे. जसे तू माझ्यावर प्रीती करतो तसे तू त्यांच्यावर प्रीती करतो आणि तू मला पाठवले आहे हे अविश्वासणाऱ्यांना माहित व्हावे व त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे म्हणून मी हे केले आहे.

24 पित्या, मी तुझ्यासोबत असेन तेव्हा ती शोभा आणि वैभव तू मला देणार आहेस ते त्यांनी पाहावे म्हणून मी जिथे आहे तेथे ज्यांना तू मला दिले आहेस तेही माझ्यासह राहावे अशी माझी इच्छा आहे. आम्ही जगाची निर्मिती केली त्याआधीपासून तू माझ्यावर प्रीती केली आहे म्हणून तू असे कर.

25 हे धार्मिक पित्या, जग तुला ओळखत नाही; परंतु मी तुला ओळखतो; आणि त्यांच्यासाठी तू मला पाठवले आहेस हे त्यांना येथे माझ्याबरोबर ओळखले आहे. 26 मी त्यांना तू कोण आहेस हे कळविले आहे. मी त्यांच्याबरोबर एकत्र असावे म्हणून आणि तुम्ही माझ्यावर प्रीती करता तसे त्यांच्यावर देखील तुम्ही प्रीती करावी म्हणून मी हेच करत राहणे सुरू ठेवेन.”

Chapter 18

1 येशूने त्याची प्रार्थना संपवली, तेव्हा तो आपल्या शिष्यांसह गेला आणि किद्रोन ओहळाला पार केले. दुसऱ्या बाजूला तेथे जैतुनाच्या झाडाची वृक्षवाटिका होती. आणि ते त्याच्या आत शिरले.

2 येशूला त्याच्या शत्रूला धरून देण्याविषयी जो एक होता, त्या यहूदाला, ती जागा माहित होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे. 3 आता यहूदाबरोबर तेथे जावे असा आदेश मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी काही सैनिकांना आणि काही अधिकाऱ्यांना दिला. म्हणून ते कंदील, मशाल, आणि शस्त्रे घेऊन बागेत गेले. 4 आपल्यासोबत काय घडणार आहे हे येशूला माहित होते. म्हणून तो त्यांच्यापुढे गेला आणि त्यांना विचारले, “तुम्ही कोणाला शोधत आहात?” 5 त्यांनी त्याला उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” येशू त्यांना म्हणाला, “मी ती व्यक्ती आहे.” (मग यहूदा, जो त्याला त्यांना धरून देणार होता, तो त्यांच्याबरोबर होता.)

6 “मी ती व्यक्ती आहे.” हे येशू त्यांना म्हणाला, तेव्हा ते लगेच मागे वळले आणि जमिनीवर पडले. 7 म्हणून त्याने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाचा शोध घेत आहात” त्यांनी उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” 8 येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तो व्यक्ती आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही ज्याला शोधत आहात तो मी एक असल्याने, या इतर माणसांना जाऊ द्या. 9 आपल्या पित्याला तो प्रार्थना करत होता तेव्हा तो जे शब्द बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे क्रमाने घडले, “जे काही तू मला दिलेस त्यापैकी एक देखील मी गमावला नाही.”

10 तेव्हा शिमोन पेत्राने एक लहान तलवार बाहेर काढली आणि मुख्य याजकाच्या दासावर चालवली, मल्ख नावाचा एक मनुष्य होता, त्याचा उजवा कान कापून टाकला. 11 येशू पेत्राला म्हणाला, “तुझ्या तरवारीला तिच्या म्यानात परत घाल! मझ्याकरीता माझ्या पित्याने माझी योजना आखली आहे अर्थातच मी त्या मार्गाने मार्गस्त होईन.”

12 मग सैनिकांचा समूह, त्यांच्या कर्णधारा सोबत आणि मंदिरातील काही सुरक्षारक्षक, ह्यांनी येशूला अटक केली आणि त्याला त्यांनी पळून जाण्यापासून टाळावे म्हणून बांधून टाकले. 13 नंतर त्यांनी त्याला हन्नाकडे नेले, कयफा त्या वर्षाचा प्रमुख याजक होता, त्या कयफा या प्रमुख याजकाचा तो सासरा होता. 14 संपूर्ण लोकांचा नाश होण्यापेक्षा सर्व मनुष्यासाठी एक मनुष्य मरतो हे चांगले आहे असा सल्ला इतरांना ज्याने दिला होता तो हाच कयफा होता.

15 शिमोन पेत्र येशूच्या मागे मागे चालला आणि आणखी दुसरा एक शिष्य चालला. तो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता, म्हणून शिपायांनी येशूला अटक केली तेव्हा त्याला मुख्य याजकाच्या वाड्यात प्रवेश करण्याची परवानगी होती. 16 पेत्राला द्वारावरच थांबविण्यात आले. त्यामुळे दुसरा शिष्य पुन्हा बाहेर गेला आणि दरवाजाला राखीत होती त्या द्वारपाळ मुलीशी बोलला, आणि तिने पेत्राला आता जाऊ दिले.

17 ती दासी मुलगी पेत्राला म्हणाली, त्यांनी ज्याला अटक केली त्या मनुष्याच्या शिष्यांपैकी तू ही एक आहेस काय?” तो म्हणाला, “नाही, मी नाही.” 18 ते थंडीचे दिवस होते, म्हणून महायाजकाच्या सेवकांनी व मंदिराच्या रक्षकांनी कोळशाचा एक विस्तव पेटवला आणि त्याच्याभोवती ते उभे होते आणि स्वतःला शेकत होते. पेत्र देखील तेथे त्याच्यांसोबत होता. तो उभा होता आणि स्वतःला शेकत होता.

19 मुख्य याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी आणि तो त्यांना काय शिकवत होता याबद्दल प्रश्न केले. 20 येशूने उत्तर दिले, “मी प्रत्येकाशी उघडपणे बोललो आहे. सभास्थानात, मंदिरात, आणि ज्या ठिकाणी आमचे लोक एकत्र येतात तेथे मी नेहमी शिकवले आहे. मी गुप्तपणे काहीच बोललो नाही. 21 मग तुम्ही मला हे प्रश्न का विचारत आहात? मी त्यांना काय शिकवले हे ज्या लोकांनी ऐकले त्यांना विचारा. मी काय बोललो हे त्यांना माहित आहे.”

22 येशू या गोष्टी बोलला, तेव्हा मंदिराच्या पहारेकऱ्यांपैकी एक त्याच्याजवळ उभा होता त्याने त्याच्या हाताने त्याला जोरात चापट मारली. तो म्हणाला, मुख्य याजकाला असे उत्तर देण्याचा हा योग्य मार्ग नाही.” 23 येशूने त्याला उत्तर दिले, “मी काही चुकीचे बोललो, तर ते काय होते ते मला सांग. तथापि, मी जे बोललो ते बरोबर आहे, तर तू मला चापट मारायला नको होते!” 24 मग हन्नाने येशूला बांधलेलेच मुख्य याजक कयफाकडे पाठविले.

25 शिमोन पेत्र तेथे अजूनही उभा होता आणि स्वत:ला शेकत होता. आणखी एका व्यक्तीने त्याला म्हटले, “ज्याला त्यांनी अटक केली आहे त्या मनुष्याच्या शिष्यांपैकी पण तू एक आहेस काय?” तो म्हणाला, “नाही, मी नाही.” 26 पेत्राने ज्याचा कान कापला होता त्या मनुष्याचा एक नातलग, महायाजकाच्या दासापैंकी एक होता, तो त्याला म्हणाला. “नक्कीच, ज्या मनुष्याला त्यांनी अटक केली आहे, त्याच्यासोबत जैतून वृक्षवाटिका मध्ये मी तुला पाहिले आहे. की नाही?” 27 पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लागलाच, एक कोंबडा आरवला.

28 नंतर सैनिकांनी येशूला कयफाच्या घरातून रोमन राज्यपाल पिलाताच्या मुख्यालयात घेऊन गेले. ती अगदी पहाट होती. पिलात हा यहूदी नव्हता, त्यांनी त्याच्या मुख्यालयात प्रवेश केला तर ते स्वतःच अशुद्ध होतील आणि वल्हांडण सण साजरा करण्यास असमर्थ असतील म्हणून येशूवर आरोप करणाऱ्यांनी हा विचार केला. त्यामुळे ते आत गेले नाहीत. 29 म्हणून पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, तो म्हणाला, तुम्ही या मनुष्यावर कोणता आरोप करत आहात?” 30 त्यांनी उत्तर दिले, “हा मनुष्य एक गुन्हेगार नसता, तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केले नसते.”

31 तेव्हा पिलात त्यांना म्हणाला, “त्याला तुम्हीच घेऊन जा, आणि तुमच्या स्वतःच्या नियमांनुसार त्याचा न्याय करा.” तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी म्हटले, “आम्ही त्याला अंमलात आणु इच्छितो, परंतु आपले रोमी कायदा आम्हाला असे करण्यापासून रोखते.” 32 येशू कोणत्या प्रकारच्या मृत्यु ने मरणार होता याविषयी हे त्याने सांगितले होते ते खरे करण्यासाठी ते असे म्हणाले होते.

33 म्हणून पिलात परत आपल्या मुख्यालयात परत गेला. त्याने येशूला बोलावले आणि तो त्याला म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” 34 येशूने उत्तर दिले, “आपण स्वत:ला हे जाणून घेऊ इच्छित आहात म्हणून आपण विचारत आहात, किंवा इतरांनी आपल्याला हा प्रश्न विचारण्यास सांगितले आहे काय?” 35 पिलाताने उत्तर दिले, “मी एक यहूदी नाही! तुझे लोक आणि तुझ्या मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले आहे. तू काय चूकीचे केले आहे?” 36 येशूने उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते, तर माझ्या यहूदी विरोधक यांना मला स्वाधीन केले जात असतांना मला त्यांच्या हाती देण्यापासून वाचवण्याकरता माझ्या सेवंकानी लढाई केली असती, परंतु माझे राज्य या जगाचे नाही.” 37 मग पिलात त्याला म्हणाला, “मग तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय. देवाबद्दलचे सत्य लोकांना सांगावे म्हणून मी जन्मलो आणि या जगात आलो आहे. प्रत्येक जे सत्यावर प्रीती करतात ते माझे ऐकतात.

38 पिलाताने त्याला विचारले, “सत्य काय आहे?”

पिलाताने हा प्रश्न विचारल्यानंतर, तो बाहेर गेला आणि यहूदी पुढाऱ्यांशी पुन्हा बोलू लागला. तो त्यांना म्हणाला, त्याने कोणताही कायदा मोडला नाही असे मला दिसले. 39 तथापि, दरवर्षी दरम्यान वल्हांडण सणांत एक मनुष्य जो तुरूंगात आहे त्याला सोडण्याची विनंती तुम्ही करतात अशी एक रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?” 40 तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, “नाही या मनुष्याला सोडू नका, परंतु बरब्बाला सोडा!” आता बरब्बा हा एक लुटारू होता.

Chapter 19

1 मग पिलाताने येशूला पाठविले. त्याने त्याच्या सैनिकांना त्याला चाबकाने फटके मारण्यास अनुमती दिली. 2 आणि शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून तो त्याच्या डोक्यात घातला होता. त्यांनी त्याच्या अंगावर जांभळी वस्त्रे घातली होती. 3 त्यांनी त्याची थट्टा केली आणि म्हटले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” आणि त्यांनी त्याला पुन्हा पुन्हा मारले.

4 पुन्हा पिलात बाहेर आला आणि लोकांना म्हणाला, “पाहा, मी त्याला बाहेर तुमच्याकडे घेऊन येत आहे जेणेकरून तुम्हाला कळून येईल त्याला शिक्षा करण्यास काही कारण मला दिसत नाही.” 5 मग येशू काटेरी मुकुट आणि जांभळी वस्त्रे घालून बाहेर आला. पिलाताने त्यांना म्हटले, “पाहा, हा तो मनुष्य!” 6 जेव्हा मुख्य याजकाने व मंदिराच्या रक्षकाने त्याला पाहिले, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा! त्याला वधस्तंभावर खिळा!” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खिळा! माझ्यासाठी, त्याला शिक्षा करण्यास मला काही कारण दिसत नाही.”

7 यहूदी पुढाऱ्यांनी पिलाताला उत्तर दिले, “आमच्याकडे विशिष्ट कायदा आहे जे सांगतात तो मेला पाहिजे कारण तो स्वतःला देवाचा पुत्र जाहीर करतो.” 8 जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा तो अधिकच घाबरला. 9 तो पुन्हा त्याच्या मुख्यालयात दाखल झाला आणि त्याने शिपायांना येशूला परत आत आणण्यास सांगितले. मग त्याने येशूला विचारले, “तू कुठून आला आहेस?” परंतु, येशूने त्याला उत्तर दिले नाही.

10 म्हणून पिलात त्याला म्हणाला, “तू माझ्याशी बोलणार नाहीस का? तुला मुक्त करण्याचा मला अधिकार आहे, आणि वधस्तंभावर खिळण्याची मलाही भीती होती तुला माहित नाही का?” 11 येशूने उत्तर दिले, “जर वरून अधिकार देण्यात आला नसता, तर तुला माझ्यावर अधिकार नसता. म्हणून ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले तो तुझ्यामुळेच पाप घडला आहे.”

12 तेव्हापासून पिलाताने येशूला सोडण्याचा प्रयत्न केला, तथापि, यहूदी अधिकारी ओरडत राहिले, “जर तुम्ही या माणसाला जाऊ दिले, तर तू कैसराचा मित्र नाहीस! जो कोणी स्वतःला राजा बनवितो, तो कैसराच्या विरूद्ध आहे.” 13 जेव्हा पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने येशूला बाहेर आणले. मग पिलात त्याच्यासमोर न्यायाच्या आसनावर बसला, ज्या ठिकाणी तो सामान्यतः निकाल घोषित केले. त्याला “फरसबंदी” असे म्हणतात आणि अरामीमध्ये “गब्बाथा” होय.

14 आत्ता तो वल्हांडण सणाच्या अगोदरचा दिवस होता, हा तयारीचा दिवस असून दुपारची वेळ झाली होती तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “पाहा! येथे तुमचा राजा आहे!” 15 ते ओरडले, “त्याला घेऊन जा! त्याला घेऊन जा! त्याला वधस्तंभावर खिळा!” पिलाताने त्यांना सांगितले, “मी तुमच्या राजाला वधस्तंभी द्यावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसराशिवाय आम्हावर दुसरा कोणी राजा नाही.” 16 म्हणून पिलाताने येशूला त्यांच्या हाती दिले, आणि ते त्याला घेऊन गेले.

17 तो बाहेर गेला, त्याने स्वतःचा वधस्तंभ स्वतः वाहत “कवटीची जागा” म्हटलेल्या ठिकाणी गेला. अरामी भाषेत त्याला “गुलगुथा” म्हणतात. 18 त्यांनी त्याला तेथे वधस्तंभी खिळले. आणि त्याच वेळी, त्यांनी आणखी दोन गुन्हेगारांना त्याच्या बाजूला खिळले. येशू मध्यभागी, एक एक त्याच्याबाजूला होते.

19 पिलाताने कोणालातरी एकाला सांगितले सूचना लिही आणि ती पाटी येशूला वधस्तंभावर खिळण्याची सूचना दिली. ‘नासरेथचा येशू हा यहूद्यांचा राजा आहे.’ असे त्यावर होते. 20 बऱ्याच यहूदी लोकांनी हे वाचले, कारण येशूला जेथे वधस्तंभावर देण्यात आले होते ते ठिकाण शहराच्या जवळ होते. हे चिन्ह तीन भाषेत लिहिलेले होते. अर्खियन, ग्रीक, अरामी भाषेतही होते. 21 मुख्य याजक पिलाताकडे परत गेला आणि म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा’ असे लिहायला नको होते, त्याऐवजी ‘तर हा मनुष्य यहूदी लोकांचा राजा आहे’” असा दावा करतो, असे लिहा.” 22 पिलाताने उत्तर दिले, “जसे मी पत्र लिहित आहे, तसेच चिन्ह आहे.”

23 शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्यांनी त्याचे कपडे घेतले आणि चार भागात वाटले, प्रत्येकासाठी एक भाग पडला. तथापि, त्यांनी त्याचा अंगरखा वेगळा ठेवला. हा अंगरखा वर पासून तर खालपर्यत एका कापडाने बनविलेला होते. 24 म्हणून ते एकमेकांस म्हणाले, “आपण ह्याला फाडू नये, त्याऐवजी, तो कोणाला मिळेल हे आपण ठरवू त्याच्यासाठी बरेच फेकून देऊन तो एक तुकडा म्हणून कोण ठेवील ते ठरवू या.” हे यासाठी झाले की शास्त्रलेख खरा ठरावा ते असे,

     “त्यांनी त्यांच्यात माझे कपड्यांचे विभाजन केले.

     त्यांनी माझ्या कपड्यासाठी चिठ्या टाकल्या.”

25 येशूची आई, त्याच्या आईची बहीण, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया ह्या त्याच्या वधस्तंभाजवळ उभ्या होत्या. 26 जेव्हा येशूने ज्यावर त्याची विशेषतः प्रीती होती, त्या योहानाला आणि त्याच्या आईला, तेथे आजुबाजूला उभा असलेले पाहीले, तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला, “आई, येथे हा आहे जो तुझ्या पुत्रासारखा वागेल.” 27 आणि तो शिष्याला म्हणाला, “ही तुझी आई आहे!” मग त्या क्षणापासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी राहण्यासाठी नेले.

28 थोड्या वेळाने, देवाने त्याला जे काही करायला पाठवले ते आता पूर्ण झाले हे येशूला माहित होते, आणि आता शास्त्रवचनात भाकीत करण्यात आलेली एक अंतिम गोष्ट पूर्ण करण्यासाठी, तो म्हणाला, “मला तहान लागली आहे!” 29 एक आंबट द्राक्षारसाचे एक भांडे तेथे होते, म्हणून त्यांनी एका लहान झाडाची छोटी शाखा घेऊन त्यावर एक स्पंज लावला आणि ते आंबट द्राक्षारस ओलांडून येशूच्या तोंडावर ठेवून गेले. 30 मग येशूने द्राक्षारसाचा प्याला घेतला आणि म्हणाला, “तो पूर्ण झालाच आहे.” आणि त्याने त्याचे डोके खाली सोडले आणि तो मरण पावला.

31 हा तो वल्हांडण सणाचा तयारीचा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी शब्बाथ होता. शब्बाथ दिवशी वधस्तंभावर मृतदेह राहू देणे हे कायद्याच्या विरोधात होते, त्यामुळे त्यांनी पिलाताकडे जाऊन त्याला त्या तीन माणसाचे पाय तोडण्यासाठी विचारले ह्यासाठी त्यांनी लवकर मरावे आणि त्याचे शरीरे खाली घेतले जाईल. 32 म्हणून शिपायांनी येऊन येशूबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे मग दुसऱ्याचे पाय तोडले. 33 जेव्हा ते येशूकडे आले, त्यांनी पाहिले तो पहिलेच मेला आहे. म्हणून त्यांनी त्यांचे पाय मोडले नाहीत.

34 त्याऐवजी, एका सैनिकाने भाल्याने येशूच्या बाजूला भोसकले, आणि लगेच त्याच्या शरीरातून रक्त आणि पाणी बाहेर आले. 35 ज्या एकाने हे पाहीले तो साक्षी झाला—त्याची साक्ष खरी आहे, आणि तो खरे बोलतो हे त्याला माहीत आहे—म्हणून तुम्ही येशूवर विश्वास ठेवावा.

36 या गोष्टी पवित्र शास्त्रातील वचनाची परिपूर्ती व्हावी ह्यासाठी घडल्या “त्याचे एकही हाड कोणी मोडणार नाही.”

37 आणि दुसऱ्या शास्रभागात म्हटले आहे: “ज्याला त्यांनी भोसकले त्याला ते पाहतील.”

38 नंतर, ह्या गोष्टी झाल्यावर अरिमथाई येथील योसेफ, जो येशूचा शिष्य, परंतु गुप्त रीतीने कारण त्याला यहूद्यांची भीती वाटत होती, तो पिलाताकडे गेला आणि त्याला विचारले येशूचे शरीर घेवू शकतो का?. पिलाताने योसेफाला परवानगी दिली, म्हणून तो आत आला आणि त्याने येशूचे शरिरीर नेले. 39 निकदेम, जो येशूकडे रात्रीच्या वेळी भेटायला आला होता, तो देखिल आला आणि शरीर दफन करण्याच्या तयारीने गंधरस व कोरफड मसाले यांचे मिश्रणसुद्धा आणले. मसाल्यांचे वजन सुमारे ३४ किलो होते.

40 त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि तागाच्या कापड पट्ट्यामध्ये ते गुंडाळले, आणि त्यांनी पुर्ण कोरफड मसाल्यासहित त्याला गुंडाळले. 41 आता जेथे येशूला वधस्तंभी मारले होते तेथे एक बाग होती, त्या बागेच्या शेवटी एक नवीन थडगे होते आणि आतापर्यंत त्यात कोणालाच पुरले नव्हते. 42 त्यांनी ती कबर निवडली कारण वल्हांडण सण त्या संध्याकाळी सुरू होणार होता, आणि हाताच्या अंतरावर होता त्यामुळे त्यांनी लवकर येशूला तेथे पूरले. म्हणून त्यांनी येशूला तेथे ठेवले.

Chapter 20

1 मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दालिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले. 2 म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले, “त्यांनी प्रभूला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हांला माहित नाही.” 3 मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले. 4 तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला. 5 आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही. 6 मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून आला व थडग्यात आत गेला. 7 तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला. 8 शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तो सुध्दा आत गेला, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. 9 येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते. 10 मग शिष्य त्यांच्या घरी गेले.

11 पण मरीया थडग्यासमोर रडत उभी राहिली, ती रडत असता आत डोकावण्यासाठी वाकली. 12 आणि तिने दोन देवदूतांना पांढऱ्या पोशाखात जेथे येशूचे शरीर होते तेथे बसलेले पाहिले. एकजण डोक्याजवळ बसला होता व एकजण पायाजवळ बसला होता. 13 त्यांनी तिला विचारले, “बाई तू का रडत आहेस?” ती म्हणाली, “ते माझ्या प्रभूला घेऊन गेले आहेत आणि मला माहित नाही, त्यांनी त्याला कोठे ठेवले आहे.” 14 यावेळी ती पाठमोरी वळाली. तिने तेथे येशूला उभे असलेले पाहिले. पण तिला हे समजले नाही की तो येशू आहे. 15 तो म्हणाला, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाला शोधत आहेस?” तिला वाटले तो माळी आहे, ती म्हणाली, “दादा, जर तू त्याला कोठे नेले असशील, तर मला सांग तू त्याला कोठे ठेवले आहेस, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” 16 येशू तिला म्हणाला, “मरीये” ती त्याच्याकडे वळाली आणि अरामीक भाषेत मोठ्याने ओरडली, “रब्बानी!” (याचा अर्थ गुरूजी) 17 येशू तिला म्हणाला, “माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी अजून पित्याकडे गेलो नाही, तर माझ्या भावांकडे जा आणि त्यांना सांग मी माझ्या पित्याकडे व तुमच्या पित्याकडे व माझ्या देवाकडे व तुमच्या देवाकडे जात आहे.” 18 मरीया मग्दालिया ही बातमी घेऊन शिष्यांकडे गेली. “मी प्रभूला पाहिले आहे!” आणि तिने त्यांना सांगितले की, त्याने या गोष्टी सांगितल्या आहेत.

19 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हाला शांती असो.” 20 असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. 21 पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांती असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हाला पाठवितो.” 22 आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला, “पवित्र आत्मा स्वीकारा. 23 जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्याला पाप क्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही.”

24 आता थोमा (याला दिदुम म्हणत) बारा शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. 25 तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की, “आम्ही प्रभूला पाहिले आहे!” पण तो त्यांना म्हणाला, “त्याच्या हातांमधील खिळ्यांचे व्रण पाहिल्या शिवाय व खिळ्यांच्या व्रणांत माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही.” 26 एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणाला, “तुम्हांबरोबर शांती असो.” 27 मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव.” 28 थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभू आणि माझा देव!” 29 मग येशू त्याला म्हणाला, “तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस, पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत.”

30 आणखी या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ अद्भुत चिन्हे येशूने त्याच्या शिष्यांच्या समवेत केली. ती या पुस्तकात लिहिली नाहीत. 31 पण ही लिहिली यासाठी की, तुम्ही विश्वास ठेवावा की, येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हाला जीवन मिळेल.

Chapter 21

1 नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबीर्या सरोवराजवळ (जे गालीलात होते) त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले 2 काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते. 3 शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.” ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही. 4 दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे. 5 तो त्यांना म्हणाला, “मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का?” त्यांनी उत्तर दिले, “नाही.” 6 तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हाला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना. 7 तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, ‘तो प्रभू आहे!’ असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले. (कारण त्याने कपडे काढले होते) व पाण्यात उडी मारली. 8 दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले कारण ते काठापासून दूर नव्हते, फक्त शंभर यार्ड होते. 9 जेव्हा ते किनाऱ्याला आले, त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तव पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली. 10 येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही मासे आणा.” 11 शिमोन पेत्राने नावेत जाऊन एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठास आणले. इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही. 12 येशू त्यांना म्हणाला, ‘या, जेवा, “तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला, तू कोण आहेस, हे विचारायला धजला नाही. 13 मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली. 14 येशू मेलेल्यांतून उठल्यावर तो आपल्या शिष्यांस प्रगट होण्याची ही तिसरी वेळ.

15 मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले, येशू पेत्राला म्हणाला, “योहानाच्या मुला, शिमोना, तू माझ्यावर या सर्वापेक्षा अधिक प्रीती करतोस काय?”तो म्हणाला, “होय प्रभू, तुम्हाला माहित आहे की, मी तुमच्यावर प्रीती करतो.”येशू म्हणाला, “माझ्या कोकरांना चार.” 16 पुन्हा येशू म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू खरोखर माझ्यावर प्रीती करतोस का?” पेत्राने उत्तर दिले, “होय प्रभू तुम्हाला माहित आहे की मी तुमच्यावर प्रीती करतो.”येशू म्हणाला, “माझ्या मेढरांची काळजी घे.” 17 तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीती करतोस का?”पेत्र दु:खी झाला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, ‘तू माझ्यावर प्रीती करतोस का?’तो म्हणाला, “प्रभू, तुम्हाला सर्व गोष्टी माहित आहेत, तुम्हाला माहित आहे की, मी तुमच्यावर प्रीती करतो.”येशू म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार. 18 मी खरे सांगतो, तू तरूण होतास, तेव्हा तू स्वतः पोशाख करून तुला जेथे पाहिजे तेथे जात होतास. पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील, आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील. आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल.” 19 तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला, “माइयामागे ये.” 20 मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीती करत असे, तो त्यांच्यामागे येत होता. (हा तोच होता, जो भोजनाच्या वेळी येशूजवळ बिलगून बसला होता. आणि म्हणाला होता. “प्रभू, तुझा विश्वासघात कोण करणार आहे?)” त्याला पाहिले. 21 जेव्हा पेत्राने त्याला पाहिले, तेव्हा त्याने विचारले, ‘प्रभू, याचे काय?” 22 येशूने उत्तर दिले, “मी परत येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय? तू मला अनुसर.” 23 या कारणामुळे अशी अफवा बंधूवर्गात पसरली की, हा शिष्य मरणार नाही, पण येशू असे म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, तो फक्त म्हणाला, “मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे, अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?”

24 जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे. आणि त्याची साक्ष खरी आहे, हे आम्हांला माहित आहे. 25 आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत, ती एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही, असे मला वाटते.