2 Peter
2 Peter front
2 पेत्र याचा परिचय
भाग 1: सामान्य परिचय
2 पेत्र या पुस्तकाची रूपरेषा
- परिचय (1:1-2)
- परिचय (1:1-2)
- चांगले जीवन जगण्याची आठवण करून दिली कारण देवाने त्यासाठी आपल्याला सक्षम केले आहे (1:3-21)
- येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी तयार राहण्यासाठी प्रोत्साहन (3:1-17)
2 पेत्र हे पुस्तक कोणी लिहिले?
लेखक स्वतःची ओळख शिमोन पेत्र अशी करून देतो. शिमोन पेत्र हा प्रेषित होता. त्याने 1 पेत्र हे पुस्तक सुद्धा लिहिले. कदाचित पेत्राने हे पत्र तुरुंगात असताना त्याच्या मरण्याच्या थोडे अगोदर लिहिले असावे. पेत्र या पत्राला दुसरे पत्र म्हणतो म्हणून याची तारीख आपण पहिल्या पत्रानंतरची समजू शकतो. त्याने हे पत्र त्याच श्रोत्यांना संबोधित करण्यासाठी लिहिले जे पहिल्या पत्राचे श्रोते होते. हे श्रोते कदाचित आशिया मायनरमध्ये विखुरलेले ख्रिस्ती लोक असावेत.
2 पेत्र हे पुस्तक कश्याबद्दल आहे?
पेत्राने हे पत्र विश्वासणाऱ्यांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लिहिले. त्याने श्रोत्यांना खोट्या संदेष्ट्यांबद्दल जे म्हणतात की येशूला परत येण्यासाठी खूप वेळ लागणार आहे त्याबद्दल चेतावणी दिली. त्याने त्यांना सांगितले की येशू परत येण्यामध्ये आवकाश नाही. त्याऐवजी, देव त्यांना पश्चात्ताप करण्याची संधी देत आहे जेणेकरून ते वाचले जातील.
या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?
भाषांतरकार या पुस्तकाचे भाषांतर त्याच्या पारंपारिक शीर्षकाने “2 पेत्र” किंवा “दुसरे पेत्र” याने करू शकतात. किंवा ते स्पष्ट शीर्षकाची निवड करू शकतात, जसे की “पेत्राचे दुसरे पत्र” किंवा “पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र.” (पहा: नावे कशी भाषांतरित करावीत)
भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना
पेत्र ज्यांच्याविरुद्ध बोलला ते लोक कोण होते?
ज्या लोकांच्या विरुद्ध पेत्र बोलला ते कदाचित अज्ञातवासी म्हणून ओळखले गेले असावे. या शिक्षकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वचनांच्या शिक्षणाला विकृत केले. ते अनैतिक मार्गाने जगले आणि त्यांनी इतरांना सुद्धा तसेच जगायला शिकवले.
देव प्रेरित वचन याचा अर्थ काय?
वचनांचे तत्व हे खूप महत्वाचे आहे. 2 पेत्र वाचकांना हे समजण्यासाठी मदत करते की जरी प्रत्येक वचन लिहिणाऱ्या लेखकाची स्वतःची वेगळी पद्धत असते, तरी देव हा वचनाचा खरा लेखक आहे (1:20-21).
भाग 3: भाषांतराच्या महत्वाच्या समस्या
एकवचनी आणि अनेकवचनी “तु”
या पुस्तकात “मी” हा शब्द पेत्राला संदर्भित करतो. आणि “तुम्ही” हा शब्द नेहमी अनेकवचनी आहे आणि तो पेत्राच्या श्रोत्यांना संदर्भित करतो. (पहा: अनन्य आणि सर्वसमावेशक "आम्ही" आणि 'तुम्हीचे' रूपे)
2 पेत्राच्या पुस्तकाच्या मजकुरांमध्ये महत्वाच्या कोणत्या समस्या आहेत?
खालील काही वचनांसाठी, पवित्रशास्त्राच्या काही नवीन आवृत्त्या जुन्या आवृत्त्यांपेक्षा वेगळ्या आहेत. युएलटी मजकुरामध्ये आधुनिक वाचन आहे आणि जुने वाचन तळटीप मध्ये ठेवलेले आहे. पवित्र शास्त्राचे भाषांतर सामान्य क्षेत्रामध्ये अस्तित्वात असेल तर भाषांतरकारांनी त्या आवृत्त्यांमध्ये मिळणाऱ्या वाचनाचा विचार करावा. जर नसेल तर भाषांतरकारांनी आधुनिक वाचनाचे अनुसरण करण्याचे सुचवले जाते.
- “न्याय होईपर्यंत खाली अंधारात कैदेत ठेवले” (2:4). काही नवीन आवृत्त्यांमध्ये आणि जुन्या आवृत्त्यांमध्ये “न्याय होईपर्यंत डोहाच्या खालील अंधारामध्ये ठेवले” असे आहे.
- “ते तुमच्याबरोबर सण साजरे करत असताना त्याची कपटाची कृत्ये उपभोगतात” (2:13). काही आवृत्त्यांमध्ये “तुमच्याबरोबर प्रेमाच्या सणातील सण साजरे करत असताना ते त्यांच्या कृत्यांचा उपभोग घेतात” असे आहे.
- “बौर” (2:15). काही इतर आवृत्त्या “बोसोर” असे वाचतात.
- “सृष्टीतत्वे अग्नीद्वारे जाळली जातील आणि पृथ्वी आणि तिच्यातील कृत्ये प्रगट होतील” (3:10).इतर आवृत्त्यांमध्ये “सृष्टीतत्वे अग्नीद्वारे जाळली जातील आणि पृथ्वी आणि तिच्यावरील कृत्ये सुद्धा जाळली जातील” असे आहे.
(पहा: मजकुराचे प्रकार)
2 Peter 1
2 पेत्र 01 सामान्य माहिती
स्वरूप आणि संरचना
1-2 वचनात पेत्र औपचारिकरित्या या पत्राची ओळख करून देतो. पूर्वेकडील भागात प्राचीन काळी लेखक बऱ्याचदा पत्राची सुरवात या प्रकारे करत.
या अधिकारातील विशेष संकल्पना
देवाचे ज्ञान
देवाचे ज्ञान असणे म्हणजे त्याचे असणे किंवा त्याच्याबरोबर संबंध असणे. येथे “ज्ञान” हे मानसिकदृष्ट्या देव माहित असणे याच्यापेक्षा काहीतरी जसे आहे. हे ते ज्ञान आहे जे देवाला एखाद्या मनुष्याला वाचवावयास भाग पाडते आणि त्याला दया आणि शांती देते. (पहा: माहित आहे, ज्ञान, अज्ञात, वेगळे करणे)
दैवी जीवन जगणे
पेत्र शिकवतो की देवाने विश्वासणाऱ्यांना दैवी जीवन जगण्यासाठी ज्या कशाची गरज आहे ते सर्व दिले आहे. म्हणून, विश्वासणाऱ्यांनी देवाची आज्ञा अधिकाधिक पाळण्यासाठी ते करू शकतील ते सर्व काही केले पाहिजे. जर विश्वासणारे हे करत राहतील, तर ते त्यांच्या येशुबरोबर असलेल्या संबंधाद्वारे परिणामकारक आणि उत्पादक बनू शकतात. तथापि, जर विश्वासणारे दैवी जीवन जगत राहिले नाहीत तर, देवाने त्यांना वाचवण्यासाठी ख्रिस्ताद्वारे जे काही केले ते विश्वासणारे विसरले असे होईल. (पहा: धार्मिक, धार्मिकता, अधार्मिक, देवहीन, अधार्मिकता, देवहीनता आणि वाचविणे, वाचविले, सुरक्षित, तारण)
या अधिकारातील भाषांतराच्या इतर शक्य अडचणी
वचनाचे सत्य
पेत्र शिकवतो की या वचनात केलेल्या भविष्यवाण्या या मनुष्यांद्वारे केलेल्या नाहीत. पवित्र आत्म्याने देवाचे संदेश मनुष्यांवर प्रगट केले जे ते बोलले किंवा त्यांनी लिहून काढले. अजून, पेत्र आणि इतर प्रेषित लोकांना येशुबद्दल जे काही सांगतात त्या कथा त्यांनी बनवलेल्या नाहीत. येशूने जे काही केले ते त्याचे साक्षीदार आहेत आणि देवाने येशूला त्याचा पुत्र म्हणल्याचे त्यांनी ऐकले आहे.
2 Peter 1:1
पेत्र स्वतःची ओळख लेखक म्हणून करून देतो आणि ज्या विश्वासणाऱ्यांना तो लिहितो त्यांना ओळखतो आणि त्यांचे स्वागत करतो.
δοῦλος καὶ ἀπόστολος Ἰησοῦ Χριστοῦ
पेत्र येशू ख्रिस्ताचा सेवक असल्याचे बोलतो. त्याला ख्रिस्ताचा प्रेषित होण्याचे पद आणि अधिकार सुद्धा दिला होता.
τοῖς ἰσότιμον…λαχοῦσιν πίστιν
या लोकांनी विश्वास प्राप्त केला हे याला सूचित करते की, देवाने तो विश्वास त्यांना दिला. पर्यायी भाषांतर: “त्यांना ज्यांना देवाने तसाच पूर्ण विश्वास दिला” (पहा: गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती)
τοῖς…λαχοῦσιν
ज्यांनी प्राप्त केले आहे त्या तुम्हाला. पेत्र सर्व विश्वासणाऱ्यांना जे हे पत्र वाचतील त्यांना संबोधित करत आहे.
ἡμῖν
येथे “आम्ही” या शब्दाचा संदर्भ पेत्र आणि इतर प्रेषितांशी येतो, परंतु ज्यांना तो लिहित आहे त्यांच्याशी येत नाही. पर्यायी भाषांतर: आम्ही प्रेषितांनी प्राप्त केले” (पहा: अनन्य आणि सर्वसमावेशक "आम्ही")
2 Peter 1:2
χάρις…καὶ εἰρήνη πληθυνθείη
देव एकमेव आहे जो विश्वासणाऱ्यांना दया आणि शांती देतो. पर्यायी भाषांतर: “देव तुमच्यावर दया आणि शांती करत राहो” (पहा: गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती)
χάρις…καὶ εἰρήνη πληθυνθείη
पेत्र शांतीबद्दल बोलत आहे जसे ती एक वस्तू आहे जिला तिच्या आकारमानात किंवा संख्येत वाढऊ शकतो. (पहा: रूपक)
ἐν ἐπιγνώσει τοῦ Θεοῦ, καὶ Ἰησοῦ τοῦ Κυρίου ἡμῶν
तुम्ही “ज्ञान” याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुम्ही देव आणि येशू आमचा प्रभू याला ओळखण्याद्वारे” (पहा: भाववाचक नामे)
2 Peter 1:3
पेत्र विश्वासणाऱ्यांना देवभक्तीचे जीवन जगण्याबद्दल शिकवण्यास सुरवात करतो.
πρὸς ζωὴν καὶ εὐσέβειαν
येथे “देवभक्ती” हे “जीवन” या शब्दाचे वर्णन करते. पर्यायी भाषांतर: “देवभक्तीच्या जीवनासाठी” (पहा: हेंडिडाईस)
τοῦ καλέσαντος ἡμᾶς
येथे “आम्हाला” हा शब्द पेत्र आणि त्याच्या श्रोत्यांना संदर्भित करतो. (पहा: समावेशक आणि अनन्य "आम्ही")
2 Peter 1:4
δι’ ὧν
येथे “हे” याचा संदर्भ “त्याचे स्वःताचे वैभव आणि चारित्र्य” याच्याशी येतो.
γένησθε…κοινωνοὶ
तुम्ही कदाचित विभागूण घ्यावे
θείας…φύσεως
देव कशासारखा आहे
ἀποφυγόντες τῆς ἐν τῷ κόσμῳ ἐν ἐπιθυμίᾳ φθορᾶς
पेत्र त्या लोकांनी भ्रष्टाचारानी ग्रस्त न होण्याबद्दल बोलतो जे दुष्ट इच्छांच्या कारणामुळे घडतात जसे की ते त्या भ्रष्टाचारांपासून सुटणे आहे. “भ्रष्टाचार” हा शब्द एक अमूर्त संज्ञा आहे जिला मौखिक वाक्यांशासह भाषांतरित केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेणेकरून जगातील दुष्ट इच्छा तुम्हाला अजून भ्रष्ट करू शकणार नाहीत” (पहा: रूपक आणि भाववाचक नामे)
2 Peter 1:5
αὐτὸ τοῦτο
याचा संदर्भ पेत्राने या आधीच्या वचनात काय सांगितले त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “कारण देवाने जे काही केले आहे त्यामुळे” (पहा: गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती)
2 Peter 1:7
τὴν φιλαδελφίαν
याचा संदर्भ मित्र किंवा कुटुंबातील सदस्यासाठी असणाऱ्या प्रेमाशी येतो आणि त्याचा अर्थ आत्मिक कुटुंबातील सदस्यासाठीचे प्रेम असा सुद्धा होतो.
2 Peter 1:8
ταῦτα
याचा संदर्भ विश्वास, चारित्र्य, ज्ञान, आत्म नियंत्रण, सहनशीलता, देवभक्ती, बंधुप्रिती, आणि प्रेम, ज्यांचा उल्लेख पेत्राने आधीच्या वचनात केला त्याच्याशी येतो.
οὐκ ἀργοὺς οὐδὲ ἀκάρπους καθίστησιν
पेत्र अशा व्यक्तीबद्दल बोलतो ज्याच्याकडे हे गुण नाहीत जसे की तो त्या शेतासारखा आहे जे पीक उत्पन्न करीत नाही. हे कर्तरी सज्ञांमध्ये सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तुम्ही उत्पन्न कराल आणि फलद्रूप व्हाल” किंवा “तुम्ही परिणामकारक असाल” (पहा: रूपक आणि दुहेरी नकारात्मक)
ἀργοὺς οὐδὲ ἀκάρπους
या शब्दांचा मूळ अर्थ हा एकच गोष्ट होतो आणि हा मनुष्य उत्पादक नसेल किंवा येशूला ओळखल्यामुळे कोणत्याही फायद्याचा अनुभव न घेणारा यावर भर देतो. पर्यायी भाषांतर: “उत्पादनक्षम नसलेला” (पहा: दुप्पट काम)
εἰς τὴν τοῦ Κυρίου ἡμῶν, Ἰησοῦ Χριστοῦ, ἐπίγνωσιν
तुम्ही “ज्ञान” याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुम्ही देव आणि येशू आमचा प्रभू याला ओळखण्याद्वारे” (पहा: भाववाचक नामे)
2 Peter 1:9
ᾧ…μὴ πάρεστιν ταῦτα
कोणताही व्यक्ती ज्याच्याकडे या गोष्टी नाहीत
τυφλός ἐστιν μυωπάζων
पेत्र अशा व्यक्तीबद्दल बोलतो ज्याच्याकडे हे गुण नाहीत जसे की तो दूरदृष्टी नसलेला किंवा आंधळा आहे कारण त्याला त्याची किंमत कळत नाही. पर्यायी भाषांतर: एक दूरदृष्टी नसलेल्या व्यक्तीप्रमाणे आहे जो त्याचे महत्व पाहू शकत नाही” (पहा: रूपक)
τοῦ καθαρισμοῦ τῶν πάλαι αὐτοῦ ἁμαρτιῶν
तुम्ही याचे भाषांतर करण्याकरिता क्रियापदाचा उपयोग करू शकता. पर्यायी भाषांतर: “की देवाने त्याला त्याच्या जुन्या पापापासून शुद्ध केले आहे” (पहा: भाववाचक नामे)
2 Peter 1:10
βεβαίαν ὑμῶν τὴν κλῆσιν καὶ ἐκλογὴν ποιεῖσθαι
“बोलवणे” आणि “निवडणे” या शब्दांचा अर्थ सामायिक आहे आणि त्याचा संदर्भ देवाने त्यांना त्याचे लोक होण्याकरिता निवडले असा होतो. पर्यायी भाषांतर: “देवाने खरोखर तुम्हाला त्याचे होण्याकरिता निवडले आहे याची खात्री करा” (पहा: दुप्पट काम)
οὐ μὴ πταίσητέ
येथे “अडखळणे” या शब्दाचा संदर्भ एकतर 1) पाप करणे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही पापी स्वभावामध्ये राहणार नाही” किंवा 2) ख्रिस्ताशी अविश्वासी बनणे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही ख्रिस्ताशी अविश्वासू बनणार नाही” (पहा: रूपक)
2 Peter 1:11
πλουσίως ἐπιχορηγηθήσεται ὑμῖν ἡ εἴσοδος εἰς τὴν αἰώνιον βασιλείαν
हे सकारात्मक स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव सार्वकालिक राज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हास विपुलतेने पुरवील” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
ἡ εἴσοδος
प्रवेश करण्याची संधी
2 Peter 1:12
पेत्र विश्वासणाऱ्यांना सतत आठवण करून देतो आणि त्यांना शिकवणे याबद्दलच्या त्याच्या कर्तव्याबद्दल सांगतो.
ἐστηριγμένους ἐν τῇ…ἀληθείᾳ
या गोष्टींच्या सत्याबद्दल तुम्ही ठामपणे विश्वास ठेवता.
2 Peter 1:13
διεγείρειν ὑμᾶς ἐν ὑπομνήσει
येथे “हलवणे” या शब्दाचा अर्थ एखाद्याला झोपेतून उठवणे असा होतो. पेत्र त्याच्या वाचकांना या गोष्टींबद्दल विचार करण्यास भाग पाडतो जसे की तो त्यांना झोपेतून उठवत आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्हाला या गोष्टींबद्दल आठवण करून देतो जेणेकरून तुम्ही त्यांच्याबद्दल विचार कराल” (पहा: रूपक)
ἐφ’ ὅσον εἰμὶ ἐν τούτῳ τῷ σκηνώματι
पेत्र त्याच्या शरीराबद्दल बोलतो जसे की ते एक तंबू आहे ज्याला त्याने रोवला आहे आणि तो ते काढून टाकेल. त्याच्या शरीरात असणे हे तो जिवंत असण्याचे प्रतिक आहे, आणि ते काढून टाकणे हे मरण्याचे प्रतिक आहे. पर्यायी भाषांतर: “जोपर्यंत मी या शरीरात आहे” किंवा “जोपर्यंत मी जिवंत आहे” (पहा: रूपक आणि शिष्टोक्ती)
2 Peter 1:14
ταχινή ἐστιν ἡ ἀπόθεσις τοῦ σκηνώματός μου
पेत्र त्याच्या शरीराबद्दल बोलतो जसे की ते एक तंबू आहे ज्याला त्याने रोवला आहे आणि तो ते काढून टाकेल. त्याच्या शरीरात असणे हे तो जिवंत असण्याचे प्रतिक आहे, आणि ते काढून टाकणे हे मरण्याचे प्रतिक आहे. पर्यायी भाषांतर: “मी लवकरच हे शरीर काढून टाकेल” किंवा “मी लवकरच मरणार आहे” (पहा: रूपक आणि शिष्टोक्ती)
2 Peter 1:15
ἑκάστοτε, ἔχειν ὑμᾶς…τὴν τούτων μνήμην ποιεῖσθαι
येथे “या गोष्टी” यांचा संदर्भ आधीच्या वचनात पेत्राने जे काही सांगितले त्या सर्वांशी येतो.
μετὰ τὴν ἐμὴν ἔξοδον
पेत्र त्याच्या मृत्यूबद्दल बोलतो जसे की तो दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एखादे ठिकाण सोडत आहे. पर्यायी भाषांतर: “माझ्या मृत्यूनंतर” किंवा “मी मेल्यानंतर” (पहा: रूपक आणि शिष्टोक्ती)
2 Peter 1:16
पेत्र त्याचे शिक्षण विश्वासणाऱ्यांना स्पष्ट करून सांगत राहतो आणि ते विश्वासयोग्य का आहे ते सुद्धा स्पष्ट करत राहतो.
οὐ γὰρ σεσοφισμένοις μύθοις ἐξακολουθήσαντες
येथे “आम्ही” हा शब्द पेत्र आणि इतर प्रेषितांना संदर्भित करतो, परंतु त्याच्या वाचकांना संदर्भित करता नाही. पर्यायी भाषांतर: “कारण आम्ही प्रेषित चतुराईने बनवलेल्या कथांचे अनुसरण करीत नाही” (पहा: अनन्य आणि सर्वसमावेशक "आम्ही")
τὴν…δύναμιν καὶ παρουσίαν
हे दोन वाक्यांश कदाचित एकाच गोष्टीला संदर्भित करतात आणि त्यांचे भाषांतर एकच वाक्यांश असे केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “सामर्थ्यवान येत आहे” (पहा: हेंडिडाईस)
τοῦ Κυρίου ἡμῶν Ἰησοῦ Χριστοῦ…παρουσίαν
शक्य अर्थ हे आहेत 1) प्रभू येशूचे भविष्यातील येणे किंवा 2) प्रभू येशूचे पहिले येणे.
τοῦ Κυρίου ἡμῶν Ἰησοῦ Χριστοῦ
येथे “आमचा” हा शब्द सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो. (पहा: समावेशक आणि अनन्य "आम्ही")
2 Peter 1:17
φωνῆς ἐνεχθείσης αὐτῷ…ὑπὸ τῆς Μεγαλοπρεποῦς Δόξης
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेंव्हा त्याने भव्य वैभवातून आलेला आवाज ऐकला” किंवा “जेंव्हा त्याने भव्य वैभवातून येणारा आवाज त्याच्याशी बोलताना ऐकला” किंवा “जेंव्हा भव्य वैभव त्याच्याशी बोलले” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
τῆς Μεγαλοπρεποῦς Δόξης
पेत्र देवाला त्याच्या वैभवाच्या संज्ञेत संदर्भित करतो. हे एक शोभनभाषित आहे जे देवाचे नाव घेणे त्याच्याबद्दल असणाऱ्या आदरामुळे टाळते. पर्यायी भाषांतर: “देव, सर्वोच्च वैभव, म्हणतो” (पहा: लक्षणालंकार आणि शिष्टोक्ती)
2 Peter 1:18
ταύτην τὴν φωνὴν ἡμεῖς ἠκούσαμεν ἐξ οὐρανοῦ, ἐνεχθεῖσαν
“आम्ही,” या शब्दासह पेत्र त्याला आणि याकोब आणि योहान या शिष्यांना संदर्भित करत आहे, ज्यांनी देवाचा आवाज ऐकला. पर्यायी भाषांतर: “आम्ही स्वतः स्वर्गातून आलेला आवाज ऐकला आहे” (पहा: अनन्य आणि सर्वसमावेशक "आम्ही")
ταύτην τὴν φωνὴν…ἠκούσαμεν ἐξ οὐρανοῦ, ἐνεχθεῖσαν
अशा एकाचा आवाज ऐकला जो स्वर्गातून बोलला
σὺν αὐτῷ, ὄντες
आम्ही येशुबरोबर होतो
2 Peter 1:19
पेत्र विश्वासणाऱ्यांना खोट्या शिक्षकांबद्दल चेतावणी देण्यास सुरवात करतो.
καὶ ἔχομεν βεβαιότερον τὸν προφητικὸν λόγον
ज्या गोष्टी पेत्र आणि इतर प्रेषितांनी पहिल्या, ज्याचे वर्णन त्याने आधीच्या वचनात केले, त्या गोष्टी संदेष्टये जे काही बोलले त्याची खात्री करतात. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कारण ज्या गोष्टी आम्ही बघितल्या त्याने या भविष्यवाणीचा संदेश अधिक निश्चित करतो” (पहा: गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती आणि कर्तरी किंवा कर्मरी)
καὶ ἔχομεν
येथे “आपण” या शब्दाचा संदर्भ सर्व विश्वासणाऱ्यांशी येतो, ज्यामध्ये पेत्र आणि त्याचे वाचक समाविष्ट आहेत. (पहा: समावेशक आणि अनन्य "आम्ही")
βεβαιότερον τὸν προφητικὸν λόγον
याचा संदर्भ जुन्या कराराशी येतो. पर्यायी भाषांतर: “वचने, जी संदेष्टये बोलले, बनवले” (पहा: गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती)
ᾧ καλῶς ποιεῖτε προσέχοντες
पेत्र विश्वासणाऱ्यांना भविष्यवाणीच्या संदेशाकडे अधिक लक्ष देण्याची सूचना करतो.
ὡς λύχνῳ φαίνοντι ἐν αὐχμηρῷ τόπῳ, ἕως οὗ ἡμέρα διαυγάσῃ
पेत्र भविष्यवाणीच्या शब्दाची तुलना दिव्याबरोबर करतो जो अंधारात सकाळचा उजेड येईपर्यंत प्रकाश देतो. सकाळ होणे हे ख्रिस्ताच्या येण्याला संदर्भित करते. (पहा: उपमा अलंकार)
φωσφόρος ἀνατείλῃ ἐν ταῖς καρδίαις ὑμῶν
पेत्र ख्रिस्ताबद्दल जसे की तो “प्रभातेचा तारा” आहे असे बोलतो, जो दिवसाच्या सुरवातीला आणि अंधाराच्या शेवटाला सूचित करतो. ख्रिस्त सर्व विश्वासणाऱ्यांच्या हृदयात त्यांच्या सर्व संशयाचा शेवट करून आणि तो कोण आहे याबद्दल पूर्ण समज आणून प्रकाश आणेल. येथे “हृदय” हे लोकांच्या विचारांबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्त त्याचा प्रकाश तुमच्या हृदयावर पाडेल जसा प्रभातेचा तारा त्याचा प्रकाश जगात पाडतो” (पहा: रूपक आणि लक्षणालंकार)
φωσφόρος
“प्रभातेचा तारा” याचा संदर्भ शुक्र ग्रहाशी येतो, जो कधीकधी सूर्य उगवायच्या आधी उगवतो आणि पाहाट होत आहे हे सूचित करतो.
2 Peter 1:20
τοῦτο πρῶτον γινώσκοντες
अतिशय महत्वाचे, तुम्हाला हे समजलेच पाहिजे
προφητεία…ἰδίας ἐπιλύσεως οὐ γίνεται
शक्य अर्थ हे आहेत 1) संदेष्टये त्यांच्या भविष्यवाण्या स्वतः करत नाहीत किंवा 2) लोकांनी भविष्यवाणी समजण्यासाठी पवित्र आत्म्यावर अवलंबून राहिले पाहिजे किंवा 3) लोकांनी भविष्यवाणींचा अर्थ विश्वासणाऱ्यांच्या संपूर्ण ख्रिस्ती लोकांच्या मदतीने लावला पाहिजे.
2 Peter 1:21
ὑπὸ Πνεύματος Ἁγίου φερόμενοι, ἐλάλησαν ἀπὸ Θεοῦ ἄνθρωποι
पेत्र पवित्र आत्मा संदेष्ट्यांना देवाची त्यांनी जे लिहावे अशी इच्छा आहे ते लिहिण्यास मदत करतो याबद्दल बोलतो जसे की पवित्र आत्मा त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेतो. पर्यायी भाषांतर: “जसे पवित्र आत्म्याने त्यांना निर्देश दिले तसे ते लोक देवाकडून बोलले” (पहा: रूपक)
2 Peter 2
2 पेत्र 02 सामान्य माहिती
या अधिकारातील विशेष संकल्पना
देह
“देह” हे मनुष्याच्या पापी स्वभावासाठीचे रूपक आहे. हा मनुष्याच्या शरीराचा भाग नाही जो की पापमय आहे. “देह” हा मनुष्याच्या स्वभावाला प्रदर्शीत करतो जो देवाच्या गोष्टी नाकारतो आणि जे पापमय आहे त्याची इच्छा करतो. अशी स्थिती सर्व मनुष्यांची त्यांनी येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे पवित्र आत्मा प्राप्त करण्यापूर्वी होती. (पहा: देह)
गूढ माहिती
2:4-8 मध्ये अनेक साम्य आहेत ज्यांना समजणे अवघड आहे जर जुन्या कराराचे भाषांतर झालेले नसेल. कदाचित अधिक स्पष्टीकरण आवश्यक असेल. (पहा: गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती)
2 Peter 2:1
पेत्र विश्वासणाऱ्यांना खोट्या शिक्षकांबद्दल चेतावणी देण्यास सुरवात करतो.
ἐγένοντο…ψευδοπροφῆται ἐν τῷ λαῷ…καὶ ἐν ὑμῖν ἔσονται ψευδοδιδάσκαλοι
जसे खोटे शिक्षक इस्राएलला फसवण्यासाठी आले होते, तसेच खोटे शिक्षक ख्रिस्ताबद्दल खोटे शिकवण्यासाठी येतील.
αἱρέσεις ἀπωλείας
“पाखंडी मत” या शब्दाचा संदर्भ मत जे ख्रिस्ताचे शिक्षण आणि प्रेषितांच्या शिक्षणाच्या विरुद्ध आहे याच्याशी येतो. ही पाखंडी मते अशा लोकांच्या विश्वासाचा नाश करतात ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे.
τὸν ἀγοράσαντα αὐτοὺς Δεσπότην
येथे “स्वामी” या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो ज्याचे स्वतःचे दास असतात. पेत्र येशूबद्दल लोकांचा मालक असे बोलतो ज्यांना त्याने त्याच्या मृत्यूची किंमत देऊन विकत घेतले आहे. (पहा: रूपक आणि गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती)
2 Peter 2:2
ταῖς ἀσελγείαις
अनैतिक लैंगिक स्वभाव
ἡ ὁδὸς τῆς ἀληθείας βλασφημηθήσεται
“सत्याचा मार्ग” या वाक्यांशाचा संदर्भ ख्रिस्ती विश्वास एक देवाकडे जाण्याचा खरा मार्ग याच्याशी येतो. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “अविश्वासणारे सत्याच्या मार्गाची निंदा करतील” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
2 Peter 2:3
πλαστοῖς λόγοις ὑμᾶς ἐμπορεύσονται
तुम्ही त्यांना पैसे देण्यासाठी तुम्हाला ते खोटे बोलून तयार करतील
οἷς τὸ κρίμα…οὐκ ἀργεῖ, καὶ ἡ ἀπώλεια αὐτῶν οὐ νυστάζει
पेत्र “निषेध” आणि “विनाश” यांच्याबद्दल बोलतो जसे की ते मनुष्य आहेत जे कृती करतात. दोन वाक्यांश मूळतः एकच गोष्ट आहे आणि ते किती लवकर खोट्या शिक्षकांचा निषेध केला जाईल यावर भर देतात. (पहा: चेतनगुणोक्ती आणि समांतरता)
οἷς τὸ κρίμα…οὐκ ἀργεῖ, καὶ ἡ ἀπώλεια αὐτῶν οὐ νυστάζει
तुम्ही या वाक्यांशाचे भाषांतर क्रियापदासह सकारात्मक सज्ञांमध्ये करू शकता. पर्यायी भाषांतर: “देव लवकरच त्यांचा निषेध करील; तो त्यांचा नाश करण्यासाठी तयार आहे” (पहा: दुहेरी नकारात्मक)
2 Peter 2:4
पेत्र अशा लोकांचे उदाहरण देतो ज्यांनी देवाच्या विरोधामध्ये कृती केली आणि त्यांनी जे काही केले त्याबद्दल ज्यांना देवाने शिक्षा केली.
οὐκ ἐφείσατο
शिक्षा देण्यापासून परावृत्त झाला नाही किंवा “शिक्षा केली”
ταρταρώσας
“तार्तारास” हा शब्द ग्रीक धर्मातील एक संज्ञा आहे जिचा संदर्भ अशी जागा जिथे दुष्ट आत्मे आणि दुष्ट माणसे जी मेलेली आहेत त्यांना शिक्षा केली जाते याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्याने त्यांना नरकात टाकले” (पहा: नावे कशी भाषांतरित करावीत)
σειροῖς ζόφου…τηρουμένους
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेथे तो त्यांना भयंकर अंधारातील कैदेत ठेवेल” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
σειροῖς ζόφου
शक्य अर्थ हे आहेत 1) “अतिशय अंधाऱ्या जागेतील कैदेत” किंवा 2) अतिशय खोल अंधकार जे त्यांना कैदेत टाकल्यासारखे भासते.” (पहा: रूपक)
εἰς κρίσιν
याचा संदर्भ न्यायाच्या दिवसाशी येतो जेंव्हा देव प्रत्येक मनुष्याचा न्याय करेल.
2 Peter 2:5
ἀρχαίου κόσμου οὐκ ἐφείσατο
येथे “जग” या शब्दाचा संदर्भ त्यात राहणाऱ्या लोकांशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्याने प्राचीनकाळी राहणाऱ्या लोकांना सोडले नाही” (पहा: लक्षणालंकार)
ὄγδοον, Νῶε…ἐφύλαξεν
देवाने जेंव्हा प्राचीन जगातील लोकांचा नाश केला तेंव्हा नोहा आणि त्याच्याबरोबर असलेल्या सात लोकांचा नाश केला नाही.
2 Peter 2:6
πόλεις Σοδόμων καὶ Γομόρρας τεφρώσας
सदोम आणि गमोरा या शहरांना अग्नीने राख होईपर्यंत जाळून टाकले
καταστροφῇ κατέκρινεν
येथे “त्यांना” या शब्दाचा संदर्भ सदोम आणि गमोरा आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांशी येतो.
ὑπόδειγμα μελλόντων ἀσεβέσιν
जे लोक देवाची अवज्ञा करतील त्यांच्याबरोबर काय होईल याबद्दल सदोम आणि गमोरा यांनी एक उदाहरण आणि चेतावणी दिली.
2 Peter 2:7
पेत्र लोटाचे उदाहरण देतो, ज्याला देवाने अशा लोकांच्यामधून सोडवले जे शिक्षेच्या योग्य होते.
τῆς τῶν ἀθέσμων ἐν ἀσελγείᾳ ἀναστροφῆς
लोकांचा अनैतिक स्वभाव ज्याने देवाचे नियम मोडले
2 Peter 2:8
ὁ δίκαιος
याचा संदर्भ लोटाशी येतो.
ψυχὴν δικαίαν…ἐβασάνιζεν
येथे “आत्मा” याचा संदर्भ लोटाचे विचार आणि भावना यांच्याशी येतो. सदोम आणि गमोरा शहरातील नागरिकांच्या अनैतिक वागणुकीने त्याला भावनिकदृष्ट्या त्रास दिला होता. पर्यायी भाषांतर: “अनेक पीडा होत होत्या” (पहा: उपलक्षण)
2 Peter 2:10
पेत्र पापी मनुष्यांच्या गुणधर्मांचे वर्णन करण्यास सुरवात करतो.
μάλιστα
“हा” या शब्दाचा संदर्भ 2 पेत्र 2:9 मध्ये देवाने पापी मनुष्यांना न्यायाच्या दिवसापर्यंत कैदेत ठेवण्याशी येतो.
τοὺς…σαρκὸς ἐν ἐπιθυμίᾳ μιασμοῦ πορευομένους
येथे “देहाच्या इच्छा” या वाक्यांशाचा संदर्भ पापी स्वभावाच्या इच्छा यांच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “असे जे त्यांच्या भ्रष्ट, पापी इच्छांना पूर्ण करत राहतात”
κυριότητος καταφρονοῦντας
देवाच्या अधिकाराला समर्पित होण्यास नकार देतात. येथे “अधिकार” या शब्दाचा संदर्भ कदाचित देवाचा अधिकार याच्याशी येतो.
κυριότητος
येथे “अधिकार” याचा अर्थ देव असा होतो, ज्याला आज्ञा देण्याचा आणि अवज्ञा करणाऱ्याला शिक्षा करण्याचा अधिकार आहे. (पहा: लक्षणालंकार)
αὐθάδεις
त्यांची जे करण्याची इच्छा आहे ते करत
δόξας
या वाक्यांशाचा संदर्भ आत्मिक गोष्टींशी येतो, जसे की देवदूत किंवा सैतान.
2 Peter 2:11
ἰσχύϊ καὶ δυνάμει μείζονες
खोट्या शिक्षकांपेक्षा अधिक सामर्थ्य आणि ताकद
οὐ φέρουσιν κατ’ αὐτῶν…βλάσφημον κρίσιν
“ते” या शब्दाचा संदर्भ दुतांशी येतो. “त्यांना” या शब्दाचे शक्य अर्थ हे आहेत 1) वैभवशाली जन किंवा 2) खोटे शिक्षक.
φέρουσιν κατ’ αὐτῶν…βλάσφημον κρίσιν
दूत त्यांना दोष देतील ही संकल्पना बोलली आहे जसे की ते त्यांच्यावर दोषारोपाला शस्त्र असे वापरून हल्ला करतील. (पहा: रूपक)
2 Peter 2:12
οὗτοι…ὡς ἄλογα ζῷα, γεγεννημένα φυσικὰ εἰς ἅλωσιν καὶ φθοράν
ज्या प्रकारे प्राणी तर्क करू शकत नाहीत, तसेच या लोकांच्या बरोबर तर्क केला जाऊ शकत नाही. पर्यायी भाषांतर: “हे खोटे शिक्षक तर्कहीन प्राण्यांसारखे आहेत ज्यांना बंदी बनवून त्यांचा नाश केला जाईल” (पहा: रूपक)
ἐν οἷς ἀγνοοῦσιν βλασφημοῦντες
त्यांना जे माहित नाही किंवा समजत नाही त्याबद्दल ते वाईट बोलतात.
φθαρήσονται
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव त्यांचा नाश करील” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
2 Peter 2:13
ἀδικούμενοι μισθὸν ἀδικίας
पेत्र शिक्षेबद्दल बोलतो जिला खोटे शिक्षक प्राप्त करतील जसे की तो एक पुरस्कार आहे. पर्यायी भाषांतर: “त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल ज्यासाठी ते पात्र आहेत ते त्यांना मिळेल” (पहा: विडंबन)
τὴν ἐν ἡμέρᾳ τρυφήν
“ऐष आराम” या शब्दाचा संदर्भ अनैतिक कृत्यांशी येतो ज्यामध्ये खादाडपण, दारूबाजी, आणि लैंगिक कृत्यांचा समावेश होतो. या गोष्टी दिवसा करणे हे याला सूचित करते की या लोकांना या वागणुकीची लाज वाटत नाही.
σπίλοι καὶ μῶμοι
“डाग” आणि “ठिपके” हे शब्द सारखाच अर्थ सांगतात. पेत्र खोट्या शिक्षकांबद्दल बोलतो जसे की ते कपड्यांवर पडलेले डाग आहेत, जो त्या कपड्यांना घालतो त्याला लाज आणतात. पर्यायी भाषांतर: “ते कपड्यांवर पडलेल्या डाग आणि ठिपक्यांसारखे आहेत, जे मानहानी करतात” (पहा: रूपक आणि दुप्पट काम)
2 Peter 2:14
ὀφθαλμοὺς ἔχοντες μεστοὺς μοιχαλίδος
येथे “डोळे” त्यांच्या इच्छांचे प्रतिनिधित्व करतात आणि “डोळे भरून” याचा अर्थ त्यांना नेहमी काहीतरी हवे असते असा होतो. पर्यायी भाषांतर: “त्यांना नेहमी व्यभिचार करायचा असतो” (पहा: लक्षणालंकार)
ἀκαταπαύστους ἁμαρτίας
जरी त्यांनी त्याची वासना पूर्ण करण्यासाठी पाप केले, तरी जे पाप ते करतात ते कधीही तृप्त होत नाही.
δελεάζοντες ψυχὰς ἀστηρίκτους
येथे “आत्मा” या शब्दाचा संदर्भ व्यक्तींशी येतो. पर्यायी भाषांतर: “ते अस्थिर लोकांना भुरळ घालतात” (पहा: उपलक्षण)
καρδίαν γεγυμνασμένην πλεονεξίας
येथे “हृदय” या शब्दाचा संदर्भ मनुष्याचे विचार आणि भावना याच्याशी येतो. त्यांच्या सवयींच्या कार्यामुळे, त्यांनी स्वतःला लोभ टाळण्यासाठी आणि कार्य करण्यास प्रशिक्षित केले आहे. (पहा: लक्षणालंकार)
2 Peter 2:15
καταλειπόντες εὐθεῖαν ὁδὸν, ἐπλανήθησαν ἐξακολουθήσαντες
या खोट्या शिक्षकांनी योग्य मार्ग सोडला आहे, आणि अनुसरण करण्यासाठी ते भलतीकडे गेले आहेत. खोट्या शिक्षकांनी देवाची आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे कारण त्यांनी जे योग्य आहे ते नाकारले आहे.
εὐθεῖαν ὁδὸν
योग्य वर्तणूक जी देवाचा सन्मान करते याबद्दल बोलले आहे जसे की तो एक अनुसरण करण्याचा मार्ग आहे. (पहा: रूपक)
2 Peter 2:16
ἔλεγξιν…ἔσχεν
तुम्ही निर्देशित करू शकता की तो देव होता ज्याने बलामाला दोष दिला. पर्यायी भाषांतर: देवाने त्याला दोष दिला” (पहा: भाववाचक नामे)
ὑποζύγιον ἄφωνον ἐν ἀνθρώπου φωνῇ φθεγξάμενον
एक गाढव, जे स्वभावतः बोलू शकत नाही, ते मानवी आवाजात बोलले.
ἐκώλυσεν τὴν τοῦ προφήτου παραφρονίαν
देवाने संदेष्ट्याच्या मूर्खपणाच्या कृतीला थांबवण्यासाठी गाढवाचा वापर केला. (पहा: लक्षणालंकार)
2 Peter 2:17
οὗτοί εἰσιν πηγαὶ ἄνυδροι
पाण्याने वाहणारे झरे हे तहानलेल्या लोकांसाठी ताजे करण्याचे वचन आहेत, परंतु “पाण्याविना वाहणारे झरे” हे तहानलेल्या लोकांना निराश करून सोडते. त्याच प्रकारे, खोटे संदेष्ट्ये आहेत, जरी त्यांनी अनेक गोष्टींचे वचन दिले, तरी ज्याचे वचन त्यांनी दिले आहे ते करण्यात असमर्थ आहेत. (पहा: रूपक)
ὁμίχλαι ὑπὸ λαίλαπος ἐλαυνόμεναι
जेंव्हा लोक वादळी ढग पाहतात, तेंव्हा ते पाऊस पडण्याची अपेक्षा करतात. जेंव्हा वादळातील हवा ढगांना पाऊस पडण्याच्या आधी दूर घेऊन जाते, तेंव्हा लोक निराश होतात. त्याच प्रकारे, खोटे संदेष्ट्ये आहेत, जरी त्यांनी अनेक गोष्टींचे वचन दिले, तरी ज्यांचे वचन त्यांनी दिले आहे ते करण्यात असमर्थ आहेत. (पहा: रूपक)
οἷς ὁ ζόφος τοῦ σκότους τετήρηται
“त्यांना” हा शब्द खोट्या संदेष्ट्यांना संदर्भित करतो. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्यांच्यासाठी गडद अंधकाराचा अंधार राखून ठेवला आहे” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
2 Peter 2:18
ὑπέρογκα…ματαιότητος φθεγγόμενοι
ते प्रभावी परंतु अर्थहीन शब्दांचा वापर करतात.
δελεάζουσιν ἐν ἐπιθυμίαις σαρκὸς ἀσελγείαις
ते लोकांना अनैतिक आणि पापी कृत्यांमध्ये अडकवून ठेवण्यासाठी पापी स्वभावाचे आवाहन करतात.
τοὺς ὀλίγως ἀποφεύγοντας τοὺς ἐν πλάνῃ ἀναστρεφομένους
हा वाक्यांश अशा लोकांना संदर्भित करतो जे अलीकडेच विश्वासणारे बनले आहेत. “जे लोक चुका करत राहतात,” या वाक्यांशाचा संदर्भ अविश्वासणारे जे अजूनसुद्धा पापात आहेत त्यांच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “जे लोक जसे बाकीचे लोक पापात जीवन जगत होते तसे आधीचे जीवन जगण्याऐवजी धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात” (पहा: गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती)
τοὺς ὀλίγως ἀποφεύγοντας
पेत्र अशा लोकांच्याबद्दल बोलतो जे पाप करत राहतात जसे की ते पापाचे गुलाम आहेत ज्यांना गुलामीतून सोडवण्याची गरज आहे. (पहा: रूपक)
2 Peter 2:19
ἐλευθερίαν αὐτοῖς ἐπαγγελλόμενοι, αὐτοὶ δοῦλοι ὑπάρχοντες τῆς φθορᾶς
येथे स्वतंत्रता हा स्वतःला जसे हवे तसे जगण्याची क्षमता यासाठीचा शब्दबंध आहे. पर्यायी भाषांतर: “ते त्यांना तसेच जीवन जगण्याची क्षमता देण्याचे वचन देतात जसे त्यांची इछा आहे, परंतु ते स्वतः त्यांच्या पापी इच्छांमधून सुटलेले नाहीत” (पहा: रूपक)
ἐλευθερίαν…ἐπαγγελλόμενοι…δοῦλοι…τῆς φθορᾶς
पेत्र अशा लोकांच्याबद्दल बोलतो जे पाप करत राहतात जसे की ते पापाचे गुलाम आहेत ज्यांना गुलामीतून सोडवण्याची गरज आहे. (पहा: रूपक)
ᾧ γάρ τις ἥττηται, τούτῳ δεδούλωται
पेत्र एका व्यक्तीला गुलाम असे बोलतो जेंव्हा त्या व्यक्तीवर दुसऱ्या गोष्टीचे नियंत्रण असते, आणि ती गोष्ट त्या व्यक्तीची स्वामी अशी असते. पर्यायी भाषांतर: “कारण, जर कोणाचे एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण असेल तर ती व्यक्ती त्याच्यासाठी एक गुलाम अशी बनून जाते” (पहा: रूपक)
2 Peter 2:20
“ते” आणि “त्यांना” या शब्दांचा संदर्भ खोट्या शिक्षकांशी येतो ज्यांच्याबद्दल पेत्र 12-19 या वचनात बोलतो.
εἰ…ἀποφυγόντες…δὲ πάλιν ἐμπλακέντες ἡττῶνται, γέγονεν…τὰ ἔσχατα χείρονα τῶν πρώτων
हे वाक्य एका सशर्त विधानाचे वर्णन आहे जे सत्य आहे. खोटे शिक्षक एके वेळी “सुटू” शकतात, परंतु जर ते परत त्यामध्ये गुंतले ... आणि पराभूत झाले, तर “शेवटची अवस्था ही ... अगोदरच्या अवस्थेपेक्षा वाईट होईल.”
τὰ μιάσματα τοῦ κόσμου
“भ्रष्ट” या शब्दाचा संदर्भ पापी स्वभाव जो एखाद्याला नैतिकदृष्ट्या अशुद्ध बनवतो. “जग” याचा संदर्भ मानवी समुदायाशी येतो. पर्यायी भाषांतर: “पापी मानवी समुदायातील भ्रष्ट सवयी” (पहा: लक्षणालंकार)
ἐν ἐπιγνώσει τοῦ Κυρίου…καὶ Σωτῆρος, Ἰησοῦ Χριστοῦ
तुम्ही “ज्ञान” याचे भाषांतर मौखिक वाक्यांश वापरून करू शकता. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर 2 पेत्र 1:2 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याला जानण्याद्वारे” (पहा: भाववाचक नामे)
γέγονεν αὐτοῖς τὰ ἔσχατα χείρονα τῶν πρώτων
त्यांची स्थिती पहिल्यापेक्षा अधिक वाईट आहे
2 Peter 2:21
τὴν ὁδὸν τῆς δικαιοσύνης
पेत्र जीवनाला “मार्ग” किंवा रस्ता असे बोलतो. या वाक्यांशाचा संदर्भ देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याशी येतो. (पहा: रूपक)
ὑποστρέψαι ἐκ τῆς…ἁγίας ἐντολῆς
येथे “च्या पासून वळा” हे एखादी गोष्ट करण्याचे थांबवा यासाठीचे रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “पवित्र आज्ञा पाळावयाच्या थांबवा” (पहा: रूपक)
τῆς παραδοθείσης αὐτοῖς ἁγίας ἐντολῆς
हे कर्तरी साज्ञांमध्ये सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्यांना दिलेल्या पवित्र आज्ञा” किंवा “पवित्र आज्ञा ज्याबद्दल देवाने हे निश्चित केले की त्या त्यांना प्राप्त होतील” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
2 Peter 2:22
συμβέβηκεν αὐτοῖς τὸ τῆς ἀληθοῦς παροιμίας
हे नितीसुत्र त्यांना लागू होते किंवा “हे नितीसुत्र त्यांचे वर्णन करते”
κύων ἐπιστρέψας ἐπὶ τὸ ἴδιον ἐξέραμα, καί, ὗς λουσαμένη, εἰς κυλισμὸν βορβόρου
पेत्र खोटे शिक्षक कसे आहेत याचे उदाहरण देण्यासाठी दोन नितीसुत्रांचा वापर करतो, जरी त्यांना “धर्मिकांचा मार्ग” माहित असला तरी ते त्याच्यापासून अशा गोष्टींकडे वळले आहेत ज्या त्यांना नैतिकदृष्ट्या आणि आत्मिकदृष्ट्या अशुद्ध करतात. (पहा: नीतिसुत्रे)
2 Peter 3
2 पेत्र 03 सामान्य माहिती
या अधिकारातील विशेष संकल्पना
आग
लोक बऱ्याचदा आगीचा वापर गोष्टींना नष्ट करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट त्यातील कचरा आणि निरुपयोगी घटक नष्ट करून शुद्ध करण्यासाठी करतात. म्हणून जेंव्हा देव दुष्टाला शिक्षा करतो किंवा त्याच्या लोकांना शुद्ध करतो तेंव्हा सहसा ते आगीशी संबंधित असते. (पहा: आग (अग्नी), अग्निपात्रे, शेकोट्या, अग्नीचे भांडे, अग्नीची भांडी)
प्रभूचा दिवस
देव येण्याच्या दिवसाची अचूक वेळ हि लोकांच्यासाठी एक अनपेक्षित गोष्ट असेल. “जसा रात्रीचा चोर येतो तसा” ही एक उपमा आहे. या कारणामुळे ख्रिस्ती लोकांनी प्रभूच्या आगमनासाठी तयार असले पाहिजे. (पहा: प्रभूचा दिवस, यहोवाचा दिवस आणि उपमा अलंकार)
2 Peter 3:1
पेत्र शेवटच्या दिवसांबद्दल बोलण्यास सुरवात करतो.
διεγείρω ὑμῶν…τὴν εἰλικρινῆ διάνοιαν
पेत्र त्याच्या वाचकांना या गोष्टींबद्दल विचार करण्यास भाग पाडण्याबद्दल बोलत आहे जसे की तो त्यांना झोपेतून उठवत आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही शुद्ध विचार करावा यासाठी कारणीभूत होणे” (पहा: रूपक)
2 Peter 3:2
τῶν προειρημένων ῥημάτων, ὑπὸ τῶν ἁγίων προφητῶν
हे कर्तरी स्वरुपात संगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “फार पूर्वी पवित्र संदेष्ट्याद्वारे बोलले गेलेले शब्द”(पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
τῆς τῶν ἀποστόλων ὑμῶν ἐντολῆς τοῦ Κυρίου καὶ Σωτῆρος
हे कर्तरी स्वरुपात संगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आपला प्रभू आणि तारणारा याची आज्ञा, जी तुमच्या प्रेषितांनी तुम्हाला दिली होती” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
2 Peter 3:3
τοῦτο πρῶτον γινώσκοντες
ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे हे माहित असू द्या. तुम्ही याचे भाषांतर 2 पेत्र 1:20मध्ये कसे केले आहे ते पहा.
κατὰ τὰς ἰδίας ἐπιθυμίας αὐτῶν πορευόμενοι
येथे “इच्छा” या शब्दाचा संदर्भ पापमय इछा जी देवाच्या इच्छेला विरोध करते त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्यांच्या स्वतःच्या पापी इछेच्या अनुसार जीवन जगतील” (पहा: गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती)
πορευόμενοι
कृती, वागणूक
2 Peter 3:4
ποῦ ἐστιν ἡ ἐπαγγελία τῆς παρουσίας αὐτοῦ
थट्टा करणारे, हा अलंकारिक प्रश्न येशू परत येईल याच्यावर ते विश्वास ठेवीत नाहीत यावर भर देण्यासाठी विचारतात. “वचन” या शब्दाचा संदर्भ येशू परत येईल या वचनाच्या पुर्णतेशी येतो. पर्यायी भाषांतर: “येशू परत येणार हे वचन खरे नाही! तो परत येणार नाही!” (पहा: वक्तृत्वविषयक प्रश्न आणि लक्षणालंकार)
οἱ πατέρες ἐκοιμήθησαν
येथे “वडील” यांचा संदर्भ पूर्वज जे फार वर्षापूर्वी जिवंत होते त्यांच्याशी येतो. झोपले ह्या शब्दाला मरणासाठीच सौम्य शब्दात सांगीतले आहे. पर्यायी भाषांतर: “आपले पूर्वज मेले” (पहा: शिष्टोक्ती)
πάντα οὕτως διαμένει ἀπ’ ἀρχῆς κτίσεως
थट्टा करणारे “सर्व” या शब्दासह अतिशयोक्ती करतात, आणि आतापर्यंत या जगात काहीही बदलले नाही, आणि येशू परत येणार हे सत्य असू शकत नाही असा वाद घालतात. (पहा: अतिशयोक्ती आणि सामान्यीकरण)
ἀπ’ ἀρχῆς κτίσεως
याचे भाषांतर मौखिक वाक्यांश असे केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने जगाची निर्मिती केल्यापासून” (पहा: भाववाचक नामे)
2 Peter 3:5
οὐρανοὶ ἦσαν ἔκπαλαι, καὶ γῆ…συνεστῶσα τῷ τοῦ Θεοῦ λόγῳ
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने स्वर्ग आणि पृथ्वी यांची स्थापना ... खूप आधी त्याच्या शब्दाद्वारे केली” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
ἐξ ὕδατος καὶ δι’ ὕδατος συνεστῶσα
याचा अर्थ असा होतो की, देवाने पाण्यातून भूमीला बाहेर येण्यास भाग पाडले, पाण्याच्या स्रोतांना एकत्रित आणून भूमी प्रकट केली.
2 Peter 3:6
δι’ ὧν
येथे “या गोष्टी” याचा संदर्भ देवाचे शब्द आणि पाणी याच्याशी येतो.
ὁ τότε κόσμος ὕδατι κατακλυσθεὶς ἀπώλετο
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्या वेळी अस्तित्वात असलेल्या जगाला पाण्याचा पूर आणून नाश केले” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
2 Peter 3:7
οἱ…οὐρανοὶ καὶ ἡ γῆ, τῷ αὐτῷ λόγῳ τεθησαυρισμένοι εἰσὶν, πυρὶ
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: देवाने, त्याच शब्दाद्वारे, स्वर्ग आणि पृथ्वी यांना आगीसाठी राखून ठेवले आहे” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
τῷ αὐτῷ λόγῳ
येथे “आज्ञा” देव आहे, जो आज्ञा देईल: येथे “देव, जो समान आज्ञा देईल”
τηρούμενοι εἰς ἡμέραν κρίσεως
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते आणि नवीन वाक्याची सुरवात केली जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “त्याने त्यांना न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
εἰς ἡμέραν κρίσεως καὶ ἀπωλείας τῶν ἀσεβῶν ἀνθρώπων
हे मौखिक वाक्यांशासह सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “अशा दिवसासाठी जेंव्हा तो अधर्मिक लोकांचा न्याय आणि नाश करील” (पहा: भाववाचक नामे)
2 Peter 3:8
μὴ λανθανέτω ὑμᾶς
तुम्ही हे समजून घेण्यास चुकू नका किंवा “याच्याकडे दुर्लक्ष करू नका”
ὅτι μία ἡμέρα παρὰ Κυρίῳ ὡς χίλια ἔτη
हेच की देवाच्या नजरेमध्ये, एक दिवस हजार वर्षांसारखा आहे
2 Peter 3:9
οὐ βραδύνει Κύριος τῆς ἐπαγγελίας
देव त्याचे वचन पूर्ण करण्यास विलंब करणार नाही
ὥς τινες βραδύτητα ἡγοῦνται
काही लोक असा विचार करतात की, देव त्याचे वचन पूर्ण करण्यात सावकाश आहे कारण वेळेचा त्यांचा दृष्टीकोन हा देवाच्या दृष्टीकोनापेक्षा वेगळा आहे.
2 Peter 3:10
δὲ
जरी देव सहनशील असला आणि लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा असली, तरी तो खात्रीने परत येईल आणि न्याय करेल.
ἥξει…ἡμέρα Κυρίου ὡς κλέπτης
पेत्र त्या दिवसाबद्दल बोलत आहे जेंव्हा देव प्रत्येकाचा न्याय करेल जसे की तो दिवस चोर आहे जो अनपेक्षितपणे येतो आणि लोकांना आश्चर्यचकित करून जातो. (पहा: चेतनगुणोक्ती आणि उपमा अलंकार)
οἱ οὐρανοὶ…παρελεύσονται
आकाश नष्ट होईल
στοιχεῖα…καυσούμενα λυθήσεται
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव सृष्टीतत्वे आगीने जाळून टाकील” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
στοιχεῖα
शक्य अर्थ हे आहेत 1) आकाशातील अस्तित्वे जसे की सूर्य, चंद्र, आणि तारे किंवा 2) अशा गोष्टी ज्यांनी मिळून आकाश आणि पृथ्वी बनते, जसे की, माती, हवा, अग्नी, आणि पाणी.
γῆ καὶ τὰ ἐν αὐτῇ ἔργα εὑρεθήσεται
देव सर्व पृथ्वीला आणि प्रत्येकाच्या कृत्यांना बघेल, आणि नंतर तो प्रत्येकाचा न्याय करेल. हे कर्तरी संज्ञात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव पृथ्वी आणि तिच्यावरील लोक जे काही करतात ते सर्व उघड करील” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
2 Peter 3:11
पेत्र विश्वासणाऱ्यांना सांगण्यास सुरवात करतो की, त्यांनी प्रभूच्या दिवसाची वाट बघत कसे जीवन जगले पाहिजे.
τούτων οὕτως πάντων λυομένων
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कारण देव या सर्व गोष्टी याप्रकारे नष्ट करील” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
ποταποὺς δεῖ ὑπάρχειν?
पेत्र या अलंकारिक प्रश्नाचा वापर तो पुढे जे सांगणार आहे त्यावर भर देण्यासाठी करतो, की, त्यांनी “पवित्र आणि दैवी जीवन जगले पाहिजे.” पर्यायी भाषांतर: “तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक असले पाहिजे हे तुम्हाला माहित आहे” (पहा: वक्तृत्वविषयक प्रश्न)
2 Peter 3:12
οὐρανοὶ πυρούμενοι, λυθήσονται, καὶ στοιχεῖα καυσούμενα, τήκεται
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव आकाश अग्नीद्वारे नष्ट करील, आणि तो सृष्टीतत्वे अतिशय तापवून वितळवील” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
στοιχεῖα
शक्य अर्थ हे आहेत 1) आकाशातील अस्तित्वे जसे की सूर्य, चंद्र, आणि तारे किंवा 2) अशा गोष्टी ज्यांनी मिळून आकाश आणि पृथ्वी बनते, जसे की, माती, हवा, अग्नी, आणि पाणी. तुम्ही याचे भाषांतर 2 पेत्र 3:10 मध्ये कसे केले आहे ते पहा.
2 Peter 3:13
ἐν οἷς δικαιοσύνη κατοικεῖ
पेत्र “धार्मिकता” याबद्दल बोलतो जसे की ती एक व्यक्ती आहे. हे अशा लोकांच्यासाठी लक्षणा आहे जे धार्मिक आहेत. पर्यायी भाषांतर: “जेथे धार्मिक लोक राहतील” किंवा “जेथे लोक धार्मिकतेने राहतील” (पहा: चेतनगुणोक्ती)
2 Peter 3:14
σπουδάσατε ἄσπιλοι καὶ ἀμώμητοι αὐτῷ εὑρεθῆναι ἐν εἰρήνῃ
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: तुम्ही जेथे देव तुम्हाला दोषरहित आणि निष्कलंक असे पाहील, आणि त्याच्याबरोबर आणि एकमेकांबरोबर शांतीने राहाल अशा प्रकारे जीवन जगण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करा” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
ἄσπιλοι καὶ ἀμώμητοι
“निष्कलंक” आणि “निर्दोष” या शब्दांचा मूळ अर्थ एकच होतो आणि ते नैतिक शुद्धतेवर भर देतात. पर्यायी भाषांतर: “पूर्णपणे शुद्ध” (पहा: दुप्पट काम)
ἄσπιλοι
येथे याचा अर्थ “निर्दोष” असा होतो. (पहा: रूपक)
2 Peter 3:15
τὴν τοῦ Κυρίου ἡμῶν μακροθυμίαν, σωτηρίαν ἡγεῖσθε
कारण देव सहनशील आहे म्हणून न्यायाचा दिवस अजूनपर्यंत आला नाही. हे लोकांना पश्चात्ताप करून वाचावयाची संधी देते, जसे त्याने 2 पेत्र 3:9 मध्ये स्पष्ट केले. पर्यायी भाषांतर: “आणि, आमच्या प्रभूच्या सहनशीलतेबद्दल सुद्धा विचार करा जो तुम्हाला पश्चात्ताप करून वाचण्याची संधी देत आहे” (पहा: गृहित ज्ञान आणि अप्रत्यक्ष माहिती)
κατὰ τὴν δοθεῖσαν αὐτῷ σοφίαν
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्याला दिलेल्या ज्ञानानुसार” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
2 Peter 3:16
ἐν πάσαις ταῖς ἐπιστολαῖς, λαλῶν…περὶ τούτων
पौल त्याच्या सर्व पत्रात देवाची सहनशीलता तारनाकडे नेते याबद्दल बोलतो
ἐν αἷς ἐστιν δυσνόητά τινα
पौलाच्या पत्रात काही गोष्टी आहेत ज्यांना समजणे अवघड आहे.
ἃ οἱ ἀμαθεῖς καὶ ἀστήρικτοι στρεβλοῦσιν
अज्ञानी आणि अस्थिर मनुष्य पौलाच्या पत्रातील समजण्यास अवघड गोष्टींचा चुकीचा अर्थ लावतो.
οἱ ἀμαθεῖς καὶ ἀστήρικτοι
अज्ञानी आणि अस्थिर. या लोकांना वचनांचा अर्थ योग्य रीतीने लावण्यास शिकवलेले नाही आणि त्यांना शुभवर्तमानाच्या सत्यात योग्य रीतीने स्थिरावलेले सुद्धा नाही.
πρὸς τὴν ἰδίαν αὐτῶν ἀπώλειαν
याचा परिणाम त्यांचा स्वतःचा नाश असा होतो
2 Peter 3:17
पेत्र विश्वासणाऱ्यांना सूचना देणे थांबवतो आणि त्याच्या पत्राचा शेवट करतो.
ὑμεῖς…προγινώσκοντες
या गोष्टी याचा संदर्भ देवाच्या सहनशीलतेबद्दलचे सत्य आणि या खोट्या संदेष्ट्यांचे शिक्षण याच्याशी येतो.
φυλάσσεσθε
स्वतःचे रक्षण करा
ἵνα μὴ τῇ τῶν ἀθέσμων πλάνῃ συναπαχθέντες
येथे “भलतीकडे नेणे” हे खोट्या गोष्टींबद्दलची खात्री पटवणे यासाठी रूपक आहे. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेणेकरून त्या खोट्या लोकांनी तुम्हाला फसवू नये आणि तुम्ही चुकीचे काही करण्यास तुम्हाला भाग पाडू नये” (पहा: रूपक आणि कर्तरी किंवा कर्मरी)
ἐκπέσητε τοῦ ἰδίου στηριγμοῦ
विश्वासाबद्दल बोलले आहे जसे की तो एक मालमत्ता आहे ज्याला विश्वासणारा गमावू शकतो. पर्यायी भाषांतर: “तुम्ही विश्वासू असणे थांबवणे” (पहा: रूपक)
2 Peter 3:18
αὐξάνετε…ἐν χάριτι, καὶ γνώσει τοῦ Κυρίου ἡμῶν καὶ Σωτῆρος, Ἰησοῦ Χριστοῦ
येथे त्याच्या दयेत आणि ज्ञानात वाढत जाणे हे त्याच्या दयेचा अधिकाधिक अनुभव करणे आणि त्याला अधिकाधिक ओळखणे याला सूचित करते. अमूर्त संज्ञा “दया” याला “दयेने वागा” या वाक्यांशासह व्यक्त केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याची दया अधिकाधिक प्राप्त करा आणि त्याला अधिकाधिक ओळखा” किंवा “तुमच्याशी आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त कसा दयेने वागला याबद्दल जागरूक असा आणि त्याला अधिक चांगल्या प्रकारे जाणा” (पहा: रूपक आणि भाववाचक नामे)