Jude
Jude front
यहुदाचा परिचय
भाग 1: सामान्य परिचय
यहुदाच्या पुस्तकाची रूपरेषा
- परिचय (1:1-2)
- खोट्या शिक्षकांच्या विरुध्द इशारा (1:3-4)
- जुन्या करारातील उदाहरणे (1:5-16)
- योग्य प्रतिसाद (1:17-23)
- देवाची स्तुती (1:24-25)
यहुदाचे पुस्तक कोणी लिहिले?
लेखक स्वतःची ओळख यहूदा याकोबाचा भाऊ अशी करून देतो. यहूदा आणि याकोब हे दोघेही येशूचे सावत्र भाऊ होते. हे पत्र एखाद्या विशिष्ठ मंडळीसाठी लिहिले आहे का ते माहित नाही.
यहूदाचे पुस्तक कशाबद्दल आहे?
यहुदाने हे पत्र विश्वासू लोकांना खोट्या शिक्षकांपासून सावध करण्यासाठी लिहिले. हे कदाचित असे सूचित करते की, यहूदा हे यहुदी ख्रिस्ती श्रोत्यांना लिहित होता. या आणि पेत्राच्या दुसऱ्या पात्राचा विषय समान आहे. हे दोन्ही पत्र देवदूत, सदोम आणि गमोरा, आणि खोटे शिक्षक यांच्याबद्दल बोलतात.
या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?
भाषांतरकार या पुस्तकाला त्याच्या “यहूदा” या पारंपारिक नावाने बोलवू शकतात, किंवा ते स्पष्ट शीर्षक निवडू शकतात, जसे की, “यहूदाचे पत्र” किंवा “यहुदाने लिहिलेले पत्र.” (पहा: नावे कशी भाषांतरित करावीत)
भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना
यहूदा ज्या लोकांच्या विरुद्ध बोलला ते कोण होते?
यहूदा ज्या लोकांच्या विरुद्ध बोलला ते लोक अज्ञातवासी म्हणून ओळखले गेले असावे हे शक्य आहे. या शिक्षकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वचनांच्या शिक्षणाला विकृत केले. ते अनैतिक मार्गांनी जीवन जगले आणि इतरांना सुद्धा त्यांनी असेच जगण्यास शिकवले.
Jude 1
Jude 1:1
यहूदा स्वतःला या पत्राचा लेखक म्हणून प्रस्तुत करतो आणि वाचकांना अभिवादन करतो. तो कदाचित येशूचा सावत्र भाऊ (ज्यांची आई एक असून वडील वेगळे होते) असावा. नवीन करारामध्ये अजून दोन यहुदांचा उल्लेख आलेला आहे. या पत्रामधील “तुम्ही” हा शब्द ख्रिस्ती लोकांना संदर्भित करतो ज्यांना यहुदाने हे पत्र लिहिले आणि तो नेहमीच अनेकवचनी आहे.
Ἰούδας, Ἰησοῦ Χριστοῦ δοῦλος
यहूदा हा याकोबाचा भाऊ आहे. पर्यायी भाषांतर: मी यहूदा, चा सेवक आहे” (पहा: नावे कशी भाषांतरित करावीत)
ἀδελφὸς…Ἰακώβου
याकोब आणि यहूदा हे येशूचे सावत्र भाऊ होते.
Jude 1:2
ἔλεος ὑμῖν, καὶ εἰρήνη, καὶ ἀγάπη πληθυνθείη
तुमच्यासाठी दया, शांती आणि प्रेम अधिकाधिक वाढत जावो. या कल्पना ह्या अशा पद्धतीने बोलल्या गेल्या की जणू त्या वस्तू आहेत ज्या आकारमानाने आणि संख्येने वाढत जातात. “दया,” “शांती,” आणि “प्रेम” या अमूर्त संज्ञा काढून टाकण्यासाठी याला पुनः सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: देव तुमच्यावर दया करो जेणेकरून तुम्ही शांतीने राहाल आणि एकमेकांवर अधिकाधिक प्रेम करू शकाल (पहा: भाववाचक नामे)
Jude 1:3
या पत्रातील “आमचा” हा शब्द यहूदा आणि विश्वासू या दोघांचा समावेश करतो. (पहा: समावेशक आणि अनन्य "आम्ही")
यहूदा विश्वासू लोकांना हे पत्र लिहिण्यामागचे कारण सांगतो.
τῆς κοινῆς ἡμῶν σωτηρίας
तारण जे आपण वाटतो
ἀνάγκην ἔσχον γράψαι
मला हे लिहिण्याची मोठी गरज वाटली किंवा “मला हे लिहिण्याची तातडीची गरज वाटली”
παρακαλῶν ἐπαγωνίζεσθαι τῇ…πίστει
तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि खऱ्या शिक्षणाचा बचाव करण्यासाठी
ἅπαξ
शेवटी आणि पूर्णपणे
Jude 1:4
παρεισέδυσαν γάρ τινες ἄνθρωποι
काही लोक विश्वासू लोकांच्यामध्ये त्यांच्याकडे जास्त लक्ष जाऊ न देता येतात
οἱ…προγεγραμμένοι εἰς…τὸ κρίμα
हे सक्रीय आवाजात देखील सांगता येऊ शकते. पर्यायी भाषांतर: “लोक ज्यांना देवाने दोष देण्यासाठी निवडले” (पहा: कर्तरी किंवा कर्मरी)
τὴν τοῦ Θεοῦ ἡμῶν χάριτα μετατιθέντες εἰς ἀσέλγειαν
देवाची दया जी बोलली गेली जसे की, ती एखादी गोष्ट आहे जिला काहीतरी भयंकर गोष्टीमध्ये बदलले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जे असे शिक्षण देतात की, देवाची कृपा एखाद्याला लैंगिक पाप करण्यास परवानगी देतात” (पहा: रूपक)
τὸν μόνον Δεσπότην καὶ Κύριον ἡμῶν, Ἰησοῦν Χριστὸν, ἀρνούμενοι
शक्य अर्थ हे आहेत 1) ते असे शिकवतात की तो देव नाही किंवा 2) हे लोक येशू ख्रिस्ताचे आज्ञा पालन करत नाहीत.
Jude 1:5
यहूदा भूतकाळातील अशा लोकांचे उदाहरण देतो ज्यांनी देवाचे अनुसरण केले नाही.
Ἰησοῦς λαὸν ἐκ γῆς Αἰγύπτου σώσας
देवाने इस्राएली लोकांना खूप आधी मिसरमधून सोडवले
Jude 1:6
τὴν ἑαυτῶν ἀρχὴν
देवाने त्यांना जबाबदाऱ्या सोपवल्या
δεσμοῖς ἀϊδίοις ὑπὸ ζόφον τετήρηκεν
देवाने त्या दूतांना अंधाऱ्या कोठडीत टाकले जिथून त्यांना कधीच सुटता मिळणार नाही
ζόφον
येथे “अंधार” हे एक लक्षनिक आहे जे मृत्युच्या जागेचे किंवा नरकाचे प्रतिनिधित्व करते. पर्यायी भाषांतर: “नरकातील पूर्ण अंधारात” (पहा: लक्षणालंकार)
μεγάλης ἡμέρας
शेवटच्या दिवसापर्यंत जेंव्हा देव सर्वांचा न्याय करेल
Jude 1:7
αἱ περὶ αὐτὰς πόλεις
येथे “शहर” याचा अर्थ लोक जे त्यामध्ये राहतात असा होतो. (पहा: लक्षणालंकार)
τὸν ὅμοιον τρόπον τούτοις ἐκπορνεύσασαι
सदोम आणि गमोरा यांचे लैंगिक पाप हे बंड केलेल्या दूतांच्या वाईट कृत्यांचा परिणाम आहेत.
δεῖγμα…δίκην ὑπέχουσαι
सदोम आणि गमोरा येथील लोकांचा नाश हे जे लोक देवाला नाकारतात त्यांच्या विनाशाचे उदाहरण बनले.
Jude 1:8
οὗτοι ἐνυπνιαζόμενοι
जे लोक देवाची अवज्ञा करतात, कदाचित ते असे करण्याचे कारण म्हणजे ते असा दावा करतात की त्यांनी दृष्टांत पहिला ज्याने त्यांना असे करण्याचा अधिकार दिला
σάρκα μὲν μιαίνουσιν
हे रूपक असे सांगते की त्यांच्या पापाने त्यांचे शरीर बनवले-म्हणजेच, त्यांची कृत्ये-नदीमधील कचऱ्याचा अस्वीकृत मार्ग पाण्याला पिण्यायोग्य ठेवत नाही. (पहा: रूपक)
βλασφημοῦσιν
अपमान करतात
δόξας
याचा संदर्भ आत्मिक अस्तित्वाशी येतो, जसे की देवदूत.
Jude 1:9
बालाम हा एक संदेष्टा होता ज्याने शत्रूसाठी इस्राएलाला श्राप देण्याचे नाकारले परंतु नंतर त्याने शिकवले की त्या लोकांना अविश्वासी लोकांच्याबरोबर लग्न करायला लावून त्यांना मूर्तीचे उपासक बनवा. कोरह हा इस्राएली मनुष्य होता ज्याने मोशेच्या नेतृत्वाविरुद्ध आणि अहरोनाच्या याजकपदाविरुद्ध बंड केले.
οὐκ ἐτόλμησεν…ἐπενεγκεῖν
स्वतःचा ताबा घेतला. त्याने आणले नाही किंवा “आणण्याची इच्छा नव्हती”
κρίσιν…βλασφημίας
निंदा-अपमानकारक न्याय किंवा “दुष्ट न्याय”
κρίσιν ἐπενεγκεῖν βλασφημίας
च्याबद्दल खोट्या दुष्ट गोष्टी
Jude 1:10
οὗτοι
अधार्मिक लोक
ὅσα μὲν οὐκ οἴδασιν
असे काहीतरी ज्याचा अर्थ त्यांना माहित नाही. शक्य अर्थ हे आहेत 1) “सर्वकाही चांगले जे ते समजू शकत नाहीत” किंवा 2) “वैभवशाली असा एक, ज्याला ते समजू शकत नाहीत” (यहूदा 1:8).
Jude 1:11
τῇ ὁδῷ τοῦ Κάϊν ἐπορεύθησαν
येथे त्या मार्गात चालले हे “जसे होते तसे त्या मार्गाने जगले” यासाठी एक रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “काईन जगला त्या पद्धतीने जगले” (पहा: रूपक)
Jude 1:12
यहुदाने अधार्मिक लोकांचे वर्णन करण्यासाठी रूपकांच्या मालिकांचा उपयोग केला. त्याने विश्वासू लोकांना त्यांच्यामधील अशा लोकांना कसे ओळखायचे ते सांगितले.
οὗτοί εἰσιν οἱ
यहूदा 1:4 मधील “ते” हा शब्द “अधार्मिक मनुष्यांना” संदर्भित करतो.
σπιλάδες
खडक हे मोठे दगड आहेत जे समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या अतिशय जवळ असतात. ते खूप धोकादायक असतात कारण नावाडी त्यांना बघू शकत नाहीत. (पहा: रूपक)
δὶς ἀποθανόντα ἐκριζωθέντα
एक झाड ज्याला कोणीतरी मुळापासून उपटले आहे ते मृत्युसाठीचे रूपक आहे. (पहा: रूपक)
ἐκριζωθέντα
मुळांपासून जमिनीतून पूर्णपणे उपटलेल्या झाडासारखे अधार्मिक लोक देवापासून वेगळे झालेत, जो जीवनाचा स्त्रोत आहे. (पहा: रूपक)
Jude 1:13
κύματα ἄγρια θαλάσσης
जश्या समुद्राच्या लाटा वादळी वाऱ्याने वाहवल्या जातात, तसेच अधार्मि लोक सहजरीत्या अनेक दिशांना हलवले जातात. (पहा: रूपक)
ἐπαφρίζοντα τὰς ἑαυτῶν αἰσχύνας
जसे वारे मोठ्या लाटा निर्माण करतो ज्याने घाण आणि फेस ढवळून निघतात-तसेच हे लोक त्यांच्या खोट्या शिक्षणांनी आणि कृतींनी स्वतःला लज्जित करतात. पर्यायी भाषांतर: “आणि जशा लाटा फेस आणि घाण आणतात, तसे हे लक इतरांना त्यांच्या लज्जास्पदतेमुळे दुषित करतात” (पहा: रूपक)
ἀστέρες πλανῆται
प्राचीन काळी ज्यांनी ताऱ्यांचा अभ्यास केला त्यांनी असे नमूद केले की, ज्यांना आपण ग्रह म्हणतो ते ताऱ्यांप्रमाणे हालचाल करत नाहीत. पर्यायी भाषांतर: “ते हलणाऱ्या ताऱ्यांसारखे आहेत” (पहा: रूपक)
οἷς ὁ ζόφος τοῦ σκότους εἰς αἰῶνα τετήρηται
येथे “अंधार” हे लक्षणा आहे जे मृत्यूची जागा किंवा नरक यांचे प्रतिनिधित्व करते. येथे “गडद अंधार” ही एक उपमा आहे जिचा अर्थ “खूप भयानक अंधार” असा होतो. “राखून ठेवले आहे” हा वाक्यांश सक्रीय स्वरुपात सांगितला जाऊ शकतो. पर्यायी भाषांतर: “आणि देव त्यांना नरकाच्या खूप भयंकर अंधारात टाकून देईल” (पहा: लक्षणालंकार आणि म्हणी आणि कर्तरी किंवा कर्मरी)
Jude 1:14
ἕβδομος ἀπὸ Ἀδὰμ
जर आदमला मानवजातीची पहिली पिढी असे मोजले गेले, तर हनोख हा सातवा आहे. जर आदमच्या मुलाला पहिला असे मजले गेले, तर हनोख त्या अनुक्रमेत सहावा आहे.
ἰδοὺ
ऐका किंवा “मी जी महत्वाची गोष्ट सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या”
Jude 1:15
ποιῆσαι κρίσιν κατὰ
चा निर्णय करा किंवा “निर्णय करा”
Jude 1:16
γογγυσταί μεμψίμοιροι
लोक ज्यांना आज्ञा पालन करायचे नाही ते दैवी अधिकाराच्या विरुद्ध बोलतात. “कुरकुर करणाऱ्यांचा” कल शांतपणे बोलण्याकडे, तर “तक्रार करणाऱ्यांचा” कल उघडपणे बोलण्याकडे असतो.
λαλεῖ ὑπέρογκα
लोक जे स्वतःची प्रशंसा करतात जेणेकरून इतर लोक ऐकू शकतील.
θαυμάζοντες πρόσωπα
इतरांची चुकीची प्रशंसा करतात
Jude 1:18
κατὰ τὰς ἑαυτῶν ἐπιθυμίας πορευόμενοι τῶν ἀσεβειῶν
या लोकांना असे म्हंटले आहे की जसे काय त्यांच्या इच्छा ह्या त्यांच्यावर राज्य करणाऱ्या राजासारख्या आहेत. पर्यायी भाषांतर: “ज्या वाईट गोष्टी करण्याची त्यांची इच्छा आहे त्या करून ते देवाचा अनादर करण्याचे कधीच थांबवत नाहीत” (पहा: रूपक)
κατὰ τὰς ἑαυτῶν ἐπιθυμίας πορευόμενοι τῶν ἀσεβειῶν
अधार्मिक इच्छा सांगण्यासाठी तो एक मार्ग आहे ज्याचे एखादी व्यक्ती अनुसरण करते असे बोलले आहे. (पहा: रूपक)
Jude 1:19
οὗτοί εἰσιν
हेच ते थट्टा करणारे आहेत किंवा “हे थट्टा करणारे तेच आहेत”
ψυχικοί
इतर अधार्मिक लोक विचार करतात तसा विचार करा, ज्या गोष्टींना अविश्वासू लोक महत्व देतात त्या गोष्टींना हे लोक सुद्धा महत्व देतात (पहा: रूपक)
Πνεῦμα μὴ ἔχοντες
पवित्र आत्मा सांगण्यासाठी तो एखादी गोष्ट आहे जिला धारण केले जाऊ शकते असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “आत्मा त्यांच्यात नाही”
Jude 1:20
यहुदाने विश्वासू लोकांना सांगितले की, त्यांनी कसे जगावे आणि इतरांना कसे वागवावे.
ὑμεῖς δέ, ἀγαπητοί
प्रियांनो, त्यांच्यासारखे होऊ नका. त्याऐवजी
ἐποικοδομοῦντες ἑαυτοὺς
देवावर विश्वास ठेवण्यास व त्याच्या आज्ञेत राहण्यात अधिकाधिक सक्षम बनणे हे सांगण्यासाठी ही एखादी इमारत बांधण्याची प्रक्रिया आहे असे बोलले आहे. (पहा: रूपक)
Jude 1:21
ἑαυτοὺς ἐν ἀγάπῃ Θεοῦ τηρήσατε
देवाचे प्रेम स्वीकार करण्यास सक्षम राहणे हे सांगण्यासाठी एखादा स्वतःला एखाद्या विशिष्ठ ठिकाणी ठेवतो असे बोलले आहे. (पहा: रूपक)
προσδεχόμενοι
उत्सुकतेने वाट पाहत आहे
τὸ ἔλεος τοῦ Κυρίου ἡμῶν, Ἰησοῦ Χριστοῦ, εἰς ζωὴν αἰώνιον
येथे “दया” याचा अर्थ स्वतः येशू ख्रिस्त असा होतो, जो विश्वासू लोकांच्यावर त्यांना त्याच्याबरोबर कायमचे राहायला देऊन दया दाखवील. (पहा: लक्षणालंकार)
Jude 1:22
οὓς…διακρινομένους
येशूच देव आहे असा आतापर्यंत ज्यांनी विश्वास ठेवलेला नाही ते
Jude 1:23
ἐκ πυρὸς ἁρπάζοντες
लोक जाळायला सुरु होण्याच्या आधी त्यांना जाळातून बाहेर ओढले पाहिजे असे ते चित्र आहे. पर्यायी भाषांतर: “लोकांनी ख्रिस्ताला ग्रहण न करता मारण्यापासून वाचवण्यासाठी जे करता येईल ते त्यांच्यासाठी करणे. हे त्यांना जाळातून बाहेर ओढण्यासारखे आहे” (पहा: रूपक)
οὓς…ἐλεᾶτε ἐν φόβῳ
इतरांशी दयाळूपणे वागा, परंतु ते ज्या पद्धतींनी पाप करतात त्याची भीती बाळगा
μισοῦντες καὶ τὸν ἀπὸ τῆς σαρκὸς ἐσπιλωμένον χιτῶνα
यहूदा त्याच्या लोकांना अतिशयोक्तीचा वापर करून इशारा देतो की, ते त्या पापी लोकांसारखे होऊ शकतात. पर्यायी भाषांतर: “त्यांना असे वागवा की, तुम्ही त्यांच्या फक्त कपड्यांना स्पर्श करून पापाचे दोषी बनाल” (पहा: अतिशयोक्ती आणि सामान्यीकरण)
Jude 1:24
यहूदा अशीर्वादासह संपवतो.
στῆσαι κατενώπιον τῆς δόξης αὐτοῦ
त्याचे वैभव हे तेजस्वी प्रकाश आहे, जे त्याच्या महानतेचे प्रतिनिधित्व करते. पर्यायी भाषांतर: “आणि तुला त्याच्या वैभवाचा आनंद घेण्यास आणि त्याची उपासना करण्यास परवानगी देईल” (पहा: रूपक)
τῆς δόξης αὐτοῦ ἀμώμους ἐν
येथे पापाला असे सांगितले आहे की, ते एखाद्याच्या शरीरावरची धूळ किंवा एखाद्याच्या शरीराचा दोष आहे. पर्यायी भाषांतर: “वैभवी उपस्थिती, जेथे तुम्ही पापविना असाल” (पहा: रूपक)
Jude 1:25
μόνῳ Θεῷ Σωτῆρι ἡμῶν, διὰ Ἰησοῦ Χριστοῦ τοῦ Κυρίου ἡμῶν
आणि फक्त देव असेल, ज्याने तुम्हाला जे काही येशू ख्रिस्ताने केले त्यामुळे वाचवले. हे यावर भर देते की, देव जो बाप त्याचप्रमाणे पुत्र दोघेही तारणारे आहेत.
δόξα, μεγαλωσύνη, κράτος, καὶ ἐξουσία, πρὸ παντὸς τοῦ αἰῶνος, καὶ νῦν, καὶ εἰς πάντας τοὺς αἰῶνας. ἀμήν
देवाकडे सर्व गोष्टींचे गौरव, संपूर्ण नेतृत्व, आणि संपूर्ण नियंत्रण, नेहमीच होते, आता आहे, आणि नेहमीच राहील.